आदिवासी क्षेत्रातील पोषण – कुपोषण

 Tribal Areas Nutrition - Malnutrition

11784   05-Sep-2018, Wed

मानवी हक्कांची अंमलबजावणी व मनुष्यबळ विकास या दोन्हीच्या दृष्टीने पोषण हा महत्त्वाचा मुद्दा आहे. विशेषत: महाराष्ट्रातील आदिवासी समूहांमध्ये कुपोषणाची त्यातही आदिवासी मुलांमध्ये तीव्र / अतितीव्र कुपोषणाची समस्या मोठय़ा प्रमाणात असल्याने त्याबाबत कल्याणकारी योजना / प्रकल्प राबविणे शासनासाठी आवश्यक ठरते. त्या अनुषंगाने राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात.

लोकसहभागातून राज्यातील आदिवासी समाजाच्या सक्षमीकरण आणि पोषणासाठी प्रक्रिया राबविण्यासाठी कम्युनिटी ऑक्शन फॉर न्युट्रिशन (CAN) हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.

प्रकल्पाची उद्दिष्टे

*      आदिवासी क्षेत्रातील कुपोषणाशी संबंधित बालमृत्यूचे प्रमाण १५ टक्क्यांपर्यंत कमी करणे.

*    आदिवासी क्षेत्रातील बालकांमधील तीव्र व मध्यम कुपोषणाचे प्रमाण २० टक्क्यांपर्यंत कमी करणे. तसेच या श्रेणीतील बालकांमधील सुधारणांचे प्रमाण २५ टक्क्यांपर्यंत वाढविणे.

*      सहा वर्षांखालील बालकांमधील वजनातील घसरणीचे प्रमाण २० टक्क्यांपर्यंत कमी करणे.

*      भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेबाबत जनजागृती करणे. या योजनेंतर्गत गर्भवती, स्तनदा माता व बालकांच्या नोंदणीचे प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत वाढविणे. तसेच त्यांच्या आहार घेण्याचे प्रमाण ८० टक्क्यांपर्यंत वाढविणे.

*      गावपातळीवर पोषणसेवेसंदर्भात लोकसहभाग वाढविणे व त्यासाठी अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती व आरोग्य सेविका यांचा समन्वय साधणे.

प्रकल्पाचे स्वरूप

*      प्रायोगिक / पथदर्शी प्रकल्प गडचिरोली, नंदुरबार, पालघर, ठाणे, नाशिक, रायगड व पुणे या जिल्ह्य़ांमधील १० तालुक्यांमधील ४२० गावांमध्ये राबविण्यात येणार आहे. हा पथदर्शी प्रकल्प सप्टेंबर २०१८ ते ऑगस्ट २०२० या कालावधीमध्ये राबविण्यात येईल. त्यानंतर त्याची राज्यातील सर्व आदिवासी क्षेत्रांमध्ये अंमलबजावणी करण्यासाठी आराखडा तयार करण्यात येईल.

*      प्रकल्पाच्या अंलबजावणीसाठी एकूण आठ संस्थांना सहभागी संस्था म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

*     पोषणाची माहिती, त्याबाबतच्या समस्या यांवर चर्चा करण्यासाठी गावपातळीवर दर महिन्याला बठकांचे आयोजन करण्यात येईल. यामध्ये ग्रामपंचायतीच्या संबंधित समित्या, पालक, आशा कार्यकर्त्यां तसेच सहभागी संस्था यांचा सहभाग असेल. या बठकांमध्ये पोषणाची उद्दिष्टे गाठण्याच्या दृष्टीने धोरणात्मक निर्णय घेण्यात येतील.

*      निवडलेल्या तालुक्यांमधील ४० गावांमध्ये आशा कार्यकर्त्यां बठकांच्या माध्यमातून पोषणाबाबत माहिती देणे, कुपोषित बालकांच्या घरी जाऊन त्यांच्यासाठी पाठपुरावा करणे अशा स्वरूपाची कामे करतील.

*      भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेच्या अंमलबजावणी संदर्भातील आकडेवारी तसेच अन्य माहितीचे संकलनही या कालावधीमध्ये करण्यात येईल. त्या आधारे आरोग्य व पोषण सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील.

पार्श्वभूमी

महाराष्ट्रातील कुपोषणाची समस्या गंभीर असल्याचे राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून सामोरे आले आहे. महाराष्ट्रातील एक तृतीयांश मुले कमी उंचीची आहेत, एक चतुर्थाश मुले ही उंचीप्रमाणे कमी वजनाची, तर निम्मी मुले ही ऑनिमिआ आजाराने ग्रस्त आहेत. अनुसूचित क्षेत्रातील कुपोषणावर मात करण्यासाठी पारंपरिक योजनांबरोबरच नवीन रणनीती अवलंबिण्याची आवश्यकता जाणवत आहे.

यामध्ये पोषण सेवांच्या बळकटीकरणासाठी लोकसहभाग वाढविणे, तसेच कुपोषित मुलांच्या घरच्या पोषण पद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणे अशी नवी रणनीती राबविण्यासाठी हा पथदर्शी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानातील लोकआधारित आरोग्यसेवा व देखरेख तसेच एकात्मिक बाल विकास सेवांमधील लोकसहभागाच्या दिसत असलेल्या उचित परिणामांमुळे शासकीय प्रयत्नांना लोकसहभागाची जोड लाभल्यास त्याचे फलित चांगले दिसून येते, हे समजले आहे. त्या धर्तीवर हा प्रकल्प योजण्यात आला आहे.

संबंधित मुद्दे

*      भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत गरोदर महिला व स्तनदा मातांना एक वेळचा चौरस आहार, सात महिने ते सहा वष्रे वयोगटातील सर्व बालकांना अंडी / केळी यांचा अतिरिक्त आहार देण्यात येतो.

*      जागतिक आरोग्य संघटनेनुसार तीव्र व मध्यम कुपोषणाचे परिमाण पुढीलप्रमाणे आहे.

तीव्र कुपोषण – Severe wasting for height below 3z score and / or severe underweight low weight for age below 3z score

मध्यम कुपोषण – Moderate wasting for height between 2z to 3z score and / or moderate underweight low weight for age between 2z to 3z score

राज्यसेवा परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास अशा प्रकारच्या योजनांबाबत मूलभूत व संबंधित मुद्दय़ांचाही प्रश्नांमध्ये समावेश असल्याचे लक्षात येते. त्याचबरोबर मुलाखतीसाठी आणि एकूणच अधिकारी म्हणून आवश्यक असलेल्या परिप्रेक्ष्यातून विषय समजून घेण्यासाठी अशा प्रकारे बहुआयामी अभ्यास आवश्यक आहे हे लक्षात घ्यावे.

पंजाबमधील शिक्षणकेंद्र गुरुनानक देव विद्यापीठ, अमृतसर

guru-nanak-dev-university

10169   15-Dec-2018, Sat

संस्थेची ओळख –

शिख धर्मगुरू गुरुनानकजींच्या पाचशेव्या जयंतीनिमित्त २४ नोव्हेंबर, १९६९ रोजी अमृतसरमध्ये गुरुनानक देव विद्यापीठाची स्थापना झाली. नॅकची ‘ए’ ग्रेड मिळवणारे हे विद्यापीठ २०१८ सालच्या राष्ट्रीय पातळीवरील विद्यापीठांसाठीच्या ‘एनआयआरएफ’ मानांकनामध्ये देशात ५९ व्या स्थानी आहे. विद्यापीठ स्थापनेपासूनच गुरुनानकजींचे आयुष्य आणि त्यांच्या शिकवणीविषयीचे संशोधन आणि त्याचा प्रसार करणे, पंजाब राज्यातील शैक्षणिकदृष्टय़ा मागास वर्गासाठी शिक्षणाचा प्रसार करणे, पंजाबी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे या प्रमुख उद्देशांसह सुरू असलेली या संस्थेची वाटचाल गेल्या काही काळामध्ये उल्लेखनीय अशीच ठरली आहे.

