जीएस-४ : मुख्य परीक्षा - २०१८

gs-4-main-exam-2018

5898   14-Nov-2018, Wed

यूपीएससी मुख्य परीक्षा २०१८ यातील ‘जीएस-४’ या पेपर विषयाचे विश्लेषण आपण या लेखात पाहणार आहोत. एकंदर यूपीएससी मुख्य परीक्षेतील अधि‌काधिक गुण देणारा हा विषय म्हणून ‘जीएस-४’ नीतीशास्त्र याकडे पाहिले जाते. यूपीएससी यशस्वीतेचा मूलमंत्र म्हणजे ‘वैकल्पिक विषय’, ‌‘निबंध’ आणि ‘जीएस-४’ नीतीशास्त्र असे सर्वसाधारणपणे म्हटले जाते. तसे पाहिले तर २०१७चा अपवाद सोडल्यास ‘जीएस-४’ हा नेहमीच चांगले गुण मिळविण्यासाठी वाव असणारा विषय राहिला आहे. ‘जीएस-४’ हा तत्त्वज्ञानाशी साधर्म्थ राखणारा विषय असल्यामुळे त्यासाठीची भाषाशैली व आकलन इथे महत्त्वपूर्ण ठरते. २०१८च्या पेपरवरून आपण काही बाबी स्पष्ट होतात. त्या आपण या लेखाद्वारे समजून घेणार आहोत. जेणेकरून २०१९ मध्ये त्याचा आपल्याला फायदा होण्याची दाट शक्यता निर्माण होईल. 

‘जीएस-४’ नीतीशास्त्र पेपरचे स्वरूप 

एकूण गुण - २५० (SECTION - A 130 गुण SECTION B - 120 गुण) 

वेळ - ३ तास 

प्रश्न - I) १९ (तसे पाहिल्यास ते १२ आहेत. मात्र, उपप्रश्न गृहित धरल्यास प्रश्नांची संख्या वाढते.) 
II) SECTION A - ६ प्रश्न (उपप्रश्न ७ - ६ + ७ = १३) 
III) SECTION B - ६ केसस्टडी 

शब्दमर्यादा I) १० गुणांसाठी प्रत्येकी १५० शब्द 

II) केसस्टडी : २० गुणांसाठी प्रत्येकी २५० शब्द : २०१७ चा विचार करता ‘जीएस-४’मध्ये स्वरूपाच्या बाबतीत बदल झालेला नाही. 

‘जीएस-४’ SECTION ए : विश्लेषण 

पहिल्या सेक्शनचा विचार केल्यास यात अभ्यासक्रमातील मूळ संकल्पनांवर आधारित प्रश्न विचारण्याची आयोगची वृत्ती आहे. तेव्हा यातील एकूण १३ प्रश्न हे अभ्यासक्रमही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे साधर्म्य राखतात. २०१८ मध्ये काही बदल व पारंपारिकता दिसून येते ती पाहूया. 

पारंपरिक अभ्यासक्रमातील संकल्पना 

२०१३ ते २०१८ चे पेपर पाहिल्यास एक बाब स्पष्ट होते ती म्हणजे काही घटकांवर आयोगाद्वारे पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले जात आहेत. त्यातील २०१८ मध्ये विचारलेल्या संकल्पना खालीलप्रमाणे आहेत. 

१) Three basic values for civil service हा प्रश्न ज्यात सनदी सेवेतील मूल्यांचा विचार आहे. २०१३, २०१७ व २०१८ अशा तिन्ही वर्षांत विचारलेला आहे. त्यामुळे सनदी सेवेसाठीच्या मूल्यांचा अभ्यास व त्यांचे सनदी सेवेसाठी महत्त्व अभ्यासणे खूप महत्त्वाचे आहे. 
२) confilict interest ही मूलभूत संकल्पना २०१५, २०१७, २०१८ चा तिन्ही वर्षांत विचारली आहे. 
३) अभ्यासक्रमातील काही संकल्पना असे की Ethical Dileman, public interest, code of 
ethics, morality, code of conduct, right to lufamation (माहितीचा अधिकार) यावर सरळसरळ प्रश्न विचारलेले आहेत. यावरून एक बोब स्पष्ट होते की अभ्यासक्रमातील संकल्पना जर समजून घेतल्यास तर नीतीशास्त्र हा पेपर आपण अधिक चांगल्या पद्धतीने सोडवू शकतो. 
४) Environmental ethics 2014 मध्ये विचारले होते. २०१८ मध्ये 
II) सुभाषिते (Quotes) dam constrnd व त्याचे परिणाम 

जीएस ४ मध्ये दरवर्षी किमान २ सुभाषिते (Quotes) विचारली जातात. परंतु, २०१९च्या पेपरमध्ये खालील आक्षयाची सु‌भाषिते विचारले आहेत. 
* वॉरेन बफे यांचे inteqrity, intilligency of Energy यांच्या परस्पर संबंधांचे सुभाषित 
* समाजाच्या भल्यासाठी असत्यही सत्याचे रूप घेते - तिरुक्कुरल 
* अब्राहम लिंकन - True rule, Good & Evil, Government policy 
* महात्मा गांधी - Anger आणि Intderance 

त्यामुळे असे तत्त्वज्ञानाशी साधर्म्य राखणारे प्रश्न लिहिण्याचा सराव करणे गरजेचे आहे. तसे पहिल्यास वरील सर्व सुभाषिते वाचल्यावर त्यांचा अर्थ स्पष्ट होतो. 

SECTION B, CASESTUDY 

‘जीएस-४’ या पेपरमधील केस स्टडी हा घटक १२० गुणांसाठी विचारला गेला आहे. म्हणजे साधारणपष ५० टक्के गुण हे केस स्टडीला दिलेले आहेत. यशाचा मटामार्ग यातील लेखन कौशल्य भाग १४ या लेखात केस स्टडी कशी सोडवावी याचे विवेचन केलेले होते. तसेच ‘जीएस-२’ लेख प्रकाशितही झाले आहेत. तेव्हा ते नजरेखालून घातल्यास ‘जीएस-४’ बद्दल दृष्टीकोन अधिक स्पष्ट होईल. 
२०१८ मध्ये खालील विषयांवर केस स्टडी विचारल्या आहेत. 
१. समाजातील दुर्बल घटक व प्रशासन 
२. समाजसेवा व प्रशासन कायदा 
३. सामाजिक नीतीमूल्य व मागास भाग 
४. पर्यावरणाचे नीतीशास्त्र व अर्थव्यवस्था 
५. सनदी अधिकारी व मंत्री संबंध 
६. प्रशासकीय नीतीमूल्ये 

२०१३ ते २०१८ यातील केस स्टडी या घटकाचे विश्लेषण केल्यास तोच तो पणा यात जाणवतो. जर मूलभूत संकल्पनांशी संबंधित सर्व प्रकारच्या case study समजून घेऊन सोडविण्याचा सराव केल्यास नक्कीच फायदा होईल.

जीएस-३ मुख्य परीक्षा : २०१८

gs-3-main-examination-2018

7798   14-Nov-2018, Wed

यूपीएससी मुख्य परीक्षा २०१८ मधील जीएस-३ या पेपरचे विश्लेषण आपण या लेखात पाहणार आहोत. यूपीएससी मुख्य परीक्षेतील थोडा किचकट पेपर म्हणून या पेपरकडे पाहिले जाते. जीएस-३ या पेपरचे मुख्य घटक म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था, कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान, पर्यावरण व सुरक्षा व्यवस्था हे होत. साधारणपणे मुख्य परीक्षेचे स्वरूप पाहता या पेपरचा विचार केल्यास चालू घडामोडींची भूमिका खूप महत्त्वपूर्ण ठरते. बहुतांशी प्रश्न हे अभ्यासक्रमाशी संबंधित चालू घडामोडींवरच आधारित असतात. पुस्तकी माहितीचा इथे फारसा उपयोग होत नाही तसेच त्यावर विसंबून राहणे जीएस-३ करिता त्रासदायक ठरू शकते. 

जीएस-३ पेपरचे स्वरूप 

एकूण गुण - २५० 

वेळ - ३ तास 

प्रश्न - २०-१० प्रश्न प्रत्येकी १० गुण, १० प्रश्न प्रत्येकी १५ गुण, शब्दमर्यादा - १० गुणांसाठी १५० शब्द, १५ गुणांसाठी २५० शब्द, गेल्या वर्षीच्या तुलनेत म्हणजेच २०१७ चा विचार करता २०१८ मध्ये या पेपरमध्ये स्वरूपाच्या बाबतीत बदल झालेला नाही. 

अभ्यासक्रमातील मुख्य घटक व गुणांचे विभाजन - २०१८ 

अर्थशास्त्र - ६५ गुण (२०१७-७५ गुण) 

कृषी - ६० गुण (२०१७ - ५० गुण) 

विज्ञान व पर्यावरण - ७५ गुण (२०१७ - ७५ गुण) 

सुरक्षा व्यवस्था - ५० गुण (२०१७ - ५० गुण) 

वरील गुणांचे विभाजन बघता फक्त अर्थशास्त्र व कृषी या घटकांमध्ये १० गुण कमी-जास्त झालेले असून २०१७ च्या तुलनेत विज्ञान व तंत्रज्ञान व पर्यावरण; तसेच सुरक्षा व्यवस्था घटकांच्या प्रश्न संख्येत बदल केलेले नाहीत. मात्र, या घटकांच्या प्रश्न संख्येत बदल झालेले आहेत. उदा. २०१७ मध्ये पर्यावरण या घटकावर ३ प्रश्न विचारले होते. तर २०१८ मध्ये एकच प्रश्न विचारलेला दिसतो. 

