भारतात युरोपियन वसाहतीची सुरुवात - फ्रेंच राज्यसत्ता

European Colonial Rule in India - French

14673   01-Mar-2018, Thu

वास्को-द-गामाचे कालिकत बंदरातील पहिले पाऊल म्हणजेच युरोपियनांच्या व्यापाराला झालेली सुरुवात म्हणावी लागेल. सर्वप्रथम व्यापाराच्यानिमिज्ञ्ल्त्;ााने पोर्तृगीज आले. त्यानंतर त्यांच्या पाठोपाठ डच, इंग्रज, फ्रेच, इ. व्यापारी आले व ते हिंदुस्थानात व्यापार करु लागले. या व्यापारातून त्यांच्यात सज्ञ्ल्त्;ाा स्पर्धेला सुरुवात झाली. त्यातुनच इंग्रज फ्रेंच संघर्षातून कर्नाटकात तीन युध्दे लढली गेली. त्यात अंतिम विजय इंग्रजांना मिळाला व ते सत्तास्पर्धेत यशस्वी झाले. ब्रिटिशांच्या प्रशासकीय व्यवस्थेत आणि धोरणात विविध कायद्यांद्वारे बदल कसे होत गेले. याचा उहापोह या प्रकरणात केला आहे. 


प्लासीच्या युध्दाने इंग्रजांना साम्राज्य विस्ताराची गुरुकिल्ली मिळाली बक्सारच्या युध्दात विजय मिळाल्याने साम्राज्याविस्ताराचा खर्‍या अर्थाने पाया रोवला गेला. र्लॉड वेलस्लीने तैनाजी फौजेला पध्दशीर स्वरूप दिल्यामुळे भारतीय राज्यकर्त्यामध्ये त्याविषयी जे आकर्षण निर्माण झाले त्यातुन अनेक राजे, महाराजे व नबाब यांनी या पध्दतीचा स्वीकार केला.

युरोपियनांचे भारतात आगमन :-


पूर्वी भारतातील माल इराणचे आखात कॉन्स्टॅटिनोपल इटली या खुष्कीच्या मार्गाने युरोपियन देशात पाठवला जात असे. परंतु १४५३ मध्ये तुर्कानी कॉन्स्टॅटिनोपल हे शहर जिंकुन घेतल्यामुळे युरोपियनांचा भारताशी चालणारा व्यापारच बंद झाला कारण तुर्कानी युरोपियन व्यापार्‍यांचा मार्गच अडवून धरला. आता युरोपियनांपुृढे एकच मार्ग होता. तो म्हणजे भारताकडे जाणार्‍या समुद्रमार्गाचा शोध लावणे भारताशी सुरु असलेला व्यापार असा अचानक बंद पडल्यामुळे नेहमी लागणारा व भारतातून येणारा माल दुसर्‍या राष्ट्रांमध्ये मिळणे अशक्य होते. या गरजेतूनच युरोपियन व्यापारी व राज्यकर्ते भारताचा शोध समुद्रमार्गे लागतो का याचा प्रयत्न करु लागले या गरजेतूनच स्पॅनिश राजा राणीच्या मदतीने कोलंबस या धाडसी खलाशाने अटलांटिक महासागर पार करुन भारताकडे जायार्‍या मार्गाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्या या प्रयत्नामुळे तो १४९२ मध्ये अमेरिकेला जाऊन पोहचला म्हणजे त्यास अमेरिका हा नवीन खंड सापडला. पुढे लवकरच पोर्तुगाल या देशास भारताकडे जाणारा मार्ग शोधून काढण्यास यश मिळाले. वास्को-द-गामा हा पोर्तृगीज प्रवासी आफ़्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून २३मे १४९८ रोजी कालिकत बंदरात येऊन पोहोचला. या दिवसापासून भारताच्या इतिहासाला नवीन वळण लागले वास्को-द-गामाचे कालिकत बंदरातील पहिले पाऊल म्हणजे युरोपियन संस्कृतीचे भारतीय किनार्‍यावरील पहिले पाऊल होते.


१६१५ मध्ये इंग्रज राजाचा प्रतिनिधी सर थॉमस रो याने जहांगीर बादशहाकडून प्रथमच व्यापारी सवलती मिळवल्या व त्यानंतर मच्छलीपट्टण, सुरत, मद्रास, कलकज्ञ्ल्त्;ाा, मुंबई इ. अनेक ठिकाणी त्यांनी आपल्या वखारीउभारल्या नफा प्रचंड मिळत असल्यामुळे त्यांचा भारतातील व्यापार सारखा वाढत होता. काही मालाच्या बाबतीत या व्यापार्‍यांना १०० टक्के फायदा मिळत होता. पुढे १७१७ साली विल्यम हॅमिल्टन नावाच्या एका इंग्रज डॉक्टरने मोगल बादशहा फारुक सियर याला एका भयंकर आजारापासून वाचवले या गोष्टीचा फायदा इंग्रज व्यापार्‍यांनी घेतला व बंगालमध्ये जकात मुक्त व्यापार करण्याचे आणि भारतात व्यापाराच्या निमिज्ञ्ल्त्;ााने वखार स्थापन करण्याचे फर्मान मिळविले.

युरोपियन कंपन्यांची सत्तास्पर्धा :-


ब्रिटिश ईस्ट कंपनीतर्फे भारतात आलेल्या व्यापार्‍यांचा उद्देश व्यापार करणे आणि त्यातून जास्तीत जास्त नफा मिळवणे हा होता. पण भारतातही होणार्‍या व्यापारात इंग्रजांना पोर्तृगीज, डच, फ्रेंच, अशा विविध युरोपियन व्यापार्‍यांशी स्पर्धा करावी लागली. त्या वेळी भारतात कार्यरत असणार्‍या डच ईस्ट इडिया कंपनीकडून व फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीकडून जबरदस्त स्पर्धेला तोंड द्यावे लागल्यामुळे ब्रिटिश कंपनीच्या व्यापारावर व नफ्यावर मर्यादा आली. त्याला पर्याय व सर्वोत्तम मार्ग म्हणजे भारतीय व्यापार क्षेत्रातून या स्पर्धेत कंपन्यांना समाप्त करणे होय. भारतात व्यापार करण्याच्या निमिज्ञ्ल्त्;ााने आलेल्या पोर्तुगीजांनी व्यापाराबरोबर राज्यविस्ताराचे व धर्मप्रसाराचे धोरण स्वीकारले म्हणून त्यांच्या सत्तेचा विस्तार भारतात फारसा होऊ शकला नाही. याच सुमारास युरोपात इंग्लडने हॉलंडचा पराभव केल्यामुळे भारतातील डच, व्यापारी निष्प्रभ झाले.


प्लासीच्या युध्दांत इंग्रजांना विजय मिळाला. सिराजउद्दिला याच्या जागी इंग्रजांच्या मदतीने मीर जाफर हा बंगालचा नबाब झाला. दिवसेदिवस इंग्रजांचे वर्चस्व वाढत गेल्यामुळे तो भयभीत होऊ लागला होता. या वेळी बंगालमध्ये इंग्रजांप्रमाणेच डच लोकही व्यापार करीत होते. इंग्रजांच्या वाढत्या प्रभावामुळे त्यांच्या व्यापाराला धक्का बसल्याने ते इंग्रजांचा द्वेष करीत होते. मीर जाफरने त्यांना इंग्रजांविरुध्द भकडावले. त्याचा परिणाम असा झाली की इ.स. १७५९ मध्ये डचांनी इंग्रजांमध्ये निकराचा संघर्ष होऊन त्यात इंग्लंडला विजय मिळाला. डच व इंग्रज यांच्यात तह होऊन डचांनी इंग्रजांवर चढाई न करण्याचे सैन्य न पाठवण्याचे व वखारींची तटबंदी न करण्याची हमी दिली. यांनतर बंगालमध्ये डचांनी पुन्हा डोके वर काढण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. इंग्रजांना आता भारतातील फ्रेंच हेच प्रभावी विरोध करणारे प्रतिस्पर्धी होते.

भारतातील इंग्रज -फ्रेंच संघर्ष :-


व्यापार करता-करता इंग्रज व फ्रेंच कंपन्या भारतीय राजकारणात प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत होत्या. या दोन्ही कंपन्यांचा मुख्य उद्देश व्यापारातून जास्तीत जास्त फायदा करुन घेणे हा होता. भारतातील व्यापारातून आपल्याला जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी इंग्लंड व फ्रान्स यांच्यात जणू स्पर्धाच लागली होती. पण त्यातूनच त्यांच्यात भारतात सज्ञ्ल्त्;ाा मिळविण्यासाठी जो प्रयत्न करण्यात आला त्यातून त्यांच्यात संघर्ष निर्माण झाला.


१७ व्या आणि १८ व्या शतकात इंग्लड व फ्रान्स परस्परांचे कट्टर शत्रू होते. त्यामुळें त्यांच्यात युध्द सुरु झाले की जगाच्या कोणत्याही भागात त्यांच्या कंपन्या एकत्र कार्यरत असल्या म्हणजे त्यांच्यातही युध्द सुरु असे. ऑस्ट्रियाच्या वारसा युध्दापासून भारतात इंग्रज फ्रेच संघर्ष सुरु झाला. फ्रेचंाचे भारतातील मुख्य केंद्र पॉडेचरी असून मछलीपट्टम, कारिकल, माहेृ सुरत व चंद्रनगर ही उपकेंद्रे होती. इंग्रजांनी आपले वर्चस्व मद्रास, मुंबई, व कलकज्ञ्ल्त्;ाा या विभागावर आणि आजूबाजूच्या परिसरात प्रस्थापित केले होते.

पहिले कर्नाटक युध्द (१७४६-१७४८) :-


युरोपात ऑस्ट्रियाच्या वारसा युध्दाचा प्रारंभ झाल्यांवर त्याचाच झालेला विस्तार म्हणजे कर्नाटकाचे पाहिले युध्द होय. आपल्या मूळ देशांच्या आदेशाविरुध्द भारतातील इंग्रज व फ्रेंचांनी १७४६ मध्ये संघर्ष सुरु केला. बारनेटच्या नेतृत्वाखाली इंग्रज आरमाराने फ्रेंचांची काही जहाजे पकडली त्यामुळे पॉंडेचरीचा फ्रेंच गव्हर्नर डुप्ले याने मॉरिशसचा फ्रेंच गव्हर्नर ला बोर्डोकडे मदत मागितली. डुप्लेच्या मदतीला ३००० सैन्यासह ला बोर्डो मद्रासजवळ असलेल्या कोरोमंडळ तटाकडे निघाला. मार्गात त्याने इंग्रजाच्या आरमाराचा पराभव केला. फ्रेंचांनी जल व स्थल अश दोन ठिकाणी मद्रासला घेरले. या युध्दात मद्रासच्या इंग्रजांचा २१ सष्टेंबर १७४६ रोजी पराभव कला फ्रेंचांनी मद्रास जिंकून घेतले.


