National Parks in India

The National Parks in India

7211   18-Jun-2018, Mon

National Parks in India

 

Name

State

1. Bandhavgarh National Park

Madhya Pradesh

2. Kanha National Park

Madhya Pradesh

3. Panna National Park

Madhya Pradesh

4. Pench National Park

Madhya Pradesh

5. Thattekkad Bird Sanctuary

Kerala

6. Idukki Wildlife Sanctuary

Kerala

7. Eravikulam National Park

Kerala

8. Kumarakom Bird Sanctuary

Kerala

9. Periyar Wildlife Sanctuary

Kerala

10. Sariska Wildlife Sanctuary

Rajasthan

11. Bharatpur Bird Sanctuary

Rajasthan

12. Keoladeo National Park

Rajasthan

13. Nagarhole National Park

Rajasthan

14. Ranthambore National Park

Rajasthan

15. Sambhar Wildlife Sanctuary

Rajasthan

16. Rajaji National Park

Uttarakhand

17. Corbett National Park

Uttarakhand

18. Manas National Park

Assam

19. Kaziranga National Park

Assam

20. Sanjay Gandhi Wildlife Sanctuary

Maharashtra

21. Mahim Nature Park

Maharashtra

22. Dachigam National Park

J&K

23. Hemis High Altitude Park

J&K

24. Chilka Lake Bird Sanctuary

Odisha

25. Nandankanan Zoo

Odisha

26. Similipal National Park

Odisha

27. Bandipur National Park

Karnataka

28. Dandeli National Park

Karnataka

29. Dudhwa National Park

Uttar Pradesh

30. Gir National Park

Gujarat

31. Mudumalai Wildlife Sanctuary

Tamilnadu

32. Nagarjunasagar Wildlife Sanctuary

Telangana

33. Renuka Wildlife Sanctuary

Himachal Pradesh

34. Sultanpur Bird Sanctuary

Haryana (Gurgoan)

35. Sunderbans Tiger Reserve

West Bengal

भूगोलाची परीक्षाभिमुख तयारी

Geographical examination oriented preparation

7951   27-Jan-2018, Sat

या लेखात आपण आजपर्यंत आयोगाने विचारलेल्या प्रश्नांचे घटक, त्यांचा अभ्यास करताना कोणत्या गोष्टींवर भर द्यावा आणि परीक्षेला जाता जाता नेमक्या कोणत्या मुद्दय़ांकडे लक्ष द्यावे, याविषयी विस्तृत चर्चा करू या. पुढे महाराष्ट्राचा, भारताचा, जगाचा तसेच प्राकृतिक व संकल्पनात्मक भूगोल अभ्यासण्यासाठी महत्त्वाच्या आणि पाहिलेच पाहिजेत अशा मुद्दय़ांची यादी दिली आहे.

जगाचा भूगोल:-

या विभागात आजपर्यंत राज्यसेवा पूर्वपरीक्षेत जगात घेतली जाणारी चहासारखी नगदी पिके आणि त्यांची वैशिष्टय़े, अग्निकंकणाचा भाग असणारे प्रदेश, स्थानिक वारे, क्षारतेनुसार समुद्रांचा क्रम, विविध आखाते, सामुद्रधुनी आणि महासागर, हवामान प्रदेश, भूरूपे, नद्या, वाळवंटे, पर्वतरांगा, पठारे आणि त्यांची वैशिष्टय़े, विविध भागांत आढळणारे विशिष्ट संस्कृतींचे लोक आणि प्रदेश या उपघटकांवर आधारित प्रश्न विचारले आहेत.

भारताचा भूगोल:-

या विभागात साधारणपणे भारतातील मृदा समस्या, मासेमारी, वस्त्या (मानवी भूगोल), नद्यांची खोरी – त्यांचा आकार, हवामान, पशुधन, महत्त्वाची शहरे – त्यांची टोपणनावे, लोकसंख्या वितरण, साक्षरता, कृषीचे प्रकार, वने, प्रमुख पिके – नगदी व अन्नधान्य – त्यांचे वितरण, विकसित बंदरे, व्यापारी केंद्रे, आदिवासी जमाती – राज्ये, पठारे, पर्वतरांगा, पर्जन्य, धबधबे, पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे कृषी क्षेत्रातील विविध क्रांती या उपघटकांवर विशेष भर दिला आहे.

महाराष्ट्राचा भूगोल:-

या विभागावर राज्यसेवा परीक्षेत आजपर्यंत फारसे प्रश्न विचारले नाहीत तरी या विभागाकडे योग्य ते लक्ष देण्यासाठी पुढील घटक अभ्यासणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील खनिज संपत्ती, मृदा, हवामान, पर्वतरांगा, नद्या, खाडय़ा, बंदरे, राष्ट्रीय महामार्ग आणि त्यांच्या काठावर वसलेली शहरे, लोकसंख्या वितरण, पिके, शेती, उद्योग, वाहतूक, संदेशवहन व पर्यटन. २०१३ साली परीक्षेचे स्वरूप बदलल्यापासून या घटकावरील प्रश्नांची संख्या जरी कमी असली तरी वरील अपेक्षित घटकांचा अभ्यास करणे अपरिहार्य ठरते.

प्राकृतिक व संकल्पनात्मक भूगोलाची तयारी:-

भूगोलाच्या या विभागांतर्गत पृथ्वीच्या उत्पत्तीसंबंधित परिकल्पना आणि त्यांचे निर्माते तत्त्ववेत्ते, पृथ्वीचे अंतरंग आणि त्यातील विविध स्तरांवरील दाब, तापमान असे भौतिक गुणधर्म, सांद्रीभवन आणि सांद्रीभवनादरम्यान उत्सर्जति होणारी ऊर्जा, पृथ्वीच्या परिवलनामुळे निर्माण झालेल्या पृथ्वीच्या विशिष्ट स्थिती (संपात दिन, आयन दिन) मृदा, हवामान, वने, पर्वतरांगा तसेच नदी, वारा, समुद्रलाटा, हिमनद्या यांच्याद्वारा निर्मित भूरूपे, सूर्यमालेतील इतर ग्रहांची वैशिष्टय़े, ज्वालामुखी, भूअंतर्गत हालचाली, बंदरे, सागरी प्रवाह यांच्याबद्दलची माहिती विचारली जाते. या घटकांचा अभ्यास करताना नकाशावाचनाद्वारे कोऱ्या नकाशांवर शक्य त्या ठिकाणी वरील घटकांची माहिती भरून ते नकाशे या शेवटच्या दिवसांत दररोज पाहावेत. जेणेकरून ते आपल्या चित्ररूपी स्मृतीत साठवले जातील आणि परीक्षेच्या वेळी सहज आठवतील.

परीक्षेला जाता जाता:-

राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी भूगोल या विषयाचा अभ्यास करण्यासाठी योग्य रणनीती आखावी. ज्यामुळे या विषयावर येणाऱ्या १२ ते १५ प्रश्नांना सामोरे जाणे निश्चितच शक्य होईल.

त्यासाठी खालील महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

१) दिलेला अभ्यासक्रम नीट पाहणे.

२) चालू घडामोडींची दिलेल्या अभ्यासक्रमाशी सांगड घालणे.