राष्ट्रीय पातळीवर क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी दिला जाणारा मौलाना अबुल कलाम आझाद चषकावर आत्तापर्यंत तब्बल २२ वेळा या विद्यापीठाने आपले नाव कोरले आहे. सांस्कृतिक स्पर्धामध्येही या विद्यापीठाची कामगिरी उल्लेखनीयच ठरलेली आहे. राष्ट्रीय पातळीवरील युवक महोत्सवांचे ९ वेळा विजेतेपद, तर उत्तर विभाग आंतरविद्यापीठीय सांस्कृतिक महोत्सवांमध्ये १४ वेळा विजेतेपदाचा बहुमान पटकावणारी कामगिरी या विद्यापीठाने नोंदवली आहे. याशिवाय, विद्यापीठ अनुदान आयोगाकडून ‘कॅटेगिरी-क’ हा दर्जा मिळालेले पंजाब राज्यातील हे एकमेव विद्यापीठ आहे.

संकुले आणि सुविधा – 

अमृतसर शहराच्या पश्चिमेकडील भागामध्ये जवळपास पाचशे एकरांच्या परिसरात या विद्यापीठाचे मुख्य संकुल विस्तारले आहे. त्याशिवाय विद्यापीठाची एकूण चार विभागीय संकुले पंजाब राज्यामध्ये कार्यरत आहेत. त्यापकी सठियाला व फटू धिंगा (सुलतानपूर लोधी) ही संकुले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी महत्त्वाची मानली जातात. जालंधर व गुरुदासपूर येथे असलेली विद्यापीठाची विभागीय संकुलेही त्या भागातील विद्यार्थ्यांपर्यंत विद्यापीठाच्या विविध सेवा सुविधा पोहोचवत आहेत. या बरोबरीने विद्यापीठाद्वारे नियंत्रित अशी एकूण नऊ महाविद्यालये चालतात.

मुख्य संकुल, विभागीय संकुले आणि या महाविद्यालयांच्या माध्यमातून हे विद्यापीठ एकाचवेळी पाच हजारांवर विद्यार्थ्यांना शैक्षणिक सेवा-सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्नशील आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण देण्यासाठी विद्यापीठाने ‘प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी’सारखी संस्थाही सुरू केली आहे. या संस्थेमार्फत आयआयटी-जेईईसारख्या परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रशिक्षण पुरविले जाते. विद्यापीठाच्या मुख्य संकुलामध्ये विद्यार्थ्यांसाठी तीन व विद्याíथनींसाठी चार वसतीगृहे आहेत. जालंधर, गुरुदासपूर व सठियाला संकुलामध्येही वसतीगृहांच्या सुविधा उपलब्ध आहेत.

जालंधरला केवळ विद्याíथनींसाठी वसतीगृहाची सुविधा उपलब्ध आहे. विद्यार्थी व संशोधकांची ग्रंथालयाची गरज पूर्ण करण्याच्या दृष्टीने विद्यापीठाचे भाई गुरुदास ग्रंथालय महत्त्वाचे ठरते. १९७० मध्ये स्थापन झालेले हे ग्रंथालय उलटय़ा त्रिकोणाच्या आकारातील पाच मजली इमारतीमधून चालते. ग्रँड टँक रस्त्यावरून विद्यापीठाकडे पाहिले असता, सहजच नजरेस पडणारी अशी ही ग्रंथालयाची इमारत सर्व शैक्षणिक विभागांसाठी मध्यवर्ती ठिकाणही ठरते.

विद्यार्थ्यांना कोणत्याही क्षणी परीक्षेतील आपल्या कामगिरीची माहिती देऊ शकेल, अशी एसएमएस सुविधा विद्यापीठाने विकसित केली आहे. हॉकीसाठीचा अस्ट्रो टर्फ, आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव, शूटिंग रेंज अशा क्रीडा क्षेत्रासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या सुविधाही विद्यापीठाने निर्माण केल्या आहेत.

विभाग आणि अभ्यासक्रम – 

विद्यापीठांतर्गत एकूण १३ विद्याशाखांतर्गत ३८ शैक्षणिक विभागांचे कामकाज चालते. या विभागांमार्फत पदवी, पदव्युत्तर पदवी, पदविका आणि प्रमाणपत्र अशा प्रकारांमधील अभ्यासक्रम चालविले जातात. विद्यापीठाच्या आíकटेक्चर विभागामध्ये बॅचलर ऑफ आíकटेक्चर या पदवी अभ्यासक्रमाच्या जोडीने विद्यापीठाने अर्बन डिझाइन आणि सस्टेनेबल बिल्ट इन्व्हायर्न्मेंट या विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमही उपलब्ध करून दिले आहेत. बॉटनिकल अँड इन्व्हायर्न्मेंटल सायन्सेस विभागामध्ये बी. एस्सी. हॉनर्स बॉटनी, एम. टेक. इन्व्हायर्न्मेंटल सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे वेगळे पर्याय उपलब्ध आहेत.

केमिस्ट्री विभागांतर्गत टेक्स्टाइल प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी या विषयातील बी. टेक अभ्यासक्रम चालतो. पंजाब स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अंतर्गत इकॉनॉमिक्स विषयातील बी. एस्सी. व एम. एस्सीचे अभ्यासक्रम चालतात. त्या जोडीने बिझनेस इकॉनॉमिक्स विषयातील एम.ए. अभ्यासक्रम, बँकिंग इन्शुरन्स अँड फायनान्स विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाचा पर्यायही या विभागाने उपलब्ध करून दिले आहेत. शिक्षणशास्त्र विभागांतर्गत एम. ए. एज्युकेशन आणि एम. एड. या अभ्यासक्रमांच्या जोडीने ‘अर्ली चाइल्ड केअर अँड एज्युकेशन’ विषयातील प्रमाणपत्र आणि पदविका अभ्यासक्रम चालविले जातात.

स्पेशल एज्युकेशन विषयातील पदविका अभ्यासक्रमही या विभागात उपलब्ध आहे. फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभागांतर्गत त्याच विषयातील बी. टेक आणि एम. एस्सीच्या अभ्यासक्रमांची सुविधा विद्यार्थ्यांना मिळते. परकीय भाषा विभागामध्ये रशियन, फ्रेंच, जर्मन आणि जॅपनीज या भाषांच्या अध्यापनाचे काम चालते. हिंदी विभागांतर्गत हिंदी पत्रकारिता या विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम चालविला जातो.

इतिहास विभागामध्ये ‘हेरिटेज टुरिझम ऑफ नॉर्थ वेस्ट इंडिया’ या विषयातील, तर मानसशास्त्र विभागामध्ये ‘मेंटल हेल्थ कौन्सेलिंग’ या विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठीचे वेगळे पर्याय ठरतात. विद्यापीठाच्या स्पोर्ट्स सायन्स अँड मेडिसिन विभागामध्ये स्पोर्ट्स फिजिओथेरेपी, स्पोर्ट्स न्युट्रिशन, स्पोर्ट्स बायोकेमिस्ट्री, एक्सरसाइज अँड स्पोर्ट्स फिजिओलॉजी, स्पोर्ट्स सायकॉलॉजी, स्पोर्ट्स अँथ्रोपोमेट्री या विषयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. विद्यापीठाच्या मुख्य संकुलाशिवाय इतर विभागीय संकुलांमध्ये व्यवस्थापन, अभियांत्रिकी, वाणिज्य, विज्ञान आणि विधी विद्याशाखेमधील विविध पदव्युत्तर तसेच पदवी अभ्यासक्रमही विद्यापीठाने उपलब्ध करून दिले आहेत.

मानवी हक्क व संसाधन अद्ययावत मुद्दे

human rights and resources

6957   04-Aug-2018, Sat

मानवी हक्क आणि मनुष्यबळ विकास या घटकाच्या पारंपरिक व विश्लेषणात्मक अभ्यासाबाबत मागील लेखांमध्ये चर्चा करण्यात आली. या पेपरशी संबंधित चालू घडामोडींचा अभ्यास कशा प्रकारे करावा याबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.

