एमपीएससी मंत्र : वनसेवा मुख्य परीक्षा पर्यावरण आणि वनविषयक घटक

MPSC chalu ghadamodi, current affairs-Forest Service Main Exam Mpsc Abn 97 2

2512   29-Sep-2019, Sun

वनसेवा मुख्य परीक्षेच्या पेपर दोनमधील पर्यावरण आणि वनविषयक मुद्दय़ांच्या तयारीबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास अभ्यासाची दिशा आणि विस्तार निश्चित करता येतो. या विश्लेषणाच्या आधारावर पर्यावरणाशी संबंधित मुद्दे आणि वनसंवर्धनाशी संबंधित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय उपक्रम या घटकांची तयारी पुढीलप्रमाणे करता येईल.

पर्यावरणविषयक मुद्दे

*   यातील पर्यावरण प्रदूषण, खाणकामाशी संबंधित पर्यावरणीय समस्या, हरितगृह परिणाम, कार्बन ट्रेडिंग, हवामान बदल या प्रत्येक मुद्दय़ावर प्रश्न विचारण्यात आले आहेत.

*   पर्यावरणीय प्रदूषण अभ्यासताना प्रदूषणाचे प्रकार (वायू, जल, मृदा, ध्वनी, आण्विक, इ.), त्यांचे मानवी आरोग्य, हवामान इत्यादीवरील परिणाम समजून घ्यावेत. याबाबतची आंतरराष्ट्रीय मानके, संयुक्त राष्ट्र संघटनेतील ठराव इत्यादी बाबी समजून घ्याव्यात.

*   हवा, पाणी आणि मृदेच्या प्रदूषणास जबाबदार प्रदूषकांचे प्रकार, त्यांचे स्रोत, त्यांच्या वातावरणातील प्रमाणाची मर्यादा, त्या मर्यादेबाहेर वाढ झाल्यास मानवी आरोग्य व हवामानावर होणारे परिणाम याबाबतची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मानके, वाहनांच्या प्रदूषण मर्यादेची भारत मानके यांचा आढावा घ्यायला हवा.

*   प्रदूषणाच्या ऐतिहासिक व व्यापक परिणाम केलेल्या जागतिक व राष्ट्रीय स्तरावरील घटना माहीत असायला हव्यात. तसेच महत्त्वाच्या प्रदूषित नद्या, शहरे, त्यांची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रमवारी, त्यांच्यामधील प्रदूषणाचे स्रोत, प्रमाण, प्रदूषण नियंत्रणासाठीचे प्रयत्न यांचा आढावा घ्यावा.

*   हरितगृह परिणाम व हवामान बदल या संकल्पना व्यवस्थित समजून घ्यायला हव्यात. हरितगृह वायू, त्यांचे हवेतील प्रमाण, त्यांचे स्रोत, त्यांच्यामुळे होणारे परिणाम बारकाईने समजून घ्यावेत.

*   प्रदूषणाच्या नियंत्रणासाठीचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रयत्न समजून घ्यायला हवेत. त्याबाबत वसुंधरा परिषद, क्योटो प्रोटोकॉल, पॅरीस परिषद इत्यादी महत्त्वाच्या परिषदा व त्यातील ठराव माहीत असावेत. यामध्ये कार्बन ट्रेडिंग ही संकल्पना समजून घ्यायला हवी.

*   यामध्ये पर्यावरणविषयक कायद्यांचा अभ्यासही आवश्यक आहे. जल, वायू, ध्वनी नियंत्रणविषयक कायद्यांमधील व्याख्या, प्रदूषणाच्या मर्यादा, दंड, शिक्षा, अधिकारी या बाबतच्या तरतुदी व्यवस्थित समजून घ्याव्यात. केंद्र व राज्य शासनाची पर्यावरणपूरक धोरणे माहीत असायला हवीत.

*   उत्खनन आणि खाणकाम या बाबींचे भूरूप, हवामान, जलस्रोत, मानवी आरोग्य यांवरील तसेच इतर सामाजिक व सांस्कृतिक परिणाम समजून घ्यायला हवेत. देशातील अशा उपक्रमांचे ठळक परिणाम व त्यामुळे न्यायालये किंवा शासनाने घेतलेले महत्त्वाचे निर्णय विचारण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांचा आढावा आवश्यक आहे.

वनसंवर्धनासाठीचे प्रयत्न

*   यामध्ये कृषी वानिकी, सामाजिक वनीकरण, संयुक्त वन व्यवस्थापन, वनविषयक कायदे, वन संवर्धनामध्ये कार्यरत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्था, रात्रीय वने व जागतिक वारसा स्थळे या मुद्दय़ांचा समावेश केलेला आहे. या प्रत्येक मुद्दय़ावर प्रश्न विचारलेले आहेत, तसेच याबाबतच्या चालू घडामोडींचाही प्रश्नामध्ये समावेश आहे.

*   कृषी वानिकी, सामाजिक वनीकरण आणि संयुक्त वन व्यवस्थापन या संकल्पना, यामध्ये समाविष्ट उपक्रम, त्यांची उद्दिष्टे अशा उपक्रमांमधील भौगोलिक वैविध्य समजून घ्यावेत. या मुद्दय़ांवर संकल्पनात्मक प्रश्न विचारण्याचा कल जास्त दिसून येतो.

*   भारताची वन धोरणे, वन कायदा, वन्यजीव संरक्षण कायदा, वन संवर्धन कायदा यांचा अभ्यासक्रमामध्ये उल्लेख असल्याने त्यांचा अधिक बारकाईने अभ्यास करणे आवश्यक आहे. कायद्याची पार्श्वभूमी, महत्त्वाच्या व्याख्या, अंमलबजावणी अधिकारी, गुन्ह्य़ाचे स्वरूप, निकष, अपीलीय प्राधिकारी, तक्रारी / अपिलासाठीची (असल्यास निर्णय देण्याची / कार्यवाहीची) कालमर्यादा, दंड / शिक्षेची तरतूद, अंमलबजावणीची प्रक्रिया – विहित मुदती, पार्श्वभूमी, असल्यास विशेष न्यायालये, नमूद केलेले अपवाद हे मुद्दे विशेषत्वाने अभ्यासावेत. यासाठी हे कायदे मुळातून वाचणेच जास्त व्यवहार्य ठरते.

*   राष्ट्रीय वने व उद्याने, अभयारण्ये यांच्या व्याख्या, निकष, त्यांच्या व्यवस्थापनासाठी जबाबदार अधिकारी व यंत्रणा यांचा नेमका अभ्यास करावा. देशातील महत्त्वाची आणि महाराष्ट्रातील सर्व राष्ट्रीय वने व उद्याने, त्यांचे स्थान, त्यातील महत्त्वाचे वृक्ष व प्राणी पक्षी यांच्याविषयी कोष्टक पद्धतीत टिपणे काढून अभ्यास करावा. देशातील महत्त्वाची आणि महाराष्ट्रातील सर्व अभयारण्ये व ती ज्या प्राणी अथवा पक्ष्यांसाठी राखीव आहेत त्यांची माहिती, तसेच त्या वनांची इतर वैशिष्टय़े समजून घ्यावीत.

*   आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटना (IUCN), संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP), हवामान बदलावरील आंतरशासकीय समिती (IPCC) तसेच भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्था आणि प्राणी सर्वेक्षण संस्था यांचा स्थापना, उद्दिष्ट, रचना, कार्ये, वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे या मुद्दय़ांच्या आधारे अभ्यास करावा.

*   IUCN च्या रेड लिस्टमधील लुप्तप्राय जमातींचे वर्गीकरण व त्याचे निकष तसेच भारतातील लुप्तप्राय जमाती यांची माहिती करून घ्यावी.

*    युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमधील नैसर्गिक वारसा स्थळे माहीत असावीत. भारतातील जागतिक नैसर्गिक वारसा स्थळे आणि जैवविविधता हॉट्स्पॉट यांची नेमकी माहिती करून घ्यावी.

प्रश्नवेध एमपीएससी : वनसेवा मुख्य परीक्षा सराव प्रश्न

MPSC chalu ghadamodi, current affairs-Forest Service Main Exam Mpsc Abn 97

567   29-Sep-2019, Sun

वनसेवा मुख्य परीक्षा येत्या १५ सप्टेंबरला होत आहे. मुख्य परीक्षेच्या पेपर दोनचे सराव प्रश्न या लेखामध्ये देण्यात येत आहेत.

*   Que1: Which of the following weeds has been introduced for afforestation in Western Ghats?

