पुरस्कारांचे महत्त्व

current affairs, loksatta editorial-Mpsc Exam Preparation Apk 94

1006   13-Oct-2019, Sun

लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा सराव प्रश्न

लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा १३ तारखेला होत असून यामध्ये ‘पुरस्कार’ घटकाचा स्वतंत्रपणे उल्लेख करण्यात आला आहे. या घटकाचे सराव प्रश्न या लेखामध्ये देण्यात येत आहेत.

प्रश्न १. सन २०१९च्या पुण्यभूषण पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला?

१) आशा भोसले

२) बाबासाहेब पुरंदरे

३) जयंत नारळीकर

४) डॉ. जी. बी. देगलूरकर

 

 प्रश्न २. पुढीलपकी कोणत्या पुरस्कारास ‘प्रति नोबल पुरस्कार’ म्हटले जाते?

१) मॅगसेसे पुरस्कार

२) राईट लाईव्हलीहूड पुरस्कार

३) एबल पुरस्कार

४) गांधी शांतता पुरस्कार

 

प्रश्न ३. ७८वे शांतीस्वरूप भटनागर पुरस्कारविजेते व त्यांचे कार्यक्षेत्र यांच्या योग्य जोडय़ा जुळवा.

अ. डॉ. सुबीमल घोष

क . वैद्यकशास्त्र

ब. डॉ. मोहम्मद जावेद अली

कक. अभियांत्रिकी

क. माणिक वर्मा                                ककक. पर्यावरण

ड. डॉ. नीना गुप्ता                               कश्. गणित

१) अ- ३, ब- १, क- २, ड- ४          २) अ- ४, ब- २, क- ३, ड- १

३) अ- १, ब- २, क- ३, ड- ४          ४) अ- ४, ब- ३, क- २, ड- १

 

   प्रश्न ४. दादासाहेब फाळके पुरस्काराबाबत अयोग्य विधान कोणते?

अ. पन्नासावा दादासाहेब फाळके पुरस्कार अमिताभ बच्चन यांना प्रदान करण्यात आला.

ब. भारतीय चित्रपटांच्या विकासामध्ये योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात येतो.

पर्यायी उत्तरे

१) अ आणि ब दोन्ही

२) केवळ अ

३) केवळ ब

४) अ आणि ब दोन्ही नाही

 

   प्रश्न ५. ‘ग्लोरियस डायस्पोरा – प्राइड ऑफ इंडिया’ या कॉफी टेबल पुस्तकाचा विषय कोणता आहे?

१) यशस्वी अनिवासी भारतीय           २) प्रवासी भारतीय सन्मान विजेते

३) भारतात स्थायिक झालेले यशस्वी परदेशी नागरिक

४) वरील सर्व

 

   प्रश्न ६. क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार व त्यांचे निकष यांची अयोग्य जोडी कोणती?

१) राजीव गांधी खेलरत्न – आंतरराष्ट्रीय स्तरावर सलग चार वष्रे अत्युत्कृष्ट कामगिरी

२) अर्जुन पुरस्कार – आंतरराष्ट्रीय स्तरावर सलग चार वष्रे अत्युत्कृष्ट कामगिरीसहित खिलाडूवृत्ती, नेतृत्वगुण आणि शिस्तीचे प्रदर्शन

३) मौलाना अबुल कलाम आझाद चषक – खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्युत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी साहाय्य करणे

४) ध्यानचंद पुरस्कार – आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये पदक विजेते व निवृत्तीनंतर क्रीडा क्षेत्राच्या विकासामध्ये योगदान

 

    प्रश्न ७. साहित्य अकादमीकडून पुढीलपकी कोणता पुरस्कार दिला / दिले जातो/ जातात?

अ. भाषा सन्मान पुरस्कार

ब. भाषांतरासाठीचा पुरस्कार

क. बाल साहित्य पुरस्कार                 ड. युवा पुरस्कार

पर्यायी उत्तरे

१) वरील सर्व

२) केवळ अ, ब आणि क

३) केवळ ब आणि क

४) केवळ अ, क आणि ड

 

उत्तरे व स्पष्टीकरणे

ल्ल     प्र. क्र.१ . योग्य पर्याय क्र.(४) विज्ञान, कला, संस्कृती, संगीत, समाजसेवा, उद्योग व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुण्यभूषण फाउंडेशनकडून पुण्यभूषण पुरस्कार सन १९८९ पासून दरवर्षी प्रदान करण्यात येतो. या वर्षीचा पुरस्कार पुरातत्व क्षेत्रामधील कामगिरीसाठी डॉ. जी. बी. देगलूरकर यांना प्रदान करण्यात आला.

 

प्र.क्र. २. योग्य पर्याय क्र.(२) जगासमोरील तातडीच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी व्यवहार्य व आदर्श उपाय मांडणाऱ्या व्यक्ती / संस्थांना साहाय्य आणि सन्मानित करण्यासाठी स्वीडनच्या राईट लाईव्हलीहूड फाउंडेशनकडून सन १९८०पासून राईट लाईव्हलीहूड पुरस्कार देण्यात येतात. या वर्षीच्या पुरस्कारप्राप्त व्यक्ती / संस्था पुढीलप्रमाणे-  स्वीडनच्या पर्यावरण कार्यकर्त्यां ग्रेटा थनबर्ग, सहाराच्या मानवी हक्क कार्यकर्त्यां अमिनातू हैदर, चीनच्या महिला हक्क विधिज्ञ गुओ जिआनमी आणि ब्राझीलची हुतूकारा यानोमामी संघटना व तिचे पर्यावरण कार्यकत्रे दावी कोपेनावा यांना जाहीर झाले आहेत.

 

   प्र. क्र. ३. योग्य पर्याय क्र.(१)

या वर्षीचे इतर शांतीस्वरूप भटनागर पुरस्कारविजेते पुढीलप्रमाणे –

जीवशास्त्र – डॉ. कायारत साईकृष्णन,

डॉ. सौमेन बसक;

रसायनशास्त्र – डॉ. राघवन बी. सुनोज, डॉ. तपस कुमार माजी;

गणित – डॉ. दिशांत मयूरभाई पांचोली,

डॉ. नीना गुप्ता;

भौतिकशास्त्र – डॉ. अिनदा सिन्हा,

डॉ. शंकर घोष;

वैद्यकशास्त्र- डॉ. धीरज कुमार

भारतातील विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीसाठी वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेकडून शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार सन १९५८पासून देण्यात येतात.

 

    प्र.क्र.४. योग्य पर्याय क्र. (४)

सन १९६९ पासून माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारतीय चित्रपटांच्या विकासामध्ये योगदानासाठीचा भारतातील सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सुवर्णकमळ, शाल व रु. १० लक्ष असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. भारतातील पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट – राजा हरिश्चंद्र – दिग्दíशत करणारे दादासाहेब फाळके यांच्या नावे हा पुरस्कार देण्यात येतो.

 

    प्र. क्र. ५. योग्य पर्याय क्र.(२)

सन २००३ ते २०१९ या कालावधीतील प्रवासी भारतीय सन्मानविजेत्यांची माहिती असणारे हे कॉफी टेबल पुस्तक उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले.

 

प्र.क्र. ६. योग्य पर्याय क्र.(३) मौलाना अबुल कलाम आझाद चषक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थ्यांच्या कामगिरीसाठी विद्यापीठांना प्रदान करण्यात येतो. तर खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्युत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी साहाय्य करण्यासाठी द्रोणाचार्य पुरस्कार देण्यात येतो.

 

प्र.क्र.७. योग्य पर्याय क्र.(१)

या चार पुरस्कारांबरोबरच भारतातील महत्त्वाच्या २४ भाषांमध्ये दरवर्षी साहित्य अकादमी पुरस्कारही देण्यात येतात.

दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क पदनिहाय घटकांची तयारी

current affairs, loksatta editorial- Mpsc Exam Preparation Akp 94 8

1714   11-Oct-2019, Fri

दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क पदाच्या पदनिहाय घटकांच्या मागील वर्षीच्या पदनिहाय घटकांचे विश्लेषण मागील लेखामध्ये करण्यात आले. या लेखामध्ये या घटकांच्या तयारीबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.

