यूपीएससीची तयारी : आपत्ती आणि आपत्ती व्यवस्थापन

upsc strategy-geography-  Preparation Of Upsc Upsc Exam Tipc Upsc Exam 2019 Zws 70

3239   26-Nov-2019, Tue

आजच्या लेखामध्ये आपण यूपीएससी मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर तीनमधील आपत्ती आणि आपत्ती व्यवस्थापन या घटकाचा सर्वागीण आढावा घेणार आहोत.

या घटकावर विचारण्यात आलेले काही प्रश्न

* आपत्ती सज्जता (Disaster preparedness) हे आपत्ती व्यवस्थापन प्रक्रियेतील पहिले पाऊल आहे. स्पष्ट करा की कशा प्रकारे भू-स्खलनाच्या बाबतीत धोकादायक क्षेत्र नकाशा (hazard zonation mapping) साहाय्यकारी ठरू शकते. (२०१९).

* भारतात आपत्ती जोखीम कमी करणे (DRR) यासाठी सेंदाई आपत्ती जोखीम कमी करणे प्रारूप (२०१५-२०३०) (Sendai Framework for DDR-2015-2030) करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी आणि केल्यानंतरच्या विविध उपाययोजनांचे वर्णन करा. हे प्रारूप ह्य़ोगो कृती प्रारूप, २००५ (Hyogo Framework for Action, 2005) च्या तुलनेत कशा प्रकारे भिन्न आहे? (२०१८)

* २००४ मध्ये आलेल्या त्सुनामीने भारतासह चौदा देशांमध्ये हाहाकार माजवलेला होता. त्सुनामी घडून येण्यासाठी जबाबदार असणारी कारणे आणि यामुळे जनजीवन व अर्थव्यवस्थेवर पडणाऱ्या  परिणामाची चर्चा करा. ठऊटअ च्या २०१० च्या मार्गदर्शक तत्त्वांच्या संदर्भात अशा प्रकारच्या घटना दरम्यान जोखीम कमी करण्यासाठी तयार असणाऱ्या यंत्रणेचे वर्णन करा. (२०१७).

* अलीकडेच उत्तराखंडमध्ये ढगफुटीच्या अनेक घटना घडल्या, याचा प्रभाव कमी करण्यासाठी अवलंबल्या जाणाऱ्या उपायांची राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या ((NDMA) मार्गदर्शक तत्त्वाच्या संदर्भात, चर्चा करा. (२०१६).

* भारतीय उपखंडामध्ये भूकंपाच्या वारंवारितेत वाढ झालेली दिसून येत आहे. असे असूनसुद्धा त्याचा प्रभाव कमी करण्यासाठीच्या दृष्टीने भारतातील तयारीमध्ये लक्षणीय उणिवा दिसून येतात. विविध पलूंची चर्चा करा. (२०१५).

* दुष्काळाला त्याचा स्थानिक विस्तार (spaital expanse), ऐहिक कालावधी (temporal duration), संथ सुरुवात आणि पीडित वर्गावरील स्थायी स्वरूपातील प्रभाव या दृष्टीने आपत्ती म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) च्या सप्टेंबर २०१० च्या मार्गदर्शक सूचना ध्यानात घेऊन भारतामध्ये एल निनो (El Nino) आणि ला निनो (La Nino) च्या संभाव्य दुष्परिणामांना सामोरे जाण्यासाठीच्या यंत्रणा सज्जतेची चर्चा करा. (२०१४).

* आपत्तीपूर्व व्यवस्थापनेसाठी असुरक्षितता आणि आपत्तीपूर्व व्यवस्थापन जोखीम मूल्यमापन किती महत्त्वाचे आहे? प्रशासक या नात्याने तुम्ही आपत्ती व्यवस्थापन पध्दतीमधील कोणत्या मुख्य क्षेत्रावर लक्ष्य द्याल? (२०१३).

आपत्ती आणि आपत्ती व्यवस्थापन – परीक्षेच्या दृष्टीने आकलन

आधुनिक तंत्रज्ञानामुळे जगभरातील जवळपास सर्व देशांमध्ये विकासात्मक प्रक्रिया अधिक वेगवान बनलेली आहे. पण यामुळे विविध प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. उदारणार्थ, अमर्याद जंगलतोड आणि यामुळे होणारा जमिनीचा ऱ्हास, औद्योगिक क्षेत्रामधून उत्सर्जति केले जाणारे हरितगृह वायू, ज्यामुळे झालेली जागतिक तापमानवाढ आणि याचे जागतिक पर्यावरण आणि हवामानावर झालेले दुष्परिणाम, वाढत चालेली लोकसंख्या, औद्योगिक क्षेत्राची वाढ, शहरीकरण इत्यादीमुळे नैसर्गिक साधन संपत्तीचा वेगाने ऱ्हास होत आहे. परिणामी, जगभर विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींमध्ये वाढ होत असलेली दिसून येत आहे.

प्रत्येक वर्षी भारताला विविध प्रकारच्या आपत्तींना सामोरे जावे लागत आहे. वादळे, महापूर, भूकंप, त्सुनामी, दुष्काळ, भूस्खलन, हिमस्खलन, ढगफुटी यामध्ये जागतिक हवामान बदलामुळे उतरोत्तर अधिकच वाढ होत आहे आणि या सोबतच मानवनिर्मित आपत्तींचाही धोका वाढत आहे. आण्विक ऊर्जा केंद्रे, रासायनिक उद्योग यामध्ये होणारे अपघात आणि यामुळे निर्माण होणारी आपत्तीसदृश्य परिस्थिती आणि याचा पर्यावरण आणि मानवी जीवनावर होणारा परिणाम गंभीर स्वरूपाचा असतो. सध्या जगातील जवळपास सर्व देशांमध्ये आपत्ती आणि आपत्ती व्यवस्थापन हा महत्त्वाचा धोरणात्मक भाग बनविण्यात आलेला आहे.

आपत्ती, आपत्ती व्यवस्थापन, आपत्ती पूर्व व्यवस्थापन, आपत्तीचा प्रभाव कमी करण्याच्या उपाययोजना, भूकंप, दुष्काळ व एल निनो (El Nino) आणि ला निनो (La Nino) या  हवामानविषयक संकल्पनांची योग्य माहिती असल्याशिवाय प्रश्नाचा नेमका कल ओळखता येऊ शकत नाही. हा घटक व्यवस्थित समजून घेण्यासाठी पर्यावरण आणि हवामान याविषयाशी संबंधित संकल्पनांची माहिती असणे गरजेचे आहे, हे वरील प्रश्नांवरून दिसून येते.

भारत सरकारनेही आपत्तींना यशस्वीरीत्या हाताळण्यासाठी राष्ट्रीय, राज्यस्तरीय आणि स्थानिक पातळीवर विविध प्रकारच्या सरकारी यंत्रणा कार्यरत केलेल्या आहेत. तसेच याच्या जोडीला कायदेही करण्यात आलेले आहेत, ज्यामुळे देशातील आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षमपणे राबविता येऊ शकते. आपत्ती आणि आपत्ती व्यवस्थापन याविषयी जनजागृती करण्यासाठी सरकारकडून विशेष कार्यक्रमही राबविले जातात.

या घटकावर प्रश्न विचारताना संकल्पनात्मक पलूंचा अधिक विचार केलेला दिसून येतो आणि प्रश्नांचे स्वरूप सामान्यत: विश्लेषणात्मक पद्धतीचे आहे आणि याला चालू घडामोडींची सांगड घालण्यात आलेली आहे. या प्रश्नाची योग्य उकल करण्यासाठी सर्वप्रथम या घटकाची मूलभूत माहिती असणे महत्त्वाचे आहे.

या घटकासाठी नेमके कोणते संदर्भ वापरावेत याची आपण थोडक्यात माहिती घेऊ. या घटकासाठी एन.सी.ई.आर.टी अथवा सी.बी.एस.ई बोर्डाची शालेय पुस्तके सर्वप्रथम वाचावीत ज्याधून या घटकाची मूलभूत माहिती आपणाला मिळते. बाजारात या घटकासाठी अनेक गाइडस स्वरूपात पुस्तके उपलब्ध आहेत, यातील कोणतेही पुस्तक जे सोप्या पद्धतीने या घटकाची माहिती देईल ते वाचावे. उदाहरणार्थ आर. गोपालन लिखित Environmental studies  हे पुस्तक. यामध्ये आपत्ती व्यवस्थापन संबंधित प्रकरण आहे. हा घटक पर्यावरण आणि हवामान याच्याशी मोठय़ा प्रमाणात संबंधित आहे आणि यातील महत्त्वाच्या संकल्पना समजून घेण्यासाठी पी.डी.शर्मा लिखित Ecology and Environment पुस्तक अभ्यासावे. या घटकाचा चालू घडामोडींच्या अनुषंगाने अभ्यास करण्यासाठी ‘द हिंदू’ आणि ‘इंडियन एक्सप्रेस’ ही इंग्रजी दैनिके, योजना, कुरुक्षेत्र, डाऊन टू अर्थ आणि वर्ल्ड फोकस ही मासिके, तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या संकेतस्थळांचा वापर करावा.

