आइनस्टाइनचे विद्यापीठ.. ई.टी.एच.झुरिक विद्यापीठ

eth-zurich-university-

2055   22-Mar-2019, Fri

विद्यापीठाची ओळख-स्विस फेडरल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात ई.टी.एच. झुरिक हे स्वित्र्झलडमधील विज्ञान-तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या विषयांमध्ये संशोधन-अध्यापन करणारे एक प्रथितयश विद्यापीठ आहे. २०१९सालच्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सटिी रँकिंगनुसार ई.टी.एच. झुरिक हे जगातले सातव्या क्रमांकाचे तर युरोप खंडातील तिसऱ्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञानातील जगातील अग्रगण्य विद्यापीठांमध्ये ई.टी.एच. झुरिक या विद्यापीठाचा समावेश आहे. ई.टी.एच. झुरिक त्याच्या अत्याधुनिक संशोधन आणि व त्यातील अभिनव कल्पनांसाठी सर्वत्र ज्ञात आहे. इसवी सन १८५४मध्ये स्वीस फेडरल पॉलिटेक्निक स्कूल म्हणून स्थापना झालेल्या संस्थेचे रूपांतर कालांतराने विद्यापीठामध्ये झाले. ई.टी.एच. झुरिक हे स्वित्र्झलडमधील सर्वात प्रतिष्ठित आणि अग्रगण्य विद्यापीठ आहे.

ई.टी.एच. झुरिक विद्यापीठ एकूण दोन कॅम्पसमध्ये विभागले गेले आहे. यामध्ये झुरिक झेन्त्रम परिसरातील मुख्य वास्तू व हाँगर्बर्ग परिसराचा समावेश आहे. विद्यापीठाच्या १५०व्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने हाँगर्बर्ग परिसरात ‘सायन्स सिटी’ या प्रमुख प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.

विद्यापीठाच्या या कॅम्पसमध्ये प्रमुख शैक्षणिक-संशोधन विभाग, कार्यालये, सायन्स सिटी, ई.टी.एच.लॅबोरेटरी ऑफ आयन बीम फिजिक्स, ग्रंथालय यांसारखे महत्त्वाचे विभाग वा स्कूल्स आहेत. आज ई.टी.एच. झुरिकमध्ये सुमारे साडेसहा हजारच्या आसपास एवढा प्राध्यापक-संशोधकवर्ग आपले अध्यापन-संशोधनाचे कार्य करत आहे. तर जवळपास दहा हजार पदवीधर तर सहा हजारांहून अधिक पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण पूर्ण करत आहेत.

अभ्यासक्रम – ई.टी.एच. झुरिक विद्यापीठातील सर्व पदवी अभ्यासक्रम हे पूर्णवेळ अभ्यासक्रम आहेत. पदवी अभ्यासक्रम जर्मन भाषेमध्ये असून पदव्युत्तर अभ्यासक्रम मात्र जर्मन व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहेत. जवळपास सर्व आंतरराष्ट्रीय विद्यार्थी या विद्यापीठामध्ये पदव्युत्तर आणि पीएचडी अभ्यासक्रमांसाठी अर्ज करतात. आंतरराष्ट्रीय विद्यार्थी विज्ञान आणि अभियांत्रिकी शाखेतील बहुतांश विषयांवर आपले लक्ष्य केंद्रित करतात.

विद्यापीठातील फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, इंजिनिअरिंग, गणित या प्रमुख विभागांमार्फत विद्यापीठातील विविध पदवी व पदव्युत्तर विभाग चालतात. विद्यापीठाचे मुख्य संशोधन मेडिसिन, डेटा, सस्टेनेबिलीटी, मॅन्युफॅक्चिरग टेक्नॉलॉजी, क्रिटीकल थिंकिंग इनिशिएटिव्ह या क्षेत्रांमध्ये चालते. सर्व विभागांमधून विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडी वा संशोधन पातळीवरील अभ्यासक्रमांचे पर्याय विद्यापीठाने उपलब्ध करून दिले आहेत. विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्यासाठी त्या त्या पदवी वा पदव्युत्तर स्तरासाठी आवश्यक असलेली प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे विद्यार्थ्यांसाठी गरजेचे आहे.

सुविधा – ई.टी.एच. झुरिक विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्क, निवास व भोजन सुविधा विविध निकषांद्वारे उपलब्ध करून दिलेल्या आहेत. विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आíथक सहाय्य उपलब्ध करून दिले जाते. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर यासाठी असलेली अर्जप्रक्रिया व इतर बाबींबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. विद्यापीठाचे ग्रंथालय व सर्व प्रयोगशाळा अद्ययावत आहेत. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना हेल्थ इन्शुरन्स व वैद्यकीय सुविधा काही अटींवर विद्यापीठाकडून दिल्या जातात.

वैशिष्टय़ – ई.टी.एच. झुरिक विद्यापीठ हे विज्ञान व अभियांत्रिकीमधील शिक्षण आणि संशोधन यासाठी जगभर प्रसिद्ध आहे. या विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय स्तरावरील जागतिक दर्जाचे संशोधक व तंत्रज्ञ दिलेले आहेत. यामध्ये महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन व विल्यम रॉन्टजेन यांचा समावेश आहे. आतापर्यंतच्या उपलब्ध सांख्यिकीनुसार, विद्यापीठातील एकूण ३२ माजी विद्यार्थी वा प्राध्यापक नोबेल पारितोषिक विजेते आणि एक टय़ुरिंग पुरस्कार विजेते आहेत.

संकेत स्थळ:  https://www.ethz.ch/en.html

ज्ञानसागर शिकागो विद्यापीठ, अमेरिका

article-on-chicago-school-of-america

990   20-Mar-2019, Wed

विद्यापीठाची ओळख

यू शिकागो किंवा यू ऑफ सी या नावाने सर्वत्र परिचित असलेले आणि अमेरिकेतील इलिनॉय राज्यातील शिकागो या शहरात वसलेले ‘शिकागो विद्यापीठ’ हे क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सटिी रँकिंगनुसार जगातले नवव्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे. तत्कालीन अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योजक जॉन रॉकफेलर यांच्या पुढाकाराने या विद्यापीठाची स्थापना १८९० साली झाली.

शिकागो विद्यापीठातील अर्थशास्त्र व व्यवसाय शिक्षण विभाग हे जगातील नामांकित शैक्षणिक केंद्र आहेत. जागतिक अर्थकारणावर असलेल्या त्यांच्या प्रभावामुळे शिकागो हे जगातील सर्वात प्रतिष्ठित विद्यापीठांपकी एक आहे. शिकागो विद्यापीठ हे खासगी विद्यापीठ असून ना नफा ना तोटा या तत्त्वावर चालणारे संशोधन विद्यापीठ आहे. ’ let knowledge grow from more to more and so be human life enrichedहे या विद्यापीठाचे ब्रीदवाक्य आहे.

शिकागो विद्यापीठ एकूण २१७ एकरच्या कॅम्पसमध्ये पसरलेले आहे. विद्यापीठाच्या या कॅम्पसमध्ये विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम, पाच शैक्षणिक संशोधन विभाग आणि सात व्यावसायिक विभागांद्वारे चालतात. आज शिकागोमध्ये सुमारे तीन हजार प्राध्यापक-संशोधक आपले अध्यापन-संशोधनाचे कार्य करत आहेत. तर जवळपास पंधरा हजारांहून अधिक पदवी-पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण पूर्ण करत आहेत.

अभ्यासक्रम

शिकागो विद्यापीठातील पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचे असून पदव्युत्तर अभ्यासक्रम वेगवेगळ्या कालावधीचे आहेत. विद्यापीठाने समाजशास्त्र, कायदा, अर्थशास्त्र, साहित्यिक टीका, धर्म विभागांसह इतर अनेक शैक्षणिक विषयांच्या विकासात प्रमुख भूमिका बजावली आहे. विद्यापीठामध्ये साहित्य, समाजशास्त्र, गणित, अभियांत्रिकी, कला आणि विज्ञान विभागही आहेत. मात्र शिकागो विद्यापीठ आपल्या व्यावसायिक स्कूल्ससाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे अधिक विद्यार्थी या विषयांवर आपले लक्ष केंद्रित करतात.

प्रमुख पाच विभागांमध्ये जीवशास्त्र, समाजशास्त्र, भौतिकशास्त्र, मॉलिक्युलर इंजिनीअिरग आणि मानववंशशास्त्र या विभागांचा तर व्यावसायिक विभागांमध्ये प्रिझ्झर स्कूल ऑफ मेडिसिन, जगप्रसिद्ध असे बूथ स्कूल ऑफ बिझिनेस, लॉ स्कूल, स्कूल ऑफ सोशल सíव्हस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, ग्रॅहम स्कूल ऑफ कंटिन्युइंग लिबरल अ‍ॅण्ड प्रोफेशनल स्टडीज, हॅरिस स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसी स्टडीज इत्यादी स्कूल्सचा समावेश आहे.

