
1319 28-Sep-2018, Fri
- संयुक्त राष्ट्रसंघाच्या न्यूयॉर्क येथील मुख्यालयी दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्रपती नेल्सन मंडेला यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे.
- 18 जुलै 1918 रोजी जन्मलेल्या मंडेला यांची या वर्षी 100वी जयंती साजरी केली गेली आहे आणि त्यानिमित्त संयुक्त राष्ट्रसंघाने सन ‘2019-2028’ हा काळ "नेल्सन मंडेला शांती दशक” म्हणून घोषित केला आहे.
- नेल्सन मंडेला सन 1994-1999 या काळात दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्रपती होते.
- ते देशाचे प्रथम कृष्ण-वंशीय राष्ट्रपती तसेच राष्ट्रवादी लोकशाही निवडणुकीतून निवडून आलेले प्रथम राष्ट्रपती आहेत.
- मंडेला त्यांच्या शांती, क्षमा, करुणा आणि मानवी प्रतिष्ठेच्या सर्वोच्च मूल्यांसाठी ओळखले जातात.
- आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ (UN) या आंतरसरकारी संघटनेची स्थापना दुसर्या महायुद्धानंतर 24 ऑक्टोबर 1945 रोजी करण्यात आली.
- सध्या या संघटनेचे 193 सदस्य देश आहेत.
- UN चे मुख्यालय मॅनहॅटन (न्यूयॉर्क शहर, अमेरिका) येथे आहे.
- संयुक्त राष्ट्रसंघ महासभा (UNGA) हे संयुक्त राष्ट्रसंघामधील सहा प्रमुख अंगांपैकी एक आहे, ज्यामध्ये सर्व सदस्य राष्ट्रांना समान प्रतिनिधित्व बहाल केले गेले आहे आणि संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्य धोरणात्मक, धोरणनिर्धारक आणि प्रतिनिधींचे अंग आहे.