मुख्य परीक्षा : मानवी हक्क

mpsc hrd mains exam

6271   05-Jan-2018, Fri

मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर ३ मधील ‘मानव संसाधन विकास’ घटकाचे विश्लेषण पाहिल्यानंतर आता त्याच पेपरमधील मानवी हक्क या घटकांचे मुख्य परीक्षेतील प्रश्नांच्या स्वरूपाचे विश्लेषण या लेखात आपण पाहूयात.

स्वरूप

राज्यसेवा मुख्य परीक्षाचा अभ्यास बारकाईने करावा हे आपण मागच्या लेखात पाहिले होते. तसे पाहायचे झाले तर मानव संसाधन विकास आणि मानवी हक्क हे दोन्ही घटक एकमेकांशी संबंधित आहेत. दोन्हींमधील उपघटकसुद्धा एकमेकांशी संलग्न आहेत. त्यामुळे मानव संसाधनाचा अभ्यास करताना मानवी हक्क हा विषय कायमच सोबत अभ्यासावा.

पुरेशा अभ्यास साहित्याच्या अभावामुळे अनेक उमेदवार या घटकाकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे अभ्यासक्रमात कोणते घटक आहेत, हे ते अभ्यासत नाहीत. या घटकाचा अभ्यास करताना या विषयाचा अभ्यासक्रम पाठ असणे महत्त्वाचे असते. अभ्यासक्रमातील एकही घटक सुटता कामा नये.

विश्लेषण

मानवी हक्क या विषयावर या वर्षीच्या मुख्य परीक्षेत ७७ प्रश्‍न विचारण्यात आले होते. सर्व प्रश्नांचे स्वरूप पाहता मानवी हक्कांची पूर्तता करण्यासाठी सरकारचे कायदे आणि राज्यघटनेने मानवाला प्रदान केलेल्या विविध अधिकारांवर आणि हक्कांवर प्रश्न विचारण्यात आले होते. प्रश्नांचे स्वरूप कठीण असल्यासारखे जाणवले, कारण प्रश्‍न जरी चालूघडामोडींशी संबंधित असेल तरी त्याची माहिती अभ्यासक्रामाच्या वेगवेगळ्या उपघटकांशी निगडित होती. यामध्ये सर्वांत जास्त प्रश्न (एकूण १७) बाल विकास आणि महिला विकास या घटकांवर विचारले गेले.

आंतरराष्ट्रीय व प्रादेशिक संघटनांवर १५, ग्राहक संरक्षणावर १२, मानवी हक्क प्रतिज्ञापत्रावर १०, आदिवासी विकासावर ६, विकलांग व वयोवृद्ध कल्याणवर १०, मागासवर्गीय घटक चार आणि कामगार कल्याण तीन प्रश्‍न, अशी प्रश्‍नांची सर्वसाधारण विभागणी दिसून आली.

उपघटकांवर भर

अभ्यासक्रमातील उपघटकांवर सखोल प्रश्न विचारण्याकडे नेहमीप्रमाणेच आयोगाचा असलेला कल दिसून येतो. यामध्ये ‘जागतिक मानवी हक्क प्रतिज्ञापत्र’ घटकावर विचारण्यात आलेल्या एकूण १० पैकी भारतातील मानवी हक्क चळवळ, निरक्षरता, आंतराष्ट्रीय मानके, लोकशाही चौकट, मानवी विकास निर्देशांक यांसारख्या उपघटकांवर मुख्य भर असल्याचे दिसते. या प्रकारचा पेपर अभ्यासण्यासाठी इंटरनेटचा वापर महत्त्वाचा ठरेल.

बाल विकास आणि महिला विकास

सर्वांत जास्त म्हणजे १७ प्रश्‍न या घटकावर विचारण्यात आले होते. त्यात कल्याण व सबलीकरण, विविध योजना, आंतराष्ट्रीय संस्था, स्वंयसेवा संघटना यांसारख्या उपघटकांवर मुख्य भर होता. हे घटक अभ्यासण्यासाठी भारत सरकारचे विविध अहवाल आणि इंडिया इयर बूक महत्त्वाचे ठरते.

आंतरराष्ट्रीय संघटना

आंतराष्ट्रीय संघटकांचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत असतानाच मुख्य परीक्षेत या घटकावर १५ प्रश्‍न विचारण्यात आले. यासाठी संयुक्त राष्ट्रासारख्या संस्थांची संकेतस्थळे अभ्यासावीत. तसेच ‘इंडिया इयर बूक’मधून आंतराष्ट्रीय संबंध अभ्यासावेत.

आदिवासी आणि कामगार कल्याण

या दोन्ही घटकांवर मिळून नऊ प्रश्‍न होते. ते आदिवासी आणि कामगार कायदा आणि त्यांचे हक्क या संबंधी होते. याचा अभ्यास करण्यासाठी आदिवासी मंत्रालयाचे संकेतस्थळ उपयोगी पडू शकेल.

विकलांग व वयोवृद्ध कल्याण

सरकारी योजना, कल्याण कार्यक्रम, रोजगार, स्वयंसेवा संघटना, आंतरराष्ट्रीय संस्था या उपघटकासहीत एकूण १० प्रश्‍न विचारण्यात आले होते.

या विषयासाठी संदर्भसाहित्याचा विचार करता मुक्त विद्यापीठाच्या नोट्स, विकीपीडिया, इंडिया इयर बूक, विविध मंत्रालयांची संकेतस्थळे उपयोगी ठरू शकतात.

 

ग्लोबल हंगर इंडेक्स

Global Hunger Index

3665   25-Dec-2017, Mon

‘ग्लोबल हंगर इंडेक्स २०१७’ अनुसार, उपासमारीत भारत १०० व्या स्थानी आहे. बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण अधिक असल्यामुळे मागील वर्षाच्या ९७ व्या स्थानावरून आणखी तीन क्रमांकाने घाली घसरत यावर्षी भारत १०० व्या स्थानी आले आहे.