या प्रसंगी जे इंग्रजयुध्दकैदी पकडण्यात आले त्यात रॉर्बट क्लाईव्हही होता. मद्रासच्या इंग्रजांपासून खंडणी घ्यावी असे ला बोर्डेनिचे मत होते. पण डुप्लेला ते मान्य नव्हते. शेवटी एका मोठया रकमेच्या मोबदल्यात ला बोडॅनि मद्रास पुन्हा जिंकून घेतले. पण पाँडेचरीपासून फक्त १८ मैल दक्षिणेला असलेला सेंट डेविडचा किल्ला त्यास जिंकता आला नाही. अर्थात इंग्रजांनी पाॅंडेचरी जिंकून घेण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रयत्न असफल ठरला.
 

कर्नाटकच्या पहिल्या युध्दातील सेंट टोमेची लढाई महत्वाची समजली जाते. ही लढाई कर्नाटकचा नबाब अन्वरुद्दीन याच्या नेतृत्वाखालील भारतीय सैन्य आणि फ्रेंच सैन्य यांच्यात झाली. मद्रास फ्रेंचांनी घेतल्यापासून हा संघर्ष सुरु झाला आपल्या प्रदेशात दोन्ही परकिय कंपन्या लढत असलेल्या पाहून हा संघर्ष बंद करण्याची व प्रदेशांची शांतता भंग न करण्याची आज्ञम्प्;म्प्;ाा नवाबाने दिली. त्यावर डुप्लेने आपले आश्र्वासन न पाळल्याने आपली मागणी पूर्ण करण्यासाठी नबाबने सैन्य पाठविले. या तुकडीचे नेतृत्व कॅ पॅराडइज याच्याकडे होते. आणि महफूजखानच्या नेतृत्वाखालील १०,००० भारतीय सैनिकांना अडयार नदीजवळ सेंट टोमे येथे पराभूत केले. या विजयामुळे असंघटिक व अप्रशिक्षित भारतीय सैन्याच्या तुलनेत प्रशिक्षित परकिय सैन्याचे श्रेष्ठत्व दिसून आले.


परंतु एक्स-ला शापेलच्या युरोपातील युध्द बंद होताच १७४८ पहिल्या कर्नाटक युध्दाचीही समाप्ती झाली. मद्रास इंग्रजांना पुन्हा परत मिळाले. या युध्दात फ्रेंचांचे श्रेष्ठत्व दिसून आले. डुप्लेची कूटनीती प्रदर्शित झाली. इंग्रजांना पॉंडेचरी जिंकून घेता आले नसले तरी त्यांना आरमाराचे महत्व लक्षात आले.

दुसरे कर्नाटक युध्द (१७४८-१७५४) :-


कर्नाटकच्या पहिल्या युध्दामुळे डुप्लेची राजकीय महत्वाकांक्षा अधिक वाढली. भारतीय राजांमध्ये सुरु असलेल्या संघर्षात भाग घेउन फ्रेंचांचा राजकीय प्रभाव वाढविण्याचा त्याने निणर्य घेतला. या स्थितीचे वर्णन करताना मॅलेसन म्हणतो. महत्वाकंाक्षा जागृत होऊ लागल्या, परस्पर द्वेष वाढू लागले. युरोपियनांना शांततेशी काहीच देणे घेणे नव्हते कारण आकांक्षा पूर्तीसाठी संधी दार ठोठावत होती. ही संधी हैद्राबाद व कर्नाटकच्या निर्वादास्पद वारसांमूळे प्राप्त झाली.


हैद्राबादचा निजाम उल मुल्क आसफजाह याचा मे १७४८ मध्ये मृत्यू झाला त्यांच्यानंतर त्याचा मुलगा नासिरजंग हैद्राबादच्या गादीवर बसला. परंतु त्याला निजाम उल मुल्काचा नातू मुझॅफ्फरजंगने आव्हान दिले. याच वेळी कर्नाटकचा नबाब अन्वरुद्दीन आणि त्याचा मेहुण चंदासाहेब यांच्यात संघर्ष निर्माण झाला. या संघर्षपूर्ण राजकीय स्थितीचा लाभ घेत. मुझफ्फरजंगने दक्षिणेचा सुभेदार आणि चंदासाहेंबास कर्नाटकचा सुभेदार बनविण्यासाठी त्यांना समर्थन देण्याचे डुप्लेंने ठरवले स्वाभाविकच इंग्रजांनी त्यांचे प्रतिस्पर्धी अनुक्रमे नासिरजंग व अन्वरुद्दीन यांचा पक्ष उचलून धरला. एकुण डुप्लेला खूप यश मिळाले. मुझफ्फरजंग चंदासाहेब व फ्रेंच सैन्याचे ऑगस्ट १७४९ मध्ये अंबूर येथे अन्वरुद्दीनचा पराभव करुन त्यास ठार मारले. तसेच डिसेंबर १७५० मध्ये झालेलया एका संघर्षात नासिरजंगसुध्दा मारला गेला. मुझफ्फरजंग दक्षिणेचा सुभेदार बनला व आपल्या समर्थकांना त्याने फार मोठी बक्षिसे दिली. कृष्णा नदीच्या दक्षिणेकडील मोगल प्रदेशाचा गव्हर्नर म्हणून डुप्लेंची नियुक्ती करण्यात आली. या वेळी फ्रेंचांना बराच प्रदेश हैद्राबादला ठेवण्यात आली. चंदासाहेब कर्नाटकचा नबाब बनला. १७५१ डुप्ले या वेळी आपल्या यशाच्या व राजकीय शक्तीच्या शिखरावर होता.


परंतु लवकरच फ्रेंचांसमोर नविन आव्हान उभे राहिले. अन्वरूद्दीनचा मुलगा मुहम्मद अलीने त्रिचनापल्लीला आश्रय घेतला होता. त्यामुळे चंदासाहेब व फ्रेंच सैन्याने त्रिचनापल्लीच्या किल्ल्यास वेढा घातला त्याला शह देण्यासाठी इंग्रजांचा प्रतिनिधी रॉर्बट क्लाईव्ह याने फक्त २१० सैनिकांसह कर्नाटकची राजधानी असलेले अकराट जिंकून घेतले. राजधानी अकराट जिंकून घेण्यासाठी चंदासाहेबाने ४००० सैनिक पाठविले, परतु क्लाईव्हने अकराटचे योग्य पध्दतीने संरक्षण केले. त्यामुळे फ्रेंचांना अकराट जिंकता आले नाही. हा फ्रेंचांच्या प्रतिष्ठेला जोरदार धक्का बसला.


जून १७५२ मध्ये त्रिचनापल्लीला वेढा घातलेल्या फ्रेंच इंग्रजांसमोर शरणागती पत्करली. याच सुमारास चंदासाहेब तंजावरच्या राजाकडून मारला गेला. त्रिपनापल्लीला झालेल्या फ्रेंचांच्या पराभवामुळे डुप्लेचे महत्व कमी झाले. या युध्दात झालेल्या वित्त हानीमुळे फ्रेंच कंपनीच्या संचालकांनी डुप्लेला परत बोलावून घेतले. १७५४ मध्ये गॉडेव्हयूला डुूप्लेंचा उत्तराधिकारी नियुक्त करून भारतातील फ्रेंच प्रदेशाचा गव्हर्नर म्हणून नेमणूक करण्यात आली फ्रेंचांनी इंग्रजांशी पाँडेचरीचा तह करुन हे युध्द समाप्त केले.
एकंदरीत हे युध्द अनिर्णित अवस्थेत संपले. जमिनीवर लढल्या गेलेल्या युध्दांत इंग्रजांचे वर्चस्व राहिले. इंग्रजांनी मुहम्मदअली यास कर्नाटकाच्या नबाब पदी बसवले असे असले तरी हैद्राबाद राज्यात अजूनही फ्रेंचंाची परिस्थिती चांगली होती. मुझफ्फरजंग एका लहानशा संघर्षात मारला गेल्यावर हैद्राबादच्या गादीवर बसलेल्या सलाबतजंगाकडून फ्रेंचांनी बराच प्रदेश जहागीरी म्हणून पदरात पाडून घेतला. ३० लक्ष रु वार्षिक उत्पन्नाचा भू भाग फ्रेंच कंपनीला देण्यात आला. थोडक्यात दुसर्‍या कर्नाटक फ्रेंचांची पिछेहाट झाली तर इंग्रजांची परिस्थिती अधिक दृढ झाली.


तिसरे कर्नाटक युध्द (१७५६-१७६३) :-


१७५६ मध्ये युरोपात इंग्लंड व फ्रान्समध्ये पुन्हा युध्द सुरु झाले. ते सप्तवर्षीय म्हणून प्रसिध्द आहे. त्याचे पडसाद भारतात उमटून इंग्रज फ्रेंच संघर्ष पुन्हा सुरु झाला. फ्रेंच सरकारने ताबडतोब काऊंट लाली यास भारतात पाठविले तो जवळजवळ एक वर्ष प्रवास करीत एप्रिल १७५८ मध्ये भारतात येऊन पोहोचला या दरम्यान सिरोजउद्दीला या पराभव करुन इंग्रजानी बंगालवर आपले नियंत्रण प्रस्थापित केले होते. त्यास इंग्रजांचा जो प्रचंड आर्थिक फायदा झाला, त्याचा उपभोग त्यांनी फ्रेंचांविरुध्द लढण्यास केला.


काऊंट लालीने १७५८ मध्येच पाॅंडेचरी जवळ असलेला सेंट डेविड किल्ला जिंकून घेतला त्यानंतर त्याने तंजावरवर आक्रमण करण्याचा आदेश दिला. कारण तंजावरच्या राजाकडून ५६ लक्ष रुपये घ्यावयाचे होते. परंतु या मोहिमेत अपयश आल्यामुळे फ्रेंचांच्या आरमार आल्यामुळे त्याने हा वेढा उठवला. त्यानंतर लालीने बूसीला हैद्राबाद येथून बोलावून घेतले पण ही त्याची चूक ठरली. कारण त्यामुळे हैद्राबादला फ्रेंचांची स्थिती कमकुवत झाली. दुसर्‍या बाजूला पोकॅाकच्या नेतृत्वाखाली इंग्रज आरमारी तुकडीने डी अ‍ॅशच्या नेतृत्वाखाली असलेल्या फ्रेंच आरमारी तुकडीचा तीन वेळा पराभव करुन त्यांना भारतीय सागरातून परत सेनानी सरआयकूट याने वांदिवाश येथे फ्रेंचांचा जबरदस्त पराभव केला. खुद्द बुसीला युध्दकैदी बनविण्यात आले. युध्दातील या पराभावामुळे फ्रेंच पॉडेंचरीला परत गेले. पण इंग्रजांनी पाँडेचरीलाच वेढा घातला शेवटी आठ महिन्यानंतर फ्रेंचांनी पॉडेचरी इंग्रजांच्या ताब्यात दिले. कर्नाटकाच्या तिसर्‍या युध्दात फ्रेंचांचा अंतिम पराभव झाल्यामुळे हे युध्द निर्णायक सिध्द झाले. १७६३ च्या पॅरिसच्यातहाने सप्तवर्षीय युध्द थांबल्यावर भारतातील संघर्षही संपुष्टात आला. या तहानुसार पॉडेचरी व काही प्रदेश फ्रेंचांना परत मिळाला असला तरी यापुढे फ्रेंचांनी इंग्रजाविरूध्द युध्द करण्याची हिंमत केली नाही. येथून फ्रेंच सज्ञ्ल्त्;ाा भारतात वाढू शकती नाही.

