स्वातंत्र्यपूर्व काळात गाजलेली वृत्तपत्रे 

 Newspapers in the pre-independence era

7859   19-Jun-2018, Tue

                                            स्वातंत्र्यपूर्व काळात गाजलेली वृत्तपत्रे

 

क्र. वृपत्राचे नाव संस्थापक
रास्तगोप्तार दादाभाई नौरोजी
न्यू इंडिया बिपीनचंद्र पाल
न्यू इंडिया अँनी  बेझंट
कॉमन विल अँनी  बेझंट
यंग इंडिया महात्मा गांधी
इंडियन ओपीनियन महात्मा गांधी
नवजीवन समाचार महात्मा गांधी
वंदे मातरम अरविंद घोष
इंडियन मजलिस अरविंद घोष
१० अल – हिलाल आझाद
११ इंडियन सोशॅलिस्ट श्यामजी कृष्ण वर्मा
१२ नॅशनल हेरॉल्ड पंडित नेहरू
१३ इंडिपेंडन्स मोतीलाल नेहरू
१४ हिंदू श्री सुब्राह्मण्यम अय्यर
१५ शोमप्रकाश ईश्वरचंद विद्यासागर
१६ पंजाबी लाला लजपत राय
१७ बंगाल हेरॉल्ड राजा राममोहन राय
१८ वंदे मातरम लाला लजपत राय
१९ पीपल लाला लजपत राय
२० वंदे मातरम मादाम कामा
२१ बिहारी वि. दा. सावरकर
२२ संवाद कौमुदी, राजा राममोहन रॉय
२३ बॉम्बे क्रोनिकल फिरोजशहा मेहता
२४ युगांतर व संध्या भूपेंद्र दत्त, विरेंद्र घोष
२५ अमृतबझार पत्रिका शिरीष कुमार घोष
२६ बंगाली सुरेंद्रनाथ बॅनर्जी
२७ कॉम्रेड, हमदर्द मोहम्मद अली
२८ गदर लाला हरदयाळ
२९ प्रबुद्ध भारत डॉ. बाबासाहेब आंबेडकर
३० रिव्होल्युशनरी सच्चीन्द्रनाथ सन्याल
३१ इंडिया सुब्रमण्यम भारती

महाराष्ट्राचा इतिहास
 

history of maharashtra

6358   16-Jun-2018, Sat

मौर्य ते यादव :-
इ.स.पू. २२० ते इ.स. १३१०

मौर्य साम्राज्याचा काळ:-
महाराष्ट्राचा कोकण विभाग हा प्राचीन काळांत मौर्य साम्राज्याच्या (इ.स.पू. ३२१-१८४) हिस्सा होता. या काळात महाराष्ट्राने भरभराटीचा व्यापार आणि बौद्धधर्माचा विकास पाहिला. पण मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासाबरोबर महाराष्ट्रावरील मौर्य सत्ता संपुष्टात आली, आणि या प्रदेशावर निरनिराळ्या घराण्यांची सत्ता प्रस्थापित होऊ लागली.

सातवाहन साम्राज्याचा काळ:-
सातवाहन हे महाराष्ट्राचे पहिले ज्ञात राजघराणे होय. त्यांचा काळ इ.स.पू. साधारणतः २२० ते इ.स. २२५ पर्यंतचा मानला जातो. अर्थात या कालखंडाबाबत मतभेद आहेत. प्रतिष्ठान अथवा पैठण ही त्यांची राजधानी आणि सिम्मुक सातवाहन हा या घराण्याचा मूळ पुरुष. महाराष्ट्राच्या राजकीय. सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने सातवाहनांचा कालखंड हा अतिशय महत्त्वाचा गणला जातो. सातव्या शतकातील हाल राजाने महाराष्ट्री प्राकृत भाषेत संकलित केलेले गाथासप्तशती हे काव्य ही सातवाहनांची साहित्याला मोठी देणगी. हिंदूंचा शालिवाहन शक सातवाहनांनीच सुरू केला.

वाकाटकांचा काळ:-
वाकाटक (इ.स. २५० ते ५२५) राजांनी विदर्भ आपल्या वर्चस्वाखाली आणला होता. वाकाटक काळात राजाश्रयामुळे महाराष्ट्राची साहित्य, कला आणि धर्म या क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती झाली. अजिंठ्याची १६, १७, १९ या क्रमांकांची लेणी ही वाकाटक काळातील आहेत. भित्ति-चित्रांची कला या काळात अतिशय विकसित झाली होती.

कलाचुरींचा काळ:-
वाकाटकांनंतर कलचुरी राजघराण्याने इसवी सनाच्या सहाव्या शतकात महाराष्ट्राच्या काही भागांवर राज्य केले. महिष्मती ही त्यांची राजधानी होती.

बदामी चालुक्य आणि कल्याणी चालुक्यांचा काळ:-
वाकाटकांचे महत्त्वाचे राजघराणे म्हणजे चालुक्यांचे. महाराष्ट्राचा भूप्रदेश त्यांच्याकडे इ.स. ५५० ते ७६० आणि इ.स. ९७३ ते ११८० या दोन कालखंडांत होता. जयसिंह हा या घराण्याचा संस्थापक आणि बदामी ही त्याची राजधानी. त्रैमहाराष्ट्रिकाचा स्वामी आणि या घराण्याचा सर्वश्रेष्ठ राजा दुसरा पुलकेशी याने नाशिक येथे आपले महत्त्वाचे ठाणे केले होते. चालुक्य राजे हिंदू धर्माचे अभिमानी होते त्यांनी मंदिरे बांधण्याच्या कामी मौलिक कामगिरी केली होती.

वाकाटक, चालुक्य व राष्ट्रकूटांचा काळ:-
वाकाटकांच्या(इस.२५०-५२५) राज्यात विदर्भ समाविष्ट झाला. या कालखंडात कला, धर्म व तंत्रज्ञानात प्रगती होत गेली. सहाव्या शतकात बदामीच्या चालुक्यांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता आली. दंतिदुर्ग या राष्ट्रकूट राजाने इ.स. ७५३ च्या सुमारास चालुक्यांचा पराभव केला आणि गुलबर्गा जिल्ह्यातील मान्यखेत (मालखेड) आपली राजधानी बनविली. कल्याणी शाखेच्या तैलप चालुक्याने इ.स. ९७३ च्या सुमारास राष्ट्कूटांची सत्ता संपुष्टात आणून चालुक्यांची राजवट दुसऱ्यांदा प्रस्थापित केली. वेरूळ येथील जगप्रसिद्ध कैलास लेणे हे पहिला कृष्ण या राष्ट्रकूट राजाने बांधले.

महाराष्ट्राच्या काही भागावर कल्याणीच्या चालुक्यांची सत्ता इ.स.११८९ पर्यंत टिकली. यादवांनी त्यांचा पराभव केला व इ.स. १३१०पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. गोव्याचे कदंब, कोकण आणि कोल्हापूर येथील शिलाहार राजे हे चालुक्य आणि राष्ट्रकूट यांचे मांडलिक म्हणून राज्य करीत होते. यादवांनी त्यांची सत्ता संपुष्टात आणली. यादवांनी महाराष्ट्राचा बराचसा भाग आपल्या आधिपत्याखाली आणला होता.

 यादव राजांनी धार्मिक सहिष्णुतेचे धोरण अवलंबिले होते. त्यांनी मराठी भाषेला राजाश्रय दिला आणि तिला राजभाषेचा दर्जा प्राप्त करून दिला. भक्तिसंप्रदायाचे उद्‌गाते आणि महाराष्ट्राचे सर्वश्रेष्ठ संतकवी ज्ञानेश्वर महाराज हे याच यादव काळात उदयास आले.

नवव्या शतकात नाशिक जिल्ह्यांतील चांदोर या ठिकाणी यादवांची पहिली राजधानी होती. इ.स. ११८७ च्या सुमारास भिल्लम राजाने ती देवगिरी येथे आणली.