विद्यापीठातील या सर्व स्कूल्सच्या अंतर्गत सर्व पदवी, पदव्युत्तर व संशोधन विभाग चालतात. शिकागोमधील या स्कूल्सच्या माध्यमातून, विद्यापीठ ५१ मेजर्स आणि ३३ मायनर्स म्हणजेच पदवी अभ्यासक्रम, पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि व्यावसायिक अभ्यासक्रम चालवते. या सर्व विभागांमधून विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडी वा संशोधन पातळीवरील शेकडो अभ्यासक्रमांचे सर्टििफकेट, ऑनलाइन व ऑफलाइन पर्याय विद्यापीठाने उपलब्ध करून दिले आहेत.

विद्यापीठामार्फत चालणाऱ्या या सर्व अभ्यासक्रमांना त्या त्या कार्यक्षेत्रातील विविध संस्थांची मान्यता मिळालेली आहे. विद्यापीठातील ऑफलाइन अभ्यासक्रम हे फॉल आणि िस्प्रग या दोन सत्रांमध्ये चालतात तर ऑनलाइन अभ्यासक्रम वर्षभर उपलब्ध असतात. विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्यासाठी त्या त्या पदवी वा पदव्युत्तर स्तरासाठी आवश्यक असलेली प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे.

विद्यापीठामध्ये बायोइंजिनीअिरग, कॉम्प्युटर सायन्स, अर्थशास्त्र, इतिहास, भाषाशास्त्र, तर्कशास्त्र, राज्यशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित, संगीत, इंग्रजी, मानसशास्त्र इत्यादी विषयांपासून ते युरोपियन सायन्स, अ‍ॅटमॉसफिअरिक अ‍ॅण्ड प्लॅनेटरी सायन्स, जेनेटिक्स, सर्जरी, बायोइंजिनीअरिंग, न्युरोलॉजी, न्युरोबायोलॉजी इत्यादी हजारो विषय उपलब्ध आहेत.

सुविधा

शिकागो विद्यापीठातील शिक्षण जरी अतिशय महाग असले तरी विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्क, शैक्षणिक कर्ज, निवास व भोजन आदी सुविधा पात्रतेच्या निकषांनुसार दिलेल्या आहेत. प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांपकी बहुतांश विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून शिष्यवृत्ती दिली जाते.

तसेच, विद्यार्थ्यांच्या आवश्यकतेनुसार विद्यापीठाच्या आवारात विवाहित व अविवाहित विद्यार्थ्यांना निवासाची सुविधा बहाल करण्यात येते. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर यासाठी असलेली अर्जप्रक्रिया व इतर बाबींबद्दल माहिती देण्यात आलेली आहे.

वैशिष्टय़

शिकागोच्या भौतिकशास्त्र विभाग आणि मेट लॅबने दुसऱ्या विश्वयुद्धाच्या मॅनहॅटन प्रकल्प प्रयत्नांचा मुख्य भाग असलेल्या व जगातील पहिली अणुविभाजन क्रिया  (शिकागो पाइल -१) विकसित करण्यात मदत केली. विद्यापीठाच्या संशोधन प्रयत्नांमध्ये फेर्मी नॅशनल एक्सलेटर प्रयोगशाळा (fermi national accelerator laboratory) आणि आरगॉन नॅशनल लॅबोरेटरी (argonne national laboratory) तसेच मरिन बायोलॉजिकल प्रयोगशाळेचे व्यवस्थापन इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. विद्यापीठाचे स्वत:चे स्वतंत्र प्रकाशनगृह आहे.

शिकागो युनिव्हर्सटिी प्रेस हे अमेरिकेतील सर्वात मोठे विद्यापीठ प्रकाशनगृह आहे. २०२१पर्यंत अमेरिकेचे पूर्व अध्यक्ष बराक ओबामा यांच्या नावे असलेल्या बराक ओबामा अध्यापन केंद्र विद्यापीठात सुरू होईल.

शिकागोच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये अनेक दिग्गजांचा समावेश आहे. यामध्ये, जगविख्यात अर्थतज्ज्ञ फ्रीडमन, मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्य नडेला, ओरॅकलचे संस्थापक-संचालक लॅरी एलिसन व उद्योगजगतातील अनेक नामवंतांचा समावेश आहे. भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन आणि अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामांनी काही काळ शिकागो विद्यापीठात अध्यापन केले होते.

ऑक्टोबर २०१८ पर्यंतच्या सांख्यिकीनुसार, आतापर्यंतचे एकूण ९८ नोबेल पारितोषिक विजेते आणि चार टय़ुरिंग पुरस्कार विजेते या विद्यापीठाशी विद्यार्थी वा प्राध्यापक म्हणून संलग्न होते. म्हणजेच ते विद्यापीठात विद्यार्थी वा प्राध्यापक होते/आहेत.

संकेतस्थळ :

http://www.uchicago.edu/

विद्यापीठ विश्व : व्यवसाय आणि शिक्षण

university-world-nanyang-technological-university-singapore

1037   19-Mar-2019, Tue

नानयांग टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटि, सिंगापूर

विद्यापीठाची ओळख

क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगनुसार २०१९सालच्या नानयांग टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटि हे जगातले बाराव्या क्रमांकाचे तर आशिया खंडातील तिसऱ्या क्रमांकाचे विद्यापीठ ठरले आहे. नानयांग टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटि या विद्यापीठाची स्थापना १९८१ साली करण्यात आली. तत्कालीन संस्थेचे नाव नानयांग टेक्नॉलॉजीकल इन्स्टिटय़ूट असे होते. १९९१ साली हे नाव बदलून नानयांग टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटि असे करण्यात आले.

नानयांग टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटि एनटीयू या नावाने सर्वत्र ओळखले जाते. एनटीयू हे विद्यापीठ सिंगापूरमधील दुसरे स्वायत्त संशोधन विद्यापीठ आहे. जागतिक स्तरावर विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये अद्ययावत संशोधन करणाऱ्या प्रमुख विद्यापीठांपैकी एक महत्त्वाचे विद्यापीठ आहे. विद्यापीठात विज्ञान, वैद्यकीय, कायदा, कला आणि सामाजिक विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवसाय इत्यादी सर्वच विद्याशाखांमधील प्रमुख विषयांतील पदवी आणि पदव्युत्तर पदवी स्तरावरील विविध अभ्यासक्रमांचे अध्ययन-अध्यापन-संशोधन केले जाते.

सिंगापूरच्या ज्युरोंग वेस्ट या निवासी परिसराजवळ एनटीयू विद्यापीठाचा मुख्य कॅम्पस-युनान गार्डन कॅम्पस एकूण दोनशे हेक्टर क्षेत्रफळामध्ये साकारला गेलेला आहे. तसेच शहरात नोव्हेना आणि वन नॉर्थ या ठिकाणी विद्यापीठाचे इतर दोन कॅम्पस आहेत. या सर्व कॅम्पसमध्ये विद्यापीठाचे सर्व प्रमुख शैक्षणिक-संशोधन विभाग व महाविद्यालये आहेत.

एनटीयूमध्ये सध्या जवळपास दोन हजार तज्ज्ञ प्राध्यापक-संशोधक आपले अध्यापन-संशोधनाचे कार्य करत आहेत. तर तेहतीस हजार पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण व संशोधन पूर्ण करत आहेत. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम एकूण आठ शैक्षणिक-संशोधन विभागांद्वारे आणि महाविद्यालयांच्या माध्यमातून चालवले जातात.

अभ्यासक्रम

एनटीयू विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रम हे पूर्णवेळ अभ्यासक्रम आहेत. हे अभ्यासक्रम तीन ते चार वर्षांचे असून पदव्युत्तर अभ्यासक्रम वेगवेगळ्या कालावधीचे आहेत. पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी व्यवसाय-व्यवस्थापन, विज्ञान, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शाखेतील बहुतांश विषयांवर आपले लक्ष केंद्रित करतात. एनटीयूच्या तीन कॅम्पसमध्ये एकूण आठ स्कूल्स आणि कॉलेजेस आहेत.

विद्यापीठातील नानयांग बिझनेस स्कूल, कॉलेज ऑफ इंजिनीअिरग, कॉलेज ऑफ ह्युमॅनिटीज, आर्ट्स अ‍ॅण्ड सोशल सायन्सेस, कॉलेज ऑफ प्रोफेशनल अ‍ॅण्ड कंटीन्युइंग एज्युकेशन, ली काँग चियान स्कूल ऑफ मेडिसिन, कॉलेज ऑफ सायन्सेस, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ एज्युकेशन आणि राजारत्नम स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज या विभागांमार्फत विद्यापीठातील सर्व पदवी व पदव्युत्तर विभाग चालतात.

या सर्व विभागांमधून विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर आणि पीएच.डी. वा संशोधन पातळीवरील शेकडो अभ्यासक्रमांचे सर्टिफिकेट, ऑनलाइन व ऑफलाइन पर्याय विद्यापीठाने उपलब्ध करून दिले आहेत. विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्यासाठी त्या त्या पदवी वा पदव्युत्तर स्तरासाठी आवश्यक असलेली प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे विद्यार्थ्यांसाठी गरजेचे आहे.