भारताची राज्यघटना 

 • राज्यघटनेच्या निर्मितीची प्रक्रिया, तिच्यावरील वेगवेगळ्या विचारसरणींचा व कायदे तसेच राज्यघटनांचा प्रभाव यांचा आढावा घ्यायला हवा. घटनेच्या सरनाम्यातील तत्त्वज्ञान, हेतू समजावून घ्यावे.
 • घटनेतील सगळया कलमांचा अभ्यास आवश्यक नाही. मूलभूत हक्क, राज्याची नीतिनिर्देशक तत्त्वे, मूलभूत कर्तव्ये याबाबतची कलमे बारकाईने अभ्यासावीत. प्रशासकीय, आर्थिक, न्यायिक व इतर बाबतीत केंद्र शासन व राज्य शासन यांच्यामध्ये अधिकारांची विभागणी कशा प्रकारे झाली आहे त्याबाबतची कलमे नीट समजून घ्यायला हवी. याबाबत घटनेच्या सातव्या अनूसूचीचा संदर्भ घ्यावा. विशेषत: चालू घडामोडींच्या संदर्भात या बाबी महत्त्वाच्या आहेत.
 • केंद्र व राज्य शासनाचे अधिकार, काय्रे, कायदा निर्मितीची प्रक्रिया, विधेयके, त्यांचे प्रकार या बाबीही महत्त्वाच्या आहेत.
 • उच्च व सर्वोच्च न्यायालयांविषयीची महत्त्वाची कलमे, न्यायाधीशांच्या नेमणुका, पदावरून दूर करणे, अधिकार, कार्यपद्धती इत्यादी बाबींचा आढावा घ्यावा.
 • घटनात्मक पदे अभ्यासताना संबंधित कलम, काय्रे, अधिकार, नेमणुकीची पद्धत, पदावरून काढण्याची पद्धत, सध्या त्या पदावरील व्यक्तीचे नाव हे मुद्दे पाहावेत.
 • घटनादुरुस्ती व न्यायिक पुनर्विलोकन हे दोन मुद्देही महत्त्वाचे आहेत. घटनादुरुस्ती प्रक्रिया आणि महत्त्वाच्या मुद्दय़ांबाबतच्या घटनादुरुस्त्या माहीत करून घ्याव्यात.
 • सर्वोच्च न्यायालयाचे घटनेचा अर्थ विषद करणारे तसेच मूलभूत हक्कांबाबतचे महत्त्वाचे निर्णय माहीत असणे आवश्यक आहे.
 • स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत ७३वी व ७४वी घटनादुरुस्ती यांमधील महत्त्वाच्या तरतुदी समजावून घ्याव्यात.

मानवी हक्क व जबाबदाऱ्या

 • अभ्यासाची सुरुवात मानवी हक्कांची संकल्पना, तिचा इतिहास, भारतातील मानवी हक्क चळवळ, मानवी हक्कांची आंतरराष्ट्रीय मानके, युनोची घोषणापत्रे व भारतीय संविधानातील मानवी हक्कांचे प्रतिबिंब या बाबी बारकाईने समजून घेऊन करायला हवी.
 • मानवी हक्कांपासून वंचित राहिल्यास कोणत्याही सर्वसाधारण व्यक्तीला जाणवणाऱ्या समस्या सर्वप्रथम समजून घ्यायला हव्यात. निरक्षरता, बेरोजगारी, दारिद्रय़, हिंसा, शोषण, गुन्हेगारी, दहशतवाद, भ्रष्टाचार इत्यादी समस्यांचे मानवी हक्कांच्या संदर्भाने समस्यांचे स्वरूप, त्यांची कारणे, परिणाम, उपाय या मुद्दय़ांच्या आधारे विश्लेषण करणे आवश्यक आहे. याबाबत काही आंतरराष्ट्रीय संघटनांचे अहवाल असल्यास त्यांचा आढावा घ्यायला हवा. या अनुषंगानेच जागतिकीकरणामुळे या समस्यांच्या स्वरूपामध्ये, तीव्रतेमध्ये होणाऱ्या परिणामांबाबत वृत्तपत्रे, टीव्ही, इंटरनेट इ. माध्यमांतून होणारी विश्लेषणात्मक चर्चासुद्धा पाहायला हवी.
 • समस्येचे स्वरूप, कारणे, परिणाम, उपाय, संबंधित संस्था, संघटना, आयोग, राबविण्यात येणाऱ्या योजना अशा मुद्दय़ांच्या आधारे समस्यांचा अभ्यास करावा.
 • उपायांचा विचार करताना विविध कायदे, शासकीय योजना, आंतरराष्ट्रीय संस्था व त्यांचे प्रस्ताव तसेच घोषणा व करार यांचा समावेश करायला हवा.
 • शासकीय योजनांचा अभ्यास करताना पुढील मुद्दे विचारात घ्यावेत. – शिफारस करणारा आयोग/ समिती, उद्देश, योजनेबाबतचा कायदा, योजनेचा कालावधी, स्वरूप व बारकावे, लाभार्थ्यांचे निकष, खर्चाची विभागणी, अंमलबजावणी यंत्रणा, योजनेचे मूल्यमापन. मूळ कायदे वाचून त्यातील महत्त्वाच्या तरतुदींच्या नोट्स काढणे, बहुविधानी प्रश्न सोडविण्यामध्ये उपयोगी ठरते.

 

अभ्यासक्रमातील कायदे व नियमपुस्तिका खंड

अभ्यासक्रमामध्ये मुंबई प्रतिबंध कायदा, १९४९ (The Bombay Prohibition Act, 1949), महाराष्ट्र उत्पादन शुल्क नियमपुस्तिका खंड १ व ३ (The Maharashtra Excise Manual Volume – I & III) आणि महाराष्ट्र प्रतिबंध व उत्पादन शुल्क नियमपुस्तिका खंड २

(The Prohibition and Excise Manual Volume – II) यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये अमली पदार्थ विरोधी कायदा, अफू ओढण्यासंबंधी अधिनियम, औषध नियंत्रणविषयक नियम अशा सर्व नियामक कायदे व नियमांचा समावेश होतो. कायद्यामधील तरतुदी तसेच कायद्याच्या अंमलबजावणीसाठी बनविण्यात आलेले नियम आणि त्यामध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यासाठी शासनाने निर्गमित केलेले आदेश या सर्वाचा नियमपुस्तिका खंडामध्ये समावेश होतो. याबाबत पुढील बाबींची कलमे समजून घ्यावीत  –

 • कायद्याची पाश्र्वभूमी, व्याप्ती, प्राधिकारी व लागू होण्याबाबतच्या तरतुदी
 • महत्त्वाच्या व्याख्या
 • गुन्ह्य़ाचे स्वरूप
 • निकष
 • अंमलबजावणी अधिकारी, अनुज्ञप्ती व नियामक अधिकारी
 • अपिलीय प्राधिकारी
 • तक्रारी/ अपिलासाठीची (असल्यास निर्णय देण्याची/ कार्यवाहीची) कालमर्यादा
 • दंड/ शिक्षेची तरतूद
 • अंमलबजावणीची प्रक्रिया- विहित मुदती, पाश्र्वभूमी असल्यास विशेष न्यायालये
 • नमूद केलेले अपवाद

दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क पदनिहाय घटक विश्लेषण

MPSC chalu ghadamodi, current affairs--Mpsc Exam Preparation Akp 94 7

710   10-Oct-2019, Thu

दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पदनिहाय पेपर मागील वर्षी पहिल्यांदा झाला. या पदासाठी विहित अभ्यासक्रमातील काही मुद्दे बाकीच्या पदनिहाय पेपर्समध्ये सामायिक आहेत तर काही मुद्दे स्वतंत्र. पदनिहाय पेपरमधील भारतीय राज्यघटना, मानवी हक्क व जबाबदाऱ्या आणि अभ्यासक्रमातील कायदे व नियमपुस्तिका खंड या घटकांवर विचारण्यात आलेल्या प्रश्नांच्या अनुषंगाने विश्लेषणात्मक चर्चा या लेखामध्ये करण्यात येत आहे. यासाठी मागील वर्षीच्या पेपरमधील काही प्रातिनिधिक प्रश्न पाहू.

 

(प्रश्नातील योग्य उत्तराचा पर्याय ठळक केलेला आहे.)

प्रश्न – विधान परिषदेबाबत खालीलपकी कोणते चुकीचे आहे?

१)      सामान्य विधेयकास विधान परिषद जास्तीतजास्त सहा महिन्यांसाठी रोखू शकते किंवा विलंब करू शकते.

२)      ते फक्त उशीर लावू शकणारे गृह किंवा सल्लागार संस्था आहे.

३)      घटनादुरुस्ती विधेयकाच्या संमतीमध्ये विधान परिषदेला प्रभावी स्थान नसते.