भारतातील क्रांतीकारी चळवळ भाग २

India's Revolutionary Movement Part 2

2465   12-Jun-2018, Tue

बंगाल व इतर प्रांतांतील क्रांतिकार्य :-

 • महाराष्ट्र्राप्रमाणेच बंगालही क्रांतिकारकांचे महत्वाचे केंद्र होते.
 • स्वातंत्र्यासाठी सशस्त्र संघर्षाच्या कल्पनेने भारलेल्या तरुणांनी तेथे अनुशीलन समिती नावाची गुप्त संस्था स्थापन केली.
 • अशीच एक संस्था कलकत्ता यातही निघाली. दुष्टांचे निर्दालन करणारी कालीमाता हे या तरुणांचे दैवत होते, समितीतर्फे तरुणांना लाठयाकाठयांचे शिक्षण देण्यात येई. तरुणांमध्ये लढाऊ बाणा यावा हा त्यामागील उद्देश होता.
 • डाक्का अनुशीलन समिती व कलकत्ता अनुशीलन समिती यांच्या शाखा प्रामुख्याने बंगालमध्ये सर्वदूर पसरल्या होत्या आणि त्यांचे शेकडोंच्या संख्येने सदस्य होते.
 • अरविंद घोष यांचे बंधू वीरेंद्रकुमार घोष आणि स्वामी विवेकानंदांचे बंधू भूपेंन्द्रनाथ दत्त यांचा बंगालमधील क्रांतीकार्यात महत्वाचा वाटा होता.
 • वीरेंद्रकुमार घोष यांनी युगांतर वृत्तपत्राद्वारे बंगालमध्ये देशभक्ती जागृत करण्याचे कार्य केले. त्या वेळी बंगालमध्ये अनेक क्रांतिकारी संस्था गुप्तपणे कार्यरत होत्या.
 • र्लॉड कर्झन यांनी बंगालची फाळणी केल्यावर बंगालमध्ये असंतोषाचा प्रचंड भडका उडाला.  
 • हेमचंद्र दास आणि उल्हास दत्त यांनी बाँब बनवण्याची कला अवगत करुन घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कलकत्याच्याजवळ बॉब तयार करण्याचे कार्य सुरु झाले.
 • या बाँबचा पहिला प्रेयोग पूर्व बंगाल प्रांताचा पहिला नायब राज्यपाल मुस्लिमांना झुकते माप देणारा जॉन बाम्फिल्ड फुल्लर याच्यावर करण्यात आला, पण त्यात यश मिळाले नाही.
 • या व्यतिरिक्त अनेक ब्रिटिश अधिकार्‍यांना ठार करण्यात आल्याने सरकार खडबडून जागे झाले. अशाच एका प्रयत्नात खुदीराम बोस पकडले जाऊन त्यांना फासावर लटकवण्यात आले. या वेळी अनेकांना पकडण्यात आले.
 • सर्वांवर अलिपूरच्या न्यायालयात खटला चालवण्यात आला. तो अलिपूर खटला या नावाने प्रसिध्द आहे.
 • या खटल्यातील सरकारी वकील आशुतोष विश्र्वास व पोलिस अधिकारी शम्स ललम या दोघांचाही न्यायालय परिसरातच हत्या करण्यात आली.
 • या खटल्याच्या निमित्ताने बंगालमधील क्रांतिकारकांच्या गुप्त कार्याची माहिती मिळाल्याने सरकार अतिशय अस्वस्थ झाले.
 • कारण क्रांतिकारकांचे गुप्त जाळे दूरवर विणले गेले होते आणि त्यांच्यामार्फ़त परदेशातही शस्त्रास्त्रे पाठवली जात होती.
 • अलिपूर खटल्यानंतर कलकत्ता याच्या अनुशीलन समितीचे कार्य बरेच थंडावले पण ढाक्का येथील अनुशीलन समितीतर्फे बंगालमधील तरुणांना देशकार्यासाठी उत्तेजित करण्याचे, शस्त्रास्त्रे निर्माण करण्याचे कार्य सुरुच होते.
 • महाराष्ट्र्र आणि बंगालप्रमाणे पंजाबमध्येही क्रांतिकार्य सुरु होते.
 • तेथील गुप्त क्रांतिकारी संस्था लाला हरदयाळ यांच्या मार्गदर्शनाखाली चालत होती,  या कार्याला लाला लजपतराय यांचा आशीर्वाद होता.
 • पुढे 1911 मध्ये लाला हरदयाळ अमेरिकेत गेल्यावर पंजाबमधील त्यांचे कार्य रासबिहारी बोस यांनी चालवले.
 • दक्षिण भारतात पाॅंडेचरी हेही क्रांतिकारकांचे महत्वाचे केंद्र होते. उत्तर प्रदेशातही प्रामुख्याने वाराणसी येथे क्रांतिकारकांचे कार्य सरु होते.
 • 1909 मध्ये अहमदाबाद येथे व्हाईसरॉय र्लॉड मिंटो आणि त्यांची पत्नी बग्गीतून जात असता त्यांच्यावर बाँब फेकण्यात आला. त्यातून ते दोघेही बचावले.
 • 1912 मध्ये व्हाईसरॉय र्लॉड हार्डिंग यांच्यावरही दिल्लीत बाँब फेकण्यात आला. त्यात हार्डिंग जखमी झाले.

भारताबाहेरील क्रांतीकारी चळवळ :-

 • भारताबाहेर ज्यांनी क्रांतिकार्य केले त्यात शामजी कृष्ण वर्मा यांचा महत्वाचा वाटा आहे. ते 1897 मध्ये लंडनला स्थायिक झाले.
 • परदेशात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या भारतीय तरुणांना शामजी कृष्ण वर्मा शिष्यवृत्ती देत.
 • या निमित्ताने देशभक्त तरुणांना एकत्र आणून राष्ट्रवादी गट तयार करणे हा त्यांचा उद्देश होता.
 • त्याद्वारे शामजी भारतीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करत असत. शामजी कृष्ण वर्मा यांचे लंडनमधील घर पुढे इंडिया हाऊसम्हणून प्रसिध्द पावले. हे घर म्हणजे क्रांतिकारकाचे केंद्र होते.
 • ब्रिटिश सरकारवर टीका करणार्‍या लिखाणामुळे शामजींकडे सरकारची वृष्टी वळली. म्हणून शामजी वर्मा पॅरिसला गेले आणि तेथे क्रांतिकार्य करु लागले.
 • त्यांच्या अनुपस्थितीत लंडनचे केंद्र स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांभाळले. शामजी वर्मांकडून शिष्यवृत्ती घेऊन सावरकर इंग्लंडमध्ये आले होते.
 • त्यावेळी इंडिया हाऊसमध्ये क्रांतिकारकांचा जो संच निर्माण झाला, त्यांपैकी एक मदनलाल धिंग्रा होते.
 • जुलै 1909 मध्ये धिंग्रा यांनी भारतात राहिलेल्या साम्राज्यवादी मनोवृत्तीवरच्या कर्झन वायली नावाच्या इंग्रज अधिकार्‍यावर लंडन येथे गोळया झाडल्या, त्यामुळे इंग्लंड सरकार अस्वस्थ झाले.
 • भारतातील क्रांतिकार्याचे जाळे दूरवर प्रत्यक्ष इंग्लंडच्या राजधानीतही विणले गेलेले पाहून इंग्लंड सरकार सावध झाले आणि ताबडतोब इंडिया हाऊसवर डोळे रोखले गेले कर्झन वायलीचा खून करण्याच्या आरोपाखाली मदनलाल धिंग्रा फाशी गेले.
 • सावरकरांना नाशिक खटल्यांत गुंतवून अटक करण्यात आली त्यांची रवानगी भारतात केली गेली.
 • भारताबाहेरील क्रांतिकार्यात गदर चळवळीचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे. ही चळवळ अमेरिकेत लाला हरदयाळ यांनी चालवली.
 • यापूर्व लालाजींनी भारतात असतांना लाहोर येथून क्रांतिकार्य करण्याचा प्रयत्न केला. पण ब्रिटिश सरकारची करडी नजर असल्याने त्यांना यश मिळू शकले नाही.
 • म्हणून 1911 मध्ये लाला हरदयाळ अमेरिकेत आले. त्याआधीच नागपूरचे डॉ. पा. स. खानखोजे अमेरिकेत आले होते, त्यांचे संघटन लाला हरदयाळ यांनी केले.
 • लालाजींनी अमेरिकेत गदर नावाचे साप्ताहिक सुरु केले. त्यावरुनच अमेरिकेतील क्रांतिकारी गटाचे कार्य गदर चळवळ म्हणून ओळखले जाऊ लागले.
 • या चळवळीला बर्‍याच अमेरिकनांची सहानुभूती होती.
 • अमेरिकेत कार्याच्या दृष्टीने अनेक ठिकाणी शाखाही स्थापन झालेल्या होत्या.
 • जवळच्या कॅनडातही गदर चळवळीच्या शाखा होत्या आणि शेकडो तरुण सदस्य होते.
 • पुढे ब्रिटिश सरकारचे लक्ष या कार्याकडे गेल्यावर लाला हरदयाळांना पकडण्यात आले. पण जामिनावर सुटका होऊन ते स्वित्झर्लंडमध्ये निघून गेले.
 • 1914 मध्ये पहिले महायुध्द सुरु झाले तेव्हा परदेशातील क्रांतिकारकांच्या कार्यावर ब्रिटिश सरकारची करडी नजर असल्याने ते शक्य झाले नाही गदर गटाने इंग्लंडच्या शत्रुशीही संर्पक साधला.
 • विशेषत: शक्तिशाली जर्मनीची मदत मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यासाठी लाला हरदयाळ स्वित्झर्लंडमधून जर्मनीत आले होते.
 • त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन जर्मनीने शस्त्रास्त्रे आदी मदत करण्याचे कबूल केले, त्या दृष्टीने भारतात फार मोठे कारस्थान रचले गेले जे लाहोर कट म्हणून प्रसिध्द आहे.
 • जर्मनीने भारतावर हल्ला चढवावा आणि त्याच वेळी भारतात घुसलेल्या क्रांतिकारकांनी ब्रिटिशांविरुध्द सशस्त्र उठाव करावा, शिपायांनी लढयास सुरुवात करावी अशी योजना होती.
 • पण सरकारच्या सर्तकतेमुळे व फितुरी झाल्याने लाहोर कट अपयशी ठरला, याशिवाय विष्णू पिंगळे व अनेकांना जन्मठेप झाली.
 • येथूनच भारतातील क्रांतिकारी चळवळ मागे पडत गेली.

