The main proposal in the 'Union Budget 2018' implemented on 1st April

1 एप्रिल 2018 रोजी वित्त वर्ष 2018-19 अस्तित्वात आले. या वित्त वर्षाच्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या सर्व प्रस्ताव 1 एप्रिलपासून प्रभावी झाले आहेत.

अर्थसंकल्पात समाविष्ट काही प्रमुख तरतुदी पुढीलप्रमाणे आहेत -

आर्थिक लेखाजोगा

 1. भारतीय लेखा मानक 115 (Indian Accounting Standard - Ind AS) प्रभावी झाले. हे नवीन मानक विविध क्षेत्रातील कंपन्यांचा आर्थिक लेखाजोगा याविषयी गणना करण्यास, ओळख पाठविण्यास आणि उघड करण्याचा एक सुधारित मार्ग प्रदान करतो. यामुळे प्राप्त महसुलाविषयी पारदर्शकता वाढविण्यास मदत होते.
 2. याशिवाय महसूल आणि बांधकाम करारांशी संबंधित इंड AS 18 आणि इंड AS 11 ही दोन मानके अस्तित्वात नसतील.

ज्येष्ठ नागरिकांसाठी

 1. व्याजापासून उत्पन्नावरील सूट असलेली मर्यादा वार्षिक 50,000 रुपयांसाठी पाच पटीने वाढविण्यात आली आहे.
 2. आता ज्येष्ठ नागरिकांच्या व्याज उत्पन्नातून TDS (टॅक्स डिडक्टेड अॅट सोर्स) कापला जाणार नाही.
 3. आरोग्य विम्याचे प्रीमियम आणि वैद्यकीय खर्चासाठी असलेली कपात मर्यादा 30,000 रूपयांवरून 50,000 रुपये करण्यात आली आहे. या 20,000 रुपयांच्या अतिरिक्त कपातीमुळे करदात्याचे वर्षाला 6,000 रुपये एवढी बचत होईल.
 4. जेष्ठ आणि त्याहून ज्येष्ठ नागरिकांसाठी 1 एप्रिलपासून गंभीर आजारासाठी कर कपात मर्यादा 1 लाख रुपयांपर्यंत होईल, जी सध्या जेष्ठ नागरिकांसाठी रुपये आणि त्याहून ज्येष्ठ नागरिकांसाठी 80000 रूपये आहे.

ई-वे बिल यंत्रणा

 1. 1 एप्रिल 2018 पासून ‘ई-वे’ बिल यंत्रणेमधून 50,000 रुपयांहून अधिक किंमतीचा माल एका राज्यातून दूसर्यार राज्यात पाठविण्याआधी त्याची ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक असणार आहे. ‘ई-वे’ बिल व्यवस्था कारखान्यातून निघालेले उत्पादन आणि आंतरराज्य वाणिज्य कार्यपद्धती यावर इलेक्ट्रॉनिकरीत्या पाळत ठेवण्याप्रमाणे काम करणार, ज्यामुळे मालाच्या खपासंबंधी माहितीमधून धोरण-निर्मात्यांना उपयुक्त मदत होणार.

कामावरून काढल्यास किंवा रोजगारात बदल केल्यास भरपाई

 1. सध्या, रोजगाराच्या संबंधात विशिष्ट नुकसान भरपाई करपात्रतेच्या अंतर्गत येत नाही, त्यामुळे आधारभूत तूट आणि महसूली तोटा होण्याची शक्यता असते. नव्या प्रस्तावानुसार, आता एखाद्या व्यक्तीला कामावरून बडतर्फ करताना किंवा व्यक्तीच्या रोजगाराशी संबंधित कोणत्याही करारनाम्याच्या अटी आणि नियमांमध्ये फेरबदल करतेवेळी दिली जाणारी किंवा प्राप्त झालेली कोणतीही भरपाई किंवा इतर कोणतीही देय रक्कम करपात्र असेल.

भांडवली बंधवर दीर्घकालीन भांडवली लाभ

 1. एक लाख रुपयांपेक्षा अधिकच्या दीर्घकालीन भांडवली लाभ (LTCG) यावर 10% कर प्रस्तावीत आहे. आतापर्यंत भांडवली समभाग (equity shares) किंवा कोणत्याही भांडवली म्युच्युअल फंड युनिट्सवर मिळणारा दीर्घकालीन नफा करमुक्त होता.

मानक कपात

 1. या वर्षी आयकर गटांमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. मात्र पगारदार कर्मचार्यांमसाठी वाहतुक आणि वैद्यकीय परतफेड करण्याच्या बदल्यात शासनाकडून 40,000 रुपयांचे एक मानक कपात सादर करण्यात आले आहे.
 2. उत्पन्नावरील उपकर 3% वरून 4% एवढा वाढवला आहे.

