Megha Arora From Daughter of Rikshaw driver to IAS

रिक्षा ड्रायव्हरची मुलगी संघर्षाने बनली आयएएस टॉपर...


1353   02-May-2018, Wed

तुम्ही प्रतिभावंत असाल तर तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही रोकू शकत नाही. याचेच एक उत्तम उदाहरण बनली आहे आग्र्याची मेघा अरोरा. मेघाने लोकसेवा आयोगाने आयोजित केलेल्या आयएएस परीक्षेत संपुर्ण भारतातून ८ वा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे मेघाचे वडील हे एक रिक्षा ड्रायव्हर आहेत तर आई प्राध्यापिका आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबातून असलेल्या मेघा साठी मिळालेले यश हे खूप मोठी उपलब्धी आहे.

मेघा ही लहाणपणी पासूनच अभ्यासात हुशार होती. तिची शाळा आणि कॉलेजमध्ये असतानाची कामगिरी सुद्धा प्रशंसनीय होती. मेघाने १२ वी मध्ये ९५ टक्के मार्क्स मिळवून घवघवीत यश संपादन केले होते. चांगले मार्क्स मिळाल्यानंतर तिच्या स्वप्नांना एकप्रकारे भरारी मिळाली. त्यानंतर तिने दिल्लीच्या प्रसिद्ध हंसराज कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. बारावी पर्यंत सायन्स मध्ये शिक्षण घेतलेल्या मेघाने पुढे आपल्या काकाच्या म्हणणे ऐकून कॉमर्स मध्ये ग्रॅज्युएशन करण्याचा निर्णय घेतला. ग्रॅज्युएशन चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने दिल्ली स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये कॉमर्स मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा पूर्ण केले.

यानंतर मेघाने यूपीएससी परीक्षा देऊन आयएएस होण्याचा निर्धार केला. ती सांगते की तिला तिच्या काकांनी अभ्यासासाठी खूप मदत केली. मेघाने जिद्द आणि चिकाटीने पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत टॉपर बनून घवघवीत यश मिळवले आहे. तिने पहिल्याच प्रयत्नात एवढे घवघवीत यश मिळवले आहे त्यावरून तिच्या मेहनतीचा तुम्ही अंदाजा लावू शकता. यावर्षी मे महिन्यात यूपीएससीची परीक्षा पार पडली व निकाल जुलै मध्ये जाहीर झाले. यानंतर मेघाला इंटरव्ह्यू साठी बोलावण्यात आले. अंतिम निकाल २३ सप्टेंबरला जाहीर झाला. आता ११ डिसेंबर पासून मेघा ट्रेनिंग साठी जाणार आहे.

मेघाच्या या यशानंतर तिचे ८ वी पर्यंत शिकलेले वडील सुनील अरोरा म्हणाले की, ‘ तिने आमच्या सर्वांचे नाव अभिमानाने वर नेले आहे. यासाठी तिने खूप कठीण परिश्रम घेतले. हे यश आमच्या सर्वांसाठी एखादं स्वप्न खरं झाल्यासारखे आहे’. मेघाची आई सविता या एका प्राथमिक शाळेत शिक्षिका आहेत. त्या म्हणाल्या की, ‘ अभ्यासात मेघा नेहमी अव्वल राहिली आहे. ती आमच्या परिवारात एकमेव आहे जिने सरकारी अधिकारी होण्याची परिक्षा पास केली आहे. मेघाचे आई-वडिल म्हणून आम्हाला याचा खूप अभिमान आहे’.

विशेष म्हणजे दिल्ली स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स मधील मेघा सोबतच्या अजून १५ जणांनी ही परिक्षा दिली होती, परंतु त्यापैकी मेघा ही एकमेव आहे जिची यामध्ये निवड झाली आहे. मेघा सांगते की तिच्या एका मैत्रिणीच्या सल्ल्याने तिने या परीक्षेची तयारी करण्यास सुरुवात केली होती. मेघाचा अर्थशास्त्र विषयात सखोल अभ्यास होता. परंतु मेघाला रोज ८-१० तास अभ्यास केल्यानंतर हे यश मिळाले आहे. मेघाला फिक्शन पुस्तके वाचण्याची आवड आहे व तिचे आवडते लेखक अमिताभ घोष आहेत.

inspiration article of two young boys to psi

मेंढरं वळता वळता 'वर्दी' अंगावर आली..!!!


457   13-Oct-2018, Sat

मेंढरं वळता वळता 'वर्दी' अंगावर आली..!!!
जिद्दीला सलाम....!!!
भरल्या पोटी क्रांती घडत नाही तर उपाशी पोटी माणसेच क्रांती करु शकतात याचे उत्तम उदहारण म्हणजे 'हंडाळ' बंधु..त्यांच्या यशाने 'कोकणगाव' गावाला आभाळ ठेंगणे झाले..
'हंडाळ' मेंढपाळाची मुले झाली पोलिस उपनिरीक्षक...
परिस्थितीच्या बुडावर लाथ मारुन यशाला गवसणी घालणारे 'चांगदेव व आप्पा हंडाळ' बंधुची संघर्ष गाथा!!!
अखंड हिंदुस्थानावर राज्य करणारे सम्राट चंद्रगुप्त मौर्य..चक्रवती सम्राट अशोक यांचा वसा आणि वारसा सांगणारा 'धनगर समाज' शौर्यवान,काटक अन् रांगडा..धन अन् मनाची श्रीमंती बाळगणारा... पण पुढे परिस्थितीने त्यांना वणवण भटकंती करायला भाग पाडले..
'हंडाळ' कुटुंबीय मूळ मौजे-वावरथ ता.राहुरी येथील,'मुळा' धरण झाले अन् वाड-वडीलांची जमीन पाण्याखाली गेली.जमीन गेली आणि हातात फक्त खंडीभर मेंढ्या तेवढ्या शिल्लक राहील्या, विस्थापित झालेलं हे कुटुंबीय. आता 'बबन हंडाळ' मेंढीपालन करत आपल्या मामाच्या गावी आले.परिस्थिती बदलली नाही पण मनस्थिती मात्र बदलली. 
रुईगव्हाण ता-कर्जत येथे हंडाळ कुटुंबीय तात्पुरते स्थायिक झाले..बबन हंडाळ यांना चार मुले सुखदेव,ज्ञानदेव,चांगदेव अप्पा..घरात कमावती हातं वाढावीत,धाकल्या भावंडाना शिकता यावं,म्हणुन थोरल्या दोघांनी शाळा अर्धवट सोडली.आपल्या पाठीमागं आपल्या पोरांनी मेंढरं वळु नयेत,त्यांच्या वाट्याला चार घास सुखाचे येवोत,ती शिकलीत तर त्यांना आपल्यावाणी इकडं तिकडं मेंढरं चारत भटकत जगावं लागणार नाही, म्हणुन शाळेत जाणार्या चांगदेव आणि आप्पा ला बा-आई नेहमी प्रोत्साहन देत.