विद्यापीठ विश्व : संगणक विज्ञानातील अग्रेसर कार्नेजी मेलन विद्यापीठ, अमेरिका

MPSC chalu ghadamodi, current affairs-UPSC-university information

468   19-Nov-2019, Tue

अमेरिकेतील पेन्सिल्वेनिया या राज्यातील पिट्सबर्ग शहरात असलेले कान्रेजी मेलन विद्यापीठ (सीएमयू) हे एक प्रमुख खासगी संशोधन विद्यापीठ आहे. २०१९ सालच्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सटिी रँकिंगनुसार जागतिक क्रमवारीत या विद्यापीठाचा सेहेचाळीसवा क्रमांक आहे. या विद्यापीठाची स्थापना इसवी सन १९०० साली अँड्रय़ू कान्रेजी या तत्कालीन श्रीमंत उद्योगपतीने ‘कान्रेजी टेक्निकल स्कूल्स’ या नावाने केली होती. १९१२ साली त्या संस्थेला विद्यापीठाचे स्वरूप देऊन तिचे ‘कान्रेजी इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ असे नामकरण करण्यात आले. १९६७ मध्ये या संस्थेचे ‘मेलन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडस्ट्रियल रिसर्च’ या अमेरिकेतील दुसऱ्या एका तांत्रिक संस्थेबरोबर विलीनीकरण करण्यात आले. विलीनीकरणानंतर नव्या संस्थेने ‘कान्रेजी मेलन विद्यापीठ’ हे नाव ग्रहण केले. विद्यापीठाचा मुख्य कॅम्पस पिट्सबर्ग शहरातच आहे. त्याशिवाय कॅलिफोर्नियामधील ‘सिलिकॉन व्हॅली’मध्ये दुसरा कॅम्पस तर तिसरा मध्यपूर्वेत आंतरराष्ट्रीय कॅम्पस ‘कतार’ येथे आहे. तसेच विद्यापीठ वीसपेक्षाही अधिक संशोधन संस्थांसह शैक्षणिक कराराच्या माध्यमातून जोडले गेले आहे. पिट्सबर्गमधील कान्रेजी मेलन विद्यापीठाचा मुख्य कॅम्पस जवळपास अडीचशे एकरमध्ये पसरलेला आहे. शिकागोमधील कॅम्पस एकशे चाळीस  एकरांमध्ये व्यापलेला आहे. सध्या कान्रेजी मेलनमध्ये शंभराहून अधिक देशांमधून आलेले एक हजारांहूनही अधिक प्राध्यापक-संशोधक आपले अध्यापन-संशोधनाचे कार्य करत आहेत. जवळपास पंधरा हजार पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण पूर्ण करत आहेत.

अभ्यासक्रम – कार्नेजी मेलन विद्यापीठात सात प्रमुख विभाग (कॉलेजेस) आणि इतर काही स्वतंत्र विभाग आहेत. यामध्ये कॉलेज ऑफ इंजिनीअिरग, कॉलेज ऑफ फाइन आर्ट्स, डेट्रिक कॉलेज ऑफ ह्युमॅनिटीज अ‍ॅण्ड सायन्सेस, मेलन कॉलेज ऑफ सायन्स, टेपर स्कूल ऑफ बिझनेस, कॉलेज ऑफ इन्फॉम्रेशन सायन्स अ‍ॅण्ड पब्लिक पॉलिसी, स्कूल ऑफ कॉम्प्युटर सायन्स हे सात विभाग आहेत. कान्रेजी मेलन विद्यापीठाचा पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी चार वर्षांचा आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा कालावधी वेगवेगळा आहे. कान्रेजी मेलन विद्यापीठ या सर्व विभागांच्या माध्यमातून हजारांहूनही अधिक अभ्यासक्रम सर्व स्तरांवर चालवते. विद्यापीठाकडे पदवी, पदव्युत्तर आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाबरोबरच ‘समर रिसर्च फेलोशिप्स’सारखे अभ्यासक्रमदेखील उपलब्ध आहेत. अभ्यासक्रमासाठी पर्यायांची भरपूर उपलब्धता असल्याने अभ्यासक्रम वा विषय निवडीसाठी विद्यापीठाचे स्वतंत्र कार्यालय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी सज्ज आहे. विद्यापीठातील अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीसाठी पदवी वा पदव्युत्तर स्तरासाठी आवश्यक असलेल्या जीआरई, टोफेल, सॅट, जीमॅट यांसारख्या प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे विद्यार्थ्यांसाठी गरजेचे आहे. २०१८ सालच्या ‘यूएस न्यूज अ‍ॅण्ड वर्ल्ड रिपोर्ट’च्या जागतिक अहवालानुसार विद्यापीठाचा संगणक विभाग हा जगातील प्रथम क्रमांकाचा शैक्षणिक व संशोधन विभाग आहे. तसेच २०१७ सालच्या हॉलीवूड रिपोर्टरच्या अहवालानुसार विद्यापीठाचा नाटय़ विभाग हा जगभरात दुसऱ्या क्रमांकाचा आहे.

सुविधा – कार्नेजी मेलन विद्यापीठाकडून बहुतांश आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत दिली जाते. विशेष म्हणजे विद्यापीठाचे बहुतांश विभाग स्वत: यामध्ये पुढाकार घेतात. विभागांकडे उपलब्ध असलेल्या एकूण निधीवर विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, पाठय़वृत्ती, शैक्षणिक शुल्कामध्ये कपात यांसारख्या पर्यायांचा वापर करण्याचे ठरवले जाते. विद्यापीठाने आपल्या परिसरात वसतिगृहांची सुविधा, कॅफेटेरिया, रेस्टॉरंट आणि इतर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. याव्यतिरिक्त विद्यापीठाच्या आवारात भरपूर क्लब्स आणि तत्सम केंद्रे आहेत. त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी प्रदर्शने, व्याख्याने, कॉन्सर्ट्स, परफॉर्मन्सेस आयोजित केली जातात. विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना वेळोवेळी करिअर मार्गदर्शन, आरोग्य आणि क्रीडा सुविधा दिल्या जातात.

वैशिष्टय़ – कार्नेजी मेलनच्या आजी-माजी प्राध्यापकांमध्ये वीस नोबेल विजेत्यांचा समावेश आहे. याशिवाय विद्यापीठाचे कित्येक माजी विद्यार्थी ऑस्कर व पुलित्झर पुरस्कार विजेते, टय़ुरिंग व ऱ्होड्स पुरस्कार विजेते आहेत. १४०पेक्षाही अधिक देशांतील एक लाखापेक्षा जास्त माजी विद्यार्थ्यांचे जाळे विणण्यात विद्यापीठाला यश आले आहे.

विद्यापीठाचे विशेषत: संगणक विज्ञान विभागातील प्राध्यापक-संशोधकांचे संशोधन क्षेत्राला असलेले योगदान वाखाणण्याजोगे आहे. विद्यापीठाच्या संगणक विज्ञान विभागातील संशोधन हे ‘पिट्सबर्ग सुपरकॉम्प्युटिंग सेंटर’, ‘रोबोटिक्स इन्स्टिटय़ूट’, ‘सॉफ्टवेअर इंजिनीअिरग इन्स्टिटय़ूट’ आणि ‘ह्य़ुमन- कॉम्प्युटर इंटरॅक्शन इन्स्टिटय़ूट’ यांसारख्या जागतिक दर्जाच्या संशोधन संस्थांशी संलग्न होऊन चालते. प्रायोजित संशोधन हा कान्रेजी मेलन विद्यापीठाचा प्रमुख उत्पन्नाचा स्रोत आहे. त्यामुळेच कान्रेजी मेलन हे अमेरिकेतील श्रीमंत विद्यापीठांपकी एक आहे.

शतकापूर्वीचे शिक्षण केंद्र सिडनी विद्यापीठ, ऑस्ट्रेलिया

upsc strategy- india and world_The University Of Sydney Akp 94

1056   22-Oct-2019, Tue

विद्यापीठाची ओळख – ऑस्ट्रेलियामधील एक महत्त्वाचे विद्यापीठ असलेले सिडनी विद्यापीठ (द युनिव्हर्सटिी ऑफ सिडनी) हे २०१९ सालच्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सटिी रँकिंगनुसार जगातले बेचाळिसाव्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे. ऑस्ट्रेलियामधील सिडनी शहरामध्ये स्थित असलेले हे विद्यापीठ त्या देशामध्ये स्थापन केले गेलेले पहिले विद्यापीठ आहे. या विद्यापीठाची स्थापना १८५० साली करण्यात आली. सिडनी विद्यापीठ हे शासकीय संशोधन विद्यापीठ आहे. सिडनी विद्यापीठाचा मुख्य कॅम्पस हा जगातल्या दहा सर्वोत्कृष्ट विद्यापीठांपकी एक आहे. ‘द स्टार्स चेंज, माइंड रिमेन्स सेम’ हे या विद्यापीठाचे ब्रीदवाक्य आहे. सिडनी विद्यापीठामध्ये सध्या जवळपास पाच हजारपेक्षा अधिक तज्ज्ञ प्राध्यापक-संशोधक आणि प्रशासकीय वर्ग आहे तर जवळपास चार हजार डॉक्टरल विद्यार्थ्यांसहित साठ हजारपेक्षाही अधिक पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण व संशोधन पूर्ण करत आहेत. विद्यापीठाचे इतर कॅम्पस सिडनीमध्येच आहेत. विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये, शैक्षणिक आणि संशोधन केंद्रे व तत्सम कॅम्पस ऑस्ट्रेलियामध्ये ठिकठिकाणी स्थित आहेत.

अभ्यासक्रम – सिडनी विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रम हे तीन, चार किंवा त्याहून अधिक वर्षांच्या कालावधीचे पूर्ण वेळ अभ्यासक्रम आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रम एक वर्षांपासून ते चार वर्षांपर्यंतच्या कालावधीचे आहेत. डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी आणि प्रोफेशनल डॉक्टरेट अशा दोन पद्धतीने पीएचडी पदवी विद्यार्थ्यांना ग्रहण करता येते. सिडनी विद्यापीठाकडे उपलब्ध असलेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांची संख्या साडेचारशेपेक्षा जास्त आहे. सिडनी विद्यापीठामध्ये एकूण सहा फॅकल्टी-शैक्षणिक विभाग आणि तीन युनिव्हर्सटिी स्कूल्स आहेत. विद्यापीठात पदवी स्तरावर आर्ट्स अ‍ॅण्ड सोशल सायन्स, बिझनेस, इंजिनिअिरग, हेल्थ सायन्सेस, मेडिसिन, अ‍ॅण्ड हेल्थ, सायन्स हे शैक्षणिक विभाग आहेत तर आíकटेक्चर, डिझाइन अ‍ॅण्ड प्लॅनिग, कन्झव्‍‌र्हेटेरियम ऑफ म्युझिक आणि लाँ हे युनिव्हर्सटिी स्कूल्स आहेत. याबरोबरच पदव्युत्तर स्तरावर आíकटेक्चर, डिझाइन अ‍ॅण्ड प्लॅनिग, आर्ट्स अ‍ॅण्ड सोशल सायन्स, बिझनेस, इंजिनीअिरग अ‍ॅण्ड कॉम्प्युटर सायन्सेस, मेडिसिन अ‍ॅण्ड हेल्थ, एज्युकेशन अ‍ॅण्ड सोशल वर्क, सायन्स, म्युझिक आणि लॉ हे नऊ विभाग आहेत.