जीएस-३ मध्ये १० गुणांसाठी विचारलेले प्रश्न व विश्लेषण : 

* शाश्वत विकासाचे ध्येय (SDG) यावर प्रश्न विचारलेला आहे. याआधी सहस्त्रक विकासाचे ध्येय (MDG) यावरही आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. SDG-२०१५ ते २०३० या कालावधीसाठी असल्याने आगामी परीक्षांमध्येही अपेक्षित असणार यात शंका नाही. 

* २०१८-१९ बजेटचा विचार करता त्यातील मुद्द्यांवर प्रश्न विचारलेले आहेत. जसे की, Long term Capital Gain Tax व Divident Distribution Tax (DDT) तसेच Minimum Supper Price (MSP) म्हणजेच किमान आधारभूत किंमत जी दीडपट होण्याची तरतूद बजेटमध्ये होती त्यावर प्रश्न विचारले आहेत. 

* चालू घडामोडींचा विचार करता नक्षलवाद, सिक्कीमसारखे शंभर टक्के सेंद्रिय राज्य व चीनच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा म्हणजेच वन बेल्ट वन रोड व सीपेक व त्यात भारताची भूमिका यावर प्रश्न विचारलेला आहे. सध्या 'शहरी नक्षलवाद' ही संज्ञाही चर्चेत आहे. त्यावरही येत्या काळात प्रश्न विचारण्याची शक्यता असणार आहे. 

* पारंपरिक अभ्यासक्रमातून प्रश्न विचारण्याची आयोगाची वृत्तीही २०१८ च्या GS-III मध्ये दिसून येते. जसे की घन कचरा (Solid Waste) व्यवस्थापन, पानथळ (Wet Land) जमिनींचा शाश्वत वापर, अन्नप्रक्रिया व Quantum Theory यावर प्रश्न विचारलेले दिसून येतात. मात्र, या प्रश्नांच्या बाबतीत खालील बाब महत्त्वाची आहे. 

प्रश्न विचारताना विशिष्ट बाबींवर प्रश्न विचारलेले आहेत. जसे की, 'Bose-Einstein Statistics' व रामसार करार यातील दोन स्थळांची उदाहरणेही विचारलेली आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे की अभ्यास करताना उदाहरणांचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते. 

१५ गुणांसाठी विचारलेले प्रश्न व विश्लेषण 

* चालू घडामोडींचा वरचष्मा इथेही दिसून येतो. प्रश्न विचारताना आयोगाने चर्चेत असणाऱ्या बी. एन. श्रीकृष्ण समिती (Data Security), आपत्ती निवारणासाठीचे फ्रेमवर्क. जागतिक व्यापारातील चलनासंबंधीचे मुद्दे व प्रोटेक्शनिझम, राष्ट्रीय बायोफार्म मिशन, जैवविविधता व जैवविधता कायदा, व अमली पदार्थ तस्करी यावर प्रश्न विचारले आहेत. गेल्या वर्षभरात वरील विषय चर्चेत होते. यावर हे स्पष्ट होते की, अभ्यासक्रमातील घटकांशी सुसंगत असणाऱ्या चालू घडामोडींवर प्रश्न विचारण्याची आयोगाची वृत्ती अधोरेखित होते. 

* नीती आयोगावर पहिल्यांदाच आयोगाने प्रश्न विचारला आहे. त्यातही 'नियोजन आयोग' व 'नीती आयोग' तुलनात्मक प्रश्न विचारला आहे. यावरून एक बाब स्पष्ट होते ती म्हणजे जर सरकारने जुने धोरण वा संस्था यांच्या जागी नवीन धोरण वा संस्था अस्तित्वात आणल्या असतील तर भविष्यात त्यावर प्रश्न विचारले जावू शकतात. असे योजनांच्या बाबतीतही होऊ शकते. 

* कृषीचा विचार करता पारंपरिक अभ्यासक्रमातील पिकांबद्दल व त्यांच्या लागवडीच्या पद्धतीबद्दल प्रश्न विचारण्याची वृत्ती २०१७ नंतर २०१८ मध्येही पहायला मिळते. तसेच कृषीबद्दलच्या योजनांचा विचार करता National Horticulture Mission यावर प्रश्न विचारलेला आहे. कृषीबाबत सर्व योजना आपल्याला माहित असणे जीएस-३ साठी महत्त्वाचे आहे. 

* उर्जेच्या बाबतीत अणुऊर्जेवर प्रश्न विचारलेला आहे. 

अपारंपरिक स्रोत चर्चेत असताना अणुऊर्जेवर प्रश्न विचारणे हे आयोगाच्या एकंदर वृत्तीबाबत सूचक असे आहे. 

 

जीएस-२ : मुख्य परीक्षा २०१८

gs-2-main-examination-2018

2745   14-Nov-2018, Wed

यूपीएससी मुख्य परीक्षा २०१८च्या जीस-२ या पेपरविषयीचे विश्लेषण आपण या लेखात पाहणार आहोत. २९ सप्टेंबर रोजी दुपारच्या सत्रात आयोगातर्फे हा पेपर घेण्यात आला. जीएस-२ म्हणजे भारतीय राज्यघटनाप्रशासनकल्याणकारी योजना व धोरणे; तसेच आंतरराष्ट्रीय संबंध यांचा समावेश असलेला पेपर होय. गुणांचा विचार केल्यास सहजासहजी यात अपेक्षित गुण मिळत नाहीत. त्यासाठी सटीक उत्तरे, योग्य उदाहरणे व चालू घडामोडींचा चांगला अभ्यास अपेक्षित असतो. या पेपरसाठीची भाषाशैलीही राज्यघटनेला साजेशी अशी असली, तर त्याचा गुणांवर चांगलाच परिणाम दिसून येतो. 

जीएस-२ पेपरचे स्वरूप - २०१८ 
एकूण गुण : २५० 
वेळ : ३ तास 
प्रश्न : २०, १० प्रश्न प्रत्येकी १० गुण, १० प्रश्न प्रत्येकी १५ गुण 
शब्दमर्यादा : १० गुणांसाठी १५० शब्द, १५ गुणांसाठी २५० शब्द 
गतवर्षीच्या म्हणजेच २०१७च्या तुलनेत पेपरच्या स्वरूपात कोणताही बदल झालेला नाही. 

अभ्यासक्रमातील घटकांच्या आधारे गुणांचे विभाजन व प्रश्नांचे विश्लेषण 
भारतीय राज्यघटना : ११५ गुण 
या वर्षीच्या पेपरमध्ये २०१७च्या तुलनेत मुलभूत संकल्पना वा पारंपरिक प्रश्नही चालू घडामोडीच्या जोडीला विचारले गेले आहेत. एकंदरीतच भारतीय राज्यघटनेबद्दलचे आपले आकलन २०१८च्या पेपरसाठी अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते. संविधानातील घटाकांवर जर प्रश्न विचारले असतील, तर त्यांची उत्तरे योग्य पद्धतीने लिहिणे अपेक्षित आहेत. अन्यथा पेपर तपासणाऱ्या व्यक्तीचा दृष्टिकोन नकारात्मक होऊ शकतो. म्हणजे संविधानातील मूलभूत घटकांबद्दल जर आपणास योग्य पद्धतीचे आकलन नसेल, तर ते उत्तरांतून दिसून येईल. 
संविधानातील मुलभूत घटकांचा विचार करता सीएजी कलम १४८ प्रश्न विचारलेला आहे. संविधानातील नमूद संसदेच्या समित्यांवर प्रश्न असून त्यात एस्टिमेट कमिटीबद्दल प्रश्न विचारलेला आहे. आर्थिक आणीबाणी (कलम ३६०) बद्दलही, त्यासाठीची कारणे, त्यामुळे होणारा परिणामही आयोगाने विचारलेला आहे. ट्रीब्युनल्स व न्यायालय यांची तुलना व ट्रीब्युनल्सद्वारे न्यायालयाच्या अधिकारांवर येणारी गदा याबद्दलचे आपले मत विचारलेले आहे.

भारत व अमेरिका यांच्यातील लोकशाही मूल्ये कोणकोणती आहेत ते नमूद करण्यासाठीचाही प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था त्यासंबंधीची आर्थिक संसाधने; तसेच अस्तित्वात असणारे सारे आयोग मानव अधिकार आयोगात विलीन करण्याबाबतचे विद्यार्थ्यांचे मत नमूद करण्यास सांगितले आहे. हे सारे प्रश्न पारंपरिक अभ्यासक्रमांचा भाग म्हणून आपण पाहू शकतो. 
चालू घडामोडींचा मुख्य परीक्षेतील प्रश्न बनविण्यात सिंहाचा वाटा असतो. इव्हीएम व त्यासंबंधींची विश्वासार्हता टिकविण्यासंबंधीची निवडणूक आयोगासमोर असणारी आव्हाने, अनुसूचित जातींसाठीचा आयोग व धार्मिक अल्पसंख्याक यांच्या आरक्षणाविषयीचे धोरण, दिल्ली व नायब राज्यपाल यात सर्वोच्च न्यायालयाची भूमिका असे प्रश्न चालू घडामोडींच्या आधारे विचारले गेले आहेत. 