मानवी हक्कविषयक मुद्दय़ाच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडी, निर्णय, ठराव यांचा आढावा हिंदू किंवा इतर वर्तमानपत्रांतून घेता येईल. याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल किंवा शेरा चच्रेत असल्यास त्याची माहिती करून घ्यावी. विविध समाजघटकांबाबत घेण्यात आलेले निर्णय, नवे धोरण यांची माहिती असायला हवी.

मानव संसाधन म्हणजेच भारतातील लोकसंख्येच्या सद्य:स्थितीचा अभ्यास आहे. त्यामुळे सन २०११च्या जनगणनेच्या अहवालाचा विश्लेषणात्मक अभ्यास हा मानव संसाधन घटकाच्या अभ्यासाचा तांत्रिक पाया (technical base) आहे. या घटकाचा अभ्यास टेबलमध्ये करता येईल. नागरी, ग्रामीण, वयोगट, लिंग गुणोत्तर, बाल लिंग गुणोत्तर, बालमृत्यू दर, अर्भक मृत्यू दर, साक्षरता या मुद्दय़ांसाठी टेबल बनवावा. प्रत्येक मुद्दय़ामध्ये भारतविषयक आकडेवारी व टक्केवारी, महाराष्ट्राची टक्केवारी व राज्यांच्या एकत्रित यादीमधील क्रमांक, महाराष्ट्राच्या तुलनेत मागे व पुढे असलेले एक एक राज्य/ केंद्रशासित प्रदेश, सर्वात जास्त व सर्वात कमी टक्केवारीची तीन तीन राज्ये / केंद्रशासित प्रदेश व त्यांची टक्केवारी यांचा समावेश करावा. यामध्ये महाराष्ट्राची जनगणना व्यवस्थित पाहणे आवश्यक आहे. वरील मुद्दय़ांबाबत चर्चा केलेल्या पद्धतीनेच प्रत्येक मुद्दय़ासाठी महाराष्ट्रातील जिल्ह्य़ांचा विचार करून टेबल तयार करावा. शक्य झाल्यास सन २००१च्या जनगणनेच्या अहवालातील या मुद्दय़ांचा आढावा घ्यावा. यामुळे तुलनात्मक प्रश्नांची उत्तरे देणे शक्य होईल.

अभ्यासक्रमामध्ये उल्लेख नसला तरी सामाजिक, आíथक व जातिगत जनगणना (SECC) ची आकडेवारी अत्यंत महत्त्वाची आहे. यातील आपोआप समावेशाचे आणि आपोआप वगळण्याचे (Automatic Inclusion &Automatic Exclusion) निकष व या दोन निकषांव्यतिरिक्त ठरविण्यात आलेले वंचिततेचे निकष माहीत करून घ्यावेत. शहरी, ग्रामीण व एकत्रित अशी महत्त्वाची आकडेवारी पाहायला हवी. देशाची व महाराष्ट्राची या सर्व निकषांबाबतची आकडेवारी/ टक्केवारी माहीत करून घ्यायला हवी. याबाबत तपशीलवार माहितीसाठी SECC चे संकेतस्थळ आणि ठळक मुद्दय़ांसाठी करंट ग्राफ वार्षकिी यांचा वापर करता येईल.

याच पायाभूत अभ्यासामध्ये दरवर्षी प्रसिद्ध होणाऱ्या आíथक पाहणी अहवालामधून शिक्षणविषयक आकडेवारी – पटनोंदणी, गळतीचे प्रमाण, साक्षरतेमधील लिंगसमानता याबाबतची टक्केवारी पाहायला हवी. भारत आणि महाराष्ट्र यांची तुलना, राज्यातील जिल्ह्य़ांची तुलना करणारे टेबल तयार करावेत. असर अहवालातील अद्ययावत आकडेवारी व कल (Trends) समजावून घ्यावेत.

 आरोग्यविषयक आकडेवारी

मातामृत्यू दर, अर्भक /बाल मृत्यू दर, कुपोषणविषयक आकडेवारी भारत आणि महाराष्ट्राच्या आíथक पाहणी अहवालामधून पाहणे आवश्यक आहे. विविध साथीच्या रोगांबाबत जागतिक आरोग्य संघटनेकडून जाहीर होणाऱ्या अहवालामध्ये भारताचा उल्लेख असल्यास त्याचा आढावा घेणे आवश्यक आहे. तसेच रोगमुक्त घोषित केल्या गेलेल्या देशांची माहितीही असायला हवी. पेपर ४ मधील पोषण आणि आरोग्यविषयक मुद्दय़ांची सांगड येथे घालता यायला हवी. नवीन लसीकरण मोहीम/ आरोग्य योजना तसेच नव्या उपचार / रोग निदान पद्धती याबाबत अद्ययावत माहिती असणे आवश्यक आहे.

बेरोजगारीचे प्रमाण, कामगारांचा मागणी दर, वेगवेगळ्या क्षेत्रातील सेवायोजन इत्यादी गोष्टींच्या नोट्स काढणे आवश्यक आहे. याबाबत भारतातील एकूण आकडेवारी / टक्केवारी, महाराष्ट्रातील आकडेवारी / टक्केवारी व रोजगाराबाबत राज्यांची तुलना पाहायला हवी.

आरोग्य, शिक्षण, ग्राम विकास याबाबत नव्याने लागू झालेले शासकीय नियम, धोरण यांचा नेमका अभ्यास करणे आवश्यक आहे. तसेच पेपर दोनच्या समांतरपणे मानवी हक्कांची चर्चा असलेले सर्वोच्च न्यायालयाचे अलीकडचे निर्णय माहीत असावेत. संयुक्त राष्ट्रांची शाश्वत विकास उद्दिष्टे आणि त्यासंदर्भातील आधीच्या सहस्रक विकास उद्दिष्टांमधील मुद्दे माहीत असणे आवश्यक आहे. शाश्वत विकास उद्दिष्टांसाठी करण्यात येणारे प्रयत्न व त्यासाठीची अभियाने, योजना यांची माहिती बारकाईने करून घ्यायला हवी.

सर्वच उपघटकांसाठीच्या शासकीय योजनांचा अभ्यास पुढील मुद्दय़ांच्या आधारे टेबलमध्ये करता येईल. योजनेचे ध्येय, हेतू, असल्यास घोषणा, संक्षिप्त नाव, स्वरूप, खर्चाची विभागणी, अंमलबजावणी करणारी यंत्रणा, असल्यास लाभार्थ्यांचे निकष, शिफारस करणारा आयोग / समितीचे नाव, असल्यास आकडेवारी, मूल्यमापन इ.

वेगवेगळ्या अशासकीय संस्थांचे (NGO) उल्लेखनीय कार्य त्या त्या वर्षीच्या पेपरमध्ये एका प्रश्नासाठी तरी विचारण्यात आलेले आहे. अशा संस्थांचे कार्य, कार्यपद्धती, कार्यक्षेत्र, असल्यास त्यांना मिळालेले पुरस्कार, असल्यास संबंधित प्रमाणित आकडेवारी (authentic figure) व इतर उल्लेखनीय माहिती असल्यास फायदा होईल.

मनुष्यबळ विकास व्यावसायिक शिक्षण व ग्रामविकास घटक

HRD EDUCATION AND RURAL DEVELOPMENT

6338   01-Aug-2018, Wed

मागील लेखांमध्ये मनुष्यबळ विकासाच्या जैविक आणि मूल्यात्मक आयामांबाबत चर्चा करण्यात आली. व्यावसायिक शिक्षण हे मनुष्यबळाच्या विकासाचे प्रत्यक्ष परिणाम साधणारे माध्यम म्हणून विचारात घेता येईल. आणि ग्रामीण विकास त्याला साहाय्य करणारे बाह्य साधन म्हणून. या घटकांच्या तयारीबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येईल.

