गट ‘क’ सेवा मुख्य परीक्षा  मराठी आणि इंग्रजी प्रश्नविश्लेषण

Mpsc-CLASS 3-exam-preparation-akp-

3104   11-Sep-2019, Wed

लिपिक टंकलेखक, कर सहायक आणि दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क या पदांसाठी गट ‘क’ सेवा मुख्य परीक्षा संयुक्त आणि पदनिहाय पेपर अशा पद्धतीने पहिली परीक्षा मागील वर्षी झाली. या पॅटर्नमध्ये पेपर क्र. १ हा संयुक्त पेपर असतो आणि पेपर क्र. २ हा प्रत्येक पदासाठी वेगळा घेण्यात येतो. संयुक्त पेपरमध्ये मराठी व इंग्रजी हे घटकविषय समाविष्ट आहेत. सन  २०१८च्या पेपरचे विश्लेषण या लेखामध्ये करण्यात येत आहे.

मराठी भाषेसाठी ६० गुणांसाठी ६० प्रश्न तर इंग्रजी भाषेसाठी ४० गुणांसाठी ४० प्रश्न विचारण्यात आले आहेत. दोन्ही भाषांमध्ये उताऱ्यावरील प्रश्नांची संख्या आहे प्रत्येकी पाच. यापुढील परीक्षांमध्ये अशीच रचना असणे अपेक्षित आहे. या पेपरसाठी २५%  नकारात्मक गुणपद्धती लागू आहे. हे पाहता सर्वच्या सर्व प्रश्न सोडविण्याचा अट्टहास करून चालणार नाही. ८५ ते ९० प्रश्न सोडविण्याचे उद्दिष्ट ठरवून पेपर सोडविणे व्यवहार्य ठरेल. या सगळ्याचा विचार केला तर मराठीवर भर देऊन तयारी केल्यास चांगल्या गुणांची अपेक्षा करता येईल.

व्याकरणावरील प्रश्न

दोन्ही भाषांमधील व्याकरणावरील प्रश्नांमध्ये बहुविधानी प्रश्नांचे प्रमाण बरेच जास्त आहे.   प्रत्येक प्रकारच्या नियमावर किमान एक तरी प्रश्न विचारण्यात आलेला आहे.

 • दोन्ही भाषांमधील व्याकरणावरील प्रश्न हे उदाहरणे देऊन आणि प्रत्यक्ष( direct / straight forward) दोन्ही पद्धतींनी विचारण्यात आले आहेत. त्यामुळे नियमांची नेमकी माहिती असणे आणि त्यांचा वापर करता येणे दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत.
 • इंग्रजी शब्द रचना, स्पेलिंग, शब्दांचे प्रकार यांवर सरळ व विश्लेषणात्मक अशा दोन्ही प्रकारे प्रश्न विचारण्यात आले आहेत. रेन अँड मार्टिन किंवा कोणत्याही इंग्रजी व्याकरणाच्या प्रमाणित संदर्भग्रंथाचा वापर करावा.
 • इंग्रजी वाक्यरचनेचे प्रकार व त्याचे नियम बारकाईने समजून घेणे आवश्यक आहे. [प्रयोग, काळ आणि तुलनांचे स्तर (Degrees of Comparison)]. या घटकाचा अभ्यास कसा करावा, यासाठी सिव्हिल्स महाराष्ट्र-राज्य लोकसेवा आयोग परीक्षा माहिती कोश हे पुस्तक उपयोगी ठरेल.
 • मराठीच्या प्रश्नांमध्ये व्याकरणाचे प्रत्यक्ष नियम विचारण्यापेक्षा नियमांचे उपयोजन करून उदाहरणे सोडविण्याच्या प्रश्नांचा समावेश जास्त आहे. त्यामुळे अर्थ समजून घेऊन नियमांचा वापर करण्याचा सराव आवश्यक आहे. यासाठी के सागर प्रकाशनचे डॉ. लीला गोविलकर यांचे मराठी व्याकरणाचे पुस्तक वापरावे.
 • म्हणी आणि वाक्प्रचार यांवरील प्रश्नांची तयारी जास्तीत जास्त सराव करूनच होऊ शकणार आहे, हे लक्षात घ्यावे.
 • समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार व म्हणी यांबाबतचे प्रश्न सोडविण्यासाठी रोजचे इंग्रजी वाचन व त्याचे आकलन याचा सराव आवश्यक आहे. वाक्प्रचार, म्हणी व अनेक शब्दांसाठी एका शब्दाचे उपयोजन यांची तयारी कशी करावी यासाठीही सिव्हिल्स महाराष्ट्र वाचावे.ल्ल शब्दांचे अर्थ आणि मूलभूत व्याकरण नियम यांची सांगड घालणारे प्रश्नही विश्लेषणात्मक प्रश्नांमध्ये समाविष्ट आहेत.
 • दोन्ही भाषांमधील शब्दसंग्रह, वाक्प्रचार व म्हणी यांचा संग्रह वारंवार वाचत राहणे आणि शक्य असेल तर रोजच्या रोज ठरावीक वेळी अवांतर वाचन करणे हा या घटकाच्या तयारीचा गाभा आहे.
 • उताऱ्यावरील प्रश्नांच्या विश्लेषणातून लक्षात येते की चर्चाविषय नीट समजून घेतला तर सगळेच प्रश्न आत्मविश्वासाने सोडविता येतात. त्यामुळे उतारा
 • घाई न करता शांतपणे व समजून घेत वाचला तर प्रश्नांचे उत्तर नेमके कुठे शोधायचे ते लगेच लक्षात येईल.

यासाठी दोन्ही उताऱ्यांना मिळून किमान १० ते १२ मिनिटे दिलीत तर १० पकी ८ गुण तर नक्कीच मिळवता येतील.मराठी आणि इंग्रजी या भाषांचे व्याकरण ढोबळ नियमांच्या समान रचनेमध्ये दर्शवता येत असले तरी त्यांच्यामध्ये मूलभूत फरक आहे. किंबहुना प्रत्येक भाषेची शब्दयोजना, वाक्यरचना इत्यादी बाबी इतरांपेक्षा वेगळ्याच असतात. हा मुद्दा लक्षात घेऊन दोन्ही भाषांच्या अभ्यासासाठी स्वतंत्र पण समांतर अशी योजना करता आल्यास कमी वेळेत चांगली तयारी होते. भाषेचा अर्थ व व्याकरणाचे नियम समजून घेणे आणि त्यांच्या वापराचा सराव करणे ही फक्त या परीक्षेतील यशाचीच नव्हे तर भाषेवर मजबूत पकड निर्माण करायची गुरुकिल्ली आहे.

विभक्ती व त्याचे प्रकार

MPSC chalu ghadamodi, current affairs-marathi-vibhakti

2479   20-Dec-2019, Fri

 • नामे व सर्वनामे यांचा वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना ‘विभक्ती’ असे म्हणतात.
 • नामाचे किंवा सर्वनामचे रूप तयार करण्यास त्याला जी अक्षरे जोडली जातात त्यांना ‘प्रत्यय’ असे म्हणतात.
 • नामांच्या किंवा सर्वनामांच्या क्रियापदांशी किंवा इतर शब्दांशी असणारा संबंध 8 प्रकारचा असतो, म्हणून विभक्तीचे एकूण 8 प्रकार पडतात.
 • प्रथमा – प्रत्यय नाहीत – प्रत्यय नाहीत – कर्ता
 • व्दितीया – स, ला, ते – स, ला, ना, ते – कर्म
 • तृतीया – ने, ए, शी – ने, शी, ही, ई – करण
 • चतुर्थी – स, ला ते – स, ला, ना, ते – संप्रदान
 • पंचमी – ऊन, हून – ऊन, हून – अपादान
 • षष्टी – चा, ची, चे – चा, ची, चे – संबंध
 • सप्तमी – त, ई, आ – त, ई, आ – अधिकरण
 • संबोधन – नो – संबोधन

विभक्तीचे अर्थ :

 • 1) कारकार्थ/ कारकसंबंध

वाक्यातील नाम/सर्वनाम यांचे क्रियापदांशी जे संबंध असतात, त्यांना ‘कारकार्थ’ असे म्हणतात. तसेच क्रियापदाशिवाय इतर शब्दांशी असलेले जे संबंध असतात त्यांना ‘उपपदार्थ’ असे म्हणतात.

विभक्तीचे मुख्य 6 कारकार्थ आहेत

 • कर्ता
 • कर्म
 • करण
 • संप्रदान
 • अपादान (वियोग)
 • अधिकरण

1) कर्ता –

 • क्रियापदाने दर्शविलेली क्रिया करणारा कोणीतरी असतो, त्यास ‘कर्ता’ असे म्हणतात. कर्त्यांची विभक्ती केव्हा-केव्हा प्रथमा असते.
 • प्रथमेचा प्रमुख असते. प्रथमेचा प्रमुख कारकार्थ कर्ता असतो.
 • उदा. राम आंबा खातो.

2) कर्म –

 • कर्त्यांने केलेली क्रिया कोणावर तरी घडलेली किंवा घडते हे सांगणारा शब्द म्हणजे ‘कर्म’ होय.
 • हे प्रत्यक्ष कर्म असते याची विभक्ती व्दितीया असते.
 • व्दीतीयेचा प्रमुख कारकार्थ कर्म असतो.
 • उदा. राम रावणास मारतो.

3) करण –

 • वाक्यातील क्रिया ज्या साधनाने घडते त्याला ‘करण’ असे म्हणतात.
 • करण म्हणजे क्रियेच साधन.
 • उदा. आई चाकूने भाजी कापते.
 • या वाक्यात कापण्याची क्रिया चाकू या साधनाने होत आहे. म्हणून चाकूने या शब्दांची विभक्ती तृतीया असून तृतीयेचा मुख्य कारकार्थ करण होय.

4) संप्रदान –

 • जेव्हा क्रिया दानाचा अर्थ व्यक्त करते तेव्हा ते दान (कोणतीही वस्तू) ज्याला करण्यात येते त्या शब्दाला किंवा क्रिया ज्याला उद्देशून घडतात त्या वस्तूला व स्थानाला ‘संप्रदान’ असे म्हणतात.
 • दान देण्याची क्रिया ज्याच्यावर होते त्याला ‘संप्रदान’ असे म्हणतात.
 • उदा. मी गुरुजींना दक्षिणा दिली.
 • या वाक्यात दान देण्याची क्रिया गुरुजी या शब्दावर होत असून त्याची विभक्ती चतुर्थी व चतुर्थीचा मुख्य कारकार्थ संप्रदान होय.
 • आजीने नातीला गोष्ट सांगितली.
 • गुरुजी मुलांना व्याकरण शिकवतात.

5) आपदान (वियोग) –

 • क्रिया जेथून सुरू होते तेथून ती व्यक्ती व वस्तू दूर जाते म्हणजे क्रियेच्या संबंधाने त्याच्यापासून एखाधा वस्तूचा वियोग दाखविण्याचा असतो त्यास ‘अपादान’ म्हणतात.
 • उदा. मी शाळेतून आताच घरी आलो.
 • या वाक्यातील शाळेतून या शब्दातून अपादानाचा अर्थ व्यक्त होत असून त्याची विभक्ती पंचमी ही असून पंचमीचा मुख्य कारकार्थ अपादान हा होय.

