यूपीएससीची तयारी ; नैतिकता एक आढावा

MPSC chalu ghadamodi, current affairs-Preparation Of Upsc Exam Tips For Upsc Exam Preparation Zws 70

291   04-Dec-2019, Wed

स्पर्धा परीक्षांच्या तयारीतील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे, आयोगाची ठरावीक विषयाला धरून काय मागणी आहे, हे नीट समजून घेणे. ही मागणी विषयाबद्दल तसेच परीक्षा पद्धतीबद्दल असू शकते. ठरावीक विषयाची परीक्षा घेण्यामागचा हेतू, विचारल्या जाणाऱ्या प्रश्नां चा साचा, या सर्वाचा नागरी सेवांशी असणारा संबंध हे लक्षात घेतल्यास विषयाची तयारी करणे सोपे जाऊ शकते. हे मुख्य परीक्षेतील सर्वच विषयांसाठी लागू आहे. अर्थातच एथिक्सच्या म्हणजेच नीतिमत्तेच्या पेपरसाठीदेखील अशा विश्लेषणाची खूप मदत होते. याचाच एक भाग म्हणजे, आयोगाने मागील वर्षांत विचारलेल्या प्रश्नांचा आढावा घेणे, तसेच एकंदर प्रश्नपत्रिकेच्या बदलत्या स्वरूपाचे विश्लेषण करत राहणे.

यामुळे अनेक प्रश्नांचा खुलासा होतो –

(१)    कोणत्या संकल्पनांवर प्रश्न विचारताना भर दिला गेला आहे?

(२) प्रश्न विचारत असताना, चालू घडामोडी या संकल्पनांशी कशा जोडल्या जातात?

(३) पुन्हा पुन्हा विचारले जाणारे प्रश्न प्रकार आणि घटक कोणते?

(४) तीन तासांत कराव्या लागणाऱ्या लिखाणाचा एकूण आवाका किती?

(५) येणाऱ्या प्रत्येक वर्षांबरोबर बदलत जाणारी काठिण्यपातळी

वरील बाबींचा आढावा घेतल्याशिवाय तयारीला नेमकी दिशा मिळत नाही. एथिक्ससारखा विषय तुलनेने नवीन असल्याने प्रश्नांचे विषय आणि स्वरूप जरी लक्षात आले, तरीही नेमके लिखाण कसे करायचे याबद्दल उमेदवारांच्या मनात अनेकदा संभ्रम दिसून येतो. तसेच इतर सामान्य अध्ययनांच्या पेपरच्या तुलनेत एथिक्स हा घटक नावीन्यपूर्ण असल्याने, त्याचे वेगळे दडपणही बघायला मिळते. या सगळ्याचा सामना करता येण्यासाठी, वर म्हटल्याप्रमाणे प्रामाणिकपणे विषयाचा आवाका आणि मागणी समजून घेणे आवश्यक आहे.

यूपीएससीची तयारी : नागरी सेवा क्षमता चाचणी (CSAT)

upsc-exam-2019-useful-tips-for-upsc-exam-preparation-2-1885631/

2164   05-May-2019, Sun

सर्व उमेदवारांना आता २ जून २०१९ रोजी होणाऱ्या पूर्वपरीक्षेचे वेध आता सर्व उमेदवारांना लागले आहेत. त्या परीक्षेमधील  CSAT  हा एक महत्त्वाचा पेपर आहे. २०० गुणांचा हा पेपर २०१५ पासून पात्रता पेपर ठरवण्यात आला आहे. तयारी करताना महत्त्वाचे मुद्दे लक्षात न आल्याने किंवा लक्षात न ठेवल्याने किंवा याच्या तयारीला पुरेसे महत्त्व न दिल्याने बऱ्याच उमेदवारांना किमान ३३ टक्के गुण मिळवणेसुद्धा अवघड होऊन बसते. या महत्त्वाच्या मुद्दय़ांची थोडक्यात उजळणी व्हावी हाच या लेखाचा हेतू आहे.

सर्वसाधारणपणे  CSAT च्या अभ्यासक्रमाचे तीन विभाग करता येतात. त्यामधील पहिला म्हणजे उताऱ्यावर आधारित आकलनक्षमता, दुसरा म्हणजे अंकगणित आणि सामान्य बौद्धिक क्षमता आणि तिसरा म्हणजे तार्किक क्षमता व विश्लेषण क्षमता.

आजच्या या लेखामध्ये आपण उताऱ्यावर आधारित आकलन क्षमता या घटकाच्या महत्त्वाच्या मुद्दय़ांची चर्चा करूयात.

आकलन क्षमतेची पुरेशी तयारी करतानाचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या भाषेतून उतारे आणि प्रश्न दिले जातात त्या भाषेचे पुरेसे ज्ञान असणे. बहुतांश मराठी भाषिक उमेदवार पेपर सोडवताना हिंदी भाषेऐवजी इंग्रजी भाषेलाच प्राधान्य देतात. म्हणून इंग्रजी शब्दांचा पुरेसा साठा, व्याकरण, आणि वाक्या-वाक्यांमधील संबंध दाखवणारे निर्देशक शब्द इत्यादी प्राथमिक पण अत्यंत महत्त्वाच्या घटकांची तयारी खूप अगोदरपासूनच सुरू व्हायला हवी.

उताऱ्यावर विचारले जाणारे प्रश्न सर्वसाधारपणे दोन गटांत मोडतात. एक म्हणजे सर्वसमावेशक प्रश्न जसे की, उताऱ्याची मुख्य संकल्पना, उताऱ्यावरून निघणारे अनुमान, लेखकाचा उद्देश आणि त्याने काय गृहीत धरले आहे. दुसरा गट हा विशिष्ट ठरावीक माहितीवर आधारित प्रश्नांचा आहे. यामध्ये उताऱ्यातील एखाद्या विशिष्ट भागावर प्रश्न विचारले जातात. पहिल्या गटामध्ये शब्द, वाक्य आणि त्यांमधील संबंधांवरून अर्थ लावून उत्तर द्यावे लागते तर दुसऱ्या गटात फक्त उत्तर हे उताऱ्यामध्ये नेमके कुठे आहे हे शोधावे लागते. म्हणून अशा विविध प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे शोधताना वेगवेगळी रणनीती वापरावी लागते.

मुख्य संकल्पनेबद्दल विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांसाठी वापरले जाणारे काही वाक्यांश –  main idea, central theme, best sums up, passage refers to  B. मुख्य संकल्पनाही अशी सर्वसमावेशक संकल्पना वा वाक्य असते की ज्याला उताऱ्यातील बाकीच्या गोष्टी आधार देत असतात.

अनुमान वाक्य ही अशी बाब आहे की, जी लेखकाने उताऱ्यामध्ये अप्रत्यक्षरीत्या सांगितलेली असते. उताऱ्यामध्ये केलेला युक्तिवाद हा अनुमानाला आधार देत असतो. पण अनुमान हे मुख्य संकल्पनेसारखे सर्वसमावेशक असेलच असे नाही, कारण ते संपूर्ण उताऱ्यावर आधारित असेलच असे नाही. हा या दोघांमधील अत्यंत महत्त्वाचा फरक आहे याची नोंद घ्यावी. अनुमानाबद्दल विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांसाठी वापरले जाणारे काही वाक्यांश –  inference, passage implies, view implied, conclusion B. लेखकाचा हेतू वा उद्देश ठरवताना बऱ्याच गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. जसे की, कोणत्या मुद्दय़ावर लेखक जास्त वारंवार चर्चा करत आहे, कशा प्रकारचे शब्द त्याच्या लिखाणात येत आहेत, कशा पद्धतीने त्याने उताऱ्याचा समारोप केला आहे वा कोणता निष्कर्ष काढला आहे. तसेच स्वत:च्या युक्तिवादाला आधार देण्यासाठी कोणत्या प्रकारची उदाहरणे वा पुरावे देत आहे या बाबींचा विचार करावा लागतो.