सुविधा – सिडनी विद्यापीठाच्या या परिसरामध्ये विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या निवासाच्या सोयीसाठी ‘हॉल्स ऑफ रेसिडन्सेस’ म्हणजेच वसतिगृहांच्या माध्यमातून केलेले आहे. याशिवाय सर्व सोयीसुविधांनी युक्त व आधुनिक जीवनशैलीने सुसज्ज अशी निवासी महाविद्यालये आहेत. विद्यापीठाचे मोठे ‘द युनिव्हर्सटिी ऑफ सिडनी लायब्ररी’ ग्रंथालय असून त्यामध्ये स्वतंत्र अकरा ग्रंथालये आहेत. याशिवाय विद्यापीठाची ‘सेंटर फॉर कन्टिन्युइंग एज्युकेशन’ हे प्रौढ शिक्षण केंद्र, निकोलस म्युझियम आणि मॅक्ले म्युझियम ही संग्रहालये, ‘द युनिव्हर्सटिी आर्ट कलेक्शन’ आणि ‘द युनिव्हर्सटिी आर्ट गॅलरी’ या गॅलरीज आहेत. याशिवाय विद्यापीठाच्या आवारात आरोग्य केंद्र, आंतरराष्ट्रीय आरोग्य विमा, पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पदवीपूर्व तयारी अभ्यासक्रम, करिअर मार्गदर्शन केंद्र, कॅफे, अद्ययावत व्यायामशाळा, बगीचे इत्यादी बाबी आहेत. विद्यापीठ आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी विविध स्वरूपात आर्थिक मदत दिली जाते. यामध्ये शिष्यवृत्ती, पाठय़वृत्ती, शैक्षणिक शुल्कामध्ये कपात आणि ‘ऑन कॅम्पस जॉब्ज’ यांसारख्या वेगवेगळ्या पर्यायांचा अवलंब केला जातो. विद्यापीठाच्या परिसरामध्ये विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडीला वाहून घेतलेले विविध सांस्कृतिक, क्रीडा आणि शैक्षणिक क्लब्ज आहेत.

 

वैशिष्टय़

सिडनी विद्यापीठ हे ऑस्ट्रेलियातील एक प्रमुख संशोधन विद्यापीठ आहे. विद्यापीठाचे संशोधन जागतिक स्तरावर गौरवले गेले आहे. जगभरातील विविध अशा नव्वद विषयांतील संशोधनासाठी सिडनी विद्यापीठ हे एका अर्थाने ‘विद्येचे माहेरघर’ आहे. विद्यापीठातील ‘चार्ल्स पíकन्स सेंटर, द ब्रेन अ‍ॅण्ड माइंड सेंटर, द युनिव्हर्सटिी ऑफ सिडनी नॅनो सेंटर’ ही प्रमुख संशोधन केंद्रे आरोग्य, हवामान बदल आणि अन्न सुरक्षा यांसारख्या जगाला भेडसावणाऱ्या समस्यांवर अविरत संशोधन करत आहेत. सिडनी विद्यापीठ हे ‘ग्रुप ऑफ एट, सीईएमएस, द असोसिएशन ऑफ पॅसिफिक रिम युनिव्हर्सटिीज (एपीआरयू) आणि वर्ल्डवाइड युनिव्हर्सटिीज नेटवर्क’ इत्यादी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संस्थांचे सदस्य आहेत. या विद्यापीठातील विद्यार्थी-प्राध्यापकांना आतापर्यंत पाच नोबेल पुरस्कार मिळालेले आहेत. ऑस्ट्रेलियातील सात पंतप्रधान आणि दोन गव्हर्नर जनरल हे या विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. विद्यापीठाने आतापर्यंत ११० ऱ्होड्स स्कॉलर्स तर १९ गेट स्कॉलर्स निर्माण केलेले आहेत. विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांच्या संपर्काचा आजी विद्यार्थ्यांना भरपूर फायदा होतो. विद्यापीठातून पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना रोजगार मिळण्याचे प्रमाण अतिशय उत्तम आहे. रोजगार मिळवण्याच्या निकषामध्ये सिडनी विद्यापीठाचा जगामध्ये पाचवा क्रमांक आहे. पदवी आणि पदव्युत्तर अशा दोन्ही स्तरांवरील विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून इंटर्नशिप्सची संधी दिली जाते.

सिडनी विद्यापीठ हे एक प्रतिष्ठित विद्यापीठ आहे.  माजी विद्यार्थ्यांनी या विद्यापीठाची एक उत्तम प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर तयार केलेली आहे. ज्याचा फायदा आजी विद्यार्थ्यांना निश्चितच होतो. त्यामुळे मलासुद्धा  तंत्रज्ञान क्षेत्रातील एका प्रसिद्ध सल्लागार कंपनीकडून इंटर्नशिप मिळाली, तेही कोणताही अनुभव नसताना.  मला विद्यापीठातील अभियांत्रिकी विभाग सर्वोत्तम वाटतो. कारण येथे शिक्षकांकडून केवळ पुस्तकी शिक्षणावरच नव्हे तर प्रात्यक्षिकांवर विशेष भर दिला जातो.   विषयाची एकूण समज आणि तांत्रिक कौशल्ये विकसित करण्यासाठी या गोष्टीचा निश्चितच फायदा होतो.’’

यूपीएससीची तयारी : प्राकृतिक भूगोल

physical,geography, Upsc Exam 2019 Preparation Of Upsc Zws 70

3022   06-Aug-2019, Tue

आपण भूगोल या विषयातील प्राकृतिक भूगोल या घटकाची परीक्षेच्या दृष्टीने तयारी कशी करावी, याबाबत माहिती घेणार आहोत. प्राकृतिक भूगोल या घटकावर २०१३ मध्ये ४; २०१४ मध्ये ५; २०१५ मध्ये ६; २०१६ मध्ये ५; २०१७ मध्ये ४; आणि २०१८ मध्ये ३ प्रश्न विचारण्यात आले होते. अभ्यासक्रमामध्ये भारत व जगाचा भूगोल असे नमूद केलेले आहे म्हणून प्राकृतिक भूगोलाची तयारी करताना जगाचा प्राकृतिक भूगोल आणि भारताचा प्राकृतिक भूगोल अशी सर्वसाधारण विभागणी करावी लागते. या विषयाचे परीक्षेच्या दृष्टीने अभ्यासाचे नियोजन करताना सर्वप्रथम या विषयातील घटकाची माहिती असणे आवश्यक आहे. प्राकृतिक भूगोलामध्ये मुखत्वे भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, सागरशास्त्र, जैविक भूगोल आणि पर्यावरणीय भूगोल यांसारख्या घटकांचा समावेश होतो. या सर्व घटकांचे मूलभूत अर्थात पारंपरिक ज्ञान सर्वप्रथम अभ्यासावे लागते. वर नमूद केलेल्या घटकासंबंधी अभ्यासाव्या लागणाऱ्या संकल्पना, त्यांची वैशिष्टय़े याची माहिती सर्वप्रथम असणे आवश्यक ठरते.

पुढे आपण २०१३ ते २०१८ दरम्यान घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षांमध्ये या घटकावर विचारण्यात आलेल्या काही प्रश्नांची थोडक्यात चर्चा करणार आहोत.

* ‘भूखंड अपवहन सिद्धांताद्वारे तुम्हाला नेमके काय समजते? याच्या समर्थनार्थ प्रमुख पुराव्यानिशी चर्चा करा.’ (२०१३)

या प्रश्नाचा मुख्य रोख हा भूखंड अपवहन सिद्धांतावर आहे आणि हा प्रश्न योग्य पद्धतीने समजून घेण्यासाठी हा सिद्धांत नेमका काय आहे, या सिद्धांताची मांडणी कोणी केली आणि यामध्ये नेमक्या कोणत्या प्राकृतिक घडामोडींची चर्चा करण्यात आलेली आहे अशा विविधांगी पलूंचा विचार करून या प्रश्नाचे उत्तर लिहिणे अपेक्षित आहे.

* ‘‘हिमालयातील हिमनद्यांमध्ये होणारी घट आणि भारतीय उपखंडामध्ये जागतिक तापमानवाढीच्या लक्षणांचा संबंध उघड करा.’’ (२०१४)

या प्रश्नाचे आकलन होण्यासाठी हिमनदी म्हणजे काय, तिची निर्मिती कशी होते, या प्रकारच्या नद्या हिमालय पर्वत रांगांमध्येच का आहेत याची माहिती सर्वप्रथम असणे गरजेचे आहे. या प्रश्नाचा मुख्य कल हा एका विशिष्ट प्रक्रियेशी म्हणजे जागतिक तापमानवाढीशी जोडण्यात आलेला आहे आणि जागतिक तापमानवाढीमुळे या हिमनद्यांमध्ये कशी घट होत आहे याची पुराव्यानिशी चर्चा करून या प्रश्नाचे उत्तर आपणाला लिहावे लागते.