6) अधिकरण (आश्रय/ स्थान) –

 • वाक्यातील क्रिया कोठे किंवा केव्हा घडली हे क्रियचे स्थान किंवा काळ दर्शविणार्‍या शब्दांच्या संबंधास ‘अधिकरण’ असे म्हणतात.
 • उदा. दररोज सकाळी मी शाळेत जातो.
 • या वाक्यातील सकाळी व शाळेत हे शब्द अनुक्रमे क्रियेचा काळ व शाळेत हे शब्द क्रियेचे स्थळ दर्शवित असून त्यांची विभक्ती सप्तमी ही आहे व त्या सप्तमीचा मुख्य कारकार्थ अधिकारण हे आहे

2) उपपदार्थ :

 • नाम किंवा सर्वनाम यांचे क्रियापदाशिवाय इतर शब्दांशी असलेले जे संबंध असतात त्यांना ‘उपपदार्थ’ असे म्हणतात.
 • उदा. आमच्या वर्गातील मधुने शाळेचे सुवर्णपदक जिंकले.
 • वाक्यातील उद्देश: आमच्या वर्गातील मधुने.
 • वाक्यातील विधेय: शाळेचे सुवर्णपदक जिकले.

सामान्य रूप :

विभक्ती प्रत्यय लावण्यापूर्वी तसेच शब्दयोगी अव्यय लावण्यापूर्वी नाम किंवा सर्वनामाच्या मूळ स्वरुपात जो बद्दल होतो त्याला ‘सामान्य रूप’ असे म्हणतात.

उदा.

 • घोडा: घोड्यास, घोड्याला, घोड्याने, घोड्याचा.- या सर्व शब्दांमध्ये ‘घोड्या’ हे सामान्यरूप.
 • पाणी: पाण्यास, पाण्याला, पाण्याने, पाण्याचा – या सर्व शब्दांमध्ये ‘पाण्या’ हे सामान्यरूप.

 पुल्लिंगी नामांचे सामान्यरूप :

1. ‘अ’ कारान्त पुल्लिंगी नामाचे रूप ‘आ’ कारान्त होते.

उदा.

 • खांब-खांबास,
 • काळ-काळास
 • निर्णय-निर्णयास/निर्णयाने
 • दोर-दोरास/दोराने
 • बाक-बाकास/बाकाला.

2. ‘आ’ कारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप ‘या’ कारान्त होते.

उदा.

 • घोडा-घोड्यास, घोड्याला
 • दोरा– दोर्‍यास, दोर्‍याने
 • पंखा-पंख्याला, पंख्यास

 अपवाद: आजोबा, दादा, काका, मामा, राजा, यांचे सामान्यरूप होत नाही.

3. ‘ई’ कारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप ‘या’ कारान्त होते.

उदा. 

 • धोबी-धोब्याला, धोब्यास
 • तेली-तेलीला, तेल्यास
 • माळी-माळीला, माळ्यास

अपवाद :  हत्ती, नंदी, पंतोती, मुनी, ऋषी, भटजी.

4. ‘ऊ’ कारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप ‘वा’ कारान्त होते.

उदा. 

 • भाऊ-भावास, भावाचा
 • विंचू-विंचवास, विंचवाला
 • नातू-नातवाला, नातवास.

5. ‘ए’ कारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप ‘या’ कारान्त होते.

उदा. 

 • फडके-फडक्यांचा
 • गोखले-गोखल्यांचा
 • फुले-फुल्यांचा

6. ‘ओ’ कारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप ‘ओ’ कारान्त राहते.

उदा.  

 • किलो-किलोस, किलोला
 • धनको-धनकोस, धनकोला
 • हीरो-हीरोला, हिरोस.

 स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरूप :

 1. ‘अ’ कारान्त स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरूप एकवचनात ‘ए’ कारान्त होते व अनेकवचनात ‘आ’ कारान्त होते.

उदा.  

 • वीट-विटेस, विटेला, विटांना, विटांचा.
 • जीभ-जीभेस, जिभेला, जिभांचा, जिभांना
 • सून-सुनेस, सुनेला, सुनांना, सुनेचा.

2. काही वेळा ‘अ’ कारान्त स्त्रीलिंग नामाचे सामान्यरूप ‘ई’ कारान्त होते.

उदा.

 • भिंत-भिंतीस, भिंतीला, भिंतीचा
 • विहीर-विहिरीस, विहिरीला
 • पाल-पालीस, पालीला

3. ‘आ’ कारान्त स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरूप ‘ए’ कारान्त होते.

उदा. 

 • शाळा-शाळेत, शाळेस, शाळेला.
 • भाषा-भाषेत, भाषेस, भाषेचा.
 • विधा-विधेस, विधेला, विधेचे

4. ‘ई’ कारान्त स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप एकवचनात ‘ई’ कारान्त व अनेकवचनात ‘ई’ कारान्त किंवा ‘य’ कारान्त होते.

उदा. 

 • भक्ती-भक्तीने
 • नदी-नदीस
 • स्त्रि-स्त्रिस, स्त्रिया, स्त्रियांचा
 • बी-बीस, बियांचा
 • दासी-दसींचा, दासीला
 • पेटी-पेटीस, पेटीला.

5. ‘ऊ’ कारान्त स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरूप होत नाही. क्वचित ते ‘वा’ कारान्त होते.

उदा.    

 • ऊ-ऊवास, उवाला
 • काकू-काकूस, काकूला.
 • सासू, सासुला, सासवांना.

6. ‘ओ’ कारान्त स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरूप एकवचनात होत नाही व अनेकवचनात ‘आ’ कारान्त होते.

उदा.

 • बायको-बायकांना, बायकांचा.

नपुंसकलिंगी नामांचे सामान्यरूप:

1. ‘अ’ कारान्त नपुंसकलिंगी नामाचे सामान्यरूप ‘आ’ कारान्त होते.

उदा.

 • मूल-मुलास, मुलाला, मुलांना
 • पान-पानास, पानाला, पानांना

2. ‘ई’ कारान्त नपुंसकलिंगी नामाचे सामान्यरूप ‘या’ कारान्त होते.

उदा.

 • पाणी-पाण्यात, पाण्याचा
 • मोती– मोत्यात, मोत्याचा
 • लोणी-लोण्यात, मोण्याचा

3. ‘ऊ’ कारान्त नपुंसकलिंगी नामाचे सामान्यरूप ‘आ’ कारान्त होते.

उदा.

 • लिंबू-लिंबास, लिंबाचे
 • कोकरू-कोकारास, कोकराचे

4. काही वेळा ‘ऊ’ कारान्त नपुंसकलिंगी नामाचे सामान्यरूप ‘वा’ कारान्त होते.

उदा.

 • कुंकू-कुंकवास, कुंकवाचा
 • गडू-गडवास, गडवाचा

5. ‘ए’ कारान्त नपुंसकलिंगी नामाचे सामान्यरूप ‘या’ कारान्त होते.

उदा.

 • तळे-तळ्यात, तळ्याला
 • केळे-केळ्याची, केळ्याचे
 • खोके-खोक्यात, खोक्याला
 • डोके-डोक्यात, डोक्याला

 विशेषणाचे सामान्यरूप :

1. ‘अ’ कारान्त ‘ई’ कारान्त व ‘ऊ’ कारान्त विशेषणाचे सामान्यरूप होत नाही.

उदा.  

 • जगात गरीब माणसांना कोणी विचारात नाही.
 • त्याचे लोकरी कपड्यांचे दुकान आहे.
 • मला कडू कारल्याची भाजी आवडते.

2. ‘आ’ कारान्त विशेषणांचे सामान्यरूप ‘या’ कारान्त होते.

उदा.    

 • भला माणूस-भल्या माणसास
 • हा मुलगा-ह्या मुलास
 • खरा माणूस– खर्य्या माणसाला.

वाक्य पृथक्करण व त्याचे प्रकार

MPSC chalu ghadamodi, current affairs-marathi-

509   15-Dec-2019, Sun

पृथक म्हणजे वेगळे किंवा सुटे करणे असा होतो आणि वाक्यपृथक्करण म्हणजे वाक्यातील भाग वेगळा करून दाखविणे.

उद्देश विभाग (उद्देशांग) विधेय विभाग (विधेयांग)
1) उद्देश (कर्ता) 1) कर्म व कर्म विस्तार
2) उद्देश विस्तार 2) विधानपूरक
  3) विधेय विस्तार
  4) विधेय (क्रियापद)

उद्देश विभाग/ उद्देशांग :

1 ) उद्देश (कर्ता)

वाक्य ज्याच्या विषयी माहिती सांगते तो वाक्याचा कर्ता असतो. क्रियापदातील धातुला णारा, णारे, णारी, हे प्रत्यय जोडून कोण / काय ने प्रश्न विचारल्यास उत्तर कर्ता येते.

उदा.

 • रामुचा शर्ट फाटला. (फाटणारे काय/कोण?)
 • रामरावांचा कुत्रा मेला. (मरणारे कोण/काय?)
 • मोगल साम्राज्याचा अंत झाला. (होणारे-कोण/काय?)
 • रामुच्या घराचा दरवाजा उघडला. (उघडणारे कोण/काय?)

वरील वाक्यात शर्ट, कुत्रा, अंत, दरवाजा हे उद्देश (कर्ता) आहेत.

2) उद्देश विस्तार

कर्त्याविषयी माहिती सांगणारे शब्द जर कर्त्यापूर्वी असतील तर अशा शब्दांना उद्देश विस्तारात लिहावे.

उदा.

 • शेजारचा रामु धपकन पडला.
 • नियमित अभ्यास करणारे विधार्थी पास होतात.

 विधेय विभाग/ विधेयांग :

वाक्यात ज्यांच्यावर क्रिया घडते ते कर्म असते म्हणजेच क्रिया सोसणारे कर्म असते.

उदा. 

 • रामने झडाचा पेरु तोडला. (या वाक्यात तोडण्याची क्रिया पेरु वर झाली म्हणून ते कर्म).
 • गवळ्याने म्हशीची धार काढली. (या वाक्यात काढण्याची क्रिया धारेवर झाली म्हणून ते कर्म).

1) कर्म विस्तार

कर्मापूर्वी कर्माविषयी माहिती सांगणारा शब्द म्हणजे ‘कर्म विस्तार’ होय.

उदा. 

 • रामने झाडाचा पेरु तोडला.
 • गवळ्याने काळ्या म्हशीची धार काढली.

2) विधान पूरक

कर्त्याविषयी माहिती सांगणारा शब्द जर कर्त्यांनंतर आला तर ते ‘विधानपूरक’ असते.

उदा. 

 • राम राजा झाला.
 • संदीप शिक्षक आहे.
 • शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो.

वरील वाक्यावरुन राजा, शिक्षक, मोहक ही शब्द कर्त्याविषयी अधिक महितीसांगत आहेत म्हणून त्यांना ‘विधानपूरक’ असे म्हणतात.

3) विधेय विस्तार

 • क्रियापदास विधेय असे म्हणतात.
 • वाक्यात क्रियापदाविषयी माहिती सांगणार्‍या शब्दांचा यात समावेश होतो.
 • क्रियापदाला केव्हा/ कोठे/ कसे ने प्रश्न विचारल्यास ‘विधेय विस्तार’ उत्तर येते.
 • ही सर्व क्रियाविशेषणे असतात.

उदा. 

 • कुटुंबातील सर्व व्यक्ती रविवारी वनभोजनास गेले.
 • शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो.
 • माझा जिवलग मित्र मनीष माझे पत्र पाहताच त्वरित आला.

4) विधेय/क्रियापद

वाक्यातील क्रियापदाला ‘विधेय’ असे म्हणतात.

उदा.

 • रमेश खेळतो.
 • रमेश अभ्यास करतो.
 • रमेश चित्र काढतो.