अहवालामधील ठळक बाबी

 1. ३१.४ सह भारताचे २०१७ सालचे GHI गुण अधिक असून ते ‘गंभीर’ श्रेणीमध्ये गणल्या गेले आहे.
 2. ११९ देशांच्या सर्वेक्षणामध्ये भारत १०० व्या स्थानी असून ते आशियामध्ये केवळ अफगानिस्तान आणि पाकिस्तान यांच्या पुढे आहे. यादीत, आशिया खंडात
  1. चीन (२९),
  2. नेपाल (७२),
  3. म्यानमार (७७),
  4. श्रीलंका (८४) आणि
  5. बांग्लादेश (८८)  
   ही राष्ट्रे भारतापूढे आहेत. तर पाकिस्तान आणि अफगानिस्तान अनुक्रमे १०६ व्या आणि १०७ व्या स्थानी आहे.
 3. तीन वर्षांच्या कालावधीत, भारत २०१४ सालच्या ५५ व्या स्थानावरून ४५ क्रमांकाने खाली आले आहे.
 4. भारतात पाच वर्षाखालील एक पंचमांश बालके त्यांच्या उंचीच्या मानाने खूप कमी वजनाचे आहेत आणि एक तृतीयांश बालकांची उंची वयाच्या मानाने कमी आहे.
 5. वर्ष २०१५-१६ पर्यंत, भारतातील एक पंचमांशहून अधिक (२१%) बालके उंचीच्या तुलनेत कमी वजनाचे आहेत, जे की हे प्रमाण वर्ष २००५-०६ मध्ये २०% हून अधिक होते. या प्रमाणात भारताने गेल्या २५ वर्षांमध्ये कोणतीही सुधारणा दाखवलेली नाही.
 6. तुलनात्मकदृष्टय़ा, भारताने बालकांच्या स्टंटिंग (बालकाला येणारा थकवा) दर घटवण्यामध्ये (सन २००० पासून २९% ने घट) लक्षणीय सुधारणा केली आहे. परंतू असे असूनही, भारतात हा दर ३८.४% इतका अधिक आहेच. 
 7. जागतिक स्तरावर, मध्य आफ्रिकन गणराज्यमध्ये कोणत्याही देशाच्या तुलनेत   सर्वाधिक उपासमार आहे आणि हा निर्देशांकमध्ये ‘अत्यंत चिंताजनक’ श्रेणीत असलेला एकमेव देश आहे.
 8. अहवालात मूल्यमापनासाठी वापरण्यात येणार्‍या ‘बालकाचे कमी वजन’ या घटकाला 'वास्टिंग (बालकाची खुंटलेली वाढ)' आणि ' स्टंटिंग (बालकाला येणारा थकवा)' या घटकांनी बदलले गेले आहे.

 

GHI कश्यासंबंधी आहे ?

 1. जगभरात लोकांना खाण्या-पिण्याच्या वस्तू कश्याप्रकारे आणि किती प्रमाणात उपलब्ध होतात याला प्रदर्शित करण्याचे GHI हे एक माध्यम आहे. देशांकडून प्राप्त होणार्‍या आकड्यांपासून या विश्लेषणात्मक अभ्यासातून उपासमार या समस्येविरुद्ध देशांच्या सरकारचे चाललेले प्रयत्न प्रदर्शित करते.
 2. सन २००६ मध्ये पहिल्यांदा ‘वेल्ट हंगरलाइफ’ नामक जर्मनीच्या स्वयंसेवी संस्थेने ‘ग्लोबल हंगर इंडेक्स’ प्रसिद्ध केला होता, जी इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इंस्टीट्यूट (IFPRI) च्या अहवालाखाली काम करते

महाराष्ट्रातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती

educational-scholarship-for-minority-students-in-maharashtra

2849   02-Sep-2017, Sat

महाराष्ट्र शासनांतर्गत उच्च शिक्षण संचालनालय, पुणे तर्फे राज्यातील मुसलमान, ख्रिस्ती, शीख, बौद्ध, पारसी व जैन या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना २०१७-१८ या शैक्षणिक सत्रासाठी देण्यात येणाऱ्या केंद्र शासन पुरस्कृत मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

योजनेअंतर्गत समाविष्ट विषय

या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत समाविष्ट विषय व अभ्यासक्रमांमध्ये ११वी ते पीएचडी व व्यावसायिक अभ्यासक्रमांशिवाय डीएड, बीएड, एमएड शिवाय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, विविध पदविका अभ्यासक्रम व अकरावी/बारावी स्तरावरील विविध अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

आवश्यक पात्रता अर्जदार खालीलप्रमाणे पात्रताधारक असावेत.

अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. अर्जदार विद्यार्थ्यांने मागील वार्षिक परीक्षेचे किमान ५०% गुण मिळविलेले असावेत. अर्जदारांच्या पालकांचे वार्षिक एकत्रित उत्पन्न २ लाख रुपयांपर्यंत असावे. अर्जदार विद्यार्थी इतर कोणत्याही शिष्यवृत्ती वा पाठय़वृत्ती योजनेचा लाभार्थी नसावा.

शिष्यवृत्तींची संख्या व तपशील

योजनेअंतर्गत उपलब्ध असणाऱ्या नव्या शिष्यवृत्तींची एकूण संख्या ४८,३०२ असून त्यापैकी ३०% शिष्यवृत्ती विद्यार्थिनीसाठी राखीव आहेत.

विशेष सूचना – वरील शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत सध्या लाभार्थी असणाऱ्या पात्रताधारक विद्यार्थ्यांनी निर्धारित कालावधीत नूतनीकरणासाठी अर्ज करणे आवश्यक आहे.

राज्यातील अल्पसंख्याक समाजातील पात्रताधारक विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणानंतरच्या अभ्यासक्रमांसाठी उपलब्ध असणाऱ्या या विशेष शैक्षणिक शिष्यवृत्तींचा फायदा घ्यावा.

अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क

अल्पसंख्याक विद्यार्थी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली महाराष्ट्र शासन- उच्च शिक्षण संचालनालयाची जाहिरात पाहावी, दूरध्वनी क्र. ०२०- २६१२६९३९ वर संपर्क साधावा अथवा संचालनालयाच्या www.scholarships.gov.in किंवा www.dhepune.gov.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.

अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०१७ आहे.

पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियान

pm-safe-maternity-campaign-

1742   02-Sep-2017, Sat

युनिसेफच्या नुसार ५५,००० पेक्षा जास्त गर्भवती महिला प्रसूतीच्यावेळी मृत्यू पावतात. याला वेळोवेळी मेडिकल चिकित्सा करून हे थांबवले जाऊ  शकते. या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे.

उपलब्ध सार्वजनिक आरोग्य सेवा

 • ग्रामीण भागात : प्राथमिक आरोग्य केंद्र, सामुदायिक स्वास्थ्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उप-जिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालये मेडिकल कॉलेज रुग्णालये
 • शहरी भागात : शहरी रुग्णालये, शहरी आरोग्य केंद्र, प्रसूतीगृहे

अभियानाचा उद्देश

 • गर्भवती महिलांसाठी चांगले आरोग्य आणि स्वतंत्र तपासणी प्रदान करणे
 • मातृत्व मृत्यू दर कमी केला जाईल
 • गर्भवती महिलांना त्यांच्या आरोग्याच्या समस्या आणि परिस्थितीबाबत जागरूक करणे
 • मुलांचे निरोगी जीवन आणि सुरक्षित प्रसूतीची खात्री करणे

प्रमुख वैशिष्टय़े

 • ही योजना फक्त गर्भवती महिलांना लागू राहील.
 • प्रत्येक महिन्याच्या ९ तारखेला मोफत आरोग्य तपासणी होईल
 • या योजनेनुसार सर्व प्रकारची वैद्यकीय तपासणी पूर्णपणे मोफत आहे.
 • तपासण्या वैद्यकीय केंद्रे, सरकारी आणि खासगी रुग्णालयात आणि देशातील खासगी दवाखान्यात केल्या जातील
 • महिलांना त्यांच्या आरोग्य समस्यांच्या आधारावर वेगळे चिन्हांकित केले जाईल ज्यामुळे डॉक्टरांना सहजपणे समस्या ओळखू शकतील.
 • भारत सरकारने या योजनेंतर्गत गर्भवती महिलांना सर्व प्रकारचे वैद्यकीय साहाय्य मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे.