1) Clidemia Hirta

2) Acacia mearnsii

3) Blainvillea acmella

4) Datura innoxia

*   Que2:Which of the following type of soil moister can not be absorbed by plants?

 1. Hygroscopic water
 2. Gravitational water
 3. Capillary water

1) a, b and c

2) a and b

3) b and c

4) a and c

*   Que 3: Which of the following is not an Aichi Target?

1) To safeguard the genetic diversity of cultivated plants and domestic animals by 2020.

2) To bring the pollution to the levels that are not detrimental to biodiversity by 2020.

3) To prevent the extinction of known threatened species and conserve them by 2020.

4) To bring the usage of crude oil to the levels that are not hazardous to the climate by 2020.

*   Que 4: The term denitrification describes which of the following process in the biogeochemical cycle of Nitrogen?

1) The bacteria in the soil converts the decomposed matter into N2 which is released in the air.

2) The bacteria involved in the decomposition of matter, converts organic nitrogen into ammonia.

3) The atmospheric NO2is converted into forms useful for absorption in plants by bacteria or lightening.

4) The bacteria in soil and water oxidize ammonia and ammonium ions and form nitrites and nitrates.

*   Que 5: Which of the following statement is not true regarding Forest Survey of India?

1) It is established on 1stJune 1981.

2) The headquarter of FSI is in Deharadun.

3) The Divisional offices of FSI are at Delhi, Mumbai, Kolakata and Chennai.

4) The FSI publishes the State of Forest reports biennially.

*  Que 6: Which of the following statements is true for the Deoni cattle breed?

1) It is a dual purpose breed indigenous to Australia.

2) It is mainly found in Latur, Nanded, Osmanabad and Prabhani districts of Maharashtra.

3) It has been awarded as best cattle for more than 35 times in Indian cattle exhibition.

4) The milk production from this breed is 700 to 1200 Kg.

*   Que 7: Which of the following are the objectives of water shade management?

 1. flood control b. prevention of soil degradation
 2. rain water harvesting. checking sedimentation

1) a, b, c & d

2) a, c & d

3) b, c & d

4) a, b & d

उत्तरे व स्पष्टीकरणे

प्र. क्र.१ – योग्य पर्याय क्र.   (२) Acacia mearnsii हे तण पश्चिम घाट क्षेत्रामध्ये आढळते. त्याचे मूळ स्थान ऑस्ट्रेलिया आहे.

प्र. क्र.२ – योग्य पर्याय क्र.

(३) Hygroscopic water (जलाकर्षक मृदाजल) मृदाकणांना वातावरणीय दाबाने जोडलेले असते. या दाबाचा परिणाम नसíगक बलाने तोडता येत नसल्याने हे पाणी वनस्पतींना उपलब्ध होऊ शकत नाही.

प्र. क्र. ३ – योग्य पर्याय क्र. (४)

प्र. क्र.४ – योग्य पर्याय क्र.(१) नायट्रोजन चक्राच्या प्रक्रिया व त्यांच्या संज्ञा पुढील्प्रमाणे आहेत:

The bacteria involved in the decomposition of matter, converts organic nitrogen into ammonia – ammonification

The atmospheric NO2 is converted into forms useful for absorption in plants by bacteria or lightening – Nitrogen fixation

The bacteria in soil and water oxidize ammonia and ammonium ions and form nitrites and nitrates – nitrification

प्र. क्र. ५- योग्य पर्याय क्र.   (३) The Divisional offices of FSI are at Kolakata, Bengluru, NAgapur and Simala

प्र. क्र. ६ – योग्य पर्याय क्र.(१) देवणी हा भारतीय वंश आहे.

प्र. क्र.७ – योग्य पर्याय क्र. (४) The rain water harvesting  हा पाणलोटक्षेत्र व्यवस्थापनाचा उद्देश्य नाही तर पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनातील प्रक्रिया आहे.

एमपीएससी मंत्र : वनसेवा परीक्षा मुख्य परीक्षा पेपर दोन विश्लेषण

MPSC chalu ghadamodi, current affairs-Forest Service Exam Main Examination Paper Mpsc Abn 9

752   29-Sep-2019, Sun

महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा पेपर एकमधील घटकांच्या तयारीबाबत मागील लेखांमध्ये चर्चा करण्यात आली. या लेखापासून पेपर दोनच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येत आहे.

वनसेवा मुख्य परीक्षा पेपर दोनमध्ये सामान्य विज्ञान आणि निसर्ग संवर्धन हा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे विहित केलेला आहे. –

1)  General Science

(Physics, Chemistry, Botany, Zoology)

2)   Nature Conservation

*    2.1 1 Soils: – Physical, chemical and biological properties. Processes and factors of soil formation. Mineral and organic constituents of soil and their role in maintaining soil productivity.

Soil profile. Problem soils and their reclamation.

*  Soil and moisture conservation:- Causes of soil erosion, method of control, role of forest, characteristics of and steps in Watershed Management.

*   2.2 1 Eco Systems: – Types, food chain, food web, ecological pyramids, energy flow, biogeochemical cycle of carbon and nitrogen.

2  Manures and Fertilizers:- Types, organic – inorganic.

3  Diseases and pests of plants and animals.

4  Pesticides and insecticides.

5  Injurious plants and weeds.

*    2.3 1 Environmental Pollution:- Types, control,

bio-indicators, endangered species,.

2 Environmental problems related to quarrying and mining.

3  Greenhouse effect, Carbon trading, Climate Change.

*    2.4 1 Important wild animals of India.

2  Breeds of cattle, Economics of fodder and pasture of grassland management.

*    2.5 1 Important indigenous trees species of India, exotic plants, plants as a source of forest products such as food, fibre, fuel wood, timber, non-timber, forest produce/minor forest produce. Medicinal plants, Energy plantations, Mangroves, Forest based industries.

2  Factors effecting growth and distribution of plants. Forest types of India.

*   2. 6 1 National parks and Sanctuaries, World heritage sites.

2  Social forestry, Joint Forest Management, Agro forestry.

3  Indian forest policy, Indian Forest Act, Wild Life Protection Act, Forest Conservation Act, 1980.

4  National and International Organization working for nature conservation.

*    2.7 1 Use of aerial photographs, thematic maps. Satellite imageries, Principle and application of GIS.

2 Biodiversity, causes of loss of biodiversity, importance of biodiversity conservation.

3 Plants breeding, tissue culture. Tribals and forests. Important tribes of India.

या अभ्यासक्रमावर मागील वर्षांमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांच्या विश्लेषणातून पुढील मुद्दे लक्षात येतात. या मुद्दय़ांच्या आधारे अभ्यासाची नेमकी दिशा ठरविण्यास मदत होते.

*     सामान्य अध्ययन घटकातील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र व प्राणीशास्त्र यांमध्ये मूलभूत संकल्पनांवर आधारित प्रश्न विचारण्यात आले आहेत.

*     रसायनशास्त्रामध्ये महत्त्वाच्या संयुगांची रेणूसूत्रे, गुणधर्म, उपयोग इत्यादी विचारण्यात आले आहेत. भौतिकशास्त्रातील बल, विद्युत इत्यादी बाबींवर समीकरणे विचारण्यात आली आहेत तर रसायनशास्त्रातील महत्त्वाच्या अभिक्रिया विचारण्यात आल्या आहेत.

*     वनस्पती व प्राणीशास्त्रातील वर्गीकरण, विविध वर्गातील वनस्पती / प्राण्यांची वैशिष्टय़े, वनस्पतींसाठीची पोषक द्रव्ये, त्यांचे रोग यावर प्रश्न विचारलेले आहेत.

*    मृदा या घटकावर अभ्यासक्रमामध्ये दिलेल्या प्रत्येक मुद्दय़ाचा अभ्यास आवश्यक आहे. यातील प्रत्येक घटकावरील प्रश्नांचा समावेश

दरवर्षीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये केलेला दिसून येतो.

*     पर्यावरण आणि जीवशास्त्रातील मूलभूत संकल्पना, महत्त्वाच्या अभ्यासशाखा व त्यांचे विषय विचारण्यात आले आहेत.

*     पर्यावरण आणि वने याबाबतच्या राष्ट्रीय स्तरावरील चालू घडामोडींवर प्रश्न विचारलेले आहेत.

*     वने आणि पर्यावरण यांच्याशी संबंधित कायदे, आदिवासी व जंगल संवर्धन यांसाठीच्या योजना यांमधील तरतुदी नेमकेपणाने माहीत असणे आवश्यक आहे.