सुविधा

एनटीयू विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्येच वसतिगृहांची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. विद्यापीठाकडे एकूण चोवीस हॉल्स ऑफ रेसिडेन्सेस आहेत. त्या माध्यमातून एकूण चौदा हजारांहूनही अधिक विद्यार्थ्यांसाठी निवासस्थानांची सुविधा उपलब्ध केलेली आहे. प्रत्येक हॉलसाठी उपलब्ध असलेल्या सुविधा या पंचतारांकित दर्जाच्या आहेत.

तसेच, शहराच्या इतर भागांतून विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत बसची सोयही करण्यात आलेली आहे. विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व पाठय़वृत्तीच्या माध्यमातून आर्थिक साहाय्य उपलब्ध करून दिले जाते. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर यासाठी असलेली अर्जप्रक्रिया व इतर बाबींबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. विद्यापीठाचे ग्रंथालय व सर्व प्रयोगशाळा अद्ययावत आहेत. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना हेल्थ इन्शुरन्स व इतर वैद्यकीय सुविधा विद्यापीठाकडून दिल्या जातात.

वैशिष्टय़

सिंगापूरमधील अनेक ख्यातनाम राजकारणी व उद्योजक हे एनटीयू विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक तंत्रज्ञ व प्राध्यापक तयार केलेले आहेत. एनटीयूमध्ये अध्यापन करणारे अनेक प्राध्यापक हे त्यांच्या क्षेत्रातील जागतिक नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत. विद्यापीठाचे नानयांग बिझनेस स्कूल हे आशियातील एक महत्त्वाचे आणि अग्रगण्य बी-स्कूल म्हणून नावारूपास येत आहे. विद्यापीठाच्या परिसरातच अर्थ ऑब्झव्‍‌र्हेटरी स्थित आहे.

संकेतस्थळ  https://www.ntu.edu.sg/

येल विद्यापीठ

yale-university-usa

7076   09-Apr-2019, Tue

विद्यापीठाची ओळख

येल युनिव्हर्सिटी किंवा येल या नावाने सर्वत्र परिचित असलेले विद्यापीठ अमेरिकेतील कनेटीकट या राज्यामधील प्रमुख विद्यापीठ आहे. न्यू हेवनमध्ये स्थित असलेले हे जागतिक दर्जाचे विद्यापीठ आयव्ही लीग विद्यापीठांपैकी एक आहे.

येल विद्यापीठ क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगनुसार जगातले पंधराव्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे. प्रिन्स्टनसारखीच या विद्यापीठाची स्थापना अमेरिकन क्रांतीच्याही अगोदर इसवी सन १७०१ साली झालेली आहे. येल विद्यापीठ हे अमेरिकेतील तिसऱ्या क्रमांकाचे जुने विद्यापीठ आहे. येल विद्यापीठ हे खासगी संशोधन विद्यापीठ आहे. ‘राइट अ‍ॅण्ड ट्रथ’ हे या विद्यापीठाचे ब्रीदवाक्य आहे.

येल विद्यापीठ एकूण एक हजार एकरच्या कॅम्पसमध्ये पसरलेले आहे. येलचा मध्यवर्ती कॅम्पस हा डाऊनटाऊन न्यू हेवनमध्ये जवळपास दोनशे साठ एकरांच्या परिसरामध्ये विस्तारलेला आहे. विद्यापीठाचे सर्व प्रशासन ‘येल कॉर्पोरेशन’ या नियामक मंडळातर्फे चालवले जाते. आज येलमध्ये चार हजारपेक्षाही अधिक प्राध्यापक-संशोधक आपले अध्यापन-संशोधनाचे कार्य करत आहेत. तर जवळपास बारा हजारांहून अधिक पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण पूर्ण करत आहेत.

अभ्यासक्रम

येल विद्यापीठातील पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचे असून पदव्युत्तर अभ्यासक्रम वेगवेगळ्या कालावधींचे आहेत. विद्यापीठामध्ये एकूण चौदा प्रमुख विभाग (स्कूल्स) कार्यरत आहेत. यामध्ये येल कॉलेज, स्कूल ऑफ मेडिसिन, डिव्हीनिटी स्कूल, लॉ स्कूल, आर्ट्स अ‍ॅण्ड सायन्सेस, शेफिल्ड सायंटिफिक स्कूल, फाइन आर्ट्स, म्युझिक, फॉरेस्ट्री अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंटल सायन्सेस, पब्लिक हेल्थ, आर्किटेक्चर, नìसग, नाटय़ आणि व्यवस्थापन इत्यादी प्रमुख स्कूल्सचा समावेश आहे. विद्यापीठातील या स्कूल्सच्या अंतर्गत सर्व पदवी, पदव्युत्तर व संशोधन विभाग चालतात. येलमधील या स्कूल्सच्या माध्यमातून, विद्यापीठ सर्व मेजर्स आणि मायनर्स म्हणजेच पदवी अभ्यासक्रम, पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि व्यावसायिक अभ्यासक्रम चालवते.

या सर्व विभागांमधून विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडी वा संशोधन पातळीवरील शेकडो अभ्यासक्रमांचे सर्टिफिकेट, ऑनलाइन व ऑफलाइन पर्याय विद्यापीठाने उपलब्ध करून दिले आहेत. विद्यापीठामार्फत चालणाऱ्या या सर्व अभ्यासक्रमांना त्या त्या क्षेत्रातील विविध संस्थांची मान्यता मिळालेली आहे. विद्यापीठातील ऑफलाइन अभ्यासक्रम हे फॉल आणि स्प्रिंग या दोन सत्रांमध्ये चालतात तर ऑनलाइन अभ्यासक्रम वर्षभर उपलब्ध असतात. विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्यासाठी त्या त्या पदवी वा पदव्युत्तर स्तरासाठी आवश्यक असलेली प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे विद्यार्थ्यांसाठी गरजेचे आहे.

सुविधा

येल विद्यापीठातील शिक्षण जरी अतिशय महाग असले तरी विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्क, शैक्षणिक कर्ज, निवास व भोजन आदी सुविधा पात्रतेच्या निकषांनुसार दिलेल्या आहेत. प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून शिष्यवृत्ती दिली जाते. तसेच, विद्यार्थ्यांच्या आवश्यकतेनुसार विद्यापीठाच्या आवारात विवाहित व अविवाहित विद्यार्थ्यांना निवासाची सुविधा दिली जाते. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर यासाठी असलेली अर्जप्रक्रिया व इतर बाबींबद्दल माहिती देण्यात आलेली आहे.

येल एक महत्त्वाची आयव्ही लीग संस्था असल्याने पदवीच्या चार वर्षांच्या कालावधीदरम्यान सर्व पदवीधर विद्यार्थ्यांना त्यांच्या निवासाच्या सोयीची हमी विद्यापीठाकडून दिली जाते. विद्यापीठाशी संलग्न काही निवासी महाविद्यालये असून ती विद्यार्थ्यांना शैक्षणिक वातावरणाबरोबरच उत्कृष्ट सामाजिक व सांस्कृतिक वातावरण प्रदान करतात.

वैशिष्टय़

येलच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये अनेक दिग्गजांचा समावेश आहे. यामध्ये, अमेरिकेच्या बिल क्लिंटन, जॉर्ज बुश (सिनिअर व ज्युनिअर दोघेही ) विल्यम हॉवर्ड टफ्ट, गेराल्ड फोर्ड या पाच माजी राष्ट्राध्यक्षांचा समावेश आहे. याशिवाय, हिलरी क्लिंटन, मॉर्गन स्टॅनले,

बोइंगचे संस्थापक विल्यम बोइंग, नोबेल विजेते पॉल क्रुगमन यांसारखे नामवंत या विद्यापीठामध्ये कधीकाळी शिक्षण घेत होते. ऑक्टोबर २०१८ पर्यंतच्या सांख्यिकीनुसार, आतापर्यंतचे एकूण ६१ नोबेल पारितोषिक विजेते, पाच फिल्ड मेडॅलिस्ट्स, अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाचे १९ सरन्यायाधीश आणि तीन टय़ुिरग पुरस्कार विजेते या विद्यापीठाचे विद्यार्थी वा प्राध्यापक होते/आहेत.

संकेतस्थळ

https://www.yale.edu/

विद्यापीठ विश्व : संशोधनातील शैक्षणिक गुंतवणूक

national-university-of-singapore

1111   16-Mar-2019, Sat

नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर

विद्यापीठाची ओळख

नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर हे २०१९ सालच्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगनुसार जगातले अकराव्या क्रमांकाचे, तर आशिया खंडातील प्रथम क्रमांकाचे विद्यापीठ आहे.

सिंगापूरमधील इतर दोन प्रमुख विद्यापीठ – नानयांग विद्यापीठ आणि सिंगापूर विद्यापीठ यांना एकत्र करून ‘नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर’ची स्थापना १९८० साली करण्यात आली. एनएसयू या नावाने ओळखले जाणारे हे विद्यापीठ सिंगापूरमधील स्वायत्त संशोधन विद्यापीठ असून आशिया खंडातील एक प्रमुख संशोधन विद्यापीठ आहे.