योजनेसाठी पात्रता

 • गर्भावस्थाच्या ३ ते ६ महिन्यात महिला या प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाचा लाभ घेण्यास पात्र राहील.

 

नवजात बालकांसाठी मातृदुग्ध पेढी

newborn-baby-mother-milk-bank

2564   02-Sep-2017, Sat

मातेचे दूध न मिळाल्यामुळे जगात १३ लाख ते साडे अठरा लाख बालकांचा मृत्यू होतो. यावर मात करण्यासाठी मातृदुग्ध पेढी ही संकल्पना जगभर राबविली जाते. जगभर ५१७ मातृदुग्ध पेढय़ा कार्यरत आहेत. जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि युनिसेफच्या संयुक्त विधानाप्रमाणे जे बाळ आपल्या मातेचे दूध घेऊ  शकत नाही अशा बाळास आपल्याच मातेचे काढलेले किंवा मातृदुग्ध पेढीतले दूध सर्वात उत्तम आहे.

 • भारतात सध्या १३ मातृदुग्ध पेढय़ा असून त्यापैकी मुंबईत पाच आहेत. त्यामध्ये जे.जे. रुग्णालय, सायन रुग्णालय, राजीव गांधी रुग्णालय, ठाणे, के.ई.एम. रुग्णालय, नायर रुग्णालय यांचा समावेश आहे.
 • इतर मातृदुग्ध पेढय़ा गोवा, बडोदा, सुरत, हैदराबाद, होशगाबाद, उदयपूर व पुणे येथे बै.जी.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून रुग्णालय आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालय अशा दोन मातृदुग्ध पेढय़ा पुण्यात आहेत.
 • ही एक अशी संस्था आहे जिथे दान केलेल्या मातृ दुधाचे संकलन, तपासणी, प्रक्रिया, साठवण वाटप केले जाते. हे दूध अशा बालकांसाठी वापरले जाते ज्यांचे या मातांशी कुठलेही नाते संबंध नसतात.

मातृदुग्ध कोण दान करू  शकतात?

 • दुग्धन आई जिला अतिरिक्त दूध येते व जिला कुठलाही संसर्गजन्य रोग नसावा. (उदा. एचआयव्ही, हिपॅटायटिस बी, सी, सिफीलीस, क्षयरोग).
 • अकाली जन्माला आलेल्या बाळांचे माता, आजारी बाळांच्या माता, अशा माता ज्यांनी हल्लीच आपल्या बाळाला काही कारणास्तव गमावले आहे.

लाभार्थी कोण आहेत

 • अति धोका असलेले नवजात बाळ (मुदतपूर्व जन्म झालेले बाळ, कमी वजन असलेले बाळ) जे बाळ आपल्या आईपासून प्रसूतीनंतर दूर झाले आहे.
 • माता ज्यांचे स्तनाग्र सपाट किंवा अधोमुख आहेत.
 • माता ज्यांनी जुळे, तिळे किंवा चतुष्क बाळांना जन्म दिले असेल.
 • दुग्धन नसलेली माता जिने नवजात बाळाला दत्तक घेतले असेल.

मानव संसाधन विकास समर्पक योजना – भाग ३

human-resource-development-plans in mumbai

4033   02-Sep-2017, Sat

२०१६-१७ या शैक्षणिक वर्षांपासून या योजना सुरू झाल्या आहेत

शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठीही काही योजना आहेत. उच्च शिक्षणासाठी भोजन, निवास व शैक्षणिक साहित्यासाठी थेट रक्कम वितरित करण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयम योजना व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अशा दोन योजना राज्य शासनाने सुरू केल्या आहेत. सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षांपासून या योजना सुरू झाल्या आहेत. त्यांची परीक्षेपयोगी माहिती देत आहे. या दोन्ही योजनांच्या लाभाचे स्वरूप एकसारखेच आहे.

ते पुढीलप्रमाणे:

लाभाचे स्वरूप –

वरील रकमेव्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष रु. ५०००/- व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी रु. २०००/- इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरूपात देण्यात येईल.

दोन्ही योजनांच्या लाभार्थ्यांचे मूलभूत निकषही एकसारखेच आहेत.

मुलभूत पात्रता

१.     विद्यार्थ्यांने अर्जासोबत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.

२.     विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न रु. २.५० लाखांपेक्षा जास्त नसावे.

३.     विद्यार्थ्यांने आपल्या राष्ट्रीयकृत बँकेतील खात्याशी स्वत:चा आधार क्रमांक संलग्न करणे बंधनकारक आहे.

४.     विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या ठिकाणी आहे अशा शहरातील सदर विद्यार्थ्यांचे पालक रहिवाशी नसावेत.

५.     सदर योजनेचा लाभ मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांने संबंधित शहरामध्ये राहणे आवश्यक राहील.

याव्यतिरिक्त या योजनांमध्ये वेगळ्या असलेल्या तरतुदी पुढीलप्रमाणे

पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयम योजना

१. प्रवर्ग – अनुसूचित जमाती

२. शासनाचा विभाग – आदिवासी विकास विभाग

३. योजनेचे स्वरूप – १२ वीनंतरच्या उच्चशिक्षणाकरिता

४. लाभाचे निकष –

शैक्षणिक निकष

१. विद्यार्थी १२ वीनंतरचे उच्च शिक्षण घेत असावा.

२. केंद्र शासनाच्या पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी निश्चित करण्यात आलेल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सदर योजनेंतर्गत लाभ देण्यात येईल. तथापि, दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ मिळणार नाही.

३. विद्यार्थ्यांची संस्थेमधील / महाविद्यालयातील उपस्थिती ८०टक्क्यांपेक्षा अधिक असणे आवश्यक आहे.

इतर निकष

१. एका विद्यार्थ्यांस जास्तीत जास्त ७ वष्रे सदर योजनेचा लाभ घेता येईल.

२. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे कमाल वय २८ वर्षांपेक्षा अधिक नसावे.

३. विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करत नसावा.

४. आदिम जमातीच्या व अनुसूचित जमातीच्या अपंग विद्यार्थ्यांना सदर योजनेचा लाभ प्राधान्याने देय राहील

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना

१. प्रवर्ग अनुसूचित जाती व नवबौद्ध

२. शासनाचा विभाग – सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग

३. योजनेचे स्वरूप  १० वीनंतरचे अभ्यासक्रम तसेच १२ वीनंतरचे व्यावसायिक किंवा बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी.

४. लाभाचे निकष –

१. ११ वीमध्ये प्रवेशासाठी १० वीमध्ये ६०% गुण तर पदवी / पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी १२ वीमध्ये ६०% गुण आवश्यक.

२. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ३% आरक्षण व गुणांची अट ५०%

३. विद्यार्थ्यांची संस्थेमधील / महाविद्यालयातील उपस्थिती ७५ टक्केपेक्षा अधिक असणे आवश्यक आहे.

४. दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ मिळणार नाही.