* ‘‘आर्क्टिक समुद्रामध्ये शोधण्यात आलेल्या खनिज तेलाचे आर्थिक महत्त्व काय आहे आणि याचे संभाव्य पर्यावरणीय परिणाम काय असू शकतात.’’ (२०१५)

आर्क्टिक समुद्राचे भौगोलिक स्थान काय आहे आणि याचा पृथ्वीच्या वातावरणावर नेमका काय परिणाम होतो याची सर्वप्रथम माहिती असणे गरजेचे आहे. त्यानंतर आर्क्टिक समुद्रातील खनिज तेलाचे आर्थिक महत्त्व लक्षात घ्यायला हवे. सद्य:स्थितीमध्ये जगातील विविध देशांची ऊर्जेची गरज भागवण्यासाठी या खनिज तेलाचा उपयोग होऊ शकतो.  आर्क्टिक समुद्रावर अधिपत्य असणाऱ्या देशांना याचा होणारा आर्थिक लाभ, या खनिज तेलाचे उत्पादन करताना आक्र्टिक समुद्रामध्ये केले जाणारे उत्खनन आणि यामुळे येथील प्रदेशाच्या भौगोलिक रचनेत होणारा बदल आणि या बदलांचा येथील पर्यावरणावर होणारा परिणाम अशा विविधांगी बाबींचा एकत्रित विचार करणे गरजेचे आहे. तो केल्याशिवाय या प्रश्नाचे योग्य उत्तर लिहिता येणार नाही.

* २०१६ मध्ये या घटकातील हिमालय पर्वतातील दरडी कोसळण्याचे प्रमाण अधिक आहे, परिणामकारकरीत्या केलेले जमीन आणि पाणी व्यवस्थापन हे मानवी विपत्ती कमी करू शकते, दक्षिण चिनी समुद्राचे भूराजकीय महत्त्व, भारतातील प्रमुख शहरांमधील पुरांची समस्या, भारतातील अंतर्गत जल वाहतूक व समस्या इत्यादीवर प्रश्न विचारण्यात आलेले होते.

* २०१७ मध्ये आशिया मान्सून आणि लोकसंख्या संबंध, महासागरीय क्षारतेतील फरकाची कारणे सांगा आणि याच्या बहुआयामी परिणामांची चर्चा करा, कोळसा खाणीच्या विकासासाठी असणारी अपरिहार्यता आणि याचे प्रतिकूल पर्यावरणीय परिणाम असे प्रश्न विचारण्यात आलेले होते. हे प्रश्न प्राकृतिक भूगोलाची पारंपरिक माहिती आणि चालू घडामोडीचा संबंध जोडून विचारण्यात आलेले होते.

* २०१८ मध्ये समुद्री पारिस्थितीकीवर आणि मृत क्षेत्रे, तसेच आच्छादन (mantle plume) याची व्याख्या आणि आच्छादन याची प्लेट टेक्टोनिकमध्ये असणारी भूमिका स्पष्ट करा, अशा स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात आलेले होते.

उपरोक्त प्रश्नांचे विश्लेषण केल्यास असे दिसून येते की पर्यावरण आणि हवामान संबंधित घटकांवर अधिक प्रश्न विचारले गेले आहेत. त्याचबरोबर प्रश्न विचारताना या विषयाचे पारंपरिक ज्ञान, यातील महत्त्वाच्या संकल्पना तसेच यासंबंधी घडणाऱ्या चालू घडामोडींचा एकत्रित वापर केलेला दिसून येतो. यातील बहुतांश प्रश्न भारत व जगाच्या प्राकृतिक घडामोडीच्या पाश्र्वभूमीचा एकत्रित विचार करून विचारण्यात आलेले आहेत. म्हणून प्राकृतिक भूगोलाची संपूर्ण तयारी करण्याबरोबरच चालू घडामोडीचा अभ्यास करावा लागतो. थोडक्यात अभ्यासक्रमामध्ये नमूद घटकाच्या आधारे या प्रश्नांची विभागणी करावी आणि अभ्यासाची दिशा निर्धारित करावी. त्याचबरोबर महत्त्वाची बाब म्हणजे प्रश्न विचारण्याचा कल हा केव्हाही बदलला जाऊ शकतो, त्यामुळे हा घटक सर्वंकष आणि सखोल पद्धतीने अभ्यासणे अपरिहार्य ठरते.

या घटकाची मूलभूत माहिती सर्वप्रथम अभ्यासावी. यासाठी आपणाला एनसीईआरटीच्या  Fundamentals of Physical Geography (XI), Indian Physical Environment(XI), या क्रमिक पुस्तकांचा आधार घेता येतो. ज्यामुळे या विषयाचे सरळ व सोप्या भाषेत आकलन करता येऊ शकेल आणि या माहितीला विस्तारित करण्यासाठी ‘Certificate Physical and Human Geography (by Goe Cheng Leong), Fundamentals of Physical Geography (by Majid Husain), India A Comprehensive Geography ( by D.R. Khullar), World Geograhy (by Majid Husain) या संदर्भ ग्रंथांचा आधार घेता येतो.

या विषयाच्या स्वत:च्या नोट्स तयार कराव्यात. स्वत:च्या अभ्यासाची तयारी कितपत झालेली आहे, हे कळण्यासाठी उत्तर लेखनाचा सराव करावा व मूल्यमापन करून घ्यावे. त्यामुळे आपल्या अभ्यासातील उणिवा दूर करून अधिक नेमकेपणाने उत्तर लिहिण्याचा सराव करता येतो आणि चांगले गुण प्राप्त करता येऊ शकतात. तसेच महत्त्वाची बाब म्हणजे हा घटक आपणाला सामान्य अध्ययनासाठी तयार करायचा आहे याचे भान ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे नोट्स तयार करताना त्यातील समर्पकता आणि महत्त्वाच्या मुद्दय़ांचाच अंतर्भाव करणे अधिक श्रेयस्कर ठरते.

यूपीएससी : भूगोल चालू घडामोडींच्या अनुषंगाने

upsc strategy- geography-Upsc Exam Preparation Akp 94 5

178   30-Sep-2019, Mon

आपण भूगोल विषयातील चालू घडामोडींच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा ऊर्जा साधन संपत्ती हा घटक चच्रेला घेणार आहोत. प्रत्येक राष्ट्राला अर्थव्यवस्थेच्या वृद्धी विकासाकरिता ऊर्जेचा विनाअडथळा, पुरेसा पुरवठा आवश्यक असतो. परिणामी, प्रत्येक राष्ट्र ऊर्जेबाबत स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न करत असते. थोडक्यात, ऊर्जा साधनसंपत्तीचा अभ्यास आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचा घटक आहे. या घटकावर गेल्या काही वर्षांमध्ये आलेले प्रश्न पुढीलप्रमाणे आहेत.

प्र. १.With growing scarcity of fossil fuels, the atomic energy is gaining more and more significance in India. Discuss the availability of raw material required for the generation of atomic energy in India and in the world. (१० गुण)

 प्र. २.  In spite of adverse environmental impact, coal mining is still inevitable for development. Discuss. (१० गुण)

प्र. ३.  Petroleum refineries are not necessarily located nearer to crude oil producing areas, particularly in many of the developing countries. Explain its implications.  (१० गुण)

 वरील प्रश्नांचा विचार केल्यास असे जाणवते की, या घटकावर संकल्पनात्मक किंवा विश्लेषणात्मक प्रश्न विचारले जाण्याची शक्यता फार नाही. बहुतांश प्रश्न माहितीवर (Informative) आधारित स्वरूपाचे आहेत. या घटकाचा अभ्यास करताना काही मूलभूत गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे.

आपल्या दैनंदिन जीवनात आपण घरगुती व व्यावसायिक पातळीवर ऊर्जा वापरतो. या ऊर्जा प्रकारांचा अभ्यास केल्यास दगडी कोळसा, रॉकेल, LPG, CNG, लाकूड, वीज या स्रोतांचा वापर सर्वाधिक केला जातो. थोडक्यात जीवाश्म इंधने व वीज हे प्रमुख ऊर्जास्रोत आहेत. त्यापकी वीजनिर्मितीसाठी आपण भारतामध्ये विविध पर्यायांचा वापर करतो. त्या पर्यायांमध्ये पुढील घटक समाविष्ट होतात. जल-विद्युत प्रकल्प, औष्णिक विद्युत प्रकल्प, अणू विद्युत प्रकल्प, सौरऊर्जेपासून वीजनिर्मिती, पवनऊर्जेपासून वीजनिर्मिती, सागरी लाटा, भरती-ओहोटी, सागर प्रवाह यांपासून वीजनिर्मिती, OTEC (Ocean Thermal Energy Conversion), भू-औष्णिक वीजनिर्मिती व जैव ऊर्जेपासून वीजनिर्मिती.

या मार्गानी वीजनिर्मितीचे तंत्रज्ञान भारतात कोणत्या टप्प्यावर विकसित झाले आहे, या प्रकल्पांची भारतातील सद्य:स्थितीतील उपस्थिती, स्थापित क्षमता व एकूण वीजनिर्मिती यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. या प्रकारांपकी जे प्रकल्प पुनर्नवीकरणीय व पर्यावरणपूरक आहेत ते आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने जास्त महत्त्वाचे आहेत. अशा पर्यायांबद्दल केंद्र सरकारचे धोरण व सद्य:स्थितीतील योजना व कार्यक्रम यांचा अभ्यास करावा. त्यामध्ये प्रामुख्याने सौरऊर्जा, पवनऊर्जा व लाटांपासून ऊर्जा हे पर्याय सर्वाधिक महत्त्वाचे आहेत.

वीजनिर्मितीमध्ये महत्त्वाचा पर्याय विद्युत उर्जा आहे. भारताने गेल्या दोन दशकांत अणुऊर्जेवरील अवलंबित्व मोठय़ा प्रमाणात वाढविले आहे. त्या अनुषंगाने भारतातील अणु इंधनाचे साठे, त्यांचे वितरण, उत्पादन आणि भारताद्वारे परराष्ट्राकडून होणारी अणू इंधनाची खरेदी या घटकांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

वीज या ऊर्जास्रोतानंतर अभ्यासावयाचा स्रोत आहे तो म्हणजे जीवाश्म इंधने ! जीवाश्म इंधनांचा पर्यावरणावरील दुष्परिणाम सिद्ध होऊनसुद्धा भारताचे त्यावरील अवलंबित्व फार मोठय़ा प्रमाणात कमी झालेले नाही. परिणामी, भारतातील दगडी कोळशाचे साठे, खनिज तेल व नसíगक वायूचे साठे, त्यांचे वितरण, उत्पादन यांचा सखोल अभ्यास करावा. भारताचा डढएउ राष्ट्रांशी तेलाचा व्यापार, त्याचे स्वरूप, एकूण आयातीतील त्याचा वाटा अभ्यासावा. भारतातील तेलशुद्धीकरण प्रकल्प, तेल व वायू वाहक नलिका मार्गाचे जाळे यांचा नकाशांसह अभ्यास करावा.