३) सरावासाठी प्राकृतिक भूगोलातील घटकांचे नकाशे तयार करून नियमितपणे पाहणे.

४) नद्यांचा, पर्वतरांगांचा, खाडय़ांचा, बंदरांचा दक्षिणोत्तर वा उत्तर-दक्षिण तसेच पूर्व-पश्चिम वा पश्चिम-पूर्व क्रम ध्यानात ठेवणे.

५)  जाता-जाता कोणते उपघटक कोणत्या स्रोतामधून वाचायचे आहेत त्याची यादी बनविणे. ते घटक पूर्णपणे वाचून त्यांची वारंवार उजळणी करणे. त्यासाठी जुन्या प्रश्नपत्रिकांचा आधार घेणे.

६) या घटकांचा अभ्यास करताना महाराष्ट्र – पाठय़पुस्तक महामंडळाची चौथी ते बारावीपर्यंतची भूगोलाची पुस्तके तसेच एनसीआरटीची अकरावी आणि बारावीची भूगोलाची पुस्तके आणि त्यामधील नकाशे अत्यंत उपयुक्त ठरतात.

भूगोल या विषयावर पूर्वपरीक्षेमध्ये बहुविधानात्मक तसेच ‘जोड य़ा जुळवा’ आणि नकाशावर आधारित प्रश्नांची संख्या अधिक प्रमाणात असल्यामुळे असे प्रश्न सोडविण्याचा सराव करणे अत्यंत आवश्यक ठरते. त्याचबरोबर प्रश्नांचे चिकित्सक विश्लेषण करून त्यामधून निर्माण होणाऱ्या उपप्रश्नांचे आडाखे बांधून चौफेर विचारमंथन करणे अत्यंत आवश्यक ठरते. यासाठी जुन्या प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांचा तोच पर्याय का बरोबर आहे? तो प्रश्न का आला असावा? त्या दृष्टीने या वर्षी कोणता प्रश्न येऊ शकेल? आला तर कसा येईल, हा प्रश्न कसा सोडवावा, यासाठी कोणता अभ्यास केला पाहिजे, या प्रश्नांची उत्तरे मिळवून योग्य रणनीतीने अभ्यास केल्यास या विषयात जास्तीत जास्त गुण मिळविणे सहज साध्य आहे.

राज्यसेवा पूर्व परीक्षा भूगोल

State Services Pre-Examination Geography

9262   24-Jan-2018, Wed

विद्यार्थी मित्रांनो, आपण भूगोलाचा अभ्यास नेमका कसा आणि कोणत्या पद्धतीने करावा यासंदर्भात पाहूयात.

अभ्यासक्रम

आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी भूगोलाच्या अभ्यासक्रमात ‘महाराष्ट्र, भारत आणि जगाचा प्राकृतिक, सामाजिक व आíथक भूगोल’ इतक्याच मुद्दय़ांचा स्पष्ट उल्लेख केला आहे. याच अभ्यासक्रमाची जर आपण फोड केली तर यामध्ये भारताचा व महाराष्ट्राचा रचनात्मक (Physiographic) भूगोल, मुख्य रचनात्मक (Physiographic) विभाग, हवामान (Climate), पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नसíगक संपत्ती- वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल – लोकसंख्या, लोकसंखेचे स्थलांतर व त्याचे Source व Destination वरील परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्टय़ा व त्यांचे प्रश्न, कृषी परिस्थितिकी, पर्यावरणीय भूगोल या घटकांचा समावेश होतो. त्याचबरोबर जगाच्या भूगोलाच्या संदर्भात विविध आखाते, खाडय़ा, सामुद्रधुनी आणि महासागर, आंतरराष्ट्रीय आपत्ती- तिचे साल; झालेली हानी; ठिकाण, व्यापारी केंद्रे त्यांची टोपण नावे, हवामान, भुरुपे, नद्या, वाळवंटे, पर्वतरांगा, पठारे आणि त्यांची वैशिष्टये या उपघटकांचा समावेश होतो.

प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण

गेल्या पाच वर्षांतील आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचा जर बारकाईने अभ्यास केला  तर खालीलप्रमाणे प्रश्नांचे विभाजन दिसून येईल.

वरील विश्लेषणावरून खालील मुद्दय़ांकडे विशेष लक्ष देणे क्रमप्राप्त ठरते.

१. भारताच्या भूगोलावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा भर थोडा कमी कमी होऊन भौगोलिक संकल्पनांवर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांवरील भर वाढत आहे.

२. जगाच्या भूगोलावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची संख्या जवळपास स्थिर आहे.

३. महाराष्ट्राच्या भूगोलावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची संख्या मात्र तुलनेने अगदीच

कमी आहे.

अभ्यासाची रणनीती

१. चालू घडामोडींशी भूगोलाची सांगड- भूगोल या विषयावर गेल्या चार ते पाच वर्षांत विचारलेले प्रश्न पाहिल्यास लक्षात येते की, प्राकृतिक भूगोल, जगाचा भूगोल, भारताचा भूगोल व महाराष्ट्राचा भूगोल या घटकांचा अभ्यास करताना विचारले जाणारे प्रश्न कोणत्या ना कोणत्या बाजूने चालू घडामोडींशी निगडित आहेत. त्यामुळे भूगोलाच्या अभ्यासाची उजळणी करताना गेल्या वर्षभरातील घडलेल्या राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वपूर्ण परिषदा, संमेलने, घटना ज्या ठिकाणी घडल्या आहेत त्या ठिकाणांची एक यादी बनवून महाराष्ट्र, भारत व जगाच्या नकाशात ती ठिकाणे कुठे आहेत, हे पाहून तेथील राजकीय व प्राकृतिक भौगोलिक वैशिष्टये लक्षात ठेवावीत.

२. भूगोलाच्या अभ्यासाची वैज्ञानिक पद्धत- सध्याच्या प्रश्नपत्रिकांच्या कलानुसार भौगोलिक संकल्पनांवरील प्रश्नांवरील भर वाढत आहे यासाठी आपण भूगोलाच्या अभ्यासातील काही संकल्पनात्मक मुद्दय़ांचा खालीलप्रमाणे क्रम लावून घेतला पाहिजे.

१. सर्वप्रथम भूगोलाच्या संज्ञा व संकल्पना याची यादी करावी.

२. भूरूप निर्मिती, भूकंप, वादळांची निर्मिती अशा भौगोलिक संकल्पना समजून घ्याव्यात.

३. भूगोलाच्या शाखा, पृथ्वीची उत्पत्ती, रचना, पृथ्वीचा आस आणि त्याचे कलणे, वातावरण, अक्षांश, रेखांश, हवामानाचे घटक, प्रमाण वेळ अशा पायाभूत संकल्पनांचा अभ्यास करून त्यावर विचारल्या जाऊ शकणाऱ्या प्रश्नांचा मनामध्ये आराखडा तयार करून त्याप्रमाणे त्याची टिपणे काढून ठेवावीत.