*     पारिस्थितिकी घटकातील अन्नसाखळी व जाळे, जैवरासायनिक चक्रे, खते, वनस्पतींवरील रोग, कीटकनाशके या मुद्दय़ांवर दरवर्षी प्रश्न विचारलेले आहेत.

*     निसर्ग संवर्धनासाठी कार्यरत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांचे कार्य, उद्दिष्टे, स्थापना या मुद्दय़ांचा प्रश्नांमध्ये समावेश आहे.

* Aerial photographs, thematic maps. Satellite imageries, Principle and application of GIS या मुद्दय़ांवर चालू घडामोडी, मूलभूत संकल्पना आणि तांत्रिक आयामांवर प्रश्न विचारलेले आहेत.

वरील विश्लेषणाच्या आधारे पेपर दोनचा अभ्यास कशा प्रकारे करावा याची चर्चा पुढील लेखांमध्ये करण्यात येईल.

गट क मुख्य परीक्षा  चालू घडामोडींची तयारी

mpsc-exam-preparation group c main exam

2357   23-Sep-2019, Mon

गट ‘क’ मध्ये समाविष्ट पदांच्या वेतनश्रेणी, जबाबदाऱ्या व कर्तव्ये वेगळ्या स्वरूपाची आहेत. त्यामुळे मुख्य परीक्षेतील पेपर दोन हा पदनिहाय वेगळ्या अभ्यासक्रमावर आधारित आहे. मात्र यामध्ये चालू घडामोडी व बुद्धिमत्ता चाचणी हे घटक सामायिक आहेत. या दोन घटकांच्या तयारीबाबत चर्चा केल्यावर पदनिहाय स्वतंत्र अभ्यासक्रमाच्या तयारीची चर्चा करण्यात येईल.

मागील वर्षी झालेल्या तिन्ही पदांसाठीच्या पहिल्या पदनिहाय पेपरमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे विश्लेषण केल्यास तयारीबाबत पुढील मुद्दे विचारात घेता येतील.

 • साधारणपणे परीक्षा कालावधीपूर्वीच्या आठ ते दीड महिना अशा कालावधीतील घडामोडींवर आधारित प्रश्न विचारण्यात आलेले आहेत.
 • त्या त्या पदासाठी विहित केलेल्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने चालू घडामोडींवरील प्रश्नांचाही समावेश करण्यात आला आहे.
 • लिपिक टंकलेखक पदासाठी राष्ट्रीय व राज्य स्तरावरील घडामोडींचा अभ्यासक्रमामध्ये उल्लेख असला तरी पेपरमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही घडामोडींवरही प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्यामुळे जागतिक स्तरावरील घडामोडींकडे लक्ष असणे सर्वच पदांच्या पेपरसाठी आवश्यक आहे.
 • महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था तसेच संघटना यांची स्थापना, उद्देश, ठळक काय्रे, ब्रीदवाक्य, भारत या संस्था / संघटनांचा सदस्य केव्हा झाला, भारताची त्यातील भूमिका, संघटनेचा नवीन ठराव किंवा इतर चच्रेतील मुद्दे या आधारावर तयारी करावी.
 • आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचे निर्देशांक या मुद्दय़ावर मागील वर्षी प्रश्नांचा समावेश झालेला नसला तरी तो अपेक्षित यादीमध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे निर्देशांक व त्यातील भारताचे स्थान, निर्देशांक / अहवाल प्रकाशित करणारी संस्था / संघटना, महत्त्वाच्या निर्देशांकांचे निकष, त्यातील भारताचे अद्ययावत व मागील वर्षीचे स्थान हे मुद्दे लक्षात घ्यावेत.
 • भारताचे शेजारी देशांशी असलेले विवाद किंवा नवे संयुक्त प्रकल्प दोन्हीचाही परिपूर्ण आढावा घेणे आवश्यक आहे. यामध्ये संबंधित प्रकल्पाचे भौगोलिक स्थान, संबंधित सीमावर्ती राज्य, प्रकल्पाचा फायदा, असल्यास त्याबाबतचे चच्रेतील मुद्दे यांचा आढावा घ्यावा.
 • संरक्षण घटकामध्ये भारत व इतर देश / देशांचे गट यांचे संयुक्त युद्धाभ्यास यांचे कोष्टक पाठच करावे. दरवर्षी केवळ अभ्यासाचे ठिकाण व कालावधी अद्ययावत करणे इतकाच उजळणीचा भाग मग शिल्लक राहतो. या घटकामध्ये पारंपरिक आणि अद्ययावत असे दोन्ही मुद्दे विचारण्यात येतात. त्यामुळे भारतातील क्षेपणास्त्र, रणगाडे, लढाऊ विमाने, पाणबुडय़ा, युद्धनौका, रडार व इतर यंत्रणा यांचे नाव, प्रकार, वैशिष्टय़, वापर, विकसित करणारी संस्था, असल्यास अद्ययावत चाचणीचे परिणाम या मुद्दय़ांच्या आधारे कोष्टक तयार करून टिप्पणे काढावीत.
 • व्यक्तिविशेष, शासकीय योजना यांबाबत नेमकेपणाने व शक्यतो बहुविधानी प्रश्न विचारण्यात आले आहेत.
 • शासकीय योजनांचे उद्दिष्ट, सुरू झालेले वर्ष, तरतुदी, लाभार्थ्यांचे निकष, अंमलबजावणी यंत्रणा, असल्यास अपवाद, असल्यास कालमर्यादेतील उद्दिष्टे यांची कोष्टकांत मांडणी करून अभ्यास करावा. योजनांच्या मूळ दस्तावेजाचे (शासन निर्णय किंवा राजपत्रातील सूचना) वाचन आणि तरतुदी समजून घेणे आवश्यक आहे. यामध्ये नव्या योजनांवर भर द्यायला हवा. मागील पाच ते सात वर्षांमधील योजनांचा समावेश केल्यास जास्त उपयुक्त ठरेल. पायाभूत सुविधांबाबतचे नवे प्रकल्प बारकाईने माहीत करून घ्यावेत.
 • चर्चेतील व्यक्ती, निधन, नेमणुका, आपापल्या क्षेत्रात वैशिष्टय़पूर्ण कामगिरी करणाऱ्या व्यक्तींबाबत त्यांचे कार्यक्षेत्र, वैशिष्टय़पूर्ण कामगिरी, नियुक्त्या, बढती असल्यास महत्त्वाच्या पदावरील निवड, प्राप्त पुरस्कार यांचा आढावा घ्यायला हवा. त्यांचे कार्य, संस्था, पुस्तके, प्रसिद्ध विधाने यांची जास्तीत जास्त माहिती करून घेणे आवश्यक आहे.
 • राज्यव्यवस्थेशी संबंधित चालू घडामोडींबाबत घटनात्मक तरतुदी, तशी प्रत्यक्ष तरतूद नसल्यास कायदेशीर बाजू समजून घेणे आवश्यक आहे. तसेच याबाबत पूर्वीच्या ठळक घडामोडी माहीत असायला हव्यात.
 • महत्त्वाच्या खेळांचे विश्वचषक, ऑलिम्पिक, आशियाई स्पर्धा, इतर महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, त्यातील विक्रम, भारत / महाराष्ट्र यांची कामगिरी यांचा आढावा घ्यायला हवा.
 • चर्चेतील महत्त्वाची पुस्तके व त्यांचे लेखक, चर्चेतील लेखकांबाबतच्या महत्त्वाच्या बाबी तसेच साहित्य क्षेत्रातील महत्त्वाचे पुरस्कार व विजेते यांची टिप्पणे काढणे आवश्यक आहे.
 • चित्रपट, संगीत, पत्रकारिता, प्रशासन, संशोधन, शैक्षणिक क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त व्यक्ती माहीत असाव्यात. भारतातील व्यक्तींना आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले असल्यास त्यांच्या बाबतची अतिरिक्त माहिती असणे आवश्यक आहे. पद्म पुरस्कारप्राप्त व्यक्ती व त्यांचे कार्यक्षेत्र, शौर्य पुरस्कारप्राप्त व्यक्ती माहीत असाव्यात.
 • महाराष्ट्र शासनाचे विविध पुरस्कार, राज्य स्तरावरील महत्त्वाची संमेलने यांची माहिती असायला हवी.
 • केंद्रीय व राज्याच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या तरतुदी माहीत असायला हव्यात. आर्थिक विकास दर, बँक दर, जीएसटी, आíथक क्षेत्रातील नवे निर्णय, जीडीपी, जीएनपी यांची अद्ययावत माहिती असायला हवी.