सद्य:स्थितीतील वापरामध्ये असणाऱ्या ऊर्जास्रोतांऐवजी नवीन ऊर्जास्रोतांचा विकास केला जात आहे. त्यामध्ये हायड्रोजनसारख्या नवीन स्रोताचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. तसेच इतर पर्यायांचा विचार करावा. त्याबाबतची भारताची भूमिका व विकास भविष्यातील योजनांचा विचार करावा. अशा प्रकारे ऊर्जा साधन संपत्तीच्या अभ्यासाची रणनीती आखणे आवश्यक आहे. ऊर्जा संपत्तीबाबत मूलभूत संकल्पना अभ्यासल्यानंतर चालू घडामोडींचा सखोल आढावा घ्यावा.

आयोगाच्या प्रश्नांचा विचार केल्यास प्रश्न अणुऊर्जा, जीवाश्म इंधने, त्यांचे वितरण, त्याचा पर्यावरणावरील दुष्परिणाम यांवर प्रामुख्याने केंद्रित आहे. वर नमूद केलेल्या प्रश्नांपकी पहिल्या प्रश्नात अणू इंधनाचे वितरण स्पष्ट करताना भारत व जगाच्या नकाशावर वितरण मांडल्यास चांगले गुण प्राप्त होतील. दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर मांडताना इतर पर्यायांचा पुरेसा विकास न झाल्याने कोळशावरील अवलंबित्वाची भारताची अपरिहार्यता स्पष्ट करावी. ती स्पष्ट करताना त्याचे दुष्परिणाम थोडक्यात स्पष्ट करावेत. तिसरा प्रश्न ऊर्जा साधन संपत्तीपेक्षा उद्योगांचे स्थानिकीकरण याच्याशी संबंधित आहे. त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये तेल शुद्धीकरण प्रक्रियेचा व त्यातील उप उत्पादने व त्यावर आधारित उद्योगांचा विकास; या घटकांचा विचार करून विकसनशील देशांसंदर्भात त्याचे परिणाम विशद करणे आवश्यक आहे.

थोडक्यात, विद्यार्थ्यांनी भारताची सद्य:स्थितीतील ऊर्जा साधन संपत्तीबाबतची ध्येयधोरणे लक्षात घेऊन, मूलभूत संकल्पना स्पष्ट करून अभ्यास करावा. या घटकावर नजीकच्या भविष्यात पुन्हा प्रश्न येणार हे निश्चित आहे.

यूपीएससी जागतिकीकरणाचे मुद्दे

upsc strategy- Upsc Exam Preparation Akp 94

450   29-Sep-2019, Sun

यूपीएससीच्या २०१३ साली झालेल्या लेखी परीक्षेत वृद्धांवर होणाऱ्या जागतिकीकरणाच्या परिणामांबाबत प्रश्न विचारला गेला होता. आजघडीलासुद्धा बहुतांश सामाजिक मुद्दे कमी-अधिक प्रमाणात जागतिकीकरणाच्या प्रभावापासून स्वत:ला वाचवू शकत नाहीत. त्यामुळे जागतिकीकरण हा सामाजिक मुद्दा म्हणून समजून घेताना संकल्पना आणि तिचा व्यवहार, त्यात गुंतलेले विविध प्रवाह, तसेच त्याकडे पाहण्याचे विविध दृष्टिकोन समजून घेणे आवश्यक ठरते.

संपूर्ण जगाच्या एका मोठय़ा बाजारपेठेत रूपांतरित होण्याच्या प्रक्रियेला जागतिकीकरण म्हणतात. वस्तू आणि सेवा तसेच भांडवल आणि श्रम यांच्या व्यापारावरील र्निबध उठवून जागतिक पातळीवर व्यापार खुला करण्याची प्रक्रिया यात सामावलेली आहे. खऱ्या अर्थाने ही प्रक्रिया १९व्या शतकापासून सुरू झाली. भांडवलशाहीची वाढ, उपलब्ध सागरी दळणवळण, टेलिग्रामपासून ते २०व्या शतकातील उपलब्ध हवाई मार्ग, दूरध्वनी, संगणक, बहुराष्ट्रीय कंपन्या, व्यापार आणि गुंतवणुकीवरील र्निबध सल होण्यातून ही प्रक्रिया सुरू झाली. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि एकविसाव्या शतकाच्या पूर्वाधात माहिती तंत्रज्ञान, इंटरनेट आणि सेवांचा उदय आणि पुढे व्यापार जागतिक पातळीवर खुला झाल्याने जागतिकीकरणाच्या प्रक्रियेने वेग घेतला.

जागतिकीकरणाच्या समर्थकांच्या मते, अविकसित आणि विकसनशील देशांच्या आर्थिक विकासाला गती प्राप्त होऊन विकसित देश आणि बहुराष्ट्रीय कंपन्या गरीब देशात मोठी भांडवल गुंतवणूक करीत आहेत. अद्ययावत तंत्रज्ञानाचा प्रवाह मागास राष्ट्रांकडे जाताना दिसतो आहे. जागतिकीकरणाच्या धोरणातून दक्षिणपूर्व आशियायी देश आणि ब्राझील यांनी विकास संपादन केला आहे. याउलट जागतिकीकरणांतर्गत उदारीकरण, खासगीकरण, तंत्रज्ञानात्मक क्रांती, बहुराष्ट्रीय कंपन्या, आंतरराष्ट्रीयीकरण, राष्ट्र राज्याचा ऱ्हास, कल्याणकारी राज्याचा ऱ्हास, बाजारपेठांचे सार्वभौमत्व, बहुसांस्कृतिकवाद असेही प्रवाह सुरू झाले.

फ्रान्सिस फुकुयामा यांनी ‘जागतिकीकरणाला’ मानवी शासनाचे उदारमतवादी लोकशाहीचे अंतिम प्रारूप असे संबोधले. थॉमस फ्रीडमनच्या मते, जागतिकीकरण म्हणजे व्यापार, वित्त आणि माहितीच्या एकत्रीकरणातून एकच एक अशी जागतिक बाजारपेठ आणि संस्कृतीची निर्मिती होय. अँथनी गिडन्स म्हणतो त्याप्रमाणे जागतिकीकरण म्हणजे जगभरात सामाजिक संबंधांचे सघनीकरण घडून येणे होय.

या धर्तीवर २०१८च्या लेखी परीक्षेत ‘जागतिकीकरण हे सांस्कृतिक एकजिनसीकरणास प्रोत्साहन देणारे आहे. तरीही जागतिकीकरणाची सांस्कृतिक गुणवैशिष्टय़े ही भारतीय समाजाला सशक्त करणारीच ठरतात. विषद करा,’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. जे स्थानिक आहे ते जागतिक आहे आणि जे जागतिक ते स्थानिक आहे या प्रक्रियेला रॉबर्टसन विशिष्टतेचे सार्वत्रिकीकरण आणि सार्वत्रिकतेचे विशिष्टीकरण या रूपाने ओळखतो. आजघडीला संपूर्ण जग हे जागतिक खेडे बनून ‘विचार जागतिक आणि कृती राष्ट्रीय’ असाच नारा होताना दिसतो. ग्लोबल आणि लोकल यातून ग्लोकल बनले आहे. त्यामुळे अरेनाज यांनी यास ‘हायब्रीडायझेशन’ असे संबोधले. सांस्कृतिक आक्रमण आणि मागास राष्ट्रांचे आर्थिक सार्वभौमत्व पायदळी तुडवण्यामुळे जागतिकीकरणास नववसाहतवादाचे नवे रूप मानण्यात येते. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये कोणतीही व्यक्ती स्वतंत्र अथवा विभक्त समूहाचा भाग न राहता संपूर्ण समाजच थेट जागतिक व्यवहाराशी जोडला गेला आहे.

जागतिकीकरणाचा सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनावर परिणाम झालेला दिसतो. कुटुंब व्यवस्था, विवाह, स्त्री-पुरुष संबंध, जाती, जनजाती, भाषा या सामाजिक घटकांमध्ये संक्रमण घडते आहे. लहान मुले, तरुण वर्ग आणि वृद्धांचे जीवनमान प्रभावित झालेले आहे. ग्राहकवादाच्या प्रभावातून नवसमाज आकार घेत आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे लोकांच्या जीवनाचा सांस्कृतिक आकृतिबंध बदलत असून अमेरिकन कपडे, चायनीज अन्न, फ्रेंच व्हिस्की, इंग्लिश पॉप संगीत या बाबी नित्य परिचयाच्या झालेल्या आहेत. जागतिकीकरणातून नव्या नागरी समाजाची निर्मिती होत आहे.

जागतिकीकरणाचा स्पष्ट आविष्कार बाजारपेठा, व्यापार, वस्तू आणि वित्तीय गुंतवणूक या क्षेत्रातील आर्थिक प्रक्रियांमध्ये दिसून येतो. आर्थिक धोरणे, कृषी, रोजगार, नसर्गिक आणि मानवी संसाधने या गोष्टींवरही जागतिकीकरणाने प्रभाव टाकलेला आहे. जागतिकीकरणाची नसर्गिक नाळ उदारीकरणाशी जोडली असल्याने जगभर भांडवलाचा प्रवाह व बहुराष्ट्रीय कंपन्या तसेच कार्पोरेशन्स स्वत:चे जाळे विणत आहेत. त्यातून डिस्नेफिकेशन, मॅकडोनाल्डायझेशन आणि कोकाकोलोनायझेशन आदी शब्द आपल्या अंगवळणी पडत आहेत. थेट परकीय गुंतवणूक हे जगभरातील घटित बनले आहे.