एकूणच भूगोल हा घटक ठराविक मुद्दय़ांच्या पाठांतरापुरता मर्यादित नाही तर त्याची नाळ पर्यावरण, विज्ञान, अर्थशास्त्र व चालू घडामोडी या इतर महत्त्वाच्या विषयांशीसुद्धा जुळली आहे. या विष याचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी पारंपरिक अभ्यासाच्या घोकंपट्टीची सवय बाजूला ठेवून परीक्षाभिमुख स्मार्ट स्टडीची पद्धत आत्मसात केली पाहिजे. यासाठी जुन्या प्रश्नपत्रिकांच्या आधारे आपण काही ठोकताळे बांधू शकतो. 

भूगोल : सामाजिक, आर्थिक व पर्यावरणीय घटक

Geography: Social, economic and environmental factors

5008   24-Jan-2018, Wed

भूगोलाचा पायाभूत अभ्यास कशा प्रकारे करायचा त्याची चर्चा यापूर्वी करण्यात आली आहे. या लेखामध्ये सामाजिक, आर्थिक व पर्यावरणीय घटक व आर्थिक घटकामध्ये समाविष्ट कृषीविषयक आयामांचा अभ्यास करण्याची रणनीती पाहू.

पर्यावरणीय घटक:-

अभ्यासक्रमातील भौगोलिक संकल्पना एकत्रितपणे अभ्यासल्यानंतर पर्यावरणीय भूगोलातील वैज्ञानिक संकल्पना समजून घ्यायच्या आहेत. यामध्ये पर्यावरणाचा ऱ्हास, जागतिक तापमान वाढ, हरितगृह परिणाम, जैवविविधतेचा व वनांचा ऱ्हास, कार्बन क्रेडिट या संकल्पना अत्यंत बारकाईने अभ्यासणे आवश्यक आहे. यातून पूर्वपरीक्षेचा सामान्य अध्ययन पेपर १ मधील पर्यावरण घटकाचा मूलभूत अभ्यास पूर्ण होणार आहे. मूलद्रव्यांचे चक्र, अन्नसाखळी व अन्नजाळे या बाबी फक्त समजून घेतल्या तरी चालेल. हा सगळा संकल्पनात्मक अभ्यास ठउएफळ च्या पुस्तकातून करणे आवश्यक आहे.

पश्चिम घाटाची रचना, भौगोलिक वैशिष्टय़े, जैवविविधता, संवर्धनाबाबत समस्या, कारणे, उपाय, संबंधित राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी असा परिपूर्ण अभ्यास महत्त्वाचा आहे.

पर्यावरणविषयक कायदे हा पेपर २ चाही घटक आहे. त्यामुळे मुख्य परीक्षेच्या अभ्यासावेळी पेपर २ च्या विधीविषयक घटकातूनच याची तयारी करावी.

मानवी व सामाजिक भूगोल

मानवी व सामाजिक भूगोलामध्ये वसाहती व स्थलांतर हे मुख्य मुद्दे अभ्यासायचे आहेत. वसाहतींचे प्रकार, आकार, स्वरूप, ठिकाण व आर्थिक महत्त्व पाहायला हवे. नोट्समध्ये स्थानविशिष्ट वसाहती एकत्र, आकाराप्रमाणे डिफाइन केलेल्या एकत्र व आर्थिक दृष्टय़ा डिफाइन केलेल्या एकत्र अभ्यासल्यास बहुविधानी प्रश्नांची उत्तरे शोधण्यास मदत होईल.

स्थलांतराची कारणे, स्वरूप, समस्या, परिणाम व उपाय इत्यादींच्या दृष्टीने अभ्यास आवश्यक आहे. या बाबतीत आकडेवारी हा मुद्दा महत्त्वाचा आहे. विशेषत: महाराष्ट्राच्या संदर्भातील स्थलांतराची आकडेवारी (म्हणजे टक्केवारी) आर्थिक पाहणी अहवालामधून अद्ययावत करून घ्यायला हवी. यामध्ये स्थलांतरातील सामाजिक घटकांचे उतरत्या क्रमाने प्रमाण, कारणांची उतरत्या क्रमाने टक्केवारी, कोणत्या ठिकाणाहून स्थलांतर होत आहे. त्यांच्या टक्केवारीचा उतरता क्रम ही आकडेवारी महत्त्वाची आहे.

महाराष्ट्राचा आर्थिक भूगोल

महाराष्ट्राचा आर्थिक भूगोल हा पूर्णत: तथ्यात्मक घटक आहे. यामध्ये खनिजे व ऊर्जा स्रोत, महत्त्वाचे पायाभूत उद्योग, महत्त्वाची धरणे/प्रकल्प व महत्त्वाची पर्यटन स्थळे यांचा टेबल फॉरमॉटमध्ये अभ्यास करायचा आहे. टेबलमध्ये सामाविष्ट करायचे मुद्दे पुढीलप्रमाणे स्थान, वैशिष्टे, आर्थिक महत्त्व, असल्यास वर्गीकरण, असल्यास पर्यावरणीय मुद्दे, संबंधित समस्या, कारण, उपाय, असल्यास संबंधित चालू घडामोडी.

धार्मिक, वैद्यकीय, सांस्कृतिक पर्यटन, राखीव उद्याने इत्यादी संकल्पना व्यवस्थित समजून घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील सर्व राष्ट्रीय उद्याने, वने माहीत असायला हवीत. भारतातील प्रसिद्ध वने, उद्याने व सद्य:स्थितीत चच्रेत असलेली स्थळे याची माहिती करून घ्यावी. संदर्भ साहित्यातील संबंधित सगळा टेबल पाठ करणे आवश्यक नाही. किल्लेही काही ऐतिहासिक महत्त्वाचे तेवढेच लक्षात घ्यावेत.

कृषीविषयक घटक

कृषीविषयक मूलभूत भौगोलिक व वैज्ञानिक संकल्पना आधीच्या टप्प्यामध्ये समजून घेतलेल्या आहेत. पूर्णपणे कृषीविषयक भाग टेबल फॉरमेटमध्ये अभ्यासता येईल. पीकवाढीसाठी आवश्यक पोषणतत्त्व, त्यांचे महत्त्व, त्याचे स्रोत, अभावामुळे होणारे रोग व अतिपुरवठय़ामुळे होणारे रोग तसेच इतर आनुषंगिक मुद्दय़ांच्या आधारे टेबल तयार करता येईल.

महाराष्ट्रातील कृषी-हवामान विभागांच्या आधारे महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राचा संकल्पनात्मक आणि तथ्यात्मक अभ्यास एकाच वेळी करणे शक्य आहे. प्रत्येक हवामान विभागातील पर्जन्याचे स्वरूप, मृदेचा प्रकार, महत्त्वाची पिके, जलव्यवस्थापन, सिंचन पद्धती इत्यादींचा अभ्यास स्वरूप, समस्या, कारणे, उपाय या चार पलूंच्या आधारे करावा. समस्यांचा विचार करताना नसíगक स्थान, स्वरूपामुळे निर्माण होणाऱ्या, चुकीच्या पीकपद्धतीमुळे निर्माण होणाऱ्या, खतांच्या वापरामुळे, सिंचन पद्धतीमुळे, औद्योगिक व इतर प्रदूषणांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचा समावेश करणे आवश्यक आहे.

