Women's T20 World Cup will be played in the West Indies

 1. ‘ICC महिला टी20 विश्वचषक’ स्पर्धेचे आयोजन 9-24 नोव्हेंबर 2018 या काळात वेस्टइंडीजमध्ये केले जाणार आहे.
 2. वेस्टइंडीजमध्ये एंटीगा व बार्बुडा, गुयाना आणि सेंट लुसिया या ठिकाणी सामने खेळले जाणार आहेत.
 3. स्पर्धेत वेस्टइंडीज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि आणखी दोन संघ खेळतील.
 4. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) हे क्रिकेट खेळासाठीचे आंतरराष्ट्रीय प्रशासकीय मंडळ आहे.
 5. सन 1990 मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्या प्रतिनिधींनी ICC ची ‘इम्पेरियल क्रिकेट कॉन्फरन्स’ या नावाने स्थापना केली होती.
 6. सन 1989 मध्ये याला वर्तमान नाव प्राप्त झाले.
 7. ICC मध्ये 105 सदस्य आहेत, त्यात 12 पूर्ण सदस्य जे कसोटी सामने खेळतात, 37 सहयोगी सदस्य आणि 56 संलग्न सदस्य आहेत.
 8. याचे मुख्यालय संयुक्त अरब अमिराती (UAE) च्या दुबईमध्ये आहे.


WEF announced 'comprehensive development index 2018'

 1.  दावोस (स्वित्झर्लंड) येथे आयोजित जागतिक आर्थिक मंच (WEF) च्या वार्षिक बैठकीत ‘सर्वसमावेशक विकास निर्देशांक 2018’ जाहीर करण्यात आला.
 2. निर्देशांकाचे घटक:-
  1. निर्देशांकामध्ये राहणीमान, पर्यावरणाच्या दृष्टीने शाश्वत आणि भविष्यात येणार्‍या पिढीला आणि कर्जाच्या भारापासून संरक्षण आदी घटकांना समाविष्ट केले गेलेले आहे. यामध्ये 103 अर्थव्यवस्थांच्या प्रगतीचे आकलन वृद्धी व विकास, समावेशकता आणि इंटर-जनरेशनल इक्विटी या तीन खाजगी स्तंभांच्या आधारावर केले गेले आहे.
  2. यादीला दोन गटात विभाजित केले गेले आहे
   1. (i) 29 विकसित अर्थव्यवस्था
   2. (ii) 74 उदयोन्मुख अर्थव्यवस्था.
  3. शिवाय माहितीत पाच वर्षाच्या सर्वसमावेशक विकास व वृद्धीच्या आधारावर विविध देशांना - घट, हळूहळू घट, स्थिर, मंद वृद्धी आणि वृद्धी – या पाच उप-श्रेणींमध्ये वर्गीकृत केले गेले आहे.
 3. गेल्या दशकात सामाजिक समानतेच्या बदली आर्थिक वाढीला प्राधान्य दिल्यामुळे  संपत्ती व उत्पन्न यामध्ये ऐतिहासिक अशी उच्च पातळीची असमानता निर्माण झाली आहे.
 4. 29 विकसित अर्थव्यवस्थांपैकी 20 मध्ये उत्पन्नातील असमानता वाढली आहे आणि तशीच आहे. या देशांमध्ये दारिद्र्यामध्ये 17% ची वाढ झाली आहे.
 5. त्या तुलनेत 84% उदयोन्मुख देशांमध्ये दारिद्र्याच्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून आलेले आहे, परंतु तरीही त्यांच्यात असमानतांचे प्रमाण खूपच अधिक आहे.
 6. प्रगत आणि उदयोन्मुख अश्या दोन्ही अर्थव्यवस्थांमध्ये, संपत्ती उत्पन्नापेक्षा अधिकच असमानपणे वितरीत आहे.
 7. इंटर-जनरेशनल इक्विटी आणि स्थिरता या बाबतीत प्रवृत्ती कमकुवत आहे, मात्र 74 पैकी 74 उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये घट आहे.
सर्वसमावेशक विकास निर्देशांक 2018
 1. ठळक बाबी:-
 2. जागतिक:-
  1. नॉर्वे ही जगातली सर्वात सर्वसमावेशक आधुनिक विकसित अर्थव्यवस्था ठरली आहे. तर लिथुआनिया उदयोन्मुख अर्थव्यवस्था गटात शीर्ष स्थानी आहे.
  2. विकसित अर्थव्यवस्थांमध्ये प्रथम पाच देशांमध्ये नॉर्वे, आयरलॅंड, लक्झेंबर्ग, स्वित्झर्लंड आणि डेन्मार्क यांचा समावेश आहे.
  3. शीर्ष पाच सर्वसमावेशक अर्थव्यवस्थांमध्ये लुटियानिया, हंगेरी, अझरबैजान, लाटविया आणि पोलंड यांचा क्रम आहे. BRICS देशांमध्ये रशिया 19 वा, चीन 26 वा, ब्राझील 37 वा, भारत 62 वा आणि दक्षिण आफ्रिका 69 वा आहे.
  4. भारत उदयोन्मुख अर्थव्यवस्थेत 62 व्या क्रमांकावर आहे. भारताच्या शेजारी देशांमध्ये यादीत श्रीलंका 40 वा, बांग्लादेश 34 वा, चीन 26 वा, पाकिस्तान 47 वा आणि नेपाळ 22 वा आहे.
  5. दरडोई GDP (6.8%) आणि कामगार उत्पादकता वाढ (6.7%) यामध्ये चीन उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये प्रथम क्रमांकावर असला तरी, वर्ष 2012 पासून त्याची एकंदर समावेशकता घटकात कामगिरी कमी दिसून आलेली आहे.
  6. छोट्या युरोपीय अर्थव्यवस्था निर्देशांकामध्ये शीर्ष स्थानी आहेत. मात्र ऑस्ट्रेलिया (9) हा एकमेव गैर-युरोपीय अर्थव्यवस्था आहे, ज्याने शीर्ष 10 मध्ये जागा मिळवली.
 3. भारत:-
  1. भारत उदयोन्मुख अर्थव्यवस्थेत 62 व्या क्रमांकावर आहे, जेव्हा की भारत मागच्या वर्षी 79 विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये 60 व्या क्रमांकावर होता.
  2. भारताचे एकूण गुण खालच्या पातळीवरचे आहेत, मात्र तरीही त्याचा वेगाने वाढणार्‍या 10 उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये समावेश आहे.
  3. समावेशकता घटकात भारताचा 72 वा क्रमांक आहे, तर वृद्धी व विकासासाठी 66 वा आणि इंटर-जनरेशनल इक्विटीसाठी 44 व्या क्रमांकावर आहे.