राष्ट्र राज्याच्या सीमा धूसर होऊन राष्ट्रांचे सार्वभौमत्व धोक्यात आलेले आहे. कल्याणकारी भूमिकेतून माघार घेऊन राज्याने कायदा सुव्यवस्था सांभाळावी, असा दबाव तयार होत आहे. राज्यसंस्था बिगरराजकीय अभिकर्त्यांच्या मदतीने राज्य कारभार चालवीत आहे. त्यातून प्रातिनिधिक लोकशाही राजकारणाचा अवकाश नागरी समाजाकडून गिळंकृत केला जात आहे. जागतिकीकरणामुळे राष्ट्रातीत नागरिकत्व निर्माण होत आहे. विल किमलिका यांच्या मते, आजघडीला बहुसांस्कृतिक नागरिकत्व उदयाला येत आहे. पुढे ही प्रक्रिया अशीच सुरू राहिली तर गोल्डस्मिथच्या शब्दात जागतिक नागरिकत्व या संकल्पना मूर्त रूपात येऊ शकतील. या उलट जागतिकीकरणात सांस्कृतिक वैविध्य नष्ट होऊन एकछापी संस्कृती निर्माण होते असाही प्रतिवाद केला जातो.

सोव्हिएत युनियनचे विघटन आणि आखातातील युद्ध, देशांतर्गत निर्माण झालेली राजकीय अस्थिरता तसेच अनिवासी भारतीयांची गुंतवणुकीमधून माघार यांच्या एकत्रित परिणामातून भारताने मिश्र अर्थव्यवस्थेला सोडचिठ्ठी देऊन खुले आर्थिक धोरण स्वीकारले. खासगी क्षेत्रावरील र्निबध काढून गुंतवणुकीचे मार्ग खुले केले. विदेशी गुंतवणुकीवरील बंधने हटवून भारतीय बाजारपेठ जागतिक बाजारपेठांशी जोडली गेली.

त्यामुळे मुख्य परीक्षेची तयारी करताना बदलती सार्वजनिक धोरण प्रक्रिया आणि योजना निर्मितीवरील जागतिकीकरणाचा प्रभाव समजून घ्यावा. जागतिकीकरणामुळे सामाजिक घटकांतील वाढती दरी आणि सामाजिक प्रश्नांबद्दल वाढती अनास्था याचाही विचार करावा. त्याचप्रमाणे जागतिकीकरणामुळे स्त्रिया, बालके, जाती-जनजाती, परिघावरील घटक यांच्यासमोर कोणती आव्हाने उभी राहिली, हे पाहावे. यासाठी योजना, फ्रंटलाइन यांसारख्या नियतकालिकांचाही वापर करावा. वृत्तपत्रात यासंबंधी आलेल्या विश्लेषणात्मक लेखाचा आधार घ्यावा.

प्रश्नवेध यूपीएससी : भूगोल चालू घडामोडी व संभाव्य प्रश्न

upsc strategy- geoghraphy-Geography Current Events Upsc Abn 97

198   29-Sep-2019, Sun

 भूगोल विषयाचा अभ्यास करताना आर्थिक भूगोलामधील नसर्गिक साधन संपत्ती हा महत्त्वाचा घटक आहे. एखाद्या राष्ट्राच्या आर्थिक विकासामध्ये राष्ट्रामध्ये उपलब्ध असलेली साधन संपत्ती अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. राष्ट्र जर आवश्यक साधन संपत्तीच्या उपलब्धतेबाबत स्वयंपूर्ण असेल तर त्या राष्ट्रास आर्थिक प्रक्रियांमध्ये वेगाने वाढ करून वेगात आर्थिक विकास साध्य करता येतो. या पार्श्वभूमीनुसार साधन संपत्तीवर प्रश्न विचारले जाणे अपेक्षित आहे. पृथ्वीवर उपलब्ध असणाऱ्या साधन संपत्तीमध्ये मृदा, जल, वन, पशू, खनिज व ऊर्जा साधन संपत्ती महत्त्वाची आहे. यापकी भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने ऊर्जा, खनिज, जल, मृदा संपत्ती सर्वाधिक महत्त्वाची असून त्या पाठोपाठ वन व पशू संपत्ती महत्त्वाची आहे. त्यामुळे २०११सालापासूनच्या मुख्य परीक्षेतील प्रश्नांचा आढावा घेतल्यास सातत्याने किमान एकतरी प्रश्न साधन संपत्तीवर विचारलेला आढळतो. त्यामध्ये देखील प्रामुख्याने ऊर्जा व जल साधन संपत्तीवर प्रश्न विचारलेले आढळतात. त्यापकी काही प्रश्नांचा आढावा आपण या लेखामध्ये घेणार आहोत.

  1. The ideal solution of depleting ground water resources in India is water harvesting systemll How can it be made effective in urban areas?
  2. In what way micro-watershed development projects help in water conservation in drought- prone and semi-arid regions of India?
  3. The effective management of Land and Water resources will drastically reduce the human miseries. Explain.
  4. India is well endowed with fresh water resources. Critically examine why it still suffers from water scarcity?

वरील प्रश्नांचा आढावा घेतल्यास भारतातील पाणीटंचाईची सद्य:स्थितीतील समस्या डोळ्यांसमोर ठेवून हे सर्व प्रश्न विचारले आहेत, हे लक्षात येते. परिणामी, या पाणीटंचाईवर भविष्यात पुन्हा प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे, कारण भारतातील मोठय़ा शहरांमध्ये उदा. चेन्नईमध्ये यावर्षी भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. या प्रकारच्या प्रश्नांची तयारी करण्यासाठी भारतातील जल साधन संपत्तीच्या उपलब्धतेचा प्रथम अभ्यास करावा. पाण्याच्या ग्रामीण व नागरी पातळीवरील वापराचे स्वरूप अभ्यासावे; त्यातून उद्भवणारी टंचाई अभ्यासावी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या समस्येवरील उपाय; तेसुद्धा प्रामुख्याने पर्यावरणपूरक शाश्वत उपाय म्हणून नदी जोड प्रकल्पाची उपयुक्तता अभ्यासावी.

वर नमूद केलेल्या प्रत्येक प्रश्नाचा आपण आढावा घेऊ.

प्र. १. भारतामधील भूजल पातळीमध्ये वेगात होणारी घट!

या समस्येवर जल संवर्धन हा सर्वोत्तम उपाय आहे. त्याची नागरी प्रदेशामध्ये अंमलबजावणी कशा प्रकारे होऊ शकते. याचे स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे. या उत्तरामध्ये प्रथम भूजल पातळीमध्ये वेगात घट होण्याची कारणे थोडक्यात नमूद करावीत. त्यानंतर भूजल पातळीमध्ये वाढ करण्यासाठी मृदा व जल संवर्धन पद्धती कशा प्रकारे उपयुक्त ठरेल ते उदाहरणासह स्पष्ट करावे. त्यामध्ये विशेषत: नागरी प्रदेशात जलसंवर्धन कशा प्रकारे करावे ते नमूद करणे आवश्यक आहे. उदा. नागरी वस्तीमधील निवासी व व्यापारी इमारतींवर पर्जन्य जल संवर्धन (Rain Water Harvesting) यंत्रणा राबवावी. पावसाच्या काळात प्राप्त होणारे पाणी टाक्यांमध्ये साठवून, त्याद्वारे विंधन विहीर (बोअरवेल), विहिरी यांचा वापर करून भूजल पुनर्भरण करण्याच्या प्रक्रिया आकृतींसह स्पष्ट कराव्यात.

प्र. २. भारतातील अवर्षणप्रवण व निम्न शुष्क प्रदेशांमध्ये सूक्ष्म पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्प कशा प्रकारे जल संवर्धनास उपयुक्त ठरतील?

या प्रश्नाच्या उत्तरामध्ये अवर्षणप्रवण व निम-शुष्क प्रदेशातील पर्जन्याचे स्वरूप(सरासरी, वारंवारता) स्पष्ट करावे, कारण प्रश्नामध्ये सूक्ष्म पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्पाचा उल्लेख आहे. त्यामुळे सूक्ष्म पाणलोटाचे कमी पावसाच्या प्रदेशासंदर्भात महत्त्व काय आहे, ते स्पष्ट करणे आवश्यक आहे. त्याकरिता राजस्थानमधील ग्रामीण भागात पाण्याच्या स्वयंपूर्णतेकरिता राबविलेल्या-विशेषत: वैयक्तिक पातळीवर जलसंवर्धन पद्धतींचे उदाहरण द्यावे.

प्र. ३. या प्रश्नांमध्ये भारतातील विविध समस्या, लोकांचे हाल कमी करण्यासाठी जमीन व पाणी या साधन संपत्तीचा परिणामकारक वापर उपयुक्त ठरेल. याचे स्पष्टीकरण द्यावे.

उत्तराच्या सुरुवातीस जमीन व पाणी या साधन संपत्तीचे महत्त्व स्पष्ट करावे. त्यानंतर मानवाच्या प्रमुख समस्या, ज्या जमीन व पाण्याशी संबंधित आहेत, त्या स्पष्ट कराव्यात. उत्तराच्या उर्वरित भागामध्ये जमीन व पाण्याचा शाश्वत पद्धतीने वापर केल्यास या समस्या कशा प्रकारे कमी होऊ शकतील, याचे उदाहरणासह स्पष्टीकरण द्यावे.

प्र. ४. भारतामध्ये गोडय़ा पाण्याचे (पेयजलाचे) मुबलक साठे उपलब्ध आहेत, परंतु तरी देखील भारतामध्ये पाणीटंचाई जाणवते. याचे टीकात्मक मूल्यमापन करणे अपेक्षित आहे.