समास व त्याचे प्रकार

MPSC chalu ghadamodi, current affairs-mpsc-marathi

573   12-Dec-2019, Thu

वाक्य पृथक्करण व त्याचे प्रकार:-

 • काटकसर करणे हा मनुष्याच्या अंगी असलेला एकूण गुण आहे. आपण दैनंदिन जीवनात बरीच काटकसर करतो. त्यामुळे आपण बोलतांना सुद्धा हा गुण वापरतो. बर्‍याचदा आपण एखादे वाक्य पूर्ण न बोलता शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोडशब्द तयार करतो. जो त्या वाक्यातील अर्थबोध करून देतो. यालाच ‘समास’ असे म्हणतात. अशी काटकसर करून जो शब्द तयार होतो त्यालाच सामासिक शब्द असे म्हणतात.

उदा.

 • वडापाव – वडाघालून तयार केलेला पाव.
 • पोळपाट – पोळी करण्यासाठी लागणारे पाट
 • कांदेपोहे – कांदे घालून तयार केलेले पोहे.
 • पंचवटी – पाच वडांचा समूह

समासाचे मुख्य 4 प्रकार पडतात.

 • 1. अव्ययीभाव समास
 • 2. तत्पुरुष समास
 • 3. व्दंव्द समास
 • 4. बहुव्रीही समास

1)  अव्ययीभाव समास :

ज्या समासात पहिला शब्द मुख्य असतो व त्या तयार झालेल्या सामासिक शब्दांचा उपयोग क्रियाविशेषणासारखा केला जातो त्यास ‘अव्ययीभाव समास’ असे म्हणतात. अव्ययीभाव समासात आपल्याला खालील भाषेतील उदाहरणे पहावयास मिळतात.

 • अ) मराठी भाषेतील शब्द

उदा.  

 • गावोगाव– प्रत्येक गावात
 • गल्लोगल्ली – प्रत्येक गल्लीत
 • दारोदारी – प्रत्येक दारी
 • घरोघरी – प्रत्येक घरी

मराठी भाषेतील व्दिरुक्ती (पहिल्या शब्दांचीच पुनरावृत्ती) होऊन तयार झालेले शब्द हे क्रियाविशेषणा प्रमाणे वापरले जातात म्हणून ही उदाहरणे अव्ययीभाव समासाची आहेत.

 • ब) संस्कृत भाषेतील शब्द

उदा.  

 • प्रती (प्रत्येक)– प्रतिमास, प्रतिक्षण, प्रतिदिन
 • आ (पर्यत) – आमरण
 • आ (पासून) – आजन्म, आजीवन
 • यथा (प्रमाण) – यथाविधी, यथामती, यथाशक्ती.

वरील उदाहरणात प्रति, आ, यथा हे संस्कृत भाषेतील उपस्वर्ग लागून तयार झालेले शब्द आहेत. संस्कृत मधील उपस्वर्गाना अव्यय मानले जाते.
वरील उदाहरणामध्ये हे उपस्वर्ग प्रारंभी लागून सामासिक शब्द तयार झालेला आहे व ह्या उपस्वर्गाना सामासिक शब्दांत अधिक महत्व आहे.

 • क) अरबी व फारसी भाषेतील शब्द

उदा.

 • दर (प्रत्येक) – दरसाल, दरडोई, दरमजल.
 • गैर (प्रत्येक) – गैरसमज, गैरहजर, गैरशिस्त
 • हर (प्रत्येक) – हररोज, हरहमेशा
 • बे (विरुद्ध) – बेकायदा, बेमालूम, बेलाशक, बेलाईक

वरील उदाहरणात संस्कृत भाषेमध्ये फारसी व अरबी भाषेतील उपस्वर्ग लागून मराठी भाषेत अव्ययीभाव समासाची उदाहरणे तयार झाली आहेत.

2 ) तत्पुरुष समास :

ज्या समासात दुसरे पद महत्वाचे असून समासाचा विग्रह करतांना गाळलेला शब्द, विभक्तीप्रत्यय लिहावा लागतो, त्यास तत्पुरुषसमास असे म्हणतात. थोडक्यात ज्या समासात दूसरा शब्द प्रधान / महत्वाचा असतो त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात.

उदा.  

 • महामानव – महान असलेला मानव
 • राजपुत्र – राजाचा पुत्र
 • तोंडपाठ – तोंडाने पाठ
 • गायरान – गाईसाठी रान
 • वनभोजन – वनातील भोजन

वरील उदाहरणांमध्ये पहिल्या पदापेक्षा दुसरे पद प्रधान आहे आणि या शब्दांना ला, चा, ने हे विभक्ती प्रत्यय वापरावे लागतात म्हणून त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात.

तत्पुरुष समासाचे 7 उपप्रकर पडतात.

 • 1. विभक्ती तत्पुरुष

ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्तीचा अर्थ व्यक्त करणार्‍या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पद जोडली जातात त्यास  विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. वरील उदाहरणांत वेगवेगळ्या सामासिक शब्दांचा विग्रह केला असता त्याला वेगवेगळ्या विभक्त्या लागलेल्या दिसतात.

उदा. 

 • कृष्णाश्रित – कृष्णाला आश्रित – व्दितीया – देशगत, प्रयत्नसाध्य
 • तोंडापाठ – तोंडाने पाठ – तृतीया – गुणदोष, बुद्धिजड, भक्तिवश, द्यार्द्र, ईश्वरनिर्मित
 • क्रीडांगण – क्रीडेसाठी अंगण – चतुर्थी – गायरान, पोळपाट, वाटखर्च, पूजाद्रव्य, बाइलवेडा
 • ऋणमुक्त – ऋणातून मुक्त – पंचमी – सेवानिवृत्त, गर्भश्रीमंत, जातिभष्ट, चोरभय, जन्मखोड
 • राजपुत्र – राजाचा पुत्र – षष्ठी – देवपुजा, राजवाडा, घोडदौड, धर्मवेड, आंबराई
 • घरजावई – घरातील जावई – सप्तमी – स्वर्गवास, वनभोजन, पोटशूळ, कूपमंडूक, घरधंदा
 • 2. अलुक तत्पुरुष

ज्या विभक्ती तत्पुरुष समासात पहिला पदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही त्यास अलुक तत्पुरुष समास म्हणतात. अलुक म्हणजे लोप न पावणारा म्हणजे ज्या विभक्ती तत्पुरुष सामासिक शब्दांच्या पहिल्या पदाचा लोप होत नाही त्यास अलुक तत्पुरुष समास असे म्हणतात.

उदा. 

 • तोंडी लावणे
 • पाठी घालणे
 • अग्रेसर
 • कर्तरीप्रयोग
 • कर्मणी प्रयोग
 • 3. उपपद तत्पुरुष/कृदंत तत्पुरुष

ज्या तत्पुरुष समासात दुसरे पद महत्वाचे असून व ते दुसरे पद हे धातुसाधीत/ कृदंत म्हणून त्या शब्दांत येते तसेच त्याचा वाक्यात स्वतंत्रपणे उपयोग करता येत नाही अशा समासास उपपद तत्पुरुष/कृदंत तत्पुरुष असे म्हणतात.

उदा. 

 • ग्रंथकार – ग्रंथ करणारा
 • शेतकरी – शेती करणारा
 • लाचखाऊ – लाच खाणारा
 • सुखद – सुख देणारा
 • जलद – जल देणारा

वरील उदाहरणांमध्ये पहिल्या पदात ग्रंथ, शेत, लाच, सुख, जल हे सर्व धातू आहेत.
नंतर दुसर्याद पदात त्यांचे रूपांतर धातुसाधीतांमध्ये झाले आहे म्हणून ते उपपद तत्पुरुष/कृदंत तत्पुरुष समासाची उदाहरणे आहेत.
इतर उदाहरणे : लाकूडतोडया, आगलाव्या, गृहस्थ, कामकरी, कुंभकर्ण, मार्गस्थ, वाटसरु.

 • 4. नत्र तत्पुरुष समास

ज्या तत्पुरुष सामासातील प्रथम पद हे नकारार्थी असते त्यास नत्र तत्पुरुष असे म्हणतात. म्हणजेच ज्या समासातील पहिले पद हे अभाव किंवा निषेध दर्शवतात त्यांना नत्र तत्पुरुष समास असे म्हणतात. उदा. (अ, अन्, न, ना, बे, नि, गैर इ.)

उदा.

 • अयोग्य – योग्य नसलेला
 • अज्ञान – ज्ञान नसलेला
 • अहिंसा – हिंसा नसलेला
 • निरोगी – रोग नसलेला
 • निर्दोष – दोषी नसलेला
 • 5. कर्मधारय तत्पुरुष समास

ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असतात व त्या दोन्ही  पदांचा संबंध विशेषण व विशेष्य या प्रकारचा असतो त्यालाच कर्मधारेय तत्पुरुष समास म्हणतात.

उदा. 

 • नील कमल – नील असे कमल
 • रक्तचंदन – रक्तासारखे चंदन
 • पुरुषोत्तम – उत्तम असा पुरुष
 • महादेव – महान असा देव
 • पीतांबर – पीत असे अंब ज्याचेपीत (पिवळे,अंबरवस्त्र)
 • मेघशाम – मेघासारखा काळा
 • चरणकमळ – चरण हेच कमळ
 • खडीसाखर – खडयसारखी साखर
 • तपोबळ – तप हेच बळ

कर्मधारण्य समासाचे पुढील 7 उपप्रकर पडतात.

    अ) विशेषण पूर्वपद कर्मधारय

जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दातील पहिले पद विशेषण असते अशा समासला विशेषण पूर्वपद कर्मधारय असे म्हणतात.

उदा.

 • महादेव – महान असा देव
 • लघुपट – लहान असा पट
 • रक्तचंदन – रक्तासारखे चंदन

आ) विशेषण उत्तरपद कर्मधारय

जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांतील दुसरे पद विशेषण असते अशा समासाला विशेषण उत्तरपद कर्मधारेय असे म्हणतात.

उदा.

 • पुरुषोत्तम – उत्तम असा पुरुष
 • मुखकमल – मुख हेच कमल
 • वेशांतर – अन्य असा वेश
 • भाषांतर – अन्य अशी भाषा

इ) विशेषण उभयपद कर्मधारय

जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दातील दोन्ही पदे विशेषण असतात तेव्हा अशा समासला विशेषण उभयपद कर्मधरय असे म्हणतात.

उदा.

 • लालभडक – लाल भडक असा
 • श्यामसुंदर – श्याम सुंदर असा
 • काळाभोर – काळा भोर असा
 • पांढराशुभ्र – पांढरा शुभ्र असा
 • हिरवागार – हिरवागार असा
 • कृष्णधवल – कृष्ण धवल असा

ई) उपमान पूर्वपद कर्मधारय

जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांत पहिले पद उपमान असते म्हणजे त्या सामासिक शब्दांतील पूर्वपदापेक्षा उत्तरपदाला जास्त महत्व दिलेले असते. उत्तरपदाचे विशेषणासारखे काम करते त्याला उपमान पूर्वपद कर्मधारय समास असे म्हणतात.

उदा.  

 • वज्रदेह – वज्रासारखे देह
 • चंद्रमुख – चंद्रासारखे मुख
 • राधेश्याम – राधेसारखा शाम
 • कमलनयन– कमळासारखे नयन

उ) उपमान उत्तरपद कर्मधारय

जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांत दुसरे पद उपमानअसते म्हणजे त्या सामासिक शब्दांतील उत्तरपदपेक्षा पूर्वपदाला जास्त महत्व दिलेले असते व त्या शब्दांत उत्तरपद हे पूर्वपदाचे विशेषणासारखे काम करते त्याला उपमान उत्तरपद कर्मधारय समास असे म्हणतात.

उदा. 