 

 

क्रांतिकारक क्रांतीकार्य
चाफेकर बंधू 1897 साली पुण्याचा प्लेग कमिशनररैंड याची हत्या
स्वा.वि.दा. सावरकर 1904 साली नाशिक येथे अभिनवभारत संघटनेची स्थापना
अनंत लक्ष्मण कान्हेरे 1909 साली नाशिक येथे जॅक्सनची हत्या
बारींद्रकुमार घोष संघटनेला क्रांतिकारक विचार, सल्ला व मार्गदर्शन
अरविंद घोष संघटनेला क्रांतिकारक विचार, सल्ला व मार्गदर्शन
खुदीराम घोष प्रफुल्ल चाकी 1908 साली किंग्जफोर्ड ला ठार करण्याचा प्रयत्न
रासबिहारी बोस र्लॉड हार्डिंग्जवर बाँब फेकण्याचे घाडसी कृत्य व जपानला पलायन क्रांतिकार्य चालू ठेवले
वांची अयर अ‍ॅश या ब्रिटिश अधिकार्‍याची हत्या
श्यामजी कृष्ण वर्मा इंडिया हाऊसची स्थापना
मादाम कामा जागतिक समाजवादी परिषदेत भारताचा ध्वज फडकावला
मदनलाल धिंग्रा कर्झन वायली या इंग्रज अधिकार्‍याला ठार केले.
लाला हरदयाळ, भाई परमानंद. डॉ खानखोजे भारताबाहेर गदर पक्ष्याची स्थापना गदर पक्षात सकि्रय सहभाग
विष्णू गणेश पिंगळे 1915 साली गदर कटात सहभाग
वीरेंद्रनाथ चटटोपाध्याय, भूपेन दत्त हरदयाळ बर्लिनमध्ये ब्रिटिशविरोधी कारवाया
महेंद्रप्रताप काबूलमध्ये स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारची स्थापना
चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिलागेश चटर्जी, मच्छिंद्रनाथ सन्याल, शफाक उल्लाखान, रोशनसिंग राजेंद्र लाहिरी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएनशची स्थापना, काकोरी कटात सहभाग
भगतसिंग, राजगुरूागतसिंग, बटुकेश्र्वर दत्त साँडर्सची हत्या संसदेत बॉम्बस्फोट ?
सूर्य सेन, नंतसिंग गणेश घोष, कल्पना दत्त चितगाव कटात सहभाग
प्रीतिलता वडडे्दार ब्रिटिश अधिकार्‍यांच्या क्लबवर गोळीबार
शांती घोष चौधरी कोमिल्लाच्या जिल्हा मॅजिस्ट्रेटची हत्या
बीना दास कलकत्ता विदयापीठाच्या पदवीदान समारंभात गर्व्हनरवर गोळया झाडल्या.

भारतातील क्रांतीकारी चळवळ भाग १

India's Revolutionary Movement Part 1

3208   12-Jun-2018, Tue

 • 1857 चा उठाव अयशस्वी झाल्यावर ब्रिटिशांविरुध्द सशस्त्र संघर्षाचा मार्ग भारतीयांनी सोडून दिला.
 • भारतात राष्ट्रवाद मूळ धरू लागला होता. त्याचेच पर्यावसन म्हणजे राष्ट्रीय सभेची स्थापना होय.
 • 1885 मध्ये स्थापन झालेली राष्ट्रीय सभा सुरुवातीला नेमस्तपंथीय होती. पुढे बदलत्या परिस्थितीमुळे ती जहालवादी बनू लागली.
 • राणीच्या जाहीरनाम्यातील आश्र्वासने ब्रिटिशांनी पाळली नाहीतच, उलट भारतीय जनतेची आर्थिक पिळवणूक सुरु ठेवली.
 • ब्रिटिशांच्या धोरणामुळेच आपला देश दरिद्री बनला हे भारतीयांना कळून चुकले.
 • ब्रिटिशांचे वर्णद्वेशाचे धोरणही भारतीयांना जाचक ठरु लागले. उच्च परीक्षा उत्तीर्ण करुनही भारतीयांना प्रशासनात घेतले जात नव्हते.
 • ब्रिटिश साम्राज्य भारतावर हजारो वर्षे चालणार अशी भाषा इंग्रज वापरत. अर्थात उन्मत राजसत्तेचे ते प्रताप होते. या सर्व अन्यायाची, अत्याचाराची हकीकत जनतेला नेत्यांकडून, वृत्तपत्रांतून कळत होती.
 • केसरी, मराठा, न्यूइंडिया, टि्रब्यून, इत्यादी वृत्तपत्रे, तसेच बंकिमचंद्र चेपाध्यय, रवींद्रनाथ टागोर, इत्यादीच्या साहित्यातून भारतीय जनतेला वेळोवेळी मार्गदर्शन मिळत होते.
 • तरुण वर्ग जहालवादाकडे झुकू लागला. तरुणांचा एक गट क्रांतिकारी मार्गाकडे वळला.
 • विशेषत: एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात भारतात दुष्काळाने व प्लेगाने प्रचंड थैमान घातले असता ब्रिटिशांनी जनतेप्रती जे सहानुभूतीशून्य धोरण अवलंबले, त्यामुळे अनेक तरुणांचे माथे भडकले.
 • जहालवादी आणि दहशतवादी क्रांतिकारी यांचे ध्येय एकच होते ते म्हणजे भारतमातेला परकीय दास्यांच्या शृखंलेतून मुक्त करणे. मात्र त्यांच्यात साधनांची, मार्गांची तफावत होती. जहालवादी विचारसरणीत हिंसेला स्थान नव्हते.
 • केवळ ब्रिटिश अधिकार्‍यांना ठार करुन देशाचे स्वातंत्र्य मिळणार नाही. असे त्यांचे मत होते.
 • असे असले तरी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणार्‍या दहशतवादी क्रांतिकारकांच्या कार्याबद्दल जहालवाद्यांना सहानुभूती होती, हिसेने, पाशवी बलाने निर्माण झालेले साम्राज्य त्याच मार्गाने खुडून फेकणे शक्य आहे, नव्हे तोच मार्ग योग्य आहे अशी क्रांतिकारकांची धारणा होती. एखाद्या ब्रिटिश अधिकार्‍याला ठार मारुन मूळ प्रश्न सुटणार नाही हे क्रांतिकारकांनाही मान्य होते पण निर्माल्यवत बनलेल्या देशाला खडबडून जागे करण्यासाठी असे वध उपयुक्त ठरतील ही त्यांची श्रध्दा होती.
 • प्रखर राष्ट्रनिष्ठ व त्यांच्या विचारांचा आधार होता. म्हणूनच देशासाठी प्राणार्पण करणे, हुतात्मा बनणे, इत्यादी गोष्टी क्रांतिकारकांना अभिमानास्पद वाटत होत्या.

वासुदेव बळवंत फडके यांचे कार्य :-

 • भारतातील क्रांतिकार्याची सुरुवात वासुदेव बळवंत फडके यांनी केली. म्हणूनच त्यांना आद्य क्रांतिकारक म्हणतात.
 • वासुदेव बळवंताचा जन्म 1845 मध्ये झाला.
 • रेल्वे खात्यात नोकरीला असल्यामुळे त्यांच्या ब्रिटिश नोकरशाहीशी जवळून संबंध आला.
 • ब्रिटिश प्रशासकीय अधिकार्‍यांच्या उद्दाम, उर्मट व अपमानास्पद वागणुकीमुळे तरुण वासुदेवांचे रक्त खवळून उठले. त्यातूनच त्यांच्या मनात जाज्वल्य देशभक्तीचे स्फ़ुलिंग प्राज्वलित झाले.
 • अशा स्थितीत आपल्या आईला भेटण्यासाठी वासुदेव बळवंत फडकेंनी रजा मागितली. ती नाकारल्याने त्यांनी नोकरीचे त्यागपत्र दिले.
 • त्याच क्षणी ब्रिटिशांची अत्याचारी राजवट उलथून पाडण्याचा निर्धार वासुदेव बळवंतांनी केला.
 • 1857 चा संघर्ष होऊन फार कालावधी लोटला नव्हता.
 • संघर्षाच्या हकिकती ऐकून वासुदेव बळवंत रोमांचित होत.
 • ब्रिटिशांशी झुंज देणार्‍या तात्या टोपे व झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्याबद्दल त्यांना नितांत आदर होता.
 • आपणही असेच काहीतरी केले पाहिजे असे फडके यांना मनोमन वाटत होते. याचा सुमारास महाराष्ट्र्रात भयंकर दुष्कार पडला. सर्वसामान्य जनतेचे हाल होऊ लागले.
 • अशा परिस्थितीत वासुदेव बळवंत फडके ब्रिटिश राज्यकर्त्याविरुध्द भाषणे देऊन जनतेला जागृत करण्याचा प्रयत्न करु लागले. परंतु त्यांना अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नाही.
 • या मार्गाने यश मिळत नाही असे दिसताच वासुदेव बळवंत फडक्यांनी पश्चिम महाराष्ट्र्राचा दौरा करुन, तेथील रामोशांना संघटित करण्याचे कार्य केले.
 • ब्रिटिश साम्राज्याबरोबर टक्कर द्यायची म्हणजे शस्त्रास्त्रे आवश्यक होती आणि त्यासाठी पैसा पाहिजे होता. म्हणून वासुदेव बळवंत फळके यांनी रामोशांच्या साहाय्याने धनिकांवर दरोडे टाकण्यास प्रारंभ केला. म्हणूनच काही लोक त्यांना दरोडेखोर म्हणू लागले.
 • पण हे दरोडे पोटासाठी नसून देशासाठी होते हे विसरता कामा नये. रामोशांच्या साहाय्याने तारायंत्र उद्ध्वस्त करणे.
 • तुरुंगावर हल्ले करुन कैद्याना मुक्त करणे व त्यांना आपल्या कामात घेणे, दळणवळण यंत्रणा निकामी बनवणे असे कार्य वासुदेव बळवंत फडके यांनी सुरु केले.
 • ब्रिटिश सरकारच्या मार्गात होता होईल तितके अडथळे निर्माण करणे हा त्यामागील हेतू होता. पण त्याचबरोबर वासुदेव बळवंत गोरगरिबांना मदत करत असल्याने त्यांना परमेश्र्वर मानले गेले.
 • हळूहळू त्यांच्या कार्यात महत्व सरकारच्या नजरेत आले. म्हणूनच वासुदेव बळवंतांना पकडण्यासाठी बक्षीस लावले गेले.
 • त्याला प्रत्युत्तर म्हणून वासुदेव बळवंत फळके यांनी असे जाहीर केले की, मुंबईचे गव्हर्नर रिर्चड टेंपल यांचे शीर कापून आणणार्‍यांस अधिक बक्षीस दिले जाईल.
 • अनेक दिवस प्रयत्न करुनही सरकारला वासुदेव बळवंतांचा पज्ञ्ल्त्;ाा लागला नाही. शेवटी 27 जुलै 1879 रोजी डॅनियल नावाच्या ब्रिटिश अधिकार्‍याने त्यांना पकडण्यात यश मिळवले.
 • त्या वेळी वासुदेव बळवंत आजारी असल्याने एका मंदिरात असाहाय्य अवस्थेत होते.
 • पुण्याच्या न्यायालयात त्यांच्यावर खटला भरण्यात आला. त्या वेळी फार मोठा जनसमुदाय तेथे उपस्थित असे.
 • जनतेने स्वयंस्फूर्तीने वासुदेव बळवंत फडक्यांच्या सुटकेसाठी पैसा गोळा केला.
 • परंतु अखेर ब्रिटिश सरकारने वासुदेव बळवंतांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावून त्यांना दूर एडनच्या तुरुंगात ठेवले.
 • तुरुंगांत वासुदेव बळवंतांचे अतोनात हाल करण्यात आल्याने त्यांची प्रकृती बिघडली आणि 1883 च्या फेब्रुवारीमध्ये या महान देशभक्ताची प्राणज्योत मालवली.

