The 'World Book Fair 2018' will be started from 6th January in Delhi

 1. नवी दिल्लीत 6 जानेवारी ते 14 जानेवारी 2018 या काळात 26 व्या ‘जागतिक पुस्तक मेळावा’ चे आयोजन करण्यात आले आहे.
 2. राष्ट्रीय पुस्तक विश्वस्त (NBT) तर्फे आयोजित हा कार्यक्रम यावर्षी ‘पर्यावरण व हवामान बदल’ या विषयावर आधारित आहे.
 3. यामध्ये जवळपास 40 देशांमधील प्रकाशकांचा सहभाग दिसून येणार आहे.
 4. भारतातून 800 हून अधिक प्रकाशक यामध्ये भाग घेणार आहेत.
 5. ‘जागतिक पुस्तक मेळावा’ हा कोलकाता पुस्तक मेळाव्यानंतर भारताचा दुसर्‍या क्रमांकाचा सर्वात जुना आणि मोठा पुस्तक मेळावा आहे.
 6. पहिल्यांदा 18 मार्च ते 4 एप्रिल 1972 या काळात नवी दिल्लीत आयोजित करण्यात आला होता.
 7. 2013 सालापासून राष्ट्रीय पुस्तक विश्वस्त (NBT) तर्फे हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे.


Union Cabinet approves water supply development project

 1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्‍यक्षतेत मंत्रिमंडळाच्या आर्थिक विषयक समितीने जलवाहतूक क्षमता बळकट करण्यासाठी जागतिक बँकेद्वारा समर्थित 5369.18 कोटी रुपयांच्या हल्दिया-वाराणसी विभागादरम्यानच्या 'राष्ट्रीय जलमार्ग-1' यावर जलमार्ग विकास प्रकल्प (JMVP) ला मंजूरी प्रदान केली.
 2. या योजनेंतर्गत इलाहाबाद ते हल्दिया दरम्यान 1620 किलोमीटर लांब जलमार्ग विकसित केला जाणार आहे. या मार्गावर कमीतकमी 1500-2000 टन वजनी भार असणारे मालवाहू जहाजे चालणार आहे.
 3. ही योजना भारतीय आंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणकडून राबविण्यात येणार आहे.
 4. 5369.18 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला जागतिक बँकेकडून तांत्रिक आणि गुंतवणूक मदत प्राप्त होणार आहे. मार्च 2023 पर्यंत प्रकल्प पूर्ण होण्याचे अपेक्षित आहे.
जलमार्ग विकास प्रकल्प
 1. महत्त्वपूर्ण बाबी:-
  1. जागतिक बँकेकडून 2,512 कोटी रुपये प्राप्त होणार आणि भारत सरकारकडून अर्थसंकल्पीय वाटपातून आणि बॉन्डमार्फत 2,556 कोटी रूपये गुंतवले जाणार आहे. सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्वावर 301 कोटी रुपये उभे केले जाणार आहेत.
  2. पर्यावरणास अनुकूल आणि जलवाहतुकीस वैकल्पिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने असलेला हा प्रकल्प देशात माल-वाहतूकीचा खर्च कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
  3. बहू-रचना आणि आंतर-रचना टर्मिनल, रोल ऑन - रोल ऑफ (RO-RO) सुविधा, फेरी सेवा, जलवाहतुक सहाय्य यासारख्या मोठ्या संरचनेचा विकास करण्यात येणार आहे.
  4. राष्‍ट्रीय जलमार्ग-1 च्या विकासाने प्रत्‍यक्ष रूपात 46 हजार रोजगार तर जहाज बांधणी उद्योगात 84 हजार लोकांना अप्रत्‍यक्ष रोजगार मिळू शकणार आहे.
 2. प्रकल्पातील मुख्य घटक:-
  1. फेयर-वे विकास; वाराणसी, साहिबगंज, हल्दिया या ठिकाणी बहू-रचना टर्मिनल निर्मिती; कालूघाट, गाजीपुर या ठिकाणी आंतर-रचना टर्मिनल निर्मिती; फरक्‍कामध्ये नवीन नेव्हिगेशन लॉकची निर्मिती; जलवाहतुकीस मदतीची तरतूद; टर्मिनलवर RO-RO च्या 5 जोडींची बांधणी; एकात्मिक जहाज दुरूस्ती व देखरेख परिसराची निर्मिती; नदी माहिती प्रणाली (RIS) आणि जहाज रहदारी व्यवस्थापन प्रणाली (PTMS) ची तरतूद; तट संरक्षण कार्य अश्या बाबींचा समावेश आहे.  
 3. वर्तमानात देशात कार्यरत 5 राष्ट्रीय जलमार्ग आहेत आणि 106 मार्गांचा अभ्यास केला जात आहे:-
  1. राष्ट्रीय जलमार्ग-1 (1620 किमी) : इलाहाबाद-हल्दिया (गंगा-भागीरथी-हुगली नदीचा भाग) (वर्ष 1986 मध्ये घोषित)
  2. राष्ट्रीय जलमार्ग-2 (891 किमी) : सदिया-धुबरी (ब्रह्मपुत्र नदी) (वर्ष 1988 मध्ये घोषित)
  3. राष्ट्रीय जलमार्ग-3 (205 किमी) : चम्पाकारा आणि उद्योग मंडल कॅनल सहित कोल्लम-कोट्टापुरम (पश्चिम तट कॅनल) (वर्ष 1993 मध्ये घोषित)
  4. राष्ट्रीय जलमार्ग-4 (1078 किमी) : (i) काकीनाडा-पुडुचेरी आणि कालुवेली टँक (ii) गोदावरी नदीत नाशिक-भद्रचलम-राजामुंद्री (iii) कृष्णा नदीत गंलागली-वजीराबाद-विजयवाडा
  5. राष्ट्रीय जलमार्ग-5 (588 किमी) : (i) तालचेर-धर्मा (ii) ईस्ट कोस्ट कालव्याचे गेओंखली-चारबाटीया (iii) मताई नदी आणि महानदी संगम नदीत हर्बाटिया-धर्मा