४)      विधान परिषदेचे अस्तित्वच विधानसभेच्या इच्छेवर अवलंबून असते.

 

प्रश्न – खालील तरतुदीचा अंतर्भाव भारतीय राज्यघटनेच्या — या भागात केला आहे?

‘राज्य ग्राम पंचायती स्थापण्याची योजना करील, त्यांना स्वशासनाचा एक घटक म्हणून आवश्यक अशी कार्य करण्यास अधिकार व सत्ता देवून समर्थ बनविण्यासाठी पावले उचलेल.’

१)      भाग १ – संघ आणि तिचे राज्ये किंवा प्रांत

२)      भाग ४ – राज्याच्या ध्येय धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे

३)      भाग ९ – स्थानिक स्व-शासन (पंचायती राज)

४)      भाग ३ – मूलभूत अधिकार

प्रश्न – ‘अ’ आणि ‘ब’च्या लग्नात ‘अ’च्या वडिलांनी ‘ब’च्या वडिलांकडे मोटारगाडी घेण्यासाठी रु. ५ लाख मागितले. त्याप्रमाणे ‘ब’च्या वडिलांनी वरील पसे विवाहानंतर एक आठवडय़ात ‘अ’च्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा भाऊ ‘क’ यांच्याकडे दिले.

वरील उदाहरणात हुंडा बंदी अधिनियम, १९६१च्या अंतर्गत कोण दोषी ठरेल?

१) ‘अ’चे वडील

२) ‘ब’चे वडील

३) क         ४) वरील सर्व

 

प्रश्न – मानवी हक्क म्हणजे —

१)      जीवन, स्वातंत्र्य, समानता आणि सन्मान यांच्याशी संबंधित व्यक्तीचे अधिकार.

२)      प्रथा, परंपरा, पूर्वीच्या न्यायालयीन निर्णयाचा दाखला याद्वारे मिळालेले अधिकार.

३)      स्थानिक कायद्यांद्वारे दिलेले अधिकार.

४) ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ने दिलेले अधिकार.

 

प्रश्न – पुढील विधानांचा प्रोहिबिशन कायद्याच्या संदर्भात विचार करा.

अ.      या कायद्याअंतर्गत सर्व गुन्हे दखलपात्र आहेत.

ब.      या कायद्याअंतर्गत नेमलेल्या प्रोहिबिशन अधिकाऱ्याला कलम १२३ प्रमाणे, वॉरंटशिवाय अटक करण्याचे अधिकार आहेत.

पर्यायी उत्तरे

१) अ बरोबर असून, ब चूक आहे.

२) अ चूक असून, ब बरोबर आहे.

३) अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत.

४) अ आणि ब दोन्ही चूक आहेत.

प्रश्न –  महाराष्ट्रात अफू ओढण्यासंबंधीच्या अधिनियम, (१९३६चा २०)च्या कलम ७नुसार,जी कोणतीही व्यक्ती अफू ओढणाऱ्या जमावाचा सदस्य असेल, तिला सिद्धअपराध ठरविण्यात आले असता—– कारावासाची शिक्षा आणि —– रुपयांच्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही होतील.

१) ३ महिने, ५०० रु.

२) ६ महिने, १,०००रु.

३) १ वर्ष, २०००रु.

४) ३ वष्रे, ५,०००रु.

 

ल्ल      प्रश्न – अमली पदार्थ औषधे आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायदा, १९८५हा खालील कोणत्या हेतूने करण्यात आला आहे?

अ.      अमली पदार्थाच्या औषधांशी संबंधित विद्यमान कायद्यात एकत्रीकरण आणि सुधारणा.

ब.      वरील कायद्याशी संबंधित पदार्थाच्या बाबतीत कडक नियम बनवणे.

क.      मादक द्रव्यांच्या अवैध वाहतुकीमधून प्राप्त मालमतेची जप्ती

ड.      सदर कायद्याअंतर्गत आंतरराष्ट्रीय अधिवेशनात मान्य झालेले करार लागू करणे.

पर्यायी उत्तरे

१) फक्त ब

२) फक्त ब आणि क

३) फक्तक आणि ड

४) अ, ब, क आणि ड

 

प्रश्न – महाराष्ट्र औषधे (नियंत्रण) नियम, १९६३च्या कोणत्या नियमान्वये अधिसूचित औषधांच्या किरकोळ विक्रेत्याची अनुज्ञप्ती मंजूर करण्यात येणे?

१) नियम ४              २) नियम ५

३) नियम ६              ४) नियम ७

 

 •    भारतीय राज्यघटना घटकावर १० प्रश्न, मानवी हक्क व जबाबदाऱ्या घटकावर १० प्रश्न आणि कायदे व नियमपुस्तिका खंड या घटकांवर एकत्रितपणे ४० प्रश्न विचारलेले आहेत.
 •    राज्यघटनेच्या तरतुदींमागील तत्त्वज्ञान, घटनेचा विकास, महत्त्वाची कलमे, कायदेमंडळाचे कार्य व अधिकार, राजकीय व्यवस्थेची तथ्यात्मक माहिती अशा मुद्दय़ांच्या आधारे प्रश्न विचारलेले दिसून येतात.
 •      मानवी हक्क व जबाबदाऱ्या घटकामध्ये मानवी हक्कांची व्याख्या, वैशिष्टय़े, मानवी हक्क संरक्षणासाठीच्या कायद्यांमधील तरतुदी, मानवी हक्क आयोगाची कार्यपद्धती, मानवी हक्कांशी संबंधित योजना अशा मुद्दय़ांवर प्रश्न विचारलेले आहेत.
 •     अभ्यासक्रमातील कायदे व नियमपुस्तिका खंड यांचा मुळातून अभ्यास आवश्यक असल्याचे प्रश्नांच्या विश्लेषणातून लक्षात येते. त्यामुळे संबंधित कायदा लागू करणारा प्राधिकारी, व्याप्तीचे क्षेत्र, व्याख्या, अंमलबजावणीसाठीच्या नेमक्या तरतुदी व नियम, अंमलबजावणी अधिकारी, दंड, शिक्षा, अपवाद अशा मुद्दय़ांच्या आधारे प्रश्न विचारलेले आहेत.

दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क पदनिहाय पेपर प्रश्न विश्लेषण

MPSC chalu ghadamodi, current affairs

1513   04-Oct-2019, Fri

गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षेतील पेपर एक संयुक्त पेपर व पेपर दोन पदनिहाय पेपर हा पॅटर्न मागील वर्षीपासून लागू झाला आहे. दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क पदासाठीचा पेपर दोन या वर्षी २० ऑक्टोबरला होणार आहे. मागील वर्षी झालेल्या पेपरचे विश्लेषण केल्यास या वर्षीच्या तयारीसाठी उपयुक्त ठरेल. विचारण्यात आलेल्या प्रश्नांची घटकनिहाय संख्या सोबतच्या टेबलमध्ये देण्यात आली आहे.

यापकी बुद्धीमापन विषयक प्रश्नांच्या तयारीबाबत आधीच चर्चा करण्यात आली आहे. इतर घटकांच्या तयारीबाबत या व पुढील लेखामध्ये चर्चा करण्यात येईल.

माहितीचा अधिकार व लोकसेवा हक्क अधिनियम या कायद्यांमधील व्याख्या, त्यातील कलमांच्या नेमक्या तरतुदी आणि एकूण कायद्यामागील तत्त्व समजले असल्यास उत्तर देता येईल अशा प्रकारचे विश्लेषणात्मक प्रश्न विचारलेले दिसून येतात.

 • या दोन्ही कायद्यांच्या मूळ दस्तावेजांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. माहिती अधिकार कायदा व त्याच्या अंमलबजावणीचे नियम दोन्ही बाबी व्यवस्थित अभ्यासणे आवश्यक आहे. तर लोकसेवा हक्क कायद्याअंतर्गत मूळ कायदा बारकाईने अभ्यासणे आवश्यक आहे. शक्य असल्यास या कायद्यांतर्गत विहित केलेल्या गृह विभाग आणि महसूल विभाग यांच्या लोकसेवा व त्यांचे विहित कालावधी यांचा आढावा घ्यावा.
 • मूळ दस्तावेजातून कायद्याची पाश्र्वभूमी, महत्त्वाच्या व्याख्या, लागू होणारे क्षेत्र व दिनांक समजून घ्यावेत.
 • प्रत्यक्ष तरतुदी विचारलेल्या असल्याने दोन्ही कायद्यांतर्गत माहिती किंवा लोकसेवा मागण्याची विहित पद्धत, शुल्क, माहिती किंवा लोकसेवा पुरविणारे अधिकारी, विहित कालमर्यादा, कालमर्यादा ओलांडल्यावर तक्रारीसाठीचे / अपिलासाठीचे अपिलीय प्राधिकारी, तक्रारी / अपिलासाठीची (असल्यास निर्णय देण्याची / कार्यवाहीची) कालमर्यादा, दंड / शिक्षेची तरतूद, नमूद केलेले अपवाद अशा सर्व बाबींचा बारकाईने अभ्यास करणे आवश्यक आहे.
 • माहिती आयोग / लोकसेवा हक्क आयोग, दोन्ही आयोगांचे कार्य, अधिकार, जबाबदाऱ्या, समजून घेणे आवश्यक आहे.