 • मुखचंद्र – चंद्रासारखे मुख
 • नरसिंह – सिंहासारखा नर
 • चरणकमल – कमलासारखे चरण
 • हृदयसागर – सागरासारखे हृदय

ऊ) अव्यय पूर्वपद कर्मधारय

जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांत पहिले पद अव्यय असेन त्याचा उपयोग विशेषणासारखा केला जातो अशा समासाला अव्यय पूर्ववाद कर्मधारय असे म्हणतात.

उदा.  

 • सुयोग – सु (चांगला) असा योग
 • सुपुत्र – सु (चांगला) असा पुत्र
 • सुगंध – सु (चांगला) असा गंध
 • सुनयन – सु (चांगला) असा डोळे
 • कुयोग – कु (वाईट) असा योग
 • कुपुत्र – कु (वाईट) असा पुत्र

ए) रूपक कर्मधारय

जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांतील दोन्ही पदे एकरूप असतात. तेव्हा अशा समसाला रूपक कर्मधारय समास असे म्हणतात.

उदा. 

 • विधाधन – विधा हेच धन
 • यशोधन – यश हेच धन
 • तपोबल – ताप हेच बल
 • काव्यांमृत – काव्य हेच अमृत
 •  ज्ञांनामृत – ज्ञान हेच अमृत
 • 6. व्दिगू समास

ज्या कर्मधारय समासातील पहिले पद हे संख्याविशेषण असते व त्या सामासिक शब्दांतून एक समूह सुचविला जातो. त्याला व्दिगू समास असे म्हणतात. या समासास संख्यापूर्वपद  कर्मधारय समास असेही म्हणतात.

उदा. 

 • नवरात्र – नऊ रात्रींचा समूह
 • पंचवटी – पाच वडांचासमूह
 • चातुर्मास – चार मासांचा समूह
 • त्रिभुवन – तीन भुवनांचा समूह
 • त्रैलोक्य – तीन लोकांचा समूह
 • सप्ताह – सात दिवसांचा समूह
 • चौघडी – चार घडयांचा समुह
 • 7. मध्यमपदलोपी समास

ज्या सामासिक शब्दांतील पहिल्या पदांचा दुसर्‍यासाठी पदाशी संबंध दर्शविणारी मधली काही पदे लोप करावी लागतात त्या समासाला मध्यमलोपी समास असे म्हणतात. या समासास लुप्तपद कर्मधारेय समास असेही म्हणतात.

उदा. 

 • साखरभात – साखर घालून केलेला भात
 • पुरणपोळी – पुरण घालून केलेली पोळी
 • कांदेपोहे – कांदे घालून केलेले पोहे
 • घोडेस्वार – घोडयावर असलेला स्वार
 • बालमित्र – बालपणापासूनचा मित्र
 • चुलत सासरा – नवर्यानचा चुलता या नात्याने सासरा
 • लंगोटी मित्र – लंगोटी घालत असल्यापासूनचा मित्र

3) व्दंव्द समास :

ज्या समासातील दोन्ही पद अर्थदृष्टया समान दर्जाचे असतात. त्यास ‘व्दंव्द समास’ असे म्हणतात. या समासातील पदे आणि, अथवा, व, किंवा या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात.

उदा.  

 • रामलक्ष्मण – राम आणि लक्ष्मण
 • विटीदांडू – विटी आणि दांडू
 • पापपुण्य – पाप आणि पुण्य
 • बहीणभाऊ  – बहीण आणि भाऊ
 • आईवडील – आई आणि वडील
 • स्त्रीपुरुष – स्त्री आणि पुरुष
 • कृष्णार्जुन – कृष्ण आणि अर्जुन
 •  ने-आण  – ने आणि आण
 • दक्षिणोत्तर – दक्षिण आणि उत्तर

व्दंव्द समासाचे खलील 3 प्रकार पडतात.

 •  1. इतरेतर व्दंव्द समास

ज्या समासाचा विग्रह करतांना आणि, व, ही, समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो. त्यास इतरेतर व्दंव्द समास असे म्हणतात.

उदा.  

 • आईबाप – आई आणि बाप
 • हरिहर – हरि आणि हर
 • स्त्रीपुरुष – स्त्री आणि पुरुष
 • कृष्णार्जुन – कृष्ण आणि अर्जुन
 • पशुपक्षी – पशू आणि पक्षी
 • बहीणभाऊ – बहीण आणि भाऊ
 • डोंगरदर्यात – डोंगर आणि दर्यात
 • 2. वैकल्पिक व्दंव्द समास

ज्या समासाचा विग्रह करतांना किंवा, अथवा, वा ही विकल्प बोधक उभयन्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्यास वैकल्पिक व्दंव्द समास असे म्हणतात.

उदा.    

 • खरेखोटे – खरे आणि खोटे
 • तीनचार – तीन किंवा चार
 • बरेवाईट – बरे किंवा वाईट
 • पासनापास –  पास आणि नापास
 •  मागेपुढे – मागे अथवा पुढे
 • चुकभूल – चूक अथवा भूल
 • न्यायान्याय – न्याय अथवा अन्याय
 • पापपुण्य – पाप किंवा पुण्य
 • सत्यासत्य – सत्य किंवा असत्य
 • 3. समाहार व्दंव्द समास

ज्या समासातील पदांचा विग्रह करतांना त्यातील पदांचा अर्थशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थाचाही त्यात समावेश म्हणजेच समहार केलेला असतो त्यास समाहार व्दंव्द समास असे म्हणतात.

उदा.  

 • मिठभाकर –  मीठ, भाकर व साधे खाधपदार्थ इत्यादी
 • चहापाणी –  चहा, पाणी व फराळाचे इतर पदार्थ
 • भाजीपाला – भाजी, पाला, मिरची, कोथंबीर यासारख्या इतर वस्तु
 • अंथरूणपांघरून – अंथरण्यासाठी पांघरण्यासाठी लागणार्‍या वस्तु व इतर कपडे
 • शेतीवाडी – शेती, वाडी व इतर तत्सम मालमत्ता
 • केरकचरा – केर, कचरा व इतर टाकाऊ पदार्थ
 • पानसुपारी – पान, सुपारी व इतर पदार्थ
 • नदीनाले – नदी, नाले, ओढे व इतर
 • जीवजंतू – जीव, जंतू व इतर किटक

  4) बहुव्रीही समास :

ज्या समासातील कोणतेच पद प्रमुख नसून त्या पदाच्या अर्थापेक्षा वेगळ्या अशा वस्तूंचा किंवा व्यक्तींचा त्यामधून बोध होतो त्या समासाला बहुव्रीही समास असे म्हणतात.

उदा.  

 • नीलकंठ – ज्याचा कंठ निळा आहे असा (शंकर)
 • वक्रतुंड – ज्याचे तोंड वक्र आहे असा (गणपती)
 • दशमुख  – ज्याला दहा तोंड आहे असा (रावण)

बहुव्रीही समासाचे खालील 4 उपपक्रार पडतात.

 • 1. विभक्ती बहुव्रीही समास

ज्या समासाचा विग्रह करतांना शेवटी एक संबंधी सर्वनाम येते. अशा सर्वनामाची जी विभक्ती असेल त्या विभक्तीचे नाव समासाला दिले जाते त्याला विभक्ती बहुव्रीही समास असे म्हणतात.

उदा.

 • प्राप्तधन – प्राप्त आहे धन ज्याला तो – व्दितीया विभक्ती
 • जितेंद्रिय – जित आहे इंद्रिये ज्याची तो – षष्ठी विभक्ती
 • जितशत्रू – जित आहे शत्रू ज्याने तो – तृतीया विभक्ती
 • गतप्राण – गत आहे प्राण ज्यापासून तो – पंचमी विभक्ती
 • पूर्णजल – पूर्ण आहेत जल ज्यात असे – सप्तमी विभक्ती
 • त्रिकोण – तीन आहेत कोन ज्याला तो – चतुर्थी विभक्ती
 • 2. नत्र बहुव्रीही समास

ज्या समासाचे पहिले पद नकारदर्शक असते त्याला नत्र बहुव्रीही समास असे म्हणतात. या समासातील पहिल्या पदात अ, न, अन, नि अशा नकारदर्शक शब्दांचा वापर केला जातो.

उदा.  

 • अनंत – नाही अंत ज्याला तो
 • निर्धन – नाही धन ज्याकडे तो
 • नीरस – नाही रस ज्यात तो
 • अनिकेत – नाही निकेत ज्याला तो
 • अव्यय – नाही व्यय ज्याला तो
 • निरोगी – नाही रोग ज्याला तो
 • अनाथ – ज्याला नाथ नाही असा तो
 • अनियमित – नियमित नाही असे ते
 • अकर्मक – नाही कर्म ज्याला ते
 • अखंड – नाही खंड ज्या ते
 • 3. सहबहुव्रीही समास

ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद सह किंवा स अशी अव्यये असून हा सामासिक शब्द एखाधा विशेषणाचे कार्य करतो त्यास सहबहुव्रीही समास म्हणतात.

उदा. 

 • सहपरिवार – परिवारासहित असा जो
 • सबल – बलासहित आहे असा जो
 • सवर्ण – वर्णासहित असा तो
 • सफल – फलाने सहित असे तो
 • सानंद – आनंदाने सहित असा जो
 • 4. प्रादिबहुव्रीही समास

ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद प्र, परा, अप, दूर, सु, वि अशा उपसर्गानी युक्त असेल तर त्याला प्रादिबहुव्रीही समास असे म्हणतात.

उदा.  

 • सुमंगल – पवित्र आहे असे ते
 • सुनयना – सु-नयन असलेली स्त्री
 • दुर्गुण – वाईट गुण असलेली व्यक्ती
 • प्रबळ -अधिक बलवान असा तो
 • विख्यात – विशेष ख्याती असलेला
 • प्रज्ञावंत – बुद्धी असलेला.