उताऱ्यावर गृहीतकाबद्दल (Assumption) विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी असे पर्याय शोधावे लागतात की, ज्याबद्दल लेखकाने पुरेसे विवरण देणे आवश्यक समजलेले नाही. अथवा त्याने असे गृहीत धरले आहे की वाचकांना याचे पुरेसे ज्ञान वा माहिती असेल. म्हणजे गृहीतकदेखील अप्रत्यक्षरीत्या सांगितलेले असते. परंतु ते लेखकाच्या युक्तिवादाला आधार देत असते. इथे अनुमान आणि गृहीतक यातील फरक लक्षात घ्यावा. कारण दोन्ही अप्रत्यक्षरीत्या सांगितलेले असतात. पण गृहीतक हे लेखकाच्या युक्तिवादाला आधार देत असते आणि लेखकाचा युक्तिवाद हा अनुमानाला आधार देत असतो.

जर उतारा हा दोन वा जास्त परिच्छेदांचा असेल तर अगोदर प्रश्न वाचून घ्यावेत आणि त्यातील महत्त्वाचे कळीचे शब्द लक्षात ठेवावेत. उतारा वाचताना ते अधोरेखित करावेत म्हणजे विशिष्ट प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी परत शोधाशोध करावी लागणार नाही. याव्यतिरिक्त मोठय़ा उताऱ्यासाठी Structure of the Passage Approach, Story-line Approach आणि Optimized Reading Approach चा गरजेनुसार वापर करावा. पण हे करण्याअगोदर वरील पद्धतींची माहिती घेऊन पुरेसा सराव करणे अत्यंत आवश्यक आहे.

पुढील लेखामध्ये आपण अंकगणित आणि सामान्य बौद्धिक क्षमता, आणि तार्किक क्षमता व विश्लेषण क्षमता या घटकांच्या महत्त्वाच्या मुद्दय़ांची चर्चा करणार आहोत.

उताऱ्यावरील प्रश्न आणि त्याचे अभ्यास नियोजन

question on passage and its study

11576   06-Jun-2018, Wed

कोणत्याही लेखनाचे आकलन होण्यासाठी तो एकदा वाचून संपूर्ण कळला असे प्रत्येक वेळी होईलच असे नसते. सामान्यपणे आवडता विषय किंवा विशेष प्रावीण्य असलेला किंवा ज्यामध्ये शिक्षण झाले आहे असा विषय पटकन समजतो. त्यावरील नवीन लेखनही कमी प्रयत्न आणि वेळेमध्ये समजते.

अनोळखी विषय, शालेय व महाविद्यालयीन काळात अवघड वाटणारे विषय, अमूर्त विषय समजून घ्यायला कोणासही थोडे जड जातात आणि त्यासाठी जास्त वेळही द्यावा लागतो. अशा विषयांवरील नवीन लेखनही जास्त अवघड वाटते. आकलन हे असे व्यक्तिनिष्ठ असते. त्यामुळे प्रत्येकाची या घटकाची तयारी करायची पद्धतही वेगळी असायला हवी.

मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केले असता प्रबोधनकाळ, सामान्य विज्ञान, पर्यावरण, आध्यात्म तसेच वैचारिक चर्चा, आर्थिक व सामाजिक समस्या / विकास, सामाजिक चालू घडामोडी यांवर आधारित उतारे विचारण्यात आल्याचे लक्षात येते. यातील कोणता विषय आपल्या आवडीचा, कम्फर्ट झोनमधील आहे आणि कोणता नावडता, अवघड आहे हे स्वत:ला माहीत असायला हवे.

दुसऱ्या श्रेणीमधील त्यातल्या त्यात सरावाने कम्फर्ट झोनमध्ये येऊ शकतील अशा विषयांच्या तयारीवर सर्वात जास्त भर द्यावा. त्यानंतर पहिली श्रेणी आणि त्यानंतर अत्यंत कठीण वाटणारे विषय अशा प्राधान्याने सराव करायला हवा. सर्वात अवघड विषय दुर्लक्षित करण्याचा पर्याय आहे, पण त्यासाठी आधीच्या दोन प्रकारांवरील प्रश्न मात्र शत प्रतिशत चांगल्या प्रकारे सोडविता येतील इतकी तयारी व्हायला हवी. आपल्या कम्फर्ट झोनमधील नवीन लेखनाच्या आकलनाबाबत अतिआत्मविश्वास अणि अवघड, नावडत्या विषयाबाबत न्यूनगंड दोन्ही गोष्टी नुकसान देतात. त्यामुळे दोन्हीचा सराव महत्त्वाचा आहे, हे नेहमी लक्षात ठेवावे. 

उताऱ्यांवरील प्रश्नांचा सराव दोन पद्धतींनी केल्यास जास्त फायदा होतो. वेगवेगळ्या स्रोतांमधून वेगवेगळ्या विषयावरचे लेखन वाचून त्याचे आकलन करण्याचा आणि त्यावरचे प्रश्न स्वत:च तयार करण्याचा प्रयत्न करणे हा एक प्रकार. रोज दोन उतारे घेऊन अशा प्रकारे सराव करावा. यातून आकलनाचा आणि वाचनाचा वेग वाढेल यासाठी प्रयत्न करावा.

दुसरा प्रकार प्रत्यक्ष परीक्षेच्या वातावरणामध्ये वेळ लावून प्रश्न सोडविण्याचा सराव. पहिल्या तयारीच्या जोरावर आपला परफॉर्मन्स तपासून किती आणि कोणत्या प्रकारच्या तयारीची आवश्यकता आहे, हे समजून घेण्यासाठी हा सराव महत्त्वाचा आहे. यासाठी राज्यसेवा अभ्यास प्रश्नपत्रिका हे राष्ट्रचेतनाचे पुस्तक उपयुक्त ठरेल.

प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण केले तर लक्षात येते की सगळे उतारे वाचून सगळ्या प्रश्नांची उत्तरे देणे आवश्यक आणि व्यवहार्य दोन्ही नाही. मागच्या लेखामध्ये चर्चा केल्याप्रमाणे सी सॅटमध्ये किमान  १२० गुण मिळवायचे असतील तर उताऱ्यावरील ५० पैकी किमान ४० प्रश्न सोडवायला हवेत. त्यामुळे सर्वात अवघड विषयावरील दोन उतारे सोडता येतील किंवा वेगवेगळ्या उताऱ्यांवरचे काही प्रश्न सोडता येतील.

उतारा नव्हे तर त्यावरचे प्रश्न अवघड असले तरच तो सोडावा. अवघड उताऱ्यावर तथ्यात्मक माहितीचे प्रश्न असतील तर ते सोडवावेत.  आयोगाचा नियम नाही की उतारा घेतला की सगळे प्रश्न सोडवायलाच हवेत. पण यामध्ये सगळे उतारे वाचण्यात कालापव्यय होतो. त्यामुळे उतारा प्रथमदर्शनी अत्यंत अवघड वाटला तर त्यावरचे प्रश्न पहावेत. वस्तुनिष्ठ माहिती विचारणारा प्रश्न असेल तर ते २.५ गुण गमावू नयेत. 

हे प्रश्न सोडविताना एक गोष्ट कटाक्षाने लक्षात ठेवायला हवी. प्रश्नांची उत्तरे दिलेल्या उताऱ्यातील लेखकाच्या मताच्या अनुषंगाने, ते मत योग्य व खरे मानून देणे आवश्यक आहे. संबंधित विषयातील अद्ययावत माहिती आपल्याकडे असेल किंवा मांडलेले मत वस्तुस्थितीच्या विपरीत असेल तरीही उताऱ्यातील मुद्दय़ाच्या चौकटीतच उत्तर देणे आवश्यक आहे. याबाबत दिलेल्या पर्यायांनी गोंधळून न जाता उताऱ्याची चौकट हा त्या प्रश्नापुरता ठरलेला अभ्यासक्रम आहे हे लक्षात घेऊन उत्तरे द्यावीत.

वरीलप्रमाणे उताऱ्यातील मुद्दय़ाच्या अनुषंगानेच उत्तर देणे, आकलनासहीत वाचन करण्याचा वेग वाढविणे, पहिल्या एकदोन ओळीमध्येच उताऱ्याचा आपल्या श्रेणीप्रमाणे प्रकार ओळखणे या बाबी सरावानेच जमू शकतात. सराव आणि केवळ सराव हाच हे प्रश्न सोडविण्यासाठी आणि चांगले गुण मिळविण्यासाठी आवश्यक आहे.