Government of India announces '7.75% savings tax (taxable) bond, 2018'

 1. भारत सरकारने 10 जानेवारी 2018 पासून ‘7.75% बचत (करपात्र) बाँड, 2018’ ला सुरू करणार आहे.
 2. या योजनेमुळे निश्चित व्याजाच्या आश्वासनात, देशात नागरिक / HUF करपात्र बाँडमध्ये अमर्यादित गुंतवणूक करू शकणार आहे.
तुम्हाला हे माहीत आहे का?
 1. बाँडमध्ये कोणतीही व्यक्ती (संयुक्त स्वामित्व सहित) आणि हिंदू अविभाजित कुटुंब गुंतवणूक करू शकतात. NRI यामध्ये गुंतवणूक करू शकत नाहीत.
 2. बाँड लेजर अकाऊंटच्या स्वरूपात अर्ज, संस्थात्मक बँका आणि SHCIL च्या नामांकित शाखांमध्ये जमा केले जाऊ शकते.
 3. बाँड 100 रुपयांच्या सम किंमतीत नावावर केले जातील. बाँडमध्ये किमान रक्कम 1000 रुपये किंवा त्याच्या पटीने असलेल्या किंमतीत गुंतवणूक केली जाऊ शकते. बाँड डीमॅट स्वरुपात नावावर केले जातील.
 4. बाँड पुढील अधिसूचनेपर्यंत टॅपवर असतील आणि संचयी व गैर-संचयी रूपात नावावर केले जातील.
 5. बाँडवर मिळणारे व्याज आयकर अधिनियम-1961 अतंर्गत करपात्र असणार आहे.  
 6. संपत्ती कर अधिनियम-1957 अंतर्गत बाँडला संपत्ती करापासून सूट दिली गेली आहे.
 7. बाँडची परिपक्वता कालावधी 7 वर्षांचा असणार आणि यावर 7.75% वार्षिक व्याज मिळणार आहे. हे व्याज सहामाही तत्वावर दिले जाणार आहे. उदा. 1000 रुपयांच्या बाँडची किंमत 7 वर्षांनंतर 1703 रुपये होणार आहे.
 8. बाँड दुसर्‍याला हस्तांतरीत केले जाऊ शकत नाही. बाँड दुय्यम बाजारपेठामध्ये व्यापारायोग्य नसणार .
 9. बँक, वित्तीय संस्था, गैर-बँकिंग वित्तीय कंपनीमध्ये कर्जासाठी बाँडचा उपयोग समर्थक कर्ज संपत्तीच्या रूपात केला जाऊ शकणार नाही.
 10. केवळ एक धारक किंवा बाँडचा एकमेव जीवित धारक नामांकन करू शकतो.