मराठीतील म्हणी

MPSC chalu ghadamodi, current affairs-marathi

569   10-Dec-2019, Tue

1 अगं अगं म्हशी मला कोठे नेशी स्वत:ची चूक मान्य करण्याऐवजी त्यासाठी इतरांवर दोष ठेवणे.
2 आपला हात जगन्नाथ आपली प्रगती आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते.
3 अति तेथे माती कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो.
4 आयत्या बिळात नागोबा दुसर्‍याने स्वत:साठी केलेल्या गोष्टीचा आयता फायदा उठविणे.
5 आईजीच्या जीवावर बाईजी उदार दुसर्‍याचा पैसा खर्च करून औदार्य दाखविणे.
6 आपल्याच पोळीवर तूप ओढणे फक्त स्वत:चाच तेवढा फायदा साधून घेणे.
7 आंधळे दळते कुत्रं पीठ खाते एकानं काम करावं आणि दुसर्‍यांनं त्याचा फायदा घ्यावा.
8 आधी पोटोबा मग विठ्ठोबा आदी पोटाची सोय पाहावी नंतर देवधर्म करावा.
9 अडला हरी गाढवाचे पाय धरी एखाद्या हुशार माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख माणसाची विनवणी करावी लागते.
10 आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे.
11 अति शहाणा त्याचा बैल रिकामा जो माणूस फार शहाणपणा करायला जातो. त्याचे मुळीच काम होत नाही.
12 आधी शिदोरी मग जेजूरी आधी भोजन मग देवपूजा
13 असतील शिते तर जमतील भुते एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्या भोवती माणसे गोळा होतात.
14 आचार भ्रष्टी सदा कष्टी ज्याचे आचार विचार चांगले नसतात. तो नेहमी दु:खी असतो.
15 आठ हात लाकूड अन नऊ हात ढिपली अत्यंत मूर्खपणाची अतिशयोक्ती.
16 आईचा काळ बायकोचा मवाळ आईकडे दुर्लक्ष करून बायकोची काळजी घेणारा
17 आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास मुळातच आळशी माणसाच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होणे.
18 आपलेच दात आपलेच ओठ आपल्याच माणसाने चूक केल्यावर अडचणीचे स्थिती निर्माण होणे.
19 अंथरूण पाहून पाय पसरावे आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च ठेवावा.
20 आवळा देऊन कोहळा काढणे क्षुल्लक गोष्टीचा मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे.
21 आलीया भोगाशी असावे सादर कुरकुर न करता निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे.
22 अचाट खाणे मसणात जाणे खाण्यापिण्यात अतिरके झाल्यास परिणाम वाईट होतो.
23 आधी बुद्धी जाते नंतर लक्ष्मी जाते अगोदर आचरण बिघडते नंतर दशा बदलते.
24 आपण हसे लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला ज्या दोषाबद्दल आपण दुसर्‍याला हसतो. तोच दोष आपल्या अंगी असणे.
25 आपला तो बाब्या दुसर्‍याचं ते कारटं स्वत:चे चांगले आणि दुसर्‍यांचे वाईट अशी प्रवृत्ती असणे.
26 अळी मिळी गुप चिळी रहस्य उघडकीला येऊ नये म्हणून सर्वांनी मूग गिळून बसणे.
27 अहो रूपम अहो ध्वनी एकमेकांच्या मर्यादा न दाखवता उलटपक्षी खोटी स्तुती करणे.
28 इच्छा तेथे मार्ग एखादी गोष्ट करण्याची इच्छा असेल तर काहीतरी मार्ग निघतोच.
29 इकडे आड तिकडे विहीर दोन्ही बाजूंनी अडचणीची परिस्थिती असणे.
30 उठता लाथ बसता बुकी प्रत्येक कृत्याबद्दल अद्दल घडविण्यासाठी पुन्हा पुन्हा शिक्षा करणे.
31 उडत्या पाखरची पिसे मोजणे अगदी सहजपणे अवघड गोष्टीची परीक्षा करणे.
32 उधारीचे पोते सव्वाहात रिते उधारी घेतलेल्या गोष्टीत तोटा ठरलेलाच असतो.
33 उंदराला मांजर साक्ष वाईट कृत्य करतांना एकमेकांना साक्ष देणे.
34 उचलली जीभ लावली टाळ्याला विचार न करता बोलणे.
35 उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग प्रसंगी हास्यास्पद ठरेल आशा प्रकराच्या उतावळेपणा दाखविणे.
36 उथळ पाण्याला खळखळाट फार थोडासा गुण अंगी असणारा माणूस जास्त बढाई मरतो.
37 उस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा एखाद्याच्या चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये.
38 एक ना घड भारभर चिंध्या एकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्यावर सर्वच कामे अर्थवट होण्याची अवस्था.
39 एका माळेचे मणी सगळीच माणसे सारख्या स्वभावाची.
40 एका हाताने टाळी वाजत नाही दोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्यालाच दोष देता येत नाही किंवा एखाद्या कृत्यात दोघेही दोषी असणे.
41 ऐकावे जनाचे करावे मनाचे लोकांचे ऐकून घ्यावे व मग आपल्याला जे योग्य वाटेल ते करावे.
42 एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत दोन तेजस्वी माणसे एकत्र गुण्यागोविदाने नांदू शकत नाहीत दोन सवती एका घरात सुखासमाधानाने राहू शकत नाहीत.
43 ओळखीचा चोर जीवे न सोडी ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा धोकादायक असतो.
44 कर नाही त्याला डर कशाला ज्याने काही गुन्हा किंवा वाईट गोष्ट केली नाही त्याने शिक्षा होण्याचे भय कशाला बाळगावयाचे
45 कामापुरता मामा ताकापुरती आजी आपले काम करून घेईपर्यंत एखाद्याशी गोड बोलणे.
46 काळ आला होता. पण वेळ आली नव्हती नाश होण्याची वेळ आली असताना थोडक्यात बचावणे.
47 कानामगून आली आणि तिखट झाली मागून येऊन वरचढ होणे.
48 करावे तसे भरावे जसे कृत्य असेल त्याप्रमाणे चांगलेवाईट फळ भोगावे लागते.
49 कधी गाडीवर नाव तर कधी नावेवर गाडी कधी गरीबी तर कधी श्रीमंती येणे.
50 कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ आपलाच माणूस आपल्या नाशाला कारणीभूत होतो.
51 काठी मारल्याने पानी दुभंगत नाही – रक्ताचे नाते तोडून म्हणता तुटत नाही.
52 कडू कारले तुपात तळले सारखरेत घोळले तरीही कडू ते कडूच किती ही प्रयत्न केला तरीही माणसाचा मूळ स्वभाव (दूर्वर्तणी) बदलत नाही.
53 कुडी तशी पुडी देहाप्रमाणे आहार असतो.
54 कधी तुपाशी तर कधी उपाशी संसारिक स्थिती नेहमी सारखीच राहत नाही त्यात कधी संपन्नता येते तर कधी विपन्नावस्था येते.
55 कावळा बसायला अन फांदी तुटायला परस्परांशी कारण-संबंध नसताना योगायोगाने दोन गोष्टी एकाचवेळी घडणे.
56 कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच कितीही प्रयत्न केले तरी काहीचा मूळस्वभाव बदलत नाही.
57 कुंपणाने शेत खाल्ले तर दाद न्यावी कुणीकडे रखवालादारानेच विश्वासघात करून चोरी करणे.
58 कोल्हा काकडीला राजी क्ष्रुद्र माणसे क्षुद्र गोष्टीनीही खुश होतात.
59 कोरड्याबरोबर ओले ही जळते निरपराध्याची अपराध्यासोबत गणना करणे
60 कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही निश्चित घडणारी घटना कोणाच्याही प्रयत्नाने टाळता येत नाही.
61 काखेत कळसा नि गावाला वळसा हरवलेली वस्तु जवळ असतानाही इतरत्र शोधत राहणे.
62 कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही क्षुद्र माणसांनी केलेल्या दोषा रोपाने थोरांचे नुकसान होत नसते.
63 खाण तशी माती आई वडिलाप्रमाणे त्यांच्या मुलांचे वर्तन होणे.
64 खर्‍याला मरण नाही खरे कधी लपत नाही, सत्य मेव जयते!
65 खाऊ जाणे ते पचवू जाणे एखादे कृत्य धाडसाने करणारा त्याचे परिणाम भोगण्यासही समर्थ असतो.
66 खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी परिस्थितीशी जुळवून न घेता हट्टीपणाने वागणारा.
67 खाऊन माजवे टाकून माजू नये पैशाच्या संपतीचा गैरवापर करू नये.
68 खोट्याच्या कपाळी गोटा वाईट कृत्य करणार्‍याला माणसाचे शेवटी वाईटच होते.
69 गरजवंताला अक्कल नसते गरजेमुळे अडलेल्या व्यक्तीला इतरांच्या म्हणण्यापुढे मान डोलवावी लागते.
70 गर्वाचे घर खाली गर्विष्ठ माणसाची कधीतरी फजिती होतेच.
71 गरज सरो नि वैध मरो आपले काम झाले की उपकार कर्त्याची पर्वा न करणे.
72 गर्जेल तो पडेल काय केवळ गाजावाजा करणार्‍या व्यक्तीच्या हातून फारसे काही घडत नसते.
73 गाढवाला गुळाची चव काय? मुर्खाला चांगल्या गोष्टीची किंमत कळत नाही.
74 गाढवांचा गोंधळ, लाथांचा सुकाळ मूर्ख लोक एकत्र आल्यावर मूर्खपणाचेच कृत्य करणार
75 गाव करी ते राव ना करी श्रीमंत व्यक्ति स्वत:च्या बळावर जे करू शकत नाही ते एकीच्या बळावर सामान्य माणसे करू शकतात.
76 गाड्याबरोबर नळ्याची यात्रा मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा होतच असतो.
77 गाढवापुढे वाचली गीता अन कालचा गोधळ बारा होता मूर्खाला केलेला उपदेश वाया जातो.
78 गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाली एखादी गोष्ट साध्य झाली तर उत्तमच नाही तर तिचा दूसरा उपयोग करून घेणे.
79 गाढवाच्या पाठीवर गोणी एखाद्या गोष्टीची अनूकुलता असून उपयोग नाही. तर तिचा फायदा घेता यायला हवा.
80 गुरुची विद्या गुरूला फळली एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटणे.
81 गुळाचा गणपती गुळाचाच नैवेद्य ज्याची वस्तु त्यालाच भेट देणे.
82 गोगलगाय नि पोटात पाय एखाद्याचे खरे स्वरूप न दिसणे.
83 गोरागोमटा कपाळ करंटा दिसायला देखणा पण नशिबाने दुर्दैवी व्यक्ती.
84 घर ना दार देवळी बिर्‍हाड बायको पोरे नसणारा एकटा पुरुष किंवा शिरावर कोणतीही जाबाबदारी नसलेली व्यक्ती.
85 घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात एखाद्यावर प्रतिकूल परिस्थिती आली म्हणजे सारेच त्याच्याबरोबर वाईटपणे वागू लागतात.
86 घरचे झाले थोडे, व्याह्याने धाडले घोडे स्वत:च्या कामाचा व्याप अतोनात असताना दुसर्‍यांने आपलेही काम लादणे.
87 घर पहावे बांधून लग्न पहावे करून अनुभवाने माणूस शहाणा होतो.
88 घटका पाणी पिते घड्याळ टोले खाते आपापल्या कर्मानुसार परिणाम भोगावे लागतात.
89 घरोघरी मातीच्याच चुली सर्वत्र सारखीच परिस्थिती अनुभवास येणे.
90 घोडे खाई भाडे धंद्यात फायद्यापेक्षा खर्च जास्त.
91 चढेल तो पडेल गर्विष्ठ माणसाचा गर्व उतरल्याशिवाय राहत नाही.
92 चालत्या गाडीला खीळ व्यवस्थीत चालणार्‍या कार्यात अडचण निर्माण होणे.
93 चमत्काराशिवाय नमस्कार नाही, पराक्रमावाचून पोवाडा नाही लोकांना काही विशेष कार्य करून दाखविल्याशिवाय लोक मान देत नाहीत.
94 चिंती परा येई घरा दुसर्‍याबदल मनात वाईट विचार आलेकी स्वत:चेच वाईट होते.
95 चोर सोडून सान्याशाला फाशी खर्‍या गुन्हेगाराला शासन न करता दुसर्‍याच निरपराध माणसाला शिक्षा देणे.
96 चोराच्या उलटया बोंबा स्वत:च गुन्हा करून दुसर्‍यावर आळ घेणे.
97 चोराच्या मनात चांदणे वाईट माणसांनाच वाईट माणसांच्या युक्त्या कळतात.
98 चोरावर मोर एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसर्‍यावर कडी करणे.
99 जळत्या घराचा पोळता वासा प्रचंड नुकसानीतून जे वाचले ते आपले म्हणून समाधान मानावे.
100 जलात राहुन माशांशी वैर करू नये ज्यांच्या सहवासात राहावे लागते त्यांच्याशी वैर करून नये.
101 जन्माला आला हेला, पाणी वाहून मेला निरक्षर किंवा निर्बुद्ध माणसाचे आयुष्य शारीरिक कष्टामध्येच जाते.
102 जळत घर भाड्याने कोण घेणार नुकसान करणार्‍या गोष्टीचा स्वीकार कोण करणार.
103 जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे दुसर्‍याच्या स्थितीत आपण स्वत:जावे, तेव्हा तिचे खरे ज्ञान आपणास होते.
104 ज्या गावाच्या बोरी त्याच गावच्या बाभळी एकमेंकाचे वर्म माहीत असणार्‍या माणसांशी गाठ पडणे.
105 ज्याचे खावे मीठ त्याचे करावे निट जो आपल्या वर उपकार करतो त्या उपकार कर्त्याला स्मरण करून त्याच्या यशासाठी प्रयत्न करावेत.
106 जशी देणावळ तशी धुणावळ मिळणार्‍या मोबदल्याच्या प्रमाणातच काम करणे.
107 ज्याचे करावे बरे तो म्हणतो माझेच खरे एखाद्याचे भले करायला जावे तर तो विरोधच करतो व आपलाच हेका चालवतो.
108 जी खोड बाळ ती जन्मकळा लहानपणीच्या सवयी जन्मभर टिकतात.
109 ज्याच्या हाती ससा तो पारधी ज्याला यश मिळाले तो कर्तबगार
110 जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही मूळचा स्वभाव आयुष्यात कधीच बदलत नाही.
111 जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धरी मातेकडून बालकावर सुसंस्कार होतात म्हणून ते भविष्यात कर्तुत्ववान ठरते.
112 झाकली मूठ सव्वा लाखाची व्यंग गुप्त ठेवणेच फायद्याचे असते.
113 टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही कष्ट केल्याशिवाय मोठेपणा मिळत नाही.
114 टिटवी देखील समुद्र आटविते सामान्य क्षुद्र वाटणारा माणूस प्रसंगी महान कार्य करू शकतो.
115 डोळ्यात केर आणि कानात फुंकर रोग एक आणि उपचार दुसराच
116 डोंगर पोखरून उंदीर काढणे प्रचंड परिश्रम घेवूनही अल्प यश प्राप्ती होणे.
117 तंटा मिटवायला गेला गव्हाची कणिक करून आला भांडण मिटविण्याऐवजी भडकावणे.
118 तळे राखील तो पाणी चाखील आपल्याकडे सोपविलेल्या कामाचा थोडाफार लाभ मिळविण्याची प्रत्येकाची प्रवृत्ती असते.
119 ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वाण नाही पण गुण लागला वाईट माणसाच्या सहवासामध्ये चांगला माणूसही बिघडतो.
120 ताकापुरते रामायण आपले काम होईपर्यंत एखाद्याची खुशामत करणे
121 तोंड दाबून बुक्यांचा मार एखाद्याला विनाकारण शिक्षा करणे आणि त्याला त्याबद्दल तक्रार करण्याचा मार्गही बंद करणे.
122 तेल गेले तूप गेले आणि हाती धुपाटणे राहिले फायद्याच्या दोन गोष्टीमधून मूर्खपणामुळे एकही गोष्ट साध्य न होणे.