कुका आंदोलन :-

 • महाराष्ट्र्रात वासुदेव बळवंत फडके यांनी क्रांतिकार्य केले, तसेच कार्य पंजाबमध्ये रामसिंह कुका यांनी चालवले.
 • ब्रिटिशांच्या दडपशाहीची चीड येऊन रामसिंह कुकांनी लष्करी नोकरी सोडून दिली. आणि एका धार्मिक संप्रदायाची स्थापना केली.
 • पण ब्रिटिशविरोध रोमरामात भिनलेल्या रामसिंह कुकांचे मन धर्मकार्यात गुंतून पडले नाही. परिणामी त्यांच्या संप्रदायाचे रुपांतर लवकरच एका क्रांतिदलात झाले.
 • ठिकठिकाणी आपले अनुयायी पाठवून रामसिंह कुकांनी जनतेत, विशेषत: सैन्यात ब्रिटिशविरोधी भावना भडकवण्याचे कार्य केले. त्याचबरोबर ठिकठिकाणाहून शस्त्रास्त्रे गोळा केली.
 • ब्रिटिश साम्राज्याविरुध्द कार्य करायचे असल्याने रामसिंह कुकांचे हे कुका आंदोलन अतिशय गुप्तपणे सुरु होते.
 • अखेर या आंदोलनाची माहिती सरकारला मिळालीच प्रचंड प्रमाणावर धरपकड करण्यात येऊन कुका आंदोलन पुर्णपणे चिरडून टाकण्यात आले.
 • कुकांच्या अनुयायांना मृत्यूदंड देण्यात आला आणि स्वत: रामसिंह कुकांना ब्रम्हदेशात हद्दपार करण्यात आले.
 •  तेथेच 1885 मध्ये त्यांचा अंत झाला.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे क्रांतिकार्य :-

 • एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात दुष्काळ व प्लेगने संपूर्ण महाराष्ट्र्राला भयभीत करुन टाकले.
 • मात्र जनता जास्त भयभीत झाली ती ब्रिटिश अधिकार्‍यांच्या दडपशाहीने.
 • प्लेगचा रोगी लपवून ठेवला जातो या कारणाखाली सरकारी कर्मचारी घराघरांत घुसून शोधकार्य करत असत. या दंडेलीतून स्त्रियांही सुटल्या नाहीत.
 • देवघरात घुसून जनतेच्या धार्मिक भावनाही दुखावल्या गेल्या. ब्रिटिशांची ही खबरदारी म्हणजे रोगापेक्षा औषध जालीम असा प्रकार ठरला. परिणामी लोक संतापले.
 • या वातावरणात 22 जून 1897 रोजी पुण्याचे प्लेग अधिकारी रॅंड व आयर्स्ट यांचे खून झाले. जनतेच्या प्रक्षोभाचे ते प्रतीक होते.
 • या खुनाबद्दल दामोदर, बाळकृष्ण व वासुदेव या चाफेकर बंधूंना सरकारने फासावर लटकवले. या घटनेने संपूर्ण देश विस्मयचकित झाला, तसा जागृतही झाला. स्वत: लोकमान्य टिळकांनी रॅड वधाचे नैतिक समर्थन केले.
 • वरील घटनेपासून स्फूर्ती घेऊन विनायक दामोदर सावरकर यांनी 1900 मध्ये नाशिक येथे मित्रमेळा नावाची संस्था स्थापन केली.
 • पुढे 1904 मध्ये या संस्थेचे नाव अभिनव भारत असे ठेवले. शास्त्राशिवाय स्वातंत्र्य नाही. अशी सावरकरांची विचारसरणी होती.
 • महाराष्ट्र्रात व महाराष्ट्र्राच्या बाहेरही अभिनव भारताच्या शाखा निघाल्या.
 • इटलीचा देशभक्त स्वातंत्र्यवीर मॅझिनी यांच्या चरित्राचा मराठीत अनुवाद सावरकरांनी केला.
 • मॅझिनीचे आदर्श भारतीयांसमोर ठेवावे म्हणजे त्यातून देशकार्याची प्रेरणा मिळेल, असा त्यामागे सावरकरांचा उद्देश होता.
 • 1906 मध्ये सावरकर इंग्लंडला गेले व तेथून भारतातील क्रांतिकारकांना गुप्तपणे पिस्तुले काडतुसे पुरवू लागले.
 • त्यांच्या अनुपस्थितीत अभिनव भारताचे कार्य त्यांचे वडील बंधू गणेशपंत सावरकर चालवत असत. या वेळी देशासाठी बलिदान करण्याची तयारी असलेल्या तरुणांनी महाराष्ट्र्रात व महाराष्ट्र्राच्या बाहेरही अनेक गुप्त संस्था चालवल्या होत्या, त्यांच्याशी अभिनव भारत संस्थेचा संर्पक होता.
 • इंग्लंडमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कार्य जोरात सुरु होते.
 • 1907 मध्ये 1857 च्या संघर्षाला 50 वर्षे पूर्ण झाली. तेव्हा संघर्ष म्हणजे भारतीय स्वांतत्र्य संग्राम होय. असे परखड प्रतिपादन सावरकरांनी केले.
 • 1908 मध्ये लंडन येथे सावरकरांजवळून काही आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करुन त्यांना अटक केली. त्यांना भारतात घेऊन येणारे जहाज फ्रान्सच्या मर्सेलिस बंदरात येताच सावरकरांनी सागरात उडी मारुन निसटण्याचा प्रयत्न केला.
 • त्यांच्या पाठोपाठ इंग्रज शिपायांनी सागरात उडया घेतल्या. सावरकर पोहतपोहत किनार्‍यावर आले आणि फ्रेंच शिपायांना फ्रांन्समध्ये संरक्षण मिळण्याबाबत समजावून सांगू लागले.
 • परंतु त्यांची भाषा फ्रेंच शिपायांच्या लक्षात येईना. तेवढयात इंग्रज शिपायांनी सावरकरांना पुन्हा अटक केली. भारतात आल्यावर नाशिक खटल्याबाबत त्यांना दोनदा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
 • स्वातंत्र्यवीर सावरकरांचे इंग्लंडमधील क्रांतिकार्य लक्षात घेऊन त्यांच्या गणेशपंत या वडीलबंधूंवर नाशिक येथे सरकारची करडी नजर होती.
 • 1908 मध्ये त्यांच्याजवळ बरीच आक्षेपार्ह कागदपत्रे सापडली.
 • सरकारने ताबडतोब गणेशपंतांवर खटला चालवून त्यांना जन्मठेपेच्या शिक्षेखाली अंदमानात पाठवले. यामुळे नाशिकमधल्या क्रांतिकारी गटाने ब्रिटिश अधिकार्‍यांवर दहशत बसवण्याचा निश्चय केला.
 • अभिनव भारताच्या अनंत कान्हेरे नावाच्या सदस्याने नाशिकचे कलेक्टर जॅक्सन यांचा वध केला.
 • नाशिक कटाच्या खटल्यात कान्हेरे, कर्वे व देशपांडे या नाशिकच्या क्रांतिकारकांना फाशिची शिक्षा देण्यात आली.
 • याच नाशिक खटल्यात गोवून स्वातंत्र्यवीर सावरकरांनाही दोन वेळा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. शिक्षा भोगण्याइतका तू जगशील का? अशा अर्थाचा सवाल विचारणार्‍या तुरुंगाधिकार्‍याला सावरकरांनी बाणेदार उत्तर दिले तोवर ब्रिटिश साम्राज्य तरी टिकेल का ? सावरकर बंधूंनी स्वातंत्र्यासाठी केलेले प्रयत्न, सावरकरांची सागरातील उडी, अंदमानच्या तुंरुंगात त्यांनी भोगलेल्या यमयातना या सर्व घटनांमुळे भारतीय जनतेत स्वातंत्र्याची जबरदस्त उर्मी निर्माण झाली.