संगणक व माहिती तंत्रज्ञान

 • वेगवेगळ्या क्षेत्रांतील संगणकाचा वापर, नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा विविध सेवा-सुविधांची माहिती मिळविण्यासाठी होणारा उपयोग हे मुद्दे एकत्रितपणे अभ्यासता येतील. वैद्यकीय, कृषी, प्रशासन, बँकिंग अशा विविध क्षेत्रांमध्ये संगणक व माहिती तंत्रज्ञान यांचा होणारा उपयोग समजून घ्यावा. यामध्ये त्या त्या क्षेत्रामध्ये संगणकीकरणाचा उपयोग आणि माहिती तंत्रज्ञानामुळे त्यांचा वापर करण्यामध्ये वाढलेली परिणामकारकता अशा अनुषंगाने हा मुद्दा पाहावा. विविध क्षेत्रांतील नवी संशोधने व उपकरणे यांची अद्ययावत माहिती असावी.
 • माहिती साठविणे व माहितीवर प्रक्रिया करण्यासाठीची उपकरणे, नियमावली, त्यांचे प्रकार, उपयोग माहीत करून घ्यावेत.
 • व्हायरसचे प्रकार व याबाबतच्या चालू घडामोडी माहीत करून घ्याव्यात.
 • डेटा कम्युनिकेशन, नेटवर्किंग व वेब टेक्नॉलॉजी या मुद्दय़ामध्ये माहितीचे संप्रेषण/प्रसारण करण्यासाठी आवश्यक घटकांची माहिती तसेच संप्रेषणाच्या विस्तार, माध्यम व गतीच्या आधारे त्याचे प्रकार समजून घ्यावेत.
 • सायबर गुन्ह्य़ांचे प्रकार, त्यांच्या सायबर कायद्यातील व्याख्या तसेच त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठीचे कायदेशीर प्रयत्न या बाबी सायबर कायद्याच्या मूळ दस्तावेजातून समजून घ्याव्यात.
 • भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा हा मुद्दा पुढील मुद्दय़ांच्या आधारे अभ्यासावा – शासनाची धोरणे, संगणकाच्या व माहिती तंत्रज्ञानाच्या वापरातील व विस्तारातील ठळक टप्पे, माहिती तंत्रज्ञान पार्क इत्यादी संकल्पना.
 • मीडिया लॅब एशिया, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, सामूहिक माहिती केंद्र या अभ्यासक्रमामध्ये उल्लेख केलेल्या शासकीय उपक्रमांवर भर देऊन शासनाच्या संगणक व माहिती तंत्रज्ञान क्षेत्राआधारे सुरू करण्यात आलेल्या उपक्रमांचा आढावा घ्यावा. यामध्ये उपक्रमाचे नाव, सुरू करणारा विभाग, उद्देश, स्वरूप, त्यातील माहिती तंत्रज्ञानाची भूमिका, असल्यास लाभार्थी व त्यांचे निकष हे मुद्दे समजून घ्यावेत.

क्र.  घटक विषय    प्रश्नसंख्या

 • १       चालू घडामोडी                    १०
 • २       बुद्धीमापन विषयक प्रश्न          १०
 • ३       भारतीय राज्यघटना               १०
 • ४       माहिती अधिकार व लोकसेवा हक्क अधिनियम                   १०
 • ५       संगणक व महिती तंत्रज्ञान                 १०
 • ६       मानवी हक्क व जबाबदाऱ्या              १०
 • ७       The Bombay Prohibition Act, 1949
 • 8        The Maharashtra Excise Manual Volume – I
 • 9        The Maharashtra Excise Manual Volume – III
 • 10      The Prohibition and Excise Manual Volume – II

एकूण            १००

लिपिक टंकलेखक (पदनिहाय पेपर तयारी)

MPSC chalu ghadamodi, current affairs-Mpsc Exam Preparation Akp 94 5

772   02-Oct-2019, Wed

लिपिक टंकलेखक पदाच्या पेपर दोनच्या प्रश्नांचे विश्लेषण व गणित आणि सामान्य ज्ञान घटकांच्या तयारीबाबत मागील लेखामध्ये चर्चा करण्यात आली. या लेखामध्ये सामान्य विज्ञान, पुरस्कार, माहिती तंत्रज्ञान आणि माहिती अधिकार व लोकसेवा हक्क अधिनियम या घटकांच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येत आहे.

सामान्य विज्ञान 

 • रसायनशास्त्रामध्ये पुढील मुद्दय़ांचा अभ्यास आवश्यक आहे – मूलद्रव्यांचे वर्गीकरण, आवर्तसारणी, महत्त्वाच्या मूलद्रव्यांची वैशिष्टय़े, उपयोग, अणूंची रचना, कार्बनी व अकार्बनी रसायनशास्त्र, कार्बनी संयुगांमधील बंधांचे स्वरूप, महत्त्वाचे सिद्धांत, महत्त्वाच्या कार्बनी व अकार्बनी संयुगांची रेणुसूत्रे, वैशिष्टय़े, उपयोग, महत्त्वाच्या अभिक्रिया इत्यादीसारख्या मूलभूत बाबींची व्यवस्थित उजळणी करायला हवी.
 • भौतिकशास्त्रातील महत्त्वाचे सिद्धांत, मूलभूत संकल्पना, विद्युत इत्यादींवरील समीकरणे यांचा प्रश्नांमध्ये समावेश असल्याचे दिसते. या घटकावर साधे सोपे (Straight forward) प्रश्न विचारण्याचे प्रमाण कमी आहे. मात्र मूलभूत अभ्यास झाला असेल तर आत्मविश्वासाने हे प्रश्न सोडविता
 • येतात. वस्तुमान, बल, दाब, गती, ऊर्जा, विद्युत, प्रकाश, चुंबकत्व या मुख्य घटकांचा अभ्यास महत्त्वाचे सिद्धांत, महत्त्वाची समीकरणे, संबंधित राशीचे एकक, गणना, वैशिष्टय़े, स्रोत, परिणाम, उपयोग अशा मुद्दय़ांच्या आधारे करायला हवा.
 • वनस्पती व प्राणीशास्त्रातील वर्गीकरण, विविध वर्गातील वनस्पती / प्राण्यांची वैशिष्टय़े, वनस्पतींसाठीची पोषक द्रव्ये, त्यांचे रोग यावर प्रश्न विचारलेले आहेत.
 • रोगांचे प्रकार- त्यांची लक्षणे, कारणीभूत घटक, प्रसार, बाधित होणारे अवयव, उपचारपद्धती अशा मुद्दय़ांच्या अनुषंगाने अभ्यास करावा.
 • स्थूल पोषणद्रव्ये – कबरेदके, प्रथिने व मेद आणि सूक्ष्म पोषणद्रव्ये – जीवनसत्त्वे, खनिज व क्षार या पोषण द्रव्यांचा स्रोत, शरीरावरील त्यांचे परिणाम, कमतरता व अधिक्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या, त्यावरील उपाय या मुद्दय़ांच्या आधारे अभ्यास करावा.
 • आरोग्य व पोषणाबाबतच्या केंद्र व राज्य शासनाच्या योजनांच्या महत्त्वाच्या तरतुदी नेमकेपणाने माहीत असाव्यात.