प्रत्येक कृषी हवामान विभागाचा अभ्यास करतानाच महाराष्ट्रातील शेती, कोरडवाहू, जिरायती, सिंचित शेती इत्यादीचा अभ्यास पूर्ण होणार आहे. यामध्ये घटकांचे एकमेकांशी असलेले परस्परसंबंध समजून घेऊन अभ्यास करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाचे दुष्काळ निवारण व इतर कृषी व ग्रामीण विकासासाठीचे उपक्रम, योजना इत्यादी बाबी पेपर ४ मधील अर्थव्यवस्था घटकांशी संलग्न आहेत. त्यामुळे एकत्रित अभ्यास फायद्याचा ठरेल.

शाश्वत शेती, सेंद्रित शेती, जी. एम. बियाणी, सिंचनाचे प्रकार, शेती व पर्यावरण यांचा परस्पर संबंध समजावून घेणे व त्यांचा तर्कशुद्ध वापर करणे आवश्यक आहे.

दूरसंवेदन

दूरसंवेदन हा भौगोलिक-तंत्रज्ञानात्मक घटक आहे. भारतीय दूरसंवेदी उपग्रह, त्यांच्या निर्मितीचे टप्पे, प्रस्तावित नवे उपग्रह या तथ्यात्मक माहितीबरोबरच उपग्रहांच्या कार्यपद्धती, त्यांचा वापर, प्रक्षेपण प्रणाली व त्यांचा उपयोग या संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे.

चालू घडामोडी

चालू घडामोडींपैकी ज्या पूर्णपणे भौगोलिक घटना आहेत त्यांचा नकाशा समोर ठेवून अभ्यास करणे आवश्यक आहे. त्याच वेळी संबंधित मूलभूत संकल्पनाही समजून घ्यायला हव्यात. पूर्णपणे भौगोलिक चालू घडामोडींशिवाय पर्यावरण संबंधी चालू घडामोडींमध्ये त्यांचा भौगोलिक पैलू महत्त्वाचा असतो.

कृषीविषयक चालू घडामोडींमध्ये जी. एम. बियाणी, नव्या पीक पद्धती, नवे वाण इत्यादींचा अभ्यास पेपर ४ शीही संबंधित आहे. त्यामुळे गांभीर्याने करणे आवश्यक आहे.

दूरसंवेदन क्षेत्रातील चालू घडामोडी इंडिया ईयर बुक व इंटरनेटवरून पाहाव्या लागतील.

पेपर ४ मधील आपत्ती व्यवस्थापन हा चालू घडामोडींचा भाग नसíगक आपत्तींच्या अनुषंगाने भूगोलाच्या अभ्यासात समाविष्ट करायला हवा.

वाऱ्यामुळे तयार होणारी भूरूपे

Effect Of wind on Landmass

5916   15-Jan-2018, Mon

वारा प्रामुख्याने खनन, वहन आणि संचयन असे कार्य करीत असल्याने विविध भूआकारांची निर्मिती होते.
वाऱ्याचे खननकार्य : वाऱ्याचे खननकार्य प्रामुख्याने पुढील प्रकारे घडत असते-
अपवहन : वाळवंटी प्रदेशात वाऱ्याचा वेग जास्त असल्याने वाऱ्याबरोबर अनेक लहान कण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेले जातात, त्यास अपवहन असे म्हणतात. जेथून हे पदार्थ उचलून नेले जातात तेथील भाग उघडा पडतो व तेथे लहान खड्डे पडतात. 
अपघर्षण : वाऱ्याबरोबर अनेक पदार्थ वाहात असताना या पदार्थाचा आघात वाऱ्याच्या मार्गातील खडकांवर किंवा भूपृष्ठावर होऊन मार्गातील खडक गुळगुळीत व चकचकीत होतात, या क्रियेस ‘अपघर्षण’ असे म्हणतात.
संन्निघर्षण : वाऱ्याबरोबर वाहत असणाऱ्या वाळूच्या कणांचा आघात वाऱ्याच्या मार्गातील खडकांवर किंवा भूपृष्ठावर होऊन त्या कणांचे तुकडे होतात. वाळूचे कण फुटतात. कणांचा आकार लहान लहान होत जातो, त्याला ‘संन्निघर्षण’ असे म्हणतात.
वाऱ्याच्या खननकार्यामुळे निर्माण झालेली भूरूपे : 

अपवहन खळगे : वाळवंटी प्रदेशात वाऱ्याच्या आघाताने खडकाचे तुकडे होऊन तसेच खड्डय़ाच्या जागी कधी पाणी साचून खडक कुजून कमकुवत होतात. हे तुकडे वाऱ्याबरोबर वाहत जाऊन तेथे खड्डे तयार होतात. या खळग्यांनाच ‘अपवहन खळगे’ असे म्हणतात. अशी उदाहरणे सहारा, आफ्रिकेतील कलहारी, आशियातील मंगोलिया, पश्चिम ऑस्ट्रेलिया इ. वाळवंटी प्रदेशात अपवहन खळगे आहेत. 
भूछत्र खडक : वारा वाहत असताना वाऱ्याबरोबर वाळूचे अनेक कण वाहत असतात. अशा वेळी वाऱ्याच्या मार्गात एखादा शिलाखंड आल्यास व वाऱ्याची दिशा सतत बदलत राहिल्यास शिलाखंडाच्या पायथ्यापासून एक ते दीड मीटर उंचावर असलेल्या भागाची चोहोबाजूंनी घर्षणाने झीज होते. त्याला छत्रीसारखा आकार प्राप्त होतो. अशा वैशिष्टय़पूर्ण शिलाखंडाच्या आकाराला भूछत्र खडक असे म्हणतात. अशी उदाहरणे सहारा व इराणच्या वाळवंटात मोठय़ा प्रमाणात आहेत.
झ्युजेन : वाळवंटी प्रदेशात क्षितिजसमांतर कठीण व मृदू खडकांचे स्तर एकमेकांवर आडवे असल्यास व त्यात जोड किंवा संधी असल्यास ऊन, वारा आणि जास्तीत जास्त तापमान व कमीत कमी तापमान यामुळे जोड रुंदावत जातात. अशा वेळी कठीण खडकाची फारशी झीज होत नाही. जो आकार प्राप्त होतो, त्यास झ्युजेन असे म्हणतात. झ्युजेनची उंची साधारण ४० ते ४५ मीटपर्यंत असते. अशी भूरूपे अरेबिया, इजिप्त व लिबियाच्या वाळवंटी प्रदेशात आढळतात.
यारदांग : वाळवंटात ज्या ठिकाणी कठीण आणि मृदू खडक हे लंबवत स्थितीत वाऱ्याच्या दिशेला समांतर व एकानंतर एक असतील किंवा एकमेकांना समांतर असतील तर अशा वेळी वाऱ्याच्या खननकार्यामुळे मृदू खडकाची जास्तीत जास्त झीज होऊन मृदू खडक किंवा स्तर नाहीसा होऊन यारदांग तयार होतात. अशी यारदांगे मध्य आशिया खंडातील गोबीच्या वाळवंटात, दक्षिण अमेरिकेतील अटाकामाच्या वाळवंटात आढळतात.
 