नेहरू रिपोर्ट 1928

nehru report 1928

2912   12-Jun-2018, Tue

 • भारतात सायमन कमिशनवर बहिष्कार टाकला जात असता व त्याचे सारखे निषेध होत असता भारतमंत्री लॉर्ड बर्कनहेड त्या कमिशनचे समर्थन करीत होते. असेच समर्थन करीत असता त्यांनी भारतीय नेत्यांना आव्हान दिले की, भारतीय राजकीय संघटनांनी एकत्र येऊन भारताची भावी घटना कशी असावी याविषयी एकमताने मसुदा तयार करून सरकारकडे द्यावा. सरकार तो पार्लमेंटकडे पाठवेल.
 • लॉर्ड बर्कनहेड यांची अशी कल्पना होती की, भारतीय राजकीय संघटनांत व नेत्यांत एकमत होणे केवळ अशक्य आहे; परंतु त्याची कल्पना चुकीची ठरली. भारताने ते आव्हान स्वीकारले व काँग्रेस, मुस्लीम लीग, हिंदू महासभा इत्यादि राजकीय संघटनांची सर्वपक्षीय परिषद मुंबईत डॉ. अन्सारी यांच्या अध्यक्षतेखाली 19 मे 1928 रोजी भरविण्यात आली.
 • भारताची भावी घटना कोणत्या तत्वानुसार निर्माण व्हावी हे ठरविण्यासाठी परिषदेने पं. मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केली. या समितीत सर तेजबदूर सप्रू, सर अली इमाम, बापूसाहेब अणे, सुभाषचंद्र बोस इत्यादि व्यक्ती घेण्यात आल्या.
 • समितीने मोठ्या परिश्रमाने देशातील राजकीय व घटनात्मक समस्यांचा अभ्यास व चर्चा करून आपला अहवाल तयार केला. समितीने मध्यबिंदू गाठला. साम्राज्यांतर्गत स्वराज्य भारताला लगेच मिळावे व नंतर लगेच दुसरी पायरी पूर्ण स्वातंत्र्यांची असावी असे समितीने निश्चित केले.
 • नेहरू रिपोर्टवर चर्चा करण्यासाठी कलकत्ता येथे सर्वपक्षीय सभा भरली (डिसेंबर 1928). मुस्लीम लीगच्या वतीने बॅ. जीनांनी अनेक दुरुस्त्या मांडल्या, जवळ-जवळ त्या सर्व फेटाळण्यात आल्या. मुस्लिमांच्या स्वतंत्र मतदारसंघाच्या हक्कावर पानी सोडण्यास मुस्लीम लीग तयार नव्हती.
 • केंद्रात व प्रांतात तिला पुरेसे प्रतिनिधीत्व जातीय पायावर हवे होते. मार्च 1929 मध्ये लीगने अधिवेशन भरवून त्यात काही अटींवर नेहरू रिपोर्ट स्वीकारण्यात आला. खुद्द काँग्रेसमध्येही नेहरू रिपोर्टवर मोठा वाद झाला. पं. जवाहरलाल व सुभाषचंद्र बोस यांनी ‘संपूर्ण स्वातंत्र्य’ या ताबडतोबीच्या ध्येयाचा आग्रह धरला.
 • महात्माजींनी मध्यस्थी करून काँग्रेसला एकमताने नेहरू रिपोर्टचा स्वीकार करावयास लावला आणि त्याची अंमलबजावणी सरकारने 1929 हे वर्ष संपण्यापूर्वी करावी, असा ठराव पास करून घेतला. त्यामुळे जवाहरलाल व बोस यांच्या सारखे तरुण नेते थोडे शांत झाले. गांधीजी पुन्हा आता राजकारणाकडे वळले. एका वर्षाच्या अवधीत साम्राज्यांतर्गत स्वराज्य न मिळाल्यास ते स्वातंत्र्य आंदोलन उभारणार होते.  

नेहरू रिपोर्टच्या प्रमुख शिफारशी:-

 • भारताला साम्राज्यांतर्गत स्वराज्य लगेच मिळावे, तद्नंतर पूर्ण स्वातंत्र्य हेच भारताचे ध्येय राहील.
 • भारत संघराज्यात्मक राज्य असेल. प्रांतांना आवश्यक तेवढी स्वायत्ताता मिळेल. प्रांतांना फक्त एकच कायदेमंडळ असावे. राज्यकारभाराच्या विषयांची वाटणी केंद्र व प्रांत यांच्यात व्हावी.
 • भारत हे निधर्मी राष्ट्र असेल व ते जातीय समस्या समाधानकारक सोडवेल. अल्पसंख्याकांच्या संस्कृतीचे व राजकीय हक्कांचे संरक्षण झाले पाहिजे. परंतु त्यासाठी जातीय मतदारसंघाची आवश्यकता नाही. अल्पसंख्याकांसाठी राखीव जागा असाव्यात, परंतु स्वतंत्र मतदारसंघ नसावेत.
 • सिंध हा स्वतंत्र प्रांत करावा. वायव्य सरहद्द प्रांताला इतर प्रांतांसारखा दर्जा द्यावा.
 • जगातील इतर लोकांप्रमाणेच भारतीय लोकांनाही जन्मत:च स्वतंत्र्य व मूलभूत हक्क प्राप्त झालेले असून घटनेत त्यांचा समावेश झाला पाहिजे. (अहवालात 19 मूलभूत हक्कांची यादी देण्यात आलेले होती.)
 • इंग्लंडचा राजा व कायदेमंडळाची दोन गृहे यांची मिळून भारतीय पार्लमेंट तयार होईल. प्रांतांचे प्रतिनिधी वरिष्ठगृहात बसतील तर कनिष्ठगृहातील प्रतिनिधी हे प्रौढ मतदान पद्धतीने लोकांनी निवडून दिलेले असतील.
 • आता सध्या भारतीय संस्थानांवर ब्रिटिश सरकारचे जसे अधिकार चालतात तसेच भारतीय पार्लमेंटचे अधिकार त्यांच्यावर चालतील. काही संघर्ष पैदा झाल्यास गव्हर्नर जनरल सुप्रीम कोर्टाकडे तो तंटा सोपवेल.
 • गव्हर्नर जनरलने प्रधानमंत्र्यांची निवड करावी व त्याच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नियुक्ती करावी. गव्हर्नर जनरलने मंत्रीमंडळाच्या सल्ल्याने कारभार करावा. मंत्रिमंडळ हे पार्लमेंटला जबाबदार असेल.
 • प्रांतांच्या गव्हर्नरांची नियुक्ती इंग्लंडच्या राजाकडून होईल. गव्हर्नरांनी मुख्यमंत्र्यांची निवड करावी. त्यांच्या सल्ल्याने मंत्रिमंडळ तयार करावे. मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने गव्हर्नराने कारभार करावा. प्रांतीय कायदेमंडळाची मुदत पाच वर्ष असावी व ती वाढविण्याचा किंवा कमी करण्याचा अधिकार गव्हर्नराला असावा.
 • गव्हर्नर जनरलने सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करावी. त्यांना दूर करण्याचा हक्क फक्त पार्लमेंटलाच असावा.
 • प्रधानमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री, सरसेनापती इत्यादींची संरक्षण समिती गव्हर्नर जनरलने नेमावी. देशाच्या संरक्षणाविषयी त्या समितीने गव्हर्नर जनरलला सल्ला द्यावा.