Typbar - TCV: Recognition from Indian typhoid vaccine WHO

 1. विषमज्वर (Typhoid) आजारावर हैदराबादमधील ‘भारत बायोटेक’ कंपनीने तयार केलेल्या लसीला जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) मान्यता प्राप्त झाली आहे.
 2. WHO ने 6 ते 23 महिन्यांच्या नवजात आणि 2 ते 15 वर्षांदरम्यानच्या लहान मुलांसाठी या लसीचा वापर करण्याची शिफारस केली आहे.
 3. ‘टायपबार-TCV’ (Typbar TCV) किंवा ‘टायफॉइड कोंज्युगेट वॅक्सीन’ नामक ही लस आता जागतिक सार्वजनिक लसीकरण कार्यक्रमासाठी वापरली जाऊ शकणार आहे.
 4. ग्लोबल अलायन्स फॉर लस अँड इम्युनायझेशन (GAVI) च्या संचालक मंडळाने 2019-2020 या काळात $85 दशलक्षचा निधी मंजूर करून विकसनशील देशांमध्ये ही लस प्रदान करण्यास मदत केली आहे.
 5. WHO च्या मान्यतेमुळे, UNICEF, पॅन-अमेरिकन हेल्थ ऑर्गनायझेशन (PAHO) आणि GAVI समर्थित देशांना ही लस खरेदी व पुरवठा करण्यास परवानगी मिळालेली आहे.
तुम्हाला हे माहीत आहे का?
 1. ‘टायपबार-TCV’:-
  1. ‘टायपबार-TCV’ ही लस जुन्या लसीपेक्षा दीर्घकालीन रोग प्रतिकारक्षम आहे आणि ही कमी प्रमाणात द्यावी लागते आणि नियमित लसीकरण कार्यक्रमातून लहान मुलांना दिली जाऊ शकते.
  2. ही पहिलीच विषमज्वरावरील लस आहे, जी 6 महिन्यांपर्यंतच्या मुलांपासून ते प्रौढांना दिली जाऊ शकते आणि आजाराच्या त्रासापासून दीर्घकालीन संरक्षण पुरविते.
 2. विषमज्वर:-
  1. विषमज्वर साल्मोनेला टायफी (एस. टायफी) नामक जीवाणूमुळे होतो, जे दूषित पदार्थांपासून आणि इतर संक्रमित मनुष्यांकडून दूषित झालेल्या पदार्थ आणि पेयांमुळे संक्रमित होतो.
  2. सध्या जागतिक लोकसंख्येपैकी एक तृतीयांश लोकांना विषमज्वराचा धोका आहे, ज्यामुळे शाळेतील उपस्थिती कमी होते, काम आणि मजुरीचे नुकसान होते, गर्भधारणेवर परिणाम होतो आणि मुलांचा शारीरिक आणि बुद्धिमत्तात्मक विकास कमी होतो.
  3. इंटरनॅशनल हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन (IHME) च्या अंदाजानुसार, 2016 साली विषमज्वराची सुमारे 12 दशलक्ष प्रकरणे नोंदवली गेलीत, ज्यात 1.30 लाख लोकांचा मृत्यू झाला.
  4. ‘भारत बायोटेक’ कंपनीने 12 वर्षांपर्यंत लस विकसित करण्यासाठी 150 कोटी रुपयांचा खर्च केलेला आहे आणि देशात शीर्ष 10 लसीच्या ब्रँडची निर्मिती केली आहे.