यडी-वाकडी कपडे घालुन,इर्याच्या गोणीची पीशी करत पोरं अनवाणी पायानं शाळेत जात राहीली. धाकली दोघं शिकत राहीली अन् आढळगाव च्या शाळेत दोघं भावंड पाचवीत दाखल झाली.रुईगव्हाण ते आढळगाव ११ km चे हे अंतर,दररोज २२ km चा हा प्रवास.एसटी ने शाळेत जायला पासा पुरती पोरांकडे पैसे नसत.चांगदेव ने एका भंगारवाल्या कडुन मोडकी सायकल घेतली,आता त्या सायकल वर प्रवास चालु झाला.रस्त्यात 'भावडी' हे गाव लागायचं.तिथल्या भोसलेंचा एक मुलगा याच्याच वर्गातला,तो त्याला आपल्या सायकल वर ने-आण करत,त्याबदल्यात तो दररोज चांगदेव ला 'दीड रुपया' द्यायचा,त्यातुन सायकलची देखभाल व भंगारवाल्याचा हप्ता दिला जाई,ही भावंडं मात्र जिद्दी,सकाळ-संध्याकाळ सोबतच,राम-लक्षमण नाची जोडी शोभावी अशी,शाळेत प्रथम क्रमांक यांनी मात्र कधी सोडला नाही.
रुईगव्हाण पंचक्रोशीतील धनदांडगे बाहेरची माणसं म्हणुन त्यांना जमीन कसुन देत नव्हते,प्रकरण कोर्ट कचेरी पर्यंत गेलं,त्यात वडील कर्जबाजारी झाले.आता सगळं संपलय असं वाटत होतं.धाकल्या दोघांनी शिकत रहावं म्हणुन थोरले सुखदेव आणि ज्ञानदेव सालगड्याचं काम करायचे.कोर्ट-कचेरी च्या सतत चकरा.त्यातुन त्यांचा System वरचा विश्वास उडला,गरीब,बटक्या लोकांवर होत असलेली गुंडशाही.त्या अन्यायाला प्रतिकार करण्यासाठी चौघा भावांचे बाहु फुरफुरायचे.