वनसेवा मुख्य परीक्षा अर्थशास्त्राची तयारी

MPSC- PSI- SIT - ASO-Mpsc Economy Preparation Mpg 94

9418   16-Aug-2019, Fri

एमपीएससी मंत्र

फारुक नाईकवाडे

वनसेवा मुख्य परीक्षा पेपर दोनमधील सामान्य अध्ययन घटकातील आर्थिक व समाजिक विकास या उपघटकाच्या तयारीबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे. अभ्यासक्रमामध्ये ‘‘आर्थिक व सामाजिक विकास’’ इतकाच उल्लेख असल्याने यातील मुद्दे नेमके कोणते असावेत हे मागील प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणातून लक्षात येते. या घटकामध्ये पुढील मुद्दे समाविष्ट आहेत – सार्वजनिक वित्त व बँकिंग, शासकीय धोरणे व योजना, पंचवार्षकि योजना, लोकसंख्या अभ्यास, रोजगार, दारिद्रय़, शाश्वत विकास, आंतरराष्ट्रीय संस्था व संघटना या उपघटकांची पुढीलप्रमाणे तयारी केल्यास फायदेशीर ठरेल.

मूलभूत संज्ञा व संकल्पना

अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना आणि विविध सिद्धांत समजून घेऊन चालू घडामोडींसह महत्त्वाचे मुद्दे अद्ययावत करावेत.

सार्वजनिक वित्त व बँकिंग

अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या संज्ञा, संकल्पना, महसुली, राजकोषीय, वित्तीय तूट वा आधिक्य, सकल देशांतर्गत / राष्ट्रीय उत्पादन / उत्पन्न, आर्थिक विकासातील महत्त्वाच्या संकल्पना, चलन, बँकिंगमधील महत्त्वाच्या संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे.  यासंदर्भातील महत्त्वाचे कायदे, आर्थिक धोरणे यांचा वेळोवेळी आढावा घेणे तसेच त्यांचे मूल्यमापन उपलब्ध असल्यास ते समजून घेणे आवश्यक आहे.

शासकीय धोरणे आणि योजना तसेच पंचवार्षकि योजना  सार्वजनिक वित्त, कर, परकीय गुंतवणूक, शासकीय उत्पन्न, खर्च यांबाबत संकल्पना आणि अद्ययावत आकडेवारी अशा आयामांनी अभ्यास करायला हवा.

सर्व पंचवार्षकि योजनांचा कालखंड, त्या दरम्यानचे शासन, महत्त्वाच्या राजकीय, आंतरराष्ट्रीय व आर्थिक तसेच इतर उल्लेखनीय घडामोडी, त्यांचे मूल्यमापन, त्यांच्या महत्त्वाच्या तरतुदी, घोषणा / ब्रीदवाक्य, उद्दिष्टे, मूल्यमापन समजून घ्यावे.

निती आयोगाचे अहवाल व त्यातील ठळक शिफारसी महत्त्वाच्या असल्या तरी भारतीय आर्थिक नियोजन ही बाब दूरगामी परिणाम करणारी असल्याने या उपघटकावर प्रश्न विचारले जाणारच हे लक्षात घ्यायला हवे.

 

लोकसंख्या अभ्यास

 • भारताची जणगणना आणि त्याचा इतिहास, लोकसंख्या वाढीचे टप्पे आणि अवस्था समजून घ्यावेत. साक्षरता, बाल लिगगुणोत्तर, लिगगुणोत्तर, नागरी व ग्रामीण लोकसंख्या या मुद्दय़ांच्या आधारे देशाचा जगामधील, महाराष्ट्राचा देशातील व राज्यातील जिल्ह्य़ांचा तुलनात्मक अभ्यास करायला हवा. त्यासाठी पहिले व शेवटचे तीन घटक, महाराष्ट्राच्या मागील/पुढील राज्ये अशी तथ्ये मांडून नोट्स काढाव्यात.
 • स्थलांतर- आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत, राज्यांतर्गत, जिल्ह्य़ा-जिल्ह्य़ात होणारे स्थलांतर, इ. याचे प्रकार, कारणे, परिणाम व उपाय अभ्यासावेत.
 • जन्मदर, मृत्युदर, जननदर, जन्मावेळचे आरोग्यमान यांबाबत ठळक बाबी व आकडेवारीचा आढावा घ्यावा.
 • राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, धोरणाची उद्दिष्टे, दीर्घकालीन आणि अल्पकालीन ध्येय. राष्ट्रीय लोकसंख्या आयोग – रचना, उद्दिष्टे, कार्यपद्धती हे घटक वस्तुनिष्ठ तयारीमध्ये समाविष्ट करावेत.

 

दारिद्रय़ व रोजगार

 • दारिद्रय़ अभ्यासासाठी नेमलेल्या समित्यांच्या अहवालातील मुख्य शिफारसी माहीत असायला हव्यात.
 • पंचवार्षकि तसेच इतर योजनांत दारिद्रय़ निर्मूलनासाठी तसेच रोजगारनिर्मितीसाठी राबवलेले कार्यक्रम त्याची उद्दिष्टे आणि परिणाम यांचा आढावा घ्यावा.
 • राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्थेची दारिद्रय़विषयक अहवाल व आकडेवारी अद्ययावत करून घ्यावी. तसेच आंतरराष्ट्रीय संस्था/ संघटनेच्या दारिद्रय़ किंवा रोजगारविषयक आकडेवारीबाबत काही चर्चा सुरू असल्यास त्याबाबत माहिती असायला हवी.
 • रोजगारविषयक संकल्पना व ठळक आकडेवारी अद्ययावत करून घ्यावी.

 

आर्थिक आणि सामाजिक विकास

 • आर्थिक विकासामध्ये आर्थिक पाहणी अहवाल, अर्थसंकल्प, विविध आर्थिक निर्देशांक व अहवाल, पायाभूत सुविधा व इतर अर्थविषयक योजना आणि असल्यास नवे कायदे वा तरतुदी यांचा समावेश होतो. या सर्व बाबी चालू घडामोडींचाच एक भाग आहेत.
 • व्यापार सुलभता / दारिद्रय़ / भूक / लि गभाव असमानता / मानव विकास हे जागतिक निर्देशांक व त्यातील भारताची कामगिरी यांचा आढावा घ्यायला हवा. याबाबत विशिष्ट उल्लेखनीय मुद्दे महीत असावेत.
 • पंचवार्षकि योजनांमध्ये आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी आखलेल्या धोरणांचा थोडक्यात आढावा घ्यावा व त्याचे यशापयश लक्षात घ्यावे.
 • आर्थिक व सामाजिक समावेशनामध्ये समाविष्ट होणारे प्रयत्न समजून घ्यावेत. यामध्ये कर्जविषयक, स्वयंरोजगार व कौशल्य विकासासाठीच्या, सामाजिक विमा योजना यांचा समावेश होतो. अशा योजनांमधील तरतुदी, लाभार्थ्यांचे निकष, उद्दिष्टे यांचा अभ्यास आवश्यक आहे.

 

   शाश्वत विकास

 • शाश्वत विकासाची संकल्पना व शाश्वत विकासाचे आधार समजून घेणे आवश्यक आहे.
 • वसुंधरा परिषदा आणि अजेंडा यांचा थोडक्यात आढावा घ्यावा.
 • सहस्रक आणि त्यानंतरची शाश्वत विकास उद्दिष्टे समजून घ्यावीत.
 • शाश्वत विकासासाठी भारताची निर्धारित उद्दिष्टे व त्यातील कामगिरी माहीत असायलाच हवी.
 • हरित आणि नील अर्थव्यवस्थेची संकल्पना व तिच्यासाठीचे प्रयत्न समजून घ्यावेत.
 • वरील सर्व प्रवर्गाच्या विकास व कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना व त्यांतील तरतुदी तसेच याबाबतच्या चालू घडामोडी यांचा बारकाईने अभ्यास आवश्यक आहे.

एमपीएससी मंत्र : महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा राज्यव्यवस्था घटकाची तयारी

MPSC- PSI- SIT - ASO- Maharashtra Forest Service Chief Exam Preparation Mpsc Abn 97

2239   08-Aug-2019, Thu

महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा १५ सप्टेंबर २०१९ रोजी प्रस्तावित आहे. मुख्य परीक्षेच्या तयारीबाबत या लेखापासून चर्चा करण्यात येत आहे. या लेखामध्ये सामान्य क्षमता चाचणीतील राज्यव्यवस्था घटकाची तयारी कशी करावी ते पाहू.