फ्रेंचांच्या भारतीय राजकारणातून झालेला अस्त :-


इ.स. १७८९ मध्ये फ्रेंच राज्यक्रांती यशस्वी होऊन तेथे लोकशाही शासन व्यवस्थेची निर्मिती झाली होती. पुढे याच राज्यक्रांतीतून नेपोलियन बोनापर्ाटचा उदय झाला. त्याने आपल्या कारकिर्दीतचत सर्व युरोपला सळो कि पळो करून सोडले होते. इ.स. १७९८ मध्ये नेपोलियनने इजिप्तवर स्वारी करुन तो देश जिंकलीा तेथून भारतात येऊन इंग्रजांना हाकलून लावण्याचा त्याचा बेत होता. इ.स. १७९८ मध्येच र्लॉड वेलस्ली याने भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून सत्ता आपल्या ताब्यात घेतली होती. युरोपात इंग्रज व फ्रेंच यांच्यातील संघर्षाची त्यास कल्पना होती.


भारतात ब्रिटिश साम्राज्याचा विस्तार करण्यास वेलस्ली जेवढा उत्सूक होता तेवढाच तो नाममात्र शिल्लक राहिलेल्या फ्रेंच सत्तेच्या खाणाखुणा संपुष्टात आणण्यास उतावीळ झाला होता. अनेक देशी संस्थानिकांकडे फ्रेंच लोक सैन्यात काम करीत होते. टिपू सुलतान दौलतराव श्ंिादे व हैद्राबादचा निजाम यांनी कवायती सैन्य ,तोफा, बंदुका व दारुगोळयाची सुसज्ज केल्या होत्या फ्रान्समध्ये नेपोलियनचा उदय झाल्यामूळे आता फ्रेंचांना भारतातून हुसकावून लावून नेपोलियनच्या आफि्रका व आशियातील वाढत्या आक्रमणास पायबंद घालणे. हा उद्देश र्लॉड वेलस्लीने जाहीर केला. निजामाकडे चौदा हजार व शिद्यंाकडे चाळीस हजार फ्रेंच सेना असल्याचा प्रचार करुन त्याने तिचे पारिपत्य करण्यासाठी संचालकांकडून संमती मिळविली. टिपू सुलतान फ्रेंचांच्या नादी लागला म्हणून त्याने चौथ्या इंग्रज म्हैसूर युध्दात त्याचा अंत केला. र्लॉड वेलस्लीने लासवाडी आणि असराईच्या युध्दात दौलतराव श्ंिाद्यांचाही पराभव केला. एवढयावर संतोष न मानता वेलस्लीने फ्रेंचांच्या बंदोवस्तासाठी भारताबाहेरही अनेक कारवाया केल्या जॉन माल्कमला त्याने इ.स. १८०३ मध्ये तेहरान येथे पाठविले. डच लोक फ्रेंचांचे मित्र असल्यामूळे वेलस्लीने त्यांचा जावा व इतर बेटे जिंकून घेण्याचा आणि मॅारिशसवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला इजिप्तमध्ये याच वेळी त्याने सेनापती बेर्यडला एक फौज देऊन पाठविले. परंतु वेलस्लीचे हे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले. वेलस्लीने केलेल्या या उठाठेवींचा एक फायदा झाला. तो म्हणजे फ्रेंचांचा पार निकाल लागला आणि भारतीय राजकारणातून त्यांचे पूर्णपणे उच्चाटन झाले.

आधुनिक जगाचा इतिहास –  २

History of the modern world - 2

5240   04-Feb-2018, Sun

आजच्या लेखामध्ये आपण २०व्या शतकातील आधुनिक जगाच्या इतिहासाकडे पाहणार आहोत. यातील महत्त्वाच्या घडामोडींची विस्तृत चर्चा करून गतवर्षीच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नासह या घटकाची तयारी करण्यासाठी कोणते संदर्भ साहित्य वापरावे याचाही आढावा घेणार आहोत.

या कालखंडात ज्या महत्त्वाच्या घटना घडलेल्या होत्या त्याला तत्कालीन कारणाबरोबरच मागील दोन शतकांतील म्हणजेच १८व्या आणि १९व्या शतकात घडलेल्या काही महत्त्वपूर्ण घटनांची पाश्र्वभूमी होती. विशेषकरून युरोपमध्ये घडणाऱ्या घटनांचा प्रभाव हा संपूर्ण जागतिक व्यवस्थेवर होत असे, कारण २०व्या शतकातील साम्राज्यवादी सत्ता या युरोपमधील होत्या आणि त्यांच्या वसाहती आफ्रिका आणि आशियामध्ये होत्या. तसेच याला १९व्या शतकात झालेल्या युरोपातील काही महत्त्वाच्या घडामोडी उदाहरणार्थ इटलीचे एकीकरण, जर्मनीचे एकीकरण, राष्ट्रवादाचा उदय, पूर्वेकडील प्रश्न, बíलन परिषद आणि आफ्रिका खंडाची साम्राज्यवादी सत्तेमध्ये झालेली विभागणी आणि युरोपातील विविध राष्ट्रामध्ये स्थापन झालेल्या मत्रीपूर्ण युती अथवा करार (Alliances) त्याद्वारे केले जाणारे राजकारण, याचबरोबर अमेरिका, जपान या राष्ट्राची ध्येयधोरणे इत्यादीची योग्य माहिती असल्याखेरीज २०व्या शतकाच्या सुरुवातीपासून ते या शतकाच्या मध्यापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी योग्य पद्धतीने समजून घेता येत नाहीत. मत्रीपूर्ण युती अथवा करार, राष्ट्रवादी विचारसरणीचा वाढता प्रभाव, आक्रमक लष्करवाद, साम्राज्यवादी प्रतिस्पर्धा, बाल्कन युद्धे तसेच तत्कालीन कारण या काही महत्त्वाच्या कारणामुळे पहिल्या जागतिक महायुद्धाची सुरुवात १९१४ मध्ये झाली व हे युद्ध १९१८मध्ये समाप्त झाले. यानंतर पॅरिस शांतता परिषेदतील विविध करारांनुसार पराभूत राष्ट्रांवर अनेक अटी लादण्यात आल्या.

यामध्ये जर्मनी हे महत्त्वाचे पराभूत राष्ट्र होते व जर्मनीला या युद्धासाठी जबाबदार धरण्यात आलेले होते, तसेच या परिषदेमध्ये राष्ट्रसंघाची (League of Nations) स्थापना करण्यात आली. या संघटनेचा मुख्य उद्देश आंतरराष्ट्रीय स्तरावरील विवाद सोडविणे हा होता, याचबरोबर याचदरम्यान रशियन क्रांती होऊन सोव्हिएत युनियनची स्थापन झालेली होती आणि या क्रांतीवर साम्यवादी विचारसरणीचा प्रभाव होता. या विचारसरणीचा वाढता प्रभाव याव्यतिरिक्त दोन जागतिक महायुद्धामधील जग याअंतर्गत इटलीमधील फॅसिस्टवाद आणि जर्मनीमधील नाझीवाद, राष्ट्रसंघ आणि राष्ट्रसंघाचे कार्य आणि राष्ट्रसंघाचे अपयश, जागतिक आíथक महामंदी, अरब राष्ट्रवाद, युरोपमधील हुकूमशाहीचा उदय आणि अंत, ब्रिटिशांचे तुष्टीकरण धोरण व याचे परिणाम, दुसऱ्या जागतिक महायुद्धाची महत्त्वाची कारणे व याचा परिणाम, दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतरचे जग यामध्ये संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना, आशिया आणि आफ्रिकेमधील निर्वसाहतीकरण व यामधून उदयाला आलेले नवीन राष्ट्र व अलिप्ततावादी चळवळ, चीनची क्रांती भांडवलशाही व समाजवादी विचारसरणीचा प्रभाव व अमेरिका आणि सोव्हिएत युनियन या दोन महासत्ताचा उदय व या दोन महासत्तामध्ये जगाची विभागणी, शीतयुद्धाची सरुवात आणि या काळातील महत्त्वाच्या घटना, १९८९मधील सोव्हिएत युनियनचे विघटन व याची कारणे, पश्चिम व पूर्व जर्मनीचे १९९१मध्ये झालेले एकत्रीकरण व याच्या जोडीला अमेरिकेचा एकमेव जागतिक महासत्ता म्हणून झालेला उदय इत्यादी महत्त्वाच्या घडामोडीची योग्य माहिती असणे

गरजेचे आहे. अशा प्रकारे या घटकाची सर्वप्रथम मूलभूत माहिती आपणाला करून घ्यावी लागते, ज्यामुळे या विषयाची एक व्यापक समज तयार होण्यास आपणाला मदत होते.

२०१३ ते २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेमध्ये या विषयाशी संबंधित विचारण्यात आलेले प्रश्न खालीलप्रमाणे होते.

  1. आíथक महामंदीशी सामना करण्यासाठी कोणत्या धोरणात्मक साधनांचा वापर करण्यात आलेला होता?
  2. कोणत्या घटनामुळे १९५६ मधील सुवेझ संकट (Suez Crisis) निर्माण झालेले होते? याने कशाप्रकारे ब्रिटनच्या स्वयंकित जागतिक सत्तेच्या प्रतिमेवर शेवटचा प्रहार केला?
  3. कोणत्या मर्यादेपर्यंत जर्मनीला दोन जागतिक महायुद्धासाठी जबाबदार धरले जाऊ शकते? समीक्षात्मक चर्चा करा.
  4. पश्चिमी आफ्रिकेतील वसाहतविरोधी संघर्षांचे नेतृत्व पाश्चिमात्य शिक्षण घेतलेल्या नवअभिजन वर्गाने केलेले होते. परीक्षण करा.’