पुरस्कार

 • चित्रपट, संगीत, पत्रकारिता, प्रशासन, संशोधन, शैक्षणिक व साहित्य क्षेत्रातील महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्य स्तरावरील पुरस्कार माहीत असावेत. त्यांचे स्वरूप, प्रदान करणाऱ्या संस्था, सुरुवात, निवडीसाठीचे निकष या बाबी माहीत करून घ्याव्यात.
 • साहित्य क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पुरस्कार, चच्रेतील महत्त्वाची पुस्तके व त्यांचे लेखक, चच्रेतील लेखकांबाबतच्या महत्त्वाच्या बाबी पाहाव्यात.
 • भारतातील व्यक्तींना आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले असल्यास त्यांच्याबाबतची अतिरिक्त माहिती असणे आवश्यक आहे.
 • केंद्र शासनाचे पद्म, शौर्य, क्रीडा व श्रम इत्यादी क्षेत्रांतील पुरस्कार, त्यांचे स्वरूप, पुरस्कारप्राप्त व्यक्ती
 • व त्यांचे कार्यक्षेत्र, प्राप्त व्यक्ती या मुद्दय़ांच्या आधारे अभ्यासावेत.
 • महाराष्ट्र शासनाचे विविध पुरस्कार, त्यांचे स्वरूप, पुरस्कारप्राप्त व्यक्ती यांची माहिती असायला हवी.
 • शांतताविषयक आंतरराष्ट्रीय व भारत सरकारचे पुरस्कार, त्यांची पाश्र्वभूमी, स्वरूप, पुरास्कारप्राप्त व्यक्ती/ संस्था हे मुद्दे पाहावेत.
 • महत्त्वाच्या खेळांचे विश्वचषक, ऑलिम्पिक, आशियाई स्पर्धा, इतर महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, त्यातील विक्रम, भारत / महाराष्ट्र यांची कामगिरी यांचा आढावा घ्यायला हवा.

 

माहितीचा अधिकार व लोकसेवा हक्क अधिनियम

 • या कायद्यांचा मूळ दस्तावेज पाहून अभ्यास करणे आवश्यक आहे. कायद्याची पाश्र्वभूमी, महत्त्वाच्या व्याख्या समजून घ्याव्यात.
 • कायदा व त्याच्या अंमलबजावणीचे नियम दोन्ही बाबी व्यवस्थित अभ्यासणे आवश्यक आहे.
 • दोन्ही कायद्यांतर्गत माहिती किंवा लोकसेवा मागण्याची विहित पद्धत, शुल्क, माहिती किंवा लोकसेवा पुरविणारे अधिकारी, विहित कालमर्यादा, कालमर्यादा ओलांडल्यावर तक्रारीसाठीचे / अपिलासाठीचे अपीलीय प्राधिकारी, तक्रारी / अपिलासाठीची (असल्यास निर्णय देण्याची / कार्यवाहीची) कालमर्यादा, दंड / शिक्षेची तरतूद, नमूद केलेले अपवाद
 • माहिती आयोग / लोकसेवा हक्क आयोग, दोन्ही आयोगांचे कार्य, अधिकार, जबाबदाऱ्या, समजून घेणे आवश्यक आहे.

वनसेवा मुख्य परीक्षा पेपर १ सराव प्रश्न

MPSC chalu ghadamodi, current affairs-Forest Service Mpsc Exam Preparation Akp 94

1035   30-Sep-2019, Mon

वनसेवा मुख्य परीक्षा १५ सप्टेंबर रोजी होत आहे. या परीक्षेच्या पेपर एकसाठी सराव प्रश्न या लेखामध्ये देण्यात येत आहेत.

प्रश्न १ – बँकांचे विलीनीकरण करण्याची शिफारस रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया शासनास करते. अशी शिफारस कोणत्या कारणाने करता येते?

१) संबंधित बँकांनी विनंती केल्यास

२) एखादी बँक आजारी / अक्षम बनल्यास

३) गरव्यवस्थापनामुळे बँकेची स्थिती खालावल्यास

४) वरील सर्व

प्रश्न २ – भारतामध्ये कृषी उत्पादनांची किमान आधारभूत किंमत कोण ठरवते?

१) कृषी मूल्य आयोग

२) केंद्रीय कृषी मंत्रालय

३) वखार महामंडळ

४) केंद्रीय मंत्रालय

 प्रश्न ३ – चलनवाढीच्या काळात पुढीलपकी कोणता परिणाम दिसून येत नाही?

१) चलनाच्या खरेदीशक्तीत घट

२) किंमतवाढ

३) चलनाची खरेदीशक्ती व महागाई दोन्हीमध्ये वाढ

४) बाजारातील तरलतेत वाढ

प्रश्न ४ -अयोग्य विधान कोणते?

१) भारतीय चलनामध्ये नाणी, नोटा व सरकारी रोख्यांचा समावेश होतो.

२) देशातील चलनी नाणी भारत सरकार तयार करते.

३) देशातील सर्व चलनी नोटा रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया छापते.

४) देशातील सर्व नाणी रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया चलनात आणते.

 प्रश्न ५ – पुढीलपकी कोणास मतदानाचा हक्क नाही?

अ. मनोरुग्ण

ब. दिवाळखोर

क. १८ वर्षांखालील भारतीय नागरिक

ड. संबंधित मतदारसंघाचा रहिवासी नसलेला नागरिक

पर्याय

१) केवळ अ आणि ब

२) केवळ क आणि ड

३) केवळ क

४) वरील सर्व

प्रश्न ६ – शेती व पशुपालन व्यवसायाचे वैज्ञानिक पद्धतीने व्यवस्थापन करणे हे नीतिनिर्देशक तत्त्व कोणत्या कलमान्वये विहित केले आहे?

१) कलम ४६

२) कलम ४७

३) कलम ४८

४) कलम ४९

 प्रश्न ७ – पुढीलपकी कोणती नदी /नद्या बंगालच्या उपसागरास मिळतात?

अ. तुंगभद्रा     ब. कावेरी       क. गोदावरी              ड. नर्मदा                  इ. कृष्णा

१) अ, ब आणि क

२) ब, क आणि ड

३) क आणि ड

४) ब आणि इ

 प्रश्न ८ – पुढीलपकी कोणते विधान अयोग्य आहे?

१) बिहार हे भारतातील सर्वाधिक पूरप्रवण राज्य आहे.

२) पाकची सामुद्रधुनी कच्छ्चे आखात आणि खंबातचे आखात यांच्या दरम्यान आहे.

३) तंबाखूचा कपूरी वाण हा आंध्र प्रदेशामध्ये आढळतो.

४) भारतातील सर्वाधिक ताग गिरण्या पश्चिम बंगालमध्ये आहेत.

 प्रश्न ९ – पुढीलपकी कोणती घटना दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान घडली?

१) क्रिप्स मिशनची भारतभेट

२) कॅबिनेट मिशनची भारतभेट

३) मुंबईमध्ये नाविकांचे बंड

४) सायमन कमिशनची भारतभेट

प्रश्न १० – पुढीलपकी कोणता १८५७ च्या राष्ट्रीय उठावाचा परिणाम नाही?

१) भारतामधील लष्करामध्ये ब्रिटिश शिपायांचे प्रमाण वाढवण्यात आले.

२) राणी व्हिक्टोरियाने भारताची सम्राज्ञी हा किताब धारण केला.

३) भारताचा कारभार ईस्ट इंडिया कंपनीकडे सोपविण्यात आला.

४) भारतविषयक मुद्दे हाताळण्यासाठी भारतमंत्री हे पद ब्रिटिश पार्लमेंटमध्ये निर्माण करण्यात आले.

उत्तरे व स्पष्टीकरणे

प्र. क्र. १) – योग्य पर्याय (४)

प्र. क्र. २) – योग्य पर्याय (१)

प्र. क्र. 3) – योग्य पर्याय (३)

प्र.क्र. ४) – योग्य पर्याय

(१) भारतीय चलनामध्ये फक्त नाणी व नोटांचा समावेश होतो. पूर्वी एक रुपयांच्या नोटा भारत सरकार छापत असे व आरबीआय चलनात आणत असे. मात्र आता १ व २ रुपयांच्या नोटा छापणे बंद झाले असून जुन्या नोटा चलनात आहेत.

प्र.क्र.५) – योग्य पर्याय (४) (न्यायालयाने मनोरुग्ण घोषित केलेली व्यक्ती, दिवाळखोरी जाहीर केलेली व्यक्ती मतदार म्हणून नोंदणी होण्यास अपात्र असते. तर एका मतदारसंघात नोंदणी झालेला मतदार दुसऱ्या मतदारसंघात मतदान करू शकत नाही. ६१व्या घटनादुरुस्तीने मतदानासाठी किमान वय २१ वर्षांवरून १८ वर्षांवर आणले.)

प्र.क्र.६) – योग्य पर्याय (३) कलम ४८अन्वये दुभती जनावरे आणि गायींच्या प्रजातींचे वाण सुधारणे तसेच त्यांच्या कत्तलीस आळा घालणे या तरतुदीही करण्यात आल्या आहेत.