सीसॅट – निर्णयक्षमता व व्यवस्थापन कौशल्ये

preparation for decision making and management

1960   06-Jun-2018, Wed

सीसॅटमधील शेवटचा आणि हमखास गुण मिळवून देणारा घटक म्हणजे निर्णयक्षमता व व्यवस्थापन कौशल्य हा घटक. एकूण १२.५ गुणांसाठी ५ प्रश्न या विभागात विचारले जातात. या प्रश्नांना नकारात्मक गुण दिले जात नाहीत, त्यामुळे भरपूर गुण मिळवायचे असतील तर अधिकाधिक समर्पक उत्तरे देणे आवश्यक आहे. या पाच प्रश्नांसाठी एकूण १० मिनिटे वापरली तर किमान १० गुणांची तजवीज होऊ शकते.

यामध्ये एखाद्या सुजाण नागरिकाचे हक्क आणि त्याची एखाद्या प्रसंगातील नागरिक या नात्याने किंवा हितसंबंधीय म्हणून असलेली कर्तव्ये यांचेशी संबंधित दैनंदिन जीवनातील पेचप्रसंग आणि त्यावरील तोडगा विचारला जातो. याचबरोबर संस्थेत किंवा प्रशासनात अधिकारपदावर असताना येणारी आव्हाने व त्यावरील तोडगा किंवा नैतिकदृष्टय़ा द्विधा मन:स्थितीत अडकविणाऱ्या समस्यांवर आधारित प्रश्न विचारले जातात. असे प्रश्न सोडविताना पुढील बाबी लक्षात घ्याव्यात.

*   प्रश्न लक्षपूर्वक वाचून नेमकी समस्या समजून घ्यावी.

*   या प्रसंगातील तुमची नेमकी भूमिका कोणती आहे ते लक्षात घ्यावे. कोणतीही भूमिका स्पष्टपणे तुम्हाला दिलेली नसेल तर एक सुजाण नागरिक म्हणून योग्य निर्णय घेणे तुमच्याकडून अपेक्षित आहे हे समजून घ्यावे.

*   समस्येतील सर्वात कच्चा व मजबूत पक्ष कोणता ते लक्षात घ्यावे. राज्यघटनेतील तरतुदी व तत्त्वज्ञान, सर्वसाधारण नैतिकता व नैसर्गिक न्याय, निर्बल समाजघटकांविषयी तसेच पर्यावरणीय संवेदनशीलता यांच्या आधारे समतोल दृष्टिकोन व तटस्थता ठेऊन याबाबतचे मूल्यमापन करावे.

*   दिलेले सर्व पर्याय व्यवस्थित वाचून घ्यावेत. वरील मूल्यमापनाच्या आधारे पूर्णपणे असंवेदनशील, बेजबाबदार, टोकाचे पर्याय बाद करावेत.

*   उरलेल्या पर्यायातून जास्तीत जास्त सकारात्मक आणि बहुतांश हितसंबंधियांना मान्य होऊ शकेल असा पर्याय शोधावा. असे दोन पर्याय आढळले तर जास्त दूरगामी परीणाम करणारा, कायमस्वरूपी तोडगा सांगणारा पर्याय निवडावा.

सरावासाठी एक प्रश्न पाहू या.

राज्यामध्ये प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली आहे. पण काही फेरीवाले, भाजीवाले असे किरकोळ माल विकणारे लोक अजूनही प्लास्टिक पिशव्यांचा वापर करताना तुम्हाला आढळले आहेत. याबाबत त्यांना हटकले असता ग्राहकांकडून सामान ठेवण्यासाठी पिशव्यांची मागणी होत असल्याचे त्यांनी सांगितले आहे आणि इतर पर्यायी पिशव्यांचे दर त्यांना परवडत नसल्याने प्लास्टिकचाच वापर करणे अपरिहार्य असल्याचे तुमच्या लक्षात आणून दिले आहे. तुम्ही

*   रद्दीपासून पिशव्या बनविण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांच्यामधीलच काहींना मदत आणि मार्गदर्शन कराल व प्लास्टिकचा वापर थांबवण्याची त्यांना विनंती कराल.

*   ग्राहकांना प्लास्टिकवर बंदी असल्याचे सांगून पिशवी देता येणार नाही हे स्पष्टपणे सांगण्याची विनंती विक्रेत्यांना कराल.

*   प्लास्टिकवर बंदी असल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकेल हे त्यांच्या लक्षात आणून द्याल व त्यांनी दुसऱ्या पर्यायांचाच वापर करणे आवश्यक असल्यावर भर द्याल.

*    स्थानिक प्रशासनाकडे याबाबत लेखी तक्रार नोंदवाल आणि शासनाने अशा विक्रेत्यांना पर्यायी पिशव्या कमी दराने उपलब्ध करून देण्याची विनंती कराल.

या उदाहरणातील पर्याय पाहिल्यास दुसरा पर्याय कोणत्याही प्रकारे प्रभावी नाही तसेच कोणतीही जबाबदारी यातून पार पडताना दिसत नाही तसेच कोणताच तोडगाही निघत नाही. तिसरा पर्याय कायदेशीर कार्यवाहीचा धाक दाखवतो. पण त्यातून समस्येचे निराकरण होताना दिसत नाही. तसेच विक्रेते पुन्हा प्लास्टिकचा वापर करणार नाहीत याची शाश्वतीही नाही. पर्यायातील आता उरलेल्या एक व चार क्रमांकाच्या पर्यायांमधून अधिक समर्पक व या समस्येवर अंतिम तोडगा निघू शकेल असा क्रमांक एकवरचा पर्याय निवडणे अधिक संयुक्तिक ठरते. पर्याय चार हा शासनावरील अवलंबित्व वाढवतो तर पर्याय एक हा समस्येवरचा तोडगा आहेच, शिवाय विक्रेत्यांना स्वत:च पर्यायी व्यवस्था करण्यास प्रोत्साहनही देतो व दूरगामी परिणाम साधतो. त्यामुळे यामध्ये पर्याय एकला अडीच गुण, चारसाठी दीड, तीनसाठी एक तर दोनसाठी शून्य गुण मिळतील.

सर्वसाधारण व्यवहारज्ञान, नैतिकदृष्टय़ा योग्य-अयोग्य मुद्दय़ांची जाण आणि भारतीय संविधानाचे भान असल्यास कमीत कमी वेळेत हा विभाग जास्तीत जास्त गुण मिळवून देऊ शकतो. हा घटक पेपरच्या सुरुवातीला सोडवून आत्मविश्वास बळकट करायचा की, शेवटच्या दहा मिनिटांत किंवा खूपच अवघड प्रश्नांमध्ये वेळ गेल्यावर ताण दूर करण्यासाठी अशा प्रश्नांनंतर सोडवायचा हे तुम्ही स्वत:च ठरवायचे आहे. पण हे प्रश्न सोडविताना मन शांत ठेवून पर्यायांचा विचार करायला हवा आणि जास्तीत जास्त समर्पक उत्तर शोधायला हवे. हे शक्य करायचे असेल तर सराव आणि सरावाचे विश्लेषण यांना पर्याय नाही!

निबंधाची तयारी

upsc-easy-preparation-1847491/

361   20-Mar-2019, Wed

महान व्यक्तींचे सुविचार व त्याच्या अवतीभवती लिखाण या सगळ्यातून आपली वैयक्कि मते व विचार झाकोळले जातात याचे उमेदवाराने कायम भान ठेवणे आवश्यक आहे. निबंध हा विशेष लेखन प्रकार आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. म्हणूनच निबंधासाठी लेखनाचा सातत्याने सराव केला पाहिजे.

हे केवळ निबंधाच्या पेपरसाठी लागू नसून मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययनाच्या इतर सर्वच पेपरसाठी लागू आहे. म्हणूनच योग्य शब्दमर्यादेत व कालमर्यादेत लिखाणाचा नियमित सराव करावा. बऱ्याच वेळा विद्यार्थी वाचनावर व वाचलेले लक्षात ठेवण्यावर बहुतेक वेळ खर्च करतात. परंतु लिखाणदेखील अभ्यासाचा नियमित भाग बनले पाहिजे. एकूण अभ्यासाचा साधारण ३०% वेळ लिखाणासाठी राखून ठेवला पाहिजे.

