In the four months after the marriage, Veerapatni was become the deputy superintendent of police

लग्नानंतर चार महिन्यातच वीरमरण आलेल्याच्या शहीदाची वीरपत्नी झाली उपशिक्षणाधिकारी


1725   14-Nov-2018, Wed

लष्करात असलेल्या पतीला वीरमरण आल्यानंतर खडतर प्रशिक्षण घेऊन सैन्यातच लेफ्टनंट झालेल्या स्वाती महाडिकच्या जिद्द आणि चिकाटीची महती संपूर्ण देशाला माहीत आहे. त्याचप्रमाणे लग्नानंतर अवघ्या चारच महिन्यांत नक्षल्यांशी लढताना पती गमावणार्‍या एका वीरपत्नीने स्पर्धा परिक्षांच्या माध्यमातून अत्यंत मेहनतीने तयारी करत थेट उपशिक्षणाधिकारी पदापर्यंत झेप घेतली आहे.

१० जानेवारीला आयोगाचे निकाल जाहीर झाले त्यात या विरपत्नीने हे दैदिप्यमान यश संपादन केले आहे. हेमलता जुरू परसा असे या वीर पत्नीचे नाव आहे. त्यांची ही जिद्द स्पर्धा परिक्षांच्या माध्यमातून अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहणार्‍या तरुण-तरुणींना निश्‍चितच प्रेरणादाई ठरणारी आहे.

हेमलता आणि जुरू दोघेही गोंड-माडिया आदिवासी. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम हिदूर हे जुरू केये परसा यांचे गाव. घरची परिस्थिती बेताचीच. बाबा आमटे यांच्या लोकबिरादरी आश्रमशाळेत त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले.

पदवी पास झाल्यानंतर जुरू पोलिसात भरती झाला. पत्नी शिक्षिका होती. लग्नाला अवघे चार महिने होत नाही तोच ८ ऑक्टोबर २००९ रोजी नक्षल्यांशी लढताना जुरू शहीद झाला. त्यानंतर हेमलताने दुसरे लग्न न करता शिक्षणावर लक्ष केंद्रित केले व स्पर्धा परीक्षांची तयारी सुरु केली.

पती गेल्याचे डोंगरा एवढे दु:ख असतांना अत्यंत जिद्द आणि चिकाटीने सर्व संकटांवर मात केली. २०१५ मध्ये त्या गटशिक्षणाधिकारी झाल्या. जिद्द आणि चिकाटी कायम होती. पतीच्या आठवणी आणि उंच भरारी घेण्याच्या स्वप्नाने त्यांना पुन्हा बळ दिले.

शहीद पतीला सलामी देण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. नुकताच १० जानेवारीला आयोगाने निकाल जाहीर केला आणि त्यात हेमलता यांची उपशिक्षणाधिकारीपदी निवड झाली. प्रतिकुल परिस्थितीत एका आदिवासी तरुणीने मिळवलेले हे यश इतर सर्व यशांपेक्षा खुप मोठे आहे.

success story of shrikant neve

पीएसआय होऊन पुसला “ढ” शिक्का...


6444   29-Sep-2019, Sun

तब्बल ९ वेळा (बारावीला ५ वेळा आणि डिप्लोमाला ४ वेळा) नापास झालेल्या श्रीकांत नेवेची कहानी....

हातलावल्यावर सोन्याची माती व्हावी, त्याप्रमाणे त्याला प्रत्येक परीक्षेत अपयश आले. नापासाचा शिक्का माथी चिकटवून फिरणे लाजिरवाणे वाटू लागले.शेवटी एक दिवस त्याच्यातील आत्मविश्वास परत आला. “ढ” विद्यार्थ्याचा शिक्का पुसून आज तो चक्क “पीएसआय” झाला आहे.

श्रीकांतचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जळगाव शहरातील न्यू इंग्लीश स्कूलमध्ये झाले.दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने मोठया हिमतीने व पुढे जाऊन मोठे होण्याच्या उर्मीने विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. दुर्दैवाने चांगल्या प्रयत्नानंतरही तो बारावीची परीक्षा अनुतीर्ण झाला.अपयशाने पहिला धक्का दिल्यानंतर, त्याच्यातील होता नव्हता सर्व आत्मविश्वास गळून पडला. तरीही त्याने धीर धरून पुणे येथे दहावीच्या गुणांवर एरोनॉटिकल इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेतला.मात्र प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कळले,की त्या डिग्रीला कुठेच मान्यता नाही.

शेवटी जळगावात येवून मेकॅनिकलच्या डिप्लोमाला प्रवेश घेतला. मनातील आत्मविश्वास कमी झाल्याच्या स्थितीत दोन वर्षा नंतरही कॉलेज मधील शिकविलेले सर्व डोक्यावरून जाते आहे, हे लक्षांत घेऊन त्याने डिप्लोमाला रामराम केला.दरम्यानच्या काळात पुन्हा बारावीची परीक्षा देऊन पहिली, तेथेही अपयश आले. या सर्व घडामोडीत तब्बल नऊवेळा (बारावी पाचवेळा व डिप्लोमा चारवेळा) नापास झालेल्या शिकांतवर घरच्यांनीही विश्वास ठेवणे बंद केले.

सुदैवाने श्रीकांत मध्ये दळलेल्या आत्मविश्वासाचा निखारा कुठेतरी धगधगत होता.तो विझण्यापूर्वीच त्याने आपले नेमके चुकते तरी काय, यावर चिंतन केले. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात प्रवेश घेऊन बी.ए. चे शिक्षण घेण्याचा ध्यास घेतला.घरच्यांनी सहकार्य करणे सोडून दिल्याने, शिक्षणाचा खर्च उचलण्यासाठी टेलिफोन बूथ, स्थानिक वृत्त वाहिनीवर उद्घोषक म्हणून काम केले.ऑडीओ जाहिरातींना background व्हाईस दिला. वृतनिवेदक म्हणून तत्कालीन जिल्हाधिकारी विजय सिंघल यांची मुलाखात घेतल्यानंतर त्याच्यात स्पर्धा परीक्षेची ओढ निर्माण झाली.आवश्यक तो अभ्यास करून दोनवेळा राज्यसेवा पूर्व व एकवेळ मुख्य परीक्षा तसेच उपनिरीक्षक, विक्रीकर निरक्षकाची परीक्षा दिली.मात्र या सर्व परीक्षामध्ये अपयशच पदरी पडले. अखेर आरपार ची लढाई समजून त्याने तिसऱ्या प्रयत्नात यशश्रीला आपलाल्याकडे खेचून आणली. हुलकावणी देणाऱ्या यशाने त्याच्या अंगावर “पीएसआय” ची वर्दी चढवली.