*     राज्यघटना

*     राज्यघटना निर्मितीची प्रक्रिया, घटना समितीची रचना, महाराष्ट्रातील सदस्य, समित्या व त्यांचे सदस्य / अध्यक्ष, समितीच्या बैठका, समितीचे कार्य याचा थोडक्यात आढावा घ्यावा.

*     घटनेची प्रस्तावना, त्यामध्ये समाविष्ट तत्त्वे / विचार आणि प्रस्तावनेचे घटना समजून घेण्यासाठीचे महत्त्व हे मुद्दे व्यवस्थित समजून घ्यावेत. सर्वोच्च न्यायालयाचे घटनेचा अर्थ विशद करणारे महत्त्वाचे निर्णय माहीत असावेत.

*     मूलभूत हक्क व कर्तव्ये याबाबतची सर्व कलमे मुळातून समजून घेऊन त्यामध्ये समाविष्ट अपवादांसहित पाठच करावीत. त्याबाबतच्या चालू घडामोडी व सर्वोच्च न्यायालयाचे अद्ययावत निकाल माहीत असणे आवश्यक आहे. या तरतुदींबाबत झालेल्या घटनादुरुस्त्या व महत्त्वाचे सर्वोच्च न्यायालयाचे निकाल यांचा आढावा घेणे गरजेचे आहे.

*     राज्याच्या धोरणाची सर्व नीतिनिर्देशक तत्त्वे समजून घेणे आवश्यक आहे. याबाबत केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी घेतलेले महत्त्वाचे निर्णय व ठळक कायदे समजून घ्यायचेत. उदा. कामगार कल्याण, शिक्षण, मद्यबंदी, महिला कर्मचाऱ्यांसाठीच्या सवलती इत्यादी.

*     केंद्र व राज्य सरकारे यांच्यामध्ये प्रशासकीय, आर्थिक व कायदेशीर अधिकारांची विभागणी कशा प्रकारे झाली आहे याबाबतची कलमे समजून घ्यावीत व सातव्या परिशिष्टातील विषयांची विभागणी व्यवस्थित समजून घ्यायला हवी. शक्य असेल तर केंद्र, राज्य व समवर्ती सूचीतील विषय पाठच करावेत.

*     घटना दुरुस्तीची प्रक्रिया व्यवस्थित समजून घ्यावी. महत्त्वाच्या व अद्ययावत घटनादुरुस्त्यांची माहिती असायला हवी.

*     घटनात्मक पदे अभ्यासताना संबंधित कलम, काय्रे, अधिकार, नेमणुकीची/ पदावरून काढण्याची पद्धत, सध्या त्या पदावरील व्यक्तीचे नाव हे मुद्दे पाहावेत.

*     केंद्रीय / महाराष्ट्र लोकसेवा आयोग तसेच इतर घटनात्मक आयोग यांबाबतची कलमे, त्यांची रचना, कार्ये, अधिकार, त्यांची वाटचाल, सध्याचे सदस्य व अध्यक्ष हे मुद्दे लक्षात घ्यावेत.

*      राजकीय व्यवस्था व प्रशासन

*     लोकसभा / राज्यसभा / विधानसभा / विधान परिषद यांची रचना, कार्यकाळ, पदाधिकारी, सदस्य संख्या, निवडणूक, लोकप्रतिनिधित्व कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी या बाबी बारकाईने अभ्यासाव्यात.

*     लोकसभा / राज्यसभा / विधानसभा / विधान परिषद यांचे कामकाज, त्यांच्या समित्या, रचना, काय्रे, अधिकार, कायदा निर्मिती प्रक्रिया, अर्थसंकल्पविषयक कामकाज यांच्या बाबत घटनेतील तरतुदी व्यवस्थित समजून घ्याव्यात. त्यासाठी त्यांची कामकाज नियमावली पाहणे आवश्यक आहे.

*     राष्ट्रपती, राज्यपालांचे अधिकार, कार्ये, नेमणूक याबाबतच्या तरतुदी समजून घ्याव्यात. महाराष्ट्राच्या राज्यपालांना असलेले विशेषाधिकार व्यवस्थित माहीत असायला हवेत.

*     केंद्र व राज्य शासनाची निवड, रचना, काय्रे, अधिकार, कार्यपद्धती याबाबतच्या घटनेतील तरतुदी व्यवस्थित समजून घ्याव्यात.

*     राज्य प्रशासनामध्ये मंत्रालयीन कामकाजाची थोडक्यात माहिती करून घ्यावी.

ग्रामीण आणि नागरी स्थानिक शासन

*     ग्रामीण प्रशासनामध्ये जिल्हा ते ग्रामपंचायत उशा उतरंडीचे कोष्टक मांडून त्याचा अभ्यास करता येईल. यामध्ये पुन्हा महसुली व विकासात्मक व पोलीस प्रशासन वेगवेगळे लक्षात घ्यायला हवे. अधिकाऱ्यांची उतरंड व त्यांचे अधिकार, कार्य, नेमणूक, राजीनामा, पदावरून काढून टाकणे या बाबी समजून घ्यायला हव्यात.

*    स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी याच प्रशासनाचा भाग आहेत. त्यांच्या निवडणुकांबाबतच्या तरतुदी, कार्यकाळ, विसर्जति करण्याचे अधिकार, राज्य निवडणूक आयोग, त्याची रचना, काय्रे व अधिकार यांचा बारकाईने आढावा घ्यायला हवा.

*     शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा त्यांचे प्रकार, निवडणूक, रचना, काय्रे, अधिकार इ. बाबी व्यवस्थित समजून घेऊन अभ्यास करावा.

*     ७३ व्या व ७४ व्या घटनादुरुस्त्यांमधील तरतुदी, त्या अन्वये स्थापन केलेल्या समित्या, स्थानिक स्वराज्य संस्थाकडे सोपवलेले विषय हे मुद्दे समजून घ्यावेत.

*     स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अभ्यासासाठी स्थापन केलेल्या समित्या / आयोग इ. चा अभ्यास आवश्यक आहे. या समित्यांकडून करण्यात आलेल्या शिफारशी, त्या अनुषंगाने घेण्यात आलेले निर्णय व त्यांची अंमलबजावणी यांचा नेमका अभ्यास करायला हवा.

एमपीएससी मंत्र : पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा सराव प्रश्न

MPSC- PSI- SIT - ASO-Psi Main Exam Practice Questions Mpsc Abn 97

2371   03-Aug-2019, Sat

पोलीस उप निरीक्षक मुख्य परीक्षा पदनिहाय पेपर ४ ऑगस्ट रोजी होत आहे. या पेपरच्या सरावासाठी अपेक्षित प्रश्न या लेखामध्ये देण्यात येत आहेत.

*      प्रश्न १ – ‘कोणत्याही व्यक्तीस तिने केलेल्या गुन्ह्य़ासाठी त्या वेळी अस्तित्वात नसलेल्या कायद्याच्या तरतुदी अन्वये शिक्षा किंवा दंड करता येणार नाही’ या अर्थाची तरतूद पुढीलपकी कोणत्या कलमान्वये करण्यात आली आहे?

१)   भारतीय राज्यघटनेचे कलम २० व मानवी हक्कांच्या जाहीरनाम्यामधील कलम ११.

२)   भारतीय राज्यघटनेचे कलम २१ व मानवी हक्कांच्या जाहीरनाम्यामधील कलम ०९.

३)   भारतीय राज्यघटनेचे कलम २२ व मानवी हक्कांच्या जाहीरनाम्यामधील कलम १२.

४)   भारतीय राज्यघटनेचे कलम १९ व मानवी हक्कांच्या जाहीरनाम्यामधील कलम १०.

*      प्रश्न २- अनुसूचित जाती व जमाती अत्याचारास प्रतिबंध कायदा, १९८९ च्या कलम ३ अन्वये पुढीलपकी कोणत्या गुन्ह्य़ासाठी सहा महिने ते पाच वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे?

ब.   कोणत्याही लोकसेवकाकडून अनुसूचित जाती / जमातीच्या सदस्याविरुद्ध कायदेशीर शक्तींचा वापर केला जाईल अशा तऱ्हेने खोटी माहिती पुरविणे.

क. अनुसूचित जाती / जमातीच्या सदस्याची जमीन वा जागा अन्यायाने बळकावणे.

पर्यायी उत्तरे

१) अ, ब आणि क

२) अ आणि ब

३) ब आणि क

४) अ आणि क

*      प्रश्न ३ – नागरी हक्क संरक्षण अधिनियम, १९५५ मधील नागरी हक्क या संज्ञेची व्याख्या कोणती आहे?