तसेच या लिखाणामध्ये विचारपूर्वक केलेल्या, सर्जनशील लिखाणाचादेखील समावेश असावा. तयारीच्या सुरुवातीच्या टप्प्यात निबंधाची शब्दसंख्या मर्यादित असू शकते. अगदी सुरुवातीला २०० शब्द, नंतर ६०० शब्द आणि त्यानंतर १००० ते १२०० शब्द लिहिण्याचा सराव करावा. लिखाण सुवाच्य अक्षरात, कागदाच्या एकाच बाजूला आणि पुरेसा समास सोडून करावे. अशा प्रकारे केलेले लिखाण शिक्षकांकडून, जाणकारांकडून अथवा स्वत: तपासावे.

लिखाणातील आवश्यक सुधारणा कोणत्या हे लक्षात घेऊन योग्य ते बदल करावेत. अशा सरावामधून लिखाणाचा वेग, शैली, अर्थपूर्ण शब्दांचा लिखाणातील समावेश व अचूक मजकूर मांडण्याची कौशल्ये विकसित होतात. या सर्वातून निबंध लेखनावर सकारात्मक प्रभाव पडतो. दिलेल्या शब्दमर्यादेत अर्थपूर्ण लिखाण करणे सरावानेच जमते. या सर्व बाबींकडे दुर्लक्ष केल्यास आपल्या अंगी क्षमता व प्रतिभा असली तरीदेखील मोठा फटका बसू शकतो.

शब्दमर्यादेपेक्षा निबंधाची गुणवत्ता अर्थातच प्राधान्याची आहे. पण तरीही शब्दमर्यादेचे भान सरावाने येणे गरजेचे आहे.

‘निबंधात काय लिहावे?’ या प्रश्नाचे उत्तर सखोल वाचनात व ताíकक विचारात दडलेले आहे. सामान्य अध्ययनाच्या इतर पेपरपेक्षा हा पेपर वेगळा ठरतो, कारण याकरता कोणताही ठरावीक अभ्यासक्रम निश्चित केलेला नाही. मात्र निबंधाकडून काय अपेक्षा आहेत याचे ठोकताळे आयोग कायमच देत असतो.

यामध्ये निबंध विषयाचा आवाका व मर्यादा लक्षात घेणे, विचारात व मांडणीत स्पष्टता असणे, स्वत:च्या विचारप्रक्रिया उलगडून दाखवता येणे, आणि त्याचबरोबर मूळचे स्वत:चे (Original’) असे विचार निबंधातून मांडता येणे या अपेक्षांचा समावेश आहे. तसेच निबंधाचे कोणते विषय येऊ शकतील याचा तंतोतंत अंदाज कुणीही वर्तवू शकत नाही. परंतु देशभरातील तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील नुकत्याच घडून गेलेल्या घटनांवरून अपेक्षित निबंध विषयांचा साधारण अंदाज येऊ शकतो.

याचबरोबर सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय वर्तुळातील घडामोडीदेखील या दृष्टीने महत्त्वाच्या ठरतात. वरील सर्व बाबी लक्षात घेऊन आपल्याला प्रगल्भ लिखाणाचा सराव करावयाचा आहे. निबंधाच्या विषयांचे वैविध्य व भिन्न दृष्टिकोन पाहता चौफेर वाचन असणे आवश्यक आहे. मात्र बाजारात निबंधलेखनासाठी उपलब्ध असणारी पुस्तके याकरता विशेष उपयोगी ठरत नाहीत.

प्रभावी निबंधलेखनासाठी उत्तमोत्तम पुस्तके, लेख वाचणे, रेडिओ व टीव्हीवरील दर्जेदार चर्चा ऐकणे ही प्राथमिक गरज आहे. एकाच मुद्दय़ाचे अवलोकन विविध दृष्टिकोनांतून केले जाऊ शकते. अनेक विद्यार्थी निबंधाच्या विषयाकडे केवळ दोनच दृष्टिकोनांतून पाहू शकतात. परंतु कोणत्याही विषयाला अर्थाचे अनेक कंगोरे असतात आणि म्हणूनच उमेदवारांनी स्वत:ला मर्यादित दृष्टिकोनांमध्ये अडकवून ठेवू नये. परंतु याचा अर्थ असा नाही की दिलेल्या विषयावर अनेक दृष्टिकोनांतून वरवरचे लिखाण केले जावे. प्रत्येकाने एक ठरावीक दृष्टिकोन, त्यातून निर्माण होणाऱ्या भूमिका यांचा समतोल साधत स्वत:चा ठसा असणारे लिखाण करणे अपेक्षित आहे.

अनेक वेळा निबंधाच्या विषयासंदर्भातील काही मुद्दे आपल्याला पटत नसतात. परंतु आपले लिखाण ‘योग्य’ व ‘तटस्थ’ असावे या हट्टापायी आपण त्या मुद्दय़ांचेदेखील समर्थन करतो. यामुळे लिखाणात कच्चे दुवे तयार होतात. असे लिखाण निबंध तपासणारी व्यक्ती लगेचच ओळखू शकते. म्हणूनच जे आपल्याला पटत नाही ते पटवून देण्याचा अनाठायी प्रयत्न करू नये. याचबरोबर जे मुद्दे आपण पटवून देत आहोत ते नीतिनियमांना, सांविधानिक विचारप्रणालीला व तर्काला धरून असावेत.

कोणत्याही निबंधासाठी लिखाणाची शैली व भाषा हे महत्त्वाचे घटक आहेत. प्रत्येकाने आपली स्वतंत्र लेखनशैली विकसित केली पाहिजे. लिखाण सुटसुटीत, अर्थवाही आणि मुद्देसूद असावे. हे लिखाण विचारपूर्वक व ठाम असावे. मात्र ठामपणे मते मांडत असताना त्यात उद्धटपणा नसावा. निबंधामधून ठामपणे व्यक्त केलेल्या मतांचे व विश्लेषणाचे जाळे असावे. आक्रमक अथवा अलंकारिक भाषा वापरून वाचणाऱ्यावर प्रभाव पडतोच असे नाही. तसेच अशी भाषा वापरल्याने चांगले गुण मिळतात हा समजदेखील चुकीचा आहे.

निबंधाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत ठरावीक लयीत लिखाण होणे अपेक्षित आहे. भावनांच्या आहारी जाऊन केलेले लिखाण अथवा केवळ माहितीची जंत्री असणारे लिखाण टाळावे. अर्थपूर्ण व प्रभावी निबंध लिहिण्याची प्रक्रिया अनेक वेळा थकवा आणणारी किंवा कंटाळवाणी असू शकते. मात्र कोणत्याही प्रकारच्या अभ्यासपूर्ण लिखाणाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर असे वाटणे साहजिक आहे. त्यामुळे खचून न जाता सातत्यपूर्ण प्रयत्न करत राहणे गरजेचे आहे.

‘सीसॅट’ साठीची रणनीती

Strategy for 'c-sat'

1263   07-Jun-2018, Thu

कोणत्या रणनीतीला एक उत्तम रणनीती म्हणता येईल? उत्तम रणनीती म्हणजे अशी रणनीती की जी आपल्यातील कार्यक्षमता, कौशल्य, तयारी आणि कमतरतांचा अचूक अंदाज घेऊन ठरवलेले ध्येय साध्य करण्यासाठी नियोजन करण्यासाठी मदत करते.

यामध्ये आपल्याला सोपे तसेच अवघड वाटणाऱ्या घटकांची आणि त्यातील विषयांची जाणीव, अपुरी तयारी असलेल्या विषयांची जाणीव, वाचनाचा अपेक्षित वेग आणि आपला वाचनाचा वेग, मिळवावयाच्या गुणांचे उद्दिष्ट आणि अपेक्षित अचूकता आणि त्यासाठी सोडवावयास लागणाऱ्या प्रश्नांची संख्या, प्रश्न सोडवताना वेळ वाचवणाऱ्या पद्धती आणि या सर्वाचा विचार करून केलेले वेळेचे नियोजन इ.चा अंतर्भाव होतो. आता यातील एकेक घटकांवर आपण चर्चा करूयात.