*  व्यावसायिक शिक्षण

व्यावसायिक / तंत्र शिक्षणाबाबत विविध आयोगांच्या शिफारसी व त्याप्रमाणे शिक्षण प्रणालीमध्ये करण्यात आलेले बदल यांची व्यवस्थित नोंद घ्यायला हवी. काही आयोगांच्या शिफारशी या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेबाबतही असू शकतात. त्यांच्या शिफारशी पारंपरिक व व्यावसायिक तसेच अनौपचारिक शिक्षण पद्धतीसही लागू होतात. अशा वेळी त्यांचा एकत्रितपणेच विचार करणे योग्य ठरेल.

शासनाच्या आजवरच्या सर्व शिक्षणविषयक धोरणांचा आढावा घेणे आवश्यक आहे. व्यावसायिक तसेच तांत्रिक व वैद्यकीय शिक्षणाबाबत प्रवेश परीक्षा, प्रवेश, कालावधी, परीक्षा पद्धती याबाबत मागील दोन वर्षांमध्ये घेण्यात आलेले शासकीय निर्णय माहीत असायला हवेत. याबाबत घडलेल्या महाराष्ट्रातील व देशपातळीवरील महत्त्वाच्या चालू घडामोडी, न्यायालयीन निर्णय, शासकीय निर्णय माहीत असायला हवेत. अभ्यासक्रमामध्ये उल्लेख नसला तरी राष्ट्रीय परीक्षा संस्था (National Testing Agency), NAAC,, अभिमत विद्यापीठांबाबतच्या तरतूदी यांचा अभ्यासही आवश्यक आहे.

व्यावसायिक शिक्षणाचा महिला, अपंग, सामाजिकदृष्टय़ा मागास प्रवर्ग, अल्पसंख्यांक व आदीम जमाती या व्यक्तिगटांच्या सबलीकरणामध्ये व विकासामध्ये कशा प्रकारे उपयोग होऊ शकतो यादृष्टीने विचार करणे आवश्यक आहे. या प्रवर्गामध्ये तसेच एकूणच समाजामध्ये आर्थिकदृष्टय़ा मागास असलेला समाज घटकही समाविष्ट असतो. या घटकांना विशेष करून व्यावसायिक शिक्षणामुळ होणारे फायदे व्यवस्थित समजून घ्यायला हवेत. व्यावसायिक शिक्षणाच्या प्रसारासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना तसेच व्यावसायिक, तांत्रिक व वैद्यकीय शिक्षणाचे नियमन व नियंत्रण करणाऱ्या संस्थांचा अभ्यास करायला हवा. याबाबत राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ, कौशल्य विकास योजना (DDUGK), सागरमाला प्रकल्प यांचा विचार करावा. यामध्ये मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडिया योजनांमधील तांत्रिक कौशल्यविषयक भाग पाहणेही आवश्यक आहे.

* ग्रामीण विकास

ग्रामीण विकास हा मनुष्यबळ विकासामधील Collective मुद्दा आहे. कुशल मनुष्यबळाचा आर्थिक विकासासाठी वापर करायचा तर पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असते, ही बाब लक्षात घ्यायला हवी. भारतातील बहुतांश लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. या दृष्टीने ग्रामीण क्षेत्रातील पाणीपुरवठा, ऊर्जा, दळणवळण, सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता, निवारा ईत्यादी पायाभूत सुविधांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. या पायाभूत सुविधांचे स्वरूप, त्यांची गरज, संबंधित समस्या, परिणाम व उपाय अशा मुद्दय़ांच्या आधारे त्यांचा अभ्यास करायला हवा. या संदर्भातील शासकीय योजनांचा आढावा पुढीलप्रमाणे घ्यायला हवा.

*  योजनेचा उद्देश *  स्वरूप *  कालावधी

*  योजनेबाबतचा कायदा *  पंचवार्षिक योजना *  लाभार्थ्यांचे निकष *  खर्चाची विभागणी

*  अंमलबजावणी यंत्रणा *  मूल्यमापन. PURA  मॉडेल, स्मार्ट खेडे योजना, स्वच्छ भारत अभियान, सांसद आदर्श ग्राम योजना, आमदार आदर्श ग्राम योजना यांचाही अभ्यास इतर योजनांबरोबर करणे आवश्यक आहे.

पायाभूत सुविधांचा व त्याबाबतच्या केंद

राज्याच्या योजनांची अंमलबजावणी यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका व्यवस्थित अभ्यासाला हवी. ७३व्या व ७४व्या घटना दुरुस्तीने ग्रामीण व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांकडे सोपविण्यात आलेले विषय, जबाबदाऱ्या व कार्ये यांचा अभ्यास पेपर-२ च्या अभ्यासामध्ये झालेला असेलच मात्र या पेपरमध्ये या संस्थांकडे असलेल्या विकासात्मक बाबींचा विचार करायला हवा.

ग्रामीण विकासामध्ये वित्तीय व गैरवित्तीय सहकारी संस्था यांची भूमिका व्यवस्थित समजून घ्यायला हवी. या सर्व संस्थांची रचना, कार्ये, कार्यपद्धती व ग्रामीण जीवनावरील त्यांचा प्रभाव व परिणाम याबाबत विश्लेषण करणे आवश्यक आहे.

विविध प्रकारच्या वित्तीय संस्था, अग्रणी बँकेसारख्या योजना इत्यादींचे ग्रामीण विकासातील महत्त्व समजून घ्यावे. विशेषत: सहकारी वित्तीय संस्थांचा व्यवस्थित अभ्यास करायला हवा. ग्रामीण भागातील आर्थिक व्यवहारांबाबत व एकूणच आर्थिक चित्राबाबत पेपर-४ मधून पायाभूत व संकल्पनात्मक अभ्यास पूर्ण होईल मात्र ग्रामीण विकासामध्ये व कृषी विषयक कार्यामध्ये त्यांची भूमिका समजून घेऊन तिचे मूल्यमापन करणे पेपर -३ साठी महत्त्वाचे आहे.

जमीन सुधारणेबाबतचे प्रयत्न, त्याबाबतचे नियम, कायदे यांचा आढावा घेणे आवश्यक आहे. जमीन सुधारणांच्या प्रयत्नांचे यश अपयश, परिणाम, त्यातून उद्भवलेले मुद्दे, याबाबतच्या कायदे, घटना दुरुस्त्या इत्यादींचा अभ्यास आवश्यक आहे. पेपर २ व पेपर ३ चा बराचसा भाग overlap होत असल्यामुळे त्यांचा अभ्यास एकत्रितपणे किंवा समांतरपणे केल्यास अभ्यासामध्ये सुसंगतता येईल आणि दोन्ही पेपरमधील विश्लेषणात्मक प्रश्न सोडविण्याचा आत्मविश्वास मिळेल.