विद्यापीठात विज्ञान, औषध आणि दंतचिकित्सा, आरेखन आणि पर्यावरण, कायदा, कला आणि सामाजिक विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवसाय, संगणक आणि संगीत या विषयांतील पदवी आणि पदव्युत्तर पदवी स्तरावरील विविध अभ्यासक्रमांचे अध्ययन-संशोधन केले जाते. १९०५ मध्ये किंग एडवर्ड (सातवे) यांनी कॉलेज ऑफ मेडिसीन म्हणून ज्या वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना केली होती त्याला एनयूएसमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे, म्हणूनच वैद्यकीय अभ्यासक्रम विचारात घेतल्यास एनएसयू ही सिंगापूरमधील सर्वात जुनी उच्च शिक्षण संस्था आहे.

सिंगापूरच्या दक्षिण-पश्चिमेला असलेल्या केंट रिज परिसराजवळ एनयूएस विद्यापीठाचा मुख्य कॅम्पस आहे. तसेच शहरात इतर ठिकाणी विद्यापीठाचे प्रमुख शैक्षणिक-संशोधन विभाग, महाविद्यालये आणि शैक्षणिक रुग्णालये इत्यादी गोष्टी पसरलेल्या आहेत.

सध्या एनएसयूमध्ये अडीच हजारपेक्षाही अधिक तज्ज्ञ प्राध्यापक-संशोधक आपले अध्यापन-संशोधनाचे कार्य करत आहेत, तर शंभर देशांतील जवळपास छत्तीस हजार पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण व संशोधन पूर्ण करत आहेत. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम सतरा शैक्षणिक-संशोधन विभागांद्वारे चालतात.

अभ्यासक्रम

एनएसयू विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रम हे पूर्णवेळ अभ्यासक्रम आहेत. हे अभ्यासक्रम तीन ते चार वर्षांचे असून पदव्युत्तर अभ्यासक्रम वेगवेगळ्या कालावधीचे आहेत.

पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी कला, विज्ञान, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शाखेतील बहुतांश विषयांवर आपले लक्ष केंद्रित करतात. विद्यापीठ सर्व अभ्यासक्रम चालवण्यासाठी सेमिस्टर पद्धतीचे पालन करते. ब्रिटिश आणि अमेरिकन शैक्षणिक वातावरणाचा एक सुरेख मेळ विद्यापीठाच्या एकंदरीत शैक्षणिक वातावरणात पाहायला मिळतो. एनएसयूच्या तीन कॅम्पसमध्ये एकूण सतरा शैक्षणिक विभाग म्हणजे स्कूल्स आहेत.

विद्यापीठातील कला आणि समाजशास्त्रे, व्यवसाय, संगणक, दंतवैद्यक, अभियांत्रिकी, कायदा अभ्यासक्रम, संगीत, सामाजिक आरोग्य, सामाजिक धोरणे, शास्त्रे, वैद्यकशास्त्र, डिझाइन अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंट, इंटिग्रेटिव्ह सायन्सेस अ‍ॅण्ड इंजिनीअिरग, युनिव्हर्सिटी स्कॉलर्स प्रोग्राम, येल-एनयूएस कॉलेज या सतरा प्रमुख विभागांमार्फत विद्यापीठातील सर्व पदवी व पदव्युत्तर विभाग चालतात. या सर्व विभागांमधून विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडी वा संशोधन पातळीवरील शेकडो अभ्यासक्रमांचे सर्टििफकेट, ऑनलाइन व ऑफलाइन पर्याय विद्यापीठाने उपलब्ध करून दिले आहेत.

विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्यासाठी त्या-त्या पदवी वा पदव्युत्तर स्तरासाठी आवश्यक असलेली प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे विद्यार्थ्यांसाठी गरजेचे आहे.

सुविधा

एनएसयू विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्येच वसतिगृहांची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. याशिवाय वसतिगृह आणि हॉल्स ऑफ रेसिडेन्सेस यांदरम्यान विद्यार्थ्यांसाठी सहा हजारांहूनही अधिक निवासस्थानांची सुविधा उपलब्ध केलेली आहे. तसेच शहराच्या इतर भागांतून विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत बसची सोयही करण्यात आलेली आहे.

विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व पाठय़वृत्तीच्या माध्यमातून आर्थिक साहाय्य उपलब्ध करून दिले जाते. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर यासाठी असलेली अर्जप्रक्रिया व इतर बाबींबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. विद्यापीठाचे ग्रंथालय व सर्व प्रयोगशाळा अद्ययावत आहेत. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना हेल्थ इन्शुरन्स व इतर वैद्यकीय सुविधा विद्यापीठाकडून दिल्या जातात.

वैशिष्टय़

सिंगापूरचे आजवरचे चार पंतप्रधान व दोन राष्ट्रपती हे एनएसयू विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक उद्योजक आणि शास्त्रज्ञ निर्माण केले आहेत.

संशोधनासाठी हे विद्यापीठ जागतिक पातळीवर नावाजले गेले आहे. विद्यापीठाकडून संशोधन क्षेत्रावर प्रचंड गुंतवणूक केली जाते. एनयूएसमधील प्रमुख संशोधन हे जैववैद्यकीय, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, अभियांत्रिकी, नॅनोसायन्स, नॅनो टेक्नॉलॉजी, इन्फोकम्युनिकेशन, इन्फोटेक्नॉलॉजी आणि संरक्षण या क्षेत्रांतील संशोधन आहे.

संकेतस्थळ  http://nus.edu.sg/

विद्येची श्रीमंती हार्वर्ड विद्यापीठ, अमेरिका

hrd-for-mpsc mains-exam 2019-harvard-university

7990   20-Jan-2019, Sun

विद्यापीठाची ओळख

अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स राज्यातील केम्ब्रिज या शहरात वसलेले हार्वर्ड विद्यापीठ हे क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सटिी रँकिंगनुसार जगातले तिसऱ्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे. संस्थापक जॉन हार्वर्ड यांच्या स्मरणार्थ विद्यापीठाला त्यांचे नाव देण्यात आले. या विद्यापीठाची स्थापना १६३६ साली झाली असून अमेरिकेतील ते सर्वात जुने शैक्षणिक केंद्र आहे. शिवाय स्थापनेपासूनचा विद्यापीठाचा इतिहास, समाजातील विविध घटकांवर असलेला त्याचा प्रभाव आणि संपत्ती या गोष्टींमुळे हार्वर्ड हे जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि श्रीमंत विद्यापीठांपकी एक आहे. ‘व्हेरिटास’ म्हणजे सत्य हे हार्वर्ड विद्यापीठाचे ब्रीदवाक्य आहे.

हार्वर्ड विद्यापीठ एकूण २०९ एकरच्या कॅम्पसमध्ये पसरलेले आहे. यामध्ये विद्यापीठाच्या प्रमुख दहा कार्यालयीन वास्तू, रेडक्लिफ इन्स्टिटय़ूट फॉर अ‍ॅडव्हान्स्ड स्टडी, दोन नाटय़गृहे आणि पाच संग्रहालये इत्यादी वास्तूंचा समावेश आहे. याशिवाय या परिसरात विद्यापीठाचे भलेथोरले ग्रंथालय आहे. वीस दशलक्ष पुस्तके, १,८०,००० सिरियल टायटल्स, अंदाजे ४०० दशलक्ष हस्तलिखिते आणि दहा दशलक्ष फोटो इत्यादी स्रोतांनी सुसज्ज असलेले हे जगातील सर्वात मोठे शैक्षणिक वाचनालय आहे. ग्रंथालयातील या अपर सामुग्रीची देखभाल घेण्यासाठी एकूण आठशे कर्मचाऱ्यांचा समूह स्वतंत्र सत्तर ग्रंथालयांतून कार्यरत आहे.

विद्यापीठाच्या या कॅम्पसमध्ये बारा प्रमुख शैक्षणिक-संशोधन विभाग आणि रेडक्लिफ इन्स्टिटय़ूट फॉर अ‍ॅडव्हान्स्ड स्टडीसारखे प्रगत शैक्षणिक केंद्र व त्यासारखेच इतर अजून दोन विभाग असे एकूण पंधरा महत्त्वाचे विभाग वा स्कूल्स आहेत. आज हार्वर्डमध्ये सुमारे साडेचार हजारपेक्षाही अधिक प्राध्यापक-संशोधक आपले अध्यापन-संशोधनाचे कार्य करत असून जवळपास सात हजार पदवीधर तर पंधरा हजारांहून अधिक पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण पूर्ण करत आहेत. जागतिक बुद्धिमत्तेची स्पर्धा करू शकणारे कुशाग्र मेंदूच फक्त हार्वर्डमध्ये प्रवेश मिळवू शकतात, हे गेली कित्येक वर्षे एखाद्या सूत्राप्रमाणे सिद्ध होत आले आहे.