रातच्चं दोन घास खाताना 'बा' सांगायचा.'शिंग्रोबा' धनगराची गोष्ट..कैक वर्ष गोरं इंग्रज पुण्याहुन बंम्बई ला जाण्यासाठी खंडाळा घाटातुन रस्ता कसा न्यावा शोधत होतं..त्यांना मार्ग सापडना,तवा शिंग्रोबानं इंग्रजांना सांगितलं..माझ्या मेंढरांच्या मागं मागं या तोच तुमचा रस्त्याचा मार्ग असल..शिंग्रोबानं इंग्रज लोकांना रस्ता दावला,तवा इंग्रज त्याच्यावर लई खुश झाले बगा ते म्हटले तुला काय पाहीजे?? ते माग..देऊ तुला!!
तवा आपला पुर्वज शिंग्रोबा म्हणला 'तुम्हाला द्यायचच असल काय तर माझ्या देशाला स्वातंत्र्य द्या' हे ऐकताच इंग्रजांनी लागलीच त्याला गोळ्या घातल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपला शिंग्रोबांने बलिदान दिलं पोरांनो तुम्ही बी असं काही तरी करा!!!
तवा धाकल्या पोरांची छाती फुगायची पण पुढे सततच्या झुंडशाहीला वैतागुन हंडाळ कुटुंबीयांनी रुईगव्हाण गाव सोडलं अन् श्रीगोंदे तालुक्यातील कोकणगावात ते रहायला आले.तिथं उसनंपासनं करुन जमीन घेतली घर बांधलं पण अतिक्रमणात घर आहे सांगुन लोकांनी बांधलेल्या घरावर ट्रॅक्टर ने नांगर फिरवला घरातली माणसं उघड्यावर आली गर्दीतला एक बोलला 'केस करायची असेल तर कर PSI आमच्या ओळखीचा हाय'...तेव्हा नुकतचं धाकल्या दोघांना कुठं मिसरुड फुटलं होतं तवा चांगदेव आणि आप्पा ने ठरवलं आता PSI व्हायचच पोरं तवा पासुन स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला लागली.
अवघड गणितं सोडु लागली..महापुरुषांची चरित्र वाचु लागली...पुणे येथे जाऊन तयारी करावी तर खर्च परवडण्यासारखा नव्हता. श्रीगोंद्यातच अभ्यास करण्याचं पक्क ठरलं..अभ्यासिकेतील मोजकी पुस्तकं,वारंवार सराव,स्वत:च्या नोटस,वर्तमानपत्रे हे सगळं आता रुटीन मध्ये आलं.वेळेचं अचुक नियोजन कधी चुकवलं नाही,ग्राऊॅड साठी मात्र एक अडचण उभी राहीली,रनींग साठी ४०० मीटर सरळ सपाट जागा आढळगाव परीसरात काही कुठे सापडेना,शेवटी ती ही सापडली 'नाथाची वाडी च्या जंगलात' जंगलातल्या सपाट जागेवर रनिंग ट्रॅक करुन सराव चालु झाला,कधी भल्या सकाळी पळण्याचा सराव चालु झाला तर जंगलातील कोल्हे-कुत्रे-लांडगे पाठलाग करायची..गुरगुरायची..पण हंडाळ बंधुनी त्यामुळे कधी पळण्याचा सराव सोडला नाही..शेजारीच असलेल्या ऊटूळा डोंगराहुन त्यांनी लालमाती आणली अन् जंगलातच आखाडा तयार केला त्यात लांब उडी मारण्याचा सराव चालु केला..उड्या मारुन पॅक झालेली माती कुदळ-फावड्याने खणुन काढत मोकळी नेहमी केली त्याने मनगट आणि दंडाचे स्नायु बळकट झाले..घराशेजारी त्यांना एक सरळ वर गेलेलं झाड दिसलं त्या झाडाला समांतर त्यांनी एक उभं लाकुड रोवलं त्याला आडवा बार लावला..अन् पुलअप्स त्यावर काढले जात..पुलअप्स काढण्याचं एक अनोख यंत्र आणि तंत्र हंडाळ बंधुनी विकसीत केलं.
2013 साल उजाडलं,अन् 15 आॅगस्ट ला दोघं शाळेच्या कार्यक्रमात भाषण करायला माईक समोर उभे राहीले..तर काही लोकांनी त्यांना बोलु दिलं नाही..हंडाळ बंधु सांगत होते..'फुले-शाहु-आंबेडकर' आम्ही वाचले..आमचे हक्क,अधिकार आम्हाला समजले..पण प्रत्यक्षात स्वातंत्र्यदिनी आमच्या बाबतीत असं घडलं तेव्हा वाटलं 'फुले-शाहु-आंबेडकर' यांचे विचार काय फक्त वाचनापुरतेच मर्यादित आहेत का?
असं जगणं वाट्याला आलं..झालेले अपमान पचवले...पण आत्मविश्वास कमी होऊ दिला नाही..दोघं भावंडं दहावी पास झाले आणि श्रीगोंद्याला महाराजा व छत्रपती काॅलेज मध्ये पुढचं शिक्षण घेऊ लागले..डाॅ.बाबासाहेब आंबेडकर शासकीय होस्टेल मध्ये त्यांची रहाण्याची व्यवस्था झाली..कमवा व शिका योजनेतुन ते आपलं शिक्षण घेऊ लागले..कधी खचले तर त्यांना बापाचे शब्द आठवायचे 'मला आयुष्यात हे दोन पोरं फौजदार करायचेत' पोरं मग पेठुन उठायचे..अभ्यासाला लागायचे..अन् मेहनत कामाला आली..पोलीस भरती निघाली आणि दोघं पोलीस खात्यात भरती झाले २०१६ ला PSI ची अॅड आली..चांगदेव व आप्पासाहेब Departmental Exam मधुन PSI झाले..आणि पुन्हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने PSI पोस्टसाठी घेतलेल्या Direct Exam च्या माध्यामातुन आप्पासाहेबांनी राज्यात 22 वा रॅन्क घेऊन बाजी मारली..'भगवान जबबी देता हे,छप्पर फाड के देता हे' ची अनुभवती त्यांना आली..
अरुण पवार सर,राजकुमार चौरे सर यांनी संपुर्ण आयुष्य दोघा भावंडांना प्रेरीत करण्याचे काम केले.PSI झाल्याचा आनंद त्यांच्या गगणात मावेना.दोघांनी ऐकमेकांना घट्ट मिठी मारली..आई-बापाचं पांग फिटलं..म्हणत दोघांच्या डोळ्यात आनंदआश्रु तरळले...!

coolie-son-judge at age of 24 years

हमालाच्या मुलाची गरुडझेप, वयाच्या २४व्या वर्षी न्यायाधीशपदाला गवसणी..


1277   20-Sep-2018, Thu

ग्रामीण भागात शिक्षण, योग्य मार्गदर्शन अशा विविध समस्या असताना प्रतिकूल परिस्थितीस तोंड देत चांदवड तालुक्यातील वाहेगावसाळ येथील सचिन न्याहारकर यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवत न्यायाधीशपदाला गवसणी घातली आहे. जिद्द, चिकाटी आणि श्रम करण्याची तयारी असल्यावर ग्रामीण भागातील विद्यार्थीही स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळवू शकतो हे न्याहारकर यांनी दाखवून दिले आहे.

लासलगावमधील कांद्याच्या खळ्यावर हमाली करणाऱ्या एका बापाच्या कष्टाचं आज चीज झालं आहे. परिस्थितीचं भांडवल न करता मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर मात करत सचिन न्याहारकर हा हमालाचा मुलगा आता न्यायाधीश झाला आहे. चांदवड तालुक्यातील वाहेगावसाळ इथे उत्तमराव न्याहारकर यांची एक एकर शेती आहे. मात्र हंमातच पिक घेता येत असल्याने उत्तमराव हे लासलगाव येथे माथाडी कामगार म्हणून काम करतात.