वातावरणीय बदल अनुकूलन धोरण

Adaptation Strategy for Climate Change

2636   05-Jan-2018, Fri

नैसर्गिक व मानवनिर्मित घडामोडींमुळे पृथ्वीच्या तापमानात वाढ होऊन वातावरणात प्रतिकूल बदल होत आहेत. प्रामुख्याने कार्बन डाय ऑक्साईड, नायट्रोजन व मिथेन या हरितगृह वायूंचे प्रमाण वाढल्याने जागतिक तापमानात सन १८८० पासून सरासरी ०.८ सेल्सिअसने वाढ झाली आहे. यामुळे मुख्यत: पर्जन्यवृष्टी, मानवी आरोग्य, वन्यजीव, जैवविविधता, शेती, मानवी राहणीमान, उपजीविकेची साधने इत्यादींवर विपरीत परिणाम होत आहे.

वातावरणातील प्रतिकूल बदलांना सामोरे जाण्यासाठी राज्याचे वातावरणीय बदल अनुकूलन धोरण तयार करण्यात आले आहे. या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पर्यावरण विभागामध्ये स्वतंत्र जलवायू परिपर्तन कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. तसेच या धोरणाच्या माध्यमातून पर्यावरणास पूरक अनुकूल गावे आणि शहरे विकसित करण्यात येणार आहेत.

राष्ट्रीय वातावरणीय बदल कृती आराखडय़ाप्रमाणे देशातील सर्व राज्यांना राज्यस्तरीय कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश केंद्र शासनाकडून देण्यात आले आहेत. राज्य शासनाने टेरी या संस्थेच्या सहकार्याने २०३०, २०५० व २०७० या कालखंडामध्ये होणाऱ्या वातावरणीय बदलांबाबत शास्त्रोक्त अनुमानांच्या अनुषंगाने सविस्तर कृती आराखडा तयार केला आहे. मुख्यत शेती व अन्नसुरक्षा, आरोग्य, जंगले, जलस्रोत, सागरी परिसंस्था व प्रजाती, नैसर्गिक अधिवास व जैवविविधता, उपजीविकेची साधने, पायाभूत सुविधा इत्यादींवर होणाऱ्या परिणामांची शहानिशा करून ते कमी करण्यासाठी किंवा त्यांना सामोरे जाण्यासाठी क्षेत्रनिहाय अनुकूलन व प्रतिरोधक धोरण ठरविण्याबाबत यामध्ये शिफारशी सुचविण्यात आल्या आहेत.

राज्याचे सरासरी तापमान वाढणार असले तरी कमाल तापमानापेक्षा किमान तापमान असलेल्या जिल्ह्य़ामध्ये अधिक परिणाम होणार आहे,  संवेदनशीलता निर्देशांकानुसार (व्हन्रेबिलिटी इंडेक्स) नंदुरबार जिल्हा सर्वात जास्त संवेदनशील आहे. त्याखालोखाल धुळे, बुलढाणा, जळगाव, हिंगोली, नाशिक, जालना, गोंदिया, वाशिम, गडचिरोली या जिल्ह्यांचा क्रम लागतो.

या अहवालात वने, जलसंपदा, कृषी, ऊर्जा, सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, आपत्ती व्यवस्थापन, ग्रामविकास, नगरविकास, पर्यावरण, वित्त व नियोजन अशा विभागनिहाय शिफारशी सुचविलेल्या आहेत. त्यांपैकी १४ प्रमुख शिफारशींचा प्राधान्याने विचार करून राज्याचे वातावरणीय बदल अनुकूलन धोरण तयार करण्यात आले आहे.

या धोरणातील महत्त्वाच्या तरतुदी पुढीलप्रमाणे-

 1. नदी बारमाही प्रवाही ठेवून भूजल पातळी अबाधित राखण्यासाठी नदीच्या उगमस्थानांच्या जंगलांचे रक्षण करणे.
 2. बदलत्या वातावरणात स्थानिक हवामानात वाढणाऱ्या व तग धरणाऱ्या पिके व फळांच्या प्रजातींच्या संशोधनास व लागवडीस प्रोत्साहन देणे.
 3. पारंपरिक पिकांचे संवर्धन करणे.
 4. उपजीविकेच्या पर्यायी संसाधनांना प्रोत्साहन देणे.
 5. सौर जल पंपासह सौर व पवन ऊर्जेच्या वापरासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून शेती उत्पादकता वाढविणे.
 6. वातावरण बदलास पूरक (Climate Proof Village) गावांच्या निर्मितीवर भर
 7. गाव पातळीवर लोकसहभागातून जलसंधारण, डोंगर दत्तक घेणे, नदी दत्तक घेणे, गावतळे, गावाची वनराई इत्यादी योजनांचा विकास करून पर्यावरण संवर्धन करणे.
 8. वातावरणीय बदलासंबंधी धोरणाच्या अंमलबजावणीसाठी अनुकूलन (अ‍ॅडॉप्टेशन) प्रस्ताव तयार करणे आणि केंद्र व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबर समन्वय साधून निधी प्राप्त करणे.
 9. वातावरणीय बदलामुळे रोगराईच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांना आरोग्यविषयक सल्ला किंवा तसेच आगाऊ सूचना देणारी यंत्रणा विकसित करणे.
 10. सागरी किनारी कांदळवने व प्रवाळाचे (कोरल) संवर्धन.
 11. सेंद्रिय शेतीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासह सेंद्रिय उत्पादनास विशिष्ट बाजारपेठ उपलब्ध करून देणे.
 12. पिके व फळांचे नुकसान होऊ नये यासाठी सामूहिक शीतगृहे निर्माण करणे.
 13. मत्स्य व्यवसायास पूरक पायाभूत सुविधा पुरविणे व प्रोत्साहन देणे.
 14. आपत्ती व्यवस्थापनामध्ये परिस्थितीवर आधारित (Ecosystem based) उपाययोजनांचा समावेश करून राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या सध्याच्या धोरणामध्ये सुधारणा करणे.
 15. राज्यातील संवेदनशील (व्हल्नेरेबल) जिल्ह्य़ांसाठी परिस्थितिकीवर आधारित विशेष आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा विकसित करणे.
 16. पाण्याच्या कमतरतेवर मात करण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया, पुनर्चक्र व पुनर्वापर बंधनकारक करणे, हरितगृह वायूंचे प्रमाण कमी करण्यासाठी नागरी घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाबाबत विशेष धोरण ठरविणे.
 17. पाण्याचा योग्य वापर करण्याबाबत कृती आराखडा तयार करणे.
 18. शहरांत वाहनांपासून होणाऱ्या प्रदूषणाबाबत कडक मानके ठरविणे.
 19. हवा प्रदूषण व त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम यासाठी जनजागृती कार्यक्रम राबविणे.
 20. पुरांची तीव्रता व वारंवारिता वाढणार असल्याने नदी काठावर उच्चतम पूररेषेपलीकडे बांधकामास अनुमती देण्याविषयी धोरण ठरविणे.