कल्याणकारी योजना व धोरणे : ६० गुण 
सर्वांसाठी स्वास्थ, भूक व त्यासंबंधीची आव्हाने व उपाय, विविध धोरणांचा पर्यावरणावर होणारा परिणाम असे प्रश्न या घटकावर विचारलेले आहेत. येथे लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, 
१. स्वास्थ धोरणावर २०१५मध्येही प्रश्न विचारलेला आहे. 
२. गरिबी, भूक यावर २०१७मध्ये व २०१८मध्ये जीएस-१मध्ये प्रश्न विचारलेला आहे. 
३. २०१७च्या ३ प्रश्नांच्या तुलनेत पर्यावरण या घटकावर २०१८मध्ये एकच प्रश्न विचारलेला आहे. २०१८मध्ये जीएस-१मध्ये या घटकावर प्रश्न विचारलेला दिसून येतो. 
४. जीएस-२ मधील घटक असले, तरी इतर पेपरमध्ये या घटकांवर प्रश्न दिसून येतात. 

प्रशासन : २५ गुण 
प्रशासन हा घटक खूप महत्त्वपूर्ण घटक आहे. जीएस-२ प्रमाणेच जीस-४ मध्येही याचे महत्व आहे. जीएस-४मध्ये या घटकावर प्रश्न विचारलेलेही आहेत. २०१८च्या जीएस-२मध्ये ‘ई-प्रशासना’वर प्रश्न विचारलेला आहे. ‘डिजिटल इंडिया’ याचे एक महत्त्वपूर्ण अंग म्हणून आपण ई प्रशासन हा घटक पाहतो. तसेच, ‘नागरिकांची सनद’ यावरही प्रश्न विचारलेला आहे. प्रशासनातील सुप्रशासनाचे घटक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. अभ्यासक्रमातील घटक व सरळ प्रश्न असल्यामुळे लिहिण्यास सहज सोपे असे हे घटक आहेत. 

आंतराराष्ट्रीय संबंध : ५० गुण 
आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अनुषंगाने आयोगाने आशागबात करार, अमेरिका व इराण अणुऊर्जा करार, त्यात भारताची भूमिका व भारतावर पडणारा प्रभाव याबद्दल प्रश्न विचारला आहे. भारत व इस्राइल यांचे संबंध यावरही प्रश्न विचारलेला आहे. वरील प्रश्न हे चालू घडामोंडींवर आधारित असणारे असे प्रश्न आहेत. आंतराष्ट्रीय संबंधाच्या बाबतीत अशा प्रकारे चालू घडामोडींवर आधारित प्रश्न विचारण्याची आयोगाची वृत्ती नियमितपणे आपण पाहू शकतो. 

जीएस-२ २०१८बद्दल निष्कर्ष 
१. अभ्यासक्रमांच्या आधारे सरळ प्रश्न विचारण्याची आयोगाची वृत्ती. 
२. अभ्यासक्रमातील मूलभूत संकल्पनांवर भर 
३. चालू घडामोडींची महत्त्वपूर्ण भूमिका 

असे असल्यामुळे अभ्यास करताना मूलभूत संकल्पनांना बाजूला सारून फक्त चालू घडामोडींवर भर देऊन चालणार नाही. जीएस-२ हा पेपर गुणांच्या दृष्टिने काटेकोरपणे सटीक लिहिणे गरजेचे असते. नियमित सराव व आयोगाच्या प्रश्नांचे विश्लेषण हे येथे महत्त्वपूर्ण ठरते. 

GS-I मुख्य परीक्षा - २०१८

gs-i-main-examination-2018

619   14-Nov-2018, Wed

यूपीएससी मुख्य परीक्षा २०१८चा विचार करता GS-I या पेपरचे विश्लेषण आपण करणार आहोत. २९ सप्टेंबर रोजी हा पेपर आयोगातर्फे सकाळी ९ ते १२ या वेळेत घेण्यात आला. तसे पाहिले, तर या पेपरमध्ये खूप काही बदल नाहीत. पारंपरिकच स्वरूप आपणास दिसून येते. २०१७ प्रमाणेच १० प्रश्न १० गुणांसाठी व १० प्रश्न १५ गुणांसाठी विचारले आहेत.

 GS-I - २०१८ पेपरचे स्वरूप 
एकूण गुण - २५० 
प्रश्न संख्या व गुणविभाजन : १० प्रश्न १० गुणांसाठी, १० प्रश्न १५ गुणांसाठी. 
शब्दमर्यादा : १० गुणांसाठी १५० शब्द, १५ गुणांसाठी २५० शब्द 
वेळ : स. ९ ते १२ (३ तास) 

अभ्यासक्रमातील घटकांनुसार गुणांचे विभाजन 
I : इतिहास : ६० गुण 
१. संस्कृती : ३५ गुण 
२. भारताचा स्वातंत्र्यलढा : १० गुण 
३. जगाचा इतिहास : १५ गुण 

निष्कर्ष : 
१) २०१७च्या तुलनेत गुणांचे विभाजन पाहता भारताच्या स्वातंत्र्यलढ्यावर खूप कमी गुणांसाठी म्हणजेच १० गुणांसाठी एकच प्रश्न विचारला. २०१७ मध्ये एकूम ६५ गुणांसाठीचे प्रश्न या घटकांवर विचारले होते. 
२) जगाच्या इतिहासाचा विचार केल्यास २०१३ व २०१४ मध्ये त्यावर अधिक प्रश्न विचारलेले दिसून येतात. परंतु, नंतरच्या काळात जसे २०१७मध्ये १० गुणांसाठी ‘मलयन पेनिन्सुला’ हा प्रश्न विचारला होता. २०१८ मध्ये १५ गुणांसाठी प्रश्न विचारला आहे. 
३) भारतीय संस्कृती : २०१७ मध्ये फक्त १० गुणांसाठी एक प्रश्न विचारला होता. परंतु, २०१८ मध्ये यावर ३५ गुणांसाठीचे प्रश्न विचारून भारतीय संस्कृतीबद्दलचे महत्त्व आयोगाने अधोरेखित केले आहे. 
४) स्वातंत्र्यानंतरचा भारत या घटकावर २०१८मध्ये प्रश्न विचारलेला नाही. २०१३मध्ये या घटकावर ५० गुणांसाठी प्रश्न विचारले होते. त्यानंतर म्हणजे २०१३ ते २०१८ या काळात या घटकावर एकही प्रश्न विचारलेला नाही. याचा अर्थ नक्कीच असा होत नाही, की या घटकाकडे दुर्लक्ष केले तरी चालेल. आयोग यावर प्रश्न विचारण्याची दाट शक्यता येत्या काळात आहे. 

II) भूगोल - ८५ गुण 
१) हवामान (Climate) : १० गुण 
२) आपत्ती (Disaster) : प्रश्न विचारलेला नाही. 
३) प्राकृतिक भूगोल (Physical) : २० गुण 
४) संसाधने (Resources) : १० गुण 
५) औद्योगिक संरचना (Industrial Location) : ३० गुण 
६) शहरीकरण (Urbanisation) : १५ गुण 

निष्कर्ष : 
१) हवामान या घटकावर २०१७मध्ये एकूण ६० गुणांचे प्रश्न विचारलेले आहेत. हे प्रमाण कमी झालेले दिसले. 
२) आपत्ती निवारण यावर प्रश्न विचारणे अपेक्षित असताना विचारलेला नाही. 
३) संसाधनांवर २०१७मध्ये प्रश्न विचारलेला नव्हता, तो २०१८मध्ये विचारला आहे. 
४) शहरीकरणावर २०१७मध्ये १५ गुणांसाठी प्रश्न विचारले होते. त्यात बदल नाही. 
५) २०१८मध्ये औद्योगिकीकरणाच्या बाबतीत २०१७ला १५ गुणांसाठी विचारलेले ३० गुणांसाठी विचारले आहेत. 

III) भारतीय समाज : १०५ गुण 
१) धर्म, प्रादेशिकता व सशक्तीकरण : ३५ गुण 
२) गरिबी, लोकसंख्या, विकास : ४० गुण 
३) जागतिकीकरण परिणाम : १५ गुण 
४) महिला : १५ गुण 
निष्कर्ष : १. २०१८मध्ये भारतीय समाज या घटकाला विशेष विशेष प्राधान्य दिलेले दिसून येते. २०१७मध्ये या घटकावर ५० गुणांसाठीचे प्रश्न विचारले होते. परंतु, २०१८मध्ये यावर १०५ गुणांचे प्रश्न विचारून आयोगाने हे स्पष्ट केले आहे, की कुठल्याही घटकाला आपण बाजूला सारून परीक्षेला जाणे धोकादायक ठरू शकते. 
२. २०१७मध्ये धर्म, प्रादेशिकता व सशक्तीकरण या एकाच घटकावर आयोगाने प्रश्न विचारले होते. परंतु, २०१८चा विचार करता अभ्यासक्रमातील या घटकाशी निगडित सर्व उपघटकांवर आयोगाने प्रश्न विचारले आहेत. 
GS - I ‌व GS-III या पेपरमधील अभ्यासक्रमाचा विचार करता GS-III च्या अभ्याक्रमातील प्रश्न GS-I मध्ये विचारण्याची आयोगाची वृत्ती वारंवार दिसून येते. 
उदा. २०१७मध्ये ‘जुनो मिशन’, २०१८मध्ये IRNSS हे विज्ञान तंत्रज्ञानाशी संबंधित प्रश्न जे GS-III मध्ये विचारले पाहिजेत ते GS-I मध्ये विचारले आहेत. 
२०१८मध्ये ‘निळी क्रांती’ विचारली आहे. हाही घटक GS-III शी संबंधित आहे. 
२. GS-I व GS-II च्या बाबतीतही गरिबीबद्दलच्या शासकीय योजानांच्या बाबतीत हे दिसून येते. 
३. GS - I च्या अभ्यासक्रमाबाहेरचेही प्रश्न जे इतर GS-II ‌वा GS-III जसे पर्यावरण, शेती याबाबतही दिसून येते. 
४. तेच ते प्रश्न विचारताना दिसून येतात. उदा. भारतीय धर्मनिरपेक्षता ही पाश्चिमात्य देशांपेक्षा कशी भिन्न आहे, ते २०१४ व २०१८ दोन्ही वर्षी विचारलेली आपण पाहतो. 