 शिक्षण प्रसारासाठी राज्य मुक्त विद्यालय

mpsc-exam-preparation in mumbai

2946   02-Sep-2017, Sat

मानव संसाधन विकासासाठी शिक्षण ही एक महत्त्वाची पायरी आहे. एमपीएससीच्या प्रश्नांचे विश्लेषण केले असता या घटकाशी संबंधित चालू घडामोडींबाबत विश्लेषणात्मक आणि बहुविध अंगानी प्रश्न विचारण्यात आल्याचे दिसते. त्यामुळे याबाबत नेमका व मुद्देसूद अभ्यास आवश्यक ठरतो. त्या दृष्टीने राज्य मुक्त विद्यालयाबाबत आवश्यक मुद्दे येथे देण्यात येत आहेत.

केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून National Institute for Open Schooling NIOS  ही स्वतंत्र संस्था सन १९८९ मध्ये स्थापन करण्यात आली आहे. ठकडर ची केंद्रे भारत, नेपाळ व मध्यपूर्वेतील देशांमध्ये आहेत. ठकडर च्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये राज्यस्तरावरील मुक्त विद्यालय स्थापन करण्याचा निर्णय जुलै २०१७ मध्ये घेण्यात आला आहे. हे राज्य मुक्त विद्यालय मंडळ राज्यमंडळाचा एक भाग म्हणून स्थापन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय योजनेत प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा यांचा समावेश असेल. शासनाच्या शिक्षण व रोजगाराच्या उपलब्ध असणाऱ्या संधीसाठीही या परीक्षांनी पात्रता मिळेल.

 मुक्त विद्यालयाची उद्दिष्टय़े :

* औपचारिक शिक्षणाला पूरक आणि समांतर अशी शिक्षण पद्धती सुरू करणे.

 शालेय शिक्षणातील गळती आणि अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण कमी करणे.

* शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या प्रौढ व्यक्ती, गृहिणी, कामगार या सर्वाना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे.

* जीवनाला उपयुक्त असे व्यवसायाभिमुख शिक्षण उपलब्ध करून देणे.

*  सुशिक्षित आणि जागरूक नागरिक बनविणे.

* स्थानिक स्तरावर शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे.

* दिव्यांग विद्यार्थ्यांना उपयुक्त अशी शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे.

 मुक्त विद्यालयासाठी प्रवेश पात्रता/ विषय योजना-

अ)प्राथमिक स्तर – इयत्ता पाचवी.

उमेदवाराचे वय १० वर्षे पूर्ण असावे.

प्रथम, द्वितीय व तृतीय भाषा, परिसर अभ्यास, गणित हे पाच विषय.

ब) उच्च प्राथमिक स्तर – इयत्ता आठवी

१)उमेदवाराचे वय १३ वर्षे पूर्ण असावे.

२)दोन भाषा विषय आणि सामाजिक शास्त्र, विज्ञान, गणित, National Skill Qualification Framework (NSQF) व्यवसाय / कौशल्य विकास विषय यातील ३ असे ५ विषय.

३)दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष विषयांची तरतूद.

क) माध्यमिक स्तर – इयत्ता दहावी

१) नोंदणी करताना उमेदवाराचे वय १५ वर्षे पूर्ण असावे.

२) उमेदवार किमान पाचवी उत्तीर्ण व किमान दोन वर्षे महाराष्ट्राचा रहिवासी असावा.

३) दोन अनिवार्य भाषा विषय, शालेय वैकल्पिक विषय तसेच पूर्व व्यावसायिक विषय यांपकी ३ असे एकूण ५ विषय.

ड) उच्च माध्यमिक स्तर – बारावी

१) उमेदवारांचे वय १७ वर्षे पूर्ण असावे.

२) उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त परीक्षा मंडळाची इ. १०वी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा.

३) उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाव्यतिरिक्त अन्य परीक्षा मंडळाची इ. १० वी उत्तीर्ण असल्यास किमान दोन वर्षे महाराष्ट्राचा रहिवासी असावा.

४) दोन अनिवार्य भाषा विषय आणि कला/वाणिज्य/विज्ञान शाखेपकी कोणत्याही एका शाखेचे कोणतेही ३ विषय असे ५ विषय.

इतर महत्त्वाच्या तरतुदी

* योजनेमध्ये नोंदणीसाठी कमाल वयाची अट नाही.

* महाराष्ट्र राज्य मुक्तशाळेचे माध्यम मराठी, िहदी, इंग्रजी व उर्दू राहील.

* सर्व स्तरावरील सर्व विषय १०० गुणांसाठी असतील व यामध्ये लेखी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन या दोन्हीचा समावेश असेल.

* सर्व विषयांची परीक्षा एकाच वेळी देण्याचे बंधन असणार नाही. पाच वर्षांत एकूण नऊ परीक्षांना हव्या त्या विषयांची परीक्षा देता येईल.

* दरवर्षी एप्रिल व नोव्हेंबर असे वर्षांतून दोन वेळा परीक्षेचे आयोजन करण्यात येईल.

* अभ्यासक्रमातील विविध विषयांसाठी अंतर्गत मूल्यमापन स्वाध्याय पुस्तिका सोडवणे आवश्यक राहील.

मुक्त विद्यालयाची वैशिष्टय़े

* सोयीनुसार अध्ययनाची सवलत.

* अभ्यासक्रमाची लवचीकता.

* व्यावसायिक विषयांची उपलब्धता.

* संचित मूल्यांकनाची व्यवस्था.

* सर्वासाठी शिक्षणाची व्यवस्था.

* दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष व्यवस्था.

महिलांसाठीच्या योजनांमधील महत्त्वाच्या नव्या तरतुदी

HRD WOMENS YOJANA

7498   02-Sep-2017, Sat

राज्यसेवा परीक्षेतील प्रश्नांच्या विश्लेषणाच्या आधारे परीक्षेच्या दृष्टिकोनातून विविध योजनांचा अभ्यास कशा प्रकारे करावा, याची चर्चा यापूर्वी करण्यात आली आहे. काही योजनांमध्ये शासनाकडून कालानुरूप बदल करण्यात येतात. महिला व बालविकास विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या दोन महत्त्वाच्या योजनांमधील निकष/ अर्थसाहाय्य /व्याप्ती यांमध्ये महत्त्वाचे बदल जुलै २०१७ मध्ये करण्यात आले आहेत. नव्या तरतुदींसहीत या योजनांची परीक्षोपयोगी माहिती या लेखात देण्यात येत आहे.