सुविधा

हार्वर्ड विद्यापीठातील शिक्षण जरी अतिशय महाग असले तरी विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्क, शैक्षणिक कर्ज, निवास व भोजन आदी सुविधा पात्रतेच्या निकषांनुसार दिलेल्या आहेत. विद्यापीठाच्या सांख्यिकीनुसार प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांपकी जवळपास साठ टक्के विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून शिष्यवृत्ती दिली जाते, तर जवळपास वीस टक्के विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक शुल्क भरण्याची गरजच पडत नाही इतके आíथक साहाय्य विद्यापीठाकडून उपलब्ध करून दिले जाते. तसेच, विद्यार्थ्यांच्या आवश्यकतेनुसार विद्यापीठाच्या आवारात विवाहित व अविवाहित विद्यार्थ्यांना निवासाची सुविधा बहाल करण्यात येते. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर यासाठी असलेली अर्जप्रक्रिया व इतर बाबींबद्दल माहिती देण्यात आलेली आहे.

वैशिष्टय़े

हार्वर्डच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये आठ अमेरिकी अध्यक्षांचा समावेश आहे. जगभरातल्या तीसहून अनेक देशांचे प्रमुख हे या विद्यापीठाचे एकेकाळी विद्यार्थी राहिलेले आहेत. फेसबुक व मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्यांचे संस्थापक या विद्यापीठातील काही काळाकरिता विद्यार्थी होते. ऑक्टोबर २०१८ पर्यंतच्या सांख्यिकीनुसार, आतापर्यंतचे एकूण १५८ नोबेल पारितोषिक विजेते आणि चौदा टय़ुिरग पुरस्कार विजेते या विद्यापीठाचे विद्यार्थी वा प्राध्यापक होते/आहेत. याशिवाय २४२ मार्शल स्कॉलर्स, ३५९ रोड्स स्कॉलर्स, ४८ पुलित्झर पुरस्कार विजेते आणि सध्या हयात असलेले ६२ अरबपती हार्वर्डशी संलग्न आहेत.

संकेतस्थळ : https://www.harvard.edu/

अभ्यासक्रम

हार्वर्ड विद्यापीठातील पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचे असून पदव्युत्तर अभ्यासक्रम वेगवेगळ्या कालावधींचे आहेत. पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी विज्ञान व कला शाखेतील बहुतांश विषयांवर आपले लक्ष केंद्रित करतात. विद्यापीठातील हार्वर्ड बिझिनेस स्कूल, हार्वर्ड कॉलेज, हार्वर्ड डिव्हिजन ऑफ कंटिन्युइंग एज्युकेशन, हार्वर्ड स्कूल ऑफ डेंटल मेडिसिन, हार्वर्ड डिव्हिनिटी स्कूल, हार्वर्ड फॅकल्टी ऑफ आर्ट्स अ‍ॅण्ड सायन्सेस, हार्वर्ड स्कूल ऑफ डिझाइन, हार्वर्ड स्कूल ऑफ एज्युकेशन, लॉ स्कूल, केनेडी स्कूल, स्कूल ऑफ मेडिसिन, स्कूल ऑफ इंजिनीअिरग, रेडक्लिफ इन्स्टिटय़ूट या आणि इतर अशा मिळून एकूण पंधरा स्कूल्सच्या अंतर्गत सर्व पदवी, पदव्युत्तर व संशोधन विभाग चालतात. हार्वर्डमधील या स्कूल्सच्या माध्यमातून, विद्यापीठ ४६ मेजर्स म्हणजेच पदवी अभ्यासक्रम, १३४ पदव्युत्तर अभ्यासक्रम, ३२ व्यावसायिक अभ्यासक्रम चालवते. या सर्व विभागांमधून विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडी वा संशोधन पातळीवरील शेकडो अभ्यासक्रमांचे सर्टिफिकेट, ऑनलाइन व ऑफलाइन पर्याय विद्यापीठाने उपलब्ध करून दिले आहेत. विद्यापीठामार्फत चालणाऱ्या या सर्व अभ्यासक्रमांना ‘न्यू इंग्लंड असोसिएशन ऑफ स्कूल्स अँड कॉलेजेस’ या संस्थेची १९२९पासून मान्यता मिळालेली आहे. विद्यापीठातील ऑफलाइन अभ्यासक्रम हे फॉल आणि स्प्रिंग या दोन सत्रांमध्ये चालतात तर ऑनलाइन अभ्यासक्रम वर्षभर उपलब्ध असतात. विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्यासाठी त्या त्या पदवी वा पदव्युत्तर स्तरासाठी आवश्यक असलेली प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे विद्यार्थ्यांसाठी गरजेचे आहे. विद्यापीठामध्ये बायोइंजिनीअिरग, कॉम्प्युटर सायन्स, इकॉनॉमिक्स, हिस्टरी, लिग्विस्टिक्स, फिलोसॉफी, पॉलिटिकल सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथेमॅटिक्स, म्युझिक, इंग्लिश, सायकोलॉजी इत्यादी विषयांपासून ते युरोपियन सायन्स, गव्हर्नमेंट, अर्थ, अ‍ॅटमॉस्फिअरिक अ‍ॅण्ड प्लॅनेटरी सायन्स, जेनेटिक्स, सर्जरी, बायोइंजिनीअिरग, न्युरोलॉजी, न्युरोबायोलॉजी इत्यादी हजारो विषय उपलब्ध आहेत.

मुक्त शिक्षणाचा राजमार्ग इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ

indira-gandhi-national-open-university

3225   25-Dec-2018, Tue

संस्थेची ओळख –

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ‘इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठा’ची स्थापना २० सप्टेंबर, १९८५ रोजी झाली. सर्व गरजूंपर्यंत उच्चशिक्षण पोहोचवीत कुशल मनुष्यबळ विकसित करणे हा या विद्यापीठाच्या स्थापनेमागचा मुख्य उद्देश होय. उच्चशिक्षण घेण्यासाठी पूर्णवेळ नियमित कॉलेजला जाऊन शिकणे शक्य नाही, मात्र शिकण्याची इच्छा आहे अशा सर्वासाठी या विद्यापीठाने राष्ट्रीय पातळीवरचा उत्तम पर्याय खुला केला.

केवळ राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध राष्ट्रांमधून विद्यापीठाचे अभ्यासक्रम शिकण्यासाठी निर्माण केलेल्या सुविधा, विद्यार्थीकेंद्री प्रवेश प्रक्रिया, इतर विद्यापीठांमधील अभ्यासक्रमांच्या तुलनेत परवडणारे अभ्यासक्रम आणि अभ्यासक्रमांमधील वैविध्य या वैशिष्टय़ांमुळे या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा ओढा दिसून येतो.

आज ४० लाखांहून अधिक विद्यार्थिसंख्या असलेले हे विद्यापीठ जगातील सर्वात मोठे मुक्त विद्यापीठ म्हणूनही ओळखले जाते. देशभरात उच्चशिक्षण घेणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपकी २० टक्के विद्यार्थी हे या विद्यापीठाचे असतात, यावरूनच या विद्यापीठाची आवश्यकता व गुणवत्ता स्पष्ट होते.

सुविधा – या विद्यापीठाने दूरशिक्षणाच्या सोयी-सुविधा राज्यभरात पोहोचविण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला आहे. त्या आधारे विद्यापीठाने आपल्या अभ्यास केंद्रांमधून आभासी वर्गाचे जाळे उभारले आहे.

विद्यापीठाचे कामकाज पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण व ईशान्य या पाच उपकेंद्रातून चालवले जाते. १९९० मध्ये विद्यापीठाचे दृक्श्राव्य अभ्यासक्रम पहिल्यांदा रेडिओ व दूरचित्रवाणीच्या माध्यमातून प्रसारित केले गेले. त्यानंतर १९९२ मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाने मुक्त विद्यापीठाच्या पदव्यांना इतर विद्यापीठांच्या पदव्यांसारखा दर्जा दिला. १९९९ मध्ये विद्यापीठाने कॉम्प्युटर अ‍ॅण्ड इनफॉम्रेशन सायन्सेसचा अभ्यासक्रम सुरू करून ‘आभासी संकुला’ची सुरुवात केली.

देशाच्या कानकोपऱ्यातील गरजू विद्यार्थी या शिक्षण पद्धतीचा लाभ घेत आहेतच त्याशिवाय इंग्लंड, कतार, कुवेत, ओमन, सौदी अरेबिया, मॉरिशस, मालदीव, इथिओपिया, म्यानमार, केनिया, व्हिएतनाम, सिंगापूर, इंडोनेशिया, मलेशिया, चीन, नेपाळ, श्रीलंका, अफगाणिस्तान, फ्रान्स, मादागास्कर, लिबिया, स्वित्र्झलड, मंगोलिया, झांबिया आदी देशांतील विद्यार्थ्यांनीसुद्धा या मुक्त विद्यापीठातून उच्चशिक्षण पूर्ण करण्यास प्राधान्य दिले.

मुक्त विद्यापीठातून संशोधनाला चालना देण्यासाठी ६ ऑक्टोबर, २००८ रोजी संशोधन केंद्राचीही सुरुवात करण्यात आली. ज्ञान दर्शन या शिक्षणाला वाहिलेल्या दूरचित्रवाणी वाहिनीची सूत्रेही या विद्यापीठाच्या माध्यमातूनच हलतात. अशा सर्व सोयींच्या मदतीने विद्यार्थ्यांना ते असलेल्या ठिकाणापर्यंत पोहोचून शैक्षणिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देणारे विद्यापीठ म्हणूनही या विद्यापीठाचा लौकिक निर्माण झाला आहे.