मनुष्यबळ विकास शिक्षण उपघटक

hrd education part

7327   29-Jul-2018, Sun

 1. मनुष्यबळ विकासामधील महत्त्वाच्या संकल्पना समजून घेणे व त्यातील महत्त्वाचे मुद्दे आणि मनुष्यबळ विकासासाठी आवश्यक आरोग्य या मुद्दय़ाच्या तयारीबाबत मागील लेखामध्ये चर्चा करण्यात आली. आरोग्य हा मनुष्यबळ विकासाठीचा जैविक आयाम आहे, तर शिक्षण हा मूल्यात्मक आयाम आहे. ग्रामीण विकास हा यातील भौतिक पलू आहे.
 2. शिक्षण
 3. सामाजिक बदलाचे साधन म्हणून शिक्षणाचा विचार करताना मूल्ये व नीतितत्त्वे जोपासण्यामध्ये शिक्षणाची महत्त्वाची भूमिका असते हे लक्षात घेणे आवश्यक आहे. केवळ मनुष्यबळ विकासच नव्हे, तर मानवी हक्कांची अंमलबजावणी ही शिक्षणाच्या माध्यमातून होते. याबाबत चिंतन व विश्लेषणात्मक अभ्यास आवश्यक आहे. भारतातील शिक्षण प्रणालीचा अभ्यास करताना याबाबत विविध आयोगांच्या शिफारशी व त्याप्रमाणे शिक्षण प्रणालीमध्ये करण्यात आलेले बदल यांची व्यवस्थित नोंद घ्यायला हवी. शासनाच्या आजवरच्या सर्व शैक्षणिक धोरणांचा आढावा घेणे आवश्यक आहे. पूर्वप्राथमिक ते उच्च शिक्षण स्तरापर्यंतच्या प्रवेश, प्रवेश परीक्षा, कालावधी, परीक्षा पद्धती याबाबत मागील दोन वर्षांमध्ये घेण्यात आलेले शासकीय निर्णय माहीत असायला हवेत.
 4. शिक्षण पद्धती किंवा प्रकार
 5. औपचारिक, अनौपचारिक व प्रौढ शिक्षण या संकल्पना व्यवस्थित समजून घ्यायला हव्यात. अनौपचारिक व प्रौढ शिक्षणाची गरज, स्वरूप, परिणाम, समस्या व उपाय इत्यादी बाबी महत्त्वाच्या आहेत. याबाबतच्या विविध योजना व संस्थांचा आढावा घ्यायला हवा.
 6. प्रत्यक्ष शिक्षण पद्धतीमधील समस्या – गळती, दर्जा, शिक्षकांचे प्रशिक्षण इत्यादींचे स्वरूप, कारणे, परिणाम व उपायांचा अभ्यास गरजेचा आहे. विशेषत: जागतिकीकरण व खासगीकरणाचे शिक्षण पद्धतीवरील सकारात्मक व नकारात्मक परिणाम समजून घ्यायला हवेत. यासाठी वृत्तपत्रे टीव्ही, इंटरनेट इत्यादींमधील चर्चा उपयोगी ठरतील. यामध्येच ई-अध्ययन ही संकल्पना समाविष्ट करावी. ई-अध्ययन उपलब्ध करून देणाऱ्या संस्था माहीत असाव्यात. तसेच या शिक्षणपद्धतीचे फायदे व तोटे समजून घ्यायला हवेत. ई अध्ययनाबाबतच्या विविध शासकीय योजना, ऑप्स, संकेतस्थळे आणि त्यांचे स्वरूप, स्कोप यांचा व्यवस्थित आढावा घ्यायला हवा. विद्यापीठ अनुदान आयोग, राष्ट्रीय मानांकन संस्था, एकत्रित प्रवेश परीक्षेसाठी स्थापित राष्ट्रीय परीक्षा संस्था (National Test Agency) अशा शिक्षण क्षेत्रातील आयोग, संस्थांचा नेमका अभ्यास करणे आवश्यक आहे.
 7. वेगवेगळ्या व्यक्तिगटांच्या शिक्षणविषयक समस्या ‘मानवी हक्क’ घटकाचा अभ्यास करताना लक्षात घ्यायला हव्यात. महिला, अपंग, सामाजिकदृष्टय़ा व आर्थिकदृष्टय़ा मागास प्रवर्ग, अल्पसंख्याक व आदीम जमाती यांच्या शिक्षणामधील समस्या, त्यांची कारणे, त्यांच्याबाबत असल्यास घटनात्मक तरतुदी, आरक्षणे, शासकीय योजना व त्यांचे मूल्यमापन असा सर्व मुद्दय़ांचा संकल्पना व तथ्यांच्या विश्लेषणातून अभ्यास आवश्यक आहे. शिक्षणापासून वंचित राहिल्यास या विशिष्ट वर्गावर होणारे परिणामसुद्धा पाहणे आवश्यक आहे. याबाबत सध्या बऱ्याच घडामोडी, निर्णय अशा घडामोडी घडत आहेत, त्यांचा नेमका आणि सर्वागीण अभ्यास आवश्यक आहे.
 8. पारंपरिक व पायाभूत शिक्षण हे मूल्य व नीतितत्त्वाची जोपासणी व मानवी हक्कांची अंमलबजावणी यासाठीचे महत्त्वाचे माध्यम आहे. या प्राथमिक व पायाभूत शिक्षणाची पुढची पायरी म्हणून पारंपरिक महाविद्यालयीन किंवा तांत्रिक / वैद्यकीय / व्यावसायिक शिक्षणाचा मार्ग खुला होतो. या बाबी लक्षात घेऊन व्यावसायिक शिक्षण या घटकाचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
 9. भारताच्या Demographic Dividend चा लाभ देशास व्हावा यासाठी या लोकसंख्येचे कुशल मनुष्यबळामध्ये रूपांतर होणे आवश्यक आहे. व्यावसायिक शिक्षणाच्या माध्यमातून कुशल मनुष्यबळाचा विकास प्रत्यक्षपणे व गतीने करता येतो या अनुषंगाने या घटकाचा विचार करणे आवश्यक आहे.
 10. व्यावसायिक शिक्षण
 11. यामध्ये पारंपरिक व व्यावसायिक शिक्षणामधील फरक समजून घ्यायला हवा. व्यावसायिक शिक्षणाची सुरुवात कोणत्या शैक्षणिक टप्प्यापासून होते हे लक्षात घ्यायला हवे. यातील विविध प्रकारचे अभ्यासक्रम, प्रशिक्षण माहिती करून घ्यावेत. त्यांचे स्वरूप समजून घ्यायला हवेत. यामध्ये प्रवेशासाठीची पात्रता वयोमर्यादा शिक्षणाचा / प्रशिक्षणाचा कालावधी व रोजगाराची उपलब्धता व स्वरूप अशा मुद्दय़ांचा विचार करायला हवा. या मुद्दय़ांच्या तयारीची उर्वरित चर्चा पुढील लेखामध्ये करण्यात येईल.

मानवी हक्क घटक

human rights

8077   18-Jul-2018, Wed

या पेपरचे दोन मुख्य घटक विषय आहेत. मनुष्यबळ विकास आणि दुसरा मानवी हक्क. आधी मानवी हक्क हा घटक समजून घेऊन मग मनुष्यबळ संसाधन भागाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. या लेखापासून मानवी हक्क या घटकाबाबत चर्चा करण्यात येत आहे.

मानव संसाधन विकासासाठी मानवी हक्कांची अंमलबजावणी ही आवश्यक ठरते. त्या दृष्टीने मानवी हक्क व मानव संसाधन विकास या विषयांचा अंतर्भाव मुख्य परीक्षेमध्ये करण्यात आला आहे हे लक्षात घेऊन या घटकाचा अभ्यास करायला हवा.

मूलभूत व पारंपरिक अभ्यास –

अभ्यासाची सुरुवात सर्वप्रथम काही तटस्थ संकल्पना समजून घेऊन करायला हवी. यामध्ये मानवी हक्कांची संकल्पना, तिचा इतिहास, भारतातील मानवी हक्क चळवळ, मानवी हक्कांची आंतरराष्ट्रीय मानके, युनोची घोषणापत्रे व भारतीय संविधानातील मानवी हक्कांचे प्रतिबिंब या बाबी बारकाईने समजून घ्यायला हव्यात. मानवी हक्कांचे महत्त्व, गरज माहीत असायला हवे.

या पेपरच्या अभ्यासातील पायाभूत घटक असलेल्या या क्षेत्रामध्ये कार्यरत विविध संस्था / संघटनांचा अभ्यास व त्यांचे मूल्यमापन याबाबत अभ्यास करताना पुढील मुद्दय़ांचा आधार घेता येईल.

अभ्यासक्रमामध्ये वेगवेगळय़ा मुद्दय़ांच्या अनुषंगाने संस्था व संघटनांचा वेगवेगळय़ा ठिकाणी उल्लेख करण्यात आला आहे. या संस्था व संघटना मानवी हक्कांची अंमलबजावणी किंवा मानवी संसाधन विकास या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांचा अभ्यास करताना पुढील मुद्दे लक्षात घ्यावेत – स्थापनेची पाश्र्वभूमी – स्थापनेचा उद्देश व कार्यकक्षा – संस्थापक – भारत सदस्य / संस्थापक सदस्य आहे का ? – संस्थेचे बोधवाक्य – शक्य असल्यास बोधचिन्ह – स्थापनेचे वर्ष – रचना – कार्यपद्धती – ठळक काय्रे, निर्णय, घोषणा – वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे – संस्थेला मिळालेले पुरस्कार – संस्थेकडून देण्यात येणारे पुरस्कार – असल्यास भारतीय सदस्य – संस्थेचे अहवाल व त्यातील भारताचे स्थान.