                                मनोधर्य योजना

 1. बलात्कार, ऑसिड हल्ला याला बळी पडलेल्या महिला आणि लंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या बालकांचे पुनर्वसन व त्यांना अर्थसाहाय्य करण्यासाठी दि. २ ऑक्टोबर २०१३ पासून राज्यामध्ये सुरू करण्यात आलेल्या मनोधर्य योजनेमध्ये बदल करण्यात आले आहेत. नव्या तरतुदी पुढीलप्रमाणे –
 2. घटनेचा परिणाम म्हणून महिला किंवा बालकास कायमचे मतिमंदत्व/अपंगत्व आल्यास तसेच सामूहिक बलात्कारांच्या प्रकरणात गंभीर इजा झाल्यास किंवा अ‍ॅसिड हल्ल्यामध्ये चेहरा विद्रुप झाल्यास १०लाख रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात येईल.
 3. अ‍ॅसिड हल्ल्यामध्ये प्लास्टिक सर्जरी करावी लागल्यास शासनाने निश्चित केलेल्या रुग्णालयात करण्यात येईल व त्याचा संपूर्ण खर्च विधी सेवा प्राधिकरण मंजूर करेल.
 4. अ‍ॅसिड हल्ल्यामध्ये जखमी झाल्यास रु. ३,००,०००पर्यंत अर्थसाहाय्य देण्यात येईल.
 5. अन्य प्रकरणांमध्ये रु. १,००,००० पर्यंत अर्थसाहाय्य देण्यात येईल.
 6. यापकी ७५ टक्के रक्कम १०वर्षांसाठी पीडितांच्या नावाने बँकेत मुदत ठेव म्हणून तर २५ टक्के रकमेचा धनादेश तात्काळ देण्यात येईल.
 7. अर्थसाहाय्य पीडितांच्या / पीडित बालकाच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये देण्यात येईल.
 8.                                                माझी कन्या भाग्यश्री योजना
 9. मुलींचा जन्मदर वाढविणे, िलग निवडीस प्रतिबंध करणे, मुलीचे शिक्षण, आरोग्याचा दर्जा वाढविण्यास प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात दि.१ एप्रिल २०१६ पासून माझी कन्या भाग्यश्री योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी दारिद्रय़रेषेखालील (बीपीएल) तसेच वार्षकि उत्पन्न एक लाखापर्यंत असणारी (एपीएल) कुटुंबे पात्र ठरविण्यात येत होती. दि. १ऑगस्ट २०१७ पासून सुधारित योजना साडेसात लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या सर्व घटकांतील कुटुंबांना लागू असणार आहे.
 10. योजनेंतर्गत एका मुलीनंतर माता किंवा पित्याने कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर शासनाकडून मुलीच्या नावे ५० हजार रुपये, तर दोन मुलींनंतर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर दोन्ही मुलींच्या नावे प्रत्येकी २५ हजार रुपये बँकेत मुदत ठेव योजनेत गुंतवण्यात येईल.
 11. या मुदत ठेवीवरील व्याज मुलीला वयाच्या सहाव्या आणि बाराव्या वर्षी काढता येईल. तसेच मुद्दल आणि व्याज दोन्ही रक्कम वयाच्या १८व्या वर्षी काढता येईल.
 12. योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचे वय १८ र्वष पूर्ण असणे आणि दहावीची परीक्षा उत्तीर्ण होण्यासह वयाच्या १८ र्वष पूर्ण होईपर्यंत ती अविवाहित असणे आवश्यक आहे.
 13. कुटुंबात पहिले व दुसरे अपत्य मुलगी असल्यास योजनेचा लाभ घेता येईल. मात्र तिसरे अपत्य जन्मल्यास त्यास या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. पहिल्या दोन्ही अपत्यांचेही लाभ बंद होतील. मात्र दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळ्या मुली झाल्या तर त्या योजनेस पात्र असतील.
 14. बालगृहातील मुलींसाठी ही योजना लागू असणार आहे.
 15. लाभार्थी मुलीचे वडील महाराष्ट्राचे मूळ रहिवासी असणे आवश्यक असेल.
 16. एका मुलीच्या जन्मानंतर एक वर्षांच्या आत तर दोन मुलींनंतर ६ महिन्यांच्या आत माता किंवा पिता यांनी कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केलेल्या कुटुंबांनाच या योजनेचा लाभ घेता येईल.
 17. प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत लाभार्थी मुलगी व तिची आई यांच्या नावे संयुक्त बचत खाते बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये उघडण्यात येईल. त्यामुळे दोघींना एक लाख रुपयांचा अपघात विमा व ५ हजार रुपये ओव्हरड्राफ्ट व इतर लाभ प्राप्त होतील.

मुक्त विद्यापीठ

Information about Open University

3069   02-Jul-2017, Sun

आधुनिक काळातील एक वैशिष्ट्यपूर्ण विद्यापीठ. अशा प्रकारचे विद्यापीठ प्रारंभी बाराव्या शतकात इटलीतील बोलेन्या येथे विद्यार्थ्यांनी स्थापन केले होते. त्यातील शिक्षक विद्यार्थ्यांनीच घालून दिलेले होते. शिक्षक वर्गात उशिरा आले किंवा त्यांनी ठरविलेले तास वेळेवर घेतले नाहीत, तर विद्यार्थीच त्यांना शिक्षा करीत.

शिक्षणतज्ञांच्या मताप्रमाणे १९६४ मध्ये अमेरिकेतील बर्कली येथे विद्यार्थ्यांच्या ज्या दंगली झाल्या, त्यांमध्ये अलीकडील मुक्त विद्यापीठांचा उगम आहे. आपण विद्यापीठातून बाहेर पडावे आणि आपले स्वतःचे असे एक ‘मुक्त विद्यापीठ’ स्थापन करावे, असे बर्कली विद्यापीठातील विद्यार्थ्यांना वाटले. सुरुवातीच्या काळात बर्कली येथील विद्यार्थ्यांनी आपल्या जाहीरनाम्यात असे म्हटले होते, की आपल्या समाजाच्या प्रश्नांशी निगडित असलेल्या परंतु विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश नसलेल्या गोष्टी व प्रश्न यांसंबंधी चर्चा करणे, त्यांचा अभ्यास करणे आणि त्या व्यवहारात आणणे, हेच मुक्त विद्यापीठाचे प्रमुख ध्येय होय. जेथे संवाद आहे, खुली चर्चा आहे, भावनांची उत्कटता आहे, निःपक्षपाती वातावरण आहे; स्वागत,सभा, चळवळी, संमेलने, प्रेम यांचे जीवन आहे, ते विद्यापीठ म्हणजे मुक्त विद्यापीठ होय.

मुक्त विद्यापीठाच्या चळवळीने तरुण मनाला सर्जनशील मार्गाकडे वळविले. १९६० ते १९७० या काळात अमेरिकेमध्ये बरीच मुक्त विद्यापीठे उदयास आली. २३ जुलै १९६९ रोजी ब्रिटनमधील मुक्त विद्यापीठाचे पहिले कुलगुरू लॉर्ड क्राउथर यांनी आपल्या भाषणात असे म्हटले होते की, मुक्त विद्यापीठ हे सर्वार्थाने मुक्त असते. त्यामध्ये अभ्यासक्रम, परीक्षा, नियम, तास, शिक्षक-विद्यार्थी सभा, सत्र-कालावधी या सर्वांवर कोणतेही बंधन नसते. मुक्त विद्यापीठाचे स्वरूप बदलते व अशाश्वत आहे, असे काही शिक्षणतज्ञांना वाटते. तथापि पारंपारिक विद्यापीठांचे तरी यापेक्षा वेगळे असे काय आहे ? जसजसा काळ जातो तसतशी यांचीही अवनती होत जाते, असे इतरांचे मत आहे. समाजधारणेला पर्याय देण्याची मुक्त विद्यापीठाची कल्पना महत्वाकांक्षी आहे, असे काही शिक्षणतज्ञांना वाटते.

