1. भारताच्या निर्मितीत पारशी समाजाचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले असून हा समाज आपल्या संस्कृतीमुळे नेहमीच अन्य समाजासाठी मार्गदर्शक राहिला आहे, असे मत केंद्रीय अल्पसंख्याक राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी व्यक्त केले.मुंबईत आयोजित “जिओ पारशी” योजनेच्या जाहिरात मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन आज नक्वी यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. देशात पारशी समाजाची लोकसंख्या जरी अल्प प्रमाणात असली तरी हा समाज उदारमतवादी, शिक्षणाप्रती जागरुक आणि शांतताप्रिय असल्याचं ते म्हणाले.
 2. पारशी समाजाच्या सुरक्षा आणि विकासासाठी सरकार कटिबद्ध असून या समाजासमोरील समस्यांच्या निराकरणासाठी सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल असे आश्वासन नक्वी यांनी यावेळी दिले. पारशी समाजाच्या लोकसंख्येत होणारी घट हा चिंतेचा विषय असल्याचं नक्वी यांनी नमूद केले. यावर उपाय म्हणून अल्पसंख्याक मंत्रालयाने जिओ पारशी ही योजना सुरू केली आहे.
 3. या योजनेअंतर्गत या समाजाच्या कमी होणाऱ्या लोकसंख्येबद्दल जागरुकता निर्माण करत देशातील या समाजाच्या लोकसंख्या वाढीवर भर दिला जात आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्याला 2013 मध्ये सुरूवात झाली होती. या योजनेमुळे 101 पारसी मुलांचा जन्म झाला.
 4. देशाच्या उद्योग क्षेत्रातील जमशेदजी टाटा यांचे महत्त्वपूर्ण योगदान, स्वातंत्र्य संग्रामातील दादाभाई नौरोजी, भिकाजी कामा यांची देशभक्ती, होमी भाभा यांचे अणु ऊर्जा क्षेत्रातील योगदान तसेच फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांचे सैन्यदलातील योगदान ही भारताच्या समृद्ध इतिहासाची ठळक वैशिष्ट्ये असल्याचे नक्वी यांनी यावेळी स्पष्ट केले.
 5. सर्वसमावेशक विकास आणि अंत्योदय हा संकल्प घेऊन केंद्र सरकार समाजाच्या प्रत्येक व्यक्तीसाठी प्रग ती, सु रक्षा आणि सन्मा यासाठी काम करत असल्याचं नक्वी यांनी यावेळी स्पष्ट केले.
 6. जिओ पारशी योजनेकरता पारजोर फाऊंडेशन, बॉम्बे पारशी पंचायत, टी.आय.एस.एस. मुंबई आणि फेडरेशन ऑफ जोरास्ट्रीयन अंजुमन्स ऑफ इंडिया यांचं योगदान लाभत आहे. कार्यशाळा, जागृती अभियान आदी माध्यमातून या योजनेचा प्रसार केला जात आहे.


 1. 12 व्या आय.डी.पी.ए.पुरस्कार सोहळ्यात 60 मिनिटे आणि 60 मिनिटांहून अधिक कालावधीच्या श्रेणीत चित्रपट विभाग मुंबई निर्मित "कपिला" आणि " लिव्हिंग द नॅचरल वे" या दोन माहितीपटांना सुवर्ण पुरस्कार प्राप्त झाला आहे. "कपिला" हा संजू सुरेंद्र यांचा व्यक्तीकेंद्रीत चित्रपट आहे जो तरुण निपुण कपिला वेणू हिच्या जीवन आणि सादरीकरणाच्या माध्यमातून केरळमधील कोडीयट्टम या शास्त्रीय नाट्य कला प्रकाराची माहिती देतो.
 2. एफटीआयआयचा 62 मिनिटांच्या माहितीपटात सादरीकरण, ता  लीम, आठवणी आणि आकांक्षांच्या माध्यमातून कुशाग्र कलाकारांचे जीवन चित्रीत केले आहे. कपिलाचा हा चौथा पुरस्कार आहे. 62 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2016, व्हिजन टू रिल, स्वित्झर्लंड येथे विशेष परीक्षक पुरस्कार, 9 व्या एसआयजीएनएस चित्रपट सोहळ्यात विशेष माहितीपट पुरस्कार पटकावला आहे.
 3. कपिला वेणू या कोडीयट्टम महागुरू अम्मानुरू माधव यांच्या शिष्या आहेत. संजीव पराशर यांच्या "लिव्हिंग द नॅचरल वे" या चित्रपटाला 60 मिनिटांवरील नॉन फिक्शन श्रेणीत सुवर्ण पुरस्कार मिळाला आहे. ब्रह्मपुत्रा नदीकाठच्या नापीक जमिनीला सुपिक बनवण्यासाठी 30 वर्षांहून अधिक कालावधीपासून अथक परिश्रम घेणाऱ्या एका आदिवासी व्यक्तीचा लक्षणीय आणि कोमल प्रवास या चित्रपटात उलगडला आहे.
 4. भारतीय चित्रपट विभाग निर्मित आणखी दोन माहितीपटांना पुरस्कार प्राप्त झाला आहे. शबनम सुखदेव यांच्या "अर्थ क्रसडेर" या चित्रपटाला उल्लेखनीय चित्रपट तर प्रिया चॅटर्जी यांच्या "सायलेंट व्हाईस"ला परीक्षकांचा विशेष लक्षवेधी पुरस्कार प्राप्त झाला आहे.
 5. "अर्थ क्रसडेर" या चित्रपटात प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय वास्तुविशारद दीदी काँट्रक्टर यांचा हिमालयाच्या कांग्रा व्हॅलीतील वास्तुकला दृष्टीकोनासंबंधी जीवनप्रवास उलगडला आहे.  "सायलेंट व्हाईस" या चित्रपटात 3 तरुण बंगाली महिलांचा सामाजिक जीवन प्रवास चित्रीत केला आहे.


