MPSC chalu ghadamodi, current affairs

1. ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाचे शुक्रवारी गुवाहाटी येथे दिमाखदार उद्घाटन करण्यात आले.

2. पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या जिम्नॅस्टिक्स खेळाडूंनी घवघवीत यश संपादन करताना दोन सुवर्णपदकांची कमाई केली.

3. महाराष्ट्राच्या अस्मी बदाडे हिने तालबद्ध जिम्नॅस्टिक्समध्ये तर मानस मनकवळे याने पॉमेल हॉर्स प्रकारत सुवर्णपदक प्राप्त केले.

4. तर 17 वर्षांखालील गटात अस्मीने 43.80 गुणांची कमाई करत सुवर्णपदकावर नाव कोरले. महाराष्ट्राच्या श्रेया बंगाळे हिने 40.80 गुण मिळवत रौप्यपदक पटकावले. या दोघींनीही दोरी आणि चेंडूच्या साहाय्याने अप्रतिम कसरती सादर केल्या.

5. अस्मीने याआधी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये 5 सुवर्ण आणि एक रौप्यपदक मिळवले आहे. अस्मी ही ठाणे येथील ज्ञानसाधना विद्यामंदिरची विद्यार्थी असून ती पूजा आणि मानसी सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. श्रीलंकेविरुद्ध अखेरच्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने धडाकेबाज फलंदाजी करत 200 धावांचा टप्पा ओलांडला. सलामीवीर शिखर धवन आणि लोकेश राहुल यांनी अर्धशतकी खेळी केली.

2. तर मधल्या फळीत मनिष पांडे, शार्दुल ठाकूर, विराट कोहली या फलंदाजांनी त्यांना उत्तम साथ दिली.

3.विराटने पुण्याच्या गहुंजे मैदानावर सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येताना 17 चेंडूत 26 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत 2 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.

4. मात्र या छोटेखानी खेळीतही विराटने आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये विराट 250 चौकार मारणारा पहिला फलंदाज ठरला आहे.

5. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने, लंकेविरुद्ध तिसऱ्या टी-20 सामन्यात आणखी एका विक्रमाची नोंद केली आहे.

6. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येताना विराटने एक धाव घेत, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार या नात्याने 11 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे.

7. तर 196 डावांमध्ये विराटने ही कामगिरी केली असून यादरम्यान त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटींगचा विक्रम मोडीत काढला.


Top

Whoops, looks like something went wrong.