पारंपरिक विद्यापीठांतील विद्यार्थ्यांची संख्या अतिशय वाढल्याने पाश्चात्त्य देशांत तसेच भारतातही महाविद्यालयीन शिक्षण विस्कळित झाले. संख्या व गुण यांच्या व्यस्त प्रमाणामुळे ह्या शिक्षणपद्धतीच्या मर्यादाही स्पष्ट झाल्या. पदवी मिळविणे एवढेच बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या बाबतीत या शिक्षणाचे उद्दिष्ट ठरले. शिक्षण का, कसे व कोणासाठी असे जे अनेक प्रश्न विचारले जातात; त्या प्रश्नांचे उत्तर शोधण्याचा सर्वच ठिकाणी प्रयत्न चालू असतो व रूढ शिक्षणपद्धतीला पर्यायही शोधले जातात.

पत्रद्वारा शिक्षण  बहिःशाल शिक्षण  निरंतर शिक्षण ⇨ अनौपचारिक शिक्षण

अशा विविध पर्यायांप्रमाणेच मुक्त विद्यापीठ या नव्या प्रायोगिक पर्यायाची सुरुवात झाली. मुक्त विद्यापीठामध्ये नियमित वर्ग भरविले जात नाहीत; अथवा ठराविक काळात शिक्षणक्रम संपविणारी एखादी विद्याशाखाही नसते; परंतु सर्वसाधारण विद्यापीठांतील पदवी परीक्षेपर्यंतचा पूर्ण अभ्यासक्रम शिकविला जातो. व्यक्ती हीच आपल्या जीवनाची उत्तम शिल्पकार असू शकते, ही या विद्यापीठामागची मूळ भूमिका आहे.

गृहिणी, मध्यमवर्गीय कर्मचारी,टॅक्सी ड्रायव्हर, पोलीस अशा विविध प्रकारच्या व्यवसायांत किंवा सार्वजनिक स्वरूपाच्या नोकरीत स्थिरावलेल्या व्यक्ती मुक्त विद्यापीठांत शिक्षण घेतात. बव्हंशी विद्यार्थ्यांचे व्यवसाय पूर्ण वेळेचे असतात; परंतुपदवीअभावी अनेकांना नोकरीत बढती मिळत नाही. नेहमीचे महाविद्यालयीन शिक्षण घेण्याची संधी यांपैकी फारच थोड्यांना मिळते. म्हणूनच एखाद्या व्यक्तीची पार्श्वभूमी किंवा व्यावसायिक अनुभव केवळ शालेय शिक्षणक्रमाच्या योग्यतेच्या असला, तरी त्या व्यक्तीची औपचारिक शैक्षणिक पात्रता विचारात न घेता मुक्त विद्यापीठामध्ये प्रवेश दिला जातो.

अभ्यासक्रमाबाबत शिक्षकांचा किंवा महाविद्यालयाचा सल्ला घेण्याऐवजी काय शिकण्याची इच्छा आहे, हे विद्यार्थी मुक्त विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना सांगतो आणि मार्गदर्शकांच्या साहाय्याने पदवी परीक्षेचा मार्ग स्वतःच ठरवितो. शिक्षणाची प्रक्रिया अव्याहत चालू राहावयाची असेल, तर जीवनातील समस्यांना उत्तरे कशी शोधावीत, या शोधामध्ये तज्ञांचे साहाय्य कसे घ्यावे इ. गोष्टी विद्यार्थ्यांनी शिकणे आवश्यक असते. या गोष्टी मुक्त विद्यापीठामध्ये त्यांना शिकता येतात.

भारतातील विद्यापीठांनी मुक्त विद्यापीठाच्या चळवळीपासून खूप बोध घेण्याजोगा आहे; कारण तेथील विद्यापीठांतून बराच वेळ वाया जातो व नेहमीच्या कार्यक्रमात कितीतरी अडथळे येतात. आपल्या उच्च शिक्षणात नव्या प्रयोगांचा उदय आणि अवलंब झाला नाही, तर विद्यापीठाची मोडतोड झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी मुक्त विद्यापीठाच्या संकल्पनेमधील बाबींचा अंतर्भाव सध्याच्या विद्यापीठीय अभ्यासक्रमांत केल्यास मुक्त विद्यापीठाची जरूरी भासणार नाही.

भारतामध्ये १९७० नंतरच्या काळात मुक्त विद्यापीठाची कल्पना रुजली .

२६ ऑगस्ट १९८२ रोजी राष्ट्रपती झैलसिंग यांनी आंध्र प्रदेशातील नागार्जुनसागर येथे मुक्त विद्यापीठाचे उद्‌घाटन केले. ज्यांच्यापर्यंत पारंपरिक शिक्षण पोहोचू शकले नाही, ज्यांना साक्षरतेशिवाय अधिक शिक्षण लाभू शकले नाही, अशांसाठी मुक्त विद्यापीठ ही एक आवश्यक बाब आहे. भारतातील कोट्यवधी निरक्षरांची संख्या आणि लोकसंख्या यांच्या तुलनेत उच्च शिक्षणाच्या अल्प सोयी लक्षात घेता येथे मुक्त विद्यापीठांची नितांत आवश्यकता आहे. पुण्यामध्ये स्थापन झालेले ज्ञानेश्वर विद्यापीठ ( स्था. १९८० ) हेही मुक्त विद्यापीठच म्हणावे लागेल.

काही शिक्षणतज्ञांना असे वाटते, की या विद्यापीठांमध्येही विद्यार्थ्यांवर काही बंधने घालावीच लागतात. नाव नोंदविण्याची तारीख, अभ्यासक्रमाचा कालावधी, निकाल जाहीर होण्याची तारीख इ. गोष्टींमुळे या विद्यापीठांवरही बंधने पडतात व खऱ्याखुऱ्या अर्थाने मुक्त विद्यापीठ हे त्यांचे स्वरूप नष्ट होते. १९६० ते १९७० या काळात जेवढी मुक्त विद्यापीठे स्थापन झाली, त्या तुलनेत पुढील दहा वर्षांत मुक्त विद्यापीठे स्थापन झालेली नाहीत. यासंबंधी असे अनुभवास येते, की मुक्त विद्यापीठांच्या स्थापनेमुळे पारंपरिक विद्यापीठांतील विद्यार्थ्यांच्या विचारांची नवी दिशा काय आहे, बंडखोर तरुणांना काय पाहिजे आहे, हे कळण्यास साहाय्य झाले व पारंपरिक विद्यापीठांनी या गोष्टीची वेळीच दखल घेऊन आपल्या अभ्यासक्रमांमध्ये योग्य त्या सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. एका अर्थाने मुक्त विद्यापीठाचे हे यशच होय.