उपरोक्तप्रश्न हे संकीर्ण आणि विश्लेषणात्मक या दोन्ही माहितीचा एकत्रित आधार घेऊन विचारण्यात आलेले आहेत. यातील आíथक महामंदीशी संबंधित प्रश्न सोडविताना आपणाला आíथक धोरणांचा मुख्यत्वे विचार करावा लागतो, ही धोरणे नेमकी कोणती होती? या धोरणांच्या परिणामस्वरूप नेमके काय साध्य झालेले होते? अशा पद्धतीने माहिती असावी लागते. तसे या प्रश्नाचे स्वरूप संकीर्ण प्रकारात अधिक मोडणारे आहे, म्हणून येथे फक्त धोरणाची माहिती नमूद करून उत्तर लिहिणे अपेक्षित आहे.

यातील ‘पश्चिमी आफ्रिकेतील वसाहतविरोधी संघर्षांचे नेतृत्व पाश्चिमात्य शिक्षण घेतलेल्या नवअभिजन वर्गाने केलेले होते. परीक्षण करा.’

हा प्रश्न व्यक्तिविशेष प्रकारात मोडणारा आहे. या देशातील महत्त्वाचे व्यक्ती, त्यांची नावे, कार्य, विचारसरणी आणि त्यांनी कशा प्रकारे नेतृत्व केले होते, या सर्व पलूंचा आधार घेऊन या प्रश्नाचे उत्तर लिहिणे अपेक्षित होते. अनेक महत्त्वाच्या मुद्दय़ांवर प्रश्न विचारण्यात आलेले नाहीत, म्हणून या विषयाचा सर्वागीण आणि सखोल अभ्यास करून परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारी तयारी करणे गरजेचे आहे. यासाठी उपरोक्त चच्रेचा फायदा होऊ शकतो.

या घटकाची मूलभूत तयारी करण्यासाठी आपणाला एनसीईआरटीची इयत्ता ९वी ते १२वीच्या शालेय पुस्तकाचा आधार घेता येतो. तसेच याच्या जोडीला या घटकाचा अधिक सखोल पद्धतीने अभ्यास करण्यासाठी राजन चक्रवर्ती लिखित ‘अ हिस्ट्री ऑफ दी मॉडर्न वर्ल्ड’, अर्जुन देव लिखित ‘हिस्ट्री ऑफ दी मॉडर्न वर्ल्ड’ आणि नॉर्मन लोवे लिखित ‘मास्टरिरग मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्री’ या महत्त्वाच्या संदर्भ साहित्याचा वापर करावा.

आधुनिक जगाचा इतिहास – १

History of the modern world - 1

7667   04-Feb-2018, Sun

अभ्यासक्रमामध्ये-अठराव्या शतकातील घटना जसे औद्योगिक क्रांती, जागतिक महायुद्धे, राष्ट्रांच्या सीमारेषाची पुनर्रचना/पुनर्आखणी, वसाहतीकरण व निवर्साहतीकरण, साम्यवाद, भांडवलशाही, समाजवाद यांसारखे राजकीय विचारप्रवाह/तत्त्वज्ञान व त्याचे प्रकारे आणि त्याचा समाजावरील प्रभाव अशा पद्धतीने आधुनिक जगाचा अभ्यासक्रम नमूद केलेला आहे. जो साधारणत: १८व्या शतकापासून आपणाला करावा लागतो.

आधुनिक जगाच्या इतिहासाची सुरुवात साधारणत: १५ व्या शतकापासून समजली जाते. युरोपमधील सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनामध्ये प्रबोधन युगामुळे एक मूलभूत बदल होण्यास प्रारंभ झालेला होता. तर्कशक्ती, बुद्घिप्रामाण्यवाद यांसारख्या तत्वांना अनुसरून विचारप्रक्रियेला सुरुवात झालेली होती. शतकानुशतके अस्तिवात असणाऱ्या परंपरांना चिकित्सक पद्धतीने स्वीकारणे सुरू झालेले होते, ज्यामुळे वैज्ञानिक विचारप्रक्रियेला अधिक चालना मिळालेली होती आणि याच्या परिणामस्वरूप अनेक वैज्ञानिक शोध लावण्यात आलेले होते. याच्या जोडीला अनेक भौगोलिक शोध लावले गेले आणि या शोधामुळे वसाहतवाद आणि साम्राज्यवाद याची सुरुवात झालेली होते. युरोपमध्ये १८व्या शतकामध्ये इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली आणि यामुळे जगाच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनामध्ये आमूलाग्र बदल होण्यास सुरुवात झालेली होती. अनेक राजकीय विचारप्रवाह किंवा तत्त्वज्ञान उदयाला आलेले होते. या राजकीय विचारप्रवाह किंवा तत्त्वज्ञानामध्ये भांडवलवाद, समाजवाद आणि साम्यवाद हे महत्त्वपूर्ण मानले जातात. सद्य:स्थितीमध्येही यांचा प्रभाव दिसून येतो. अशा पद्धतीने एक व्यापक समज आपणाला करून घ्यावी लागते. या विषयाची तयारी करताना आपणाला सर्वप्रथम प्रबोधन युगाची मूलभूत माहिती अभ्यासावी लागते. हा मुद्दा स्पष्टपणे अभ्यासक्रमामध्ये नमूद करण्यात आलेला नसला तरी आपणाला याची माहिती असणे गरजेचे आहे; कारण प्रबोधन युगामुळे युरोपच्या सर्वागीण जीवनशैलीमध्ये एक नवचतन्य निर्माण झालेले होते आणि युरोपचे आधुनिक युगामध्ये रूपांतरण सुरू झालेले होते. आधुनिकतेची नवीन मूल्ये उदयास आलेली होती; ज्यामध्ये मानवतावाद, मुक्त समाज, यांसारख्या मूल्यांना अधिक महत्त्व देण्यात आलेले होते. अशा पद्धतीने थोडक्यात या विषयाच्या पाश्र्वभूमीचे आकलन करून घेणे महत्त्वाचे आहे, ज्यामुळे विषयाची सुसंगत पद्धतीने समज होण्यास मदत होते. या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे व अनेक घटनांची माहिती आपणाला असणे गरजेचे आहे. यातील अनेक घटना (युरोप, अमेरिका, आफ्रिका व आशिया या खंडातील) या समांतर पद्धतीने घडलेल्या आहेत.

आजच्या लेखामध्ये आपण १८व्या आणि १९व्या शतकातील घटनांची माहिती घेणार आहोत आणि यावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाचा आढावा घेऊन याची तयारी कशी करावी याची महत्त्वपूर्ण चर्चा करणार आहोत. या विषयाची तयारी करताना आपणाला साधारणत: युरोप, अमेरिका, आफ्रिका आणि आशिया इत्यादी खंडातील देशामधील १८व्या शतकापासून घडलेल्या महत्त्वाच्या घटना व त्यांचे परिणाम आणि यामुळे घडून आलेले बदल यांसारख्या विविधांगी पलूंची माहिती सर्वप्रथम अभ्यासणे महत्त्वाचे ठरते. १८व्या शतकातील महत्त्वाच्या घटना जसे राजकीय क्रांती-अमेरिकन व फ्रेंच, औद्योगिक क्रांती, वसाहतवाद आणि साम्राज्यवाद, आशिया, आफ्रिका आणि अमेरिकन खंडामधील युरोपियन साम्राज्यवाद, राजकीय विचारप्रवाह किंवा

तत्त्वज्ञान – भांडवलवाद, साम्यवाद, आणि साम्यवाद इत्यादी, तसेच १९व्या शतकातील युरोपातील राज्यक्रांती व राष्ट्रवादाचा उदय. जर्मनीचे एकत्रीकरण व इटलीचे एकत्रीकरण, आधुनिक जपानचा उदय, अमेरिकेतील गृहयुद्ध, इत्यादी महत्त्वाच्या घटना या काळाशी संबंधित आहेत. सर्वाधिक प्रश्न या घटनांना गृहीत धरून विचारले जातात.

२०१३ ते २०१६मध्ये घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेमध्ये उपरोक्त मुद्दय़ांवर विचारण्यात आलेले प्रश्न खालीलप्रमाणे होते.

  1. ‘जपानमधील उशिराने सुरू झालेल्या औद्योगिक क्रांतीमध्ये निश्चित काही असे घटक होते, जे पश्चिमेतील देशांच्या अनुभवापेक्षा खूपच भिन्न होते. विश्लेषण करा.’
  2. ‘युरोपीय प्रतिस्पर्धीयांच्या आक्रमणामुळे आफ्रिकेचे छोटय़ा छोटय़ा कृत्रिमरीत्या निर्मित राज्यामध्ये तुकडे करण्यात आले. विश्लेषण करा.’
  3. ‘अमेरिकन क्रांती हा वाणिज्यवादाच्या विरोधातील आर्थिक उठाव होता. सिद्ध करा.’
  4. सर्वप्रथम औद्योगिक क्रांती इंग्लंडमध्येच का झाली? औद्योगिकीकरणाच्या काळामधील तेथील लोकांच्या जीवनाच्या
  5. गुणवत्तेची चर्चा करा. सद्य:स्थितीमधील भारताच्या जीवन गुणवत्तेशी ती कशी तुलनात्मक आहे?

उपरोक्त प्रश्न हे औद्योगिक क्रांती, साम्राज्यवाद आणि वसाहतवाद या दोन महत्त्वाच्या घटनासंबंधित आहेत. या प्रश्नांचे योग्य आकलन होण्यासाठी साम्राज्यवाद आणि वसाहतवाद हे नेमके काय होते, त्याची सुरुवात कशी झाली, त्यासाठी नेमके कोणते घटक कारणीभूत होते आणि औद्योगिक क्रांतीला वसाहतवाद आणि साम्राज्यवाद यामुळे कसा फायदा झाला, या विषयी सर्वप्रथम माहिती असणे गरजेचे आहे. या सर्व घटनांची योग्य समज आणि आकलन करण्यासाठी आपणाला प्रबोधन युग आणि त्याचे परिणाम म्हणून युरोपमधील समाजजीवनामध्ये घडून आलेले बदल याचा सर्वप्रथम अभ्यास करावा लागतो. त्याशिवाय वसाहतवाद आणि साम्राज्यवाद ही युरोपमधील देशांनी सुरू केलेली प्रक्रिया आणि याअंतर्गत त्यांनी आशिया, अमेरिका आणि आफ्रिका खंडामध्ये वसाहती कशा प्रकारे स्थापन करून साम्राज्यवाद निर्माण केला याचे योग्य आकलन करता येत नाही. अमेरिकन क्रांतीसंबंधीचा प्रश्न समजून घेण्यासाठी सर्वप्रथम वाणिज्यवाद काय होता आणि इंग्लंड या देशाने वाणिज्यवादाद्वारे अमेरिकन वसाहतीची आर्थिक नाकेबंदी कशी केलेली होती, इत्यादीची माहिती असणे गरजेचे आहे. या माहितीचा वापर करून अमेरिकन क्रांती हा वाणिज्यवादाच्या विरोधातील आर्थिक उठाव कशा प्रकारे होता, हे आपणाला सोदाहरण सिद्ध करता येते. हे सर्व प्रश्न विषयाची सखोल माहिती गृहीत धरून विचारण्यात आलेले आहेत.