 

सामान्य अध्ययन पेपर तीन

article-about-general-study-paper-three

6430   03-Nov-2018, Sat

प्रस्तुत लेखामध्ये आपण सामान्य अध्ययन पेपर ३ अंतर्गत नमूद केलेला अभ्यासक्रम तसेच या पेपरचे स्वरूप आणि व्याप्ती याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत. यूपीएससीने २०१३ मध्ये मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये बदल केलेला आहे व प्रस्तुत बदलानुसार या पेपरमध्ये तंत्रज्ञान, आर्थिक विकास, जैवविविधता, पर्यावरण, सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन या घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच प्रत्येक घटकामध्ये अंतर्भूत असणारे मुद्दे याची यादीही देण्यात आलेली आहे.

आर्थिक विकास

या घटकामध्ये भारतीय अर्थव्यवस्था संबंधित मुद्दय़ांचा समावेश करण्यात आलेला आहे ज्यामध्ये अर्थव्यवस्थेशी निगडित आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास, नैसर्गिक साधनसंपत्ती व या संपत्तीच्या वापराचे नियोजन, सर्वसमावेशक वाढ साध्य करण्यासाठी सरकारमार्फत राबविले जाणारे महत्त्वाचे उपक्रम, देशातील बजेट प्रक्रिया (c), कृषी आणि कृषी संबंधित संलग्न असणारे क्षेत्रे तसेच कृषी क्षेत्राची उत्पादकता आणि स्थूल देशांतर्गत उत्पादनातील वाटा वाढविण्यासाठी सरकारद्वारे राबविल्या जाणाऱ्या विविध योजना आणि या क्षेत्राला भेडसावणाऱ्या समस्या आणि त्या सोडविण्यासाठी सरकारने आखलेली ध्येयधोरणे, औद्योगिक क्षेत्र, सेवाक्षेत्र यांसारख्या आर्थिक विकासाला आणि आर्थिक वृद्धीला अधिक गती देणाऱ्या क्षेत्रासाठी सरकारमार्फत राबविले जाणारे विविध उपक्रम, योजना, आखण्यात आलेले कायदे, भारतामध्ये परकीय गुंतवणूक वाढविण्यासाठी आखण्यात आलेली रणनीती व याचबरोबर भारताचे परकीय व्यापार धोरण व निर्यात वाढीसाठी आखलेल्या विविध उपाययोजना, दळणवळण क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी सरकारमार्फत केले जाणारे विशेष प्रयत्न, १९९१मध्ये भारताने अवलंबिलेले आर्थिक उदारीकरणाचे धोरण आणि याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम, जागतिकीकरणाचे भारतीय अर्थव्यवस्थेवर झालेले परिणाम इत्यादी महत्त्वपूर्ण मुद्दय़ांचा अभ्यास या घटकाची तयारी करताना करावा लागतो.

तंत्रज्ञान – हा घटक मुखत्वे विज्ञान आणि तंत्रज्ञान या अनुषंगाने आहे. या घटकामध्ये भारत सरकारने विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये विकास घडवून आणण्यासाठी कोणत्या प्रकारच्या धोरणाची आखणी केलेली आहे, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास व व्यवहार उपयोगिता, तसेच याचा सर्वसामान्यांच्या जीवनावर होणारा परिणाम, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये भारतीयांनी केलेली कामगिरी आणि दिलेले योगदान तसेच माहिती तंत्रज्ञान, संगणक, अवकाश संशोधन, नॅनो तंत्रज्ञान, जैव-तंत्रज्ञान आणि बौद्धिक संपदा अधिकार संबंधित मुद्दे इत्यादी बाबींचा समावेश आहे आणि या संदर्भात दररोज घडामोडी घडत असतात. त्यामुळे हा घटक अभ्यासताना उपरोक्त नमूद केलेल्या प्रत्येक बाबीची मूलभूत संकल्पनेसह योग्य समाज असावी लागते.

थोडक्यात विज्ञान आणि तंत्रज्ञानचा घटक अभ्यासताना विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये लावले जाणारे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील नवनवीन शोध, आणि या शोधामुळे होणारे फायदे आणि तोटे, बौद्धिक संपदा अधिकार तसेच याचे होणारे परिणाम इत्यादी महत्त्वपूर्ण पलूंवर भर देण्यात येतो.

जैवविविधता, पर्यावरण आणि आपत्ती व्यवस्थापन – या घटकामध्ये पर्यावरण संवर्धन, पर्यावरण आणि जैवविविधतेचा होणारा ऱ्हास व या ऱ्हासासाठी जबाबदार असणारे घटक, जैवविविधतेला निर्माण झालेला धोका, पर्यावरणीय प्रदूषण, नदी प्रदूषण, हवा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण व या मुळे उत्पन्न झालेल्या समस्या, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जैवविविधता आणि पर्यावरण संरक्षणासाठी केल्या जाणाऱ्या विविध उपाययोजना, भारत सरकारमार्फत जैवविविधता आणि पर्यावरण संरक्षित करण्यासाठी पारित करण्यात आलेले विविध कायदे व त्यांची उपयुक्तता याच बरोबर पर्यावरणीय आघाताचे मूल्यमापन इत्यादी

मुद्दे अभ्यासावे लागतात. आपत्ती व्यवस्थापन यामध्ये आपत्तीचे प्रकार (नसíगक आणि मानवनिर्मित), आपत्तीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या, तसेच आपत्ती निवारणासाठी सरकारमार्फत आखण्यात आलेली आपत्ती व्यवस्थापन योजना व कायदे इत्यादी मुद्दे अभ्यासावे लागणार आहेत.

सुरक्षा – सद्यस्थितीत भारताला बाह्य आणि अंतर्गत सुरक्षा अबाधित ठेवण्यासठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे व या समस्या देशाच्या सार्वभौमत्वाला आवाहन देत आहेत.

सुरक्षा या घटकामध्ये भारताच्या बाह्य आणि अंतर्गत सुरक्षासंबंधी मुद्दय़ांचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये डाव्या विचारसरणीचा दहशतवाद अर्थात नक्षलवाद, सीमेपलीकडून होणारी घुसखोरी, दहशतवाद, वाढता प्रादेशिकवाद, पूर्वेकडील राज्यामध्ये होणारी घुसखोरी व वांशिक चळवळी, जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद, आंतरराष्ट्रीय सीमा संबंधी असणारे वादविवाद, संघटित गुन्हेगारी, अवैध पसा हस्तांतरण, सीमेवर अवैधरीत्या होणारी नशिल्या पदार्थाची तस्करी आणि याचे असणारे संघटित स्वरूप, सततचे होणारे भाषिक वाद, राज्या-राज्यांतर्गत असणारे वाद, धार्मिक दंगे, सायबर सुरक्षा संबंधित मूलभूत माहिती, माध्यमे आणि सोशल नेटवìकग साइटस याचा  होणारा वापर, त्याद्वारे देशातील सामाजिक सलोख्याला निर्माण होणारा धोका, सुरक्षिततेला निर्माण होणारे आव्हान इत्यादी बाबी आणि या आव्हानांना सामोरे जाताना भारत सरकारने आखलेली रणनीती ज्यामध्ये सीमा सुरक्षा आणि व्यवस्थापन अधिक सक्षमरीत्या राबविणे, सीमेलगतच्या भागाचा विकास घडवून आणणे, याच बरोबर सागरी सुरक्षा अबाधित राखणे इत्यादी महत्त्वाच्या बाबींचा समावेश यात आहे.

तसेच देशाची बाह्य आणि अंतर्गत सुरक्षा अबाधित राखण्यासाठी सरकारमार्फत स्थापन करण्यात आलेल्या विविध सरकारी संस्था आणि संघटना व त्यांना नेमून दिलेले कार्य याचबरोबर सरकारमार्फत वेळोवेळी केल्या जाणाऱ्या उपाययोजना व कायदे याची माहिती असणे आवश्यक आहे.