सर्वात अगोदर आपण किती गुणांचे ध्येय ठेवणे आवश्यक आहे हे ठरवावयास हवे. सीसॅट हा किमान पात्रता पेपर असून त्यात कमीतकमी ६६ गुण मिळवणे अपरिहार्य आहे. पण त्यामुळे फक्त ६६ गुणांचे ध्येय ठेवणे अत्यंत धोक्याचे राहील.

कारण परीक्षेत आपण जे काही पर्याय उत्तर म्हणून निवडतो ते सर्वच अचूक असतील हा अंदाज ते पर्याय निवडताना येईलच असे नाही. म्हणून अशा नकळत चुका झाल्या तरी आपल्याला कमीतकमी गुण खात्रीशीर मिळवता येण्यासाठी मुळातच आपले ध्येय हे ६६पेक्षा जास्त ठेवायला हवे.

उदा. ८० गुण वा १०० गुण. मग हे गुण प्राप्त करण्यासाठी सोडवलेल्या प्रश्नांपकी किती प्रश्नांची उत्तरे बरोबर यायला हवीत याचा अंदाज असायला पाहिजे. सोडवलेले प्रश्न आणि विविध गुणांच्या ध्येयानुसार सोडवलेल्या प्रश्नांपकी अपेक्षित अचूक प्रश्नांची संख्या हे दाखवणारा तक्ता खाली दिला आहे.

जसे की जर एखाद्याने ६० प्रश्न सोडवले असतील तर ६६ गुण प्राप्त करण्यासाठी किमान ३५ प्रश्नांची उत्तरे अचूक असायला हवीत, तरच नकारात्मक गुणांकन पद्धतीचा परिणाम परीक्षेच्या निकालावर होणार नाही. पण जर ध्येय ८० वा १०० गुणांचे असेल तर ६० प्रश्नांपकी अनुक्रमे ३९ आणि ४५ प्रश्न अचूक असायला हवेत. मगच आपण नकळत होणाऱ्या चुकांना सावरून नेऊ शकतो. यासाठी आपण सोडवणाऱ्या प्रश्नांच्या अचूकतेचा आणि प्रश्न सोडवण्याचा वेगाचा अंदाज असणे आवश्यक आहे. हे सर्व लक्षात येण्यासाठी पुरेसे सराव पेपर सोडवणे आवश्यक आहे.

 

आता आपण वाचनाच्या वेगाबद्दल बोलूया. गेल्या वर्षी म्हणजे २०१७ च्या सीसॅटच्या पेपरमध्ये एकूण ७८२० शब्द होते. बऱ्याच जणांना एकदाच वाचून प्रश्नांची उत्तरे देता येणार नाहीत. म्हणून कमीतकमी ७० ते ८० टक्के माहिती परत डोळ्याखालून घालावी लागते. याशिवाय आपण सर्वच वेळ फक्त वाचनात घालवत नाही तर त्यापकी काही वेळ विचार करून उत्तर काढण्यात घालवतो. यावरून असे लक्षात येते की आपल्या वाचनाचा वेग अंदाजे १७५ ते २०० शब्द दर मिनिट असायला पाहिजे.

आता प्रत्येकाने आपापल्या वाचनाचा वेग तपासून पाहावा. आता काहीजण म्हणतील की हा पेपर पास होण्यासाठी सर्व प्रश्न सोडवण्याची गरज नाही, हे बरोबर आहे. पण कोणते प्रश्न सोडवावेत आणि कोणते नाही यासाठी प्रत्येक प्रश्नातील काही भाग वा कधीकधी सर्व भाग वाचवा तर लागेलच. मग अशावेळी प्रश्नांची निवड कशी करावी आणि कुठे कुठे वेळ वाचवता येऊ शकतो हे आता पाहूया.

पहिल्यांदा जर प्रश्नाचा प्रकार / माहिती / उताऱ्याचा विषय किंवा भाषेची शैली हे सर्वच अपरिचयाचे किंवा नेहमीच अवघड जाणारे वाटत असेल तर प्रश्न सोडवण्याच्या पहिल्या फेरीत त्याच्यावर वेळ घालवू नये. जर खूप साऱ्या माहितीवर अगदीच कमी प्रश्न विचारले असतील तर अशा प्रश्नांना कमी प्राधान्य द्यावे. उतारा सोडवताना जर प्रश्नाचे स्वरूप अप्रत्यक्ष म्हणजे विधाने देऊन त्यांच्या सत्यते वा असत्यतेबद्दल विचारले असेल तर ए’्र्रेल्लं३्रल्ल पद्धतीचा उपयोग होतो का हे पाहावे.

ही पद्धत म्हणजे विधाने वाचण्याच्या आधीच पर्याय पाहावेत आणि त्यांतील असे विधान शोधावे जे जर चूक निघाले तर चारपकी तीन पर्याय चूक ठरतात. असे विधान सापडले की पहिल्यांदा त्याची सत्यता पडताळावी असे केल्याने बराच वेळ वाचतो. या अगोदरच्या लेखांमध्ये ताळा पद्धतीचा उल्लेख केला होता. तिचाही वापर जिथे जिथे शक्य आहे तिथे करावा. त्याचप्रमाणे जर इंग्रजी भाषेवर आपली पकड पक्की नसेल तर ज्या प्रश्नांमध्ये शब्दच्छल केलेला असेल किंवा जिथे समजावयास अवघड किंवा कधीच परिचय न झालेल्या वाक् प्रचाराचा उपयोग केला असेल तर तो प्रश्नप्रकार शेवटी हाताळावा. अगदी कितीही परिचयाचा असला तरीही!

नागरी सेवा क्षमता चाचणी (CSAT)

civil services aptitude tests

1207   30-May-2018, Wed

सर्व उमेदवारांना आता ३ जून २०१८ रोजी होणाऱ्या पूर्वपरीक्षेचे वेध लागले आहेत. त्या परीक्षेमधील सीसॅट हा एक महत्त्वाचा पेपर आहे. हा २०० गुणांचा पेपर २०१५ पासून पात्रता पेपर ठरवण्यात आला आहे, पण बऱ्याच उमेदवारांना किमान ३३ टक्के गुण मिळवणे देखील अवघड होऊन बसते. कारण तयारी करताना महत्त्वाचे मुद्दे लक्षात न आल्याने वा लक्षात न ठेवल्याने किंवा त्याच्या तयारीला पुरेसे महत्त्व न दिल्याने असे होते. याच महत्त्वाच्या मुद्दय़ांची थोडक्यात उजळणी व्हावी हाच या लेखाचा हेतू आहे.

सर्वसाधारणपणे सीसॅटच्या अभ्यासक्रमाचे तीन विभाग करता येतात. त्यामधील पहिला म्हणजे उताऱ्यावर आधारित आकलन क्षमता, दुसरा म्हणजे अंकगणित आणि सामान्य बौद्धिक क्षमता आणि तिसरा म्हणजे तार्किक क्षमता व विश्लेषण क्षमता. आजच्या या लेखामध्ये आपण उताऱ्यावर आधारित आकलन क्षमता या घटकाच्या महत्त्वाच्या मुद्दय़ांची चर्चा करू या.

आकलनक्षमतेची पुरेशी तयारी करतानाचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या भाषेतून उतारे आणि प्रश्न दिले जातात त्या भाषेचे पुरेसे ज्ञान असणे. बहुतांश मराठी भाषिक उमेदवार पेपर सोडवताना हिंदी भाषेऐवजी इंग्रजी भाषेलाच प्राधान्य देतात. म्हणून इंग्रजी शब्दांचा पुरेसा साठा, व्याकरण आणि वाक्यावाक्यांमधील संबंध दाखवणारे निर्देशक शब्द इत्यादी प्राथमिक पण अत्यंत महत्त्वाच्या घटकांची तयारी खूप अगोदरपासूनच सुरू व्हायला हवी.

