World Bank supports $ 310 million to improve power generation in Jharkhand

 1. झारखंड वीज व्यवस्था सुधारणा प्रकल्पासाठी भारत सरकारचा जागतिक बँकेशी $ 310 दशलक्ष इतक्या रकमेचा एक कर्ज करार झाला आहे.
 2. झारखंड राज्यामधील नागरिकांना विश्वसनीय, दर्जेदार आणि परवडणारी चोवीस तास वीज पुरवण्यासाठी हा प्रकल्प राबवला जाणार आहे.
 3. या मदतीने वीजेसंबंधी पायाभूत सुविधा तसेच अन्य घटकांच्या विकासास सहाय्य प्राप्त झाले आहे.
 4. हा प्रकल्प 2014 साली सुरू करण्यात आलेल्या भारत सरकारच्या ‘सर्वांसाठी वीज’ कार्यक्रमाचा एक भाग आहे.
 5. झारखंड राज्यात ताज्या आकडेवारीनुसार सर्व नागरिकांमध्ये 80% हून अधिक नागरिकांना वीज उपलब्ध करून देण्यात आली आहे.
 6. आता सर्वांना चोवीस तास अखंड पुरवठा देण्याच्या उद्देशाने प्रयत्न चालवले जात आहेत.
 7. जागतिक बँक (WB) ही भांडवल पुरविण्यासाठी विकसनशील देशांना कर्ज देणारी एक आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आहे.
 8. जागतिक बँक हा संयुक्त राष्ट्रसंघ प्रणालीचा एक भाग आहे.
 9.  अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन, डी.सी. येथे जागतिक बँकेचे मुख्यालय आहे.
 10. यामध्ये आंतरराष्ट्रीय पुनर्रचना आणि विकास बँक (International Bank for Reconstruction and Development- IBRD) आणि आंतरराष्ट्रीय विकास महामंडळ (International Development Association -IDA), अश्या दोन संस्थांचा समावेश आहे.
 11. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि तीन इतर संस्थांसह जागतिक बँकेची स्थापना 1944 सालच्या ब्रेटोन वूड्स परिषदेत करण्यात आली.


The technical agreement between India and Russia to build a warplane

 1. भारतात अॅडमिरल ग्रिगोरोव्हिच श्रेणीतले दोन लढाऊ जहाज तयार करण्यासाठी भारताने रशियासोबत एक तांत्रिक करार केला आहे.
 2. $ 500 दशलक्ष इतक्या रकमेचा हा करार भारताच्या गोवा शिपयार्ड लिमिटेड (GSL) आणि रशियाच्या रोसोबोरोनेक्सपोर्ट यांच्यात झाला आहे.
 3. या करारामधून रशियाकडून तांत्रिक हस्तांतरणासह अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्जित दोन लढाऊ जहाजे भारतातच तयार करण्यात येणार आहे.
 4. रशिया हा पूर्व यूरोप आणि उत्तर एशिया प्रदेशात स्थित एक विशाल आकार असलेला देश आहे.
 5. हा एकूण 17075400 चौ. किमी. क्षेत्रफळ असलेला जगातला सर्वात मोठा देश आहे.
 6. आकाराच्या दृष्टीने हा भारताच्या पाच पट आहे.
 7. या देशाची राजधानी मॉस्को शहर असून देशाचे चलन रशियन रूबल हे आहे. देशाचे वर्तमान राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन हे आहेत.


Organizing an annual exhibition of 7th International Tourism Mart at Agartala

 1. 22 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर या काळात त्रिपुरा राज्याच्या आगरतळा शहरात 7वे ‘आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट’ या वार्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
 2. भारत सरकारचे पर्यटन मंत्रालय, पर्यटन  विभाग, त्रिपुरा सरकार आणि ईशान्य राज्ये यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले.
 3. प्रदर्शनीत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताच्या ईशान्य राज्यांमधील पर्यटनाच्या संभाव्य संध्या प्रदर्शित करण्यात आल्या आहेत.
 4. भारताच्या ईशान्य राज्यांमध्ये अरुणाचल प्रदेश, आसाम, मणीपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, त्रिपुरा आणि सिक्किम या राज्यांचा समावेश आहे.


Australia also denied UN's migration agreement

 1. ऑस्ट्रेलियाच्या सरकारने स्थलांतरणासंबंधी असलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या वैश्विक करारावर स्वाक्षरी न करण्याचा निर्णय घेतला आहे.
 2. जगभरातील लोकांना कायदेशीर स्थलांतरण करण्यास मदत करणारे आणि त्याबाबत चांगल्या व्यवस्थापनेसाठी जुलै 2018 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने ‘UN ग्लोबल कॉम्पॅक्ट फॉर मायग्रेशन’ हा करार मान्य केला होता.
 3. देशाच्या सध्या अस्तित्वात असलेल्या स्थलांतरणासंबंधी धोरणाशी संयुक्त राष्ट्रसंघाचा हा करार सुसंगत नसल्याचे कारण पुढे करीत अमेरिकेच्या पाठोपाठ आता ऑस्ट्रेलियाने देखील हा करार नाकारला आहे.
 4. ऑस्ट्रेलिया हा ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रकुल दक्षिण गोलार्धाच्या खंडाच्या अंतर्गत असलेला एक देश आहे, जो जगातला सर्वात छोटा खंड आहे आणि जगातला सर्वात मोठा बेट देखील आहे, जो हिंद व प्रशांत महासागरात पसरलेला आहे. 
 5.  ऑस्ट्रेलिया हा  एकमेव असा प्रदेश आहे, जो एक खंड, एक राष्ट्र आणि एक बेट आहे.
 6.   कॅनबेरा हे राजधानी शहर तर ऑस्ट्रेलियन डॉलर हे राष्ट्रीय चलन आहे.


Top

Whoops, looks like something went wrong.