या घटकाची तयारी करण्यासाठी सर्वप्रथम एनसीईआरटीच्या इयत्ता ९ वी ते १२ वीच्या शालेय पुस्तकांमधून मूलभूत माहिती अभ्यासावी आणि या विषयांचा सखोल अभ्यास करण्यासाठी ‘अ हिस्ट्री ऑफ दी मॉडर्न वर्ल्ड’ हा राजन चक्रवर्ती लिखित संदर्भ ग्रंथ वाचवा तसेच बाजारामध्ये या विषयावर अनेक गाइड्स स्वरूपात लिहिलेली पुस्तकेही उपलब्ध आहेत. 

राज्यसेवा पूर्व परीक्षा – इतिहास

State Services Pre-Examination - History

4768   27-Jan-2018, Sat

विद्यार्थी मित्रांनो, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीप्रमाणे या वर्षी ८ एप्रिलला राज्यसेवा पूर्व परीक्षा घोषित केली गेली आहे. दिलेल्या जाहिरातीनुसार अवघ्या ६९ जागांसाठी महाराष्ट्रातून लाखो विद्यार्थी अर्ज करत आहेत. प्रसंग बाका आहे पण त्यास तेवढय़ाच धर्याने सामोरे जावे लागणार आहे तर अशा वेळी शांत चित्ताने आपल्या अभ्यासाची रणनीती बनवून अगदी नेमका अभ्यास करून राज्यसेवेचा चक्रव्यूह भेदणे क्रमप्राप्त ठरते. परीक्षेला जाता जाता इतिहास या विषयाची तयारी कशी करावी याची या लेखात चर्चा करू.

अभ्यासक्रम:- 

आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी इतिहासाच्या अभ्यासक्रमात ‘भारताचा इतिहास (विशेषत: महाराष्ट्राचा)आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ’ इतक्याच मुद्दय़ांचा स्पष्ट उल्लेख केला आहे, परंतु याच अभ्यासक्रमाची जर आपण फोड केली तर यामध्ये

१. प्राचीन भारत:-

यामध्ये अश्मयुग, ताम्र पाषाण युग, हडप्पा संस्कृती, वैदिक कालखंड, भागवत धर्म आणि त्याचा उदय, महाजनपदे अर्थात मौर्य पूर्व काळ, बौद्ध धर्म आणि जैन धर्म उदय आणि विस्तार, मौर्य साम्राज्य उदय आणि विस्तार, मौर्योत्तर काळ, संगम युग, गुप्त साम्राज्य उदय आणि विस्तार यांचा समावेश होतो.

२. मध्ययुगीन भारत:-

यामध्ये पल्लव, चालुक्य, चंदेल, गहड्वाल, परमार, गुर्जर-प्रतिहार, सेन, कलचुरी, गंग, वर्मन या आरंभिक मध्ययुगीन कालखंडातील प्रादेशिक राजसत्ता आणि त्यांचा राज्यकारभार तसेच चोळ राजे, सुलतानशाही, सुफी आंदोलन व भक्ती चळवळ, विजयनगर साम्राज्य, बहामनी साम्राज्य आणि मुघल सत्ता यांचा राज्यकारभार याचा समावेश होतो.

३. आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास:-

यामध्ये ब्रिटिश सत्तेची भारतामध्ये स्थापना, सामाजिक -सांस्कृतिक बदल, सामाजिक व आíथक जागृती, भारतीय राष्ट्रवादाची निर्मिती व विकास, गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ, स्वातंत्र्योत्तर भारत, महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक त्यांची विचारप्रणाली व काय्रे आणि महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा यांचा समावेश होतो.

४. स्वातंत्र्योत्तर भारत :- 

यामध्ये संस्थानांचे विलीनीकरण, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, भारताच्या नियोजनाचा प्रारंभ, अलिप्ततावादी धोरण, भारत, चीन युद्ध, बांगलादेश मुक्तीसंग्राम आणि भारताची भूमिका तसेच जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरणाचे भारताचे धोरण व त्याचे परिणाम या घटकांचा समावेश होतो.

प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण:-

गेल्या पाच वर्षांतील आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचा जर बारकाईने अभ्यास केला तर खालीलप्रमाणे प्रश्नांचे विभाजन दिसून येईल.

वरील विश्लेषणावरून खालील मुद्दय़ांकडे विशेष लक्ष देणे क्रमप्राप्त ठरते.

१. आधुनिक भारताच्या इतिहासावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांवरील भर कमी कमी होत जाऊन सध्या प्राचीन व मध्ययुगीन काळातील इतिहासावरील प्रश्नांची संख्या वाढत आहे.

२. एकूण १०० प्रश्नांपकी साधारणपणे १५ ते २१ प्रश्न इतिहास या घटकावर विचारले जातात.

साधारणपणे १५ ते २१ प्रश्न इतिहास या घटकावर विचारले जातात.

  २0१३ २0१४ २०१५ २०१६ २०१७
इतिहास(एकूण प्रश्न) १५ १८ २० २१ १५
१.प्राचीन इतिहास 
२.मध्ययुगीन इतिहास
३.आधुनिक इतिहास १० १६
४.स्वांतत्र्योतर इतिहास 0

अभ्यासाची रणनीती:-

राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी असणाऱ्या सर्व विषयांची तुलना केली असता इतिहासाच्या बाबतीत एक गोष्ट ठळक दिसते आणि ती म्हणजे इतिहासाचा अभ्यासक्रम आणि अभ्यासस्रोत तुलनेने अधिक आहेत त्यामुळे नेमका आणि परीक्षाभिमुख अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सुरुवातीलाच नेमका कोणता मुद्दा कोणत्या दृष्टिकोनातून अभ्यासला पाहिजे याचे काही ठोकताळे बांधले पाहिजेत. उदा. प्राचीन भारताचा अभ्यास करायचा असेल तर प्राचीन संस्कृतींच्या उत्खननात सापडलेल्या वस्तू आणि त्यांची ठिकाणे, वैदिक कालीन साहित्य आणि त्यातील वैशिष्टय़पूर्ण उल्लेख, प्राचीन काळातील महाजनपदे आणि सध्याचे प्रदेश, प्राचीन नद्या आणि त्यांची सध्याची नावे इत्यादी तर मध्ययुगीन काळात अस्तित्वात आलेल्या राजसत्ता त्यांचा राज्यकारभार, व्यापार, कला यांच्यावर भर द्यावा लागतो. त्यानंतर आधुनिक कालखंडाचा अभ्यास करताना मात्र ब्रिटिशांचे धोरण आणि त्यास भारतीयांची प्रतिक्रिया अशा स्वरूपाचा अभ्यास करणे अनिवार्य ठरते. या सर्व बाबींचे आकलन होण्यासाठी अभ्यासाची सुरुवात करताना जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करूनच पुढे जावे लागते.

आधुनिक भारताचा इतिहास

Modern India's History

4876   27-Jan-2018, Sat

आधुनिक इतिहासाचा अभ्यास करताना आपण साधारणपणे त्याचे १८१८ ते १९४७ आणि १९४७ पासून पुढे अर्थात स्वातंत्र्यपूर्व भारत व स्वातंत्र्योत्तर  भारत अशा दोन विभागांत विभाजन करू शकतो. या विभागावर आत्तापर्यंत विचारलेल्या प्रश्नांची संख्या साधारणपणे ९ ते १७ प्रश्नांच्या दरम्यान असल्यामुळे या विभागावर साहजिकच अधिक लक्ष देणे क्रमप्राप्त आहे.

महत्त्वाचे घटक व अभ्यासस्रोत

१.  आधुनिक भारताचा विशेषत:

महाराष्ट्राचा इतिहास या विभागावर काही प्रमुख मुद्दय़ांचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. भारतात ब्रिटिश सत्तेची स्थापना, महत्त्वाच्या भारतीय सत्तांविरोधात झालेली ब्रिटिशांची युद्धे, १८५७चा उठाव त्यातील नेतृत्व, त्याची कारणे आणि परिणाम, भारतात प्रबोधनाची सुरुवात करणाऱ्या एकोणीसाव्या शतकातील व्यक्ती (उदा. केशवचंद्र सेन, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, ईश्वरचंद्र विद्यासागर, न्यायमूर्ती रानडे) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना आणि स्थापनेमधील मोलाचे योगदान असणाऱ्या व्यक्ती, काँग्रेसला विरोध करणाऱ्या व्यक्ती, विरोधाची कारणे, ब्रिटिशांची भूमिका, काँग्रेसच्या स्थापनेनंतर उदयास आलेले जहाल आणि मवाळ गट, त्यांची कार्यपद्धती, काँग्रेसची महत्त्वाची अधिवेशने आणि त्यातील महत्त्वाचे निर्णय, मुस्लीम लीगची स्थापना, एकोणीसाव्या व विसाव्या शतकातील काँग्रेसेतर महत्त्वाच्या संघटना, ब्रिटिशांनी अस्तित्वात आणलेले महत्त्वाचे कायदे, त्यातील तरतुदी, ब्रिटिशांची फोडा व झोडा नीती, त्यावर भारतीयांची प्रतिक्रिया, काँग्रेसमधील फूट आणि पुन्हा एकीकरण, स्वदेशी चळवळ, क्रांतिकारी चळवळ, त्यामध्ये अश्फाक उल्ला खान, मदनलाल िधग्रा, जतीन दास, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, सूर्यसेन तसेच कल्पना दत्ता, वीणा दास, प्रीतिलता वड्डेदार, राणी गीडालू अशा क्रांतिकारी स्त्रियांचे योगदान, महात्मा गांधींचे भारतातील आगमन, त्यांचे सत्याग्रहाचे धोरण, असहकार चळवळ, सविनय कायदेभंग चळवळ, चले जाव चळवळ, या चळवळींचे परिणाम, आंबेडकर आणि त्यांची दलितांच्या हक्कासाठीची चळवळ, १९४२ ते १९४७ या कालावधीतील घडामोडी, सुभाषचंद्र बोस आणि त्यांचे कार्य, स्वातंत्र्यप्राप्तीचे १९४७ सालातील महत्त्वाचे टप्पे, ब्रिटिश प्रशासन व्यवस्था व प्रशासनामध्ये योगदान दिलेले महत्त्वाचे गव्हर्नर जनरल, त्यांचे महत्त्वाचे निर्णय तसेच या कालखंडातील महाराष्ट्रातील घटना, महत्त्वाच्या व्यक्ती; त्यांची काय्रे, त्यांनी स्थापन केलेल्या संस्था, समाजसुधारक आणि त्यांचे कार्य या मुद्दय़ांवर प्रश्न विचारले गेले आहेत. तर या विश्लेषणावरून आपल्या एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे आधुनिक कालखंडाचा अभ्यास करताना स्वातंत्र्यप्राप्तीच्या टप्प्यात महत्त्वाच्या व्यक्ती, संस्था, त्यांची काय्रे व ब्रिटिशांचे धोरण आणि त्यास भारतीयांची प्रतिक्रिया या मुद्दय़ांवर प्रश्नांचा भर अधिक असतो.