उपरोक्त चíचलेल्या जवळपास सर्व घटकांमध्ये महत्त्वाच्या संकल्पनांचाही समावेश असतो आणि या संकल्पनांचे योग्य आकलन करणे अपेक्षित आहे. या साऱ्यामुळे विषयावर प्रभुत्व निर्माण करणे सोपे होते. आपण यापुढील प्रत्येक लेखामध्ये संबंधित घटकामधील काही महत्त्वाच्या संकल्पनांवरही चर्चा करणार आहोत. उपरोक्त चíचलेले सर्व घटक अभ्यासताना या घटकासंबंधित घडणाऱ्या महत्त्वाच्या चालू घडामोडी याचीही तयारी करावी लागणार आहे. अर्थात प्रत्येक घटकाचे प्राथमिक ज्ञान असल्याशिवाय चालू घडामोडीचे योग्य आकलन करता येत नाही.

निबंध : यूपीएससी मुख्य परीक्षा, २०१८

essay-upsc-main-examination-2018

7356   14-Oct-2018, Sun

शुक्रवार २८ सप्टेंबरपासून यूपीएससी मुख्य परीक्षा सुरू झाली. यात पहिलाच पेपर हा निबंधाचा होता. आपण या लेखात यावर्षीच्या निबंधाच्या पेपरविषयी जाणून घेणार आहोत. त्याचे स्वरूप, त्यात विचारलेल्या निबंधाच्या विषयांची पार्श्वभूमी व गतवर्षीच्या निबंधाच्या पेपरशी या वर्षीच्या पेपरची तुलना याचा आढावा आपण घेणार आहोत. या आधी ‘निबंध लेखन’ या विषयावर ‘यशाचा मटामार्ग’ या सदरात आपण दोन लेख प्रकाशित केले होते. एकंदर ‘निबंध’ या भाषेच्या घटकाविषयी सर्व बाबी आपण त्यात पाहिल्या आहेत. तेव्हा विद्यार्थ्यानी तेही लेख या लेखांबरोबर अभ्यासावेत. 

सर्वप्रथम यावर्षीच्या पेपरमध्ये विचारलेल्या निबंधाचे विषय पाहू. 
SECTION – A 
1. Alternative technologies for a climate change resilient India. 
2. A good life is one inspired by love and guided by knowledge. 
3. Poverty anywhere is a threat to prosperity everywhere. 
4. Management of indian border disputers-a complex task. 
SECTION – B 
5 Customary morality cannot be a quide to modern life. 
6. ‘The past’ is a permanent dimemion of human consciousness and values. 
7. A people that values its privileges above its principles loses both. 
8. Reality does not conform to the ideal, but confirms it. 

वरीलपैकी दोन्ही SECTION मधून एकेक विषय निवडून त्यावर १००० ते १२०० शब्दांत निबंध लिहिणे अपेक्षित आहे. वरील विषयांचा विचार केल्यास काही महत्त्वपूर्ण बाबी निदर्शनास येतात. त्या खालीलप्रमाणे आहेत. 
I) तांत्रिक बाबी : यात पेपरचे स्वरूप पारंपरिक आहे. यात कोणताही बदल दिसून येत नाही. गेल्या वर्षी ज्या प्रकारे पेपरचे स्वरूप होते, त्याचप्रमाणे २०१८ मध्येही आहे. 
II) अभ्यासक्रमाच्या बाबी 
१) २०१७ च्या तुलनेत विषयांच्या निवडीबाबत आयोगाने तत्त्वज्ञानाचा दृष्टिकोन २०१८ मध्ये अधिकाधिक वापरलेला दिसून येतो. 
२) पेपरसाठी विषय निवडताना अधिक प्राधान्य ‘सुभाषितांना’ दिलेले दिसून येते. 
उदा. ‘A good life is....’ हे सुभाषित इंग्लडमधील बर्ट्रॅड रसेल या तत्त्ववेत्याचे आहे. ज्यात त्याने आयुष्याची व्याख्या केली आहे. 
‘Poverty anywhere is....’ हे सुभाषित आंतरराष्ट्रीय श्रम परिषद, फिलाल्डेल्फिया, १९४४ च्या वेळी उद‌्धृत केलेले आहे. 
‘A people that values...’ हे सुभाषित द्विईट डी इसेंहोवर याचे असून हेच सुभाषित अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही ट्विट केले होते. 
‘Reality does not comform...’ हे सुभाषित गुस्तेव फॅनबर्ट यांचे आहे. 
यावरून एक बाब स्पष्ट झाली की ८ पैकी ४ तर सुभाषिते आहेत. म्हणजे पेपर काढताना प्रश्नांची निवड करताना ५० टक्के महत्त्व हे सुभाषितांना दिले आहे. म्हणजेच अशाप्रकारे महत्त्वपूर्ण सुभाषिते आपणास माहीत असणे ही काळाची गरज आहे. 
३) अभ्यासक्रमाचा विचार करताना प्रत्यक्षपणे दोन विषय संबंधित आहेत. एक म्हणजे ‘Alternate technologies for climate...’ आणि दुसरा म्हणजे ‘Management of indian border...’ GS-3 शी याचा संबंध आपण पाहू शकतो. 
४) चालू घडामोडींचा संबंध हा प्रत्येक स्पर्धा परीक्षेत महत्त्वाचा असतो. ‘गरीबी’ संबंधीचा विषय आयोगाने विचारण्यामागे १९४३ मध्ये बंगालमधील दुष्काळ असण्याची दाट शक्यता आहे. ज्याला २०१६ मध्ये ७५ वर्ष पूर्ण झाले आहेत; तसेच ‘भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमांची सुरक्षा’ हा विषय विचारण्यामागे डोकलामचा मुद्दा, ज्यात भारत, चीन व भूतान यांचे संबंध ताणले गेले होते; तसेच बांगलादेश व हजोंग समाज, म्यानमारमधील रोहिंग्यांचा मुद्दा त्यातून भारतात बेकायदेशीर होणारे स्थलांतर याला आपण पाहू शकतो. 
५) गेल्या ४ वर्षांपासून नैतिक मूल्य मानवी मूल्य यांना केंद्रिभूत ठेवून निबंधासाठी प्रश्न दिले जातात. २०१८ मध्ये ‘Customary morality...’ हा विषय त्या संबंधात आपण पाहू शकतो; तसेच ‘The past is a permanent...’ हाही त्याचेच प्रतिबिंब आहे. 

२०१७ मधील निबंधाचा पेपर 

या पेपरमधील विषयात तांत्रिक वा अभ्यासक्रमाशी संबंधित विषय समाविष्ट केले होते. त्यात शेती, अर्थव्यवस्था, आंतरराष्ट्रीय संबंध (NAM), महिला सशक्तीकरण, सामाजिक माध्यमे, शैक्षणिक संस्थाची भूमिका, आपातकाल असे विषय विचारण्यात आले होते. फक्त एक ‘Joy is simplest form of gratitude’ हा तत्त्वज्ञानाशी संबंधित विषय होता. २०१८ मध्ये विषय निवडीत आयोगाने तत्त्वज्ञानाला खूप महत्त्व दिले आहे. आयोगाची यामागची भूमिका कदाचित उमेदवाराची आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी, मूल्यशिक्षणाप्रती असलेला दृष्टिकोन व साचेबद्ध विचार न करण्याची वृत्ती शोधणे असू शकते. 

२०१९ साठीचे नियोजन 

२०१८ च्या पेपरमध्ये SECTION A मध्ये ‘गरीबी’ वा ‘सीमाप्रश्न’ असा तांत्रिक विषय लिहिण्यास पर्याय आहे; परंतु SECTION B मध्ये तात्त्विक प्रश्न लिहिणे भाग आहे. तेव्हा अशा विषयावर निबंध लिहिण्याचा सराव करणे त्यासाठीची भाषाशैली विकसित करणे ही काळाची गरज आहे. चालू घडामोडी व त्याच्याशी संबंधित सुभाषित समजून घेणे हेही इथे फायदेशीर ठरेल. 
निबंधलेखन कसे करावे, २०१८ चे २०१७ च्या तुलनेत विश्लेषण यासाठी DrSushils Spotlight या YouTube व टेलिग्राम चॅनेलला भेट द्या. निबंध हा भाषेचा घटक आहे. शालेय जीवनातील निबंध व यूपीएससीसाठीचा निबंध यातील फरक समजून नियमित सरावाच्या आधारे आपण या पेपरमध्ये नक्कीच चांगले गुण मिळवू शकतो. 