उत्तरामध्ये प्रथम भारतातील जल साठय़ांचे विभागानुसार वितरण स्पष्ट करावे. त्यानंतर पाणीटंचाईस कारणीभूत ठरणारे घटक जसे की, पाण्याचा कृषीक्षेत्रातील अवाजवी (अतिरिक्त) वापर, पाण्याचा वापर करताना चुकीच्या पद्धतीने वापर केल्याने पाणी दूषित होणे, पावसाळ्यात प्राप्त होणारे पाणी योग्य प्रकारे न साठवणे इ. घटकांचे उदाहरणासह स्पष्टीकरण करणे आवश्यक आहे.

वरील सर्व प्रश्नांचा आढावा घेतल्यास काही निष्कर्ष काढता येतात. साधन संपत्ती महत्त्वाचा घटक आहे. भारतामध्ये ज्या साधन संपत्तीची टंचाई जाणवत आहे; ज्याबाबत समस्या आहे; त्याचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे. थोडक्यात, भारतासमोरील समस्यांचा आढावा घेऊन प्रश्नांचे पूर्वकथन करण्याचा प्रयत्न करावा.

यूपीएससीची : भूगोल चालू घडामोडी व संभाव्य प्रश्न

geography-current-events-and-potential-questions-upsc

1026   22-Aug-2019, Thu

आजच्या लेखामध्ये आपण चालू घडामोडींमधील घटना व त्यावरील संभाव्य प्रश्न काय असू शकतात? याचा विचार करणार आहोत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्याने विविध घडामोडी घडत असतात. या घडामोडींपकी ज्या घडामोडी भूगोल विषयाशी संबंधित आहेत; त्यावर निश्चित प्रश्न विचारले जातात. अशा घटना वाचनात आल्यानंतर त्या घटनांची सविस्तर माहिती करून घेणे, त्यांचे विश्लेषण करणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे संबंधित घटनेमागे भूगोल विषयातील कोणती मूलभूत संकल्पना विचारलेली आहे; हे शोधून त्यांचा परस्पर संबंध विशद करण्याचा प्रयत्न उत्तरांमध्ये करणे आवश्यक आहे. हे सर्व करताना त्यावर कोणत्या प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो? याचा अंदाज बांधणे आवश्यक आहे. तसे सुचलेले प्रश्न नोंदवून त्यांचे उत्तर लिहिण्याचा सराव करणे आवश्यक आहे.

सद्य:स्थितीत भारतात नैर्ऋत्य मान्सूनचा पाऊस सर्वत्र पडतो. त्यावेळेस मुंबईजवळील बदलापूर शहरास (उपनगरास) पुराचा तडाखा बसला होता. अचानक वाढलेल्या नदीच्या पाण्याच्या पातळीमुळे रेल्वेमार्ग पाण्याखाली जाऊन एक प्रवासी रेल्वेगाडी भर पुरात अडकली आणि शेकडो प्रवाशांचा जीव धोक्यात आला. तसेच बदलापूर शहरात पाणी पसरल्याने मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आयोगाद्वारे एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो का? याची चाचपणी विद्यार्थ्यांनी करणे आवश्यक आहे. या घटनेवर पुढीलप्रमाणे प्रश्न विचारला जाऊ शकतो.

  1. Indian Urban Centres are becoming prone to flood problems; explain those which have coastal locations. Comment.

किंबहुना चेन्नईला काही वर्षांपूर्वी आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, या प्रकारच्या घटनेमागील भौगोलिक व मानवनिर्मित कारणांचा सहसंबंध अभ्यासून; त्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेणे. तसेच गेल्या १-२ दशकांमध्ये वेगात वाढणाऱ्या कारणांचा परामर्श वैज्ञानिक दृष्टिकोनातून घेणे आवश्यक आहे.

बदलापूर पूर घटनेची चर्चा या अनुषंगाने आपण करणार आहोत, जेणेकरून विद्यार्थ्यांना उत्तरामध्ये कोणते घटक असावेत व त्यांचा क्रम काय असावा याचा अंदाज येईल. उत्तरामध्ये सर्वप्रथम पूरस्थितीस कारणीभूत नसíगक किंवा भौगोलिक कारणे कोणती आहेत याचा उल्लेख करावा. ही कारणे पूर्वीदेखील कार्यरत होती. मात्र, पुराची समस्या गेल्या एक दशकामध्ये वाढली आहे. कारण या भौगोलिक क्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये मानवी हस्तक्षेप मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे समस्येचे गांभीर्य वाढले आहे. प्रश्नाचे उत्तर एवढय़ावरच न थांबवता मानवी हस्तक्षेप या प्रदेशामध्येच का वाढत आहे? याचे कारणसुद्धा स्पष्ट करणे आवश्यक आहे. उत्तराची मांडणी याच क्रमाने होणे आवश्यक आहे.

भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कोकण विभागाच्या उत्तर भागामध्ये मुंबई व सभोवतालचा प्रदेश समाविष्ट होतो. या प्रदेशामुळे नर्ऋत्य मान्सूनमुळे जून ते सप्टेंबर कालावधीत प्रतिरोध (OROGRAPHIC) स्वरूपाचा पाऊस मोठय़ा प्रमाणात पडतो. हा पश्चिम किनारी प्रदेश अत्यंत अरुंद व निमुळता आहे. या प्रदेशाच्या पूर्वेस सह्य़ाद्रीचा उतार व पश्चिमेस अरबी समुद्राचा किनारा अशी रचना आहे. सह्य़ाद्रीच्या उतारावरील अतिवृष्टी आणि या प्रदेशातील पावसाचे सर्व पाणी याच प्रदेशात वाहून येते. तेथून समुद्रात जाते. मात्र, त्याच वेळेस समुद्रास भरती आल्यास पाणी या अरुंद प्रदेशात मोठय़ा प्रमाणात साचून राहते. या स्थितीत किनाऱ्यावरील व खाडीच्या दुतर्फा असणाऱ्या पाणथळ भू-प्रदेशामध्ये (Wetland) पावसाचे अतिरिक्त पाणी काही तास सामावून घेतले जाते. काही तासांनंतर ओहोटी आल्यास हे पाणी सागरामध्ये वाहून जाते. परिणामी, किनारी प्रदेशातील उंचावरील (मानवी वस्तीस योग्य) प्रदेश पूर समस्येपासून सुरक्षित राहतो. मात्र, गेल्या काही वर्षांत या नसíगक परिस्थितीत मोठय़ा प्रमाणात बदल झाला आहे. मुंबई व सभोवतालच्या प्रदेशामध्ये गेल्या दोन दशकांमध्ये रोजगाराकरिता मोठय़ा प्रमाणात स्थलांतर झाले आहे. मानवास निवासी व आíथक प्रक्रियांकरिता जमिनीची आवश्यकता भासते. वाढत्या लोकसंख्येची जमिनीची गरज पूर्ण करण्यासाठी मानवाने या प्रदेशातील पाणथळ भूमी, त्यामधील खारफुटीची वने नष्ट केली; तेथे भराव टाकून त्या जमिनी बांधकामासाठी वापरल्या. त्यामुळे पुराच्या वेळेस पाणी सामावण्याची त्या प्रदेशाची क्षमता संपुष्टात आली. त्याचप्रमाणे नसíगक जल प्रवाहांमध्ये भराव टाकून अतिक्रमण केले; ज्यामुळे त्या प्रवाहांची पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी झाली. काही ठिकाणी तर ओढे, नाले यांसारख्या छोटय़ा प्रवाहांचे अस्तित्वच नष्ट केले गेले. तसेच नसíगक व मानवनिर्मित पाणी निचरा करणाऱ्या प्रवाहांमध्ये घनकचऱ्याची चुकीच्या पद्धतीने विल्हेवाट लावल्यामुळे पाणी वाहण्याऐवजी साठून राहू लागले. अशा प्रकारे मानवी हस्तक्षेपामुळे पाण्याची जागा मानवी वस्तीने व्यापली. परिणामी, पाणी मानवी वस्तीमध्ये शिरल्यामुळे पूरस्थिती उद्भवली.

थोडक्यात, गेल्या काही दशकांमध्ये भारतातील मोठय़ा शहरांमध्ये व त्या सभोवतालच्या प्रदेशांमध्ये रोजगाराच्या संधी, शिक्षण, या कारणांकरिता अतिरिक्त स्थलांतर व त्यातून होणारा पर्यावरणाचा ऱ्हास ही मानवनिर्मित कारणे या समस्येस कारणीभूत आहेत. परंतु या कारणांमागे देखील काही घटक आहेत, की जे या व इतर समस्यांना कारणीभूत आहेत. बारकाईने विचार केल्यास या अतिरिक्त स्थलांतरणास कोणते घटक कारणीभूत आहेत? त्यास भारतातील लोकसंख्या विस्फोट (अल्पकालावधीत मोठय़ा प्रमाणात वाढलेली लोकसंख्या) आणि प्रादेशिक असमतोल ही कारणे आहेत. स्वातंत्र्योत्तर कालखंडात जन्मदर घटला, मात्र मृत्युदर पुरेसा न घटल्याने लोकसंख्या मोठय़ा प्रमाणात वाढली. विकासाची प्रक्रिया सर्वत्र समान प्रमाणात न झाल्याने देशात मोजक्याच शहरांमध्ये आíथक वृद्धी वेगात होऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. या स्थितीत मोठय़ा प्रमाणात वाढलेली लोकसंख्या मोजक्याच संख्येत असणाऱ्या या विकास केंद्रांकडे म्हणजे शहरांकडे मोठय़ा प्रमाणात स्थलांतरित झाली व पर्यावरणाचा वेगात ऱ्हास होऊ लागला. या सर्व घटनांचा परिपाक म्हणजे नागरी केंद्रांमध्ये उद्भवणाऱ्या पूर व इतर आपत्ती होय.