सचिनने दहावीपर्यंतचं शिक्षण गावातच घेऊन बारावीपर्यंतच शिक्षण लासलगाव घेतलं. बारावीत चांगले मार्क मिळाल्याने सचिनने पुण्यातील लॉ कॉलेज प्रवेश घेतला. घरातील परिस्थिती नाजूक, आई-वडिलांनी पोटाला चिमटा काढत मुलांच्या शिक्षणात कुठलीच कसूर ठेवली नाही. अभ्यासात सातत्य व प्रचंड मेहनत घेऊन २०१२ मध्ये प्रथम श्रेणी मिळवत पदवी प्राप्र्त केली. घरी जिरायती शेती असल्याने तसेच वडील हमाली करून उदरनिर्वाह करत असल्याने घरची परिस्थिती बेताची होती. परंतु वडिलांनी कधीही अडचण येऊ दिली नाही.

दरम्यानच्या काळात न्याहारकर यांच्या मोठय़ा बंधुस लष्करात संधी मिळाल्याने कौटुंबिक परिस्थितीत सुधारणा झाली. त्यामुळे शिक्षण घेताना मोठा आधार मिळाला. नातेवाईकांच्या मदतीने पुण्यात पोहोचला आणि तेथे शिकत असतानाच त्याने न्यायाधीशाची परीक्षा दिली.

शालेय शिक्षण घेत असतानाच न्यायाधीश होण्याचे स्वप्न बाळगले होते. त्यासाठी अभ्यासात सातत्य ठेवून जास्तीत जास्त वेळ देत अभ्यास केला. त्यासाठी वडील व भावाची वेळोवेळी योग्य मदत मिळाल्याने कमीतकमी कालावधीत यश मिळविता आले, असे न्याहारकर यांनी नमूद केले.

सचिन लहानपणापासूनच हुशार होता. स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने जास्तीत जास्त वेळ अभ्यासाला दिला. अभ्यासात नेहमी सातत्य ठेवले. त्यामुळे एवढय़ा कमी वेळात तो न्यायाधीश पदापर्यंत पोहचू शकला, अशी प्रतिक्रिया सचिन यांचे वडील उत्तमराव न्याहारकर यांनी दिली. वयाच्या २४ व्या वर्षी न्यायााधीश होणारे न्याहारकर हे तालुक्यातील पहिलेच विद्यार्थी होय.

ias ritu maheshwari

देशात होणाऱ्या करोडो रुपयांच्या वीजचोरी विरुद्ध आवाज उठवणारी महिला आयएएस…


482   19-Sep-2018, Wed

भारतात वीजचोरी हा खूप गंभीर प्रश्न बनलेला आहे. आकडेवारी नुसार दरवर्षी जवळपास 1 लाख 3 हजार कोटी रुपयांची वीजचोरी होते. विजेच्या बिलापासून वाचण्यासाठी गरीब लोकच नाही तर शिकलेले लोकं सुद्धा आकडे टाकून वीज चोरी करतात. बोलायचं झालं तर वीज चोरी एक सामान्य गोष्ट बनली आहे. सर्वात मोठी धक्कादायक बाब म्हणजे वीज विभाग वीजचोरी रोखण्यासाठी जेवढ्या संकल्पना आणतो त्यावर तोड काढत लोकं नवीन नवीन आयडिया शोधून वीजचोरी करतात.

पण या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी 39 वर्षीय एक महिला खूप जिद्दीने पेटून उठली आहे आणि यावर एक असा उपाय शोधला आहे त्याची खूप गरज होती. ती महिला सुद्धा कोणी सामान्य महिला नाहीये तर त्या आहेत 2003 बॅच च्या आयएएस ऑफिसर रितू माहेश्वरी.

2000 साली पंजाबच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर त्या 2003 साली आयएएस म्हणून जॉईन झाल्या. विशेष म्हणजे 2011 मध्ये रितू यांची नियुक्ती कानपूर इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनीमध्ये झाली. तिथे काम करत असताना त्यांना दिसले की शहरातील लोक मोठ्या प्रमाणात आकडे टाकून वीजचोरी करत आहेत. त्यांनी या समस्येकडे गंभीरपणे बघत त्यांनी एक नवीन संकल्पना राबवली.

ज्यामध्ये त्यांनी एक तृतीयांश लोकांच्या घरी नवीन स्मार्ट मीटर बसवले. या स्मार्ट मीटरद्वारे वीज वापर हा डिजिटली रेकॉर्ड केला जाऊ शकत होता. ज्यामुळे वीज वितरण प्रणालीमध्ये क्षणाक्षणाला होणार विजेचा वापराचा तपशील सहजपणे बघितला जाऊ शकत होता.

रितू माहेश्वरी माहेश्वरी म्हणतात, ‘मी वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांच्या विरोधाला झुगारून त्यांनी 5 लाखांमधील 1 लाख 60 हजार मिटर बदलले. यामुळे कानपुर शहरातील विजचोरीच्या घटना खूप कमी झाल्या जे की अगोदर 30% होत्या.’ वीज मंत्रालयाच्या वेबसाईटवर बघू शकतो की रितू यांच्या रणनितीने कानपुर इलेक्ट्रिसिटी कंपनीचा तोटा अर्ध्यावर म्हणजे 15.6% वर आला आहे.

वीजचोरी विरुद्ध आवाज उठवल्यानंतर त्या विजचोरांच्या नजरेत आल्या. मोठमोठ्या गुंड आणि नेत्यांकडून त्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये येऊन धमकावले जाऊ लागले. पण रितू सर्व धमक्यांना न घाबरता एक वेगळी सिस्टीम बनवण्यात व्यस्त राहिल्या.