१)   राज्यघटनेच्या कलम १९ अन्वये भारतातील सर्व नागरिकांना प्राप्त होणारा हक्क.

२)   राज्यघटनेच्या कलम  १७ अन्वये अस्पृश्यता नष्ट केल्यामुळे एखाद्या व्यक्तीला प्राप्त होणारा हक्क.

३)   राज्यघटनेच्या कलम ३२अन्वये मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी एखाद्या व्यक्तीला प्राप्त होणारा हक्क.

४)   मानवी हक्कांच्या जाहीरनाम्यामधील कलम ५ अन्वये क्रूर, अमानवी वागणूक किंवा शिक्षा देण्यापासून एखाद्या व्यक्तीला प्राप्त होणारा हक्क.

*      प्रश्न ४ – भारतीय साक्षी पुरावा अधिनियमातील तरतुदी अन्वये पुढील पकी कोणत्या बाबी दस्तऐवज या व्याख्येमध्ये समाविष्ट होत नाहीत?

अ. एखादा नकाशा वा आराखडा

ब.   मुद्रित शब्द

क. कोणत्याही पदार्थावर व्यक्त केलेला मजकूर

ड.   एखादे विडंबनचित्र

पर्यायी उत्तरे

१) अ, ब आणि क

२) अ, ब आणि ड

३) ब, क आणि ड

४) वरीलपैकी नाही

*      प्रश्न ५ – हुंडा प्रतिबंध अधिनियम, १९६१ मधील तरतुदी अन्वये कोणत्याही न्यायालयास या अधिनियमाखालील अपराधांची दखल कोणत्या प्रकारे घेता येते?

अ. पोलिसी अहवालावरून.

ब.   व्यथित व्यक्तीच्या तक्रारीवरून.

क. हुंडा प्रतिषेधी अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून.

ड.   मान्यताप्राप्त कल्याण संस्थेच्या अहवालावरून.

पर्यायी उत्तरे

१) अ, ब आणि क

२) अ, ब आणि ड

३) ब क आणि ड

४) अ, ब, क आणि ड

*      प्रश्न ६ – महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ अन्वये, पुढीलपकी कोणत्या बाबीचा समावेश फिर्याद या संज्ञेत होत नाही?

अ. पोलीस अहवाल.

ब.   कारवाईच्या अपेक्षेने केलेले तोंडी अभिकथन.

क. ज्ञात किंवा अज्ञात व्यक्तीने अपराध केल्याच्या आशयाचे लेखी अभिकथन.

पर्यायी उत्तरे

१) अ, ब आणि क

२) अ आणि ब

३) ब आणि क

४) अ आणि क

*      प्रश्न ७ – पुढीलपकी कोणत्या पर्यायांमध्ये समाविष्ट व्यक्तींवर भारतीय दंडसंहितेच्या कलम २२३ अन्वये संयुक्तपणे दोषारोपपत्र दाखल करता येते?

अ. एकाच अपराधाबाबत अपराध केल्याचा आरोप असणारी, अपराधास अपप्रेरणा देण्याचा आरोप असणारी व तो अपराध करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असणारी व्यक्ती.

ब.   एकास संव्यवहाराच्या ओघात निरनिराळे अपराध केल्याचा आरोप असणाऱ्या व्यक्ती.

क. एकास संव्यवहाराच्या ओघात तोच अपराध केल्याचा आरोप असणाऱ्या व्यक्ती.

पर्यायी उत्तरे

१) अ, ब आणि क

२) अ आणि ब

३) ब आणि क

४) अ आणि क

उत्तरे

प्र.क्र.१ – योग्य पर्याय क्र.(१)

प्र.क्र.२ – योग्य पर्याय क्र.(३)

प्र.क्र.३ – योग्य पर्याय क्र.(२)

प्र.क्र.४ – योग्य पर्याय क्र.(४)

प्र. क्र.५- योग्य पर्याय क्र.(२)

प्र.क्र.६- योग्य पर्याय क्र.(३)

प्र.क्र.७- योग्य पर्याय क्र.(१)

एमपीएससी मंत्र : राज्य कर निरीक्षक पदनिहाय पेपरची तयारी

current affairs, loksatta editorial-Preparation Of State Tax Inspector Designation Paper Abn 97

1287   02-Aug-2019, Fri

दुय्यम सेवा परीक्षेच्या पदनिहाय पेपरमधील सामायिक अभ्यासक्रमाच्या तयारीबाबत मागील काही लेखांमध्ये चर्चा करण्यात आली. या लेखामध्ये राज्य कर निरीक्षक पदाच्या पदनिहाय अभ्यासक्रमाच्या तयारीबाबत चर्चा करू.

*       नियोजन

*    प्रक्रिया, प्रकार, भारताच्या पहिल्या ते दहाव्या पंचवार्षकि योजनेचा अभ्यास करताना योजनांची उद्दिष्टे, ध्येयवाक्ये, प्रतिमाने, सुरू झालेल्या विकास व कल्याणकारी योजना, राजकीय आयाम, कालावधी, ठळक निर्णय, मूल्यांकन यांचा आढावा घ्यायला हवा. निती आयोगाची रचना, काय्रे, प्रस्तावित योजना / उद्दिष्टे यांचा आढावा घ्यायला हवा.

*    सामाजिक व आर्थिक विकासाचे निर्देशांक म्हणजेच रोजगार, दारिद्रय़, भूक, मानवी विकास, व्यवसाय सुलभता याबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारताचे स्थान व राष्ट्रीय स्तरावरील महाराष्ट्राचे स्थान माहीत करून घ्यावे.

*    राज्य आणि स्थानिक पातळीवरील नियोजन, विकेंद्रीकरण यांचा अभ्यास करताना ७३ वी व ७४ व्या घटनादुरुस्तीने स्थानिक स्वराज्य संस्थांना सोपविलेले अधिकार माहीत करून घ्यावेत.

*    भारतीय अर्थव्यवस्था, क्षेत्रीय विकासाचा कल व सेवा क्षेत्राची रूपरेखा यांचा अभ्यास करताना अर्थव्यवस्था विषयाच्या मूलभूत संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे. त्या आधारे या उपघटकाची तयारी करता येईल.

*    भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने, गरिबी, बेरोजगारी आणि प्रादेशिक असमतोल यांचा अभ्यास करताना आर्थिक व राजकीय अशा दोन्ही आयामांचा विचार करायला हवा. म्हणजेच याबाबतची आर्थिक पार्श्वभूमी आणि याबाबतचे शासकीय पातळीवरील प्रयत्न यांचा अभ्यास करायला हवा.

*       शहरी व ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास

*   ऊर्जा, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, गृह, परिवहन (रस्ते, बंदर इत्यादी), दळणवळण (पोस्ट, तार व दूरसंचार), रेडिओ, टीव्ही, इंटरनेट या पायाभूत सुविधांचे आर्थिक विकास आणि सामाजिक अभिसरण यातील योगदान आणि भारतातील त्यांच्या विकास व विस्ताराचे टप्पे व त्यासाठीचे प्रयत्न यांचा आढावा घेणे आवश्यक आहे. याबाबत ग्रामीण व शहरी भागातील परिवहन व गृह या विषयीचे प्रश्न व त्यावरील केंद्र व राज्य सरकारचे कार्यक्रम व उपक्रमशीलता यांवर विशेष भर द्यायला हवा.

*    तसेच भारतातील इन्फ्रास्ट्रक्चर सुविधांमधील प्रादेशिक असमतोल, गुंतवणूक, दर्जा व इतर समस्यांचा बारकाईने अभ्यास करावा. इन्फ्रास्ट्रक्चर विकासाचे पर्याय म्हणून खासगी व सार्वजनिक क्षेत्रातील भागीदारी, एफ.डी.आय., खासगीकरण या धोरणांमागची भूमिका व त्यातील तरतुदी समजून घ्याव्यात.

*    राज्य व केंद्र सरकारची वेगवेगळ्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठीची धोरणे समजून घ्यावीत तसेच याबाबत चालू घडामोडी माहीत असायला हव्यात.

*       आर्थिक सुधारणा व कायदे

*    पार्श्वभूमी, उदारीकरण, खासगीकरण, जागतिकीकरण संकल्पना व त्याचा अर्थ आणि व्याप्ती, मर्यादा यांचा संकल्पनात्मक आणि विश्लेषणात्मक अभ्यास आवश्यक आहे.

*    केंद्र व राज्य स्तरावरील आर्थिक सुधारणांचे टप्पे व त्यांचे परिणाम यांचा आढावा घ्यायला हवा.