उताऱ्यांवर विचारले जाणारे प्रश्न सर्वसाधारपणे दोन गटांत मोडतात. एक म्हणजे सर्वसमावेशक प्रश्न जसे की उताऱ्याची मुख्य संकल्पना, उताऱ्यावरून निघणारे अनुमान, लेखकाचा उद्देश आणि त्याने काय गृहीत धरले आहे इ. दुसरा गट हा विशिष्ट ठरावीक माहितीवर आधारित प्रश्नांचा आहे. यामध्ये उताऱ्यातील एखाद्या विशिष्ट भागावर प्रश्न विचारले जातात. पहिल्या गटामध्ये शब्द, वाक्य आणि त्यांमधील संबध यावरून अर्थ लावून उत्तर द्यावे लागते तर दुसऱ्या गटात फक्त उत्तर हे उताऱ्यामध्ये नेमके कुठे आहे हे शोधावे लागते. म्हणून अशा विविध प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे शोधताना वेगवेगळी रणनीती वापरावी लागते.

मुख्य संकल्पनेबद्दल विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांसाठी वापरले जाणारे काही वाक्यांश – main idea, central theme, best sums up, passage refers to  B. मुख्य संकल्पना ही अशी सर्वसमावेशक संकल्पना वा वाक्य असते की ज्याला उताऱ्यातील बाकीच्या गोष्टी आधार देत असतात.

अनुमान वा कयास ही अशी बाब आहे की जी लेखकाने उताऱ्यामध्ये अप्रत्यक्षरीत्या सांगितलेली असते. उताऱ्यामध्ये केलेला युक्तिवाद हा अनुमानाला आधार देत असतो. पण अनुमान हे मुख्य संकल्पनेसारखे सर्वसमावेशक असेलच असे नाही. कारण ते संपूर्ण उताऱ्यावर आधारित असेलच असे नाही. हा या दोघांमधील अत्यंत महत्त्वाचा फरक आहे याची नोंद घ्यावी. अनुमानाबद्दल विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांसाठी वापरले जाणारे काही वाक्यांश – inference, passage implies, view implied, conclusion इ.

लेखकाचा हेतू वा उद्देश ठरवताना बऱ्याच गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. जसे की, कोणत्या मुद्दय़ावर लेखक जास्त वा वारंवार चर्चा करत आहे, कशा प्रकारचे शब्द त्याच्या लिखाणात येत आहेत, कशा पद्धतीने त्याने उताऱ्याचा समारोप केला आहे वा कोणता निष्कर्ष काढला आहे. तसेच स्वत:च्या युक्तिवादाला आधार देण्यासाठी कोणत्या प्रकारची उदाहरणे वा पुरावे देत आहे इ. बाबींचा विचार करावा लागतो.

उताऱ्यावर गृहीतकाबद्दल (Assumption) विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे उत्तरे शोधण्यासाठी असे पर्याय शोधावे लागतात की ज्याबद्दल लेखकाने पुरेसे विवरण देणे आवश्यक समजले नाही वा त्याने असे गृहीत धरले आहे की वाचकांना याचे पुरेसे ज्ञान वा माहिती असेल. म्हणजे गृहीतकदेखील अप्रत्यक्षरीत्या सांगितलेले असते पण ते लेखकाच्या युक्तिवादाला आधार देत असते. इथे अनुमान आणि गृहीतक यातील फरक लक्षात घ्यावा कारण दोन्हीही अप्रत्यक्षरीत्या सांगितलेले असतात. पण गृहीतक हे लेखकाच्या युक्तिवादाला आधार देत असते आणि लेखकाचा युक्तिवाद हा अनुमानाला आधार देत असतो.

जर उतारा हा दोन वा जास्त परिच्छेदांचा असेल तर अगोदर प्रश्न वाचून घ्यावेत आणि त्यातील महत्त्वाचे कळीचे शब्द लक्षात ठेवावेत आणि उतारा वाचताना ते अधोरेखित करावेत म्हणजे विशिष्ट प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी परत शोधाशोध करावी लागणार नाही. याव्यतिरिक्त मोठय़ा उताऱ्यासाठी  Structure of the Passage Approach, Story-line Approach  आणि  Optimized Reading Approach  इ. चा गरजेनुसार वापर करावा. पण हे करण्याअगोदर वरील पद्धतींची माहिती घेऊन पुरेसा सराव करणे अत्यंत आवश्यक आहे.

Comprehension

THE READING COMPREHENSION

2640   10-Jan-2018, Wed

THE READING COMPREHENSION

 • The reading comprehension passages cover a wide breadth of topics.
 • While there are no formal rules governing the examiners, typically the passages cover natural science, legal, social science, and humanities.
 • Additionally, the various passages may be written in different tones and in different styles. For example, some reading comprehension passages may be written in an argumentative tone with the author trying to convince the reader that the author's position on a particular issue is correct. Meanwhile, another reading comprehension passage may be purely informational.
 • Another important factor to note regarding reading comprehension problems is that the answer choices are similar in nature to those found in logical reasoning problems. That is, there could be one or more answer selections that seem fairly on point, but the examinee is charged with selecting the best answer.
 • As a general rule, reading comprehension problems test the examinee's ability to determine one of several things.
  • First, the problem may require the examinee to determine the course of action taken by the author of the passage. This requires the examinee to wade through the content of the passage and understand the methods employed by the author to get across his/her point.
  • Second, the problem may require the examinee to decipher the point of the passage. Unlike the first category, this type of reading comprehension problem requires the examinee to truly get into the subject matter of the passage and understand its nuances.
  • Third, the problem may require the examinee to understand how the passage is put together.
 • Again, in these types of problems it is not as important that the examinee understand the subject matter of the passage, as it is that the examinee understand the composition of the passage itself.
 • Because of the timed nature of the CSAT, it is important that the examinee develop the ability to work through the reading comprehension passages quickly and diligently.
 • CSMantra experts advise that the best way to approach reading comprehension problems is to actively read the passages on the first run through and take notes of critical items as they appear. This process will allow for quick reference points for the examinee when answering questions, and keep the examinee from having to reread large portions of the passage, or worse still, the entire passage.

READING COMPREHENSION FORM QUESTIONS

CSAT reading comprehension problems pretty much look identical to one another. Therefore, the only way to distinguish them is based on what they ask of the examinee. To put it very broadly, reading comprehension problems generally focus on one of two things, the form of the passage or the substance of the passage. It is important for examinees to understand that both form and substance questions will be asked of each passage that the examiner provides.

 • Reading comprehension form questions typically require the examinee to step back from the passage and understand the satellite view of what is going on.
 • As such, one of the most frequently seen reading comprehension form questions will require the examinee to state the overall point of the passage.
 • Again, it is important for examinees to understand that these questions require the broadest view of the passage possible.
 • Obstacles can appear because often passages are long enough and filled with many facts and independent conclusions.
 • These smaller issues and conclusions can be confused with the main theme of the passage and distract the examinee from identifying the overriding issue.
 • Additionally, examiners often tempt examinees with answer selections that appear correct, but are either slightly too focused, or slightly too broad.
 • Because reading comprehension problems require selection of the best answer, the examinee must carefully choose the selection that appropriately reflects the overall point of the passage.
 • Another type of reading comprehension form question requires the examinee to identify the motivation for, or purpose of the passage.
 • This may sound similar to the first type of reading comprehension form problem, and it is. Perhaps the best way to differentiate the two is that the aforementioned overall-point questions focus on the passage, while these motivation questions require the examinee to focus on the author of the passage.
 • For example, if the overall point of a passage has been identified, the motivation for or purpose of the passage is typically seen in how the author gets to the overall point.
 • Other reading comprehension form questions require examinees to determine the specific purpose of a given paragraph. In answering these questions, it is imperative that the examinee first identify the purpose of the passage as a whole. This is critical because the specific purpose of a given paragraph can only be determined when the overall purpose of the passage is known.
 • Reading comprehension form questions also may require examinees to identify the author's stance on a particular point or player in the passage.
 • These questions (and more specifically, the answer selections) typically require the examinee to determine whether the author is pro, anti, or neutral on a given thing.
 • This is, however, an overly simplistic representation of the answer choices, which may include such statements as "guarded optimism." Having said this, it is still considered a good practice to begin by broadly categorizing the author's tone and then working on from there.
 • Finally, reading comprehension form questions include questions that require the examinee to understand the structure of the passage. These questions tend to be fairly straightforward. Unfortunately, they are among the least common reading comprehension question types.