Stem cell therapy can cause blindness of a person

 1. भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ कपिल भारती यांच्या नेतृत्वाखाली एका पथकाने अंधत्व दूर करण्यासाठी स्टेम सेलपासून प्राप्त रेटिनल पेशी तयार करण्याच्यादृष्टीने प्रगती केली आहे.
तुम्हाला हे माहीत आहे का?
 1. अमेरिकेतील नॅशनल आय इन्स्टिट्यूट (NEI) येथील शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार, रेटिनल पिगमेंट एपिथेलियम (REP / डोळ्याच्या पाठीमागे पेशींचा एक थर) च्या पेशीवरील प्रायमरी सिलीया नामक लहान नळीसारखे प्रथिने हे रेटिनाच्या प्रकाश-संवेदक फोटोरिसेप्टरचे अस्तित्व टिकवण्यासाठी आवश्यक असतात.
 2. निरोगी डोळ्यामध्ये, REP पेशी प्रकाशाला विद्युत संकेतामध्ये बदलतात, जे पुढे   दृक (optic) मज्जातंतूद्वारे मेंदूच्या दिशेने प्रवास करतात.
 3. REP पेशी फोटोरिसेप्टरच्या मागे एक थर तयार करतात. 
 4. भौगोलिक झीजमुळे, REP पेशी मरतात, ज्यामुळे फोटोरिसेप्टर कमी झाल्यामुळे दृष्टी जाते.
 5. या शोधामध्ये अमेरिकेत अंधत्वचे एक प्रमुख कारण असलेल्या कोरडा वयासंबंधित मेक्युलर डीजनरेशन (AMD) असलेल्या रुग्णांमध्ये प्रत्यारोपण करण्यासाठी स्टेम सेलपासून प्राप्त REP बनवण्यासाठी प्रगत प्रयत्न करण्यात आले आहेत.


New AIIMS will open in Bilaspur- Union Cabinet decision

 1. केंद्रीय मंत्रिमंडळाने हिमाचल प्रदेशातील बिलासपुर येथे ‘अखिल भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था (AIIMS)’ स्थापन करण्यास मंजूरी दिली आहे.
 2. 1,351 कोटी रुपयांची ही संस्था ‘प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना’ अंतर्गत उभारण्यात येणार आहे.
 3. या संस्थेमध्ये रुग्णांसाठी 750 खाटांची सोय आणि ट्रॉमा सेंटरची सुविधा असेल.
 4. तसेच तेथे दरवर्षी 100 MBBS विद्यार्थी क्षमता असलेले वैद्यकीय महाविद्यालय आणि 60 बी.एस्सी. (नर्सिंग) विद्यार्थी क्षमतेचे नर्सिंग महाविद्यालय चालवले जाईल.
 5. ‘पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजना’ देशात विविध भागांमध्ये आरोग्य सुविधांना सर्वांसाठी समरूपता उपलब्ध करून देण्यासाठीच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे.
 6. योजनेंतर्गत देशातल्या मागास राज्यांमध्ये वैद्यकीय शिक्षणास गुणवत्तापूर्ण करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे.
 7. या योजनेला मार्च 2006 मध्ये मंजूरी दिली गेली.
 8. योजनेंतर्गत आतापर्यंत भुवनेश्वर, भोपाल, रायपुर, जोधपुर, ऋषिकेश आणि पटना या ठिकाणी AIIMS स्थापित केले गेले आहे.


Top