UPSC मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर पहिला

upsc mains exam GS PAPER 1

3488   10-Jul-2018, Tue

विषयाचे स्वरूप आणि व्याप्ती

यूपीएससीने २०१३ पासून नागरी सेवा मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये बदल केलेला आहे. प्रस्तुत लेखामध्ये आपण यूपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर पहिला याचे नेमके स्वरूप काय आहे, हे थोडक्यात समजून घेणार आहोत. या पेपरचे शीर्षक ‘भारतीय वारसा आणि संस्कृती व इतिहास, जगाचा भूगोल आणि समाज’ असे आहे. तसेच या अंतर्गत अभ्यास कराव्या लागणाऱ्या घटकांची यादीही देण्यात आलेली आहे. हा पेपर २५० गुणांसाठी आहे आणि यात २० प्रश्न विचारण्यात येतात. २०१७ मधील मुख्य परीक्षेत प्रश्न क्रमांक १ ते १० हे प्रत्येकी १० गुणांसाठी होते आणि यातील प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी १५० शब्दांची मर्यादा होती. तसेच प्रश्न क्रमांक ११ ते २० हे प्रत्येकी १५ गुणांसाठी होते आणि यातील प्रत्येक प्रश्नांच्या उत्तरासाठी २५० शब्दांची मर्यादा होती. २०१७ मधील मुख्य परीक्षेत भारतीय वारसा आणि संस्कृती व इतिहास या विषयांवर ७ प्रश्न विचारण्यात आले होते. (प्रश्न क्रमांक १ ते ४ हे प्रश्न १० गुणांसाठी आणि प्रश्न क्रमांक १२, १३, १८ हे १५ गुणांसाठी), समाज या विषयांवर ५ प्रश्न विचारण्यात आलेले होते. (प्रश्न क्रमांक ९ व १० हे प्रश्न १० गुणांसाठी आणि प्रश्न क्रमांक ११, १९, २० हे प्रश्न १५ गुणांसाठी) आणि जगाचा भूगोल या विषयावर ८ प्रश्न विचारण्यात आलेले होते (प्रश्न क्रमांक ५ ते ८ हे प्रश्न १० गुणांसाठी आणि प्रश्न क्रमांक १४, १५, १६, १७ हे प्रश्न १५ गुणांसाठी).

भारतीय वारसा आणि संस्कृती व इतिहास

यामध्ये भारतीय वारसा आणि संस्कृतीचा अभ्यास प्राचीन कालखंडापासून ते आधुनिक कालखंडापर्यंत करावा लागतो आणि इतिहासाच्या अंतर्गत आधुनिक भारताचा अभ्यास १८व्या शतकाच्या मध्यापासून ते सद्य:स्थितीपर्यंत करावा लागतो. तसेच आधुनिक जगाच्या इतिहासाचा अभ्यास १८व्या शतकाच्या मध्यापासून ते साधारणत: १९९१ पर्यंत म्हणजेच यूएसएसआरचे (वररफ पूर्वाश्रमीचा सोव्हिएत रशिया) विघटन तसेच पूर्व आणि पश्चिम जर्मनीचे एकत्रीकरणपर्यंत करावा लागतो. भारतीय वारसा आणि संस्कृती यामध्ये प्राचीन भारत ते आधुनिक भारत या कालखंडातील भारतातील विविध स्थापत्यकला, शिल्पकला, चित्रकला, संगीत, नृत्य व नाटय़, साहित्य, हस्तकला, सण व उत्सव इत्यादींशी संबंधित प्रश्न विचारले जातात. या घटकाची तयारी करताना या विविध कलांचा झालेला उगम, साहित्य इत्यादी सर्वागीण पद्धतीने अभ्यासावे लागते. या सर्व कला, साहित्य, सण व उत्सव, हस्तकला यांची पाश्र्वभूमी ही प्राचीन कालखंडापासून अभ्यासावी लागते. कारण या कलांची सुरुवातच प्राचीन कालखंडापासून झालेली आहे व उत्तरोत्तर (प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक कालखंड) यामध्ये मोठय़ा प्रमाणात विकास झालेला पाहावयास मिळतो. तसेच कालखंडनिहाय या विविध कलांमध्ये घडून आलेले बदल, त्यांची वैशिष्टय़े तसेच या विविध कलांद्वारे भारतीयांची सांस्कृतिक उपलब्धी यांसारख्या माहितीचे आकलन करावे लागते. तेव्हाच या विषयावर विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे लिहिता येऊ शकतात. आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासताना या घटकाची विभागणी साधारणत: तीन भागांत करता येऊ शकते. १८व्या शतकाच्या मध्यापासून ते १९४७ पर्यंत म्हणजेच भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत, जो भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा कालखंड आहे आणि स्वातंत्र्योत्तर भारत (१९४७ पासून ते सद्य:स्थितीपर्यंत). यातील स्वातंत्र्यपूर्व भारतावर सर्वाधिक प्रश्न विचारले जातात व हे प्रश्न महत्त्वपूर्ण घडामोडी, घटना, व्यक्ती आणि त्यांचे योगदान या अनुषंगाने शक्यतो विचारले जातात. आधुनिक जगाचा इतिहास अभ्यासताना याची साधारणत: दोन भागांत विभागणी करता येऊ शकते. १८व्या शतकाच्या मध्यापासून ते दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या समाप्तीपर्यंत म्हणजे १९४५ पर्यंत आणि संयुक्त राष्ट्र संघाच्या स्थापनेपासून (१९४५) ते १९९१ पर्यंत. यामध्ये मुख्यत्वे युरोप, अमेरिका, आफ्रिका आणि आशिया या खंडामधील महत्त्वपूर्ण घडामोडी, घटना, व्यक्ती व त्यांचे योगदान यांवर प्रश्न विचारले जातात.

समाज

यामध्ये भारतीय विविधतेची आणि समाजव्यवस्थेची महत्त्वाची वैशिष्टय़े, तसेच महिलांची भूमिका, महिला संघटना, लोकसंख्या व संबंधित मुद्दे, गरिबी आणि विकासात्मक मुद्दे, नागरिकीकरण इत्यादीशी संबंधित समस्या व त्यावरील उपाययोजना. याव्यतिरिक्त सामाजिक सक्षमीकरण, सांप्रदायिकता, प्रादेशिकता आणि धर्मनिरपेक्षता हे महत्त्वाचे मुद्दे आणि जागतिकीकरणाचा भारतीय समाजावर झालेला परिणाम इत्यादी महत्त्वाच्या मुद्दय़ांवर प्रश्न विचारले जातात. या विषयातील काही नमूद मुद्दे निबंध लेखनालाही उपयुक्त ठरतात. म्हणून हा विषय सर्वागीण आणि सखोल पद्धतीने अभ्यासल्यास अधिक उपयुक्त ठरू शकतो. या विषयाचे स्वरूप विश्लेषणात्मक असल्यामुळे योग्य आकलन करणे आवश्यक आहे.

जगाचा भूगोल

यामध्ये प्राकृतिक भूगोलाची वैशिष्टय़े, महत्त्वाच्या भूप्राकृतिक घटना/ घडामोडी, भौगोलिक वैशिष्टय़े, वनस्पती आणि त्यांच्या प्रजाती, नसíगक साधनसंपत्तीचे वितरण, जगाच्या विविध प्रदेशांतील प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय क्षेत्रांतील उद्योग स्थाननिश्चितीसाठी जबाबदार असणारे घटक आणि त्यांचे स्थान इत्यादी महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश होतो. या सर्वाचा अभ्यास करताना साधारणत: याची विभागणी जगाचा भूगोल आणि भारताचा भूगोल अशी करावी लागते. जगाच्या भूगोलाचे प्राकृतिक आणि मानवी भूगोल (सामाजिक आणि आíथक भूगोल) असे वर्गीकरण करावे लागते आणि भारताच्या भूगोलालाही हेच वर्गीकरण लागू होते. या वर्गीकृत पद्धतीने या विषयाचा सखोल अभ्यास करावा लागतो. भारताच्या भूगोलावर जास्त प्रश्न विचारले जातात.

युपीएससी पूर्वपरीक्षा : भारतीय राज्यव्यवस्था

POLITY SUBJECT IN UPSC MPSC

8484   03-Jul-2018, Tue

युपीएससी पूर्वपरीक्षेतील सर्वांत महत्त्वाच्या विषयांपैकी एक म्हणजे भारतीय राज्यघटना व घटनात्मक प्रक्रिया होय. भारतीय राज्यव्यवस्थेला (Indian Polity) समजून घेणे स्पर्धा परीक्षेत महत्त्वाचे ठरते; कारण या विषयाला पूर्व व मुख्य परीक्षेत गुणांचा विचार करता अधिक महत्त्व आयोगाने दिलेले दिसून येते. सन २०११ पासूनच्या प्रश्नपत्रिकांचा विचार केल्यास १५ ते २० टक्के प्रश्न हे भारतीय राज्यव्यवस्थेवर विचारले जातात. सन २०१७ च्या पूर्वपरीक्षेचे उदाहरण घेतल्यास १०० पैकी तब्बल २२ प्रश्न या विषयावर विचारलेले आहेत. यावरूनच या विषयाचे महत्त्व अधोरेखित होते.

या विषयावर प्रश्न विचारताना तीन पद्धतीने प्रश्न विचारला जातो. 

१) मूलभूत संकल्पना व संविधानातील तथ्यांवर आधारित प्रश्न.

Q. for election to the Lok Sabha, a nomination paper can be filed by (2017) 
a) anyone residing in India 
b) a resident of the constituency from which the election is to be contested. 
c) any citizen of India whose name appers in the electoral roll of a constituency 
d) any citizen of India 

Ans - (c) 

२) चालू घडामोडींशी संबंधित विषयातील मूलभूत संकल्पनांवर आधारित प्रश्न. 

Q. With referecne to the Parliament of India, consider the following statements : 
1) A private member's bill is a bill persented by a member of parliament who is not elected buy only nominated by the persident of India. 
2) Recently, a private members bill had been passed in the parliament of India for the first time in its history. 
which of the statments qiven above is/are correct? 
a) 1 only b) 2 only c) Both 1 and 2 d) Niether 1 or 2 

Ans - (d) 

३) भारतीय राज्यघटनेतील मूलभूत संकल्पनांबाबतचे तात्त्विक प्रश्न असे प्रश्न प्रामुख्याने २०१७ च्या पूर्वपरीक्षेच्या पेपरमध्ये दिसून आले आहेत. अशा प्रश्नांच्या उत्तराबाबत तज्ज्ञांमध्येही मतभेद दिसून आले आहेत. 