*   WTO तरतुदी आणि सुधारणा आणि त्याचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील अपेक्षित परिणाम, प्रश्न व समस्या आणि त्याबाबतच्या चालू घडामोडी समजून घेणे आवश्यक आहे.

*    GST,  विक्रीकर, VAT, WTO इत्यादीशी संबंधित कायदे व नियम मुळातून वाचणे जास्त व्यवहार्य आहे. यातील ठळक तरतुदी माहीत असायलाच हव्यात.

*       आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ

*    जागतिकीकरणाच्या युगातील सूत्र व काल, वाढ, रचना या संकल्पना व्यवस्थित समजून घ्याव्यात. भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराची दिशा, निर्यातीतील वाढ या बाबींची आकडेवारी आर्थिक पाहणी अहवालातून अद्ययावत करून घ्यावी.

*    भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापाराचे धोरण, हळड आणि आंतरराष्ट्रीय व्यापार विदेशी भांडवलाचा अंत:प्रवाह, रचना व वाढ यातील महत्त्वाचे टप्पे समजून घ्यावेत. तसेच चालू घडामोडी माहीत करून घ्याव्यात.

*    प्रत्यक्ष परकीय गुंतवणूक (FDI) व्यापार त्याबाबतचे शासकीय धोरण समजून घ्यावे. बहुराष्ट्रीय भांडवल पुरविणाऱ्या संस्था, कटा जागतिक बँक, कऊअ इंटरनॅशनल क्रेडिट रेटिंग या संस्थांचे कार्य, महत्त्वाचे नियम / ठराव, सदस्य, यातील भारताची भूमिका / योगदान समजून घ्यावे.

*      सार्वजनिक वित्त व्यवस्था

*    कर आणि करेतर महसुलाचे स्रोत,केंद्र व राज्य सार्वजनिक खर्च या संकल्पना समजणे आवश्यक आहे.

*    केंद्र व राज्यातील सार्वजनिक ऋण, सार्वजनिक खर्चवाढ यांची कारणे समजून घ्यावीत. सार्वजनिक खर्च सुधारणा कामावर आधारित अर्थसंकल्प, शून्याधारीत अर्थसंकल्प, वित्तीय उत्तरदायित्व आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन कायद्यातील तरतुदी माहीत असायला हव्यात.

*    भारतातील केंद्र व राज्य पातळीवरील करसुधारणांचा आढावा महत्त्वाचे टप्पे, त्यांची पार्श्वभूमी, कारणे, स्वरूप, परिणाम, यशापयश या मुद्दय़ांच्या आधारे घ्यावा.

*    सार्वजनिक ऋणवाढ, रचना आणि भार, राज्याची कर्जबाजारीपणाची केंद्राला समस्या या बाबी विश्लेषणात्मक प्रश्नांसाठी तयार कराव्या. त्यासाठी संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे.

*    राजकोषीय तूट, संकल्पना, तुटीचे नियंत्रण या संकल्पना समजून घ्याव्यात. तूट नियंत्रणासाठीचे केंद्र, राज्य व रिझव्‍‌र्ह बँकेचे उपक्रम, केंद्र व राज्यस्तरावरील राजकोषीय सुधारणा यांचा आढावा घ्यायला हवा.

एमपीएससी मंत्र : दुय्यम सेवा पदनिहाय पेपर राज्यव्यवस्था घटक

MPSC- PSI- SIT - ASO-Secondary Service Designation Paper State Governance Components Abn 97

11582   26-Jul-2019, Fri

दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षेच्या पदनिहाय स्वतंत्र पेपरमध्ये जवळपास ३०% अभ्यासक्रम हा सामायिक आहे. या सामायिक घटकांची तयारी एकत्रितपणे केल्यास स्वतंत्र अभ्यासक्रमांसाठी जास्त वेळ उपलब्ध होतो. तिन्ही पेपरमध्ये राज्यव्यवस्था घटक हा सामायिक असला तरी त्यातील काही भाग तिन्ही पदांसाठी आहे तर काही भाग केवळ सहायक कक्ष अधिकारी व विक्रीकर निरीक्षक या पदांसाठी आहे.

आयोगाने तिन्ही पदांसाठी पेपर दोनमध्ये विहित केलेला राज्यव्यवस्था घटकाचा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहे :

भारतीय राज्यघटना

(तिन्ही पदांसाठी)

घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्त्वे, घटनेची महत्त्वाची कलमे / ठळक वैशिष्टय़े, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे – शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका.

(केवळ सहायक कक्ष अधिकारी व विक्रीकर निरीक्षक पदांसाठी)

राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाची भूमिका, अधिकार व कार्य, राज्य विधि मंडळ – विधानसभा, विधान परिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व भूमिका, विधी समित्या.

या घटकाची तयारी पुढीलप्रमाणे करता येईल.

*     भारताची राज्यघटना

*     घटना कशी तयार झाली याबाबत तयारी करताना घटना समितीची रचना, महाराष्ट्रातील सदस्य, समित्या व त्यांचे सदस्य / अध्यक्ष, समितीच्या बठका व त्यातील प्रसिद्ध चर्चा, समितीचे कार्य याबाबत अभ्यास करणे आवश्यक आहे.

*     तसेच भारतासाठी वेळोवेळी झालेली घटनेची मागणी, राज्यघटनेतील संभाव्य तत्त्वे व त्यामागील भूमिका या बाबी समजून घेणे आवश्यक आहे.

*     घटनेची प्रस्तावना, त्यामागील वेगवेगळ्या नेत्यांच्या भूमिका व प्रतिक्रिया, त्यामध्ये समाविष्ट तत्त्वे / विचार आणि प्रस्तावनेचे घटना समजून घेण्यासाठीचे महत्त्व हे मुद्देही व्यवस्थित समजून घ्यावेत.

2     मूलभूत हक्क व कर्तव्ये याबाबतची सर्व कलमे मुळातून समजून घेऊन त्यामध्ये समाविष्ट अपवादांसहित पाठच करायला हवीत. त्याबाबतच्या चालू घडामोडी व सर्वोच्च न्यायालयाचे अद्ययावत निकाल माहीत असणे आवश्यक आहे. या तरतुदींबाबत झालेल्या घटनादुरुस्त्या व महत्त्वाचे सर्वोच्च न्यायालयाचे निकाल यांचा आढावा घेणे गरजेचे आहे.

*     राज्याच्या धोरणाची सर्व नीतिनिर्देशक तत्त्वे समजून घेणे आवश्यकच आहे. मात्र शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका या मुद्दय़ांचा अभ्यासक्रमामध्ये विशेष उल्लेख केलेला असल्याने त्याबाबतची कलमे, तरतुदी व त्यानुसार केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी घेतलेले महत्त्वाचे निर्णय व केलेले कायदे समजून घ्यावेत. उदा. शिक्षण हक्क कायदा, न्यायपालिकांमधील नेमणुकांची कोलेजियम पद्धत व त्याबाबत शासन व न्यायपालिकेमधील संघर्ष इ.

*     राज्यघटनेतील महत्त्वाची कलमे ही केंद्र व राज्य संबंध व घटनादुरुस्ती तसेच घटनात्मक पदे यांपुरती मर्यादित ठेवता येतील. मात्र चालू घडामोडींच्या अनुषंगाने त्या त्या कलमांचा महत्त्वाच्या कलमांमध्ये समावेश करणे आवश्यक आहे.

*     केंद्र व राज्य सरकारे यांच्यामध्ये प्रशासकीय, आíथक व कायदेशीर अधिकारांची विभागणी कशा प्रकारे झाली आहे; याबाबतची कलमे समजून घ्यावीत व सातव्या परिशिष्टातील विषयांची विभागणी व्यवस्थित समजून घ्यायला हवी. शक्य असेल तर केंद्र, राज्य व समवर्ती सूचीतील विषय पाठच करावेत.

*     राज्य शासन

हा भाग पोलीस उपनिरीक्षक पदासाठीच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट नाही. फक्त सहायक कक्ष अधिकारी आणि विक्रीकर निरीक्षक या पदांसाठीच्या अभ्यासक्रमामध्ये आहे.

*     विधानसभा व विधान परिषदेच्या सदस्यांच्या निवडणुका, राज्यपाल व मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाची नेमणूक, कार्यकाळ, पदावरून हटविणे, राजीनामा, हक्क, कर्तव्ये या सर्व मुद्दय़ांशी संबंधित राज्यघटनेतील तरतुदी बारकाईने अभ्यासणे आवश्यक आहे. विधानमंडळातील विधि समित्यांचा अभ्यास त्यांची रचना, काय्रे व अधिकार या मुद्दय़ांच्या आधारे करावा.