मुलाने नाव ठेवणाऱ्याना तोंडात बोट घालायला लावले म्हणून श्रीकांतचे वडील भास्कर नेवे यांचा आनंद गगनात मावला नाही. अधूनमधून आर्धिक पाठबळ देणाऱ्या मोठ्या भावालाही आपले पैसे सार्थकी लागल्याबद्दल समाधान वाटले.....

Studying For Hours Not Mandatory to Become IAS

Studying For Hours Not Mandatory to Become IAS


3437   16-Aug-2019, Fri

A native of Dumka district Jharkhand, Saurabh cleared the UPSC Civil Services Examination (CSE) in 2018 with an All India Rank of 113. The 32-year-old scored third highest marks (201) in the interview round that took place in April this year. Saurabh cleared the competitive examination in his second attempt after he failed to crack the Mains in his first attempt in 2017.

 

Saurabh’s academic life was pretty much on an auto-pilot mode. He moved to Kolkata and pursued a bachelor’s degree in Commerce from St Xavier’s College and later, went for CA and CS followed by an MBA from the Faculty of Management Studies from the University of Delhi.

He worked Capgemini for 1.5 years before joining RBI Kolkata in December 2016. His wife, mother and father also moved to Kolkata to be with him.

It was during his preparations for the RBI tests and interviews when Saurabh realised his interests lay in more than just banking. So while studying for the tests, Saurabh also capitalised on exploring the do’s and don’ts of UPSC.

“I liked my job and banking was and is still interesting for me. But I always wanted my work to benefit people. Multiple factors advanced my liking for UPSC. My father owned a printing press where government officials often visited. He always held high regard for them,” he says.

One of the biggest influences for him was a District Collector of Dumka who interacted with people to understand their problems, “I saw a genuine curiosity [in her] to find out people’s problems and resolve them. She tried very hard to bridge the communication gap between the people and the government. Back then, I wished to be like her.”

Saurabh had casually mentioned UPSC to his wife Parul once, but then he got busy with his RBI job.

‘What happened to your IAS dreams?’ asked Parul a few months later.

Two months into the preparations, Saurabh received the happy news that he and Parul were expecting. And like all expectant parents, Saurabh and Parul’s responsibilities had increased, but the duo was firm on Saurabh’s dream. He looked at parenting and his full-time job as an advantage as each second of his life had become more valuable.

It took Saurabh nearly four to five months to get into the cycle of decoding study patterns, the preparation strategy, and memorising the content. Since there was no time left to join classes, Saurabh relied entirely on self-study.

Dedicating around nine hours a day is a standard plan adopted by most civil services aspirants. But due to a full-time job, Saurabh could only clock in four to five hours daily.

Setting a routine was the most challenging part, “Despite having a knack for Commerce, I chose Management as my optional. That was my first mistake. Beating myself up for not studying for five hours at a stretch was another,” says Saurabh.

Saurabh dropped the rigid approach and started studying whenever he would get time. “If I did not wake up early, I would cover it up by studying at night. I also used my coffee and lunch breaks for scrolling through the news. I tried to end the psychological pressure by thinking of ways to make up.”

Just a week before Prelims in June 2017, Parul delivered a baby boy, and Saurabh balanced his responsibilities well during this period. “I was never a fan of last-minute studies anyway, so my baby boy did not affect my preparations in any way. In the hospital, I was with my books right next to my wife and Pranav throughout.”

His hard work paid off when Saurabh cleared the Prelims with 117 marks and went straight to prepping for MAINS. But now his time had further divided among his family, work and studies.

This propelled Saurabh to work out how to strike a balance between General Studies (GS), Optional, Ethics and Essays. “Optional has the potential to fetch 60 per cent or more marks, and the questions on ethics and essay are more technical-based. I focussed more on these subjects.”

 

Saurabh made sure he did not miss out on hospital visits or special moments with Pranav. He installed news apps on his phone and found interstices between putting his child to sleep or waiting at the clinic.

However, appearing for the Mains was a wake-up call for Saurabh, “I had almost forgotten how to write in a limited time. My answers were not structured well, they were lengthy and mainly were irrelevant to the questions.”

“Completing entire syllabus was not possible anyway, so I tried studying only a few important topics. It was my self-consolation mode that helped me remain calm and composed,” Saurabh adds.

Falling short of 50 marks, Saurabh did not clear the Mains. His first thought was to give up, “Preparation took a toll on me. I already had a stable job, but something told me to give it another try. This time I had to eliminate the wrongs.”

Sadly, Saurabh had lost his father during this time and found solace, assurance and encouragement from his uncle, Dilip.

Saurabh began preparing anew for UPSC 2018, and this time he had a more organised and practical plan which included spending time with his son, being with him during vaccinations, giving a 100 per cent at his job and looking after his family.

He began with attempting several online mock tests and wrote down all that he had learnt.

While he tried to lessen the pressure on his studies, the work at his office increased. There were days when he had to skip his preparation altogether. Believing that he had nothing to lose, Saurabh trusted his instincts and appeared for the Prelims.

And he cleared it!

A few months later, he appeared for the Mains and sailed through with 814 marks out of 1750. His biggest fear was now over.

“I have given several interviews, and so the interview part was much easier for me than the Mains. I already knew all I had to do now was to clear the Interview round. Taking no risk, I joined classes,” he says. Fortunately, the teacher was flexible enough to accommodate Saurabh anytime during the day. He even made friends at classes who would sit together and help each other work on their drawbacks.

Finally, the interview day arrived. He left home fully prepared and confident. A bit of nervousness did creep in as he was the first to appear for the Interview.

“From asking about issues in West Bengal and Jharkhand to the solutions about improving India’s economy, the questions were like a jackpot!” he beams.

After the Interview, Saurabh focussed on his work and gave as much time as possible to his little one. “I had no expectations, and I knew I had my job to fall back on.”

On 9 April 2019, he received a news that changed his life, “I had cleared the Interview. In my wildest dreams, I had not imagined getting the third highest marks in the Interview round and an AIR of 113. It was overwhelming and unbelievable.”

Two months later, Saurabh quit RBI. For now, he is dedicating all his time to his family before he moves to the Lal Bahadur Shastri National Academy of Administration, Mussoorie by August-end.

