MPSC chalu ghadamodi, current affairs

1. सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने झळकावलेल्या नाबाद त्रिशतकी खेळाच्या जोरावर, ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्ध अ‍ॅडलेड कसोटी सामन्यात धावांचा डोंगर उभा केला आहे.

2. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 589 धावांवर आपला डाव घोषित केला. वॉर्नरने 418 चेंडूत 335 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत 39 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.

3. या खेळीदरम्यान वॉर्नरने माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू डॉन ब्रॅडमन यांचा विक्रमही मोडला.

4. कसोटी क्रिकेटमधलं वॉर्नरचं हे पहिलं त्रिशतक ठरलं. कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाकडून त्रिशतक झळकावणारा वॉर्नर चौथा खेळाडू ठरला आहे. याचसोबत अ‍ॅडलेड ओव्हलच्या मैदानावर सर्वोच्च धावसंख्येचा विक्रमही आता वॉर्नरच्या नावे जमा झाला आहे.

5. तर याआधी 29 जानेवारी 1932 रोजी ब्रॅडमन यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अ‍ॅडलेडच्या मैदानावर नाबाद 299 धावांची खेळी केली होती. वॉर्नरने आज त्रिशतक झळकावत हा विक्रम आपल्या नावे केला आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आणखी एक चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. चालू आर्थिक वर्षातील दुसरी तिमाही म्हणजे जुलै ते सप्टेंबर या कालावधीत जीडीपी दर घसरून ४.५ टक्क्यांवर आला आहे.

2. गेल्या २६ तिमाहींमध्ये हा भारतीय अर्थव्यवस्थेचा सर्वात निचांकी जीडीपी दर आहे. एका वर्षापूर्वीपर्यंत हा दर ७ टक्के होता, तर यापूर्वीच्या तिमाहीत ५ टक्के दर होता. याशिवाय ऑक्टोबर महिन्यात ८ कोअर सेक्टरमध्ये औद्योगिक वाढ ही ५.८ टक्के राहिली.

3. जीडीपी दर घसरण्यासोबतच महसूल तूटही वाढली आहे. २०१८ ते २०१९ च्या पहिल्या ७ महिन्यात म्हणजे एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान महसूल तूट चालू आर्थिक वर्षात लक्ष्य ठेवलं होतं, त्यापेक्षा जास्त झाली आहे. पहिल्या ७ महिन्यात महसूल तूट ७.२ ट्रिलियन रुपये (१००.३२ अब्ज डॉलर) राहिली, जी अर्थसंकल्पातील लक्ष्याच्या १०२.४ टक्के जास्त आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. फास्टॅग प्रणालीची मुदत केंद्र सरकारने 1 डिसेंबरऐवजी 15 डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. इलेक्ट्रॉनिक टोल पेमेंटसाठी फास्टॅग अनिवार्य करण्यात आली आहे.

2. 1 डिसेंबरपासून ही प्रणाली अनिवार्य करण्यात आली होती. मात्र ही मुदत आता 15 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबतची घोषणा केली होती.

3. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियानं देशभरतील सर्व टोल प्लाझांवर इलेक्ट्रॉनिक टोल घेण्यास सुरूवात केली आहे.

3. तसेच यासाठी वाहन चालकांना आपल्या गाड्यांवर ‘फास्टॅग’ लावावं लागणार आहे. हा ‘फास्टॅग’ अधिकृत टॅग विक्रेते किंवा बँकेतून विकत घेता येऊ शकतो. काही ठिकाणी पेट्रोल पंपांवरदेखील हा टॅग विकत घेता येणार आहे. तर टोल प्लाझावर ऑटोमॅटिक ट्रान्झॅक्शनसाठी विंड स्क्रिनवर ‘फास्टॅग’ लावावा लागणार आहे. यामध्ये रेडिओ फ्रिक्वेंसी आयडेंटिफिकेशन (RFDI) देण्यात येते. वाहन टोल प्लाझावर पोहोचल्यावर त्या ठिकाणी लावण्यात आलेला सेन्सर ‘फास्टॅग’ स्कॅन करतो. त्यानंतर ‘फास्टॅग’च्या अकाऊंटमधून पैसे वजा होतील.

4. ‘फास्टॅग’ अकाऊंटमधून टोलचे पैसे वजा झाल्यानंतर संबंधित वाहन चालकाला त्यासंबंधिचा एक एसएमएस त्यांच्या मोबाईलवर येईल. अकाऊंटमधील पैसे संपल्यानंतर ते पुन्हा रिचार्ज करावे लागणार आहे. ‘फास्टॅग’ची वॅलिडिटी पाच वर्षांची असेल. पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर नव्याने ‘फास्टॅग’ खरेदी करावे लागणार आहे. कार, जीप,

5. व्हॅन आणि यांसारख्या वाहनांना ‘फोर’ क्लासचे ‘फास्टॅग’ बसवले जाणार आहेत. तर हलक्या मालवाहू आणि व्यावसायिक वाहनांना ‘फाइव्ह’ क्लासचे, थ्री अॅक्सेल व्यावसायिक वाहनांना ‘सिक्स’ क्लासचे आणि बस आणि ट्रकना ‘सेव्हन’ क्लासचे ‘फास्टॅग’ बसवण्यात येणार आहेत.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. 1 डिसेंबर हा दिवस ‘जागतिक एड्स दिन‘ म्हणून पाळला जातो.

2. कोल्हापूरमधील पॅलेस थिएटरमधे श्रीपतराव काकडे, दामलेमामा, फत्तेलाल, बाबा गजबर, ज्ञानबा मेस्त्री, पंत धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत बाबूराव पेंटर यांनी 1 डिसेंबर 1917 रोजी महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली.

3. एस.एस. आपटे यांनी सन 1948 मध्ये हिन्दुस्तान समाचार ही बहुभाषिक वृत्तसंस्था स्थापन केली.

4. सन 1963 मध्ये नागालँड भारताचे 16वे राज्य झाले.

5. 1 डिसेंबर 1965 मध्ये भारतीय सीमा सुरक्षा दल (बोर्डर सिक्युरिटी फोर्से-बिएसएफ (BSF) ची स्थापना झाली.

6. सन 1980 मध्ये 1 डिसेंबर रोजी मराठी विश्वकोश मंडळाची पुनर्रचना करण्यात आली.


Top