विद्यापीठ अनुदान आयोग

University Grant Commission

6914   02-Jul-2017, Sun

उच्च शिक्षणाचा दर्जा निर्धारित करणे व तो राखणे, त्याबाबत विद्यापीठांमध्ये समन्वय साधणे, विद्यापीठांच्या व महाविद्यालयांच्या आर्थिक गरजा ओळखून त्यांना अनुदाने देणे, अशा स्वरूपाची कार्ये पार पाडण्यासाठी नेमलेला आयोग. भारतात विद्यापीठ अनुदान आयोग स्थापण्याची कल्पना युनायटेड किंग्डममधील विद्यापीठ अनुदान समितीवरून ( स्थापना १९१९ ) सुचली. उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांना ब्रिटिश सरकारकडून फारशी आर्थिक मदत पूर्वी मिळत नसे; तथापि पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस या संस्थांची आर्थिक स्थिती फारच हलाखीची झाल्याने त्यांना अर्थसाहाय्य देण्यासाठी अनुदान समिती नेमण्यात आली. विद्यापीठांना द्यावयाच्या अनुदानासंबंधी सरकारला सल्ला देणे, तसेच अन्य काही अडचणी निवारण्याबाबतही विद्यापीठांना साहाय्य करणे, अशा स्वरूपाची कामे या समितीच्या कक्षेत येत असत ( १९८८ साली ही समिती बरखास्त झाली ). या समितीच्या धर्तीवर भारतातील प्रत्येक प्रांतात, किंवा प्रांतांच्या संमूहासाठी एक अशा तर्हेमने अनुदान समिती स्थापावी, असे डॉ. अमरनाथ झा यांनी १९३६ साली तत्कालीन आंतरविद्यापीठ मंडळास सुचविले होते. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् ह्यांच्या अध्यक्षतेखाली १९४८ मध्ये विद्यापीठीय शिक्षणाच्या सुधारणेबाबत शिफारशी करण्यासाठी विद्यापीठ शिक्षण आयोग नेमण्यात आला. या आयोगाने युनायटेड किंग्डमच्या विद्यापीठ अनुदान समितीच्या धर्तीवर भारतात अशी समिती वा आयोग स्थापन करण्यात यावा, अशी शिफारस केली. डिसेंबर १९५३ मध्ये तत्कालीन केंद्रीय शिक्षणमंत्री मौलाना अबुलकलाम आझाद ह्यांनी औपचारिक रीत्या विद्यापीठ अनुदान आयोग कायदा संसदेने संमत केला व नोव्हेंबर १९५६ मध्ये त्याबाबतची अधिसूचना भारत सरकारने जारी केल्याने, ५ नोव्हेंबर १९५६ पासून विद्यापीठ अनुदान आयोगाला वैधानिक स्वरूप प्राप्त झाले.

विद्यापीठ अनुदान आयोगाला उच्च शिक्षणाचा दर्जा राखणे व समन्वय साधणे या अधिकाराबरोबरच वित्तीय अधिकारही देण्यात आले. विद्यापीठ अनुदान आयोग कायद्याच्या कलम १२ नुसार अनुदानास पात्र असणाऱ्या विद्यापीठांना व महाविद्यालयांना अध्यापन, संशोधन व विस्तारकार्य करण्यासाठी शासन आयोगाला योजनाविधी न योजनेतर निधी उपलब्ध करून देते. आयोगाची कचेरी दिल्लीत आहे. आयोगात एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष आणि दहा व इतर सभासद असतात. त्यांची नेमणूक केंद्र सरकार करते. केंद्र वा राज्य शासनामध्ये अधिकारी नसलेल्या व्यक्तींपैकी एकाची निवड अध्यक्ष म्हणून करण्यात येते. इतर दहा सभासदांपैकी दोन केंद्र सरकारचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्या सरकारच्या अधिकाऱ्यांमधून निवडलेले असतात. किमान चार सभासद हे निवड करतेवेळी विद्यापीठात सेवारत असलेल्या प्राध्यापकांमधून निवडले जातात. ऊर्वरित सभासद पुढील व्यक्तींमधून निवडले जातात : (अ) ज्यांना कृषी, व्यापार, उद्योग किंवा वनविद्या या विषयांचे ज्ञान वा अनुभव आहे; (आ) जे अभियांत्रिकी, कायदा, वैद्यक अथवा अशाच प्रकारच्या उच्च शिक्षणावर आधारलेल्या व्यवसायांचे प्रतिनिधी आहेत; (इ) जे विद्यापीठांचेकलगुरू आहेत; किंवा विद्यापीठीय प्राध्यापक नसले तरी केंद्र सरकारच्या मते नामवंत शिक्षणतज्ज्ञ आहेत; किंवा ज्यांनी उच्च अकादेमिक प्रतिष्ठा मिळविली आहे . मात्र या १० सभासदांपैकी निदान निम्मे सभासद जे केंद्र वा राज्य शासनामध्ये अधिकारी नाहीत, अशांपैकी असणे आवश्यक असते.

विद्यापीठ अनुदान आयोग (सुधारित) कायदा, १९८५ अन्वये आयोगाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर सभासद यांच्या नेमणुकीचा कालावधी पुढीलप्रमाणे असतो : (अ) अध्यक्षांच्या बाबतीत नियुक्तीपासून पाच वर्षे अथवा त्या व्यक्तीने वयाची ६५ वर्षे पूर्ण करेपर्यंत−यांपैकी जे अगोदर असेल त्याप्रमाणे; (आ) उपाध्यक्षांच्या बाबतीत नियुक्तीपासून तीन वर्षे अथवा त्या व्यक्तीने वयाची ६५ वर्षे पूर्ण करेपर्यंत−यांपैकी जे अगोदर असेल त्याप्रमाणे; (इ) इतर सभासदांच्या बाबतीत नियुक्तीपासून तीन वर्षे.

भारतातील विद्यापीठ अनुदान आयोग हा युनायटेड किंग्डंममधील विद्यापीठ अनुदान मंडळाच्या धर्तीवर स्थापन करण्यात आला, असे सामान्यपणे मानले जात असले तरी ह्या दोहोंमधील महत्त्वाचा फरक असा की, युनायटेड किंग्डममधील विद्यापीठ अनुदान मंडळाचे कार्य हे केवळ विद्यापीठांना अनुदाने देण्यापुरतेच मर्यादित होते; तर भारतातील विद्यापीठ अनुदान आयोगाला विद्यापीठांना अनुदाने देण्याबरोबरच, विद्यापीठांचा शैक्षणिक दर्जा निर्धारित करणे व त्यात समन्वय साधणे, ही वैधानिक जबाबदारी पार पाडावी लागते. विद्यापीठ अनुदान आयोग कायद्याच्या कलम १२ (ई) (ब) नुसार आयोग कोणत्याही विद्यापीठाला शैक्षणिक सुधारणेबाबत उपाययोजनांची शिफारस करू शकतो, तसेच याबाबत कोणती कार्यवाही करावी, याचे मार्गदर्शन करू शकतो.

उच्च शिक्षणाचे नियोजन करणे, त्या शिक्षणाचा कस सुधारून ते राष्ट्राच्या गरजा भागविण्यास समर्थ व्हावे म्हणून विद्यापीठांना अनुदाने मंजूर करणे व त्यांचे वाटप करणे, हे आयोगाचे प्रमुख कार्य आहे. विद्यापीठांतील शिक्षणाविषयी देशातील व परदेशांतील माहिती गोळा करून ती संदर्भासाठी उपलब्ध करणे, नवीन विद्यापीठ स्थापन करण्याच्या इष्टानिष्टतेबद्दल अभिप्राय देणे, शासन तसेच विद्यापीठे यांना समस्यांचा निरसनाबाबत सल्ला देणे, विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात सुसूत्रता आणणे व उच्च शिक्षणाच्या विकासासाठी विविध योजना अवलंबणे, ही कामेही आयोगाच्या कार्यकक्षेत येतात. अभ्यासक्रमात सुधारणा सुचविण्यासाठी आयोगातर्फे काही समित्यांची नियुक्तीही करण्यात येते.