कॉर्पोरेट कर

 1. 250 कोटी रुपयांपर्यंतच्या व्यवसायावर लादला जाणारा कॉर्पोरेट कर 30% वरून 25% वर आणला आहे.


E-way bill mechanism implemented from 1st April onwards

 1. वस्तू व सेवा कर (GST) प्रणाली अंतर्गत मोटर मालवाहकांसाठी आंतर-राज्य मालवाहतुकीसाठी आवश्यक इलेक्ट्रॉनिक वे बिल (e-way bill) यंत्रणेचा वापर 1 एप्रिल 2018 रोजी देशभरात लागू करण्यात आला आहे.
 2. 1 एप्रिल 2018 पासून ‘ई-वे’ बिल यंत्रणेमधून 50,000 रुपयांहून अधिक किंमतीचा माल एका राज्यातून दूसर्‍या राज्यात पाठविण्याआधी त्याची ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक असणार आहे.
 3. ‘ई-वे’ बिल व्यवस्था कारखान्यातून निघालेले उत्पादन आणि आंतरराज्य वाणिज्य कार्यपद्धती यावर इलेक्ट्रॉनिकरीत्या पाळत ठेवण्याप्रमाणे काम करणार, ज्यामुळे मालाच्या खपासंबंधी माहितीमधून धोरण-निर्मात्यांना उपयुक्त मदत होणार.
 4. इलेक्ट्रॉनिक मार्गाने बिल अदा करण्याची ही व्यवस्था 16 जानेवारी 2018 पासून उपलब्ध आहे आणि राज्य स्वैच्छिक आधारावर जूनच्या आधी याला स्वीकारू शकतात.
 5. ई-वे बिल व्यवस्थेमुळे आता तपास नाक्याची व्यवस्था देखील समाप्त करण्यात आली आहे.
 6. वस्तू व सेवा कर (GST) हा एक अप्रत्यक्ष कर आहे, जो 1 जुलै 2017 पासून संपूर्ण भारतात लागू करण्यात आला, ज्याने केंद्र व राज्य शासनांनी आकारलेल्या विविध करांचा त्याग केला. संविधान (101 वी दुरूस्ती) कायदा 2017 म्हणून GST सादर करण्यात आले.
 7. GST हे GST परिषदेद्वारे संचालित केले जाते आणि त्याचे अध्यक्ष भारताचे वित्तमंत्री आहेत. GST अंतर्गत वस्तू व सेवांवर 0%, 5%, 12%, 18% आणि 28% या दरांनी कर लागू आहेत. फ्रान्स हा GST ची अंमलबजावणी करणारा जगातला पहिला देश आहे.


The 'Indian Brain Template (IBT)' is being prepared in NBRC

 1. हरियाणातील राष्ट्रीय मेंदू संशोधन केंद्र (NBRC) मधील संशोधकांच्या चमूने मेंदूच्या छायाचित्रांचा एकमेव असा संग्रह तयार करीत आहे.
 2. असा संग्रह ‘इंडियन ब्रेन टेम्पलेट (IBT)’ म्हणून ओळखला जाईल. हे संशोधन विज्ञान व तंत्रज्ञान विभागाकडून पुरस्कृत आहे.
 3. 150 प्रौढ भारतीयांच्या मेंदूचे मॅग्नेटिक रेझोनेंस इमेजिंग (MRI) स्कॅनच्या माध्यमातून छायाचित्रे घेतले जात आहेत.
 4. यामध्ये संभावित रूपाने प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित क्षेत्रापासून कमीतकमी एक व्यक्ती सामील केले जाणार आहे.
 5. ही माहिती संशोधकांसाठी आणि शस्त्रक्रिया करणार्‍यांसाठी एक मार्गदर्शकाच्या रूपात मदत करणार, ज्याच्या आधार आतापर्यंत काकेशियान मॉडलवर आधारित किचकट मेंदूची संरचना आहे.