बेटावरील जिल्हा

mpsc geography

1730   05-Jan-2018, Fri

बेटावरील जिल्हा

 

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस

 

गिनीज वर्ल्ड रेकॉड्सच्या निकषांनुसार आसाम या राज्यातील ब्रम्हपुत्रा नदीवरील ‘माजुली’ बेट हे जगातील सर्वात मोठे नदीवरील बेट ठरले आहे. या आधी क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठ्या असणा-या ब्रझिलच्या ‘माराजी’ बेटास मागे टाकून माजुली बेटाने हा विक्रम नोंदवला आहे. पर्यावरणीय परिस्थिती बिघडल्यामुळे आणि

नदी पात्राच्या -हासामुळे या बेटाचे क्षेत्रफळ २०वे शतक सुरू होण्यापूर्वी १,२५० चौकिमी होते, ते आता घटले आहे. आता ते फक्त ३५२ चौकिमी इतकेच उरले आहे. आजुबाजूच्या नद्यांचे पाणी वाढल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. मागील काही वर्षांतील पूर-परिस्थिती आणि बेटावरील नदीकाठाच्या भू-क्षरणामुळे बेटाच्या एक तृतीयांश भूभाग-क्षेत्रात घट झाली आहे.

 

माजुली बेट 

आसाममधील ब्रम्हपुत्रा नदीमध्ये हे बेट आहे. माजोलीचा अर्थ होतो की दोन समांतर नद्यांमधला प्रदेश. बेटाच्या उत्तरेस ब्रम्हपुत्रेची उपनदी सुबानसिरी आहे. दक्षिणेस ब्रम्हपुत्रा आणि खेरकानिया, सुली या नद्या आहेत. ब्रह्मपुत्रा व तिच्या उपनद्या विशेषतः लोहित यांनी मार्ग बदल्याने हे बेट निर्माण झाले आहे. बेटावर १४४ खेड्यांमध्ये दीड लाखाच्या वर लोकसंख्या वास्तव्यास आहे. माजुली बेट हे दुर्मीळ पक्षी, पाणी व वनस्पतींचे ठिकाण आहे. स्थलांतरित पक्ष्यांसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. या बेटास जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी युनोस्कोने नामनिर्देशित केले होते.

 

सांस्कृतिक महत्त्व

माजुली बेटावर असलेल्या लोकसंख्येत मिशींग, देवरी, सोनोवाल कछारी या जमातींचा समावेश आहे. (याच बेटावरील सोनोवाल कछारी जमातीचे सर्बानंद सोनोवाल हे सध्या आसामचे मुख्यमंत्री आहेत.) मिशींग, आसामी, देवरी या भाषा येथे बोलल्या जातात.

 

सांस्कृतिक राजधानी

गेली ५०० वर्षे माजुली ही आसामची सांस्कृतिक राजधानी असून आसामी संस्कृतीचे पाळणाघर आहे. माजुली हे बेट आसामी नव-वैष्णव संस्कृतीचे केंद्र मानले जाते. थोर संत व समाजसुधारक ‘श्रीमंत शंकरदेव’ यांनी पंधराव्या शतकात या संस्कृतीची स्थापना केली होती. माजुलीमध्ये वैष्णव संस्कृतीच्या धार्मिक स्थळांना ‘सत्र' म्हटले जाते.

 

'सत्र' वैभव

त्यामध्ये वैष्णव पंथाशी संबंधित ६५ सत्रे आहेत. परंतु भौगोलिक बदलामुळे काही स्थळांमध्ये बदल झाला आहे. सध्याच्या मुख्य सत्रामध्ये गरामुख, दाखीनपत, कमालाबारी, अन्नीयती आणि बेन्गीती यांचा समावेश होतो. सत्रांनी जी कला व कारागिरीची परंपरा जपली आहे, ती खास इथलीच आहे. उदा. मुखवटेनिर्मिती किंवा सर्वोत्तम बोटींचे निर्माण. सत्र परंपरेने निर्माण केलेली नाट्य-नृत्य परंपरा 'सत्तारिया' हिला संगीत नाटक अकादमीने शास्त्रीय नृत्याचा दर्जा दिला आहे. श्रीमंत शंकरदेव यांनी ही परंपरा सुरू केली, असे मानले जाते. त्याशिवाय कृष्णाशी संबंधित 'रास' उत्सवदेखील प्रसिद्ध आहे. दूरदूरवरून लोक तो बघायला येतात.

 

नवीन जिल्हा

आसाम सरकारने माजुली बेटास नवीन जिल्ह्याचा दर्जा दिला आहे. तो आसामचा ३५वा जिल्हा असेल. यापूर्वी माजुली हा जोरहाट जिल्ह्याचा भाग होता. जिल्ह्याचा दर्जा मिळालेले माजुली हे देशातील पहिले नदीवरील जिल्हा बेट आहे. शेतीची समृद्ध परंपरा येथे आहे. १०० प्रकारचा भात येथे पिकवला जातो, तोही कुठलेही कृत्रीम बियाणे किंवा रसायने न वापरता. शेती खालोखाल वस्त्रोद्योग प्रसिद्ध आहे. विशेषतः आसाममधील प्रसिद्ध मुगा रेशीम येथे तयार केली जाते.

 

ईशान्य भारताचे महत्त्व

ईशान्य भारताच्या सांस्कृतिक, पर्यावरणीय आणि भौगोलिक घटकांवर परीक्षेमध्ये नेहमीच प्रश्‍न विचारले जातात. त्यामध्ये प्रश्‍नांचे स्वरूप हे चालू घडामोडीशी निगडीत असते. याप्रकारे घटकाचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांनी चालू घडामोडीवर बारकाईने लक्ष द्यावे.

पृथ्वीचे अंतरंग

Interior of Earth mpsc Geo topic

2195   15-Dec-2017, Fri

पृथ्वीच्या आंतरांगावरच पृथ्वीच्या पृष्ठभागाची रचना अवलंबून असते. म्हणून पृथ्वीच्या आंतरांगाचा अभ्यास महत्वाचा ठरतो. पृथ्वीच्या आंतरांगाचे गूढ अजूनही मानवास उलगडलेले नाही. पृथ्वीच्या आंतरांगाच्या अभ्यासात प्रमुख दोन अडचणी आहेत

 1. पृष्ठभागावरील खडक हा कठीण व अपारदर्शक आहे.  
 2. पृथ्वीच्या अंतर्गत भागात तापमान वृद्धी होत जाते. साधारणपणे ३० मी खोलीवर 1°C तापमान वाढत जाते.

 

अंतरंगाची माहिती मिळवण्यासाठी भूकंपशास्त्राची मदत होते. भूकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्रास "सेस्मोग्राफ" अथवा "सेस्मॉमीटर" असे नाव आहे. तसेच भूकंपाची ’महत्ता’ मोजण्यासाठी "रिश्टर स्केल" ह्या एककाचा वापर केला जातो. जेव्हा भूकंप होतो तेव्हा सेस्मॉमीटरवर तीन प्रकारच्या लहरींची नोंद होते.

 • प्राथमिक लहरी (P Waves)
 • दुय्यम लहरी (S Waves)
 • पृष्ठीय लहरी (L Waves)

या लहरींच्या अभ्यासावरून पृथ्वीच्या अंतरंगाची माहिती भूगर्भशास्त्रज्ञांना मिळते.