प्र. Right to vote and to be eleted in India a 
a) fundamental Right b) Natutral right 
c) constitutional right d) Legal right 

भारतीय राज्यव्यवस्था (Indian Polity) या विषयाच्या अभ्यासक्रमात खालील घटकांचा समोवश होतो. 


राज्यघटना : ऐतिहासिक पार्श्वभूमी, घटनेची निर्मिती, प्रमुख वैशिष्ट्ये, सरनामा, मूलभूत हक्क, राज्याची मार्गदर्शक तत्त्वे, मूलभूत कर्तव्ये, घटनादुरुस्ती व राज्यघटनेची मूलभूत संकल्पना. 

शासनपद्धती : संसदीय प्रणाली, संघराज्यीय प्रणाली, केंद्र-राज्य संबंध, आंतरराष्ट्रीय संबंध, आणीबाणीविषयक तरतुदी इ. 

केंद्र शासन : राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्रिमंडळ, कॅबिनेट समित्या, संसद, संसदीय समित्या, संसदीय मंच, संसदीय गट, सर्वोच्च न्यायालय, न्यायिक पुनर्विलोकन, न्यायिक सक्रियता, जनहित याचिका इ. 

राज्य शासन : राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ, राज्य विधिमंडळ, उच्च न्यायालय, दुय्यम न्यायालये, जम्मू व काश्मीर विशेष दर्जा, काही राज्ये विशेष तरतुदी इ. 

स्थानिक शासन : पंचायती राज व नगरपालिका 

संघराज्य प्रदेश व विशेष क्षेत्रे : संघराज्य प्रदेश व अनुसूचित व आदिवासी क्षेत्रे. 

घटनात्मक संस्था : निवडणूक आयोग, संघ लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग, वित्त आयोग, अनुसूचित जातींसाठी राष्ट्रीय आयोग, विशेष अधिकारी, भारताचा महालेखापरीक्षक, भारताचा महान्यायवादी राज्याचा महाधिवक्ता. 

घटनाबाह्य संस्था : निती आयोग, राष्ट्रीय मानवी हक्क आयोग, राज्य मानवी हक्क आयोग, केंद्रीय माहिती आयोग, राज्य माहिती आयोग, केंद्रीय दक्षता आयोग, केंद्रीय अन्वेषण विभाग, लोकपाल व लोकायुक्त. 

इतर घटनात्मक बाबी : सहकारी संस्था, अधिकृत भाशा, लोकसेवा, न्यायाधिकरणे, सरकारचे अधिकार व दायित्व, हिंदी भाषेतील अधिकृत राज्यघटना. 

राजकीय अभिसरण : राजकीय पक्ष, निवडणुका, पक्षांतर विरोधी कायदा, दबावगट राष्ट्रीय एकात्मता, परराष्ट्र धोरण. 

राज्यघटनेची कार्यपद्धती : राज्यघटनेचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय आयोग. 


गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांच्या आधारे अधोरेखित होणाऱ्या महत्त्वाच्या नोंदी : 

दर वर्षी विचारले जाणारे प्रश्न जर विषय ‌नीट समजून घेतला असेल तर विद्यार्थी सोडवू शकतो. 

काही विशिष्ट घटकांवर पुन्हा पुन्हा त्याच धाटणीचे प्रश्न विचारण्याची आयोगाची वृत्ती दिसून येते 

प्रश्नांत उत्तरासाठी दिलेले सर्व पर्याय नीट वाचून समजून घ्यावेत. 

सर्व कलम पाठ करण्याची गरज नसते. कलम १२ ते ५१ इतकी कलमे सोडली तर महत्त्वाची कलमे माहिती असणे पुरेसे ठरते. 

खूप खोलवरच्या तथ्यांवर प्रश्न विचारण्याची आयोगाची वृत्ती दिसून येत नाही. 

खूप महत्त्वाचे घटक, ज्यावर वारंवार आयोगाची प्रश्न विचारण्याची वृत्ती दिसून येते : 

मूलभूत हक्क, राज्याची मार्गदर्शक तत्त्वे, नागरिकांची कर्तव्ये, सरनामा, संसदेतील तीन समित्या - लोकलेखा समिती, अंदाज समिती, सार्वजनिक उपक्रम समिती इ., संसदीय कामकाजातील प्रस्तव (motion), जसे अविश्वास प्रस्ताव, लक्षवेधी सूचना, स्थगन प्रस्ताव, धन विधेयक, सर्वसमान्य विधेयक, घटनादुरुस्ती विधेयक - केंद्र व राज्यशासन, बजेटसंबंधी अधिकार, लोकसभा व राज्यसभा, राष्ट्रपती व राज्यपाल यांचे विशेषाधिकार, न्यायव्यवस्था व महत्त्वाचे खटले, स्थानिक स्वराज संस्था, ७३ व ७४ घटनादुरुस्ती इ. घटकांवर आयोगाने प्रश्न विचारले आपण पाहतो. 

संदर्भ पुस्तके : 

१. indian polity - M. laxmikant (मराठीत अनुवाद के. सागर) 
२. NCERT - constitution at work 
३. India year book यातील राज्यघटनेचा धडा. 

निबंध लेखन विषयाचा आवाका आणि मर्यादा

general-essay-writing-tips

3147   27-Jun-2018, Wed

निबंधाच्या पेपरमधील किमान आवश्यक बाबी –

  • विषयाचा आवाका आणि मर्यादा
  • विचारांतील व मांडणीतील स्पष्टता
  • वैचारिक प्रक्रिया
  • उमेदवाराचे स्वत:चे वैचारिक विश्लेषण

आता आपण यातील प्रत्येक मुद्दय़ावर स्वतंत्र चर्चा करणार आहोत. या अपेक्षा प्रत्यक्ष लिखाणात कशा उतरवायच्या हेही पाहणार आहोत. या अपेक्षांच्या यादीकडे बघितले तर असेही लक्षात येईल की, साधारणत: शाळा-कॉलेजमध्ये असताना ज्या मुद्दय़ांना धरून निबंध लिहिले किंवा तपासले जातात तशी ही यादी नाही. उदाहरणार्थ, अलंकारिक भाषा, सुविचारांचा वापर इत्यादी. अर्थात, वरील गोष्टी करूच नयेत अशातला भाग नाही. मात्र, १०००-१२०० शब्द लिहिताना असलेला ताíकक मांडणीचा हेतू असफल होणार नाही, याची दक्षता जरूर घ्यावी.

अर्थपूर्ण व सुसूत्र मांडणी असलेला निबंध लिहिण्यासाठी खालील टप्प्यांचा वापर करावा.

आराखडा

पेपरमध्ये दिलेले सर्व निबंध विषय काळजीपूर्वक वाचावेत. ज्या विषयाबद्दल आपल्याला पुरेसा आत्मविश्वास वाटतो तो विषय निश्चित करावा. एकदा विषय निश्चित करून लिखाणास सुरुवात केल्यानंतर पुन्हा विषय बदलला जाऊ शकत नाही. विषय निश्चित करत असताना, त्या विषयाबद्दल आपल्याला किती माहिती आहे व एकंदरीतच त्या विषयाचे लिखाण करण्याकडे आपला किती कल आहे याचा अंदाज घ्यावा. सुरुवातीची १० ते १५ मिनिटे विषय निश्चित करण्यात व कच्चा मसुदा तयार करण्यात गेली तरी हरकत नाही.

कच्चे काम करण्यासाठी उत्तरपत्रिकेमध्ये जागा दिलेली असते. निबंधविषयाशी संबंधित मुद्दय़ांचे टिपण काढून कच्चा आराखडा तयार करावा. निबंधामध्ये येणाऱ्या सर्व प्रमुख मुद्दय़ांचा यामध्ये समावेश असावा. यातून लिखाणाला निश्चित दिशा मिळण्यास मदत होते. तीन तास सलग लिखाण करण्याकरिता अशा नियोजनाची व त्यास अनुसरून मांडणी करण्याची नितांत गरज असते. एकदा लेखनाची रचना ठरली की, त्याप्रमाणे एकसमान लयीत मांडणी करावी. अनेकदा लिहीत असताना नवीन मुद्दे, संदर्भ आठवतात. त्यांचा लिखाणात जरूर समावेश करावा. मात्र असे करत असताना मूळ रचनेला धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी.

असे नियोजन केल्याने लेखन करण्याआधी विषयासंबंधीचा पूर्ण विचार केला जातो. संपूर्ण निबंध लिहून झाल्यानंतर जर असे लक्षात आले की, नियोजनावर अजून थोडावेळ खर्च करायला हवा होता तरी त्याचा काही उपयोग नाही. मुक्त शैलीत निबंध लिहिल्यास, नंतर आढावा घेत असताना काही परिच्छेद गाळायला हवेत असे वाटल्यास काहीही केले जाऊ शकत नाही. अशा सर्व प्रकारचे रचनेतील बदल आराखडय़ाच्या टप्प्यावरच करणे शक्य आहे. अशा प्रकारे उत्तम नियोजनानंतर लेखन करत असताना विचार करण्यात खूप वेळ खर्च होत नाही. लेखनाच्या मांडणीकडे, शब्दांच्या वापराकडे पुरेसे लक्ष दिले जाते. अर्थातच लिहीत असताना झालेल्या लिखाणाचा आढावा घेणे आवश्यक असते.