*     विधानसभा आणि विधान परिषद यांच्या कामकाजाची माहिती असायला हवी. कायदा निर्मिती प्रक्रिया तसेच विविध प्रश्न / ठराव इत्यादी कामकाजाचे महत्त्वाचे नियम माहीत असायला हवेत.

दुय्यम सेवा मुख्य परीक्षेच्या पदनिहाय पेपरमधील सामायिक अभ्यासक्रमाच्या तयारीबाबत आतापर्यंत चर्चा करण्यात आली. पुढील लेखापासून प्रत्येक पदासाठी स्वतंत्र विहित केलेल्या अभ्यासक्रमाची तयारी कशा प्रकारे करावी, याबाबत चर्चा करण्यात येईल.

एमपीएससी मंत्र : दुय्यम सेवा पदनिहाय पेपर (भूगोलाची तयारी)

MPSC- PSI- SIT - ASO-Mpsc Exam 2019 Mpsc Exam Tips Mpsc Exam Guidance Zws 70

3276   25-Jul-2019, Thu

दुय्यम सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेच्या पदनिहाय स्वतंत्र पेपरमध्ये जवळपास ३० टक्के अभ्यासक्रम हा सामायिक आहे. या सामायिक घटकांची तयारी एकत्रितपणे केल्यास स्वतंत्र अभ्यासक्रमांसाठी जास्त वेळ उपलब्ध होतो. या लेखामध्ये सामायिक अभ्यासक्रमाच्या भूगोल घटकाच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येत आहे.

तिन्ही पदांसाठी पेपर दोनमध्ये विहित केलेला भूगोल घटकाचा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहे.

महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासक्रम –

महाराष्ट्राचा रचनात्मक भूगोल, मुख्य रचनात्मक  विभाग, हवामान, पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत, व डोंगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती – वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल – लोकसंख्या, लोकसंख्येचे स्थलांतर, त्याचे स्रोत आणि स्थलांतरित ठिकाणांवरील परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्टय़ा व त्यांचे पुनर्वसन.

या घटकाची तयारी पुढीलप्रमाणे करता येईल –

*  महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल (रचनात्मक)

*   यामध्ये महाराष्ट्राच्या मुख्य हवामान विभागांचा नकाशाच्या आधारे अभ्यास करणे अवश्यक आहे. प्रत्येक विभागाची भौगोलिक वैशिष्टय़े, हवामानाचे वैशिष्टय़पूर्ण घटक, त्यामुळे होणारी मृदा, पिके, इतर आर्थिक उत्पादनांमध्ये या वैशिष्टय़ांचे योगदान या बाबी समजून घ्याव्यात. महाराष्ट्राचे हवामान विभाग हे दक्षिणोत्तर पसरले आहेत. त्यांचा पश्चिम ते पूर्व अशा क्रमाने अभ्यास केल्यास मान्सून, पर्जन्याचे वितरण, तापमानातील फरक यांचा तुलनात्मक अभ्यासही शक्य होईल.

*   राज्यातील नद्यांचा अभ्यास हा नदी खोऱ्यांचा / प्रणालींचा घटक म्हणून करणे आवश्यक आहे. पर्वतप्रणालीचा नकाशावरील अभ्यास करतानाच त्यांचे आर्थिक महत्त्व, पर्जन्यनिर्मिती व हवामान इत्यादीमधील महत्त्व या बाबींचाही अभ्यास आवश्यक आहे. या प्रणालीची उत्तर ते दक्षिण क्रमाने सलगता समजून घ्यायला हवी. उदा. महाराष्ट्रात उत्तर ते दक्षिण पुढील क्रमाने प्रणाली आढळतात. सातपुडा पर्वत तापी पूर्णा खोरे – सातमाळा अजिंठा डोंगररांगा – गोदावरी खोरे – हरिशचंद्र बालाघाट डोंगर – भीमा नदी खोरे – शंभू महादेव डोंगर – कृष्णा खोरे.

*  नैसर्गिक संपत्ती

*   महाराष्ट्रातील महत्त्वाची वने, अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने, जैवविविधता क्षेत्रे यांचा भौगोलिक व पर्यावरणीय वैशिष्टय़े व महत्त्व या दृष्टीने अभ्यास करावा. वनांचे आर्थिक महत्त्व समजून घ्यावे.

*   महाराष्ट्रातील खनिजांचे उत्पादन होणारी क्षेत्रे, त्यांची भूशास्त्रीय रचना, उत्पादनाचे प्रमाण व गुणवत्ता, खाणींचे प्रकार या बाबी समजून घ्याव्यात.

*   भारतातील व महाराष्ट्रातील खडकांचे प्रकार पुढील मुद्दय़ांच्या अनुषंगाने अभ्यासावेत. खडकांचा प्रकार, निर्मिती, कोठे आढळतो, भौगोलिक व वैज्ञानिक वैशिष्टय़े, रचना, आर्थिक महत्त्व.

*  राजकीय

*   प्रशासकीय विभागातील जिल्हे, त्यांची मुख्यालये व त्यांची वैशिष्टय़े, जिल्ह्य़ांची कालानुक्रमे निर्मिती, महत्त्वाची शहरे, आर्थिक व पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाची ठिकाणे याविषयी कोष्टक मांडणी करून टिपणे काढावीत.

*   राज्यातील जिह्यांच्या सीमा, इतर राज्यांच्या सीमेवरील जिल्हे, जिह्यांच्या सीमा म्हणून उपयुक्त ठरणारी नदी / डोंगर / नैसर्गिक भूरूपे या बाबी अभ्यासक्रमामध्ये वेगळ्याने नमूद केलेल्या नसल्या तरी त्यांचा अभ्यास आवश्यक आहे. त्यामुळे राज्याचा राजकीय नकाशाही व्यवस्थित अभ्यासणे आवश्यक आहे.

*  लोकसंख्यात्मक भूगोल

* भारताच्या व राज्याच्या लोकसंख्येचा साक्षरता, नागरीकरण, लिंग गुणोत्तर, रोजगार, लोकसंख्येची घनता या मुद्दय़ांच्या आधारे आढावा घ्यावा. जन्मदर, मृत्युदर, बाल लिंग गुणोत्तर, माता मृत्युदर, अर्भक मृत्युदर, बाल मृत्युदर यांची माहिती असायला हवी.

* वसाहतींचे प्रकार, आकार, स्वरूप, ठिकाण व आर्थिक महत्त्व पाहायला हवेत. राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी कोणत्या प्रकारची वसाहत आहे हे समजून घेता आले तर उत्तम. पण माहिती नसल्यास वसाहतींचे प्रकार नीट अभ्यासले असतील तर एखाद्या प्रसिद्ध ठिकाणी कोणत्या प्रकारे वसाहत विकसित झालेली असू शकेल याचा अंदाज नक्की बांधता येऊ शकतो. असा अंदाज बांधण्याचा सराव तयारीच्या वेळी केल्यास एकूणच या घटकाची तयारी चांगली होईल.

* स्थलांतराची कारणे, स्वरूप, समस्या, परिणाम व उपाय, इ. दृष्टींनी अभ्यास आवश्यक आहे. या बाबतीत ‘आकडेवारी’ हा मुद्दा महत्त्वाचा आहे. विशेषत: महाराष्ट्राच्या संदर्भातील स्थलांतराची आकडेवारी (म्हणजे टक्केवारी) आर्थिक पाहणी अहवालामधून अद्ययावत करून घ्यायला हवी.

* झोपडपट्टीची व्याख्या, तेथील परिस्थिती, त्यांच्या निर्मितीची कारणे यांचा आढावा घ्यायला हवा. झोपडपट्टी पुनर्वसन कायद्यातील ठळक बाबी माहिती असाव्यात. तसेच त्या दृष्टीने अद्ययावत चालू घडामोडीही माहिती असायला हव्यात.

चालू घडामोडींमध्ये खाणी, धरणे, महत्त्वाचे प्रकल्प यांबाबत नवे निर्णय, त्यांबाबत पर्यावरणीय मुद्दे, लोकांचा विरोध / स्वीकार ही तथ्यात्मक माहिती करून घ्यावी. तसेच राज्यातील नैसर्गिक तसेच इतर गंभीर आपत्तींची अद्ययावत माहिती असायला हवी.


Top

Whoops, looks like something went wrong.