या विभागाचा अभ्यास करण्यासाठी स्टेट बोर्डाची आधुनिक भारताच्या इतिहासाची माहिती असणारी पुस्तके, आधुनिक भारताचा इतिहास हे ग्रोव्हर आणि बेल्हेकर यांचे पुस्तक तसेच, बिपिन चंद्र यांचे ‘इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेन्डन्स’ हे पुस्तक अभ्यासोपयोगी आहे.

२. स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास:-

या विभागामध्ये घटनानिर्मिती प्रक्रिया आणि त्यामध्ये महत्त्वाच्या नेत्यांची भूमिका, संस्थानांचे विलीनीकरण, त्यातील सरदार पटेल यांची भूमिका, संयुक्त महाराष्ट्र चळवळ; त्यातील महत्त्वाचे नेते, परिषदा, पंडित नेहरू आणि त्यांचे अलिप्ततावादी धोरण, इंदिरा गांधी आणि त्यांचे परराष्ट्र धोरण, १९९१च्या आíथक धोरणाचा भारताच्या समाजावर पडलेला प्रभाव यासाठी बिपीन चंद्र यांचे ‘स्वातंत्र्योत्तर भारत’ हे पुस्तक महत्त्वाचा स्रोत ठरते.

त्याचबरोबर इतिहासाचा अभ्यास करताना २०१७-१८ सालात ज्या घटनांना शतक, द्विशतक, पंच्याहत्तरी, पन्नाशी पूर्ण झाली आहे अशा घटना, गेल्या वर्षभरात सकारात्मक किंवा नकारात्मक कारणाने चच्रेत आलेल्या ऐतिहासिक घटना व त्यांचे परिणाम यांची यादी करून त्यांचा विशेष अभ्यास केल्यास निश्चितच इतिहास या घटकामध्ये आपल्याला जास्तीतजास्त गुण मिळविणे शक्य होईल.

या अनुषंगाने चंपारण सत्याग्रह (१९१७), इंदिरा गांधी (जन्मशताब्दी वर्ष १९१७), चले जाव चळवळ (७५ वष्रे पूर्ण), दादाभाई नौरोजी (१००वी जयंती) हे आणि असे महत्त्वाचे मुद्दे अभ्यासणे नक्कीच उपयोगी ठरेल.

भारताची स्वातंत्र्य चळवळ

independence movement of india

6142   05-Jun-2018, Tue

आजच्या लेखामध्ये आपण आधुनिक भारताअंतर्गत येणारी भारतीय स्वातंत्र्य चळवळ या विषयाची पूर्वपरीक्षेसाठी तयारी कशी करावी, याची चर्चा करणार आहोत. या विषयावर २०११ ते २०१७ मध्ये एकूण ३६ प्रश्न विचारण्यात आलेले होते.

भारतीय स्वातंत्र्य चळवळ या विषयाची तयारी करताना प्रामुख्याने भारतीय राष्ट्रवाद आणि त्याच्या उदयाची कारणे, विविध प्रादेशिक राजकीय संघटना, १८८५ मधील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना आणि येथून पुढे स्वातंत्र्यप्राप्तीसाठी संघटित पद्धतीने सुरू झालेला लढा, त्याचबरोबर राष्ट्रीय चळवळीची सर्वसाधारणपणे तीन टप्प्यांतील विभागणी अभ्यासणार आहोत.

मवाळ अथवा नेमस्त कालखंड (१८८५-१९०५), जहालवादी कालखंड (१९०५-१९१९) आणि गांधी युग (१९२० -१९४७) तसेच याला समांतर असणारे भारतीय स्वातंत्र्य चळवळीमधील इतर प्रवाह. या प्रवाहांमध्ये कामगार चळवळ, क्रांतिकारी चळवळ इत्यादींचा समावेश होतो. याचबरोबर स्वराज पार्टी, आझाद िहद सेना, भारतीय स्वातंत्र्य चळवळीमधील महिलांचे योगदान, भारतीय सांप्रदायिकतेचा उदय, मुस्लीम लीग, हिंदू महासभा, भारतीय संस्थाने व संस्थानामधील प्रजेच्या चळवळी, खालच्या ज्ञातीतील चळवळी, आधुनिक भारताच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण व्यक्ती तसेच गव्हर्नर जनरल (व्हाइसरॉय) आणि भारतमंत्री, १८५७च्या नंतरचे ब्रिटिश संसदेने पारित केलेले कायदे- १८५८, १८६१, १८९१, १९०९, १९१९, १९३५ व १९४७ ज्यांना आपण ब्रिटिशकालीन भारतातील घटनात्मक विकास म्हणून पाहतो तसेच सायमन कमिशन, गोलमेज परिषद, ऑगस्ट ऑफर, क्रिप्स मिशन, वॉवेल प्लॅन, कॅबिनेट मिशन इत्यादीशी संबंधित मूलभूत माहिती असणे गैरजेचे आहे.

गतवर्षीय परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न व त्यांचे स्वरूप

२०११ मध्ये, १९४२ च्या चले जाव चळवळीचे कोणते निरीक्षण सत्य नाही? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यासाठी पर्याय होते

१) ही एक हिंसक चळवळ होती, २) याचे नेतृत्व महात्मा गांधीजींनी केले होते, ३) ही एक उत्स्फूर्त चळवळ होती आणि ४) कामगारांना आकर्षति करून घेता आले नाही असे चार पर्याय दिलेले होते, यातील अचूक निरीक्षण ओळखून योग्य पर्याय निवडायचा होता.

२०१२ मध्ये, भारतीय राष्ट्रीय चळवळीमध्ये दादाभाई नौरोजींचे सर्वात महत्त्वाचे योगदान कोणते होते? हा प्रश्न विचारण्यात आला होता. यासाठी

१) ब्रिटिशांकडून भारतीयांची होणारी आर्थिक पिळवणूक उघड केली, २) प्राचीन भारतीय साहित्याचा अर्थ स्पष्ट करून भारतीयांचा आत्मविश्वास वाढविला आणि ३) काही करण्यापूर्वी सामाजिकदृष्टय़ा दुष्ट प्रवृत्तीचे उच्चाटन करण्याच्या गैरजेवर भर दिला. अशी तीन विधाने देण्यात आलेली होती. यापैकी योग्य विधान/विधाने कोणती हे निवडायचे होते.

२०१३ मध्ये, इलबर्ट बिल कशाशी संबंधित होते? त्यासाठी

१) भारतीयांना शस्त्र बाळगण्यासाठी निश्चित स्वरूपाचे निर्बंध लादणे, २) भारतीय भाषांमध्ये प्रकाशित होणारी वृत्तमानपत्रे आणि मासिकावर निर्बंध लादणे, ३) युरोपियन लोकांवर खटला चालविण्यासाठी भारतीयांना घातलेली अपात्रता काढून टाकणे आणि ४) आयात केलेल्या सुती कपडय़ांवरील कर काढून टाकणे. असे चार पर्याय देण्यात आलेले होते. यातील योग्य पर्याय कोणता असे विचारण्यात आलेले होते.

२०१४ मध्ये, १९२९ चे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन भारतीय इतिहासामध्ये का महत्त्व पूर्ण मानले जाते? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यासाठी

१) स्व-सरकार मिळविणे हे काँग्रेसचे उद्दिष्ट आहे ही घोषणा केली, २) पूर्ण स्वराज मिळविणे हा काँग्रेसचा उद्देश आहे, याची घोषणा केली,

३) असहकार चळवळ सुरू करण्यात आली आणि ४) लंडनमध्ये होणाऱ्या गोलमेज परिषदेत सहभाग घेण्याचा निर्णय घेण्यात आला. असे चार पर्याय देण्यात आलेले होते आणि यातील योग्य पर्याय निवडायचा होता.

२०१५ मध्ये, खालीलपैकी कोणत्या चळवळीमुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विभाजन होऊन मवाळवादी आणि जहालवादी गटांचा उदय झाला? असा प्रश्न होता. त्यासाठी

१) स्वदेशी चळवळ, २) चले जाव चळवळ, ३) असहकार चळवळ आणि ४) सविनय कायदेभंग चळवळ हे चार पर्याय देण्यात आलेले होते. यातून योग्य पर्याय निवडायचा होता.

२०१६ मध्ये, मोत्तेगु चेम्सफोर्ड प्रस्ताव कशाशी संबंधित होता? हा प्रश्न होता. यासाठी १)सामजिक सुधारणा, २) शैक्षणिक सुधारणा, ३) पोलीस प्रशासनातील सुधारणा आणि ४) घटनात्मक सुधारणा असे पर्याय देण्यात आलेले होते. यातील योग्य पर्याय निवडायचा होता.

२०१७मध्ये, बट्लर समिती, १९२९ चा ट्रेड डिस्पुट कायदा, १८८१ चा फॅक्टरी कायदा, तसेच द्विदलशासन पद्धती (ऊ८ं१ूँ८)  इत्यादीवर प्रश्न विचारण्यात आलेले होते.

या विषयाचा अभ्यास करताना आपणाला वस्तुनिष्ठ माहितीचे संकलन, तसेच व्यक्तिविशेष माहिती, विविध चळवळी आणि संबंधित घडामोडी, इत्यादी पलूंच्या आधारे या विषयाचे आकलन करणे गैरजेचे आहे. पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टीने त्या विषयांचे सखोल आणि व्यापक पलू लक्षात घेऊन तयारी करावी लागते. या विषयाची मूलभूत माहिती अभ्यासण्यासाठी बिपीन चंद्र लिखित आधुनिक भारतावरील जुने एनसीईआरटीचे पुस्तक अभ्यासावे. त्यानंतर या विषयाचा अधिक सखोल अभ्यास करण्यासाठी बिपीन चंद्र लिखित इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स, बी. एल. ग्रोवर आणि बी. एस. ग्रोवर लिखित आधुनिक भारताचा इतिहास, सुमित सरकार लिखित आधुनिक भारत इत्यादी संदर्भग्रंथ वाचावेत. या संदर्भग्रंथांवर आधारित स्वतच्या नोट्स तयार कराव्यात, जेणेकरून हा विषय कमीतकमी वेळेमध्ये अभ्यासला जाऊ शकतो.

