महाराष्ट्रातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती

2488 02-Sep-2017, Sat
महाराष्ट्र शासनांतर्गत उच्च शिक्षण संचालनालय, पुणे तर्फे राज्यातील मुसलमान, ख्रिस्ती, शीख, बौद्ध, पारसी व जैन या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना २०१७-१८ या शैक्षणिक सत्रासाठी देण्यात येणाऱ्या केंद्र शासन पुरस्कृत मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
योजनेअंतर्गत समाविष्ट विषय
या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत समाविष्ट विषय व अभ्यासक्रमांमध्ये ११वी ते पीएचडी व व्यावसायिक अभ्यासक्रमांशिवाय डीएड, बीएड, एमएड शिवाय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, विविध पदविका अभ्यासक्रम व अकरावी/बारावी स्तरावरील विविध अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
आवश्यक पात्रता अर्जदार खालीलप्रमाणे पात्रताधारक असावेत.
अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. अर्जदार विद्यार्थ्यांने मागील वार्षिक परीक्षेचे किमान ५०% गुण मिळविलेले असावेत. अर्जदारांच्या पालकांचे वार्षिक एकत्रित उत्पन्न २ लाख रुपयांपर्यंत असावे. अर्जदार विद्यार्थी इतर कोणत्याही शिष्यवृत्ती वा पाठय़वृत्ती योजनेचा लाभार्थी नसावा.
शिष्यवृत्तींची संख्या व तपशील
योजनेअंतर्गत उपलब्ध असणाऱ्या नव्या शिष्यवृत्तींची एकूण संख्या ४८,३०२ असून त्यापैकी ३०% शिष्यवृत्ती विद्यार्थिनीसाठी राखीव आहेत.
विशेष सूचना – वरील शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत सध्या लाभार्थी असणाऱ्या पात्रताधारक विद्यार्थ्यांनी निर्धारित कालावधीत नूतनीकरणासाठी अर्ज करणे आवश्यक आहे.
राज्यातील अल्पसंख्याक समाजातील पात्रताधारक विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणानंतरच्या अभ्यासक्रमांसाठी उपलब्ध असणाऱ्या या विशेष शैक्षणिक शिष्यवृत्तींचा फायदा घ्यावा.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क
अल्पसंख्याक विद्यार्थी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली महाराष्ट्र शासन- उच्च शिक्षण संचालनालयाची जाहिरात पाहावी, दूरध्वनी क्र. ०२०- २६१२६९३९ वर संपर्क साधावा अथवा संचालनालयाच्या www.scholarships.gov.in किंवा www.dhepune.gov.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०१७ आहे.