“It does not matter if you are a parent or a working professional. Taking out five hours is not impossible. All you have to do is sustain the momentum. Do not let a small headache or a family function come in your way. Willpower and discipline are two of your biggest strengths, exploit it wisely. Set your goal and embark on it without fear and doubts,” says Saurabh.

mangesh Vadne - PSI 2017

...अन् 'पीएसआय'च्या वर्दीवर पाच वर्षांनी गावात पाऊल!
 


9806   11-Apr-2019, Thu

'जिंदगी की असली उड़ान बाकि है, जिंदगी के कई इम्तिहान अभी बाकि है| अभी तो नापी है मुट्ठीभर जमीन, हमने अभी तो सारा आसमान बाकि है|' असे म्हणत मनाशी बाळगलेली जिद्द, परिस्थितीशी दोन हात करण्याची उर्मी आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करत स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी पुणे गाठले. अधिकरी पद हासील करूनच गावात पाऊल टाकीन, असा पण केला. अन् तो तडीस नेत थेट पाच वर्षांनी 'पीएसआय'च्या वर्दीवरच गावात पहिलं पाऊल टाकलं. जळकोटवाडीच्या मंगेश वडणे याची ही यशोगाथा नवोदित परीक्षार्थींसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.   

मंगेश केशव वडणे याची ही गोष्ट. मूळ गाव उस्मानाबाद जिल्ह्यातील जळकोटवाडी (ता. तुळजापूर). गावातील जि.प. शाळेतच त्याचे प्राथमिक शिक्षण झाले. तर, माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालय, वडगाव काटी येथे झाले. शेळगाव (ता. बार्शी) येथील ज्युनिअर कॉलेजमधून अकरावी व बारावी पूर्ण केली. त्यानंतर, सन २०१० साली पाणीवच्या (ता. माळशिरस) श्रीराम अध्यापक विद्यालयातून इंग्रजी माध्यमातून डीएडची पदविका घेतली. पुढे, तुळजापूरच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातून औरंगाबाद विद्यापीठाची फिजिक्स विषयातून बी.एस्सी. पदवी प्राप्त केली.

तामलवाडी (ता. तुळजापूर) येथे खासगी प्राथमिक स्कूलमध्ये मुख्याध्यापक म्हणून त्याने तीन वर्षे नोकरी केली. एकीकडे, स्पर्धा परीक्षेतून अधिकारी बनण्याचं ध्येय त्याला स्वस्थ बसून देत नव्हतं. पण कौटुंबिक परिस्थिती आडवी येत होती. २०११साली दीर्घ आजाराने आईचं निधन झालं होतं. त्यामुळे वडीलच आई-बाप अशी भूमिका बजावायचे.

शेवटी, परिस्थतीशी दोन हात करीत मंगेशने ध्येयपूर्ती साध्य कण्यासाठी पुणं गाठलंच. 'एमपीएससीतून पोस्ट घेऊन खाकी वर्दीवरच गावात पाऊल टाकेन' हा संकल्प त्याने केला. अन् त्या दिशेने त्याचा प्रवास सुरू झाला. सातत्यपूर्ण अभ्यासाला कठोर मेहनतीची जोड देत सन २०१५ पासून स्पर्धा परीक्षा द्यायला सुरूवात झाली.

पुण्यात आला. स्पर्धा परिक्षेच्या क्लासेससाठी खरंतर पुणं प्रसिद्ध. तरीही, कोणताही क्लास न लावता, मंगेशने केवळ अभ्यासिकेत अभ्यास केला. एमपीएससीतून सीआयडी पीएसआय, एक्साईज पीएसआय, एसटीआय, असिस्टंट आणि पीएसआय यासह एकूण बारा मुख्य परिक्षांपर्यंत धडक मारली. पण् अंतिम मेरीटमध्ये नाव काही येत नव्हतं. अशावेळी हाताश होऊन त्याला नैराश्य यायचं. त्यातून सावरण्यासाठी योगा- मेडिटेशनकडे लक्ष दिलं.

आर्थिक चणचण दूर करण्यासाठी मोठा भाऊ विनोद वडणे आणि विवाहीत बहिण प्रवीणा वडणे- पोखर्णा यांनी मदतीचा हात दिला. बहिणीने तर चक्क स्वत:चे दागिने गहाण ठेऊन मंगेशला वेळोवेळी आर्थिक मदत केली. याची क्षणोक्षणी जाणीव ठेवत, मंगेश पुन्हा हिंमतीने अभ्यास अन् शारीरिक चाचणीची तयारी सुरू ठेवायचा. अखेर २०१७सालच्या पीएसआय परीक्षेत त्याने यशाचा झेंडा रोवलाच. शारीरिक चाचणीत तर १०० पैकी १०० गुण घेत त्याने यश मिळवलं.

आपला संकल्प तडीस नेत तब्बल थेट पाच वर्षांनी '#पीएसआय'च्या वर्दीवरच गावात पाऊल टाकलं. ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात त्याचं स्वागत केलं. गावातील महिलांनी औक्षण करून शुभेच्छा दिल्या. तर, वडील, भाऊ आणि बहिणी यांच्यासह कुटुंबातील सदस्यांच्या आनंदाला तर पारावार उरला नव्हता. कोणत्याही क्लासविना केवळ प्रबळ इच्छाशक्ती आणि ध्येय साध्य करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न याच्या जोरावर मंगेशने मिळविलेलं हे यश सर्वांसाठी निश्चितच प्रेरणादायी आणि दिशा दर्शक ठरलं आहे.

inspirational story of priyanka dhale tahsildar 2016

सातत्य आणि नशीब यांचा सुरेख संगम- प्रियांका ढोले-तहसीलदार


3978   22-Mar-2019, Fri

सातत्य आणि नशीब यांचा सुरेख संगम..
सही वक्त आता हैं लेकिन वक्त पे आता हैं!

दिनांक 5 एप्रिल 2016.
राज्यसेवेची अंतिम यादी प्रसिद्ध झाली. यात झळकलेल्या एका नावाने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
अगदी हे नाव आलेल्या व्यक्तीच्यासुद्धा.

प्रियांका ढोले-तहसीलदार, असं हे नाव.