थोडक्यात, यांसारख्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाय काढण्यासाठी लोकसंख्या नियंत्रण व संतुलित प्रादेशिक विकास हेच उपाय/मार्ग आहेत. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी समस्येचा आढावा घेऊन समस्येचे मूळ उत्तरामध्ये मांडावे. चालू घडामोडींचा या प्रकारे सर्व बाजूंनी विचार करून संभाव्य प्रश्नांची यादी करावी.

Paris Agreement

Paris Agreement 2015

204   17-Aug-2019, Sat

Mostly because of human actions, the concentration of gases like Carbon-di-oxide, Methane etc has increased in earth’s atmosphere and has resulted in phenomena called Green House Effect.

Because of Green House Effect, the average global temperature has increased, which is known as Global Warming.

The 2016 average temperatures were about 1.3 °C (2.3 degrees Fahrenheit) above the average in 1880 when global record-keeping began.

It is estimated that the difference between today’s temperature and the last ice age is about 5°C.

Global Warming is dangerous all life on earth.

The only way to deal with the change in climate is to reduce the emission of Green House Gases (GHGs) like Carbon Di Oxide and Methane.

From 30 November to 11 December 2015, the governments of 195 nations gathered in Paris, France, and discussed a possible new global agreement on climate change, aimed at reducing global greenhouse gas emissions and thus reduce the threat of dangerous climate change.

The 32-page Paris agreement with 29 articles is widely recognized as a historic deal to stop global warming.

Aims of Paris Agreement

As countries around the world recognized that climate change is a reality, they came together to sign a historic deal to combat climate change – Paris Agreement. The aims of Paris Agreement is as below:

Keep the global temperature rise this century well below 2 degrees Celsiusabove the pre-industrial level.

Pursue efforts to limit the temperature increase even further to 1.5 degrees Celsius.

Strengthen the ability of countries to deal with the impacts of climate change.

यूपीएससीची तयारी : मानवी भूगोल

UPSC-Human Geography Upsc Abn 97

623   08-Aug-2019, Thu

 यूपीएससी मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर पहिलामधील मानवी भूगोल या विषयाची माहिती घेणार आहोत. या विषयातील लोकसंख्या भूगोल, वसाहत भूगोल आणि आर्थिक भूगोल या घटकाची परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त तयारी कशी करावी, याबाबत माहिती घेणार आहोत.

मानवी भूगोल या घटकावर २०१३ मध्ये ३; २०१४ मध्ये ५; २०१५ मध्ये ६; २०१६ मध्ये ५; २०१७ मध्ये ५; आणि २०१८ मध्ये ५ प्रश्न विचारण्यात आले होते. पहिल्या लेखामध्ये आपण मानवी भूगोलामध्ये समाविष्ट असणाऱ्या घटकांचा तसेच या घटकामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो याची माहिती घेतलेली आहे. मागील प्रश्नांच्या विश्लेषणावरून आपणाला सर्वाधिक प्रश्न कोणत्या घटकावर विचारण्यात आलेले आहेत याची माहिती मिळते.

*     २०१३मध्ये, भारतातील सुती उद्योग अत्यंत विकेंद्रित आहे, यासाठी कारणीभूत असलेल्या घटकांचे विश्लेषण करा, असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. या प्रश्नांची योग्य उकल होण्यासाठी आपल्याला भारतातील सुती उद्योग, त्याचे विकेंद्रीकरण, भारताची प्राकृतिक रचना आणि उद्योगासाठी वेगवेगळ्या प्रदेशांतील पोषक वातावरण, कच्च्या मालाची उपलब्धता इत्यादीविषयी मूलभूत माहिती असणे गरजेचे आहे. या घटकामुळे भारतातील सुती उद्योग कशा पद्धतीने विकेंद्रित झालेला आहे याचे उदाहरणासह विश्लेषण अपेक्षित आहे.

*     २०१४ मध्ये, नैसर्गिक संसाधनाने समृद्ध म्हणून नावारूपाला येणाऱ्या आफ्रिकेतील आर्थिक क्षेत्रामध्ये भारत स्वत:चे स्थान कशा प्रकारे पाहतो? हा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचा कल हा भारताच्या आफ्रिकेविषयी एकत्रित आखल्या गेलेल्या धोरणाचा भाग आहे. येथे काही महत्त्वाच्या पैलूंचा एकत्रित विचार करणे आवश्यक आहे. उदा. भारताने आफ्रिका खंडातील विविध देशांसोबत स्थापन केलेले संबंध, यातून भारताला होणारा फायदा, नैसर्गिक संसाधनाने समृद्ध असलेला अफ्रिका खंड. इ. या सगळ्याचा विचार करून भारत आफ्रिकेमधील आर्थिक क्षेत्रामध्ये आपले स्थान कशा प्रकारे पाहतो याची उत्तरामध्ये चर्चा करणे महत्त्वाचे आहे.

*     २०१५ मध्ये, ‘भारतातील स्मार्ट शहरे, स्मार्ट खेडय़ाशिवाय शाश्वत होऊ शकत नाहीत’ या विधानाची ग्रामीण व नागरी एकत्रीकरणाच्या पार्श्वभूमीवर चर्चा करा.

हा प्रश्न विचारण्यात आला होता. हा प्रश्न भारत सरकारने आखलेल्या स्मार्ट शहरे धोरणाशी संबंधित आहे. हा प्रश्न भारतातील नागरीकरण आणि ग्रामीण विकास या प्रक्रियेला आधारभूत मानून विचारण्यात आलेला होता. या प्रश्नाची योग्य उकल होण्यासाठी पुढील गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. उदा. स्मार्ट शहरे ही संकल्पना नेमकी काय आहे? स्मार्ट शहरे ही नेमकी कशी असणार आहेत? आणि याचा संबंध ग्रामीण भारतातील खेडय़ासोबत कशा प्रकारे येणार आहे? जर स्मार्ट शहरे ही शाश्वत करावयाची असतील तर यासाठी स्मार्ट खेडय़ाची आवश्यकता का आहे? तसेच भारतातील खेडे स्मार्ट बनविण्यासाठी नेमक्या कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत आणि यामुळे ग्रामीण व नागरी एकत्रीकरणाची प्रक्रिया कशी सुरू झालेली आहे, हा या प्रश्नाचा मुख्य रोख होता. त्याआधारे उत्तर लिहिणे अपेक्षित आहे.

*     २०१६ मध्ये, ‘सिंधू नदी पाणी करार (Indus Water Treaty) याची माहिती द्या आणि बदलत्या द्विपक्षीय संबंधाच्या पार्श्वभूमीवर याचे पर्यावरणीय, आर्थिक आणि राजकीय परिणामाचे परीक्षण करा.’ हा प्रश्न विचारण्यात आला होता.

या प्रश्नाचे सरळ दोन भाग पडतात. यातील पहिला भाग सिंधू नदी पाणी करार व यातील तरतुदी याची माहिती आणि दुसरा भाग सद्य:स्थितीतील भारत-पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय संबंधांबाबत आहे. हा प्रश्न चालू घडामोडींशी संबंधित आहे. येथे प्रामुख्याने सिंधू नदीशी संबंधित प्राकृतिक माहिती आणि या दोन देशांमधील संबंध या दोन्हीची सांगड घालणे गरजेचे आहे. जर हा करार मोडीत निघाला अथवा यामध्ये काही एकतर्फी बदल केले गेले तर याचे नेमके परिणाम काय होऊ शकतात? हा प्रश्न भूगोलाशी संबंधित असल्यामुळे येथे पर्यावरणीय परिणामाची चर्चा करणे अधिक गरजेचे आहे. अशा पद्धतीने या प्रश्नाचे आकलन करून उत्तर लिहिणे क्रमप्राप्त ठरते.

*     २०१७ मध्ये, भारतात येणारे पूर जलसिंचनासाठी शाश्वत स्रोत आणि सर्व प्रकारच्या हवामानामध्ये अंतर्देशीय जलवाहतुकीसाठी कशा प्रकारे रूपांतरित करता येऊ शकतील? असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचे योग्य आकलन होण्यासाठी पूर का येतात याची माहिती जी विषयाच्या पारंपरिक अनुषंगाने माहीत असणे गरजेचे आहे, तसेच याचा विकासासाठी कसा वापर करता येऊ शकतो हे सहउदाहरण स्पष्ट करावे लागते.

*     २०१८ मध्ये, मत्स्यपालन व याच्याशी सबंधित समस्या, औद्योगिक कॉरिडॉर आणि त्याची वैशिष्टय़े शहरी भाग व पावसाच्या पाण्याची साठवण प्रणाली, भारतीय प्रादेशिक नेव्हिगेशन उपग्रह प्रणाली (कफठरर) इत्यादीवर प्रश्न विचारण्यात आलेले होते.

या घटकाशी संबंधित बहुतांश प्रश्न हे भारताच्या आíथक भूगोलशी संबंधित आहेत, तसेच यातील काही प्रश्न भारत व जगाचा मानवी भूगोल यांचा एकत्रित विचार करून विचारण्यात आलेले आहेत. उपरोक्त प्रश्नांवरून आपणाला या विषयाचे पारंपरिक ज्ञान,  महत्त्वाच्या संकल्पना तसेच यासंबंधी घडणाऱ्या चालू घडामोडी इत्यादीची योग्य माहिती असणे गरजेचे आहे, हे लक्षात येते. या विषयाच्या सर्व घटकांची मूलभूत माहिती सर्वप्रथम अभ्यासावी. त्याकरिता आपणाला एनसीईआरटीच्या Fundamentals of Human Geography (XII), Indian People and Economy. (XII) या क्रमिक पुस्तकाचा आधार घेता येतो. परिणामी या विषयाचे सरळ व सोप्या भाषेत आकलन  करता येऊ शकते. या विषयाची र्सवकष तयारी करण्यासाठी Certificate Physical and Human Geography (by Goe Cheng Leong),  India A Comprehensive Geography  (by D.R. Khullar), World Geograhy  (by Majid Husain) यासारख्या संदर्भग्रंथांचा आधार घेता येऊ शकेल.


Top

Whoops, looks like something went wrong.