  संशोधनामागील उद्देश्य

  1. संशोधकांनी बर्‍याच काळापासून असा दावा केला आहे की, वेगवेगळ्या प्रदेशातील वांशिक प्रकारांमध्ये मानवी मेंदू लक्षणीय फरक दर्शवितो, परंतु त्या देशात त्याच्याच प्रदेशामध्ये असा फरक आढळून येतो का? याचा शोध घेतला जात आहे.
  2. मागच्या वर्षापासून, जगभरातील संशोधकांमध्ये असे बोलले जात आहे की, विविध प्रदेशातील लोकांच्या मेंदूमध्ये ओळखण्याजोगी भिन्नता आढळून आलेली आहे. ही भिन्नता मेंदूच्या मुख्य प्रदेशांची स्थिती आणि विविध क्षेत्रातल्या मेंदूच्या मज्जातंतूंचे (neurons) घनत्व यामध्ये देखील भिन्नता आढळून येते.
  3. याबाबत अभ्यास करण्यासाठी चीन, दक्षिण कोरिया आणि कॅनडा सहित कित्येक देशांनी आपल्या लोकांचा ‘ब्रेन टेम्पलेट’ विकसित केला आहे. चीनचा टेम्पलेट जवळपास 1000 लोकांचा संग्रह आणि कॅनडियन टेम्पलेट जवळपास 300 लोकांचा संग्रह आहे.


'Play India Champions' is preparing for the Commonwealth Games

 1. युवा खेळाडू मनू भाखर आणि श्रीहरी नटराजन हे आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदार्पण करण्यास सज्ज असून, देशासाठी पदक जिंकण्याचा निर्धारही या खेळाडूंनी व्यक्त केला. केंद्र शासनाच्यावतीने नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेतून हे खेळाडू चॅम्पियन होऊन बाहेर आले, हे विशेष.
 2. मनूने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात २४१.१ गुण संपादन करीत सुवर्ण पदक जिंकले आहे. याआधी डिसेंबरमध्ये तिने राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत २४०.५ गुणांसह राष्ट्रीय विक्रम मोडला होता.
 3. जलतरणपटू श्रीहरीने खेलो इंडिया स्पर्धेत १०० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात राष्टÑीय विक्रम मोडताना सहा सुवर्ण आणि एक रौप्य पदक जिंकले होते. दोन वर्षांचा असताना जलतरणाला सुरुवात करणारा श्रीहरी म्हणाला, खेलो इंडियातील सहभाग राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेचा सराव होता.
 4. मनूच्या नेमबाजी खेळाला तर दोन वर्षांआधीच सुरुवात झाली. स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावरील सातत्यपूर्ण कामगिरीच्या बळावर ती विश्व स्पर्धांमध्ये पदक विजेती कामगिरी करण्यात यशस्वी ठरली आहे.
 5. मेक्सिकोत झालेल्या सिनियर विश्वचषकात दोन सुवर्ण आणि आयएसएसएफ विश्वचषकात तीन सुवर्ण जिंकल्यामुळे मनूकडे राष्टÑकुलची संभाव्य पदक विजेती म्हणून पाहिले जात आहे.
 6. श्रीहरी राष्टÑकुलच्या ५०, १०० आणि २०० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात सहभागी होणार आहे. जलतरणात तो प्रशांत करमाकरच्या सोबतीने सहभागी होणार आहे.


Land Pond in the first train compartment factory

 1. महाराष्ट्रातील पहिल्या रेल्वे डब्यांच्या कारखान्याचं लातूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते भूमीपूजन झालं. मात्र मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी शेतकरी संघटनेने गोंधळ सुरू केला.
 2. मुख्यमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी तातडीने गोंधळ घालणाऱ्यांना ताब्यात घेतलं.
 3. रेल्वेतर्फे 500 कोटी रुपयांच्या या प्रकल्पातून 25 ते 30 हजार रोजगार मिळतील, असा दावा करण्यात आला आहे.
 4. लातूरमध्ये कोच कारखाना उभारण्याचा निर्णय यावर्षी जानेवारीमध्ये घेण्यात आला. महाराष्ट्र शासन आणि रेल्वे मंत्रालय यांनी 20 फेब्रुवारी 2018 रोजी सामंजस्य करार केला होता.

प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये

 1. पहिल्या टप्प्यात प्रति वर्ष 250 डब्यांचं उत्पादन
 2. दुसऱ्या टप्प्यात प्रति वर्ष 400 डब्यांपर्यंत उत्पादन क्षमता वाढवणे
 3. जमीन क्षेत्र : 153.88 हेक्टर
 4. अपेक्षित खर्च : 500 कोटी रुपये
 5. ठिकाण : हरंगूल स्टेशनपासून 2.5 किमी अंतरावर
 6. रेल्वे विकास निगम लिमिटेड (आरव्हीएनएल) द्वारे कारखाना बांधण्यात येईल
 7. भूसर्वेक्षण पूर्ण करण्यात आलं आहे.
 8. फॅक्टरी लेआऊट विकसित
 9. 25 ते 30 हजार रोजगाराच्या संधी

 


Top