महाराष्ट्र प्रशासकीय सेवेतील तहसीलदार हे एक महत्त्वाचे पद यांच्या नावापुढे कायमचे चिकटले.
एक रंजक कथाच आहे ही.
या मूळच्या सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्याच्या कळंबी या गावच्या. सन 2010 या वर्षी इंजिनीयरिंग झालेलं. लगेचच स्पर्धा परिक्षांकडे  मोर्चा वळविला. तेंव्हापासून 2016 पर्यंत UPSC च्या तीन तर MPSC च्या तीन मुख्य परीक्षा दिलेल्या.
दरम्यानच्या काळात विक्रीकर निरीक्षक (STI) हे पद मिळाले, त्यामुळे सध्या मुंबईत कार्यरत.
गेल्यावर्षी Dy.SP चे पद केवळ एका गुणाने गेले.स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रातील अनिश्चितता परत अनुभवास आली.

आता खरी कथा येथून सुरु होते.

या NT(D) या प्रवर्गात मोडतात. 2015 यावर्षीच्या पूर्वपरीक्षेत या प्रवर्गातील मुलींसाठी वर्ग 1 ची एकही जागा नसल्यामुळे यातील अनेक मुलींनी खुल्या प्रवर्गात अर्ज दाखल केले. यांनी मात्र अनवधानाने/चुकीने NT(D) मध्ये अर्ज भरला.
जेंव्हा वर्ग 1 ची एकही जागा नाही हे लक्षात आले तेंव्हा काय करावं काही सुचत नव्हतं. डोकं धरून बसण्याची वेळ आली.आयोगाच्या नियमानुसार पूर्व परीक्षेच्या फॉर्ममध्ये नंतर बदल करता येत नाही. तरीही यांनी थेट आयोगाचे कार्यालय गाठले. स्वतःला खुल्या प्रवर्गातील मुलींमध्ये टाकण्यासाठी आयोगाकडे अनेक अर्ज विनंत्या केल्या, एवढेच नव्हे तर आयोगात माहिती अधिकारही (RTI) वापरले. पण या सगळ्या धावपळीचा काहीच फायदा झाला नाही. नियमानुसार वर्गवारीत बदल करण्यास आयोगाने स्पष्ट नकार दिला.
वर्ग 1 च्या एकही जागेसाठी आपण पात्र नाही म्हणून अभ्यासातील सगळा मूडच गेला. परिणामी पूर्व परीक्षा सहज पास होऊनही एक औपचारिकता म्हणून दिलेल्या मुख्य परीक्षेत 600 गुणांपैकी केवळ 170 गुण आले. हा प्रयत्न व्यर्थ जाणार हे स्पष्ट झाले.
दरम्यानच्या काळात एक नाट्यमय घटना घडली…..
या प्रवर्गातील मुलांसाठी असलेले “तहसीलदार” हे पद मुलींसाठी वर्ग करण्यात आले. म्हणजे मुलींसाठी तहसीलदार हे पद देण्यात आले.
यांच्यापैकी यांच्या प्रवर्गात 35 आणि 50 गुण जास्त असलेल्या काही मुली होत्या, पण त्यांनी खुल्या प्रवर्गातील मुलींमध्ये अर्ज भरल्यामुळे या प्रवर्गातील तहसीलदार या पदासाठी या मुली पात्र नव्हत्या.
या काळात  Interview Group ला प्रवेश मिळावा म्हणून यांनी माझी भेट घेतली. यावेळी यांना दोन प्रश्न विचारले..
1) तुमचा score किती?
2)तुमच्या ओळखीतील, तुमच्या प्रवर्गातील मुलींचे score किती?
यावेळी एक बाब लक्षात आली की यांच्यापेक्षा अनेक जास्त score असले तरी त्या बहुतांशी मुलींनी वर्ग 1 ची जागा नसल्यामुळे खुल्या प्रवर्गात फॉर्म भरला होता. म्हणून त्या मुली या नवीन समाविष्ट पदासाठी पात्र नव्हत्या.
म्हणजेच…..
नवीन समाविष्ट झालेले तहसीलदार हे पद यांना मिळेल याची निदान मला तरी खात्री झाली होती. परिणामी 100 गुणांच्या मुलाखतीवर आम्ही खूपच लक्ष दिले. कसून सर्व केला, काहीही मागे ठेवले नाही, मुलाखतीच्या सर्व सत्रांसाठी या दर आठवड्याला मुंबईहून यायच्या.ऑफिस सुटले कि केवळ 4 तासात पुण्यात Interview Group ला हजर.कितीही धावपळ झाली तरी नक्की येणारच.
साधारणतः चार महिने हि धावपळ चालू होती. छोट्या छोट्या उणिवा शोधून आम्ही त्या दूर केल्या.
या सगळ्या गोष्टींचा असा काही परिणाम झाला की राज्यसेवा मुलाखतीत थेट 62 गुण आले, आणि…

स्वतःचा स्वत:विषयीचा आणि इतरांचा अंदाज चुकवत ही स्वारी “तहसीलदार” बनली.
निवड यादी प्रसिद्ध झाल्यावर मी अभिनंदनासाठी फोन केला.
यांचं उत्तर होता…
“सर, चमत्कारच झाला, तुमचं म्हणणं खरं ठरलं”.
विद्यार्थी मित्रहो याला काय म्हणाल?…
नशीब ,luck, आईवडिलांची पुण्याई की MPSC चा आशीर्वाद की आणखीन काही..
माझं मत आहे की, सातत्यपूर्ण अभ्यास, एखादी गोष्ट मनाला पटल्यावर केलेली अपार मेहनत या बाबी नशिबाला सुध्दा आपल्याकडे ओढून आणतात आणि आपल्याला यशाकडे घेऊन जातात.
म्हणून मी या लेखाला शीर्षक दिलंय…
“सही वक्त आता हैं लेकिन वक्त पे आता हैं|”

Mokshada Patil  ips officer

मोक्षदा पाटील खान्देश कन्या ते पोलीस अधीक्षक…


10731   23-Dec-2018, Sun

आजकालच्या काळात अनेक मुली गुणवत्ता असतानी सुध्दा चालत आलेल्या रूढी परंपरा नुसार शिक्षणापासून वंचित राहतात किंवा संकुचित दृष्टीकोनामुळे घरी राहतात ह्या सर्वाना प्रेरणा म्हणजे मोक्षदा पाटील…

कावपिंपरी ता. अमळनेर जिल्हा. जळगाव येथील मुल रहिवासी असलेल्या मोक्षदा पाटलांची स्तुती संपूर्ण महाराष्ट्र करत आहे. कारण हि तसेच आपल्या प्रशासनाने गुंडाच्या मुसक्या आवळण्यात मोक्षदा पाटील ह्यांनी वाशीम जिल्ह्यात स्वतःची चांगलाच धाक निर्माण केला आहे.