Organized 48th Meeting of Global Economic Forum in Davos

 1. 22 जानेवारी 2018 रोजी स्वित्झर्लंडच्या दावोस शहरात जागतिक आर्थिक मंच (WEF) च्या 48 व्या वार्षिक बैठकीला सुरूवात झाली.
 2. 'क्रिएटिंग अ शेयर्ड फ्यूचर इन अ फ्रॅक्चर्ड वर्ल्ड' या विषयावर आधारित आहे.
 3. पाच दिवसांच्या या बैठकीत व्यापार, राजनीति, कला, शिक्षण आणि नागरी समाज या विषयांशी जुळलेल्या हितधारकांची उपस्थिती राहणार आहे.
 4. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जवळपास 20 वर्षांनंतर दावोसला जाणारे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत.
 5. याआधी 1997 साली एच. डी. देवेगौडा यांनी दावोसला भेट दिली होती.
तुम्हाला हे माहित आहे का?
 1. पार्श्वभूमी:-
 2. जागतिक आर्थिक मंच (World Economic Forum) हे स्वित्झर्लंडमध्ये स्थित एक ना-नफा प्रतिष्ठान आहे.
 3. याचे संस्थापक क्लाउस श्वाब यांनी सन 1971 मध्ये ‘युरोपियन मॅनेजमेंट फोरम’ या नावाने स्थापना केली.
 4. याचे मुख्यालय जिनेव्हा (स्वीत्झर्लंड) येथे आहे.
 5. ही सार्वजनिक-खासगी सहकार्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्था म्हणून स्विस प्रशासनाकडून मान्य करण्यात आलेली आहे.