विद्यापीठांना दिले जाणारे अनुदान साधारण प्रत्येकी पाच वर्षांच्या एकेका कालखंडासाठी असते. या पंचवार्षिक कालखंडाच्या सुरुवातीसच प्रत्येकी विद्यापीठ पुढील पाच वर्षांतील गरजांचा आराखडा आयोगास सादर करते. त्याच सुमारास आयोगाचे काही सभासद विद्यापीठास भेट देऊन तेथील परिस्थितीची प्रत्यक्ष माहिती घेतात. सर्व विद्यापीठांच्या मागण्यांचा एकत्र विचार करून आयोग पाच वर्षांसाठी लागणाऱ्या एकूण रकमेची मागणी केंद्र शासनाकडे करतो, शासन ती रक्कम आयोगास देते व आयोगाकडून ती विद्यापीठास मिळते. पंचवार्षिक अनुदानाच्या पद्धतीमुळे विद्यापीठांना दीर्घकालीन योजना हाती घेता येतात. आयोगाचे अनुदान भांडवली खर्चासाठी, दैनंदिन व आवर्ती खर्चासाठी, तसेच एखाद्या विशिष्ट योजनेसाठी दिले जाते. अनुदान योग्य कामासाठी वापरले की नाही, याची तपासणी आयोगाकडून केली जाते. आयोगाने आजवरच्या दीर्घ कारकीर्दीत विद्यापीठे व शासन या दोहोंचा विश्वास संपादन करून, तसेच विद्यापीठांच्या स्वायत्ततेस कायम महत्त्व देऊन शैक्षणिक विकास साधण्यावर भर दिलेला आहेस. शासकीय खर्चाची जाणीव विद्यापीठांना करून देणे व त्यांच्या शैक्षणिक गरजा पुरविण्यास शासनाला उद्युक्त करणे, या दोन्ही कार्यात आयोगाने भरघोस यश संपादन केले आहे. आयोगाने आजवर पुढील कामांसाठी विद्यापीठांना अनुदाने दिली आहेत : ग्रंथालये व प्रयोगशाळा यांची वाढ आणि सुधारणा करणे, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे बांधणे, प्राध्यापकांच्या वेतनश्रेणी सुधारणे, संशोधनप्रबंध प्रसिद्ध करण्यास आर्थिक साहाय्य देणे, प्राध्यापकांच्या परिषदा व चर्चासत्रे घडवून आणणे, नामवंत प्राध्यापकांना मानधन देणे. यांशिवाय आयोगाने अनेक शैक्षणिक समस्यांचा अभ्यास करून त्यासंबंधी उपायही सुचवले आहेत. आयोगाच्या अनुदानातून १९७०-७१ पासून काही निवडक महाविद्यालयांत पदवी पातळीपर्यंतच्या विज्ञानांतर्गत विषयांच्या अध्यापनात सुधारणा करण्यासाठी महाविद्यालयीन विज्ञान-सुधार कार्यक्रम ( कॉलेजेस सायन्स इंप्रुव्हमेंट प्रोग्रॅम; COSIP ) तसेच महाविद्यालयीन मानव्यविद्या व सामाजिक शास्त्रे विषयाच्या बाबत सुधार कार्यक्रम ( विद्यापीठे ह्यूमॅनिटीज अँड सोशल सायन्स इंप्रुव्हमेंट प्रोग्रॅम ; COHSSIP ) सुरू करण्यात आले.


स्वातंत्र्यप्राप्तीनंतर महाविद्यालये व विद्यापीठे यांच्या संख्येत बरीच वाढ झाली, तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही एकदम वाढली. या वाढीतून उद्‌भवलेली बेशिस्त कशी आटोक्यात आणता येईल, यासंबंधी आयोगाने उपयुक्त सूचना केल्या आहेत. संस्कृती, भाषा, धर्म तसेच आर्थिक व सामाजिक परिस्थिती भिन्न असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भावनिक ऐक्य व राष्ट्रीय एकात्मता कशी निर्माण करता येईल, या दृष्टीने आयोगाने एक चर्चासत्र घडवून आणले. मातृभाषेव्यतिरिक्त इतर भाषांचा अभ्यास, बहिःशाल कार्य व सामाजिक संशोधन, प्राध्यापक, शिक्षक यांच्यासाठी गणित व विज्ञाने ह्यांचे उन्हाळी प्रशिक्षणवर्ग इ. उपक्रमांस आयोगाने प्रोत्साहन दिले. प्राध्यापकांच्या उद्‌बोधनासाठी अकादोमिक स्टाफ कॉलेजांची निर्मिती करण्यात आलेली आहे, तज्ज्ञांच्या साहाय्याने परीक्षापद्धतीत सुधारणा घडवून आणण्यासाठी आयोगाने चर्चासत्र घडवून आणली आहेत. आयोगाने हाताळलेल्या आणखी एक प्रश्न म्हणजे, विशेषज्ञतेतून संभवणाऱ्या एकांगीपणास आळा कसा घालता येईल, हा होय. त्यासाठी विद्यापीठीय अभ्यासक्रमात आंतरशाखीय विषयांचा समावेश करण्याची सूचना आयोगाने केली. पदव्युत्तर अध्यापनासाठी आयोगाने प्रगत अध्यापन केंद्रे सुरू केली आहेत. १९९३-९४ मध्ये प्रशासकीय सोयीसाठी व स्थानिक प्रश्न शक्यतो स्थानिक पातळीवर सोडविण्यासाठी आयोगाने देशात विविध ठिकाणी विभागीय कार्यालये स्थापन केली. आयोगाने स्वायत्त महाविद्यालयांच्या निर्मितीची योजना आखून ती कार्यान्वित केली आहे. विद्यापाठाशी संलग्न महाविद्यालयांच्या विकासासाठी आयोगातर्फे महाविद्यालय व विद्यापीठ विकास परिषदांची (कॉलेजेस अँड यूनिव्हर्सिटी डिव्हेलपमेंट कौन्सिल) स्थापना करण्यात आली आहे. अध्यापकांसाठी प्रवास-अनुदान योजना, व्यावसायिक आचारसंहिता, अध्यापकांच्या निरनिराळ्या श्रेणींसाठी आवश्यक असलेल्या किमान पात्रतेचे निर्धारण ही कार्येही आयोगाने केली आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे दूरदर्शनवरून ‘कंट्रीवाइड क्लासरूम’ हा उच्च शिक्षणातील निरनिराळ्या विषयांवर असणारा कार्यक्रम देशभर प्रसारित केला जातो. यूनिव्हर्सिटी डिव्हेलपमेंट इन इंडिया (सांख्यिकाचा आढावा घेणारे मासिक), जर्नल ऑफ हायर एज्युकेशन, बुलेटिन ऑफ हायर एज्युकेशनयूजीसी न्यूज लेटर हे आयोगाचे कार्यक्रम व योजना ह्यांची माहिती देणारे द्वैमासिक इ. प्रकाशने आयोगातर्फे प्रकाशित केली जातात.


Top