अनिल ओंकार पाटील ठाणे महानगर पालिकेत अभियंता त्यांना दोन मुली दोघींनीही त्यांचा मार्ग निवडला आणि त्या आयुष्यात त्यांचा मार्गावर यशस्वी सुध्दा झाल्या. त्यांच्या वडिलानि त्यांना कुठल्याही गोष्टीचा दबाव न देता त्यांचा मार्ग त्यांना निवडायला लावला.

मुंबई येथील झेविअर्स महाविद्यालयात शिक्षण पूर्ण झाल्या नंतर पुकार या सामाजिक संस्थेत मोक्षदा पाटील यांनी काम केले. पुणे येथे UPSC ची तयारी मोक्षदा पाटील ह्यांनी केली. २०११ साली आयपीएस अधिकारी झाल्यानंतर मोक्षदा पाटील ह्या नागपूर व नाशिक येथे परीवेक्षाधीन पोलीस अधिकारी होत्या. त्यानंतर जळगाव येथे अप्पर पोलीस अधीक्षक पदी असताना हिंदू मुस्लीम एक्या साठी भरीव कामगिरी मोक्षदा पाटील ह्यांनी केली.

सद्या वाशीम जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक ह्या पदावर मोक्षदा पाटील आहेत. वाशीम शहरातील रोड रोमिओना चांगलाच धडा मोक्षदा पाटील यांनी निर्भया पथकांद्वारे जरब बसवली. वाशीम जिल्ह्यात मागील ४ महिन्यात ४०० पेक्षा जास्त कार्यवाही करणाऱ्या मोक्षदा पाटील ह्या पहिल्या अधिकारी आहे. मोक्षदा पाटील ह्यांनी येथील माफिया व गुंडांना चांगलाच धडा शिकवला आहे. गुटखा,दारू,सट्टेबाजी ह्या वाशीम मधून हद्दपार झाल्या आहेत. याची स्तुती सहकारी अधिकारी व कर्मचारी सुध्दा करत आहे.

एक कठोर पोलीस अधिकारी व सोबत एक प्रेमळ आई ह्या भूमिका मोक्षदा पाटील उत्तम रित्या पार पाडत आहे. २०१३ साली आस्तिककुमार पांडे यांच्या सोबत मोक्षदा पाटील यांचा विवाह झाला. आस्तिककुमार सध्या अकोल्याचे जिल्हाधिकारी आहे. त्यांच्या मुलाचे नाव आयमान…

मोक्षदा पाटील यांच्या मते आपले पहिले गोल ठरवून घ्या व शारीरिक क्षमता जाणून नंतर आपल्या परिश्रमाने कोणतेही ध्येय आपण गाठू शकता. महिला सक्षमीकरण विषयी सगळे बोलतात परंतु त्यांच्या मते पहिले घरातून ह्या गोष्टीची सुरवात घरापासून सुरवात करावी. त्यांच्या मते अस्तित्व दाखविण्यासठी स्त्रियांनी कर्तुत्व सिद्ध करावे..

ramesh gholap ias officer

बांगड्या विकणारा झाला आयएएस अधिकारी


3797   26-Nov-2018, Mon

जेव्हा आपण दृढनिश्‍चय करतो व यश मिळविण्यासाठी दिवसरात्र एकत्र करुन प्रामाणिकपणे प्रचंड मेहनत घेतो, तेंव्हा यश आपलेच असते. याचे मुर्तीमंत उदाहरण आहे ते आयएएस अधिकारी रमेश घोलप यांचे…ते आज लाखो तरुणांचे आदर्शस्थान आहेत. लहानपणी रमेश घोलप यांना पोलीओ झाला. तेंव्हा त्यांच्या घरची परिस्थिती प्रचंड हालाखीची होती.

दोन वेळेच्या जेवणाचेही वांधे होते, पोटासाठी त्यांची आई रस्त्यावर फिरुन बांगड्या विकत असे. रमेश यांच्या वडीलांचे सायकल दुरुस्तीचे एक छोटेसे दुकान होते. त्यांच्या परिवारामध्ये चार सदस्य होते मात्र वडिलांना दारुचे प्रचंड व्यसन असल्याने संपुर्ण परिवार रस्त्यावर आला होता. दारुचे व्यसन इतके वाढले की, त्यांना दवाखान्यात भरती करावे लागले. यामुळे परिवाराचा पोट भरण्यासाठी आईसोबत रमेश हे देखील बांगड्या विकण्यासाठी फिरु लागले. मात्र आपल्या मुलाने खुप शिकावे ही आईची ईच्छा होती.

गावात प्राथमिक शिक्षण पुर्ण केल्यानंतर हायस्कुलमध्ये प्रवेश घेण्यासाठी रमेश आपल्या काकांच्या गावी गेले. सन २००५ मध्ये रमेश जेंव्हा १२ वीत होते तेंव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झाले. काकांच्या गावापासून स्वत:च्या घरी जाण्यासाठी बसचे भाडे केवळ सात रुपये होते मात्र रमेश विकलांग असल्याने त्यांना केवळ दोन रुपये भाडे लागत होते. परंतू दुदैव्य इतके की त्यांच्या कडे दोन रुपये देखील नव्हते. तेंव्हा शेजार्‍यांच्या मदतीने रमेश वडिलांच्या अंत्यविधीला कशेबशे घरी पोहचले.

वडीलांचे छत्र डोक्यावरुन हरपल्यानंतरही त्यांनी १२वीत ८८ टक्के मिळवले. घरची जबाबदारी असल्याने डीएड करुन गावातल्या एका शाळेत ते शिक्षक म्हणून रुजू देखील झाले. याचवेळी त्यांनी बी.ए.ची डीग्री देखील घेतली. आपला मुलगा खुप शिकला शिक्षक झाला याचे कौतूक आईसह गावकर्‍यांनाही होते मात्र रमेश यांचे लक्ष काही तरी वेगळेच होते.

रमेश यांनी सहा महिन्यांकरीता नोकरी सोडून देत युपीएससीची तयारी केली.२०१० मध्ये त्यांनी पहिल्यांदा ही परीक्षा दिली तेंव्हा त्यांच्या पदरी निराशा पडली. मुलाची जिद्द पाहून आईने गावातून काही पैसे उसनवारीने घेतले त्यानंतर रमेश पुणे येथे जावून युपीएससीची तयारी करु लागले. यावेळी रमेश यांनी शपथ घेतली होती की जोपर्यंत ते मोठे अधिकारी होत नाही तो पर्यंत गावकर्‍यांना आपले तोंडही दाखविणार नाही.