 • प्राथमिक लहरींची वैशिष्ट्ये:
  • भूकंप यंत्रावर या लहरींची नोंद सर्वप्रथम होते, याचा आर्थ या लहरींचा वेग सर्वात जास्त असतो.
  • प्राथमिक लहरींमुळे वस्तूकणांची हालचाल ही पुढे-मागे होते. प्राथमिक लहरी या पृथ्वीच्या पृष्ठभागापासून बऱ्याच खोलपर्यंत प्रवास करतात.
  • प्राथमिक लहरी या घन तसेच द्रव माध्यमातून प्रवास करतात. परंतु मध्यम बदलले की या लहरी वाक्रीभूत होतात.

 

 • दुय्यम लहरींची वैशिष्ट्ये:
  • प्राथमिक लहारीनंतर या लहरींची नोंद होते.
  • प्राथमिक लहरींपेक्षा वेग कमी.वस्तूकणांची हालचाल लहरींच्या काटकोनामध्ये होते. पृष्ठभागापासून २८८०km पर्यंतच प्रवास करतात.
  • दुय्यम लहरी फक्त घन माध्यमातूनच प्रवास करतात. मध्यम बदलले की या लहरी परावर्तीत होतात.

 

 • पृष्ठीय लहरींची वैशिष्ट्ये:
  • पृथ्वीच्या कवचामध्येच या लहरी प्रवास करतात.
  • या लहरींचा वेग कमी असतो.
  • या लहरींमुळे वस्तूकणांची हालचाल विविध दिशांनी होते.
  • या लहरी अतिशय विध्वंसख असतात. पृथ्वीच्या आंतरांगासंबंधी निष्कर्ष

 

पृथ्वीचा केंद्रभाग द्रवरूप:-

 • पृथ्वीचे अंतरंग पूर्णतः
 1. घनरूप असते तर 'P' व 'S' लहरी गाभ्यातून आरपार गेल्या असत्या व भूकंप झालेल्या ठिकाणच्या विरुद्ध बाजूसदेखील भूकंपाची नोंद झाली असती.
 2. परंतु भूकंप लहरींच्या निरीक्षणावरून असे आढळते की, विरुद्ध बाजूस फक्त 'P' लहरींची नोंद होते.
 3. 'S' लहरी फक्त घन भागातून प्रवास करतात. यावरून केंद्रभाग द्रवरूप असावा असा निष्कर्ष काढता येतो.

भूगर्भातील गाभ्याचा व्यास ६९४२ km :-

भूकंपाच्या उगमस्थानापासून १०३° चा कोण करून लहरी वळतात.

१०३° ते १४२° प्रदेशात P व S लहरींची नोंद होत नाही; यामुळे या प्रदेशाला भूकंप छाया प्रदेश असे म्हणतात. यावरून भूगार्भाच्या गाभ्याचा व्यास ६९४२ km आहे असे निश्चित झाले.

भाय्य गाभा द्रवरूप:-

गाभ्याच्या बाह्य अवरनाजवळ 'P' लहरींचा वेग एकदम कमी होतो. या गाभ्याचा बाह्य भाग द्रवरूप आहे असा निष्कर्ष काढता येतो.

कठीण घन पदार्थाचा आंतगाभा:-

अंतर्गाभ्यात 'P' लहरींचा वेग वाढतो. यावरून असे अनुमान काढले जाते की, कठीण अशा घन पदार्थाचा आंतर्गाभा बनला असावा.

कठीण घन पदार्थाचे प्रावरण:-

'P' व 'S' लहरींचा वेग प्रवारानातून प्रवास करताना इतका प्रचंड असतो की, अशा लहरी फक्त अति कठीण व घन पदार्थातूनच प्रवास करतात.

वस्तुनिष्ठ महाराष्ट्र

Maharashtra Geo with short refrences

4606   02-Dec-2017, Sat

-----------------------------------------------------------------------------------

महाराष्ट्र : औष्णिक विद्युत प्रकल्प

-----------------------------------------------------------------------------------

०१) कोराडी, खापरखेडा नागपुर.

०२) दुर्गापूर. बल्लारपूर (चंद्रपुर)

०३) डहाणू, चोला ठाणे.

०४) एकलहरे नाशिक.

०५) बीड. परळी वैजनाथ.

०६) फेकरी भुसावळ.

०७) पारस. अकोला.

०८) ऊरण. रायगड.

-----------------------------------------------------------------------------------

कोकण प्रशासकीय विभागातील अभयारण्ये

-----------------------------------------------------------------------------------

०१) कर्नाळा, फनसाड रायगड.

०२) तुंगारेश्वर, तानसा ठाणे.

०३) मालवण. सिंधुदुर्ग.

 

-----------------------------------------------------------------------------------

पुणे प्रशासकीय विभागातील अभयारण्ये

-----------------------------------------------------------------------------------

 

०१) भिमाशंकर अभयारण्य. पुणे व ठाणे.

०२) कोयना अभयारण्य. सातारा.

०३) सागरेश्वर अभयारण्य. सांगली.

०४) राधानगरी अभयारण्य. कोल्हापुर.

०५) मयुरेश्वर सूपे अभयारण्य. पुणे

 

-----------------------------------------------------------------------------------

नाशिक प्रशासकीय विभागातील अभयारण्ये

-----------------------------------------------------------------------------------

 

०१) रेहेकुरी अभयारण्य. अहमदनगर.

०२) माळढोक पक्षी अभयारण्य. सोलापुर व अहमदनगर.

०३) कळसुबाई व हरिश्चंद्र अभयारण्य. अहमदनगर.

०४) यावल अभयारण्य. जळगांव.

०५) अनेर धरण अभयारण्य. नंदुरबार.

 

-----------------------------------------------------------------------------------

औरंगाबाद प्रशासकीय विभागातील अभयारण्ये

-----------------------------------------------------------------------------------

०१) जायकवाडी पक्षी अभयारण्य. औरंगाबाद व नगर.

०२) नायगांव मयुर अभयारण्य बीड.

०३) येडशी रामलिंग घाट अभयारण्य. उस्मानाबाद.

०४) गवताळा औटरम घाट अभयारण्य. औरंगाबाद व जळगांव.

 

-----------------------------------------------------------------------------------

अमरावती प्रशासकीय विभागातील अभयारण्ये

-----------------------------------------------------------------------------------

०१) ढाळकोळकाज/मेळघाट, वाणअभयारण्य. अमरावती.

०२) काटेपूर्णा अभयारण्य. वाशिम.

०३) पैनगंगा अभयारण्य. नांदेड व यवतमाळ.

०४) अंबाबर्वा, ज्ञानगंगा, लोणार अभयारण्य बुलढाणा.

०५) नर्नाळा अभयारण्य. अकोला.

०६) टिपेश्वर अभयारण्य. यवतमाळ.

 

-----------------------------------------------------------------------------------

नागपुर प्रशासकीय विभागातील अभयारण्ये

-----------------------------------------------------------------------------------

०१) नागनागझिरा गोंदिया

०२) बोर. वर्घा व नागपुर

०३) अंधारी चंद्रपुर

०४) चपराळा, भांबरागड. गडचिरोली.