यातील काही मुद्दय़ांच्या आधारे भारतामध्ये मानव संसाधनामध्ये कार्यरत असलेल्या शासकीय व स्वयंसेवी संघटनांचाही अभ्यास करणे शक्य आहे.

या संस्था संघटनांसाठी लक्षात घ्यायचे मुद्दे पुढीलप्रमाणे

 • स्थापनेची पाश्र्वभूमी – शिफारस करणारा आयोग / समिती – स्थापनेचा उद्देश
 • बोधवाक्य / बोधचिन्ह – मुख्यालय
 • रचना – कार्यपद्धत – जबाबदाऱ्या
 • अधिकार – नियंत्रण करणारे विभाग
 • खर्चाची विभागणी – वाटचाल
 • इतर आनुषंगिक मुद्दे.

विश्लेषणात्मक अभ्यास

मूल्ये व नीतितत्त्वे यांची जोपासना हा घटक संकल्पनात्मक आणि विश्लेषणात्मक अशा दोन्ही बाजूंनी महत्त्वाचा आहे. मूल्ये व नीतितत्त्वांची मानवी हक्क व मानव संसाधन विकासातील भूमिका महत्त्वाची आहे. त्यांची जोपासना म्हणजेच मानवी सभ्यतेच्या पालनासाठीचे प्रशिक्षण हे लक्षात घेणे आवश्यक आहे. कुटुंब, शिक्षणसंस्था या औपचारिक व अनौपचारिक संस्थांच्या माध्यमातून मूल्ये व नीतितत्त्वे कशा प्रकारे रुजविण्यात येतात त्याचा आढावा घेणे गरजेचे आहे. धर्म व प्रसारमाध्यमे यांद्वारे होणारे मूल्यशिक्षण हा चिंतन व विश्लेषणाचा विषय आहे.

मानवी हक्कांपासून वंचित राहिल्यास कोणत्याही सर्वसाधारण व्यक्तीला जाणवणाऱ्या समस्या सर्वप्रथम समजून घ्यायला हव्यात. निरक्षरता, बेरोजगारी, दारिद्रय़, हिंसा, शोषण, गुन्हेगारी, दहशतवाद, भ्रष्टाचार इत्यादी समस्यांचे मानवी हक्कांच्या संदर्भाने समस्यांचे स्वरूप, त्यांची कारणे, परिणाम, उपाय या मुद्दय़ांच्या आधारे विश्लेषण करणे आवश्यक आहे. याबाबत काही आंतरराष्ट्रीय संघटनांचे अहवाल असल्यास त्यांचा आढावा घ्यायला हवा. या अनुषंगानेच जागतिकीकरणामुळे या समस्यांच्या स्वरूपामध्ये, तीव्रतेमध्ये होणाऱ्या परिणामांबाबत वृत्तपत्रे, टीव्ही, इंटरनेट इ. माध्यमांतून होणारी विश्लेषणात्मक चर्चा सुद्धा पाहायला हवी.

या समस्यांवरील पायाभूत उपाय म्हणून मानवी हक्क व सभ्यतेचे पालन करण्याबाबत प्रशिक्षण देण्याची गरज समजून घ्यावी. असे प्रशिक्षण कशा प्रकारे, कोणत्या माध्यमातून देता येऊ शकते याबाबत चर्चा व चिंतन करणे आवश्यक आहे.

मानवी हक्क व मनुष्यबळ विकास प्रश्नांचे विश्लेषण

HRD

5021   14-Jul-2018, Sat

मुख्य परीक्षा पेपर तीनमध्ये मनुष्यबळ विकास आणि मानवी हक्क या घटकांचा समावेश करण्यात आला आहे. या पेपरच्या तयारीसाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका नुसत्या पाहून चालणार नाहीत तर त्यांचे विश्लेषण आणि अभ्यास करणे गरजेचे आहे. या पेपरच्या सन २०१५ पासूनच्या प्रश्नपत्रिकांमधील काही प्रातिनिधिक प्रश्न पाहू.

* प्रश्न – खालील वैशिष्टय़ांच्या आधारे योजनेचे नाव सांगा.

 1. a) ही १९९३ साली सुरू झाली.

 2. b) ही सुशिक्षित बेरोजगार तरुण, ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. ४०,००० प्रतिवर्षी आहे, त्यांच्यासाठी आहे.

 3. c) ही ग्रामीण आणि शहरी भागांसाठी आहे.

 4. d) हिचे मुख्य उद्दिष्ट तरुणांना स्वयंरोजगार मिळवून देणे हे आहे.

पर्यायी उत्तरे

१) इंदिरा गांधी रोजगार योजना

२) समग्र रोजगार योजना

३) पंतप्रधान रोजगार योजना

४) जवाहर ग्राम समृद्धी योजना

* प्रश्न – एलेक्ट्रोफोरेसिस चाचणीनंतर पांढरे, पिवळे व लाल कार्डाचे वाटप कोणत्या आजारात होते?

१) हिमोफिलिया २) सिकल सेल ३) थॅलॅसेमिया ४)एड्स

* प्रश्न – मानव संसाधन विकास मंत्रालयाचे कामकाज कोणत्या विभागामार्फत चालते?

 1. a) शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग.

 2. b) उच्च शिक्षण विभाग.

 3. c) आरोग्य विभाग.

 4. d) प्रशासकीय विभाग.

पर्यायी उत्तरे

१) a फक्त २) a आणि b ३) a, b आणि c ४) वरील सर्व

* प्रश्न – खालीलपैकी भारतीय शालेय शिक्षणात साहाय्य करणारी शिखर संस्था कोणती आहे?

१) केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड.

२) राष्ट्रीय शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद.

३) केंद्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था.

४) अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद.

* प्रश्न – राष्ट्रीय शहरी गरिबी कपात धोरणाचा (NUPRS) एक महत्त्वाचा घटक म्हणजे

१) शैक्षणिक संस्था, ग्रामीण गरिबांना उपलब्ध करून देणे.

२) निवारा व वाहतुकीची साधने शहरी गरिबांना उपलब्ध करून देणे.

३) दारिद्रय़रेषेखालील सर्व शहरी नागरिकांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे.

४) समाज झोपडपट्टी मुक्त बनविणे.

* प्रश्न -भारताचा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग

 1. a) मानवी हक्कांच्या उल्लंघनाविषयीच्या माध्यमातील वृत्तांताची किंवा अहवालाची स्वत:हून दखल घेऊ शकतो (कोणतीही औपचारिक तक्रार नसताना.)

 2. b) तो अशा प्रकरणातील संबंधित पक्षांवर नोटीस बजावून त्यांच्याकडून विशिष्ट कालमर्यादेत त्या प्रकरणाच्या सविस्तर अहवालाची मागणी करू शकतो.

पर्यायी उत्तरे

१) a आणि b दोन्ही विधाने बरोबर आहेत.

२) कोणतेही विधान बरोबर नाही.

आंतरराष्ट्रीय न्यायालय (ICJ)

International Court of Justice (ICJ)

14037   25-Jun-2018, Mon

आंतरराष्ट्रीय न्यायालय (ICJ):-

नुकत्याच पार पडलेल्या 193 सदस्यीय संयुक्त राष्ट्रसंघाची आमसभा (UNGA) आणि 15 सदस्यीय संयुक्त राष्ट्रसंघाची सुरक्षा परिषद (UNSC) यांच्या मतदान प्रक्रियेनंतर, आंतरराष्ट्रीय न्यायालय (ICJ) याच्या 15 न्यायाधीशांच्या खंडपीठामध्ये जपानचे युजी ईवासावा (63 वर्षीय) यांचा सहभाग केला जाणार आहे.