प्रचंड इच्छाशक्ती व प्रामाणिक मेहनत काय करु शकते, याची प्रचिती २०१२ मध्ये आली. रमेश हे यूपीएससीच्या परीक्षेत २८७ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. कोणत्याही प्रकारच्या क्लासेसला न जाता महागडी पुस्तके न खरेदी करता गरीब व निरक्षर आई-वडीलांचा मुलगा आयएएस अधिकारी झाला.

त्यांची पहिली पोस्टींग कुंती (झारखंड) येथे झाली. तेथे एक प्रमाणिक अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या सर्व मित्र/मैत्रिनींनो छोट्याशा अपयशाने खचून जाऊ नका, परिस्थितीचा बाऊ करु नका. तुम्ही अधिकारी होण्याचे जे ध्येय निश्‍चित केले आहे, त्या मार्गावर प्रामाणिकपणे वाटचाल करा, यश तुमची वाट पाहत आहे…..भविष्यातील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा!

success story of abhijit pawar

फौजदार परीक्षेत ‘अभि’ची ‘जीत’…!


1741   26-Nov-2018, Mon

घरी पिठाचा पत्ताच नाही. मग भाकरी कुठून मिळणार? रटरटलेल्या भातावरच ताव मारायचा आणि दिवस काढायचे. आई शेतमजुरी करणारी; पण परिस्थितीची जाणीव मनात पक्की होती आणि स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचेच, हा इरादाही पक्का होता.

अखेर त्याने यशाला गवसणी घातलीच. पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत तो उत्तीर्ण झाला आणि आजवरचा सारा प्रवास त्याच्या डोळ्यासमोर तरळू लागला. चिकुर्डे (ता. वाळवा) येथील अभिजित युवराज पवारची ही यशोगाथा.

चिकुर्डे हे वारणाकाठचे गाव. अभिजितचे चौथीपर्यंतचे शिक्षण गावातीलच जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. त्याच्या शिक्षणासाठी खर्च करण्याची ऐपत नसल्याने आईने त्याला मामाकडे पाठवले. वारणा महाविद्यालयात महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करू लागला. मुळात तो हुशार. दहावीनंतर त्याला विज्ञान शाखेतही प्रवेश मिळाला असता; पण या शाखेचा खर्च परवडणार नाही, याची जाणीव असल्याने त्याने कला शाखेला प्रवेश घेतला.

सकाळी जनावरांसाठी शेतातून वैरण आणणे आणि त्यानंतर दिवसभर ग्रंथालयात तो अभ्यास करू लागला. घरी आल्यानंतर रात्री एकपर्यंत तो अभ्यासातच असायचा. ‘एमए’ होईपर्यंतचा सारा प्रवास त्याचा सायकलवरूनच सुरू होता. एकदा तर सायकल दुरुस्तीला पैसे नाहीत म्हणून त्याने खांद्यावर सायकल मारून घरी आणली होती. 

दरम्यान, राज्यस्तरीय प्रश्‍नमंजूषा स्पर्धेत सलग सात वर्षे हो विजेता ठरला. पेट्रोल पंप, वारणा दूध संघ, वाळूच्या ठेक्‍यावरही त्याने काम केले. ऊसतोडणीसाठी जाणाऱ्या आईलाही तो मदत करायचा. मात्र शिक्षणाची कास सोडली नाही आणि अधिकारी होण्याचं स्वप्न कधीही विसरले नाही. पुढे गावातच त्याने अभ्यासिका सुरू केली. २०१३ मध्ये पोलिस उपनिरीक्षक पदाच्या मुलाखतीपर्यंत मजल मारली. थोडक्‍यात यश हुकले. मात्र पुन्हा तो नेटाने कामाला लागला आणि यश खेचून आणले. दरम्यान, पोलिस उपअधीक्षक विशाल खांबे, प्रदीप पांढरबळे आदींचे त्याला मार्गदर्शन मिळाले. 

ध्येय ठरवले आणि झपाटून कामाला लागलो. सलग अकरा तास अभ्यासाचे नियोजन केले. एकदा अपयश आले. मात्र पुन्हा नेटाने अभ्यास सुरू केला आणि यश खेचून आणले.
– अभिजित पवार

inspiration article of two young boys to psi

मेंढरं वळता वळता 'वर्दी' अंगावर आली..!!!


3364   13-Oct-2018, Sat

मेंढरं वळता वळता 'वर्दी' अंगावर आली..!!!
जिद्दीला सलाम....!!!
भरल्या पोटी क्रांती घडत नाही तर उपाशी पोटी माणसेच क्रांती करु शकतात याचे उत्तम उदहारण म्हणजे 'हंडाळ' बंधु..त्यांच्या यशाने 'कोकणगाव' गावाला आभाळ ठेंगणे झाले..
'हंडाळ' मेंढपाळाची मुले झाली पोलिस उपनिरीक्षक...
परिस्थितीच्या बुडावर लाथ मारुन यशाला गवसणी घालणारे 'चांगदेव व आप्पा हंडाळ' बंधुची संघर्ष गाथा!!!
अखंड हिंदुस्थानावर राज्य करणारे सम्राट चंद्रगुप्त मौर्य..चक्रवती सम्राट अशोक यांचा वसा आणि वारसा सांगणारा 'धनगर समाज' शौर्यवान,काटक अन् रांगडा..धन अन् मनाची श्रीमंती बाळगणारा... पण पुढे परिस्थितीने त्यांना वणवण भटकंती करायला भाग पाडले..
'हंडाळ' कुटुंबीय मूळ मौजे-वावरथ ता.राहुरी येथील,'मुळा' धरण झाले अन् वाड-वडीलांची जमीन पाण्याखाली गेली.जमीन गेली आणि हातात फक्त खंडीभर मेंढ्या तेवढ्या शिल्लक राहील्या, विस्थापित झालेलं हे कुटुंबीय. आता 'बबन हंडाळ' मेंढीपालन करत आपल्या मामाच्या गावी आले.परिस्थिती बदलली नाही पण मनस्थिती मात्र बदलली. 
रुईगव्हाण ता-कर्जत येथे हंडाळ कुटुंबीय तात्पुरते स्थायिक झाले..बबन हंडाळ यांना चार मुले सुखदेव,ज्ञानदेव,चांगदेव अप्पा..घरात कमावती हातं वाढावीत,धाकल्या भावंडाना शिकता यावं,म्हणुन थोरल्या दोघांनी शाळा अर्धवट सोडली.आपल्या पाठीमागं आपल्या पोरांनी मेंढरं वळु नयेत,त्यांच्या वाट्याला चार घास सुखाचे येवोत,ती शिकलीत तर त्यांना आपल्यावाणी इकडं तिकडं मेंढरं चारत भटकत जगावं लागणार नाही, म्हणुन शाळेत जाणार्या चांगदेव आणि आप्पा ला बा-आई नेहमी प्रोत्साहन देत.

