GS पेपर ४ अर्थव्यवस्था 

MPSC ECONOMICS PAPER 4

2303   13-May-2017, Sat

अभ्यासाचा दृष्टीने पेपर ४ ची अर्थव्यवस्था पारंपरिक, गतिमान अर्थव्यवस्था, कृषी आणि विज्ञान व तंत्रज्ञान अशा चार भागांत विभागणी करता येईल. अर्थव्यवस्था हा विषय बहुतांश विद्यार्थ्यांना मोठमोठे आकडे व तांत्रिक संज्ञांचा वापर यामुळे अवघड वाटतो.

या विषयाबाबतचे समज, न्यूनगंड दूर करून आत्मविश्वासपूर्ण तयारीकरण्यासाठी अभ्यासाची नेमकी पद्धत पाहू या.

अर्थव्यवस्था हा विषय फक्त आकडेवारीपुरताच मर्यादित नाही हे सर्वप्रथम लक्षात घ्यायला हवे. या विषयाचा मूळ अभ्यास पक्का असणे आवश्यक आहे. अर्थव्यवस्थेच्या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. या विषयाच्या संकल्पना फक्त व्याख्या पाठ करून, समजून घेता येत नाहीत. त्यामुळे सक्षम गाइडकडून त्या व्यवस्थित समजून घ्याव्यात किंवा ज्या पुस्तकातून तुम्हाला योग्य पद्धतीने आणि आत्मविश्वासाने हा विषय समजेल तेच पुस्तक वापरावे.

एमपीएससीने अभ्यासक्रमात नमूद केलेल्या क्रमानेच या विषयाच्या घटकांचा अभ्यास केल्यास तो परिणामकारक ठरेल. म्हणजे आधी अर्थव्यवस्था (economy) समजून घेणे. त्यानंतर योजनांचा (planning) अभ्यास करणे व मग विकासाचे अर्थशास्त्र (economics of development) अभ्यासणे असा क्रम ठेवावा.

सर्वप्रथम (economy) अर्थव्यवस्था विषयाच्या संकल्पना व संज्ञा व्यवस्थित समजून घेणे आवश्यक आहे. या विषयाच्या संकल्पना परस्परांशी घनिष्ठपणे संबंधित असतात. त्यामुळे तुलनात्मक (comparative) अभ्यासाने हा विषय सोपा होऊ शकतो. मूलभूत संकल्पना आणि व्याख्या समजणे या विषयाच्या तयारीसाठीची अट आहे. या तयारीसाठी ठउएफळ ची  १०वी १२वीची अर्थव्यवस्थेची पाठयपुस्तके अभ्यासणे आवश्यक आहे.

*  दारिद्रय़, बेरोजगारी, पायाभूत सुविधा या संकल्पना समजून घेतानाच त्यांच्या बाबतीत भारतासमोरच्या समस्यांचे स्वरूप, कारणे, परिणाम आणि संभाव्य उपाय यांचा table format मध्ये परिपूर्ण अभ्यास करणे आवश्यक आहे.

* पंचवार्षकि योजना (Planning) हा भारतीय अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा पलू आहे. भारतीय अर्थव्यवस्थेची प्रगती साधण्यासाठी शासनाचे प्रयत्न म्हणून पंचवार्षकि योजनांकडे पाहायचे आहे. या योजनांच्या अभ्यासासाठी पुढील मुद्दे लक्षात घ्यायचे आहेत.

* योजनेचा कालावधी, योजनेची घोषित ध्येये, हेतू व त्याबाबतची पाश्र्वभूमी, योजनेचे प्रतिमान, असल्यास घोषणा, योजनेतील सामाजिक पलू, सुरू करण्यात आलेले उपक्रम, कार्यक्रम, योजना, योजनाकाळात घडलेल्या उल्लेखनीय आर्थिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घटना, योजनेचे मूल्यमापन व यश / अपयशाची कारणे, परिणाम, योजनेच्या कालावधीत घोषित करण्यात आलेली आíथक, वैज्ञानिक धोरणे, योजनेमध्ये विविध क्षेत्रांवर करण्यात आलेल्या खर्चाची, उत्पादनांची टक्केवारी पाहावी.

*  भारतातील शहरी व ग्रामीण पायाभूत सुविधांचा विकास, सहकार, उद्योग व कृषीचे अर्थव्यवस्थेतील महत्त्व हे चार घटक पारंपरिक व करंट अशा दोन्ही दृष्टिकोनातून अभ्यासायचे आहेत.

*  उद्योग घटकामध्ये प्रकार, महत्त्व, सध्याचे स्थान, जागतिकीकरणाचा परिणाम इ. मुद्दय़ांचा संकल्पनात्मक अभ्यास महत्त्वाचा आहे. औद्योगिक धोरणे व विविध पंचवार्षकि योजनांमधील उद्योगक्षेत्राची प्रगती बहुपर्यायी प्रश्नांसाठी महत्त्वाची आहे. यामध्ये महाराष्ट्राचा विशेष संदर्भ बारकाईने पाहायला हवा.

*  सहकार क्षेत्राची ब्रिटिशकाळापासूनची प्रगती, महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील सहकारी संस्था, त्या क्षेत्रातील सहकाराची कामगिरी, राज्याचे धोरण व सहकाराची समर्पकता हे मुद्दे संकल्पनात्मक प्रश्नांसाठी महत्त्वाचे आहेत.

*  पायाभूत सुविधांबाबत table format वापरणे श्रेयस्कर ठरेल. या टेबलमध्ये पुढील मुद्दे असावेत.

* सुविधेचे प्रकार

(उदा. ऊर्जेचे प्रकार)

* उपलब्धता (राष्ट्रीय, राज्य)

* विकासातील महत्त्व

* मागणी / गरज / वापर

* समस्यांचे स्वरूप

* कारणे

* उपाय

* शासकीय धोरणे

* शासकीय योजना

शासकीय योजनांचा त्यांचा उद्देश / विषयाप्रमाणे विचार करता येतील.

उदा. रोजगारासाठीच्या योजना एकत्रितपणे अभ्यासल्यास त्यांच्यातील साम्य-फरकाचे मुद्दे लक्षात येतील. यामुळे बहुपर्यायी प्रश्नांची तयारी चांगल्या रीतीने होईल. योजनांसाठी table format मध्ये पुढील मुद्दे पाहायचे आहेत.

सुरू झाल्याचे वर्ष, असल्यास कायद्याचे नाव, कोणत्या पंचवार्षकि योजनेच्या कालावधीत सुरू, ध्येय, हेतू, स्वरूप, खर्चाची विभागणी, अंमलबजावणी करणारी यंत्रणा, असल्यास लाभार्थ्यांचे निकष, कुठल्या योजनेत विलीन झाली असेल तर त्या योजनेचे नाव, मूल्यमापन, राजकीय आयाम (कोणते शासन) याचबरोबर काही मूलभूत गोष्टींबाबत महाराष्ट्राची माहिती / अभ्यास गरजेचा आहे. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची वैशिष्टय़े, पंचवार्षकि योजनांमधील महत्त्वाचे मुद्दे, महाराष्ट्रातील कृषीविषयक बाबी, ग्रामीण, नागरी, पायाभूत सुविधा इ. पारंपरिक बाबीसुद्धा अभ्यासणे आवश्यक आहे.

फारूक नाईकवाडे 


Top

Whoops, looks like something went wrong.