विषयाचा आवाका आणि मर्यादा

निबंध विषय निवडल्यानंतर त्या विषयाशी प्रामाणिक राहणे, हे सर्वात मोठे आव्हान आहे. असे करत असताना विषयाशी संबंधित कोणते मुद्दे चच्रेच्या केंद्रस्थानी असायला हवेत, आणि कोणते मुद्दे परिघावरचे आहेत, याचे भान असणे अतिशय महत्त्वाचे ठरते. मध्यवर्ती मुद्दे राहून गेले आणि इतरच मुद्दय़ांवर खूप चर्चा झाली, अशा गोष्टी टाळण्याकरिता पुढील विचारपद्धती अवलंबता येईल. विशेषत: विश्लेषणात्मक निबंध (जे यूपीएससीमध्ये अनेकदा लिहावे लागतात) लिहीत असताना या पद्धतीचा अवलंब करता येतो.

इंग्रजीमध्ये याला  PESTLE Analysis म्हणतात. दिलेल्या निबंध विषयाचा आपण P(Political), E(Economics), S(Social), T(Technological), L(Legal), E(Environmental) अशा सर्व अंगांनी विचार केला आहे का?, हे पडताळून पाहिल्यास महत्त्वाचे मुद्दे सुटत नाहीत. अर्थात, अशा प्रकारे लिहायलादेखील भरपूर सराव असणे गरजेचे आहे.

पुढील लेखात आपण विचारातील व मांडणीतील स्पष्टता आणि वैचारिक प्रक्रिया यावर सविस्तर चर्चा करणार आहोत.

मूळ हेतू / प्रमुख दावा

निवडलेल्या विषयासंबंधी कोणता प्रमुख मुद्दा आपल्याला सांगायचा आहे हे निश्चित केले पाहिजे. आपण सांगत असलेला मुद्दा ठामपणे सांगण्यामागील मूळ हेतू कोणता याबद्दल लिखाणात स्पष्टता असणे आवश्यक आहे. यामधून वाचणाऱ्याला लेखनाची एकंदरीत दिशा कोणती हे समजण्यास मदत होते. एकंदरीतच स्पष्ट मूळ हेतूशिवाय चांगला निबंध लिहिणे अशक्य आहे. हा प्रमुख मुद्दा/दावा पहिल्या परिच्छेदाच्या शेवटी येणे अपेक्षित आहे.

विषयाच्या सुरुवातीला जी तोंडओळख करून दिली जाते त्याला जोडूनच हे ठाम मत येणे आवश्यक आहे. पहिल्या परिच्छेदाच्या शेवटी हे विधान असण्याची वाचक किंवा निबंध तपासणारी व्यक्ती अपेक्षा करते. एकदा प्रमुख मुद्दा लक्षात आल्यानंतर त्यासंदर्भातील अधिक बारकावे असलेला युक्तिवाद निबंधात असेल अशी अपेक्षा केली जाते.

निबंध लेखन 

upsc essay writing

3121   25-Jun-2018, Mon

भाषेच्या माध्यमातून आपली मते मांडण्याचा आणि एकंदरीतच व्यक्ती म्हणून सादर होण्याचा प्रभावी मार्ग म्हणजे निबंध लेखन! यूपीएससीच्या मुख्य परीक्षेमधील निबंधाचा पेपर हा महत्त्वाचा तसेच अतिशय आव्हानात्मक असा घटक आहे. गतवर्षीच्या निकालांनी हे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. निबंध विषयाकरिता स्वतंत्र पेपर १९९३ पासून परीक्षेच्या संरचनेमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. सतीशचंद्र समितीच्या अहवालानुसार हा बदल करण्यात आला. आधीच्या संरचनेप्रमाणे दिलेल्या सहा विषयांपैकी एक विषय निवडून त्यावर तीन तासांमध्ये २५०० (कमाल मर्यादा) शब्दांमध्ये एक निबंध लिहिणे अपेक्षित होते. १०१४ पासून २५० गुणांसाठी उमेदवारांनी दोन विषयांवर निबंध लिखाण करणे अपेक्षित आहे. २०१४ पासून अ आणि इ अशा दोन विभागांमध्ये प्रत्येकी चार विषय देण्यात येतात. प्रत्येक विभागातील चारपैकी एक विषय निवडून त्यावर प्रत्येकी १०००-१२०० शद्बात निबंध लिहिणे अपेक्षित आहे. निबंधाच्या घटकामधून उमेदवाराची विचारक्षमता व विश्लेषणात्मक कौशल्ये तपासली जातात.

यूपीएससी परीक्षेतील निबंधाच्या पेपरचे महत्त्व  

निबंध विषयामध्ये चांगले गुण मिळवून एकंदरीत गुणांची बेरीज वाढविणे शक्य आहे तर निबंध विषयामुळे एकंदरीत गुणांवर नकारात्मक परिणाम होणे देखील शक्य आहे. निबंध विषयात चांगले गुण मिळाल्यास त्याचा फायदा वरच्या गटातील पद मिळण्यास मदत होऊ  शकते. निबंधाचा पेपर हा मुख्य परीक्षेतील अनिवार्य घटक आहे आणि म्हणूनच त्याचे गुण अंतिम गुणपत्रिकेत धरले जातात.  निबंधांच्या विषयांसंदर्भात कोणीही उमेदवार विशेष प्रभुत्व असल्याचे ठामपणे सांगू शकत नाही. इतर सामान्य अध्ययनाच्या विषयांबाबत अथवा वैकल्पिक विषयांबाबत अशा प्रकारचे प्रभुत्व मिळवणे कष्टसाध्य असते. परंतु निबंधाबाबतीत सर्व उमेदवारांसाठी सारखेच आव्हान निर्माण होते. त्याचबरोबरीने निबंधाच्या विषयासाठीची सर्व माहिती कोणीही साठवून ठेवू शकत नाही. किंबहुना केवळ साठवलेल्या माहितीतून चांगला निबंध लिहिला जाऊ शकत नाही. म्हणूनच निबंधाच्या पेपरसाठी जाणीवपूर्वक तयारी करणे आवश्यक ठरते. अर्थात, निबंधाबाबतीत हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, निबंध हा प्रत्येक व्यक्तीच्या विचारांचा, मतांचा, मूल्यांचा ठसा असतो. यूपीएससी उमेदवारांकडून दिलेल्या विषयाबद्दल माहिती बरोबरच योग्य विषय व अनुमानांची आयोग अपेक्षा करते. तसेच आपली मते, वैचारिक कल, संप्रेषण कौशल्ये या सगळ्याचा परिपाक निबंधात उतरणे अपेक्षित आहे. अनेक विद्यार्थ्यांचे व भावी उमेदवारांचे असे मत असते की, सामान्य अध्ययनाच्या इतर तयारी मधूनच निबंधाच्या घटकाची सुद्धा तयारी होते. मात्र तयारीच्या या टप्प्यावर आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, सामान्य अध्ययनाच्या इतर घटकांप्रमाणेच निबंधाच्या घटकाकरिता विशिष्ट तयारी करणे गरजेचे असते. ही तयारी करीत असताना विषयाचे ज्ञान मिळविणे, स्वत:चा वैचारिक कल व मते निश्चित करणे व लिखाणाचा सराव करणे या सगळ्या टप्प्यांचे क्रमवार नियोजन करावे लागते. याकरिता पुरेसा वेळ द्यावा लागतो. तसेच सामान्य अध्ययनाच्या इतर पेपरप्रमाणे भरपूर सराव करावा लागतो.

निबंध लिखाण करत असताना लेखनाची शैली हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. दिलेल्या विषयाशी प्रामाणिक राहून सलग तीन तास गुणवत्तापूर्ण लिखाण करणे, योग्य माहितीचा वापर करणे, मते आणि विश्लेषण यांची सांगड घालणे या सगळ्याकरिता तयारीच्या नियोजनामध्ये वेगळा वेळ द्यावा लागतो. परीक्षेमध्ये यशस्वीरीत्या निबंधलेखन करण्यासाठी तयारीच्या टप्प्यावर भरपूर सराव केलेला असणे आवश्यक आहे. याकरिता काय व कसे काम करावे हे आपण पाहणार आहोत. एकंदर यूपीएससीच्या तयारीच्या काळात इतके मोठे व सविस्तर निबंध लिहिणे हे अवघड वाटणे साहजिक आहे. परंतु जसेजसे आपल्या वाचनाचा व लिखाणाचा अवकाश विस्तारत जातो तसेतसे निबंध लिखणासाठीचा पाया मजबूत होतो.

निबंधाच्या पेपरमधील किमान आवश्यक बाबी : 

१)  विषयाचा आवाका आणि मर्यादा

२)  विचारातील व मांडणीतील स्पष्टता

३)  वैचारिक प्रकिया

४)  उमेदवाराचे स्वत:चे वैचारिक विश्लेषण

वरील अपेक्षांची यादी आयोगाने दिलेली आहे. वरवर पाहता साधारण वाटत असली, तरी ही यादी प्रत्यक्षात आणताना लिखाणावर पुष्कळ कष्ट घ्यावे लागतात. 


Top

Whoops, looks like something went wrong.