भारताचा सांस्कृतिक वारसा - २

India's cultural heritag-2

3206   25-Jan-2018, Thu

आधीच्या लेखात आपण प्रजासत्ताक दिनी प्रदर्शित करण्यात आलेल्या काही चित्ररथांची माहिती घेतली. २०१७ साली प्रदर्शित केलेले आणखी काही चित्ररथ आपण बघू.

त्रिपुराची होजागिरी

होजागिरी हा त्रिपुरातील रिआंग जमातीचा (त्यांनाच ब्रु असेही म्हणतात) नृत्यप्रकार आहे. हे नृत्य महिला व तरुण मुलींकडून सादर केले जाते. यात प्रत्येक टीममध्ये ४ ते ६ सदस्य असतात. त्या गायन करतात व त्याचवेळी डोक्यावर दिवा तेवणारी बाटली, हातात फिरत्या पराती यांचा तोल साधतात.

होजागिरी सणाच्या वेळी हे नृत्य केले जाते व त्याला पूरक म्हणून बासरी, झाज यांचे वादन केले जाते. होजागिरी पौर्णिमेच्या दिवशी नवरात्रात साजरा केला जातो. त्याला लक्ष्मीपूजा असेही म्हणतात.

पश्चिम बंगालचा शारदोत्सव

शरद ऋतूच्या सुरुवातीला ग्रामीण बंगालमध्ये पांढरेशुभ्र काशफुल नावाचे गवत हिरव्यागार पार्श्वभूमीवर दिसू लागले, तर समजून जा दुर्गापूजेचा उत्सव जवळ आला आहे. (त्यालाच शरद उत्सव असे म्हणतात) शारदोत्सव फक्त धार्मिक न राहता त्याला आता लोकमहोत्सवाचे रूप प्राप्त झाले आहे. हा एक जगातील मोठा महोत्सव ठरला आहे. कलेची अभिव्यक्ती पूजा मंडपाचा अंतर्भाग व बाह्यभागात सगळीकडे दिसून येते. प्रशिक्षित कलाकारांनी शैलीदार पद्धतीने केलेले हे त्यांच्या कलेचे व पर्यायाने संस्कृतीचे प्रदर्शन असते.

पंजाबचे जागो आईया

शेकडो वर्षांपूर्वी विवाहाचे आमंत्रण निमंत्रणपत्रिकांनी दिले जात नसे. पंजाबी विवाहाच्या आदल्या रात्री 'जागो' हा ऊर्जेने सळसळता व साजसंगीताने नटलेला उत्सवी नाच त्यासाठी केला जाई. एक तेलदिव्याने सजवलेली घागर डोक्यावर घेऊन नृत्य केले जाई व जागो गीते म्हटली जात. वधूवराकडचे नातेवाईक घरोघरी जाऊन लोकांना जागे करत व समारंभात भाग घ्यायचा आग्रह धरत.

हिमाचलचा छम्बा रुमाल

हिमाचल प्रदेशच्या छम्बा नगरात अठराव्या शतकात विकसित झालेला छम्बा रुमाल हा पहाडी कलेचा सर्वोत्तम नमुना आहे. हातशिवणीच्या सॅटीन कापडावर रेशमाची दुहेरी शिवण घातली जाते. ती दोन्ही बाजूला सारखीच दिसते. त्याला 'दोरुखा' असे म्हणतात. या रुमालावर सहसा रासलीला, अष्टनायिका दाखवल्या जातात.

महाराष्ट्रात टिळकजयंती
२०१७ वर्ष हे लोकमान्य टिळकांच्या १६० व्या जयंतीचे वर्ष. राजकारणी, गणिती, पत्रकार, प्राध्यापक, लेखक, वक्ता अशा अनेक जबाबदाऱ्या लोकमान्यांनी लीलया पार पाडल्या. त्यांनी सुरू केले ल्या गणेशोत्सवाला आता १२५ वर्षे पूर्ण होतील.

गुजरातची जीवनशैली

कच्छ हा प्रचंड जिल्हा आपल्या कला व जीवनशैलीबद्दल अवघ्या जगात प्रसिद्ध आहे. १६ विविध प्रकारची कलाकुसर येथे केली जाते. त्यातही रोगण

कला (रोगण म्हणजे तिळाचे तेल वापरून तयार केलेले रंग, या रंगांनी कापडावर सुंदर चित्र काढली जातात), मातीकाम, भुंगा निर्मितीची कला

(भुंगा म्हणजे कच्छच्या वाळवंटात उभारलेली गोल घरे, त्यांच्या आतून व बाहेरून सुंदर नक्षीकाम केले जाते ज्याला भुंगा कला असे म्हणतात) येथली खासियत आहे.


आसामचे कामाख्या मंदिर

गुवाहाटीजवळील नीलांचल टेकड्यांवर वसलेले कामाख्या मंदिर देशातील प्रमुख शक्तिपीठांपैकी एक मानले जाते. अंबूबाची यात्रेच्या काळात येथे भाविकांची गर्दी उसळते. येथे देवीची कुठलीही मूर्ती नाही. त्याऐवजी स्त्रीच्या योनिमार्गासारखी दिसणारी दगडामध्ये गुलाबी झाक असलेली नैसर्गिक चीर आहे. गुहेच्या अंतर्भागातून वाहणारे पाणी त्यातून झिरपत असते. ते स्त्रीच्या रजस्रावासारखे दिसते. असे मानतात की पेरणीच्या वेळी होणारा तो रजस्राव आहे. म्हणूनच जागेचे नाव 'का-माई-खा' म्हणजे रजस्राव होणारी माता असा आहे.

भारताचा लढाऊ वारसा

India's Battlefield Heritage

2385   04-Jun-2018, Mon

स्पर्धा परीक्षांमध्ये भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाबाबत आवर्जून प्रश्न विचारला जातो. युद्ध परंपरेतून आलेल्या सादरीकरणाच्या कला या वारशाचा अविभाज्य भाग बनल्या आहेत.
 

पार्श्वभूमी

प्राचीन काळापासून युद्धात वापरली जाणारी तंत्रे आता मात्र सादरीकरण, विधीनाट्य, तंदुरुस्ती किंवा स्वसंरक्षण या कारणांसाठी वापरली जातात. या लढाऊ परंपरा नृत्य, योग आणि कला सादरीकरणाशीही जवळून जोडल्या गेल्या आहेत. यातील काही परंपरांवर ब्रिटिश काळात बंदी आली होती उदा. कलरीपयट्टू, सिलंबम, थांग टा इत्यादी. पण स्वातंत्र्योत्तर काळात त्या पुन्हा दृश्य झाल्या व लोकप्रिय ठरल्या.

कलरीपयट्टू

शोव्हलिन मास्टर्स, जॅकी चॅन यांचे स्वसंरक्षणपटूत्व (मार्शल आर्ट) आपल्याला चकीत करून टाकते. पण आपल्याला ही कल्पना नसते की, ही कला दक्षिण भारतातून पूर्व आशियात प्रसार पावली. कलरीपयट्टू भारतातील अत्यंत जुन्या अशा लढाऊ परंपरेतील एक आहे.

इ.स.नंतर चौथ्या शतकात केरळमध्ये तिचा उगम झाला. संगम साहित्यात त्याचा उल्लेख आहे. मल्याळम भाषेत कलरी म्हणजे या कलेचे प्रशिक्षण केंद्र. यात द्वंद्व खेळले जाते. (शस्त्रांनी किंवा नुसत्या हातांनी) या शैलीमध्ये लढा देण्यावर इतका भर आहे की, त्याला नगारा किंवा गाण्यांची साथ लागत नाही. कलरीपयट्टूचा भर वेगवान हालचाली व पदलालित्यावर असतो. त्यात लाथा, प्रहार यांचा समावेश असतो. 'अशोका' चित्रपटात याचे दर्शन घडले होते. स्त्रियासुद्धा या लढाऊ कलेत भाग घेतात.

थांग टा आणि सरित सारक

मणिपूरमधील मैतेई जमातीचा हा लढाऊ प्रकार आहे. (शर्मिला चानूपण मैतेईच आहे) थांग टा शस्त्रांनी लढले जाते, तर सरित सारकमध्ये फक्त हातांचा वापर केला जातो. सतराव्या शतकात ब्रिटिशांशी लढण्यासाठी मणिपूरच्या राजांनी या कलेचा वापर करून घेतला होता.

'थांग' म्हणजे तलवार, तर 'टा' म्हणजे भाला. थोडक्यात, तलवार व भाला ही थांग टाची अविभाज्य अंग आहेत. कधीकधी कुऱ्हाड व ढाल यांचाही वापर केला जातो. ढालीवर 'S' आकारातील साप रंगवलेला असतो. यालाच 'हुयेन लांगलोन' असेही म्हटले जाते. (म्हणजे युद्धकला) हे द्वंद्व प्रकाराने लढता येते किंवा एक योद्धा विरुद्ध अनेक किंवा एकाच वेळी अनेक जण यात भाग घेतात. स्त्रियाही यात सहभागी असतात.

चैईबी गड-गा

तलवार व ढाल यांचा वापर करून सादरी केली जाणारी चैईबी गड-गा ही मणिपूरमधील प्राचीन युद्धकला प्रसिद्ध आहे. आता मात्र चामड्याचे आवरण असलेली काठी व ढाल वापरली जाते. सपाट पृष्ठभागावर सात मीटरच्या वर्तुळात ही स्पर्धा भरवली जाते.

घटका

ही पंजाबमधील शिखांनी जोपासलेली शस्त्रसज्ज युद्धकला आहे. सादरीकरणाच्या वेळी दोन योद्धे मोठ्या लाकडी काठ्या घेऊन एकमेकांशी लढतात. मोठमोठी गोल चक्रे फिरवणे हा ही कौशल्याचा एक भाग असतो. आखाड्यांनी ही कला जिवंत ठेवली.

आज होला मोहल्ला या लष्करी कौशल्य दाखवणाऱ्या उत्सवाच्या वेळी याचे सर्वोत्तम सादरीकरण केले जाते. (रंग दे बसंती चित्रपटात त्याची झलक दाखवली होती) बाकी मग लग्नसमारंभ, बैसाखी, स्वातंत्र्यदिन अशा दिवशीही सादरीकरण केले जाते. सादरकर्त्यांना घटकेबाज म्हणतात.

पारी खांडा

राजपुतांनी तयार केलेली ही बिहारमधली युद्धकला आहे. ढाल तलवारीने ही लढाई खेळली जाते. यातील पदचापल्य व तंत्र छाऊ नृत्यातही वापरले जाते. 'पारी' म्हणजे ढाल तर 'खांडा' म्हणजे तलवार.