वेव्हेल योजना 

wavell plan

2286   12-Jun-2018, Tue

 • मे 1945 मध्ये युरोपातील युद्ध संपले. इंग्लंड विजयी झाले. लवकरच पार्लमेंटच्या निवडणुका होणार होत्या. चर्चिल भारताचा प्रश्न सोडवू इच्छित नव्हता. त्यामुळे हुजूर पक्षीयांबद्दल स्वातंत्र्यप्रिय इंग्रज जनता नाराज होती. आंतरराष्ट्रीय दडपणही इंग्रज सरकारवर वाढत होते.
 • युद्धसमाप्तीनंतर पारतंत्र्यातील राष्ट्रे स्वतंत्र झाली पाहिजेत, अशी रशियानेही घोषणा केली होती. अशा परीस्थितीत चर्चिलला आपण भारताचा प्रश्न सोडविण्यास अत्यंत उत्सुक आहोत असा भास निर्माण करणे तरी आवश्यक होते. कारण मजूर पक्षाची पूर्ण सहानुभूती भारतीय स्वातंत्र्यलढ्याला होती. मजूर पक्ष सत्तेवर आला तर भारताला स्वातंत्र्य लवकर मिळण्याची शक्यता होती.
 • विलायत सरकारशी सल्लामसलत करण्यासाठी वेव्हेल मार्च 1945 मध्ये इंग्लंडला गेले होते. ते जून 1945 मध्ये परत आले. 14 जून रोजी त्यांनी योजना जाहीर केली.
 • नवी घटना भारतीय लोकांनीच तयार केली पाहिजे.
 • जपानबरोबर करावयाच्या युद्धात सर्वांचे सहाय्य मिळेल अशी आशा आहे.
 • त्याकरिता केंद्रीय सरकारच्या कार्यकारिणीची पुनर्रचना करण्यात येईल. गव्हर्नर जनरल व कमांडर-इन-चीफ याशिवाय सर्व सभासद भारतीय असतील. त्यात सजातीय हिंदू व मुस्लीम यांचे प्रमाण समान राहील.
 • भारतीय गृहस्थाकडे परराष्ट्रीय खाते राहील व तोच देशाबाहेर भारताचे प्रतिनिधित्व करील.
 • पक्ष नेते, प्रांतांचे आजी व माजी पंतप्रधान यांची परिषद व्हाईसरॉय बोलावतील. ते त्यांना याद्या द्यावयास सांगतील व त्यातून केंद्रीय कार्यकारिणीकरिता सभासद निवडतील.
 • केंद्रीय सहकार्य सुरू झाले म्हणजे प्रांतांतील 93 कलमी कारभार संपेल.
 • विद्यमान घटनेप्रमाणे जास्तीतजास्त व्यवहार्य सत्ता दिली जाईल. त्यामुळे भविष्यकालीन घटनांवर किंवा घटनेवर परिणाम होणार नाही.   
 • 25 जून, 1945 रोजी परिषद चांगल्या वातावरणात सुरू झाली. युद्धाप्रयत्नात भारताचे सहकार्य, युद्ध संपेपर्यंत हंगामी सरकारचे अस्तित्व इत्यादी प्रश्नांवर सर्वांचे एकमत होते. तथापि, व्हॉईसरॉयच्या मंडळाच्या रचनेवर चर्चा येताच चर्चासत्राचे घोडे अडले.
 • बॅ. जीनांनी नेहमीप्रमाणे अडवणुकीची भूमिका घेतली. व्हॉईसरॉयच्या मंडळात हिंदू व मुस्लीम यांचे समान प्रतिनिधी असावेत हे राष्ट्रसभा व लीग यांना तत्वत: मान्य असल्यासारखे असले तरी राष्ट्रसभेने फक्त हिंदू, मुस्लीम, पारशी, हरिजन, शीख इत्यादी धर्माचे व जातीचे प्रतिनिधी पाठविण्याचा नैतिक हक्क होता. तो हक्कच जिना अमान्य करीत होते.
 • याशिवाय राज्यकारभाराच्या कोणत्याही प्रश्नावर मुस्लीम सभासदांनी बहुमताने संमती दिल्याशिवाय निर्णय होऊ नये असाही आग्रह त्यांनी धरला. हा आग्रह व्हॉईसरॉय मान्य करू शकले नाहीत. त्यांनी 14 जुलैला परिषद अपयशी होऊन बरखास्त झाल्याचे जाहीर केले. याचा अर्थ, आता भारताचा राजकीय प्रश्न सोडविण्याच्या किल्ल्या इंग्रजांनी बॅ. जीनांच्या हाती दिल्या होत्या.
 • भारतातील सर्व मुस्लिमांचे आपण एकमेव प्रतिनिधित्व करत आहोत, हा त्यांचा दावा फोल होता. भारतात पंजाब व सरहद्द प्रांत या ठिकाणी इतरही मुस्लीम संघटना होत्या व तेथे पूर्वी त्यांची प्रांतीय सरकारेही होती. मुस्लिमांच्या इतर संघटना होत्या. त्यांनाही कळून चुकले की, लीगशी सहकार्य केल्याशिवाय राजकीय प्रश्न सुटू शकत नाही. म्हणजे लीगचा पाया अधिकच भक्कम होऊ लागला.

मध्ययुगीन भारत

/upsc-exam-preparation-tips-for-upsc-exam-2019 reliable academy

4274   19-Mar-2019, Tue

या घटकावर २०११ ते २०१८ मध्ये एकूण १४ प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. इतर घटकांच्या तुलनेत या घटकावर कमी प्रश्न विचारले जातात.

अभ्यासाच्या दृष्टीने या घटकाचे नियोजन

मध्ययुगीन कालखंडाची सुरुवात साधारणत: इ.स ७५०पासून होते, असे मानले जाते. सुरुवातीचा कालखंड (इ.स ७५०-१२००पर्यंत) या कालखंडाची महत्त्वाची दोन वैशिष्टय़े  पाहावयास मिळतात. यातील पहिले म्हणजे भारतात सरंजामशाही स्वरूपाच्या राजकीय शासनव्यवस्थेचा उदय आणि दुसरे म्हणजे भारतात इस्लाम धर्माचे आगमन व सिंध प्रांतातून सुरू झालेली अरबांची व तुर्काची आक्रमणे. या कालखंडामध्ये भारताचा विविध भागांमध्ये प्रादेशिक राजकीय सत्तांचा उदय झालेला होता. उत्तर भारतामधील राजपूत सत्ता-प्रतिहार, परमार, चौहान व चंदेला इत्यादी; पूर्व भारतामध्ये पाल यांची सत्ता तसेच मध्य भारतात राष्ट्रकुट आणि दक्षिण भारतात चोल, चालुक्य इत्यादीच्या सत्ता होत्या. यानंतरचा कालखंड हा दिल्ली सल्तनत व समकालीन प्रादेशिक सत्तांचा होता. दिल्ली सल्तनतीला समकालीन असणाऱ्या सत्तांमध्ये देवगिरीचे यादव, होयसळ, काकतीय विजयनगर साम्राज्य, बहामनी राजघराणे तसेच काश्मीर, बंगाल, गुजरात या प्रांतातील प्रादेशिक राजकीय सत्ता यांचा मुखत्वे समावेश होता. दिल्ली सल्तनतीनंतर मुघल साम्राज्याची सत्ता भारतात स्थापन झालेली होती. या सत्तेला समकालीन असणाऱ्या सत्तांमध्ये राजस्थानमधील राजपूत सत्ता तसेच दख्खन भागातील आदिलशाही, निजामशाही व महाराष्ट्रातील मराठा साम्राज्य इत्यादीचा समावेश होतो.

याचबरोबर मध्ययुगीन भारतात भक्ती चळवळ आणि सुफी चळवळ या दोन धार्मिक चळवळी अस्तिवात आलेल्या होत्या. त्यांचा तत्कालीन समाजजीवनावर खूप मोठा प्रभाव पडलेला होता. यातील भक्ती चळवळ ही िहदू धर्माशी संबंधित होती आणि सुफी चळवळ ही इस्लाम धर्माशी संबंधित होती. याव्यतिरिक्त शीख चळवळीच्या माध्यमातून शीख धर्माची स्थापना गुरुनानक यांनी केलेली होती. अशा पद्धतीने या घटकाचे नियोजन करावे लागते.

मागील परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न पुढीलप्रमाणे

* २०१२ मध्ये सुफी चळवळीवर प्रश्न विचारलेला होता.

तो प्रश्न होता – गूढ सुफिवादी पुढीलपैकी कोणत्या मार्गाचा पुरस्कार करणारे म्हणून ओळखले जातात?

पर्याय होते – १)ध्यान आणि श्वासावर नियंत्रण, २)एकांतात खडतर संन्यासी जीवन आणि ३)धार्मिक गीतांद्वारे श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणे. (हा टउद प्रकारात मोडणारा प्रश्न)

* २०१४ मध्ये प्रश्न होता..

मध्ययुगीन भारतात महत्तर आणि पट्टीकल पदनाम कशाशी संबंधित होते?

पर्याय – १) सैनिक अधिकारी, २)ग्रामप्रमुख, ३)वैदिक कर्मकांडामधील विशेषज्ञ आणि ४)कारागार श्रेणी प्रमुख.

* २०१५ मध्ये प्रश्न होता..

बाबरच्या भारतातील आगमनामुळे काय झाले?

पर्याय – १)उपखंडामध्ये दारूगोळा वापरण्यास सुरुवात झाली, २)स्थापत्यकलेमध्ये कमान आणि घुमट बनण्यास सुरुवात झाली आणि ३)तमुर राजवंशाची स्थापना करण्यात आली हे पर्याय दिलेले होते. (टउद प्रकारात मोडणारा प्रश्न.)

* २०१६ मध्ये प्रश्न होता..

मध्ययुगीन भारताच्या आर्थिक इतिहास संदर्भात अराघत्ता (Araghatta) हे काय दर्शविते? असा प्रश्न विचारण्यात आलेला होता.

यासाठी पर्याय होते. – १) वेठबिगार, २) सैनिक अधिकाऱ्यांना दिले जाणारे भुदान, ३)जमीन सिंचनासाठी वापरले जाणारे जलचक्र आणि ४)पडीक जमिनीचे सुपीक जमिनीमध्ये केले जाणारे रूपांतर.

* २०१७ मध्ये  प्रश्न होता..

काकतीय राज्यामधील खालीलपैकी कोणते महत्त्वाचे बंदर (seaport) होते? असा प्रश्न विचरण्यात आलेला होता.

यासाठी पर्याय होते. – १)काकिनाडा (Kakinada), s)मोतुपल्ली (Motupalli), ३)मसुलीपट्टनम/मच्छलीपट्टनम (Masulipatanam/Machalipatnam) व ४) नेल्लुरू (Nelluru)

* २०१८ मध्ये  प्रश्न होता..

खालीलपैकी कोणत्या परकीय प्रवाशाने विस्तृतपणे भारतातील हिरे आणि हिऱ्यांच्या खाणी यांविषयी चर्चा केलेली आहे? असा प्रश्न विचारलेला होता.

यासाठी पर्याय होते – १) फ्रँकोइस बर्नियर, २)जीन बाप्टिस्टे टेवर्नियर, ३)जेंन दी थेवेनोत व ४)अब्बे बार्थलेमी कारे.

उपरोक्त स्वरूपाचे प्रश्न या घटकावर विचारले जातात, साधारणत: या प्रश्नाचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ पद्धतीचे आहे. या घटकावर विचारण्यात येणाऱ्या प्रश्नावरून असे लक्षात येते की, हा घटक मुद्देनिहाय माहितीचे संकलन करून अभ्यासणे गरजेचे आहे. पण यासाठी सर्वप्रथम या घटकाचे मूलभूत ज्ञान असणे गरजेचे आहे.