वीजचोरी मध्ये कमी करून गावागावात शेतकऱ्यांपर्यंत वीज पोचवण्याचा त्यांचा मानस आहे. विशेष म्हणजे या समस्येवर डिजिटल मित्र हा एकमेव पर्याय आहे. केंद्र सरकार पाच वर्षात पावर ट्रान्समिशन आणि डिस्ट्रिब्युशन इंडस्ट्री मध्ये जवळजवळ 3 लाख 30 हजार करोड रुपये गुंतनवण्याच्या विचारात आहे. अशात या आयएएस अधिकाऱ्याने केलेले काम खूप अनुकरणीय आणि प्रेरणादायी आहे.

smita sabharwal ias officer

सर्वात कमी वयात मुख्यमंत्री कार्यालयाचा भार सांभाळणाऱ्या महिला IAS अधिकारी…


6555   15-Jun-2018, Fri

तेलंगणाच्या मुख्यमंत्री कार्यालयात नुकतेच अतिरिक्त सचिव म्हणून कार्यभार स्वीकारणाऱ्या आयएएस अधिकारी स्मिता सब्बरवाल यांनी इतिहास रचला आहे. मुख्यमंत्री कार्यालयात या पदाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या त्या सर्वात तरुण अधिकारी बनल्या आहेत. यापूर्वी कधीच एवढ्या कमी वयाच्या अधिकाऱ्याने मुख्यमंत्री कार्यालयात काम केले नाही. यामागचे कारण असे की स्मिता यांनी खूप कमी वयात म्हणजेच वयाच्या २३ व्या वर्षी आयएएसची परीक्षा पास केली होती. त्यांचे आतापर्यंत चे कामकाज एवढे चांगले राहिले आहे की प्रत्येक जण त्यांचे कौतुक करत असतो. त्यांच्या सेवेला आता १५ वर्षे पूर्ण झाले आहेत. त्यांच्या कामामुळे त्यांना ‘द पिपल्स ऑफिसर’ म्हणून ओळखले जाते.

आतापर्यंत स्मिता यांनी वारंगल, विजाग, करीम नगर, चित्तुर या जिल्ह्यात काम केले आहे. तिथले लोक आजही त्यांच्या कामामुळे त्यांची आठवण काढत असतात. त्या जिथे जिथे काम करतात तिथे त्यांची वेगळीच छाप आतापर्यंत त्यांनी पाडली आहे. मूळच्या बंगालच्या दार्जिलिंग येथील असणाऱ्या स्मिता यांचे वडील आर्मी मध्ये होते. त्यामुळे त्यांना देशातील विविध भागात राहायला मिळाले. यामुळे त्यांचे सुरुवातीचे शिक्षण सुद्धा असेच झाले. त्यांचे वडील कर्नल पी.के. दास हे सेवेतून रिटायर्ड झाल्यानंतर हैद्राबाद मधेच स्थायिक झाले. त्यामुळे स्मिता यांनी आपली १२ वि चे शिक्षण हैद्राबाद मधील सेंट एेन्स मधून केले आणि सेंट फ्रांसिस कॉलेजमधून त्या कॉमर्स मधून ग्रॅज्युएट झाल्या.

स्मिता या १२ वी मध्ये ISC बोर्डाच्या टॉपर होत्या. यूपीएससीच्या सिव्हिल परीक्षामध्ये सुद्धा त्यांना ४ थी रँक मिळाली होती. त्यावेळी त्या फक्त २३ वर्षाच्या होत्या. त्यानंतर त्यांना देशातील सर्वात प्रतिष्ठित आयएएस ची नोकरी जॉईन करण्याची संधी मिळाली. त्यांच्या कामामुळे त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. पण स्मिता म्हणतात की त्यांचे कामच त्यांच्यासाठी खरे काम आहे. त्यांच्या वडिलांचे स्वप्न होते की त्या आयएएस बनाव्यात. यासाठी त्यांनी ग्रॅज्युएशन नंतर लगेच सिव्हिल परीक्षेची तयारी सुरू केली.

निकाल लागल्यानंतर त्यांना त्या देशातून ४ थी रँक मिळवून पास झाल्याची बातमी मिळाली. आयएएस मध्ये चांगली रँक मिळाल्याने त्यांना हैद्राबाद हे केडर मिळाले. त्यावेळी आंध्र प्रदेशचे विभाजन झाले नव्हते. त्यांना वारंगल येथील नगर परिषद आयुक्त म्हणून जबाबदारी मिळाली.

तिथे त्यांनी ‘फंड योर सिटी’ या नावाने एक योजना चालू केली. नक्षलवादी प्रभावित त्या भागात त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर उभे करण्यासाठी सहकार्य करण्याचे अपील केले. तिथल्या लोकांनी उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभाग नोंदवला. स्मिता यांच्या असलेल्या चांगल्या हेतूमुळे त्या शहराचा चेहरा मोहरा बदलून गेला.

वारंगल मध्ये काम केल्यानंतर त्यांना करीमनगर जिल्ह्यात जबाबदारी मिळाली. हा तेलंगणा मधील एक मागास जिल्हा मानला जायचा. २०११ मध्ये त्यांना करीमनगरचे जिल्हाधिकारी नेमण्यात आले. तिथे त्यांनी आरोग्य सेवा व शिक्षण सेवा बदलण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी अम्मा लालना या नावाने एक योजना आणत तेथील सरकारी दवाखान्यात स्वच्छता मोहीम राबविली. त्यानंतर गरोदर महिलांसाठी सुद्धा मोफत तपासणी शिबीर राबवले.

अगोदर रूग्ण सरकारी दवाखान्यात येण्यास टाळत असत व स्मिता यांनी रुग्णांना सरकारी दवाखान्यात येण्यासाठी विविध योजना राबविल्या. त्या प्रत्येय दवाखान्यात स्काइप सुविधा वापरून लक्ष ठेवत होत्या.