न्यायाधीश इवासावा टोकियो विद्यापीठात कायद्याचे प्राध्यापक आहेत. तसेच ते संयुक्त राष्ट्रसंघ मानवाधिकार समितीचे वर्तमान अध्यक्ष आहेत. जपानी न्यायाधीश हिसाशी ओवाडा (85 वर्षीय) यांच्या जागी ही नियुक्ती केली जात आहे.

न्यायालयाविषयी:-

आंतरराष्ट्रीय न्यायालय (International Court of Justice -ICJ) हा संयुक्त राष्ट्रसंघाचा प्रधान न्यायिक अंग आहे.

1945 साली स्थापन करण्यात आलेल्या ICJ याचे खंडपीठ हेग (नेदरलँड) शहरात आहे. आंतरराष्ट्रीय स्थायी न्यायालयाच्या (Permanent Court of International Justice) जागी ICJची स्थापना करण्यात आली. ICJ ला UNGA पुढे अहवाल सादर करावा लागतो.

न्यायालयाचे दोन कार्य:-

 1. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार, देशांद्वारे कायदेशीर तंटा प्रकरणांचे निराकरण करणे.
 2. UNच्या अन्य अधिकृत अंगांकडून आणि विशेष विभागांकडून संदर्भित प्रश्नांवर कायदेशीर सल्ला व मते देणे.

हेगच्या पीस पॅलेस लायब्ररीमध्ये न्यायालय भरते. मात्र पीस पॅलेस लायब्ररी ही संयुक्त राष्ट्रसंघाचा भाग नाही. लायब्ररी आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विविध विषयांवर उत्कृष्ट संशोधनात्मक मार्गदर्शन प्रदान करते.

संरचना:-

आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये 15 न्यायाधीश असतात. मात्र एकाच राष्ट्राचे दोन न्यायाधीश नसतात. निवडून आलेल्या न्यायाधीशाची मूदत नऊ वर्षे असते व न्यायाधीशास पुन्हा निवडून येता येते. सध्या दर तीन वर्षांनी पाच न्यायाधीशांची निवड होते. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश होण्यास पात्र आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचा अभ्यास असणारे विधी तज्ञ या जागेसाठी पात्र समजले जातात.

UNSC आणि UNGA या दोन्हींमध्ये स्वतंत्रपणे आणि एकाच वेळी मतदान घेऊन यादीतून न्यायाधीश निवडले जातात. इतर कोणतेही पद अथवा जबाबदारी स्वीकारू नये इत्यादी बंधने त्याच्यावर असतात. या न्यायाधीशांस राजदूतांप्रमाणे विशेषाधिकार असतात. वादी-प्रतिवादी राष्ट्रांना हवे असल्यास त्यांना आपले वेगळे न्यायाधीश नेमता येतात व तेही इतरांच्या बरोबरीने काम करतात.

संयुक्त राष्ट्रांचे सर्व सभासद या न्यायालयाचे वस्तुसिद्ध सदस्य आहेत. सुरक्षा-समितीने अनुमती दिल्यास संयुक्त राष्ट्रांचा सभासद नसलेल्या राष्ट्रासही या न्यायालयाचे सदस्य होता येते.

अन्य बाबी:-

 1. राष्ट्राराष्ट्रांतील वाद शांततेने आणि कायदेशीर पद्धतीने सोडविण्यासाठी याची तरतूद संयुक्त राष्ट्रांनी आपल्या सनदेत केली आहे.
 2. व्यक्ती अथवा संस्थेतर्फे फक्त राष्ट्राला न्यायालयापुढे वादी-प्रतिवादी होता येते.
 3. अस्तित्वात असलेले सर्व करार व तहांतील मुद्दयांबाबत निर्णय घेण्यास या न्यायालयास अधिकारता आहे.
 4. ICJ पुढे प्रकरणे तीन प्रकारे निकाली लावले जातात: (1) कार्यवाही दरम्यान कोणत्याही वेळी वादी-प्रतिवादी पक्षांद्वारे विवादाचे निराकरण केले जाऊ शकते; (2) एखादे राष्ट्र कार्यवाही खंडित करू शकते आणि कोणत्याही क्षणी प्रकरण मागे घेता येते; किंवा (3) न्यायालय निर्णय देऊ शकतात.
 5. या न्यायालयाचा निकाल बंधनकारक नाही. एखाद्या राष्ट्राने हा निकाल मानण्याचे नाकारले, तर त्याबाबत दुसरे राष्ट्र सुरक्षा-समितीकडे दाद मागू शकते आणि संयुक्त राष्ट्रांमार्फत त्याची अंमलबजावणी करून घेऊ शकते. या न्यायालयाच्या निर्णयानंतर पुढे अपील नाही; परंतु परिस्थितीत बदल झाला असेल अथवा नवीन मुद्दा उपस्थित झाला असेल, तर निकालानंतरच्या दहा वर्षांत त्याबाबत पुनरीक्षणाचा अर्ज करता येतो.

आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे मतभेद कायदेशीरपणे मिटविण्याचे कार्य ही संस्था चोख बजावीत आहे. आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या प्रश्नांवरील या न्यायालयाचे निर्णय अंतिम म्हणून मानण्यास आजपर्यंत 44 राष्ट्रांनी संमती दिलेली आहे. जेव्हा भारतामध्ये दाद्रा-नगरहवेली मुक्त झाल्यानंतर तेव्हा देखील भारतातून तेथे जाण्याचा मार्ग मिळावा म्हणून पोर्तुगालने ह्या न्यायालयापुढे अर्ज केला होता, परंतु तो सिद्ध न करता आल्याने न्यायालयाने हा अर्ज फेटाळला होता.

