Seventh Pay Commission will take effect from January first

 1. मराठा आरक्षणानंतर राज्य सरकारने दुसरा मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठी आनंदाची बातमी दिली आहे.
 2. येत्या एक जानेवारी 2019 पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे.
 3. विधानपरिषदेत आमदार कपिल पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नावर अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर उत्तर दिले आहे.
 4. सरकारच्या निर्णयामुळे 17 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणि सहा लाख निवृत्त  कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
 5. केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक जानेवारी 2016 पासून सातवा सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला होता. केंद्राने लागू केला तेव्हापासून राज्यात देखील सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा यासाठी काही  कर्मचारी संघटनांनी आंदोलन केले होते.
 6. त्यावर सरकारने के.पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती.
 7. येत्या 5 डिसेंबरला के.पी. बक्षी समिती अहवाल सादर करणार असून सातवा वेतन आयोग मात्र येत्या एक जानेवारी 2019 लागू करण्यात येणार असल्याचे राज्यमंत्री केसरकर यांनी सांगितले.


Ajay Bhushan Pandey, India's new finance secretary

 1. देशाच्या अर्थ सचिवपदी अजय भूषण पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
 2. मावळते अर्थ सचिव हसमुख आधिया यांनी त्यांच्या कार्यालयात स्वागत केले. 
 3. पांडे हे महाराष्ट्र केडरच्या 1984 बॅचचे अधिकारी असून, आधार (युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया)चे (यूआयडीएआय) या सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
 4. देशात बायोमेट्रिक ओळखपत्र म्हणून आधार विकसित करण्यात अजय भूषण पांडे यांचा मोठा सहभाग आहे.
 5. मागील 8 वर्षांपासून ते प्रोजेक्टशी संलग्न आहेत. त्याचबरोबर आधारला बँक खात्याशी जोडून सर्वसामान्य नागरिकाला सरकारी फायदे मिळवून देण्यात त्यांची भूमिका मोलाची आहे.
 6. आधारकार्डचे महत्व सर्वोच्च न्यायालयात पटवून देण्यात देखील त्यांनी महत्वाची कामगिरी बजावली आहे.
 7. अजय भूषण पांडे हे आयआयटी कानपूरच्या इलेक्ट्रिकल शाखेचे विद्यार्थी आहेत.
 8. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहताना त्यांनी ट्रान्समिशन व वितरणात होणारी गळती थांबविण्यासाठी मोठ्या उपाययोजना राबविल्या होत्या.
 9. तसेच महाराष्ट्रातील माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख सचिव म्हणून त्यांनी अनेक महत्त्वाच्या ई-गव्हर्नन्स प्रकल्पांना चालना देण्याचे काम त्यांनी केले आहे.


Abhinav Bindra honors Blue Cross Award from ISSF

 1. भारताचा माजी नेमबाजपटू आणि बिजींग ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्राने देशाची मान आणखी एकदा उंचावली आहे. 
 2. 36 वर्षीय अभिनवला ISSF (आंतरराष्ट्रीय नेमबाजी संघटना) कडून  मानाचाBlue Cross पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.
 3. नेमबाजी क्षेत्रात ब्लू क्रॉस हा सर्वोच्च पुरस्कार ओळखला जातो. हा पुरस्कार मिळवणारा अभिनव बिंद्रा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे.
 4. नेमबाजी क्षेत्रात आतापर्यंत केलेल्या चांगल्या कामगिरीबद्दल  अभिनवला हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
 5. या पुरस्काराबद्दल अभिनवनेही आतापर्यंत आपल्या प्रवासात साथ दिलेल्या सर्वांचे आभार मानले आहेत.
 6. बिजींग ऑलिम्पिकमध्ये मिळवलेल्या सुवर्णपदकासह, अभिनव बिंद्राने 2006 साली झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचं सुवर्णपदकही पटकावले होते.
 7. याव्यतिरीक्त 7 राष्ट्रकुल खेळांची पदके आणि 3  आशियाई खेळांची पदकंही अभिनवच्या नावावर जमा आहेत.
 8. त्याच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीबद्दल भारत सरकारने त्याचा खेलरत्न, अर्जुन पुरस्कार आणि पद्मभुषण या सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मान केला  आहे.


Top

Whoops, looks like something went wrong.