अभ्यासक्रम –

विद्यापीठाने सुरुवातीपासूनच आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनाला चालना देण्याचा प्रयत्न केला आहे. त्या अनुषंगानेच विद्यापीठाने वेगवेगळ्या विषयांना वाहिलेल्या २१ स्कूल्सच्या माध्यमातून वेगवेगळे पदवी, पदविका, प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केले आहेत.

या स्कूल्समध्ये स्कूल ऑफ ह्य़ुमॅनिटीज, स्कूल ऑफ सोशल सायन्सेस, स्कूल ऑफ सायन्सेस, स्कूल ऑफ एज्युकेशन, स्कूल ऑफ कन्टिन्युइंग एज्युकेशन, स्कूल ऑफ इंजिनीअिरग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, स्कूल ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, स्कूल ऑफ हेल्थ सायन्सेस, स्कूल ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅण्ड इन्फॉम्रेशन सायन्सेस, स्कूल ऑफ अ‍ॅग्रीकल्चर, स्कूल ऑफ लॉ, स्कूल ऑफ जर्नालिझम अ‍ॅण्ड न्यू मीडिया स्टडीज, स्कूल ऑफ जेंडर अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट स्टडीज, स्कूल ऑफ टूरिझम हॉस्पिटॅलिटी सव्‍‌र्हिस मॅनेजमेंट, स्कूल ऑफ इंटरडिसिप्लिनरी अ‍ॅण्ड ट्रान्स डिसिप्लिनरी स्टडीज, स्कूल ऑफ सोशल वर्क, स्कूल ऑफ व्होकेशनल एज्युकेशन अ‍ॅण्ड ट्रेनिंग, स्कूल ऑफ एक्स्टेंशन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट स्टडीज, स्कूल ऑफ फॉरेन लँग्वेजेस, स्कूल ऑफ ट्रान्सलेशन स्टडीज अ‍ॅण्ड ट्रेनिंग, स्कूल ऑफ परफॉर्मिग अ‍ॅण्ड व्हिज्युअल आर्ट्स आदींचा समावेश आहे. अशा सर्वच ठिकाणी नव्या अभ्यासक्रमांची सुरुवात करण्यापूर्वी संबंधित अभ्यासक्रमांविषयीची नेमकी गरज जाणून घेण्यासाठी विद्यापीठामार्फत सर्वेक्षण केले जाते.

सर्वेक्षणातून समोर आलेल्या मुद्दय़ांचा विचार करून, अभ्यासक्रमांमध्येही योग्य ते बदल केले जातात. विद्यापीठातर्फे उभारण्यात आलेल्या ६७ प्रादेशिक केंद्रे, २९९७ अभ्यासकेंद्रे व २९ परदेशस्थ केंद्रे यांच्या माध्यमातून विद्यापीठाचे अभ्यासक्रम चालवले जातात.

पदवी, पदविका व प्रमाणपत्र या प्रकारांमधील विविध असे २२६ अभ्यासक्रम हे विद्यापीठ चालविते. केवळ एवढय़ापुरतेच मर्यादित न राहता या विद्यापीठाने संशोधनासाठीच्या सुविधाही आपल्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याअंतर्गत विद्यापीठामध्ये एम.फिल. आणि पीएच.डी. संशोधनासाठीचे अभ्यासक्रमही विद्यापीठाने सुरू केले आहेत. विद्यापीठाच्या अशा एक ना अनेक वैशिष्टय़ांची आणि अभ्यासक्रमांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत सातत्याने आणि अगदी अद्ययावत स्वरूपामध्ये पोहोचविण्यासाठी विद्यापीठाचे संकेतस्थळ महत्त्वाची भूमिका बजावत आहे. www.ignou.ac.in या संकेतस्थळावर विद्यापीठाविषयीची अधिक आणि सविस्तर माहिती विद्यापीठाने उपलब्ध करून दिली आहे.

समाजाशी जोडणारे शिक्षण केंद्र पाँडिचेरी विद्यापीठ

pondicherry-university

7398   23-Dec-2018, Sun

संस्थेची ओळख – 

केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा असणाऱ्या पाँडिचेरी विद्यापीठाची स्थापना १९८५ साली झाली. विद्यापीठाच्या स्थापनेवेळी स्थानिक शासनाने समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागामध्ये उपलब्ध करून दिलेल्या जवळपास आठशे एकरांच्या परिसरामध्ये आता या विद्यापीठाचा विस्तार झाला आहे. या विस्तीर्ण शैक्षणिक संकुलामधून विद्यापीठाचे मुख्य शैक्षणिक आणि प्रशासकीय कामकाज चालते. यंदाच्या ‘एनआयआरएफ’च्या मानांकनामध्ये या विद्यापीठाने पंजाबमधील गुरुनानक देव विद्यापीठाच्या बरोबरीने देशात ५९वा क्रमांक पटकावला आहे.

पुद्दुचेरीमधील मुख्य संकुलाच्या जोडीने विद्यापीठाने कराइकल आणि पोर्ट ब्लेअर या ठिकाणी आपली पदव्युत्तर शैक्षणिक केंद्रे सुरू केलेली आहेत. एकाच वेळी सहा हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतील अशा सुविधा या विद्यापीठाने उभारल्या आहेत. पेटंट फॅसिलिटेशन सेल, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राइट सेल, कम्युनिटी कॉलेज, कम्युनिटी रेडिओ सेंटर अशा सुविधांच्या आधाराने हे विद्यापीठ समाजाच्या विविध स्तरांमधील नागरिकांच्या गरजा पूर्ण करत आहे. त्याचबरोबर त्यांना आपल्याशी जोडून घेण्यासाठी व्यापक प्रयत्नही करत आहे. स्वत:चे असे कम्युनिटी कॉलेज सुरू करणारे देशातील पहिले विद्यापीठ म्हणूनही हे विद्यापीठ विचारात घेतले जाते.

विभाग आणि अभ्यासक्रम

पाँडिचेरी विद्यापीठामध्ये शैक्षणिक विभाग हे वेगवेगळ्या १५ स्कूल्सच्या माध्यमातून विभागलेले आहेत. या स्कूल्सच्या अंतर्गत एकूण ५१ पदव्युत्तर विभाग चालतात. या सर्व विभागांमधून विद्यार्थ्यांना पदव्युत्तर आणि संशोधन पातळीवरील दीडशेहून अधिक अभ्यासक्रमांचे पर्याय विद्यापीठाने उपलब्ध करून दिले आहेत. याशिवाय विद्यापीठाने सायंकाळच्या सत्रात चालणारे १५ अ‍ॅड-ऑन अभ्यासक्रमही सुरू केले आहेत.

विद्यापीठामार्फत चालणाऱ्या या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे करण्यात आले आहे. त्यासाठी विद्यापीठातर्फे देशभरातील विविध शहरांमध्ये प्रवेश परीक्षेचे आयोजनही केले जाते. विद्यापीठामध्ये स्कूल ऑफ लॉ, सुब्रमनिया भारती स्कूल ऑफ तमिळ लँग्वेज अँड लिटरेचर, स्कूल ऑफ एज्युकेशन, स्कूल ऑफ मॅनेजमेंट, रामानुजन स्कूल ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेस, स्कूल ऑफ इंजिनीअिरग अँड टेक्नॉलॉजी, स्कूल ऑफ फिजिकल, केमिकल अँड अ‍ॅप्लाइड सायन्सेस, स्कूल ऑफ लाइफ सायन्सेस, स्कूल ऑफ ह्युमॅनिटीज, स्कूल ऑफ परफॉìमग आर्ट्स, स्कूल ऑफ सोशल सायन्सेस अँड इंटरनॅशनल स्टडीज, स्कूल ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशन, मदनजीत स्कूल ऑफ ग्रीन एनर्जी टेक्नॉलॉजीज, स्कूल ऑफ मेडिकल सायन्सेस या स्कूल्स आहेत.

विद्यापीठाच्या फ्रेंच विभागामध्ये एम. ए. फ्रेंच हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. माध्यमांच्या क्षेत्रात आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने एम. ए. मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमाच्या जोडीने एम.एस.सी. इलेक्ट्रॉनिक मीडिया हा अभ्यासक्रमही उपलब्ध करून दिला आहे. याशिवाय विद्यापीठामध्ये एम. एस्सी. क्वांटिटेटिव्ह फायनान्स, एम. टेक. कॉम्प्युटेशनल बायोलॉजी, एम. टेक. एक्स्प्लोरेशन जिओसायन्स हे तुलनेने वेगळे अभ्यासक्रही चालविले जातात.

विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी पाच वर्षे कालावधीचे एकत्रित असे इंटिग्रेटेड एम. ए. आणि एम. एस्सी अभ्यासक्रमही सुरू केले आहेत. त्यामध्ये अप्लाइड जिओलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स, मॅथेमेटिक्स, कॉम्प्युटर सायन्स आणि स्टॅटेस्टिक्स या विषयांमधील पाच वर्षे कालावधीचे इंटिग्रेटेड एम. एस्सी. अभ्यासक्रम, तर हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्सेस, सोशिओलॉजी विषयातील एम. ए. अभ्यासक्रमांचा समावेश आहे. विद्यापीठाच्या कराइकल येथील केंद्रात तीन पदव्युत्तर अभ्यासक्रम, तर पोर्ट ब्लेअर येथील केंद्रात दोन पदव्युत्तर अभ्यासक्रम व दोन पीएच. डी. अभ्यासक्रम चालवले जातात. त्यामध्ये एम. एस्सी. डिझास्टर मॅनेजमेंट, एम. एस्सी. मरीन बायोलॉजी या नेहमीच्या अभ्यासक्रमांच्या तुलनेमध्ये वेगळ्या असणाऱ्या अभ्यासक्रमांचाही समावेश आहे.

सुविधा

सध्या विद्यापीठाच्या संकुलात २२ वसतिगृहे असून यातील १३ वसतिगृहे मुलांसाठी, ८ मुलींसाठी तर एक परदेशी विद्यार्थ्यांसाठी आहे. या सर्व वसतिगृहांत मिळून सुमारे दीड हजार विद्यार्थी निवासी सुविधेचा लाभ घेत आहेत. विद्यापीठाने विशेष विद्यार्थासाठीही निवास व भोजन सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत. पोर्ट ब्लेअर व कराइकल येथील संकुलात मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहे आहेत. विद्यापीठाचे ‘आनंदा रंगापिल्लाई ग्रंथालय’ हे एक अत्याधुनिक ग्रंथालय ठरते. अपंग विद्यार्थ्यांच्या सोयीचाही या ग्रंथालयाच्या निर्मितीदरम्यान विचार करण्यात आला आहे.

हे ग्रंथालय म्हणजे पूर्णपणे वातानुकूलित, वाय-फाय सुविधा असलेले, दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी ‘आरएफआयडी’ तंत्रज्ञान असेलली सुविधा उपलब्ध करून देणारी अशी वास्तू आहे. विशेष म्हणजे ग्रंथालयातील जवळपास ५ लाख पुस्तके कायम रिमोट अ‍ॅक्सेसवरदेखील उपलब्ध आहेत. परदेशी विद्यार्थाच्या गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने विद्यापीठाने २००० सालापासून ‘स्टडी इंडिया प्रोग्रॅम’ सुरू केला आहे. या माध्यमातून विद्यार्थी सेमिस्टर किंवा शॉर्ट टर्म अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ शकतात. ‘स्पेशल कोर्स’मधून स्पोकन तमिळ, क्लासिकल इंडियन फिलॉसॉफी, हिंदूझम अँड इट्स प्रॅक्टिसेस, प्रॅक्टिकल क्लासिकल योगा ट्रेनिंग, आयडिया ऑफ इंडियन फिलॉसॉफी अशा विषयांमध्ये ३ क्रेडिटचे कोर्स करता येणे शक्य झाले आहे.

जागतिक स्तरावरील भूक आणि पोषणाची स्थिती

article-about-global-hunger-and-nutrition-status

5877   17-Dec-2018, Mon

संयुक्त राष्ट्रांचे पोषणावरील कृतीसाठीचे जागतिक दशक सन २०१६ ते २०२५ या कालावधीसाठी घोषित करण्यात आले आहे. शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये भूक व पोषणाबाबतची एकूण ८ उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत. या माध्यमातून कुपोषणाशी लढा देण्यास सर्व स्तरांवर उत्तेजन मिळत आहे. पण जगातील कुपोषणाची स्थिती आणि त्याबाबतची प्रगती ही अजिबातच समाधानकारक नाही, तसेच त्यासाठीचे प्रयत्न थिटे पडत असल्याचे जागतिक पोषण अहवाल २०१८ह्ण मध्ये स्पष्टपणे नोंदविण्यात आले आहे. भूक आणि पोषण या बाबी मानवी हक्क, मानवी संसाधनांचा विकास, आíथक प्रगती अशा व्यापक स्तरावरील मुद्दे आहेत. याबाबत जागतिक पोषण अहवाल आणि जागतिक भूक निर्देशांक २०१८ यांचा आढावा या लेखामध्ये घेण्यात येत आहे.

जागतिक पोषण अहवाल २०१८

आंतरराष्ट्रीय अन्न धोरण संशोधन संस्था, जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ आणि जागतिक बँक गट यांच्या एकत्रित माहितीबरोबर त्या त्या देशांमधील संबंधित संस्थांनी एकत्र केलेल्या माहितीच्या आधारावर हा अहवाल तयार करण्यात येतो.

 1. पाच वर्षांखालील मुलांच्या खुरटय़ा वाढीचे (Stunting) प्रमाण सन २००० मधील ३२.६ टक्क्यांवरून कमी होऊन सन २०१७मध्ये २२.२ टक्केपर्यंत कमी झाले आहे. मात्र हे प्रमाण प्रदेशानुरूप कमी-जास्त होत असल्याचे माहितीच्या विश्लेषणातून लक्षात येते. एकाच देशातील वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मुलांची वाढ खुंटण्याचे प्रमाण वेगवेगळे आहे.
 2. जगातील कुपोषित (वाढ खुंटलेल्या-Stunted) म्हणजेच वयाच्या मानाने कमी वजन असलेल्या बालकांपकी एकतृतीयांश बालके भारतात आहेत व कुपोषित बालकांची सर्वाधिक संख्या (४६.६ दशलक्ष) भारतामध्ये आहे.
 3. उंचीच्या मानाने वजन कमी असलेल्या (Wasted) मुलांची संख्याही (२५.५ दशलक्ष) भारतामध्ये सर्वाधिक आहे. जगातील अशा मुलांमधील निम्मी मुले भारतामध्ये आहेत.
 4. पाच वर्षांखालील मुलांच्या खुरटय़ा वाढीचे (Stunting) प्रमाण ग्रामीण भागात ७ टक्के तर  शहरी भागात ३०.९ टक्के आहे. वेस्टिंगचे प्रमाण ग्रामीण भागात २१.१ टक्के तर शहरी भागात १९.९ टक्के इतके आहे.
 5. उष्मांक, मीठ, साखर आणि सॅच्युरेटेड फॅट्स यांच्या प्रमाणाचा विचार करता भारतामधील २० टक्के इतके अन्नच आरोग्यपूर्ण आहे.
 6. जागतिक स्तरावर कुपोषित आणि रक्तक्षयी महिलांचे प्रमाण कमी करण्याबाबतची प्रगती अत्यंत धिमी आहे तर त्याच वेळी वाजवीपेक्षा जास्त वजन असलेल्या प्रौढ व्यक्तींच्या प्रमाणात खूप वाढ होत आहे. त्यातही महिलांचे प्रमाण जास्त आहे.
 7. लहान वयातील खुरटलेली वाढ, प्रजननक्षम वयातील माहिलांमध्ये रक्तक्षय आणि वाजवीपेक्षा जास्त वजन या तिन्ही प्रकारच्या कुपोषणांमुळे एकमेकांच्या तीव्रतेत भर पडत आहे. जवळपास ८८ टक्के देशांमध्ये यातील किमान दोन प्रकारच्या कुपोषणाचा बळी ठरलेल्या व्यक्तींची संख्या जास्त आहे.
 8. जगभरामध्ये वाढलेल्या संघर्षमय, हिंसक आणि पर्यावरणीय बदलांच्या परिस्थितीमुळे सर्व प्रकारच्या कुपोषणांच्या तीव्रतेमध्ये वाढ होत आहे. दीर्घ व मध्यम कालावधीच्या संघर्षांमध्ये अडकलेल्या देशांना पाठविण्यात येणाऱ्या साहाय्यामध्ये तात्पुरत्या स्वरूपाचीच मदत व पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे कुपोषणाची समस्या तीव्रच राहते.

तातडीने करावयाच्या गरजेच्या उपाययोजना

 1. कुपोषणाच्या एका प्रकारामुळे दुसऱ्या प्रकाराची तीव्रता वाढत असल्याने कुपोषणावर मात करण्यासाठी आयोजित वेगवेगळे उपक्रम एकीकृत करण्याची आवश्यकता आहे.
 2. कुपोषणाचा बळी ठरलेल्यांची माहिती व त्यामागची कारणे विशद झाल्याशिवाय त्यावर मात करण्यासाठीचे उपक्रम यशस्वी ठरू शकत नाहीत. त्यामुळे कुपोषितांची माहिती मिळविणे आणि तिच्यावर प्रक्रिया करण्याची तसेच विश्लेषण करण्याची क्षमता निर्माण करणे आवश्यक आहे.
 3. आवश्यक प्रमाणात निधी उपलब्ध करून मिळणे.
 4. आरोग्यदायी आहार मिळावा यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न करणे.
 5. कुपोषणाबाबतची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी परिवर्तनशील पद्धतीने उपाययोजना करणे.