महिलांविषयक कायदे व योजना

महिलांचे कायदे व योजना

14173   19-Jun-2018, Tue

महिलांविषयक कायदे:-

1. सतीबंदी कायदा –1829

2. विधवा पुनर्विवाह कायदा –1856

3. धर्मांतरीत व्यक्ती विवाह विच्छेद कायदा –1866

4.भारतीय घटस्फोट कायदा –1869

5. मानवी हक्क संरक्षण कायदा –1993

6. आनंदी विवाह कायदा –1909

7. मुस्लिम स्त्री घटस्फोट हक्क संरक्षण कायदा –1986

8. विशेष विवाह –1954

9. हिंदू दत्तक व निर्वाह कायदा –1956

10. विवाहित स्त्रियांचा संपत्तीचा कायदा –1959

11.अनैतिक ध्येय व्यापार प्रतिबंधक कायदा-1956

12. वैद्यकी व गर्भपात कायदा –1929

13. हुंडाप्रतिबंधक कायदा –1929

14. बालविवाह निर्बंध कायदा –1929

15. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक  कायदा –2005

16. महाराष्ट्र देवदासी प्रतिबंधक व निर्मूलन कायदा –2005

17. मातृत्व लाभासंबंधीचा कायदा –1961

18. समान वेतन कायदा –1976

19. बालकामगार कायदा –1980

20. अपंग व्यक्ती कायदा –1995

21. मानसिक आरोग्य कायदा –1987

22. कुटुंब न्यायालय कायदा – 1984

23. राष्ट्रीय महिला आयोग कायदा –1990

24. माहिती अधिकार कायदा –2005

25. बालन्याय कायदा – 2000

26. भिक्षा प्रतिबंधक कायदा –1959

27. अनाथालय व धर्मादाय कायदा – 1960

28. हिंदू विवाह कायदा –1955

29. कर्मचारी विमा योजना –1952

30. प्रसूती सुधारणा कायदा –1961

31. अंतरराज्यीय प्रवासी कामगार कायदा – 1979

32. वेश्या वृत्ती निवारण कायदा –1986

33. हुंडा निषेध कायदा – 1986

महिलांविषयक योजना :-

1. डवाकरा योजना –1982

2. न्यू मॉडेल चर्खा योजना –1987

3. नोरडा प्रशिक्षण योजना –1989

4. महिला सामख्या योजना –1993

5. राष्ट्रीय महिला कोश योजना –1993

6. राष्ट्रीय मातृत्व लाभ योजना –1994

7. इंदिरा महिला योजना –1995

8. ग्रामीण महिला विकास योजना–1996

9. राजराजेश्वरी विमा योजना –1997

10. आरोग्य सखी योजना –1997

11. महिला आर्थिक विकास महामंडळ –24 फेब्रुवारी 1975

12. महाराष्ट्र राज्य महिला आयोग –1993

13. महाराष्ट्र राज्य समाज कल्याण सल्लागार बोर्ड – 1960

बालकाविषयक समस्या, अधिकार आणि योजना

Child problems, rights and plans

11908   19-Jun-2018, Tue

बालकाविषयक समस्या, अधिकार आणि योजना:-

1. बालकांकरीता आंतरराष्ट्रीय आपत्कालीन अर्थकोष –1946

2. बालकांच्या हक्कांसाठीची आंतरराष्ट्रीय परिषद –1990

3. एकात्मिक बालविकास सेवा योजना–1975

4. बाळसेविका प्रशिक्षण कार्यक्रम –1962

5. बालकांची काळजी घेणारी केंद्रे

6. शाळापूर्व बालकांसाठी शिक्षण

7. आनंद आकृतीबांधावर आधारित एकात्मिक कुटुंबकल्यान कार्यक्रम

8. बालकांसाठी राष्ट्रीय परितोषिक –1981

 युवा कल्याण :-

1. राष्ट्रीय सेवा योजना

2. राष्ट्रीय लष्करी प्रशिक्षण संस्था

3. एन.सी.सी. शिष्यवृती योजना

4. नेहरू युवा केंद्र

5. राष्ट्रीय युवक पारितोषिक

6. युवक विकासासाठी राष्ट्रीय संस्था

7. मानवी जीवनमूल्य प्रशिक्षण कायदा

बालकामगार :-

बालकामगार म्हणजे कष्टाची आनिजात जीविताला धोका उद्भवतो अशी कामे करणारी अल्पवयीन मुले होय. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने बालकामगार म्हणजे अशी अल्पवयीन व्यक्ती की जीच्यावर अकाली प्रौढत्व लादले जाते. त्यांच्या शारीरिक आणि बौद्धिक क्षमतांचा विचार न करता कमी वेतनावर कष्टप्रद कामेकरण्याची सक्ती केली जाते.

संयुक्त राष्ट्र संघाच्या बालकामगार विषयक समितीने असे प्रतिपादन केले आहे की, बाललोकसंख्येतील असा घटक की, ज्यास वेतन देवून कष्टप्रद कामे करण्यास भाग पाडले जाते तो बालकामगार होय. भारतीय घटनेतील कलम क्रमांक 24 मध्ये कारखान्यात किंवा धोकादायक ठिकाणी काम करणारी वयाच्या 14 वर्षाखालील व्यक्ती म्हणजे बालकामगार होय.

बालकामगर समस्येची कारणे :-

1. दारिद्र्य

2. बेकारी

3. शैक्षणिक सुविधांचा अभाव

4. कौटुंबिक समस्या

5. शैक्षणिक मागासलेपणा

6. वेतन पद्धती

7. हुंडा

बालकामगार समस्येचे परिणाम :-

1. बालकांचा छळ

2. मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाचा अडथळा

3. बालकांचे शोषण

4. बालकांचा दुरुपयोग

बालकामगार समस्येवरील उपाय योजना :-

1. घटनात्मक उपाय योजना –
भारतीय घटनेने शोषण विरूद्धचा अधिकार भारतीय नागरिकांना दिला आहे. त्यानुसार 14 वर्षाखालील मुला-मुलींना धोक्याच्या ठिकाणी काम करण्यास मनाई करण्यात आली आहे.

2. वैधानिक तरतुदी –

1) कंपनी कायदा 1948 नुसार 14 ते 18 वयोगटातील बालकामगारांना ओळखपत्र देणे आणि प्रत्येक दिवशी 4 1/2 तास काम देणे व रात्री 10 ते 6 या वेळेत कामावर बोलवण्यास मनाई करण्यात आली आहे.

2) मळे कामगार कायदा 1951 – च्या कायद्यानुसार 12 वर्षाखालील बालकाला माळ्यास काम देण्यात मनाई करण्यात आली आहे.

3) खान कामगार कायदा –1952 खाणीत काम करणार्या कामगारांचे किमान वय 15 वर्ष असणे आवश्यक आहे.

4. बालश्रम  प्रतिबंधक आणि नियामक कायदा – 1986 या कायद्यानुसार वयाच्या 16 वर्षाच्या आतील व्यक्तींना धोकादायक उद्योगात काम करण्यास बंदो घालण्यात आली आहे.

बालकामगार विषयक राष्ट्रीय धोरण – 1987

तरतुदी :-

1. 1948 आणि 1986 सालच्या  कायद्यांची कडक अंमलबजावणी करण्यात यावी.

2. एकात्मिक बालकार्यक्रमात बालकामगारांचा समावेश करण्यात यावा.

3. बालकामगार आणि त्यांच्या पालकांना साक्षर करण्यावर भर देण्यात यावा.

4. बालकामगारांना त्यांच्या व्यवसायाशी निगडीत व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात यावे.

5. या रस्त्रीय धोरणाची कार्यवाही होण्यासाठी पाठपुरावा करणे.

बालग्राम योजना :-

बालकामगार संरक्षण विषयक कायदे :

1. बालश्रम कायदा : 1933

2. बाल रोजगार कायदा : 1938

3. कंपनी कायदा : 1948

4. मुले कामगार कायदा : 1951

5. खानकामगार कायदा : 1952

6. बालश्रम प्रतिबंधक आणि अधिनियम कायदा : 1986

7. बालकामगार कायदा : 1992

बालकामगार राष्ट्रीय धोरण : 1987

1. धोक्याच्या ठिकाणी कामावर न पाठविणे .

2. एकात्मिक बालविकासावर विशेष भर.

3. मुलांना व त्यांच्या पालकांना शिक्षण देणे.

4. व्यवसाय प्रशिक्षण शाळांची तरतूद करणे.

केंद्रीय समाजकल्याण मंडळ :-

स्थापना : 1953

मुख्यालय : दिल्ली

कार्य :

1. मुले आणि विकलांग यांच्या कल्याणासंबंधी कार्य करणे.

2. सेवाभावी संस्थांना मदत करून विकार कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे.

3. दुर्गम आदिवासी भागात विकास कार्यक्रम राबविणे.

4. ग्रामीण आणि गरीब महिलांच्या विकासासाठी कामे करणे.

5. बालवाडी पोषण आहार कार्यक्रम राबविणे.

6. प्रौढ महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण देणे.

7. प्रौढ महिलांसाठी कार्यात्मक साक्षरता कार्यक्रम राबविणे.

बालकांचे अधिकार :-

20 नोव्हेंबर 1989 साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या महासभेने पुढील अधिकार मुलांना बहाल केले.

1. मोफत शिक्षण

2. खेळ आणि मनोरंजनासाठी पुरेसा वेळ

3. स्नेह, प्रेम आणि सहानुभूती मिळविणे.

4. पुरेसे भरण, पोषण व वैद्यकीय देखभाल

5. नाव आणि राष्ट्रीयत्व

6. दुबळ्या मुलांची विशेष देखभाल

7. संकटाच्या प्रसंगी सर्वप्रथम मुलांना मदत करणे

बालकांविषयी कायदे :-

बालकामगार अधिनियम  – 1986

1. मुलांच्या कल्याणासाठी बालगुन्हेगार अधिनियम – 1958

2. बालन्यायालय अधिनियम –2000

3. प्राथमिक शिक्षण कायदा –2009

4. सुधारगृह कायदा –1897

5. बालकामगार प्रतिबंधक कायदा – 1938

6. मुंबई बालसुधार कायदा –1948

7. बालकायदा –1960

8. बालन्यायालय कायदा –1986

9. बालकामगार वेठबिगार  प्रतिबंधक कायदा –1933


Top

Whoops, looks like something went wrong.