प्र.क्र.७) – योग्य पर्याय (४) तुंगभद्रा नदी पूर्ववाहिनी असली तरी ती कृष्णा नदीमध्ये मिळते. कृष्णा नदी बंगालच्या उपसागरास मिळते.

प्र.क्र.८) – योग्य पर्याय (२) पाकची सामुद्रधुनी मन्नारचे आखात आणि बंगालचा उपसागर यांच्या दरम्यान आहे.

प्र.क्र.९) – योग्य पर्याय (१) दुसरे महायुद्ध सन १९३९ ते १९४५ दरम्यान घडले. क्रिप्स मिशनची भारतभेट सन १९४२ मध्ये झाली तर सायमन कमिशन १९२७, कॅबिनेट मिशन १९४६ मध्ये भारतभेटीवर आले. तर मुंबईतील नाविकांचे बंड १९४६मध्ये घडले.

प्र.क्र.१०) – योग्य पर्याय (३) भारताचा कारभार ईस्ट इंडिया कंपनीकडून काढून घेऊन ब्रिटिश सम्राज्ञीकडे सोपविण्यात आला.

गट ‘क’ सेवा मुख्य परीक्षा  मराठी आणि इंग्रजी प्रश्नविश्लेषण

MPSC chalu ghadamodi, current affairs-Upsc Exam Preparation Akp 94 3

352   30-Sep-2019, Mon

लिपिक टंकलेखक, कर सहायक आणि दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क या पदांसाठी गट ‘क’ सेवा मुख्य परीक्षा संयुक्त आणि पदनिहाय पेपर अशा पद्धतीने पहिली परीक्षा मागील वर्षी झाली. या पॅटर्नमध्ये पेपर क्र. १ हा संयुक्त पेपर असतो आणि पेपर क्र. २ हा प्रत्येक पदासाठी वेगळा घेण्यात येतो. संयुक्त पेपरमध्ये मराठी व इंग्रजी हे घटकविषय समाविष्ट आहेत. सन  २०१८च्या पेपरचे विश्लेषण या लेखामध्ये करण्यात येत आहे.

मराठी भाषेसाठी ६० गुणांसाठी ६० प्रश्न तर इंग्रजी भाषेसाठी ४० गुणांसाठी ४० प्रश्न विचारण्यात आले आहेत. दोन्ही भाषांमध्ये उताऱ्यावरील प्रश्नांची संख्या आहे प्रत्येकी पाच. यापुढील परीक्षांमध्ये अशीच रचना असणे अपेक्षित आहे. या पेपरसाठी २५%  नकारात्मक गुणपद्धती लागू आहे. हे पाहता सर्वच्या सर्व प्रश्न सोडविण्याचा अट्टहास करून चालणार नाही. ८५ ते ९० प्रश्न सोडविण्याचे उद्दिष्ट ठरवून पेपर सोडविणे व्यवहार्य ठरेल. या सगळ्याचा विचार केला तर मराठीवर भर देऊन तयारी केल्यास चांगल्या गुणांची अपेक्षा करता येईल.

व्याकरणावरील प्रश्न

दोन्ही भाषांमधील व्याकरणावरील प्रश्नांमध्ये बहुविधानी प्रश्नांचे प्रमाण बरेच जास्त आहे.   प्रत्येक प्रकारच्या नियमावर किमान एक तरी प्रश्न विचारण्यात आलेला आहे.

 • दोन्ही भाषांमधील व्याकरणावरील प्रश्न हे उदाहरणे देऊन आणि प्रत्यक्ष( direct / straight forward) दोन्ही पद्धतींनी विचारण्यात आले आहेत. त्यामुळे नियमांची नेमकी माहिती असणे आणि त्यांचा वापर करता येणे दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत.
 • इंग्रजी शब्द रचना, स्पेलिंग, शब्दांचे प्रकार यांवर सरळ व विश्लेषणात्मक अशा दोन्ही प्रकारे प्रश्न विचारण्यात आले आहेत. रेन अँड मार्टिन किंवा कोणत्याही इंग्रजी व्याकरणाच्या प्रमाणित संदर्भग्रंथाचा वापर करावा.
 • इंग्रजी वाक्यरचनेचे प्रकार व त्याचे नियम बारकाईने समजून घेणे आवश्यक आहे. [प्रयोग, काळ आणि तुलनांचे स्तर (Degrees of Comparison)]. या घटकाचा अभ्यास कसा करावा, यासाठी सिव्हिल्स महाराष्ट्र-राज्य लोकसेवा आयोग परीक्षा माहिती कोश हे पुस्तक उपयोगी ठरेल.
 • मराठीच्या प्रश्नांमध्ये व्याकरणाचे प्रत्यक्ष नियम विचारण्यापेक्षा नियमांचे उपयोजन करून उदाहरणे सोडविण्याच्या प्रश्नांचा समावेश जास्त आहे. त्यामुळे अर्थ समजून घेऊन नियमांचा वापर करण्याचा सराव आवश्यक आहे. यासाठी के सागर प्रकाशनचे डॉ. लीला गोविलकर यांचे मराठी व्याकरणाचे पुस्तक वापरावे.
 • म्हणी आणि वाक्प्रचार यांवरील प्रश्नांची तयारी जास्तीत जास्त सराव करूनच होऊ शकणार आहे, हे लक्षात घ्यावे.
 • समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार व म्हणी यांबाबतचे प्रश्न सोडविण्यासाठी रोजचे इंग्रजी वाचन व त्याचे आकलन याचा सराव आवश्यक आहे. वाक्प्रचार, म्हणी व अनेक शब्दांसाठी एका शब्दाचे उपयोजन यांची तयारी कशी करावी यासाठीही सिव्हिल्स महाराष्ट्र वाचावे.ल्ल शब्दांचे अर्थ आणि मूलभूत व्याकरण नियम यांची सांगड घालणारे प्रश्नही विश्लेषणात्मक प्रश्नांमध्ये समाविष्ट आहेत.
 • दोन्ही भाषांमधील शब्दसंग्रह, वाक्प्रचार व म्हणी यांचा संग्रह वारंवार वाचत राहणे आणि शक्य असेल तर रोजच्या रोज ठरावीक वेळी अवांतर वाचन करणे हा या घटकाच्या तयारीचा गाभा आहे.
 • उताऱ्यावरील प्रश्नांच्या विश्लेषणातून लक्षात येते की चर्चाविषय नीट समजून घेतला तर सगळेच प्रश्न आत्मविश्वासाने सोडविता येतात. त्यामुळे उतारा
 • घाई न करता शांतपणे व समजून घेत वाचला तर प्रश्नांचे उत्तर नेमके कुठे शोधायचे ते लगेच लक्षात येईल.

यासाठी दोन्ही उताऱ्यांना मिळून किमान १० ते १२ मिनिटे दिलीत तर १० पकी ८ गुण तर नक्कीच मिळवता येतील.मराठी आणि इंग्रजी या भाषांचे व्याकरण ढोबळ नियमांच्या समान रचनेमध्ये दर्शवता येत असले तरी त्यांच्यामध्ये मूलभूत फरक आहे. किंबहुना प्रत्येक भाषेची शब्दयोजना, वाक्यरचना इत्यादी बाबी इतरांपेक्षा वेगळ्याच असतात. हा मुद्दा लक्षात घेऊन दोन्ही भाषांच्या अभ्यासासाठी स्वतंत्र पण समांतर अशी योजना करता आल्यास कमी वेळेत चांगली तयारी होते. भाषेचा अर्थ व व्याकरणाचे नियम समजून घेणे आणि त्यांच्या वापराचा सराव करणे ही फक्त या परीक्षेतील यशाचीच नव्हे तर भाषेवर मजबूत पकड निर्माण करायची गुरुकिल्ली आहे.

एमपीएससी मंत्र : वनसेवा मुख्य परीक्षा पर्यावरण आणि वनविषयक घटक

MPSC chalu ghadamodi, current affairs-Forest Service Main Exam Mpsc Abn 97 2

403   29-Sep-2019, Sun

वनसेवा मुख्य परीक्षेच्या पेपर दोनमधील पर्यावरण आणि वनविषयक मुद्दय़ांच्या तयारीबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास अभ्यासाची दिशा आणि विस्तार निश्चित करता येतो. या विश्लेषणाच्या आधारावर पर्यावरणाशी संबंधित मुद्दे आणि वनसंवर्धनाशी संबंधित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय उपक्रम या घटकांची तयारी पुढीलप्रमाणे करता येईल.