एमपीएससी मंत्र : कृषिसेवा पूर्वपरीक्षा मराठीची तयारी

MPSC chalu ghadamodi, current affairs-marathi- Mpsc Preparation Tips Mpsc Preparation Tips In Marathi Mpsc Exam 2019 Zws 70

577   04-Dec-2019, Wed

महाराष्ट्र कृषिसेवा पूर्वपरीक्षेच्या मागील प्रश्नपत्रिकांमधील मराठी घटकाच्या प्रश्नांचे विश्लेषण मागील लेखामध्ये करण्यात आले. या विश्लेषणाच्या आधारे मराठी भाषा घटकाची तयारी कशी करावी याबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.

प्रश्नपत्रिकेतील २०० गुणांसाठी १०० प्रश्न ६० मिनिटांमध्ये सोडवायचे आहेत. १०० प्रश्नांमध्ये ३० गुणांचे १५ प्रश्न मराठी भाषा घटकाचे आहेत. पेपरचा स्तर शालांत (दहावी) परीक्षेचा राहणार असल्याचे अभ्यासक्रमामध्ये नमूद करण्यात आले आहे. त्याप्रमाणे योग्य प्रकारे तयारी केली तर हा पेपर आत्मविश्वासाने सोडविता येईल अशी प्रश्नांची काठिण्य पातळी असल्याचे वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यावर लक्षात येते. त्यामुळे १५ पैकी किमान १२ गुण तरी या घटकामध्ये मिळवणे हे चांगल्या गुणसंख्येसाठी आवश्यक आहे. या घटकाची तयारी पुढीलप्रमाणे करता येईल.

* या पेपरच्या अभ्यासक्रमाचे भाषिक आकलन (शब्दसंग्रह, म्हणी आणि वाक्प्रचार व उताऱ्यावरील प्रश्न) आणि व्याकरण (शब्दांचे प्रकार, शब्दांच्या जाती, लिंग, वचन, विभक्ती, सामान्य रूपे, संधी, समास, अलंकार आणि वाक्यरचनेतील काळ, प्रयोग आणि वाक्याचे प्रकार) असे ढोबळमानाने दोन भाग दिसून येतात.

* अभ्यासक्रमामध्ये वाक्यरचना आणि व्याकरण यांचा वेगवेगळा उल्लेख केलेला असल्यामुळे त्यांवरील प्रश्नांची संख्या कमी-जास्त होऊ शकते हे लक्षात घेऊन वाक्यरचना हा भाग जास्त भर देऊन अभ्यासावा लागेल.

* उर्वरित व्याकरणावरील प्रश्नांची तयारी करताना व्याकरणाचे नियम समजून घेणे सगळ्यात महत्त्वाचे आहे.

व्याकरण हा नेमक्या नियमांनी बनलेला घटक असल्याने नियम व्यवस्थित समजून घेतल्यास वस्तुनिष्ठ प्रश्न आत्मविश्वासाने सोडविता येतील. भाषा विषयामध्ये उत्तम गुण मिळवण्यासाठी भावार्थ व शब्दप्रभुत्व कमजोर असल्यानंतर येणाऱ्या मर्यादा येथे कमी प्रमाणात जाणवतील. आणि त्यामुळे चांगली गुणसंख्या मिळवता येईल.

* अभ्यासक्रमामध्ये संधी, समास, अलंकार, शब्दरचना, काळ, वाक्य पृथ:करण अशा बाबींचा स्वतंत्र उल्लेख केलेला नाही. मात्र त्यावर प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्यामुळे व्याकरण या व्याख्येत जे येते त्याबाबत आपल्याला माहिती असणे आणि ही माहिती नेमकी व अचूक असणे हे प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक आहे.

* विभक्ती प्रत्ययांचे कोष्टक, सामासिक शब्दांची उकल, महत्त्वाचे तत्सम, तद्भव आणि देशी शब्द पाठ करावेत आणि त्यांचे नियम व्यवस्थित समजून घ्यावेत. यामुळे अनोळखी शब्द विचारला गेल्यास सामान्यज्ञान वापरून प्रश्न सोडविता येईल.

* वाक्यरचनेचे नियम पक्के माहीत असतील तर वाक्य रूपांतरणाचे प्रश्न नक्कीच सोडवता येतात. काळ आणि प्रयोग यांची उदाहरणे नुसती पाठ करून वस्तुनिष्ठ प्रश्न सोडविता येत नाहीत. त्या त्या काळाची किंवा प्रयोगाची वाक्यरचना, त्यातील कर्ता, कर्म, क्रियापद, अव्यये यांचे स्थान व इतर घटकांशी संबंध व्यवस्थित समजून घेतले तर हे प्रश्न सोडविणे सहज सोपे होते. वाचताना खूप अवघड वाटले तरी रोज एका वाक्याचे सगळ्या काळ आणि प्रयोगात रूपांतर करणे हा सराव करत राहिल्यास नियम पक्के लक्षात राहतील.

* म्हणी व वाक्प्रचार हा या पेपरमधील खूप महत्त्वाचा भाग आहे. यावरील प्रश्न सोडविण्यासाठी अवांतर वाचन आणि सामान्य ज्ञान, व्यावहारिक ज्ञान यांची खूप मदत होते. अवांतर वाचनामुळे भाषेतील म्हणी, वाक्प्रचार वारंवार नजरेखालून जातात आणि त्यांचा समर्पक अर्थही लक्षात येतो व राहतो.

* तयारीच्या काळात अवांतर वाचनासाठी वेळ काढणे काही वेळेस शक्य होत नाही. अशा वेळी म्हणी, वाक्प्रचार यांचे संकलन असलेले छोटेसे पुस्तक किंवा िपट्र आऊट सोबत बाळगावे. अधूनमधून त्यातील म्हणी, वाक्प्रचार वाचून त्यांचा अर्थ समजून घ्यावा.

* समानार्थी / विरुद्धार्थी शब्दांबाबतचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रश्नातील शब्दाचा अर्थ नेमकेपणाने माहीत असायला हवा. मराठीतील शब्दांच्या ऱ्हस्व-दीर्घ वेलांटी, उकारांमधील बदलामुळे तसेच काना, मात्रा, वेलांटीची जागा बदलल्याने शब्दांचे अर्थ बदलतात हे लक्षात ठेवायला हवे. उदा. ‘पाणि’ म्हणजे हात आणि ‘पाणी’ म्हणजे जल.

* एकाच शब्दाचे पूर्णपणे वेगळे असे अर्थ असू शकतात. उदा. ‘वर’ या शब्दाचे पती आणि आशीर्वाद असे अर्थ आहेत. अशा शब्दांचे जास्तीतजास्त अर्थ माहीत असल्यास शब्दार्थाशी संबंधित फसवे प्रश्न आत्मविश्वासाने सोडवता येतील.

* उताऱ्यावरील प्रश्न आतापर्यंत विचारलेले नसले तरी त्यांचा अभ्यासक्रमामध्ये उल्लेख असल्याने त्यांचीही तयारी आवश्यक आहे. यासाठी सराव हाच महत्त्वाचा भाग आहे. प्रत्यक्ष पेपर सोडविताना आधी प्रश्न पाहून मग उतारा वाचावा.

वाचन करतेवेळी प्रश्नाशी संबंधित वाक्ये अधोरेखित करता येतील. जेणेकरून प्रश्न सोडविताना संबंधित वाक्य पटकन सापडेल.

शब्दबोध : चमचा

current affairs, loksatta editorial-Word Sense Spoon Abn 97

1160   01-Nov-2019, Fri

पाणी, दूध अशा द्रव पदार्थात मीठ अथवा साखर यांसारखे विद्राव्य पदार्थ टाकून चमच्याने ढवळल्यास ते चटकन विरघळतात. तसेच स्वयंपाकघरातील एक उपयोगी वस्तू म्हणून आपल्याला चमचा माहीत असतो. परंतु गंमत म्हणजे चमच्याच्या या ढवळण्याच्या क्रियेमुळे त्याला वेगळा अर्थही प्राप्त झाला आहे. एखादी व्यक्ती राजकीय पुढारी, नट-नटय़ा किंवा मोठय़ा, महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींची मर्जी संपादन करण्यासाठी त्यांच्या सतत पुढे पुढे करून त्यांच्या कामात ढवळाढवळ करत असेल तर तिचा ‘अमक्या अमक्याचा चमचा’ असा उपहासाने उल्लेख केला जातो. यालाच अनुसरून पुलंनी माझे खाद्यजीवन या लेखात ‘मानवाची सारी वाटचाल स्वत:च्या हाताने चरणे, चारणे, चिरणे आणि चोरणे या चकारी बाराखडीतून होत होत चम् च:पर्यंत आली आहे’. अशी अत्यंत मार्मिक टिप्पणी केली आहे.