गरीब महिलांना खाजगी रूग्णालयात ३०-३० हजार रुपये खर्च करणे परवडणारे नव्हते. त्यासाठी त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्या म्हणून अम्मा लालना ही योजना राबविल्याची माहिती स्मिता यांनी दिली. स्मिता यांनी फकीर रुग्णालयातील सुविधाच नाही तर साफ स्वच्छता टिकवण्यासाठी सुद्धा खूप लक्ष दिले. चांगले उपकरणे त्यांनी सरकारी दवाखान्यात उपलब्ध करून दिले. आज पूर्ण राज्यात स्मिता यांचे मॉडेल पाळले जाते. त्यांनी यासोबतच शिक्षण क्षेत्रात सुद्धा खूप भरीव कामगिरी केली त्यामुळे त्यांना पीपल्स ऑफिसर या पुरस्काराने गौरविण्यात आले. स्मिता या गरजू लोकांसाठी नेहमी उपलब्ध असत. असे कधीच नाही व्हायचे की एखाद्याला त्यांची गरज आहे आणि त्या भेटल्या नाही.

जिल्हाधिकारी म्हणून त्या रोज २००-३०० लोकांना भेटत असत आणि त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवत असत. यामुळे लोकांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान असायचे व सरकारी कार्यालयाकडे बघायचा त्यांचा दृष्टिकोन सुद्धा बदलायचा. आंध्र प्रदेशचे विभाजन झाल्यानंतर त्यांना तेलंगणाच्या मुख्यमंत्री कार्यालयात जबाबदारी मिळाली आहे. इतक्या कमी वयात इथे पोहचणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी आहेत.

त्यांचा विवाह एका आयपीएस अधिकाऱ्यासोबत झाला आहे जे की त्यांच्या बॅच चे आहेत. त्यांनी सोबतच मसुरी येथे ट्रेनिंग पूर्ण केली होती. तिथे ते मित्र बनले आणि दोन्ही परिवाराच्या मर्जीने पूढे त्यांनी लग्न केले. त्यांना दोन मुलं पण आहेत. मुलांना वेळ देण्याविषयी त्यांनी सांगितले की आम्हाला जे आवडायचं ते आम्ही निवडलं आहे, मग मुलांना खूप कमी वेळ मिळतो. आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न बघणाऱ्या महिला आणि मुलींसाठी त्यांचे एक प्रेरणा आहे. पण त्यासाठी त्याग सुद्धा करावा लागतो.

Inspirational story of the courage and determination of a woman from a tribal tribe ...

एका आदिवासी जमातीतील महिलेच्या धैर्य आणि दृढ संकल्पाची प्रेरणादायी गोष्ट…


1655   09-Jun-2018, Sat

आधुनिक भारतात ज्या महिलांनी आपले उच्च स्थान मिळविले आहे. त्यांनी आपल्या कार्याने समाजात एक उत्कृष्ट उदाहरण दिलेले आहे. पुरुषापेक्षाही अधिक चांगल कार्य या महिलांनी केले हे सांगणे अतिशयोक्ती नाही आहे. याच साखळीत समाजातील भ्रष्टाचार दूर करण्या करिता दृढ संकल्प करून आपले कार्य करणाऱ्या डीएम बी. चंद्रकला यांची प्रेरणादायक गोष्ट आपण बघूया..

फेसबुकवर यांच्या फोटोला कमीत कमी ५० ते ९० हजार लाईक घेणाऱ्या बुलंदशहरच्या डीएम बी. चंद्रकला यांनी आपल्या कठोर परिश्रमाने २००८ साली सिविल सेवा परीक्षेमध्ये यश मिळविले होते. तेलंगणा येथील करीम नगर जिल्ह्यातील गरजानापल्ली नावाच्या छोट्याश्या खेड्यात एका आदिवासी कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. २००८ साली झालेल्या UPSC मध्ये त्यांनी पूर्ण भारतातून ४०९वा क्रमांक मिळविला होता. भ्रष्ट अधिकाऱ्या विरोधात त्यांनी केलेल्या कार्यवाहीची चर्चा संपूर्ण भारतात आहे.

पदवी घेण्याकरिता बी चंद्रकला यांनी कोटी महिला विद्यालयात प्रवेश घेतला. पदवीच्या दुसर्यावर्षीच त्यांचा विवाह झाला परंतु त्यांनी आपल्या शिक्षणाची जिद्द सोडली नाही. मुक्त विद्यापीठातून त्यांनी एम.ए. अर्थशास्त्राची पदवी घेतली आणि पतीच्या मदतीने UPSCची तयारी चालू केली. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आंध्र प्रदेश लोकसेवा आयोग (APPSC) परीक्षेत त्या राज्यातून पहिल्या आल्या. या यशामुळे त्यांना IAS होण्याकरिता अधिक बळ मिळाले. आपल्या चौथ्या प्रयत्नात त्यांनी UPSC परीक्षा पास केली.

एप्रिल २०१२ मध्ये त्यांची पहिली नियुक्ती हमीरपुर येथे डीएम म्हणून झाली त्यानंतर ८ एप्रिल २०१४ ला मथुरा येथे त्यांची नियुक्ती करण्यात आली. इथे त्यांनी फक्त १२९ दिवस काम केले त्यानंतर बी. चंद्रकला यांची बदली बुलंदशहर येथे करण्यात आली. बुलंदशहराच्या इतिहासात आजपर्यंत सर्वात प्रामाणिक अधिकारी म्हणून बी. चंद्रकला यांचे नाव घेण्यात येते. चंद्रकला यांनी वीज वितरण, राजस्व विभाग, तहसील सर्व नगर पालिका येथील भ्रष्टाचाराच्या विरोधात मोर्चा तयार केला आहे. आज तर अशी परिस्थिती आहे भ्रष्ट अधिकारी चंद्रकला यांच्या समोर जाण्यास थरथर कापतात. ठेकेदारांना भीती असते कि त्यांच्या कामावर कधीही चंद्रकला भेट देऊ शकतात.