Honor to the National Bravery Award winners at the hands of Delhi Deputy Governor

 1. उप-राज्यपाल अनिल बैजल यांच्या हस्ते नवी दिल्लीत ‘राष्ट्रीय वीरता पुरस्कार 2017’ घोषित विजेत्यांचा गौरव केला आहे.
 2. पुरस्कार विजेत्या 18 बालकांपैकी 2 मुली आणि एक मुलाला मरणोत्तर हा पुरस्कार दिला गेला आहे. 18 वीर बालकांमध्ये 7 मुली आणि 11 मुलांचा समावेश आहे.
 3. राष्‍ट्रीय वीरता पुरस्कार भारतात दरवर्षी 26 जानेवारीच्या आधल्या दिवशी शौर्य दाखविणार्‍या बालकांना दिला जाणारा नागरी पुरस्कार आहे.
 4. भारतीय बाल कल्याण परिषदेने 1957 साली या पुरस्काराची स्थापना केली.
 5. विजेत्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देखील प्रदान केली जाते.
 6. या पुरस्कारांमध्ये पुढील पाच पुरस्कारांचा समावेश आहे - भारत पुरस्‍कार (1987 पासून), गीता चोपडा पुरस्‍कार (1978 पासून), संजय चोपडा पुरस्‍कार (1978 पासून), बापू गैधानी पुरस्‍कार (1988 पासून) आणि सामान्य राष्‍ट्रीय वीरता पुरस्‍कार (1957 पासून).
राष्‍ट्रीय वीरता पुरस्कार
 1. ‘भारत पुरस्कार’ - उत्तर प्रदेशची  नाजिया
 2. ‘गीता चोपडा पुरस्कार’ - मरणोत्तर कर्नाटकची नेत्रावती एम. चावन
 3. ‘संजय चोपडा पुरस्कार’ - कर्णवीर सिंह
 4. ‘बापु गैधानी पुरस्कार’ – मेघालयचा बैश्वाजान पेनलांग, ओडिशाची ममता दलाई आणि केरळचा सेबेस्टियन विन्सेट
 5. अन्य पुरस्कार विजेता - लक्ष्मी यादव (छत्तीसगड), मनसा एन. (नागालँड), एन. शेनपांन कोनयक (नागालँड), योकनई (नागालँड), चिंगई वांगशा (नागालँड), समृद्धी सुशील शर्मा (गुजरात), जोनंटुलांगा (मिजोरम), पंकज सेमवाल (उत्तराखंड), नदाफ एजाज अब्दुल रउफ (महाराष्ट्र), पाकपम रजेश्वरी चानू (मणीपुर, मरणोत्तर), एफ. लालछांदामा (मिजोरम, मरणोत्तर) आणि पंकज कुमार महंत (ओडिशा)


$ 120 million loan agreement with World Bank of India

 1. उत्तराखंडमध्ये निमशहरी क्षेत्रात पाणीपुरवठा सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता जागतिक बँक आणि भारत यांच्यात $120 दशलक्षचा कर्ज करार करण्यात आला आहे.
 2. या निधीमधून उत्तराखंडमध्ये निमशहरी भागात पाणीपुरवठा आणि स्वच्छता सेवा उपलब्ध करून देण्यासाठी अभिनव पद्धती अंमलात आणली जाणार आहे.
 3. वर्ष 2001 ते वर्ष 2011 या कालावधीत या राज्याच्या शहरी लोकसंख्येत 42% ची भर पडली आहे, जी राष्ट्रीय सरासरीच्या 32% हून अधिक आहे.
 4. जागतिक बँक ही भांडवल लागणार्‍या कार्यक्रमांसाठी विकसनशील देशांना कर्ज देणारी आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आहे.
 5. यामध्ये आंतरराष्ट्रीय पुनर्रचना आणि विकास बँक (International Bank for Reconstruction and Development- IBRD) आणि आंतरराष्ट्रीय विकास महामंडळ (International Development Association-IDA): अश्या दोन संस्थांचा समावेश आहे.
 6. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) सह तीन इतर संस्थांसह जागतिक बँकेची स्थापना 1944 साली ब्रेटोन वूड्स परिषदेत करण्यात आली.
 7. जागतिक बँकेचे मुख्यालय अमेरिकेच्या वॉशिंग्टन डी.सी. येथे आहे.


Top

Whoops, looks like something went wrong.