यडी-वाकडी कपडे घालुन,इर्याच्या गोणीची पीशी करत पोरं अनवाणी पायानं शाळेत जात राहीली. धाकली दोघं शिकत राहीली अन् आढळगाव च्या शाळेत दोघं भावंड पाचवीत दाखल झाली.रुईगव्हाण ते आढळगाव ११ km चे हे अंतर,दररोज २२ km चा हा प्रवास.एसटी ने शाळेत जायला पासा पुरती पोरांकडे पैसे नसत.चांगदेव ने एका भंगारवाल्या कडुन मोडकी सायकल घेतली,आता त्या सायकल वर प्रवास चालु झाला.रस्त्यात 'भावडी' हे गाव लागायचं.तिथल्या भोसलेंचा एक मुलगा याच्याच वर्गातला,तो त्याला आपल्या सायकल वर ने-आण करत,त्याबदल्यात तो दररोज चांगदेव ला 'दीड रुपया' द्यायचा,त्यातुन सायकलची देखभाल व भंगारवाल्याचा हप्ता दिला जाई,ही भावंडं मात्र जिद्दी,सकाळ-संध्याकाळ सोबतच,राम-लक्षमण नाची जोडी शोभावी अशी,शाळेत प्रथम क्रमांक यांनी मात्र कधी सोडला नाही.
रुईगव्हाण पंचक्रोशीतील धनदांडगे बाहेरची माणसं म्हणुन त्यांना जमीन कसुन देत नव्हते,प्रकरण कोर्ट कचेरी पर्यंत गेलं,त्यात वडील कर्जबाजारी झाले.आता सगळं संपलय असं वाटत होतं.धाकल्या दोघांनी शिकत रहावं म्हणुन थोरले सुखदेव आणि ज्ञानदेव सालगड्याचं काम करायचे.कोर्ट-कचेरी च्या सतत चकरा.त्यातुन त्यांचा System वरचा विश्वास उडला,गरीब,बटक्या लोकांवर होत असलेली गुंडशाही.त्या अन्यायाला प्रतिकार करण्यासाठी चौघा भावांचे बाहु फुरफुरायचे.

रातच्चं दोन घास खाताना 'बा' सांगायचा.'शिंग्रोबा' धनगराची गोष्ट..कैक वर्ष गोरं इंग्रज पुण्याहुन बंम्बई ला जाण्यासाठी खंडाळा घाटातुन रस्ता कसा न्यावा शोधत होतं..त्यांना मार्ग सापडना,तवा शिंग्रोबानं इंग्रजांना सांगितलं..माझ्या मेंढरांच्या मागं मागं या तोच तुमचा रस्त्याचा मार्ग असल..शिंग्रोबानं इंग्रज लोकांना रस्ता दावला,तवा इंग्रज त्याच्यावर लई खुश झाले बगा ते म्हटले तुला काय पाहीजे?? ते माग..देऊ तुला!!
तवा आपला पुर्वज शिंग्रोबा म्हणला 'तुम्हाला द्यायचच असल काय तर माझ्या देशाला स्वातंत्र्य द्या' हे ऐकताच इंग्रजांनी लागलीच त्याला गोळ्या घातल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपला शिंग्रोबांने बलिदान दिलं पोरांनो तुम्ही बी असं काही तरी करा!!!
तवा धाकल्या पोरांची छाती फुगायची पण पुढे सततच्या झुंडशाहीला वैतागुन हंडाळ कुटुंबीयांनी रुईगव्हाण गाव सोडलं अन् श्रीगोंदे तालुक्यातील कोकणगावात ते रहायला आले.तिथं उसनंपासनं करुन जमीन घेतली घर बांधलं पण अतिक्रमणात घर आहे सांगुन लोकांनी बांधलेल्या घरावर ट्रॅक्टर ने नांगर फिरवला घरातली माणसं उघड्यावर आली गर्दीतला एक बोलला 'केस करायची असेल तर कर PSI आमच्या ओळखीचा हाय'...तेव्हा नुकतचं धाकल्या दोघांना कुठं मिसरुड फुटलं होतं तवा चांगदेव आणि आप्पा ने ठरवलं आता PSI व्हायचच पोरं तवा पासुन स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला लागली.
अवघड गणितं सोडु लागली..महापुरुषांची चरित्र वाचु लागली...पुणे येथे जाऊन तयारी करावी तर खर्च परवडण्यासारखा नव्हता. श्रीगोंद्यातच अभ्यास करण्याचं पक्क ठरलं..अभ्यासिकेतील मोजकी पुस्तकं,वारंवार सराव,स्वत:च्या नोटस,वर्तमानपत्रे हे सगळं आता रुटीन मध्ये आलं.वेळेचं अचुक नियोजन कधी चुकवलं नाही,ग्राऊॅड साठी मात्र एक अडचण उभी राहीली,रनींग साठी ४०० मीटर सरळ सपाट जागा आढळगाव परीसरात काही कुठे सापडेना,शेवटी ती ही सापडली 'नाथाची वाडी च्या जंगलात' जंगलातल्या सपाट जागेवर रनिंग ट्रॅक करुन सराव चालु झाला,कधी भल्या सकाळी पळण्याचा सराव चालु झाला तर जंगलातील कोल्हे-कुत्रे-लांडगे पाठलाग करायची..गुरगुरायची..पण हंडाळ बंधुनी त्यामुळे कधी पळण्याचा सराव सोडला नाही..शेजारीच असलेल्या ऊटूळा डोंगराहुन त्यांनी लालमाती आणली अन् जंगलातच आखाडा तयार केला त्यात लांब उडी मारण्याचा सराव चालु केला..उड्या मारुन पॅक झालेली माती कुदळ-फावड्याने खणुन काढत मोकळी नेहमी केली त्याने मनगट आणि दंडाचे स्नायु बळकट झाले..घराशेजारी त्यांना एक सरळ वर गेलेलं झाड दिसलं त्या झाडाला समांतर त्यांनी एक उभं लाकुड रोवलं त्याला आडवा बार लावला..अन् पुलअप्स त्यावर काढले जात..पुलअप्स काढण्याचं एक अनोख यंत्र आणि तंत्र हंडाळ बंधुनी विकसीत केलं.
2013 साल उजाडलं,अन् 15 आॅगस्ट ला दोघं शाळेच्या कार्यक्रमात भाषण करायला माईक समोर उभे राहीले..तर काही लोकांनी त्यांना बोलु दिलं नाही..हंडाळ बंधु सांगत होते..'फुले-शाहु-आंबेडकर' आम्ही वाचले..आमचे हक्क,अधिकार आम्हाला समजले..पण प्रत्यक्षात स्वातंत्र्यदिनी आमच्या बाबतीत असं घडलं तेव्हा वाटलं 'फुले-शाहु-आंबेडकर' यांचे विचार काय फक्त वाचनापुरतेच मर्यादित आहेत का?
असं जगणं वाट्याला आलं..झालेले अपमान पचवले...पण आत्मविश्वास कमी होऊ दिला नाही..दोघं भावंडं दहावी पास झाले आणि श्रीगोंद्याला महाराजा व छत्रपती काॅलेज मध्ये पुढचं शिक्षण घेऊ लागले..डाॅ.बाबासाहेब आंबेडकर शासकीय होस्टेल मध्ये त्यांची रहाण्याची व्यवस्था झाली..कमवा व शिका योजनेतुन ते आपलं शिक्षण घेऊ लागले..कधी खचले तर त्यांना बापाचे शब्द आठवायचे 'मला आयुष्यात हे दोन पोरं फौजदार करायचेत' पोरं मग पेठुन उठायचे..अभ्यासाला लागायचे..अन् मेहनत कामाला आली..पोलीस भरती निघाली आणि दोघं पोलीस खात्यात भरती झाले २०१६ ला PSI ची अॅड आली..चांगदेव व आप्पासाहेब Departmental Exam मधुन PSI झाले..आणि पुन्हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने PSI पोस्टसाठी घेतलेल्या Direct Exam च्या माध्यामातुन आप्पासाहेबांनी राज्यात 22 वा रॅन्क घेऊन बाजी मारली..'भगवान जबबी देता हे,छप्पर फाड के देता हे' ची अनुभवती त्यांना आली..
अरुण पवार सर,राजकुमार चौरे सर यांनी संपुर्ण आयुष्य दोघा भावंडांना प्रेरीत करण्याचे काम केले.PSI झाल्याचा आनंद त्यांच्या गगणात मावेना.दोघांनी ऐकमेकांना घट्ट मिठी मारली..आई-बापाचं पांग फिटलं..म्हणत दोघांच्या डोळ्यात आनंदआश्रु तरळले...!