Reading comprehension substance questions

Reading comprehension form and substance questions make up the reading comprehension portion of the CSAT. With each reading comprehension problem passage acting as a reference for five to eight questions, examinees can expect to see several form and substance questions referring to each passage. As is the case with reading comprehension form questions, reading comprehension substance questions can be further broken down into subcategories.

The first type of reading comprehension substance questions requires examinees to identify the author's statement as to a specific portion of or detail in the passage. The positive aspect of these types of reading comprehension substance questions is that they offer the examinee an obvious starting point for finding the answer. Generally, the fact or detail that is the subject of the question is readily identifiable in the passage. The key for the examinee is to quickly locate the subject fact and glean from the context what the author says about, or how the author uses the fact. Once again, this point focuses on the benefits of actively reading and taking notes on the passages.

Another type of reading comprehension substance question requires the examinee to make a deduction from the provisions of a passage. These questions require that the examinee first have a firm grasp of the overall point and purpose of the passage. This is true because these questions require the examinee to take what is explicitly provided in the passage and determine those things that are implicit, or must be factual, but are not specifically mentioned in the passage. In other words, the examinee must be able to imply from the enumerated facts expressly provided in the passage.

Reading comprehension substance questions may also require the examinee to identify an answer selection that is in line with a particular belief of the author as it is expressed in the passage. These questions may at first blush appear identical to the questions discussed in the paragraph above. These questions, however, are distinguishable. For example, while the above-mentioned questions require the examinee to deduce something from the passage, these questions go one step further. In requiring the examinee to deduce the author's belief from the passage, these questions can be considered somewhat broader in that the answer selection (including the correct answer selection) does not have to be within the same subject matter as the passage. Therefore, the correct answer may not be implicit in the passage at all.

Finally, reading comprehension substance questions may require the examinee to identify the purpose behind the inclusion of some enumerated portion of the passage. This should sound very familiar to a question type found in the reading comprehension form problems. However, there is a distinction. The form problem requires the examinee to focus on what the enumerated paragraph of the passage states. Here, the question is asking the examinee to identify why the enumerated portion is utilized. Again, these questions require the examinee to fully understand the larger point of the passage, so that the examinee will be able to understand how a given portion of the passage supports the author's point.

TIPS TO IMPROVE Reading Comprehension SKILLS

1. Read a lot: You must read lot of newspapers, books, articles to increase your reading skills.

2. Enhance your vocabulary: Keep a dictionary handy. Make a note of new words and try to understand their meaning.

3. Highlight, summarize and review: After going through any article, make a note of important points, summary, and review important ideas.

4. Practice and practice: You need to solve lot of RC questions to get the reqquired confidence.

Books For Civil Services Preliminary Exam Paper 2 ( CSAT)

Books For Civil Services Preliminary Exam Paper 2 ( CSAT)

1794   02-Jul-2017, Sun

Civil Services Preliminary Exam General Studies Paper 2 is popularly known as CSAT. There are many who call not only the General Studies Paper 2, but also the complete preliminary stage exam as CSAT (Civil Service Aptitude Test). Aspirants should note that a terminology like “CSAT” is nowhere mentioned in the UPSC notification! It is just a popular convention for Paper 2. General Studies Paper 2 is also for 200 marks like the General Studies Paper 1 of Civil Service Exam Prelims. Paper 2 is comparatively easier and high-scoring than General Studies Paper 1. In all previous examinations so far, the number of questions in CSAT Paper 2 was 80, with each question carrying 2.5 marks. Negative marking being one-third, the candidate will lose 0.833 marks from his total for wrong answers.

Syllabus for CSAT – 

 1. Comprehension.
 2. Logical Reasoning and Analytical Ability.
 3. Quantitative and Basic Numeracy.
 4. Data Interpretation.
 5. Decision Making and Problem Solving.
 6. Interpersonal Skills including communication skills.

Books for CSAT

There are many books for CSAT in the market, often confusing freshers about how to select the right book for the exam. Civil Services Preliminary Exam Paper 2 (CSAT) being more practice oriented, it’s always better to select books with quality problems. The book(s) should also cover all sections mentioned above in the UPSC Prelims Syllabus in detail.

CSAT Manual: General Studies for Civil Services Preliminary Examination (Paper – 2) by TMH (Tata McGraw-Hill) is the most popular name in this segment. This is a high quality book covering almost all areas of the question paper/syllabus (a little heavy too  ). The book also consists of practice question paper sets and solved question papers of previous years. If price is not a concern, go for this TMH Manual.

Cracking the CSAT Paper – 2 :  Civil Services Aptitude Test more or less covers the UPSC syllabus, touching areas like verbal and numerical skills, Data Interpretation, General Mental Ability, Interpersonal Skills and Communication, Decision Making and Problem Solving Skills, and Analytical Ability. Practice tests + Previous year question papers makes this book, a serious alternative to TMH Manual, particularly for those who are searching for low-priced books.

Analytical Reasoning by M.K. PandeyWhile most similar books are published with a focus on last-minute preparations and quick comprehension, Analytical Reasoning  by M. K. Pandey  focuses on the basics of the subject of logic and reasoning. It is designed to help the reader understand the foundational aspects better. Never get deceived by the not so attractive cover, this book will turn out as a really handy tool for all serious CSAT takers. This book is useful not only for UPSC, but also for various other exams like CAT, GMAT, CLAT, Bank PO etc. Can be used to supplement TMH/Arihant.

A Modern Approach to Verbal and Non-Verbal Reasoning by Dr.R.S.AggarwalA Modern Approach To Verbal & Non-Verbal Reasoning is of great use to students preparing for a number of entrance examinations, whether it be for an MBA or for a job in the Civil Services. One of the primary reasons as to why students should use this book is that it contains a great deal of practice questions, often explaining topics like basic analogy, directions and non-verbal reasoning which you may not find in books on analytical reasoning.

Other CSAT Books in the Market :There are many other books too in the market covering similar areas. The below mentioned names also are personal favorites of many, particularly those who prepare MBA/Bank exams along with UPSC. But in-case, if you already have any of the three out of four mentioned books above, we think that you can skip the names below.

 1. Pearson CSAT manual.
 2. Trishna’s Quantitative Aptitude And Data Interpretation.
 3. CSAT Conceptual Approach (Paper – 2) by P. N. Roy Chowdhury.
 4. CSAT (paper II) by Cl India.

यूपीएससीची तयारी : इंग्रजी भाषा आकलन व त्यातील बारकावे

यूपीएससीची तयारी : इंग्रजी भाषा आकलन व त्यातील बारकावे

1014   25-May-2017, Thu

इंग्रजी उताऱ्यांच्या आकलनाकरता विषयाच्या आकलनाबरोबरच भाषेच्या अंगानेही विचार करायला हवा. इंग्रजी उताऱ्यांमध्ये अनेक वेळा एखाद्या वाक्प्रचाराचा, म्हणीचा किंवा शब्दाचा अर्थ विचारला जावू शकतो. अथवा असा अर्थ सरळपणे विचारला नसला तरीदेखील प्रश्नाचा रोख एखाद्या ठरावीक शब्दाच्या अर्थावर असू शकतो. म्हणूनच इंग्रजी शब्दसंग्रह वाढविणे या घटकासाठी अतिशय गरजेचे आहे.

मात्र याचा अर्थ उताऱ्यातील सर्वच इंग्रजी शब्द माहीत असल्याशिवाय प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाही असा होत नाही. अनेक वेळा अवघड शब्दांचे अर्थ संदर्भानुसार लावता येतात अथवा किमान साधारण जवळ जाणारा अर्थ विचारात घेतला जावू शकतो. हे कौशल्य सरावाने व किमान शब्दसंग्रहाच्या आधारे विकसित करता येते.

इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट नमूद करणे आवश्यक आहे. सीसॅटमधील यश हे केवळ इंग्रजी भाषेच्या उत्तम आकलनावरच अवलंबून आहे असे समजण्याची अजिबात गरज नाही. मात्र इंग्रजी भाषेच्या प्रभुत्वाचा फायदा होतो. िहदी भाषांतरांची सातत्याने मदत होतेच असे नाही.

इंग्रजीमध्ये येणाऱ्या उताऱ्यांबाबतीत लक्षात घ्यायची अजून एक गोष्ट म्हणजे, या ठिकाणी इंग्रजी संभाषण कौशल्याची अथवा लेखन कौशल्याची कोणतीही गरज नाही. म्हणूनच इंग्रजी व्याकरणाचे अवास्तव भय बाळगण्याचे मुळीच कारण नाही. उमेदवारास केवळ इंग्रजी वाचनामधून अर्थाचे आकलन होणे आवश्यक आहे. म्हणूनच सीसॅटच्या नवीन अभ्यासक्रमाचा समावेश झाल्यामुळे, सीसॅट म्हणजेच इंग्रजी असा समज करून घेऊन, सरसरकट इंग्रजी सुधारण्यामध्ये आपला सर्व वेळ व शक्ती खर्च करू नये.

आजच्या स्पध्रेच्या युगात इंग्रजीचे ज्ञान असणे व्यक्तिमत्त्वासाठी निश्चितच पूरक आहे. परंतु इंग्रजीचे ज्ञान, विशेषत व्याकरणाचे आणि लेखन व संभाषण याकरिता आवश्यक अशा ज्ञानाची पूर्वपरीक्षेच्या टप्प्यावर विशेष गरज नाही. म्हणूनच विद्यार्थ्यांनी आपले लक्ष इंग्रजी या एकमेव घटकामुळे विचलित न होऊ देता, अतिशय वस्तुनिष्ठपणे ठरावीक कौशल्ये विकसित करण्यावर केंद्रित करावे.

इंग्रजी उतारे हा या स्पर्धापरीक्षेचा एक अनिवार्य भाग असला तरीदेखील याबाबतीत पुढील काही गोष्टींवर आपण विचार करणे गरजेचे आहे. जसे की, मराठी मातृभाषा असणाऱ्या व्यक्तीला मराठी उताऱ्यांवरील १००% प्रश्नांची उत्तरे बरोबर देता येतीलच असे नाही. त्याचप्रमाणे, शहरी किंवा निमशहरी भागात शिकलेल्या विद्यार्थ्यांला इंग्रजी उताऱ्यांवरील सर्वच प्रश्नांची उत्तरे बरोबर देता येतील असे नाही. उताऱ्यांवरील प्रश्नांमध्ये अचूकता येण्याकरता शहरी-ग्रामीण अशा सर्वच विद्यार्थ्यांना या कौशल्यांबाबतीत सरावाची व त्यातून पारंगत होण्याची गरज असते. म्हणूनच वर म्हटल्याप्रमाणे सीसॅटमधील इंग्रजी आकलनाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून अतिशय वस्तुनिष्ठपणे इंग्रजी वाचन, शब्दसंग्रह सुधारणा व आकलन या तीनच गोष्टींकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.

इंग्रजी शब्दसंग्रह आणि आकलन

शब्दांआधी येणाऱ्या प्रत्ययांवरून अर्थाचा अंदाज लावण्याविषयी याआधीच माहिती दिली आहे. त्याच्याच जोडीला मूळ शब्द (Roots) व उगमस्रोत (Origins) यांच्यामध्ये रस घेतल्यास इंग्रजी शब्दांचा ताण न वाटता उलट ते लक्षात ठेवणे ही एक सुकर प्रक्रिया होऊ शकते. जसे की,cise  (कापणे) cide  (मारणे) या मूळ शब्दांचा विचार केल्यास अनेक शब्द लक्षात ठेवणे सोपे जाते. उदा. incision, scissor, genocide, pesticide, insecticide, scission, incise, incisor.  याचप्रमाणे – aster किंवा – astro म्हणजे ‘ताऱ्यांशी संबंधित’ हे लक्षात घेतल्यानंतर asterisk, astrology, astrophysics, astronaut, asterism या सर्व शब्दांचा अर्थ कळणे सोपे होऊन जाते.

अशाच प्रकारे उगमस्रोतांचा (Origins) विचार केल्यास एकदा अभ्यासलेले शब्द कायम लक्षात राहतात. याकरिता सर्वप्रथम इंग्रजी-इंग्रजी असा शब्दकोश वापरण्याचा सराव हवा व असा शब्दकोश वापरणे अवघड असते हे मनातून काढून टाकायला हवे. इंग्रजी शब्द जरी अवघड असला तरीदेखील त्याचा अर्थ उलगडून सांगण्यासाठी ज्या इंग्रजी शब्दांचा वापर केलेला असतो ते सापेक्षत: खूपच सोपे असतात.

किंबहुना अशा प्रकारे सोप्या शब्दांमध्ये अर्थ दिलेला असणे हेच चांगल्या शब्दकोशाचे लक्षण आहे. म्हणूनच इंग्रजी-इंग्रजी शब्दकोशाचा जरूर वापर करावा. नावाजलेल्या शब्दाकोशांमध्ये ज्या ज्या शब्दांच्या उगमस्रोताची माहिती असेल त्या त्या शब्दांच्या खाली तो Origins या सदराखाली, शब्दाच्या अर्थाच्या सर्वात शेवटी दिलेला असतो. जसे की,  juggernaut या अतिशय अवघड वाटणाऱ्या शब्दाखालील उगमस्रोत पाहिल्यास आपण तो शब्द व त्याचा अर्थ कधीही विसरणार नाही.  Juggernaut म्हणजे ‘ज्याला थांबवू शकत नाही असे प्रचंड अथवा भव्य काहीतरी’.

हा शब्द ब्रिटिशांनी भारतातून इंग्रजीमध्ये नेला. ओडिशामध्ये होणाऱ्या पुरीच्या रथयात्रेतील रथाने एकदा वेग घेतला की, त्याला थांबवणे अशक्य होवून जाते. हे दृश्य ब्रिटिशांनी जेव्हा बघितले तेव्हाच आजूबाजूचे सर्व भारतीय ‘जग्गनाथ, जग्गनाथ’ असा जयघोष करीत होते. याच जग्गनाथचे त्याच्या रथाच्या वेगावरून व भव्यतेवरून पुढे Juggernaut झाले.

अशा प्रकारे अनेक वेगवेगळ्या दृष्टिकोनातून इंग्रजीकडे एक प्रकारचे कौशल्य म्हणून त्याचा विचार केल्यास त्यातील ताण निघून जातो. मराठीतून उत्तमरीत्या आपले म्हणणे मांडता येणे हेदेखील एक कौशल्यच आहे. मराठी बोलता येणाऱ्या प्रत्येकालाच हे कौशल्य अवगत असते असे नाही. इंग्रजीचासुद्धा याचप्रमाणे विचार केल्यास आपल्याला असे लक्षात येते की, इंग्रजी उत्तम येणे अथवा इंग्रजीचे ज्ञान असणे ही खूपच व्यापक गोष्ट आहे. ज्यामध्ये वाचन-आकलन, लेखन, संभाषण अशा सर्वाचा समावेश होतो. परंतु पूर्वपरीक्षेतील आवाका हा फक्त वाचन-आकलन यापुरताच मर्यादित आहे हे ध्यानात घेतल्यानंतर केवळ तीच कौशल्ये विकसित करण्यावर भर देता येणे शक्य आहे. तसेच इतर कौशल्यांची या टप्प्यांवर तितक्या जास्त प्रमाणावर गरज नाही हे पक्के लक्षात आल्यानंतर ‘इंग्रजी’मुळे येणारा ताण बऱ्याच अंशी कमी होऊ शकतो.

शब्दसंग्रह सुधारण्याच्या व पर्यायाने आकलनात सुधारणा घडवून आणण्यासाठी इतर अनेक मार्गाचा उपयोग करता येतो. पुढील लेखात आपण शब्दसंग्रह तसेच वाचनाचा वेग यावर अधिक चर्चा करणार आहोत.

अपर्णा दीक्षित


Top

Whoops, looks like something went wrong.