संदर्भ साहित्य – या घटकाची मूलभूत माहिती अभ्यासण्यासाठी सर्वप्रथम एनसीईआरटीच्या शालेय पुस्तकांचा आधार घ्यावा लागतो. यामध्ये Our past part II  इयत्ता सातवी आणि इयत्ता बारावीचे Themes in Indian History part- II  ही पुस्तके अभ्यासावी लागतात. याच्या जोडीला सतीश चंद्र लिखित मध्ययुगीन भारतावरील जुने एनसीईआरटीचे पुस्तक वाचावे. ज्यामुळे या घटकाची योग्य परीक्षभिमुख तयारी आपणाला करता येते.

भारतीय इतिहास आणि स्वातंत्र्य चळवळ

tips-for-upsc-exam-preparation-5

1740   14-Mar-2019, Thu

यूपीएससीने २०११पासून पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये बदल केलेला आहे. पूर्वपरीक्षेसाठी एकूण दोन पेपर आहेत आणि प्रत्येक पेपर हा २०० गुणांसाठी असून यातील पहिल्या पेपरमध्ये १०० प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्नाला २ गुण असून चुकीचा पर्याय निवडल्यास पेनल्टी मार्क्स असतात. उदाहरणार्थ एका प्रश्नासाठी ०.३३अशा पद्धतीने एकूण मिळविलेल्या गुणांमधून पेनल्टी गुण वजा केले जातात. याचबरोबर २०१५पासून यूपीएससीने पूर्व परीक्षा उतीर्ण होण्यासाठी आणखी एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. पूर्वपरीक्षेतील पेपर दोन म्हणजे नागरी सेवा कल चाचणी (C-SAT) हा पात्रता (क्वालिफाइंग) पेपर केला आहे (एकूण ८० प्रश्न आणि प्रत्येक प्रश्न २.५ गुणांसाठी असतो) यामध्ये उतीर्ण होण्यासाठी कमीत कमी एकूण गुणांपैकी ३३% गुण प्राप्त करणे अनिवार्य आहे. या पेपरमध्येही चुकीचा पर्याय निवडल्यास एका प्रश्नासाठी ०.३३ अशा पद्धतीने एकूण मिळविलेल्या गुणांमधून पेनल्टी गुण वजा केले जातात. तसेच या पेपरचे गुण अंतिम मेरीट ठरविण्यात ग्राह्य धरले जात नाहीत. पहिल्या पेपरमध्ये प्राप्त केलेल्या गुणांवरून अंतिम मेरीट ठरविले जाते.

भारतीय इतिहास आणि स्वातंत्र्य चळवळ

प्रस्तुत लेखामध्ये आपण पूर्वपरीक्षा पेपर पहिला यामधील भारतीय इतिहास आणि स्वातंत्र्य चळवळ या घटकाची तयारी कशी करावी याची चर्चा करणार आहोत. तसेच २०११ ते २०१८ पर्यंत या घटकावर किती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत याचादेखील आपण आढावा घेणार आहोत. या घटकामध्ये प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत आणि आधुनिक भारत तसेच भारतीय कला आणि संस्कृती या अन्य घटकांचाही समावेश होतो. सर्वप्रथम आपण या घटकावर वर्षनिहाय विचारण्यात आलेल्या प्रश्नांची संख्या पाहू : २०११ (१३ प्रश्न), २०१२ (१८ प्रश्न), २०१३ (१५ प्रश्न), २०१४ (२० प्रश्न), २०१५ (१८ प्रश्न), २०१६ (१६ प्रश्न), २०१७ (१४ प्रश्न), २०१८ (२१ प्रश्न). या प्रश्नांच्या संख्येवरून आपणाला या घटकाचा अभ्यास पूर्वपरीक्षेत यशस्वी होण्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे लक्षात येते. हा घटक अभ्यासाच्या दृष्टीने पुढीलप्रमाणे विभागता येऊ शकतो ज्यामुळे आपणाला या विषयाचा परीक्षाभिमुख आवाका लक्षात येईल आणि त्यानुसार अभ्यासाचे योग्य नियोजन करता येऊ शकेल.

अ) प्राचीन भारत – प्राचीन भारताच्या इतिहासाचे महत्त्व आणि अभ्यासाची साधने, प्रागतिहासिक भारत, ताम्रापाषण कृषी संस्कृती, सिंधू संस्कृती, वैदिक संस्कृती, बौद्धयुग अथवा महाजनपदाचा कालखंड, मौर्य कालखंड, मौर्योत्तर कालखंड, गुप्त कालखंड आणि गुप्तोत्तर कालखंड इत्यादी.

ब) मध्ययुगीन भारत – प्रारंभिक मध्ययुगीन कालखंड (इ.स. ७५०-१२००), दिल्ली सल्तनत, उत्तर भारतातील प्रादेशिक देशी सत्ता, विजयनगर साम्राज्य, बहामनी राजघराणे, मुघल साम्राज्य, मराठा कालखंड आणि मध्ययुगीन भारतातील धार्मिक चळवळी इत्यादी.

क) आधुनिक भारत – युरोपियनांचे आगमन आणि ब्रिटिशसत्तेची भारतात स्थापना, ब्रिटिशसत्तेचा भारतावरील परिणाम, ब्रिटिशसत्तेच्या विरोधातील उठाव, १९व्या शतकातील सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी, शिक्षण आणि वृतपत्रे यांची वाढ आणि विकास, भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ, क्रांतिकारी चळवळी, कामगार चळवळ, भारतातील सांप्रदायिकतेची वाढ, गव्हर्नर जनरल आणि व्हाइसरॉय, भारतातील घटनात्मक विकास, महत्त्वपूर्ण व्यक्ती इत्यादी.

ड) भारतीय कला आणि संस्कृती – भारतीय स्थापत्यकला आणि शिल्पकला, भारतीय चित्रकला, भारतीय संगीत, नृत्य आणि नाटय़, भारतीय साहित्य, भारतीय हस्तकला इत्यादी.

अभ्यासाचे नियोजन आणि संदर्भ साहित्य

यातील नेमका कोणता भाग परीक्षेच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचा आहे, याचे आकलन आपणाला मागील परीक्षांमध्ये या घटकावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांवरून लक्षात येते. या घटकाची व्याप्ती खूप मोठी आहे तसेच याचे स्वरूप पारंपरिक पद्धतीचे आहे. त्यामुळे हा घटक सर्वप्रथम सखोल पद्धतीने अभ्यासणे गरजेचे आहे. त्यानंतर या घटकावर स्वत:च्या उजळणी स्वरूपातील टिप्पणे तयार करावीत. जेणेकरून हा घटक कमीत कमी वेळेमध्ये परीक्षेच्या दृष्टीने अभ्यासता येऊ शकतो. सर्वसाधारणपणे या घटकामध्ये प्राचीन भारत, आधुनिक भारत, भारतीय कला आणि संस्कृती यावर सर्वाधिक प्रश्न विचारले जातात. तसेच मागील परीक्षांमधील प्रश्नाचे विश्लेषण केल्यास असे दिसून येते की, भारतीय कला आणि संस्कृती यावर अधिक प्रश्न विचारण्यात येऊ लागलेले आहेत. हा घटक अभ्यासताना वस्तुनिष्ठ माहितीचा अभ्यास करणे गरजेचे आहे.

या घटकाच्या तयारीसाठी एन.सी.ई.आर.टी बोर्डाची शालेय पुस्तके सर्वप्रथम वाचावीत. बाजारात या घटकासाठी अनेक गाइडस स्वरूपात पुस्तके उपलब्ध आहेत. यातील नेमकी कोणती पुस्तके या घटकाची परीक्षाभिमुख तयारी करण्यासाठी महत्त्वाची आहेत याची माहिती असणे गरजेचे आहे.

सुराज्याच्या दिशेने वाटचाल

Moving towards Surajya

6448   04-Jun-2018, Mon

स्वातंत्र्यपूर्व काळात स्वराज्य की सुराज्य असा वाद गाजला होता. आता स्वराज्य तर आले आहे, पण सुराज्य अजून दूरच आहे. स्वातंत्र्य टिकवून ठेवायचे असेल तर हा मुद्दा समजून घ्यायला हवा.

राजकीय सुधारणा आधी करायच्या की, सामाजिक सुधारणा याबाबतचा वाद गाजला होता. तो आजही पाहणे उदबोधक ठरेल. जेव्हा आधुनिकता दृगोचर होऊ लागली, तेव्हा तिला दोनप्रकारे प्रतिसाद दिला गेला. एक असा की ब्रिटिश सत्तेमुळे देशाचे वाटोळे झाले आहे. त्यांना आधी बाहेर काढले पाहिजे (टिळकपक्ष), तर आपल्याच समाजातील दुर्गुणांमुळे देशाला ही स्थिती प्राप्त झाली आहे. तेव्हा आधी ब्रिटिशांच्या मदतीने त्या दुर्गुणांवर मात करून एकसंध समाज निर्माण करणे आवश्यक आहे. (आगरकर पक्ष) हा दुसरा. हा वाद चांगलाच रंगला.


लोकानुनयाच्या मर्यादा

टिळकांचे म्हणणे पडले की, समाजात काही दुर्गुण असले तरी त्यांना एकदम फैलावर घेतले तर त्यांचा तेजोभंग होईल. असा तेजोभंग झालेला, आत्मविश्वास गमावलेला समाज मोठे असे काही साध्य करू शकणार नाही. तेव्हा लोकांच्या कलाकलाने घेतले पाहिजे. आगरकर उत्तरले की, लोकांच्या कलाकलाने घेताघेता कलंडलो तर? औषध कडूच असते. म्हणून घ्यायचे नाही की काय? टिळकांचे म्हणणे पडले की, अशाने आपण अलोकप्रिय होऊ. मग तर काहीच करता येणार नाही. आगरकर म्हणाले की, इमारतीच्या पायात दगड असतात. ते दिसत नाहीत, पण त्यांनीच इमारत तोलून धरली असते. तसे कोणीतरी तर अलोकप्रिय झाले पाहिजे. लोकानुनय करणे चांगले नव्हे. तेव्हा 'ईष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार.'