पर्यावरणविषयक मुद्दे

*   यातील पर्यावरण प्रदूषण, खाणकामाशी संबंधित पर्यावरणीय समस्या, हरितगृह परिणाम, कार्बन ट्रेडिंग, हवामान बदल या प्रत्येक मुद्दय़ावर प्रश्न विचारण्यात आले आहेत.

*   पर्यावरणीय प्रदूषण अभ्यासताना प्रदूषणाचे प्रकार (वायू, जल, मृदा, ध्वनी, आण्विक, इ.), त्यांचे मानवी आरोग्य, हवामान इत्यादीवरील परिणाम समजून घ्यावेत. याबाबतची आंतरराष्ट्रीय मानके, संयुक्त राष्ट्र संघटनेतील ठराव इत्यादी बाबी समजून घ्याव्यात.

*   हवा, पाणी आणि मृदेच्या प्रदूषणास जबाबदार प्रदूषकांचे प्रकार, त्यांचे स्रोत, त्यांच्या वातावरणातील प्रमाणाची मर्यादा, त्या मर्यादेबाहेर वाढ झाल्यास मानवी आरोग्य व हवामानावर होणारे परिणाम याबाबतची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मानके, वाहनांच्या प्रदूषण मर्यादेची भारत मानके यांचा आढावा घ्यायला हवा.

*   प्रदूषणाच्या ऐतिहासिक व व्यापक परिणाम केलेल्या जागतिक व राष्ट्रीय स्तरावरील घटना माहीत असायला हव्यात. तसेच महत्त्वाच्या प्रदूषित नद्या, शहरे, त्यांची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रमवारी, त्यांच्यामधील प्रदूषणाचे स्रोत, प्रमाण, प्रदूषण नियंत्रणासाठीचे प्रयत्न यांचा आढावा घ्यावा.

*   हरितगृह परिणाम व हवामान बदल या संकल्पना व्यवस्थित समजून घ्यायला हव्यात. हरितगृह वायू, त्यांचे हवेतील प्रमाण, त्यांचे स्रोत, त्यांच्यामुळे होणारे परिणाम बारकाईने समजून घ्यावेत.

*   प्रदूषणाच्या नियंत्रणासाठीचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रयत्न समजून घ्यायला हवेत. त्याबाबत वसुंधरा परिषद, क्योटो प्रोटोकॉल, पॅरीस परिषद इत्यादी महत्त्वाच्या परिषदा व त्यातील ठराव माहीत असावेत. यामध्ये कार्बन ट्रेडिंग ही संकल्पना समजून घ्यायला हवी.

*   यामध्ये पर्यावरणविषयक कायद्यांचा अभ्यासही आवश्यक आहे. जल, वायू, ध्वनी नियंत्रणविषयक कायद्यांमधील व्याख्या, प्रदूषणाच्या मर्यादा, दंड, शिक्षा, अधिकारी या बाबतच्या तरतुदी व्यवस्थित समजून घ्याव्यात. केंद्र व राज्य शासनाची पर्यावरणपूरक धोरणे माहीत असायला हवीत.

*   उत्खनन आणि खाणकाम या बाबींचे भूरूप, हवामान, जलस्रोत, मानवी आरोग्य यांवरील तसेच इतर सामाजिक व सांस्कृतिक परिणाम समजून घ्यायला हवेत. देशातील अशा उपक्रमांचे ठळक परिणाम व त्यामुळे न्यायालये किंवा शासनाने घेतलेले महत्त्वाचे निर्णय विचारण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांचा आढावा आवश्यक आहे.

वनसंवर्धनासाठीचे प्रयत्न

*   यामध्ये कृषी वानिकी, सामाजिक वनीकरण, संयुक्त वन व्यवस्थापन, वनविषयक कायदे, वन संवर्धनामध्ये कार्यरत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्था, रात्रीय वने व जागतिक वारसा स्थळे या मुद्दय़ांचा समावेश केलेला आहे. या प्रत्येक मुद्दय़ावर प्रश्न विचारलेले आहेत, तसेच याबाबतच्या चालू घडामोडींचाही प्रश्नामध्ये समावेश आहे.

*   कृषी वानिकी, सामाजिक वनीकरण आणि संयुक्त वन व्यवस्थापन या संकल्पना, यामध्ये समाविष्ट उपक्रम, त्यांची उद्दिष्टे अशा उपक्रमांमधील भौगोलिक वैविध्य समजून घ्यावेत. या मुद्दय़ांवर संकल्पनात्मक प्रश्न विचारण्याचा कल जास्त दिसून येतो.

*   भारताची वन धोरणे, वन कायदा, वन्यजीव संरक्षण कायदा, वन संवर्धन कायदा यांचा अभ्यासक्रमामध्ये उल्लेख असल्याने त्यांचा अधिक बारकाईने अभ्यास करणे आवश्यक आहे. कायद्याची पार्श्वभूमी, महत्त्वाच्या व्याख्या, अंमलबजावणी अधिकारी, गुन्ह्य़ाचे स्वरूप, निकष, अपीलीय प्राधिकारी, तक्रारी / अपिलासाठीची (असल्यास निर्णय देण्याची / कार्यवाहीची) कालमर्यादा, दंड / शिक्षेची तरतूद, अंमलबजावणीची प्रक्रिया – विहित मुदती, पार्श्वभूमी, असल्यास विशेष न्यायालये, नमूद केलेले अपवाद हे मुद्दे विशेषत्वाने अभ्यासावेत. यासाठी हे कायदे मुळातून वाचणेच जास्त व्यवहार्य ठरते.

*   राष्ट्रीय वने व उद्याने, अभयारण्ये यांच्या व्याख्या, निकष, त्यांच्या व्यवस्थापनासाठी जबाबदार अधिकारी व यंत्रणा यांचा नेमका अभ्यास करावा. देशातील महत्त्वाची आणि महाराष्ट्रातील सर्व राष्ट्रीय वने व उद्याने, त्यांचे स्थान, त्यातील महत्त्वाचे वृक्ष व प्राणी पक्षी यांच्याविषयी कोष्टक पद्धतीत टिपणे काढून अभ्यास करावा. देशातील महत्त्वाची आणि महाराष्ट्रातील सर्व अभयारण्ये व ती ज्या प्राणी अथवा पक्ष्यांसाठी राखीव आहेत त्यांची माहिती, तसेच त्या वनांची इतर वैशिष्टय़े समजून घ्यावीत.

*   आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटना (IUCN), संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP), हवामान बदलावरील आंतरशासकीय समिती (IPCC) तसेच भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्था आणि प्राणी सर्वेक्षण संस्था यांचा स्थापना, उद्दिष्ट, रचना, कार्ये, वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे या मुद्दय़ांच्या आधारे अभ्यास करावा.

*   IUCN च्या रेड लिस्टमधील लुप्तप्राय जमातींचे वर्गीकरण व त्याचे निकष तसेच भारतातील लुप्तप्राय जमाती यांची माहिती करून घ्यावी.

*    युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमधील नैसर्गिक वारसा स्थळे माहीत असावीत. भारतातील जागतिक नैसर्गिक वारसा स्थळे आणि जैवविविधता हॉट्स्पॉट यांची नेमकी माहिती करून घ्यावी.

प्रश्नवेध एमपीएससी : वनसेवा मुख्य परीक्षा सराव प्रश्न

MPSC chalu ghadamodi, current affairs-Forest Service Main Exam Mpsc Abn 97

411   29-Sep-2019, Sun

वनसेवा मुख्य परीक्षा येत्या १५ सप्टेंबरला होत आहे. मुख्य परीक्षेच्या पेपर दोनचे सराव प्रश्न या लेखामध्ये देण्यात येत आहेत.

*   Que1: Which of the following weeds has been introduced for afforestation in Western Ghats?

1) Clidemia Hirta

2) Acacia mearnsii

3) Blainvillea acmella

4) Datura innoxia

*   Que2:Which of the following type of soil moister can not be absorbed by plants?

 1. Hygroscopic water
 2. Gravitational water
 3. Capillary water

1) a, b and c

2) a and b

3) b and c

4) a and c

*   Que 3: Which of the following is not an Aichi Target?

1) To safeguard the genetic diversity of cultivated plants and domestic animals by 2020.

2) To bring the pollution to the levels that are not detrimental to biodiversity by 2020.

3) To prevent the extinction of known threatened species and conserve them by 2020.

4) To bring the usage of crude oil to the levels that are not hazardous to the climate by 2020.

*   Que 4: The term denitrification describes which of the following process in the biogeochemical cycle of Nitrogen?

1) The bacteria in the soil converts the decomposed matter into N2 which is released in the air.