 1. वकील, प्रसिद्ध राजकीय प्रतिनिधी आणि दीर्घकालीन साम्यवादी वकील तसेच भारतीय सार्वजनिक जीवन व समाजातील एक सच्चे व्यक्तीमत्व रामनाथ कोविंद यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1945 रोजी उत्तर प्रदेशातील कानपूर जवळील पारारुंख येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मैकू लाल तर आईचे नाव कलावती.
 2. 25 जुलै 2017 रोजी भारताचे 14 वे राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारण्याआधी ते 16 ऑगस्ट 2015 ते 20 जून 2017 या कालावधीत बिहारचे 36 वे राज्यपाल म्हणून कार्यरत होते.
 3. शैक्षणिक आणि व्यावसायिक पार्श्वभूमी : कोविंद यांनी आपले शालेय शिक्षण कानपूर येथून पूर्ण केले. ते कानपूर विद्यापीठातून वाणिज्य शाखेची पदवी आणि एल.एल.बी उत्तीर्ण झाले. 1971 मध्ये ते दिल्लीच्या बार काऊंसिलमध्ये वकील म्हणून नियुक्त झाले.
 4. कोविंद 1977 ते 1979 या कालावधीत दिल्ली उच्च न्यायालयात सरकारी वकील म्हणून कार्यरत होते. तर 1980 ते 1993 या कालावधीत सर्वोच्च न्यायालयात केंद्र स रकारचे स्थायी सल्लागार म्हणून कार्यरत होते. 1993 पर्यंत  16 वर्ष त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात वकिली केली. 
 5. संसदीय आणि सार्वजनिक जीवन: कोविंद 1994 रोजी उत्तर प्रदेशमधून राज्यसभेवर निवडून आले. कोविंद यांनी अनुसूचित जाती/जमातींच्या कल्याणासाठीची संसदीय समिती, गृह व्यवहारासंदर्भातील संसदीय समिती, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू संसदीय समिती, सामाजिक न्याय आणि सबलीकरण संसदीय समिती आणि कायदा आणि सुव्यवस्था संसदीय समितीसारख्या विविध संसदीय समित्यांमध्ये कार्य केले.
 6. कोविंद डॉ. बी. आर. आंबेडकर विद्यापीठ, लखनऊचे व्यवस्थापकीय मंडळ तसेच भारतीय व्यवस्थापन संस्था, कोलकाताच्या नियमित मंडळाचे सदस्य म्हणून देखील कार्यरत होते. अमेरिकेत गेलेल्या भारतीय प्रतिनिधी मंडळाचे देखील ते सदस्य होते तसेच त्यांनी ऑक्टोबर 2002 मध्ये अमेरिकेच्या संसदेला संबोधित केले होते.
  • पदभार :
   1. 2015-17 : बिहारचे राज्यपाल
   2. 1994-2006 : राज्यसभा सदस्य, उत्तर प्रदेशचे प्रतिनिधी
   3. 1971-75 आणि 1981 : अखिल भारतीय कोळी समाज, महासचिव
   4. 1977-79 : दिल्ली उच्च न्यायालयात सरकारी वकील
   5. 1982-84 : सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारचे कनिष्ठ सल्लागार
 7. वैयक्तिक माहिती : रामनाथ कोविंद यांनी सविता यांच्यासोबत 30 मे 1974 रोजी विवाह केला. त्यांना प्रशांत कुमार आणि स्वाती ही दोन अपत्ये आहेत. कोविंद यांना वाचनाचा छंद असून ते राजकीय आणि सामाजिक परिवर्तन, कायदा आणि इतिहास आणि धर्मावरील पुस्तकांचे वाचन करतात.
 8. त्यांच्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात कोविंद यांनी देशभरात प्रवास केला आहे. त्यांनी थाय लंड, नेपा ळ, पाकिस्तान, सिंगापूर, जर्मनी, स्वित्झर्लंड, फ्रान्स, ब्रिटन आणि अमेरिकेचा दौरा देखील केला आहे. 


Top

Whoops, looks like something went wrong.