चमचा या शब्दाला खुशामतखोर, हांजी हांजी करणारा, लाळघोटेपणा करणारा असे अर्थ प्राप्त झाले आहेत. पण या व्यतिरिक्त चमचा हे निसर्गातील एका पक्ष्याचेही नाव आहे. इंग्रजीत त्याला स्पून बिल असे म्हणतात. स्पून म्हणजे चमचा आणि बिल म्हणजे चोच. या पक्ष्याची चोच चमच्यासारखी असते म्हणून याचे नाव पडले चमचा. हा स्थानिक पक्षी असला तरी स्थलांतर करूनही येणारा आहे. आपल्या चमच्यासारख्या चोचीने तो ढवळाढवळ करतो, पण ती त्याच्या पोटासाठी असते. मुळात हा पाणथळीचा पक्षी आहे. जलाशयांच्या काठावर वीत-दीड वीत उंचीच्या पाण्यात उभे राहून तो खाद्य शोधतो. त्यासाठी तो चोचीने चिखल ढवळतो व त्यातील किडे, बेडूक इत्यादी जलचर चोचीत पकडून खातो. मात्र त्याची ही ढवळाढवळ इतरांना तसेच निसर्गालाही हानीकारक नसते. खरे पाहता या पक्ष्याच्या चोचीचे नीट निरीक्षण केले तर ती चमच्यापेक्षा एखाद्या पळीसारखी दिसते. पळी म्हणजे आमटी किंवा पिठले, वरण अशासांरखे द्रव पदार्थ वाढण्यासाठी वापरण्यात येणारा खोलगट चमचा. तर पळीला संस्कृतमध्ये दर्वि म्हणतात. आणि या स्पून बिलचे संस्कृत नाव आहे, दर्विमुख किंवा दर्वितुण्ड. ज्यांनी कोणी हे नाव दिले असेल त्यांचे निसर्गाकडे किती बारकाईने लक्ष होते ते पाहा!

म्हणूनच नुसतीच चिखलात ढवळाढवळ करतो म्हणून या पक्ष्याला चमचा म्हणणे जीवावर येते त्यापेक्षा संस्कृतमधले दर्विमुख हे नाव त्याला अधिक शोभून दिसेल नाही का!

एमपीएससी मंत्र : गट क सेवा मुख्य परीक्षा पेपर एक

MPSC, PSI STI ASO - Marathi-Mpsc Exam Preparation Tips In Marathi Mpsc Exam 2019 Zws 70

1481   30-Sep-2019, Mon

मुख्य परीक्षा पेपर एक या पेपरमध्ये मराठी भाषेसाठी ६० तर इंग्रजी भाषेसाठी ४० प्रश्न विचारण्यात आले आहेत. दोन्ही भाषांमध्ये उताऱ्यावरील प्रश्नांची संख्या आहे प्रत्येकी पाच. या पेपरच्या अभ्यासक्रमाचे व्याकरण, आकलन आणि म्हणी-वाक्प्रचार असे तीन भाग आहेत. या तीन भागांची तयारी पुढीलप्रमाणे करता येईल.

व्याकरण

* मराठीतील संधी, समास, विभक्ती, शब्दरचना, वाक्यरचना, प्रयोग, अलंकार, काळ, वाक्य पृथक्करण अशा बाबींचा अभ्यासक्रमामध्ये वेगळा उल्लेख केलेला नसला तरी त्यांवर प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्यामुळे व्याकरण या व्याख्येत जे येते त्याबाबत आपल्याला माहिती असणे आणि ही माहिती नेमकी व अचूक असणे हे प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक आहे.

* इंग्रजीतील वाक्य रूपांतरणाचे प्रश्न वाक्यरचनेचे नियम पक्के माहीत असतील तर नक्कीच सोडवता येतात. मात्र नियम आणि त्यांच्या चौकटी फक्त माहीत असून उपयोगाचे नाही. या नियमांचा वेगवेगळ्या उदाहरणांमध्ये शब्दरचना/ वाक्यरचना करताना कशा प्रकारे वापर करण्यात येतो हे समजून घेणे आवश्यक आहे.

* मराठीतील विभक्ती प्रत्ययांचे कोष्टक किंवा इंग्रजीमधील काळ व प्रयोगांच्या वाक्यरचनेचे कोष्टक पाठच असायला हवेत.

* नियम व्यवस्थित समजून घेणे आणि त्यांचा वेगवेगळ्या उदाहरणांमध्ये वापर करण्याचा सराव करणे हा या भागाच्या तयारीसाठीचा सर्वोत्तम मार्ग आहे.

आकलन

आकलनाच्या बाबतीतले प्रश्न उताऱ्यावरील प्रश्न, समानार्थी/ विरुद्धार्थी शब्द, शब्दार्थ व त्यांचे उपयोजन अशा स्वरूपात विचारण्यात येतात. हे प्रश्न सोडविताना पुढील बाबी लक्षात घ्याव्या.

*     समानार्थी/ विरुद्धार्थी शब्दांबाबतचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रश्नातील शब्दाचा अर्थ नेमकेपणाने माहीत असायला हवा. मराठीतील शब्दांच्या ऱ्हस्व-दीर्घ वेलांटी/ उकारांमधील बदलामुळे तसेच काना/ मात्रा/ वेलांटीची जागा बदलल्याने शब्दांचे अर्थ बदलतात हे लक्षात ठेवायला हवे. उदा. पाणि (हात)- पाणी (जल). इंग्रजीमधील एकसारख्या उच्चाराचे/ स्पेिलगचे पण वेगळे अर्थ असणारे शब्द फसवे किंवा चकवणारे ठरतात. उदा.accept आणि except या शब्दांमध्ये गोंधळ उडू शकतो. त्यामुळे प्रश्नातील आणि पर्यायांमधील शब्द काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहासाठीचा शब्द हा भाग आकलनाचा असला तरी व्याकरणाच्या स्वतंत्र भागातही यावर प्रश्न विचारलेले आहेत.

*     दिलेल्या कोणत्या पर्यायामध्ये एखाद्या शब्दाचा अभिप्रेत असलेला अर्थ समाविष्ट आहे अशा प्रकारे विचारण्यात आलेल्या प्रश्नांमध्ये सूक्ष्म फरक असलेले पर्याय दिलेले असतात. त्यामुळे एखाद्या शब्दाचा नेमका अर्थ आणि त्यापेक्षा जास्त अर्थासाठी तो शब्द वापरला जात असेल तर ते अर्थ माहीत असणे आवश्यक ठरते. यासाठी शब्दसंग्रह वाढणे व पर्यायाने वाचन हा एकमेव मार्ग आहे.

*     उताऱ्यांवर १० गुणांसाठी प्रश्न विचारण्यात येत असले तरी उपलब्ध वेळ, उताऱ्याची लांबी व काठिण्य पातळी यांचा विचार करता वेळेचे नियोजन महत्त्वाचे ठरते. उतारा नीट समजून घेतल्याशिवाय त्यांची योग्य उत्तरे सापडणार नाहीत अशी काठिण्य पातळी असते हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे पहिल्या वाचनातच बहुतांश उतारा समजेल अशा प्रकारे शांतपणे वाचणे आवश्यक आहे.

*     यासाठी आधी प्रश्न पाहून मग उतारा वाचावा. वाचनावेळी प्रश्नाशी संबंधित वाक्ये अधोरेखित करता येतील, जेणेकरून प्रश्न सोडविताना संबंधित वाक्य पटकन सापडेल.

*     उताऱ्याला शीर्षक देणे, लेखकाचा हेतू, उद्देश अशा प्रकारचे प्रश्न याबाबत विचारले जातात. यासाठी एकमेकांशी साधम्र्य दाखवणारे पर्यायच दिले जाण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे गोंधळ उडू शकतो. नकारात्मक गुणपद्धतीचा विचार करता हे प्रश्न खूप काळजीपूर्वक सोडवायला हवेत.

म्हणी व वाक्प्रचार

*     म्हणी व वाक्प्रचार यावरील प्रश्न सोडविण्यासाठी अवांतर वाचन अत्यंत उपयोगी ठरते. तयारीच्या काळात अवांतर वाचनासाठी वेळ काढणे शक्य नसेल तर म्हणी, वाक्प्रचार यांचे संकलन असलेले छोटेसे पुस्तक किंवा पिंट्र आऊट सोबत बाळगायला हवे. त्यातील म्हणी, वाक्प्रचार वाचून त्यांचा अर्थ समजून घ्यायला हवा.

अर्थाची उकल झाली की त्यांचा उदाहरणांमध्ये वापर करणे किंवा केलेला वापर योग्य आहे की नाही हे कळणे सोपे होते.

या पेपरमध्ये व्याकरणाचे नियम सरळसोटपणे वापरून भागत नाही. वाक्याचा नेमका अर्थ समजून घेतल्यावर आणि भाषेतील वेगवेगळ्या अर्थच्छटा माहीत करून घेतल्या तर प्रश्न व्यवस्थित सोडविता येतील. यासाठी वाचन, उताऱ्यावरील प्रश्नांचा सराव आणि व्याकरणाच्या नियमांची उजळणी ही त्रिसूत्री उपयोगी ठरते.

शब्दबोध : रजाचा गज करणे

MPSC chalu ghadamodi, current affairs-Word Sense Eloquence Abn 97

378   29-Sep-2019, Sun

पूर्वीच्या काळी म्हणजे आपल्या आजी-आजोबांच्या काळात मराठी भाषेतील अनेक म्हणी व वाक्प्रचार लोकांच्या तोंडी सहज खेळत असत. त्यातील बहुतेक आता विस्मरणात गेले आहेत. ‘रजाचा गज करणे’ हा त्यातलाच एक वाक्प्रचार.

रज म्हणजे मातीचा कण. गज म्हणजे हत्ती. रजाचा गज करणे याचा शब्दश: अर्थ मातीच्या कणाचा हत्ती करणे असा होत असला तरी व्यवहारात मात्र तो दोन वेगळ्या अर्थाने वापरला जात असे. विद्याधर वामन भिडे यांच्या ‘मराठी भाषेचे वाक्प्रचार व म्हणी’ या कोशात अतिशयोक्ती करणे, छोटीशी गोष्ट मोठी करून सांगणे असे अर्थ दिले आहेत. याच अर्थाचा आणखी एक वाक्प्रचार मराठीत आहे, ‘राईचा पर्वत करणे’. बऱ्याचदा हा वापरलाही जातो.

गुजराथी भाषेत ‘रजनुं गज करवुं’ असा वाक्प्रचार आढळतो. रजाचा गज करणे याचा लहानाचा मोठा करणे, संस्कार करून घडवणे असा दुसरा अर्थ मोल्सवर्थच्या शब्दकोशात आहे. खरे म्हणजे मुलांना वाढवणे व घडवणे या अर्थानेच तो पूर्वी वापरला जाई.

लहान मुले म्हणजे एक प्रकारे मातीचे गोळेच. आई-वडील त्यांचे लालन-पालन करतात, त्यांच्यावर चांगले संस्कार करतात, प्रसंगी स्वत:च्या पोटाला चिमटा घेऊन त्यांची हौस-मौज करतात आणि कधी कधी स्वत:च्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा करून त्यांना उच्चशिक्षण देऊन घडवतात. अशा तऱ्हेने मुलांचा ‘रजाचा गज करतात’. अनंत फंदीचे ‘माधवाख्यान’ नावाचे पेशव्यांच्या कारकीर्दीवरील एक काव्य आहे. त्यामध्येमी केले रजाचे गज आता सोडुनि जाताति मज डोळां अश्रु आले सहज साहेबांच्या तेधवा असे वर्णन आहे. राघोबादादा आणि आनंदीबाई यांनी त्यांची अमृतराव व बाजीराव ही मुले नानांच्या हवाली केली, त्या वेळच्या प्रसंगात राघोबादादांच्या तोंडचे हे वाक्य आहे.