2) The bacteria involved in the decomposition of matter, converts organic nitrogen into ammonia.

3) The atmospheric NO2is converted into forms useful for absorption in plants by bacteria or lightening.

4) The bacteria in soil and water oxidize ammonia and ammonium ions and form nitrites and nitrates.

*   Que 5: Which of the following statement is not true regarding Forest Survey of India?

1) It is established on 1stJune 1981.

2) The headquarter of FSI is in Deharadun.

3) The Divisional offices of FSI are at Delhi, Mumbai, Kolakata and Chennai.

4) The FSI publishes the State of Forest reports biennially.

*  Que 6: Which of the following statements is true for the Deoni cattle breed?

1) It is a dual purpose breed indigenous to Australia.

2) It is mainly found in Latur, Nanded, Osmanabad and Prabhani districts of Maharashtra.

3) It has been awarded as best cattle for more than 35 times in Indian cattle exhibition.

4) The milk production from this breed is 700 to 1200 Kg.

*   Que 7: Which of the following are the objectives of water shade management?

 1. flood control b. prevention of soil degradation
 2. rain water harvesting. checking sedimentation

1) a, b, c & d

2) a, c & d

3) b, c & d

4) a, b & d

उत्तरे व स्पष्टीकरणे

प्र. क्र.१ – योग्य पर्याय क्र.   (२) Acacia mearnsii हे तण पश्चिम घाट क्षेत्रामध्ये आढळते. त्याचे मूळ स्थान ऑस्ट्रेलिया आहे.

प्र. क्र.२ – योग्य पर्याय क्र.

(३) Hygroscopic water (जलाकर्षक मृदाजल) मृदाकणांना वातावरणीय दाबाने जोडलेले असते. या दाबाचा परिणाम नसíगक बलाने तोडता येत नसल्याने हे पाणी वनस्पतींना उपलब्ध होऊ शकत नाही.

प्र. क्र. ३ – योग्य पर्याय क्र. (४)

प्र. क्र.४ – योग्य पर्याय क्र.(१) नायट्रोजन चक्राच्या प्रक्रिया व त्यांच्या संज्ञा पुढील्प्रमाणे आहेत:

The bacteria involved in the decomposition of matter, converts organic nitrogen into ammonia – ammonification

The atmospheric NO2 is converted into forms useful for absorption in plants by bacteria or lightening – Nitrogen fixation

The bacteria in soil and water oxidize ammonia and ammonium ions and form nitrites and nitrates – nitrification

प्र. क्र. ५- योग्य पर्याय क्र.   (३) The Divisional offices of FSI are at Kolakata, Bengluru, NAgapur and Simala

प्र. क्र. ६ – योग्य पर्याय क्र.(१) देवणी हा भारतीय वंश आहे.

प्र. क्र.७ – योग्य पर्याय क्र. (४) The rain water harvesting  हा पाणलोटक्षेत्र व्यवस्थापनाचा उद्देश्य नाही तर पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनातील प्रक्रिया आहे.

एमपीएससी मंत्र : वनसेवा परीक्षा मुख्य परीक्षा पेपर दोन विश्लेषण

MPSC chalu ghadamodi, current affairs-Forest Service Exam Main Examination Paper Mpsc Abn 9

204   29-Sep-2019, Sun

महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा पेपर एकमधील घटकांच्या तयारीबाबत मागील लेखांमध्ये चर्चा करण्यात आली. या लेखापासून पेपर दोनच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येत आहे.

वनसेवा मुख्य परीक्षा पेपर दोनमध्ये सामान्य विज्ञान आणि निसर्ग संवर्धन हा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे विहित केलेला आहे. –

1)  General Science

(Physics, Chemistry, Botany, Zoology)

2)   Nature Conservation

*    2.1 1 Soils: – Physical, chemical and biological properties. Processes and factors of soil formation. Mineral and organic constituents of soil and their role in maintaining soil productivity.

Soil profile. Problem soils and their reclamation.

*  Soil and moisture conservation:- Causes of soil erosion, method of control, role of forest, characteristics of and steps in Watershed Management.

*   2.2 1 Eco Systems: – Types, food chain, food web, ecological pyramids, energy flow, biogeochemical cycle of carbon and nitrogen.

2  Manures and Fertilizers:- Types, organic – inorganic.

3  Diseases and pests of plants and animals.

4  Pesticides and insecticides.

5  Injurious plants and weeds.

*    2.3 1 Environmental Pollution:- Types, control,

bio-indicators, endangered species,.

2 Environmental problems related to quarrying and mining.

3  Greenhouse effect, Carbon trading, Climate Change.

*    2.4 1 Important wild animals of India.

2  Breeds of cattle, Economics of fodder and pasture of grassland management.

*    2.5 1 Important indigenous trees species of India, exotic plants, plants as a source of forest products such as food, fibre, fuel wood, timber, non-timber, forest produce/minor forest produce. Medicinal plants, Energy plantations, Mangroves, Forest based industries.

2  Factors effecting growth and distribution of plants. Forest types of India.

*   2. 6 1 National parks and Sanctuaries, World heritage sites.

2  Social forestry, Joint Forest Management, Agro forestry.

3  Indian forest policy, Indian Forest Act, Wild Life Protection Act, Forest Conservation Act, 1980.

4  National and International Organization working for nature conservation.

*    2.7 1 Use of aerial photographs, thematic maps. Satellite imageries, Principle and application of GIS.

2 Biodiversity, causes of loss of biodiversity, importance of biodiversity conservation.

3 Plants breeding, tissue culture. Tribals and forests. Important tribes of India.

या अभ्यासक्रमावर मागील वर्षांमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांच्या विश्लेषणातून पुढील मुद्दे लक्षात येतात. या मुद्दय़ांच्या आधारे अभ्यासाची नेमकी दिशा ठरविण्यास मदत होते.

*     सामान्य अध्ययन घटकातील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र व प्राणीशास्त्र यांमध्ये मूलभूत संकल्पनांवर आधारित प्रश्न विचारण्यात आले आहेत.

*     रसायनशास्त्रामध्ये महत्त्वाच्या संयुगांची रेणूसूत्रे, गुणधर्म, उपयोग इत्यादी विचारण्यात आले आहेत. भौतिकशास्त्रातील बल, विद्युत इत्यादी बाबींवर समीकरणे विचारण्यात आली आहेत तर रसायनशास्त्रातील महत्त्वाच्या अभिक्रिया विचारण्यात आल्या आहेत.

*     वनस्पती व प्राणीशास्त्रातील वर्गीकरण, विविध वर्गातील वनस्पती / प्राण्यांची वैशिष्टय़े, वनस्पतींसाठीची पोषक द्रव्ये, त्यांचे रोग यावर प्रश्न विचारलेले आहेत.

*    मृदा या घटकावर अभ्यासक्रमामध्ये दिलेल्या प्रत्येक मुद्दय़ाचा अभ्यास आवश्यक आहे. यातील प्रत्येक घटकावरील प्रश्नांचा समावेश

दरवर्षीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये केलेला दिसून येतो.

*     पर्यावरण आणि जीवशास्त्रातील मूलभूत संकल्पना, महत्त्वाच्या अभ्यासशाखा व त्यांचे विषय विचारण्यात आले आहेत.

*     पर्यावरण आणि वने याबाबतच्या राष्ट्रीय स्तरावरील चालू घडामोडींवर प्रश्न विचारलेले आहेत.

*     वने आणि पर्यावरण यांच्याशी संबंधित कायदे, आदिवासी व जंगल संवर्धन यांसाठीच्या योजना यांमधील तरतुदी नेमकेपणाने माहीत असणे आवश्यक आहे.

*     पारिस्थितिकी घटकातील अन्नसाखळी व जाळे, जैवरासायनिक चक्रे, खते, वनस्पतींवरील रोग, कीटकनाशके या मुद्दय़ांवर दरवर्षी प्रश्न विचारलेले आहेत.

*     निसर्ग संवर्धनासाठी कार्यरत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांचे कार्य, उद्दिष्टे, स्थापना या मुद्दय़ांचा प्रश्नांमध्ये समावेश आहे.

* Aerial photographs, thematic maps. Satellite imageries, Principle and application of GIS या मुद्दय़ांवर चालू घडामोडी, मूलभूत संकल्पना आणि तांत्रिक आयामांवर प्रश्न विचारलेले आहेत.

वरील विश्लेषणाच्या आधारे पेपर दोनचा अभ्यास कशा प्रकारे करावा याची चर्चा पुढील लेखांमध्ये करण्यात येईल.


Top