आपल्या माहितीसाठी मागील काही महिन्या अगोदर चंद्रकला यांची मेरठ येथे बदली झाली आहे आता त्यांना केंद्र सरकारमध्ये पेयजल विभागात उपसचिव बनविण्यात आले आहे. चंद्रकला यांचे भ्रष्टाचारा विरोधात असलेले किस्से सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात वायरल झाले आहे. त्यांची हि गोष्ट अनेक महिलांना प्रेरणादायक आहे.

Dr. Girish Badole

डॉ. गिरीश बदोले

 


3372   03-May-2018, Thu

प्रतिकूल परिस्थिती ही काही अडचणी सांगण्याची सबब नाही. उलट लक्ष्यावर शक्ती एकवटण्यासाठी अशी परिस्थितीही पथ्यावरच पडू शकते, हे दाखवून दिले आहे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत राज्यातून प्रथम तर देशातून विसाव्या स्थानी आलेले डॉ. गिरीश दिलीपराव बदोले यांनी.

डॉ. बदोले हे मराठवाडय़ातील उस्मानाबाद जिल्ह्य़ातील. कर्नाटक सीमा भागातील उमरगा तालुक्यातील कसगी या गावचे.

चार एकर कोरडवाहू जमिनीवर शेती करणारे वडील, त्यांना शेतीत मदत करणारी आई व एक भाऊ आणि डॉ. बदोले, असे चौकोनी कुटुंब. घराचा भार अर्थातच शेतीवरच. तेव्हा अशा परिस्थितीत जगताना पावलोपावली तडजोड करणे हे ओघाने आलेच.

परिस्थिती सुधारायची असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, हे डॉ. बदोले यांच्या वडिलांना माहीत होते. त्यांनी दोन्ही मुलांना उत्तम शिक्षण द्यायचे ठरवले. प्रसंगी शिक्षणासाठी शेती गहाण ठेवून कर्जही काढण्याची तयारी ठेवली.

कसगीतील जिल्हा परिषद शाळेत पहिली ते दुसरीपर्यंतचे शिक्षण घेतले. पुढच्या शिक्षणासाठी त्यांना तुळजापूरला पाठवण्यात आले. तेथे सैनिकी विद्यालयात शिस्तीत डॉ. बदोले यांचे शिक्षण झाले. येथेच त्यांच्यामध्ये सामाजिक जाणीव रुजल्या. देशासाठी काही तरी करण्याचा संस्कार याच सैनिकी शाळेतून मिळाला.

दहावीला ८९ टक्के गुण घेतल्यानंतर लातुरातील दयानंद महाविद्यालयात विज्ञान शाखेला प्रवेश मिळाला. मग बारावीला ९४ टक्के गुण मिळवून मुंबईच्या जे. जे. वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवला. एमबीबीएसचे शिक्षण वडिलांनी कर्ज काढूनच पूर्ण केले.

त्यानंतर मुंबईतीलच ओएनजीसीमध्ये वैद्यकीय सेवा करताना ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांचे हाल, वेदना, परिस्थिती जवळून पाहता आली. तेव्हाच वैद्यकीय पेशा स्वीकारण्यापेक्षा प्रशासकीय सेवेतून सामाजिक परिस्थितीत काही बदल घडवता येतील का, या विचारांचे मूळ मनात रुजले आणि त्यादृष्टीने निश्चय करून वाटचाल सुरू ठेवली.

परीक्षेची तयारी करताना एक विशिष्ट पद्धत निश्चित केली. अनुभवी मित्रांकडून मार्गदर्शन घेतले. मोबाइल हे केवळ संपर्काचे साधन मानले आणि त्यातील इंटरनेट सेवेचा केवळ अभ्यासासाठीच उपयोग करायचा, हे कटाक्षाने पाळले.

विशिष्ट विषयांसाठी मित्र-तज्ज्ञांशी सल्लामसलत करणे, मार्गदर्शन घेणे, याही बाजूवर भर दिला. प्रशासकीय सेवेत जाताना ग्रामीण भागात मूलभूत सुविधा देण्यावर भर असेल. विशेषत: शिक्षण, आरोग्य, रस्ते या सोयी-सुविधांच्या व्यवस्थेकडे अधिक लक्ष देण्याचा मनोदय डॉ. बदोले व्यक्त करतात.

M Shivaguru prabhakaran from labour to IAS

मजूर ते आयएएस…


1161   02-May-2018, Wed

हिंमत, जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर कोणतेही काम कठीण नसते. याचा प्रत्यय तामिळनाडूतील एम शिवागुरू प्रभाकरनकडे पाहिल्यानंतर येतो. देशातील सर्वांत प्रतिष्ठित आणि कठीण मानल्या जाणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत आयएएससाठी त्याची निवड झाली आहे. २००४ मध्ये पैशांअभावी इंजिनिअर होण्याचे स्वप्न अर्ध्यावरच सोडावे लागले होते. त्यानंतर आयएएस होण्यापर्यंतचा त्याचा प्रवास प्रेरणादायी असा आहे.

तंजावर जिल्ह्यातील पट्टुकोट्टईमधील मेलाओत्तान्काडू गावाचा रहिवासी असलेल्या प्रभाकरनचा प्रवास मद्यपी वडील, रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म आणि आयआयटी मद्रासच्या कॅम्पसमधून आता प्रतिष्ठित सेंट जॉर्ज फोर्टच्या परिसरापर्यंत पोहोचला आहे. शुक्रवारी यूपीएससीच्या जाहीर झालेल्या निकालात शिवागुरू प्रभाकरनने एकूण ९९० उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये १०१ वी रँक प्राप्त केली आहे. शिवागुरूशिवाय तामिळनाडूतून व्ही. कीर्ति वासन (२९), एल. मधुबालन (७१) आणि एस. बालाचंदर (१२९) यांनीही या यादीत स्थान मिळवले आहे.