आनुषंगिक मुद्दे

जागतिक भूक निर्देशांक, २०१८

या वर्षीच्या निर्देशांकाचे शीर्षक आणि मुख्य संकल्पना होती – सक्तीचे स्थलांतर आणि भूक. सन २०१८च्या जागतिक भूक निर्देशांकामध्ये ३१.१अंकासहित भारताचे ११९ देशांत १०३वे स्थान आहे.

शाश्वत विकास उद्दिष्टांपैकी

झिरो हंगर उद्दिष्टे

 1. २०३० पर्यंत, सर्वाना संपूर्ण वर्षभर सुरक्षित, पौष्टिक आणि पुरेसे अन्न उपलब्ध करून देणे.
 2. २०३० पर्यंत, सर्व प्रकारच्या कुपोषणाचा अंत करणे, विशेषत: २०२५ पर्यंत, ५ वर्षांखालील मुलांमधील स्टंटिंग आणि वेस्टिंग प्रकारातील कुपोषण कमी करावयाची उद्दिष्टे साध्य करणे.
 3. २०३०पर्यंत, शेती क्षेत्राची उत्पादकता दुप्पट करणे.
 4. २०३०पर्यंत, शाश्वत अन्न उत्पादन प्रणाली आणि हवामान अनुकूल कृषी पद्धती विकसित करणे.
 5. २०२० पर्यंत, बियाणे, पिके, पाळीव पशू यांच्या आनुवंशिक विविधतेचे जतन साध्य करणे.
 6. विकासशील देशांमध्ये, विशेषत: कमी विकसित देशांमध्ये, ग्रामीण पायाभूत सुविधा, कृषी संशोधन व तंत्रज्ञानास चालना देणे. यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याने गुंतवणूक वाढविणे.
 7. कृषी निर्यात अनुदानांच्या सर्व प्रकारांना प्रतिबंधित करणे.
 8. अन्नधान्य बाजार (Food Commodity Markets) च्या योग्य कार्यप्रणाली सुनिश्चित करणे.

संशोधन संस्थायण : अंदाज हवामानाचा

indian-institute-of-tropical-meteorology-in-pune

1918   16-Dec-2018, Sun

भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थापुणे

पुणे येथे असलेली इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेटेरॉलॉजी (आयआयटीएम) म्हणजेच भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था ही संशोधन संस्था. भारतातील मान्सूनचे हवामान आणि उष्णकटिबंधीय महासागरातील समुद्राच्या हालचालींसंदर्भात संशोधन करणारी ही देशातील महत्त्वाची आणि एकमेव संशोधन संस्था आहे. या संशोधन संस्थेची स्थापना १९६२ साली झाली. सध्या आयआयटीएम ही एक स्वायत्त शासकीय संशोधन संस्था असून संस्थेच्या स्वायत्त दर्जामुळे ते एक मान्यताप्राप्त शैक्षणिक केंद्रदेखील आहे.

केंद्र सरकारच्या भूविज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करणारी ही संस्था मात्र सीएसआयआरशी (वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद) संलग्न नाही. मात्र संस्था भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या व हवामान विज्ञान विभागाअंतर्गत कार्यरत असलेली एक अग्रगण्य प्रयोगशाळा निश्चितच आहे.

संशोधन संस्थेविषयी

भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था म्हणजेच आयआयटीएम ही स्वायत्त संशोधन संस्था केंद्र सरकारचे भूविज्ञान मंत्रालय आणि हवामान विज्ञान विभाग या दोन्ही आस्थापनांच्या देखरेखीखाली आपले संशोधन करत आहे. १९६२ साली भारत सरकारच्या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत प्रस्तावित केल्यानुसार या संस्थेची स्थापना पुण्यामध्ये इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेटेरॉलॉजी (आयटीएम) म्हणून करण्यात आली. त्या वेळी संस्था पुणे येथील हवामान विज्ञान विभाग (आयएमडी) च्या अंतर्गत स्वतंत्रपणे कार्यरत होती.

संस्था त्या वेळेस देशभरातील हवामानाचे निरीक्षण करणे, हवामानाचा अंदाज बांधणे आणि भारतातील भूकंपांसंबंधी संशोधन करणे इत्यादी स्वरूपाची कामे करत असे. नंतर दि. १ एप्रिल १९७१ रोजी भारत सरकारच्या वैज्ञानिक संशोधन समितीची शिफारस ग्राह्य मानून या संस्थेचे नाव सुधारित करून ते आयआयटीएम म्हणजेच भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था असे करण्यात आले. त्याच वेळी संस्थेला स्वायत्त संस्थेचा दर्जा बहाल करण्यात आला.

स्थापनेपासून ते १९८४ पर्यंत आयआयटीएम केंद्र सरकारच्या पर्यटन आणि नागरी उड्डाण मंत्रालयाअंतर्गत संशोधन क्षेत्रात कार्यरत होती. नंतर १९८५ मध्ये संस्था केंद्र सरकारच्याच विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अधिपत्याखाली आपले संशोधन करू लागली. २००६ साली तत्कालीन राष्ट्रपतींच्या सूचनेनुसार आयआयटीएम आपले संशोधनकार्य भूविज्ञान मंत्रालयाअंतर्गत करत आहे.

संस्थेकडे चांगल्या पायाभूत सुविधांबरोबरच उत्कृष्ट संगणकीय सुविधाही उपलब्ध आहेत. भारतातील सर्वात मोठय़ा संगणकीय क्षमतेंपैकी एक, आदित्य एचपीसी, आयआयटीएममध्ये आहे. आयआयटीएममधील संशोधकांनी संस्थेमध्येच ‘प्रत्यूष’ या नावाचा एक महासंगणक तयार केलेला असून तो देशातील सर्वात वेगवान महासंगणकांपैकी एक आहे. ‘प्रत्यूष’चा उपयोग संस्था हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी तसेच मान्सूनसहित मासेमारी, हवेची गुणवत्ता, त्सुनामी, चक्रीवादळ, भूकंप, पूर आणि दुष्काळ इत्यादी गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी करते. जगभरात हवामान संशोधनासाठी हाय परफॉर्मन्स कॉम्प्युटिंग सुविधा वापरणारा जपान, अमेरिका व इंग्लंडनंतर भारत हा चौथा देश आहे.

संशोधनातील योगदान

आयआयटीएम या संशोधन संस्थेने हवामानशास्त्र या विषयातील मूलभूत व उपयोजित संशोधनाला पूर्णवेळ वाहून घेतलेले आहे. हवामानाचा अंदाज सुधारण्यासाठी आवश्यक असलेल्या सागरी वातावरणातील हवामान प्रणालीवरील मूलभूत संशोधनामध्ये आयआयटीएमला जगातील सर्वोत्कृष्ट संशोधन केंद्र बनवणे, या ध्येयाने संस्था आपले संशोधनकार्य करत आहे. म्हणूनच संस्था हवामानशास्त्राशी संबंधित वा आवश्यक असलेले इतर विषय जसे की भौतिकशास्त्र, समुद्रशास्त्र, रसायनशास्त्र आणि पर्यावरणशास्त्र इत्यादी विषयांमध्ये संस्था आंतरविद्याशाखीय संशोधन ((Interdisciplinary research) करत आहे.

हवामानशास्त्रातील रेन अ‍ॅण्ड क्लाउड मायक्रोफिजिक्स, क्लायमेट व्हेरिएबिलिटी अ‍ॅण्ड प्रेडिक्शन, एअर पोल्युशन स्टडीज, ओशन मॉडेिलग, अ‍ॅटमॉस्फेरिक इलेक्ट्रिसिटी, अ‍ॅटमॉस्फेरिक केमिस्ट्री अ‍ॅण्ड डायनॅमिक्स, लँड सरफेस प्रोसेस स्टडीज, एअरबोर्न मेजरमेंट इत्यादी विषय आयआयटीएमच्या संशोधनाचे प्रमुख विषय आहेत. संस्थेकडे या सर्व विषयांतील संशोधन आणि विकासाशी संबंधित विविध विषयांमध्ये मूलभूत संशोधन करण्यासाठी तज्ज्ञ आणि कुशल शास्त्रज्ञांचे पुरेसे पाठबळ उपलब्ध आहे.

विद्यार्थ्यांसाठी संधी

आयआयटीएम ही संशोधन संस्था आणि विद्यापीठाच्या दर्जाचे एक स्वायत्त शैक्षणिक केंद्रही आहे. त्यामुळे या संस्थेमध्येही विद्यार्थ्यांना पदव्युत्तर व पीएचडी संशोधन अभ्यासक्रम पूर्ण करता येतात. संस्थेचे अनेक पीएचडी पदवीधारक भारतात व परदेशातदेखील संशोधन, औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत आहेत. संस्था देश-विदेशातील विविध विद्यापीठांबरोबर पदव्युत्तर व पीएचडी अभ्यासक्रमासाठी संलग्न आहे. महाविद्यालय किंवा विद्यापीठामधील विद्यार्थी त्यांचे पदवी व पदव्युत्तर स्तरावरील संशोधन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी येथे येतात.


Top