मराठी भाषा इतकी समृद्ध आहे की, प्रत्येक शब्दाला, वाक्प्रचाराला अर्थाचे अनेक पदर येतात आणि प्रत्येक वेळी आपल्याला भाषेची महती कळते.

शब्दबोध : मेहनत

MPSC chalu ghadamodi, current affairs-Mehanat Word Sense Abn 97

274   29-Sep-2019, Sun

मेहनत म्हणजे कष्ट, श्रम याचबरोबर मजुरी, कामधंदा असेही अर्थ शब्दकोशात दिले आहेत. असं असलं तरी खूप प्रयत्न, अभ्यास, रियाझ या अर्थानेही मेहनत हा शब्द वापरला जातो. ‘मेडिकलला प्रवेश मिळवायचा असेल तर फार मेहनत घ्यावी लागते’ किंवा ‘शास्त्रीय संगीतात नाव कमावण्यासाठी गाण्याची मेहनत लागते’, आदी वाक्यांमध्ये मेहनत हा शब्द खूप प्रयत्न किंवा अभ्यास या अर्थाने घेतला जातो.

या शब्दाचा उगम मिहनत या अरबी शब्दातून झाला आहे, असे शब्दकोशात म्हटले आहे. परंतु काही तज्ज्ञांच्या मते, या शब्दाचा एक वेगळा अर्थ उलगडून दाखवण्यात आला आहे. हा शब्द मेह आणि नत या दोन संस्कृत शब्दांपासून तयार झाला आहे. मेह म्हणजे लघवी करणे, मूत्रनिदान असे अर्थ गीर्वाण लघुकोशात आहेत. नत म्हणजे वाकलेला. जिच्यापुढे मेह रोग नत होतो म्हणजेच ज्याच्यामुळे मेह रोगावर विजय मिळवता येतो ती गोष्ट म्हणजे मेहनत. व्यायामामुळे, कष्टामुळे घाम भरपूर येतो आणि मूत्राचे प्रमाण घटते. म्हणून व्यायाम, कष्ट यांसाठी मेहनत शब्द वापरला जातो, असे या तज्ज्ञांचा सिद्धांत सांगतो. ज्या व्याधीत मेहाचे म्हणजेच लघवीचे प्रमाण भरपूर वाढते त्याला प्रमेह म्हणतात. मधुमेह म्हणजे डायबिटिस. या व्याधीत मूत्राचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढलेले असते. आयुर्वेदातील प्रमेह म्हणजेच मधुमेह. मधुमेहात रक्तातील साखरेचे प्रमाण वाढलेले असते आणि मूत्रातही शर्करा असते. जे लोक फारसे कष्ट करत नाहीत, श्रम टाळतात अथवा ज्यांचा व्यवसाय बैठा आहे अशा लोकांना मधुमेह होण्याची दाट शक्यता असते. प्रमेहावर विजय मिळण्यासाठी शारीरिक कष्ट करणे आवश्यक असते. म्हणूनच पूर्वीच्या काळी अशा रुग्णांना व्यवसाय बदलण्याचा सल्ला दिला जाई. त्या दृष्टीने गुरे वळणे, शेतीत राबणे अशी कामे योग्य. चालण्यासारखा उत्तम व्यायाम नाही.

‘चराति चरतो भग:’ म्हणजे चालणाऱ्याचे भाग्य उजळते असे एक सुभाषित आहे. हल्ली अनेकांच्या कामाचे  कामाचे स्वरूप बैठे असते. या व्यक्तींना रक्तदाब, स्थौल्य आणि मधुमेह या व्याधींचा त्रास होऊ नये म्हणून व्यायाम किंवा शारीरिक श्रम अर्थात मेहनत करणे गरजेचे असते. असो मेहनत या शब्दाचा अर्थ शोधताना बरीच मेहनत करून झाली आहे!

गट क सेवा मुख्य परीक्षा सराव प्रश्न

mpsc-group c main exam-preparation-marathi passage

398   29-Sep-2019, Sun

गट क सेवा मुख्य परीक्षेचा संयुक्त पेपर म्हणजेच पेपर एक ६ तारखेला होत आहे. या पेपरमधील मराठी भाषेच्या उताऱ्यावरील प्रश्नांच्या सरावासाठी या लेखामध्ये उतारा आणि प्रश्न देण्यात येत आहेत.

सर्वच सजीव जगाच्या आरंभी सध्या आहेत तसे परमेश्वराने आपल्या अलौकिक सामर्थ्यांने उत्पन्न केले असावेत अशी विचारसरणी अनेक धर्मात प्रकट केली असली, तरी त्याबाबत वैज्ञानिक संशोधन शक्य नसल्याने वैज्ञानिक विवेचनात त्याला महत्त्व किंवा स्थान राहू शकत नाही. याबाबत चार्ल्स डार्वनि यांचे कार्य नमूद करण्यासारखे आहे. विद्यमान जीवोत्पत्ती परमेश्वराने केली नसून सर्व सजीव जैव क्रमविकासाने अवतरले आहेत, या त्यांच्या विधानाविरोधात धर्ममरतडांकडून त्यांना विरोध तर झालाच, शिवाय त्यांचा छळही झाला; पण शेवटी डार्वनि यांचीच विचारसरणी ग्राह्य ठरली.

अवकाशातून एखाद्या उल्केद्वारे प्रजोत्पादक सूक्ष्म कोशिका किंवा तत्सम सजीवाची  एखादी स्थिर अवस्था प्रथम पृथ्वीवर आली असावी किंवा सूर्यप्रकाशाच्या दाबाने आणली गेली असावी व त्यापासून पुढे जीवनिर्मिती झाली असावी, अशी एक विचारसरणी १९०३ मध्ये एस. अरहेनियस यांनी मांडली होती. ती खरी मानली, तर सजीवाला उत्पत्ती नसून इतर काही द्रव्यांप्रमाणे तो चिरकालिक आहे असे मानणे भाग आहे. किरणोत्सर्गी (भेदक कण किंवा किरण बाहेर टाकणाऱ्या) मूलद्रव्यांची उत्पत्ती पाच ते बारा अब्ज वर्षांपूर्वी झाली असून ती सर्वकाल अस्तित्वात नव्हती ही गोष्ट जर खरी असेल, तर सजीव सर्वकाल होते यावर विश्वास बसणे कठीण आहे. बाह्य अवकाशात एका ग्रहावरून दुसऱ्यावर लाखो किलोमीटरांचा प्रवास करून जाण्यास लागणारा काळ व त्यानंतर शेवटी पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करणे यांमध्ये असणारे धोके यांचा विचार केल्यास ज्ञात सजीवांपकी कोणालाही ते शक्य झाले असण्याचा संभव नाही; त्या प्रक्रियेत तो सजीव नाश पावणेच अधिक शक्य आहे, म्हणून अरहेनियस यांची उपपत्ती स्वीकारण्यात आलेली नाही. तिसरी एक विचारसरणी अशी आहे की, पूर्वी अस्तित्वात असलेल्या अकार्बनी (नििरद्रिय) द्रव्यांपासून पहिला सजीव आकस्मिकरीत्या (यदृच्छया) बनला असावा. अर्थात पुढे काही काळ त्याला आसमंतातील अकार्बनी पदार्थावरच पोषण करावे लागून त्याची वाढ झाली असली पाहिजे हे क्रमप्राप्त आहे. पृथ्वीच्या निर्मितीपासून पाच अब्ज वर्षांमध्ये अकार्बनी संयुगापासून एका झटक्यात कोशिकेची निर्मिती होणे असंभवनीय वाटते, कारण अत्यंत साध्या सूक्ष्मजंतूचेदेखील संघटन अत्यंत जटिल असते.

एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी टी. एच. हक्स्ली आणि जॉन टिंडल यांनी अकार्बनी पदार्थापासून जीवोत्पत्ती शक्य आहे असे मत व्यक्त केले होते, तथापि त्याच्या तपशिलाबाबत त्यांच्या कल्पना स्पष्ट नव्हत्या. जीवोत्पत्तीचा उलगडा होण्यास नवीन जीवरसायनशास्त्राची मदत होऊ शकेल, हे विसाव्या शतकाच्या सुरुवातीस सर एफ. गोलँड हॉफकिन्स यांनी दाखविले. त्यानंतर ज्यांनी या समस्येसंबंधी आपली  विचारसरणी पुढे मांडली त्यांमध्ये रशियन शास्त्रज्ञ ए. आय. ओपॅरिन आणि ब्रिटिश शास्त्रज्ञ जे. बी. एस. हॉल्डेन यांचा उल्लेख करता येईल. या दोघांचे म्हणणे असे की, सजीवांनीच उत्पन्न केलेल्या नव्या परिस्थितीमुळे पहिल्या सजीवाच्या वेळेची परिस्थिती नाहीशी झाली व त्यामुळे कार्बनी (सेंद्रिय, जैव) पदार्थापासून सजीवांची उत्पत्ती होणे आता अशक्य आहे.

 

प्रश्न १ – उताऱ्यातील पहिल्या विधानातून पुढीलपकी कोणता/ ते निष्कर्ष काढता येतील?

अ. वैज्ञानिक विवेचन हे संशोधनाच्या आधारावर केले जाते.

ब. परमेश्वराच्या अलौकिक सामर्थ्यांबाबत वैज्ञानिक संशोधन शक्य नाही.

क. सजीवांच्या उत्पत्तीबाबतच्या धार्मिक विचारसारणीचे वैज्ञानिक संशोधन आवश्यक आहे.

पर्यायी उत्तरे

१)  अ आणि ब    २) अ, ब आणि क

३) केवळ अ        ४) केवळ क

 

प्रश्न २ – सजीवांच्या उत्पत्तीबाबत सुष्पष्ट विचारसारणी किंवा सिद्धांत पुढीलपकी कोणी मांडले आहेत असे गृहीत धरता येणार नाही?

अ.      ए.आय.ओपॅरीन

ब.      एफ गोलँड हॉफकिन्स

क.      एस अ-हेनिअस

ड.      जॉन टींडल

पर्यायी उत्तरे

१) अ आणि ब       २) ब आणि क

३) अ आणि क      ४) ब आणि ड

 

प्रश्न ३ – सजीवांच्या उत्पतीबाबत संकल्पना मांडणाऱ्यांचा योग्य कालानुक्रम कोणता?

अ.      धार्मिक विचारसरणी

ब.      अऱ्हेनिअस

क.      हक्सली

ड.      डार्बनि

पर्यायी उत्तरे

१) अ, ब, क, ड     २) अ, ड, ब, क

३) अ, क, ड, ब     ४) अ, क, ब, ड

 

प्रश्न ४ – उत्पत्ती पुढीलपकी कोणत्या घटकांपासून झाल्याची चर्चा उताऱ्यामध्ये करण्यात आलेली नाही?

१)  परमेश्वराचे सामथ्र्य

२) अकार्बनी पदार्थ

३) जैविक रसायने

४) कार्बनी पदार्थ

 

प्रश्न ५ –  सजीवांच्या उत्पत्तीबाबत पुढीलपकी कोणती कल्पना नि:संदिग्ध आहे?

१)      सजीवांचा क्रमिक विकास

२)     अकार्बनी पदार्थापासून जीवोत्पत्ती

३)      आकस्मिक उत्पत्ती

४) सजीवांचे चिरकालिकत्व

 

उत्तरे

प्रश्न क्र.१. – योग्य पर्याय क्रमांक (१)

प्रश्न क्र.२. – योग्य पर्याय क्रमांक (४)

प्रश्न क्र.३. – योग्य पर्याय क्रमांक (२)

प्रश्न क्र.४. – योग्य पर्याय क्रमांक (३)

प्रश्न क्र.५. – योग्य पर्याय क्रमांक (१)


Top

Whoops, looks like something went wrong.