बारावीनंतर हलाखीच्या परिस्थितीमुळे शिक्षण थांबवावे लागले होते. वडील सतत दारूच्या नशेत असत. त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी प्रभाकरनवर येऊन पडलेली. प्रभाकरनने दोन वर्षे लाकूड अड्ड्यावर आणि शेतात मजुरी केली. त्याला कोणत्याही परिस्थिती आपल्या स्वप्नावर पाणी फेरायचे नव्हते.

२००८ मध्ये प्रभाकरनने लहान भावाचे इंजिनिअर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत केली आणि आपल्या बहिणीचे लग्नही केले. त्यानंतर त्याने आयआयटीत प्रवेश मिळवण्याचे स्वप्न घेऊन चेन्नई गाठले. तेथे तो दिवसभर अभ्यास करत आणि सेंट थॉमस माऊंट रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर रात्र घालवत. मेहनतीच्या जोरावर प्रभाकरनने आयआयटी मद्रासमध्ये प्रवेश मिळवला आणि २०१४ मध्ये एम.टेक पूर्ण केले. येथेही तो गुणवत्ता यादीत चमकला. त्यानंतर प्रभाकरनने चौथ्या प्रयत्नात यूपीएससीत यश मिळवले. त्याचा हा संघर्ष सर्वांसाठी प्रेरणादायी असाच आहे.

Alankrita Pandey, Came out of Depression to get Rank 85

Alankrita Pandey, Came out of Depression to get Rank 85,


3601   12-Jan-2018, Fri

In January 2014, I decided to start the preparation. But in mid 2014, I had to go through a personal crisis. It brought me to the level of using anti-depressants, anger management sessions and counseling by friends and family.

I had planned to write prelims in January 2014 and started reading some basic books but due to the aggravated situation, I could not even write the exam. These circumstances went on till October and finally I had it under control. By this time, I had decided to focus only on my career and plans for the next year and make my dream come true. This crisis gave me a clear sense of purpose.

The life changing moment was not 10th May 2016 for me, when the results came out, but it was the day when I had stuck a paper on a wall in my room saying- “I want a 2-digit AIR in CSE-2015.”

It has been said that – all things in this universe are created twice, once in your mind and then in the physical world. The first time was that day. Then began the hard work of day in-day out studies. I planned my preparation first at macro level and then at micro level eg completing full mains syllabus by May 15, then reducing it to topic wise scheduling and then hour wise everyday.

There used to be moments of doubt, depression and stress quite often for me. To tackle it, I used to run in the mornings, meditate and exercise. Sometimes, I would lose patience to go on. Then, I used to write on a paper as to why I started all this and this would provide me the motivation to move forward with more enthusiasm. Whenever I used to feel lethargic, I would see the newspaper and problems faced by various sections of society and think as to how could I help.

This always used to give me a sense of urgency to get into that position. I would also like to take this opportunity to thank my parents, family, teachers(Prof BRA Rao and institute) and my friends (Lokesh, Deepankar, Odyssey, my college gang and seniors) for supporting me throughout. Talking to my father always used to be such an encouraging experience. He used to make me believe that it is going to happen for sure, the belief and faith that he showed always kept me positive. Rao sir too had believed in me right from the first day and never refused any kind of help despite his old age and other difficulties. It was not a coaching institute for me but an extended family. I would not have been able to achieve this without the support of these people.

With these experiences, I kept going and cleared this examination in my first attempt.

From a primary teacher to ACP

From a primary teacher to ACP


1549   12-Jan-2018, Fri

Poonam Dalal says she is slightly different from many others yet at the same time very similar to a lot of us. She has her ancestral roots at Chhara village in Jhajjar District, Haryana. But she was born and brought up in Delhi.

Poonam started her career as a primary teacher in a government school at Delhi. Along with the job she did her graduation as an external student from Delhi University.

After completing her graduation she appeared for different Bank PO Exams and SSC Graduate Level Exam and cleared all of them. SBI PO, SBI Associates PO, Union Bank Of India PO, SSC Graduate Level 2005 etc are some of them.

She finally chose SBI PO. She regrets that there was nobody to guide me about UPSC Exam.  (Had there been somebody at that time to guide her about UPSC Exam, you would have been reading this interview much earlier!)

She also shares the fact that at that stage she used to be very under-confident about her chances at CS Examination. She says, “I am sharing these thoughts so that all of those who are somehow feeling the same as I had once been, can come out of it and not repeat the mistake which I did”.

After 3 years in SBI, she joined the Income Tax Department securing a very decent rank (7) at all India level in SSC graduate level Examination 2006 which gave her the confidence of writing UPSC. This is also a time she realised that being a General Category candidate her attempts were going to be wasted anyhow because of her age (Poonam was around 28 by then, and 30 was then the upper age limit for General Category candidates.)

She gave her first attempt at UPSC CSE in 2009 at the age of 28 and got Railways (RPF).

She didn’t join that service and sat for CSE 2010. She again got Railways, but a different service (IRPS).

Meanwhile, she had cleared Haryana PSC and joined as Dy.SP in Haryana Police in 2011.

In 2011, she couldn’t qualify Prelims. She thought her tryst with UPSC was over due to the age-limit. (As hinted before it was only 30 years for general category candidates then, and even now it’s only 32 years).

‘Fortune favors the brave’ – many say. Life has kept more surprises for her. In 2015, because of agitations and petitions from candidates who were affected by pattern change in 2011, the government gave an extra attempt to all those who wrote for Civil Services Exam in 2011. Thus, Poonam got an opportunity to appear again for UPSC.

9 months pregnant at the time of Prelims; had to take care a 3 months old baby while writing mains!

This attempt came as a great challenge as Poonam was out of touch with preparation, being working 24*7 in police force. Much more than that she was 9 months pregnant at the time of prelims. She cleared UPSC prelims in flying colors by self-study. While preparing for mains she had also to take care of her son who was just 3 months old. It was never easy. But as Poonam puts it, she got her best rank in her most challenging circumstances


Top