भारताचा सांस्कृतिक वारसा-१
 

India's cultural heritage1

6515   25-Jan-2018, Thu

भारताचा सांस्कृतिक वारसा या विषयाने स्पर्धा परीक्षांमध्ये महत्त्वाचे स्थान पटकावले आहे. मात्र तो इतका वैविध्यपूर्ण आहे की त्यातील कोणता भाग लक्षात ठेवायचा हे ठरवणे कठीण जाते. यावर एक युक्ती आहे.
 

चित्ररथ प्रदर्शन
दरवर्षी विविध राज्य चित्ररथाच्या माध्यमातून दिल्लीत आपल्या समृद्ध वारशाचे प्रदर्शन करतात. ६८व्या गणराज्य दिनी राजपथावरील परेडमध्ये १७ राज्ये व केंद्र सरकारच्या सहा मंत्रालयांनी आपले चित्ररथ सजवून सहभाग घेतला. त्यात त्यांनी भारताचा संपन्न सांस्कृतिक वारसा आणि सामाजिक-आर्थिक विकास यांची दृश्य मांडणी केली. प्रमुख पाहुणे म्हणून अबुधाबीचे अमीर शेख महंमद बिन झायेद अल नहयान उपस्थित होते. ६८व्या गणराज्य दिनीच्या  चित्ररथांची आपण दोन लेखातून थोडक्यात माहिती घेऊ.

ओडिशाची ढोलजत्रा

ढोल जात्रा हा ओडिशा राज्यातील एक लोकप्रिय सण आहे. तो राधा देवी व भगवान कृष्ण यांच्या भक्ती संप्रदायातील संमेलनाचे प्रतीक आहे. हा सण होळीबरोबरच फाल्गुन-दशमीला साजरा केला जातो. सहा दिवस चालणाऱ्या या उत्सवात राधा व कृष्ण यांचे गुणगान केंद्रस्थानी असते. फाल्गुन-दशमीला ग्रामदेवतांची विशेषतः कृष्णाच्या प्रतिमेची मिरवणूक 'विमान' नावाच्या रथातून घरोघरी नेली जाते. अबीराने माखलेला लोकसमूह गायन-नृत्य करत घरोघरी फिरतो.

अरुणाचलचे याक नृत्य

अरुणाचल मधल्या महायान बौद्ध पंथाचे याक नृत्य हे प्रसिद्ध मूकनाट्य आहे. शेकडो वर्षांपूर्वी एका जादुई पक्षाच्या मदतीने याकचा शोध लागला अशी आख्यायिका आहे. मुखवटा घातलेले नर्तक त्या शोध लावणाऱ्या घराण्याचे प्रतिनिधी असतात. याक ज्याला हिमालयातील उंट म्हटले जाते, तो बहुउपयोगी प्राणी असतो. असे म्हटले जाते की याकच्या शोधामुळे घराघरातील मालमत्तेची अंतर्गत भांडणे सुटली व याकमुळे संपूर्ण समाजासाठी चिरकालीन समृद्धीचा स्रोत निर्माण झाला. या नृत्यामुळे आपल्या आयुष्यातील अस्वस्थता व गुंतागुंत दूर होईल अशी आदिवासींची धारणा आहे. या चित्ररथाला यावर्षीचे (२०१७) सर्वोत्तम चित्ररथाचे बक्षीस मिळाले.

मणिपूर - लोई हारोबा

मणिपूरमधील मैतेई समूहाने प्राणप्रिय जपलेले लोई हारोबा हे जगातील एक जुने विधिनाट्य आहे. या पवित्र नाट्यात संपूर्ण समुदाय पूर्ण भक्तिभावाने सामील होतो. यात स्थानिक देवतांना देश व रहिवाशांना समृद्धी व शांती देण्यासाठी आवाहन केले जाते. या देवता झाडींमध्ये राहतात. या पवित्र समारंभाचे नेतृत्व नृत्य व विधींची तंत्रे अवगत असणाऱ्या मैईबी नावाच्या पुजारीणी करतात. त्या देवतांना झोपेतून जागे करतात. लोकसमूहदेखील या नृत्यात पारंपरिक तंतुवाद्य (पेना) आणि नगारा (लँगडेंग पुंग) घेऊन सहभागी होतात.

तामिळनाडू - काराकट्टम

तामिळनाडूच्या ग्रामीण भागात अम्मान (देवी) मंदिर उत्सवाचा 'काराकट्टम' हे लोकनृत्य अविभाज्य भाग आहे. यात नर्तक डोक्यावर ब्रासचे भांडे घेऊन नृत्य करतात. भांड्याला कोनाच्या आकारात सजवले असते. त्यावर रंगीत फुले व हलक्या लाकडाचा पोपट बसवला असतो. नगाऱ्याच्या तालात भांडे न पाडता लयबद्ध नृत्य हा नजारा दर्शनीय असतो.

कर्नाटक - लोकनृत्य

लोकपरंपरांनी समृद्ध अशा कर्नाटकातील गोरावा नृत्याचे कुरुबा समुदायाकडून सादरीकरण चित्ररथात केले गेले. गोरावा विधिनृत्याने शिवाची उपासना करतात. नर्तक अस्वलाच्या केसांची टोपी घालतात. नगारा व बासरीच्या वादनाने हे नृत्य संपन्न होते. मग तलवारधारी योद्धे नाचात सहभागी होतात.

काश्मीर - हिवाळी खेळ

हिवाळ्यात बर्फाने झाकलेले २६५० मीटर उंचीवर वसलेले गुलमर्ग जागे होते. येथील बर्फातील खेळात भाग घ्यायला सर्व जगातून लोक येतात.

मोहेंजोदारो

mohonjodaro

10637   04-Jun-2018, Mon

'मोहेंजोदारो' म्हणजे मृतांचे शहर. आजच्या पाकिस्तानातील सिंधचे रहिवासी या शहराला मृतांचे शहर म्हणतात. 


पूर्वजांचे देणे

भारतीय इतिहास हा सलग आहे. अगदी सिंधू सभ्यताही त्या अर्थाने आपल्यामधून वाहते आहे. त्यांचा लगोरी हा आवडता खेळ, तंदुरी रोटी, मेंदी व ती लावायचा कोन, लिंगपूजा, योनीपूजा, पक्षपूजा, वृक्षपूजा, स्वस्तिक, सप्तमातृका, पशुपतीसारखा देव, एक्का हे वाहन, त्यांच्या लोककथा (कावळा व कावळ्याच्या तोंडातील मासा हवा असलेला कोल्हा), वळूचे महत्त्व, मोजमापाची पद्धती, व्यापारी कौशल्य हे सगळेच टिकून आहे.

मेलुहाचे चिरंजीव

मिथककथा या उलटसुलट झालेल्या आठवणीच असतात. 'मेलुहाचे चिरंजीव' या अमिश त्रिपाठी यांच्या पहिल्याच कादंबरीने खळबळ उडवली होती. सिंधू सभ्यतेला विषय करत ही कादंबरी नायक शिवाशी जोडते. सिंधूतील लोक स्वतःला काय म्हणत ते माहीत नाही, पण पश्चिम आशियातील लोक त्यांना 'मेलुहा' असे संबोधित. या कादंबरीतील शिवा हा एक व्यक्ती असतो जो पुढे परंपरेत देव म्हणून पूजला जातो. तो तिबेटमधून येतो. सरस्वती नदी आटल्यामुळे व आक्रमणांमुळे मेलुहाचे लोक त्रस्त असतात. शिवा (नीलकंठ) त्यांचा रक्षणकर्ता ठरतो.

चित्रपट की इतिहास

चित्रपट म्हणजे इतिहासावरील माहितीपट नव्हे. कथेला इतिहासाची पार्श्वभूमी वापरली जाते. पण इतिहासाचा तोल सांभाळून कथा उलगडून दाखवण्याचे आव्हान यात असते. 'बाहुबली' ही पूर्ण कल्पित कथा होती, तिथे हे आव्हान नव्हते. लगान, जोधा-अकबर दिग्दर्शित करणाऱ्या आशुतोष गोवारीकरकडून तर जास्तच अपेक्षा असतात. आशुतोषने मेलुहा कादंबरीचा आधार न घेता चित्रपटाने स्वतंत्र कथा निर्माण केली आहे. पण बाहुबली, मेलुहा व स्वतःचीच मोठी प्रतिमा यांच्या पलीकडे जाण्याचे आव्हान चित्रपटाला पेलवलेले नाही. भव्य पार्श्वभूमीवरील हा एक सामान्य चित्रपट आहे.

सिंधू की सरस्वती

चित्रपटात जास्त जोर लोकप्रिय सिंधू प्रतिमेवर दिला असला तरी जास्त शहरे ही सरस्वती नदीच्या काठावर आढळली आहेत. सरस्वतीला आज भारतात घग्गर व पाकिस्तानात हाक्रा असे म्हणतात. मूळच्या विशाल स्वरूपात ही नदी उपलब्ध नाही. पण तिचे अवशेष आहेत. जसे सांबर तलाव, पुष्कर तलाव किंवा भारतातील एकमेव अंतर्गत नदी (जी समुद्राला मिळत नाही) ती म्हणजे राजस्थानातील लुनी. सुरुवातीचे उत्खनन सिंधूवर झाल्याने सिंधू किंवा हडप्पा हे नाव प्रचलित झाले. नुकतेच मोहंजोदारोहून मोठे शहर हरियाणा राज्यात सापडले आहे, ज्याला आज 'राखीगढी' असे म्हणतात.

प्राग इतिहास

चित्रपटाच्या पहिल्याच दृश्यात पूर्व इतिहास अशी माहिती दिली आहे. लेखनकला अवगत नसल्याने लिखित पुरावे सापडत नाहीत अशा काळाला पूर्व इतिहास म्हणतात. अगदी वैदिक संस्कृतीही पूर्व इतिहासात मोडते. कारण आर्य निरक्षर होते. पण सिंधू सभ्यतेतील लोकांकडे लिपी होती. फक्त ती आपल्याला अजून उलगडलेली नाही. अशा काळाला प्राग इतिहास म्हणतात. सिंधू प्राग इतिहास आहे. ती लिपी उलगडली, तर सिंधू सभ्यताही इतिहासाचा भाग बनेल.

प्राथमिक साधनांवर अवलंबन

लिपी वाचन अजून न जमल्याने प्राथमिक साधनांवर (उत्खनन) आपल्याला भर द्यावा लागतो. व्दितीय साधने (साहित्य) उपलब्ध नाही. लिपी मर्यादित अक्षरांची आहे. ती प्रामुख्याने त्यांच्या मुद्रिकांवर आहे व त्या लिपीत मोठ्या लांबीची वर्णने मिळालेली नाहीत. कदाचित ही व्यापारी लोकांनी त्यांच्या व्यवहारांची नोंद ठेवण्याकरता निर्माण केलेली असावी. 


Top