coolie-son-judge at age of 24 years

हमालाच्या मुलाची गरुडझेप, वयाच्या २४व्या वर्षी न्यायाधीशपदाला गवसणी..


2983   20-Sep-2018, Thu

ग्रामीण भागात शिक्षण, योग्य मार्गदर्शन अशा विविध समस्या असताना प्रतिकूल परिस्थितीस तोंड देत चांदवड तालुक्यातील वाहेगावसाळ येथील सचिन न्याहारकर यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवत न्यायाधीशपदाला गवसणी घातली आहे. जिद्द, चिकाटी आणि श्रम करण्याची तयारी असल्यावर ग्रामीण भागातील विद्यार्थीही स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळवू शकतो हे न्याहारकर यांनी दाखवून दिले आहे.

लासलगावमधील कांद्याच्या खळ्यावर हमाली करणाऱ्या एका बापाच्या कष्टाचं आज चीज झालं आहे. परिस्थितीचं भांडवल न करता मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर मात करत सचिन न्याहारकर हा हमालाचा मुलगा आता न्यायाधीश झाला आहे. चांदवड तालुक्यातील वाहेगावसाळ इथे उत्तमराव न्याहारकर यांची एक एकर शेती आहे. मात्र हंमातच पिक घेता येत असल्याने उत्तमराव हे लासलगाव येथे माथाडी कामगार म्हणून काम करतात.

सचिनने दहावीपर्यंतचं शिक्षण गावातच घेऊन बारावीपर्यंतच शिक्षण लासलगाव घेतलं. बारावीत चांगले मार्क मिळाल्याने सचिनने पुण्यातील लॉ कॉलेज प्रवेश घेतला. घरातील परिस्थिती नाजूक, आई-वडिलांनी पोटाला चिमटा काढत मुलांच्या शिक्षणात कुठलीच कसूर ठेवली नाही. अभ्यासात सातत्य व प्रचंड मेहनत घेऊन २०१२ मध्ये प्रथम श्रेणी मिळवत पदवी प्राप्र्त केली. घरी जिरायती शेती असल्याने तसेच वडील हमाली करून उदरनिर्वाह करत असल्याने घरची परिस्थिती बेताची होती. परंतु वडिलांनी कधीही अडचण येऊ दिली नाही.

दरम्यानच्या काळात न्याहारकर यांच्या मोठय़ा बंधुस लष्करात संधी मिळाल्याने कौटुंबिक परिस्थितीत सुधारणा झाली. त्यामुळे शिक्षण घेताना मोठा आधार मिळाला. नातेवाईकांच्या मदतीने पुण्यात पोहोचला आणि तेथे शिकत असतानाच त्याने न्यायाधीशाची परीक्षा दिली.

शालेय शिक्षण घेत असतानाच न्यायाधीश होण्याचे स्वप्न बाळगले होते. त्यासाठी अभ्यासात सातत्य ठेवून जास्तीत जास्त वेळ देत अभ्यास केला. त्यासाठी वडील व भावाची वेळोवेळी योग्य मदत मिळाल्याने कमीतकमी कालावधीत यश मिळविता आले, असे न्याहारकर यांनी नमूद केले.

सचिन लहानपणापासूनच हुशार होता. स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने जास्तीत जास्त वेळ अभ्यासाला दिला. अभ्यासात नेहमी सातत्य ठेवले. त्यामुळे एवढय़ा कमी वेळात तो न्यायाधीश पदापर्यंत पोहचू शकला, अशी प्रतिक्रिया सचिन यांचे वडील उत्तमराव न्याहारकर यांनी दिली. वयाच्या २४ व्या वर्षी न्यायााधीश होणारे न्याहारकर हे तालुक्यातील पहिलेच विद्यार्थी होय.


Top

Whoops, looks like something went wrong.