स्वराज्याची व्याख्या

टिळकांनी स्वराज्याची कास धरली. परकीयांना देशातून बाहेर काढणे कर्तव्य मानले. आगरकर म्हणाले की, मलाही स्वराज्यच हवे आहे. पण माझी स्वराज्याची व्याख्या व्यापक आहे. टिळकांचे स्वराज्य वरून चालू होते (परकीय सत्ता) माझी स्वराज्याची व्याख्या माझ्या घरापासून सुरू होते. घरामध्ये स्त्रियांवर पुरुषांचे राज्य आहे. समाजात कनिष्ठ जातींवर उच्च जातींचे राज्य आहे. जोवर आपण आपल्या गुलामीत आहेत त्यांना स्वातंत्र्य देत नाही, तोवर ते ब्रिटिशांकडे मागण्याचा कोणताही हक्क आपल्याला नाही. ज्या समाजात ब्राह्मण व महार एकमेकांच्या मांडीला मांडी लावून जेवत नाहीत, त्या समाजाला स्वराज्य कशासाठी हवे आहे? तेव्हा आधी घर दुरुस्त करा.

वादळाचा काळ

टिळक म्हणाले की, मलाही घर दुरुस्त करण्यात रस आहे, पण ते घर माझ्या ताब्यात तर येऊ दे. सध्या ते परकीयांच्या ताब्यात आहे. आणि असे म्हणतात की 'वादळाच्या काळात कोणी आपले घर दुरुस्त करीत बसत नाही', ब्रिटिश काळ हा असा संकटाचा काळ आहे. तेव्हा आधी स्वराज्यप्राप्ती. स्वराज्य मिळवल्यावर आपण स्वतःहून सुधारणा घडवून आणू. शिवाय आत्ता सुधारणा हाती घेतल्या तर परकीयांची मदत घ्यावी लागेल. आगरकर म्हणाले की, समाज सुधारणा ही जादूची कांडी नाही की फिरवली तर सुधारणा होतील.

निदान आता स्वराज्यासाठी सुधारणांची गरज तरी भासते आहे. स्वराज्यप्राप्तीनंतर तुम्ही म्हणाल की, आता सुधारणांची गरजच काय?

विचार कलहाला घाबरू नका.टिळक म्हणाले की, टीका केल्याने समाज दुभंगेल, दुर्बल होईल. आगरकरांच्या मते टीका केल्याने हिणकस निघून जाते व त्यामुळे समाज बळकट होईल. टिळक म्हणाले की, चांगला सेनापती दोन आघाड्यांवर लढत नाही. जर आपण राजकीय आघाडी उघडली आहे तर सामाजिक आघाडी बंद ठेवली पाहिजे. आगरकर म्हणाले, मग सामाजिक सुधारणांचीच आघाडी चालवा. कारण सुराज्य ही स्वराज्याची पूर्वअट आहे.

आज स्वराज्याचे प्रशासन चालवताना सुराज्याची निकड समजून घेऊन जर आपण चाललो तर त्या वाटचालीस अर्थ प्राप्त होईल. आगरकरांनी ‘स्वराज्याच्या दिशेने वाटचाल’ अशी पुस्तिका लिहिली होती. आज सुराज्याच्या दिशेने आपली पावले पडली तर संपूर्ण देशाचे स्वातंत्र्य जसे एकेकाळी मिळवले, तसे प्रत्येक व्यक्तीचे स्वातंत्र्य मिळेल व हा लढा सफळ संपूर्ण होईल.

ऑपरेशन विजय

operation vijay

7590   04-Jun-2018, Mon

नव्याने सुरुवात 

दादरा व नगर हवेली मुक्त केल्यावर संघर्षाला नव्याने सुरुवात झाली. १५ ऑगस्ट १९५५ रोजी गोवे विमोचन समितीने सामुदायिक सत्याग्रह केला. या नि:शस्त्र सत्याग्रहींवर पोर्तुगीजानी गोळीबार केला. निषेध म्हणून भारताने आपले गोव्यातले कार्यालय बंद केले. यानंतर भारत सरकारने सशस्त्र उठाव करणाऱ्यांना छुपा पाठिंबा देण्यास सुरुवात केली.

दरवर्षी १५ ऑगस्टला सत्याग्रह होत गेले व पोर्तुगीजांचा आडमुठेपणा जगापुढे उघड होत गेला. काळ व वेळ आली यापूर्वीच्या प्रयत्नांमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती. १९६१ सालापर्यंत पोर्तुगीजांच्या पापाचा घडा भरला. निर्वसाहतीकरणाचे युग आता शिखरावर होते. आता नाही तर कधीच नाही हे भारताने ओळखले. आता काळही आला होता आणि वेळही अचूक होती. भारत सरकारने गोवा, दीव, दमण व अंजदीव (कर्नाटकच्या किनाऱ्यावरील) यांच्या मुक्ततेसाठी ‘ऑपरेशन विजय’ सुरू केले. 
 

भारतीय सैन्याची व्यूहरचना

आकाश, समुद्र व जमीन या तिन्ही ठिकाणांहून भारतीय सैन्याने कूच केले. मेजर जनरल के. पी. कॅण्डेथ यांच्या हाती हल्ल्याची जबाबदारी सोपवण्यात आली. दमणवर मराठा पलटण, तर दीववर राजपूत व मद्रास पलटण संयुक्तरीत्या हल्ला चढवतील असे ठरले. एअर व्हॉइस मार्शल इर्लिक पिंटो यांच्याकडे हवाई हल्ला करण्याची कामगिरी सोपवण्यात आली.

गोव्यातील एकमेव हवाईतळ डाबोलिम ताब्यात घेणे हे लक्ष्य होते. भारताने कॅथलिक ख्रिश्चन अधिकारी पुढे ठेवले, कारण पोर्तुगाल कॅथलिक जगाला अन्याय झाल्याचा कांगावा करून साद घालण्याची शक्यता होती. नौदलाची जबाबदारी देशाचे नौदलप्रमुख भास्कर सोमण यांच्याकडे होती. विमानवाहू नौका विक्रांत हिलाही तयार ठेवण्यात आले. 


पोर्तुगीज सैन्याची व्यूहरचना 

हुकूमशहा सालाझारचा सैनिकांना संदेश होता की, विजयी व्हा किंवा मरा, पण शरण जाऊ नका. भारताच्या आर्थिक बहिष्कारानंतर सावध होऊन पोर्तुगीजानी पोर्तुगाल, अंगोला व मोझंबिक येथून फौजफाटा गोव्यात आणून ठेवला. 
 

सेंटिनेल योजना : गोव्याची चार संरक्षण विभागांत विभागणी (उत्तर, मध्य, दक्षिण व मार्मागोवा) बॅरेज योजना : आक्रमण लांबवण्यासाठी सर्व पूल उडवायचे, महत्त्वाचे रस्ते व चौपाट्या यांच्यावर भूसुरुंग पेरून ठेवायचे. गोव्याला युद्धनौका पाठवायचा पोर्तुगालचा बेत इजिप्तचे अध्यक्ष नासेर यांनी सुवेझ कालव्यातून जाण्याची परवानगी नाकारून हाणून पाडला. पोर्तुगालने विमानमार्गे शस्त्रास्त्रे पाठवण्याचा प्रयत्न करून पहिला, पण मधल्या सर्व देशांनी (पाकिस्तानसकट) त्यांना थांबा नाकारला. 


युद्धापूर्वीची पळापळ 

युद्धाकडे होणारी वाटचाल बघून गोव्यातील युरोपीय घाबरले व लवकरात लवकर कसे निसटता येईल यांची संधी शोधू लागले. तिमोर (दक्षिण पूर्व आशिया) येथून लिस्बन येथे जाणारे ‘इंडिया’ हे पोर्तुगीज जहाज मार्मागोवा बंदरात आले तेव्हा त्या ३८० उतारू क्षमतेच्या जहाजात ७०० पोर्तुगीज नागरिक दाटीवाटीने चढून बसले. काहींनी तर शौचालयात ठाण मांडले. बिघडती परिस्थिती बघून पोर्तुगालने काही महिला पॅराट्रुपर्स नागरिकांना वाचवून आणण्यासाठी गोव्याला रवाना केल्या. 
 

युद्धाला तोंड फुटले 

अखेर १७ डिसेंबर १९६१ला सकाळी युद्धाला तोंड फुटले. उत्तरेकडून भारतीय सैन्याने आक्रमणाला सुरुवात केली. मराठा, पंजाब व शीख पलटणींनी गोवा तीन बाजूने घेरले. पोर्तुगीजांनी माघार घेत पूल उदध्वस्त केले. तरीही भारतीय सैन्याने आघाडी घेत आग्वाद किल्ला जिंकला. तेथील राजकीय कैद्यांची मुक्तता केली.

पोर्तुगीजांच्या अल्फान्सो-डी-अल्बुकर्क या युद्धनौकेने चांगली लढत दिली. पण भारतीय नौसेनेच्या संख्याबळापुढे तिला माघार घ्यावी लागली. पोर्तुगीजांनी नौका सोडून पळ काढला व तिला पेटवून दिले. गुजरातच्या सौराष्ट्र किनाऱ्यावरील दीव या बेटावर पोर्तुगीजांची सर्वात जास्त तयारी होती. पण भारतीय हवाई दलाच्या माऱ्याने त्यांना शरण आणले. हा एका शेवटचा आरंभ होता. 


Top