 

-----------------------------------------------------------------------------------

महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन केंद्रे

 

-----------------------------------------------------------------------------------

 

०१) ध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, - पाडेगांव (सातारा)

०२) गवत संशोधन केंद्र, - पालघर (ठाणे)

०३) नारळ संशोधन केंद्र, - भाटय़े (रत्नागिरी)

०४) सुपारी संशोधन केंद्र, - श्रीवर्धन (रायगड)

०५) काजू संशोधन केंद्र, - वेंगुर्ला (सिंधुदुर्ग)

०६) केळी संशोधन केंद्र, - यावल (जळगाव)

०७) हळद संशोधन केंद्र, - डिग्रज (सांगली)

०८) राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, हिरज - केगांव (सोलापूर)

०९) राष्ट्रीय कांदा- लसून संशोधन केंद्र - राजगुरूनगर (पुणे)

 

-----------------------------------------------------------------------------------

महाराष्ट्रातील :अष्टविनायक

-----------------------------------------------------------------------------------

०१) महागणपती रांजणगांव (पुणे)

०२) चिंतामणी थेऊर. (पुणे)

०३) मोरेश्वर. मोरगांव. (पुणे)

०४) विघ्नहर. ओझर. (पुणे)

०५) गिरिजात्मक. लेण्याद्री (पुणे)

०६) बल्लाळेश्वर. पाली (रायगड)

०७) वरद विनायक. महाड. (रायगड)

०८) सिध्दी विनायक. सिध्दटेक (अहमदनगर)

नावीन्यपूर्ण पर्यटन – २

tourism-sector-mpsc-exam in mumbai

1383   02-Sep-2017, Sat

कृषी पर्यटन

शेती तसेच ग्रामीण संस्कृती यांची ओळख पर्यटकांना करून देण्याच्या दृष्टीने आपला शेती व्यवसाय सांभाळून शेतकरी पर्यटनविषयक सुविधा विकसित करतात. यामध्ये निवासाची व्यवस्था, ग्रामीण सभामंडप, लोककलांचे सादरीकरण, ग्रामीण स्वयंपाक, भोजन व जीवनपद्धतींची ओळख अशा बाबी समाविष्ट असतात. १६ मे हा जागतिक कृषी पर्यटन दिवस महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघ (मार्ट) यांच्याकडून दर वर्षी साजरा करण्यात येतो.

सामाजिक पर्यटन

तळागाळातून सुरू झालेल्या राष्ट्रनिर्माणाच्या चळवळी, समाजप्रबोधन/ समाजसेवेचे प्रेरणादायी प्रकल्प यांना भेट देऊन त्यांचा अनुभव घेणे/ समजावून घेणे या उद्देशाने सामाजिक पर्यटन (र्रू-स्र्१ॠ१ी२२्र५ी ३४१्र२े) ही संकल्पना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ राबवीत आहे. यासाठी विविध पर्यटन संस्थांना प्रमाणित करण्यात आले आहे. यामध्ये आनंदवन, हेमलकसा, सर्च संस्था, राळेगणसिद्धी, हिवरे बाजार, अन्सारवाडा/ आंबेजोगाई, सेवालय, दापोली अशी ठिकाणे व संस्थांना भेटी आयोजित करण्यात येतात.

हाऊसबोट

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील खाडय़ांमध्ये पर्यटकांना भ्रमंती करता यावी यासाठी हाऊसबोट प्रकल्प राबविण्यात येत आहे. या अंतर्गत चार हाऊसबोट तारकली येथे उपलब्ध आहेत. हाऊसबोटीसाठी पर्यटकांचा वाढता प्रतिसाद पाहून रत्नागिरी जिल्ह्य़ातील बाणकोट व दाभोळ या खाडी क्षेत्रात हाऊसबोट प्रकल्प राबवण्यात येणार आहेत.

नवीन सेवा

 • क्रूझ सेवा – मुंबई शहरात देशी-विदेशी पर्यटकांसाठी खासगी उद्योजकांच्या सहकार्याने मुंबई-हार्बर क्रूझ सेवा सुरू करण्यात येणार आहे.
 • फ्लॉटेल – मुंबईजवळच्या समुद्रामध्ये महामंडळाकडून तरंगते उपाहारगृह (ा’ं३्रल्लॠ १ी२३ं४१ंल्ल३) विकसित करण्यात येत आहे.
 • ऑम्फिबियन एअरक्राफट – राज्यामध्ये जलविमान वाहतूक अंतर्गत ऑम्फिबियन एअरक्राफ्ट सेवा खासगी उद्योजकांच्या
 • सहकार्याने सुरू करण्याचा महामंडळाने निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात सदरची सेवा जुहू चौपाटी ते गिरगाव चौपाटी अशी सुरू करण्यात येणार आहे.
 • समुद्रविश्व प्रकल्प – महामंडळाने तोंडवली- वायंगणी, जि. सिंधुदुर्ग येथे पर्यटकांसाठी अत्याधुनिक समुद्रविश्व प्रकल्प उभारण्याच्या निर्णय घेतला आहे.

पंचतीथ्रे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनाशी संबंधित पाच स्थळे ही पंचतीर्थे म्हणून विकसित करण्यासाठी शासनाने घेतली आहेत.

१) इंग्लंडमधील घर – लंडनच्या स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अ‍ॅण्ड पॉलिटिकल सायन्समध्ये त्यांनी एम.एस्सी.साठी प्रवेश घेतल्यावर डॉ. आंबेडकर १९२१-२२ अशी दोन वर्षे लंडनमध्ये किंग हेत्री या मार्गावर एका घरात राहत होते.

२) इंदू मिल – मुंबईच्या दादर भागात

डॉ. आंबेडकरांचे राजगृह हे निवासस्थान होते. त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांचे पाíथव शरीर इथेच अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले.

३) दिल्ली येथील निवासस्थान – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा देशाचे कायदामंत्री बनले तेव्हा दिल्लीमधील २६, अलिपूर रोड येथील निवासस्थान त्यांना देण्यात आले होते. येथेच त्यांनी बुद्धा अ‍ॅण्ड हिज धम्मा, बुद्ध और कार्ल मार्क्‍स हे प्रसिद्ध ग्रंथ लिहिले.

४) महू – येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी झाला. आता महूचे नामांतर आंबेडकरनगर असे करण्यात आले आहे.

५) आंबडवे – रत्नागिरी जिल्ह्य़ातील मंडणगड तालुक्यातील आंबडवे हे गाव बाबासाहेबांच्या पूर्वजांचे गाव. इथे सपकाळ कुटुंबीय वास्तव्य करून राहतात.

खासगी कंपन्यांकडून विकसित नावीन्यपूर्ण संकल्पना –

साहसी खेळ पर्यटन 

सीएसी ऑलराऊंडर यांच्याकडून पर्यटनासाठी नागपूरजवळील रामटेक येथे पॅरासीिलग, पॅराग्लायडिंग, पॅरा मोटरिंग असे विविध साहसी खेळांवर आधारित अ‍ॅडव्हेंचर व्हिलेज साकारण्यात आले आहे, तर चिखलदरा (अमरावती) येथे फ्लाियग फॉक्स व व्हॅली क्रॉसिंग या साहसी खेळांसाठी व्हेंचर व्हिलेज विकसित करण्यात आले आहे.

हॉट एअर बलून

स्काय वॉल्टझ कंपनीकडून लोणावळा येथे ६० मिनिटांची हॉट एअर बलून सफर घडविण्यात येते.


Top