The NITI commission will provide 115 'ambitious' districts for sorting

 1. NITI (राष्‍ट्रीय भारत परिवर्तन संस्‍था) आयोगाने एप्रिल 2018 पर्यंत देशातल्या 115 ‘महत्वाकांक्षी’ जिल्ह्यांना क्रमवारी प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. 
 2. आयोग 115 मागास जिल्ह्यांची 10 घटकांवर आधारित मूल्यांकन करणार आहे.
 3. या घटकांमध्ये पोषण, शिक्षण, आरोग्य आणि आदी यांचा समावेश असेल.
 4. या जिल्ह्यांमध्ये होणारे बदल सतत प्रदर्शित करण्यासाठी एक डिजिटल व्यासपीठ तयार केले जाईल.
 5. हा संपूर्ण उपक्रम वर्ष 2022 पर्यंत ‘नवा भारत’ तयार करण्याच्या दृष्टीने आयोजित केला गेला आहे.   
 6. NITI आयोग (राष्‍ट्रीय भारत परिवर्तन संस्‍था) ही भारत सरकारची संस्‍था आहे, ज्याला आधीच्या ‘योजना आयोग’ च्या जागी तयार केले गेले.
 7. 2015 साली NITI आयोगाची स्थापना करण्यात आली. हे आयोग भारत सरकारची वैचारिक संस्थेच्या रूपात सेवा प्रदान करते.
 8. हे केंद्र आणि राज्‍य शासनांना धोरणाच्या प्रमुख कारकांसंबंधी प्रासंगिक महत्त्वपूर्ण व तांत्रिक सल्ला उपलब्‍ध करून देते.
 9. आयोगाचे अध्यक्ष देशाचे पंतप्रधान असतात.
 10. यामध्ये सर्व राज्य तसेच दिल्ली आणि पुडूचेरी सोडून केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्र्यांची आणि लेफ्टनंट गव्हर्नर यांचा समावेश असलेले एक प्रशासकीय मंडळ आणि एक प्रादेशिक मंडळ यांचा समावेश आहे.


ISRO sends its 100th satellite into space

 1. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने 12 जानेवारी 2018 रोजी भारताचा 100 वा उपग्रह अवकाशात सोडून एक नवा इतिहास रचला.
 2. कार्टोसॅट-2 शृंखलेतला तीसरा उपग्रह हा ISRO चा शंभरावा उपग्रह ठरला आहे. 2018 सालातील ही पहिली मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली. हवामानावर देखरेख ठेवण्यासाठी आणि पृथ्वीवरील भौगोलिक परिस्थितीचे आकलन करण्यासाठी ‘कार्टोसॅट-2’ उपग्रहांच्या श्रृंखलेचा वापर होणार आहे. यामध्ये उच्च क्षमतेची छायाचित्रे घेण्यासाठी पॅक्रोमेटिक आणि मल्टी-स्पेक्टल कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत.
 3. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून ISRO च्या PSLV C-40 या प्रक्षेपकाच्या सहाय्याने 31 उपग्रह अंतराळात सोडल्या गेले. त्यात तीन भारतीय तर 28 विदेशी उपग्रहांचा समावेश आहे.
 4. विदेशी उपग्रहांमध्ये फ्रान्स, फिनलँड, कॅनडा, अमेरिका (19 सर्वाधिक), दक्षिण कोरिया (5), युरोप या देशांचे सूक्ष्म-उपग्रह होते. सर्व उपग्रहांचे एकूण वजन 1323 किलोग्राम होते. PSLV C-40 या प्रक्षेपकाचे हे 42 वे उड्डाण होते.
 5. ISRO ने साधलेल्या प्रशंसनीय यशाचा आढावा :-
  1. 19 एप्रिल 1975 रोजी भारताने सोवियत संघाच्या मदतीने आपला पहिला उपग्रह ‘आर्यभट्ट’ पृथ्वीच्या कक्षेत स्थापित केला.
  2. 1980 साली पुर्णपणे स्वदेशी बनावटीच्या SLV-3 प्रक्षेपकाद्वारे ‘रोहिणी’ हा पहिला उपग्रह अवकाशात सोडण्यात आला.
  3. 22 ऑक्टोबर 2008 रोजी भारताची ‘चंद्रयान-1’ मोहीम यशस्वी झाली. या मोहिमेमधून चंद्राच्या ध्रुव क्षेत्रात पाणी असण्याची पुष्टी केली.
  4. ‘मार्स ऑर्बिटर मिशन (MOM)’ ने 24 सप्टेंबर 2014 रोजी यशस्वीरित्या मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केला आणि पहिल्याच प्रयत्नात आणि अगदी कमी खर्चात मंगळ ग्रहाच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचणारा पहिला देश ठरला.
  5. फेब्रुवारी 2017 मध्ये एकाचवेळी 7 देशांचे 104 उपग्रह अवकाशात सोडत रशियाचा 37 उपग्रहांचा विक्रम मोडीत काढला.
  6. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यान (PSLV) आणि भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान (GSLV) विकसित केले.
  7. सॅटलाइट सुचालन प्रणाली ‘गगन’ आणि क्षेत्रीय सुचालन उपग्रह प्रणाली ‘IRNSS’ विकसित केले.
  8. यानाला पुढे नेणारे अत्यावश्यक असलेले स्वदेशी ‘क्रायोजेनिक इंजन’ तयार केले.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO)
 1. ISRO चा ऐतिहासिक प्रवास:-
  1. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ही भारत सरकारची प्रमुख अंतराळ संस्था आहे. याचे बंगळुरू येथे मुख्यालय आहे.
  2. 1962 साली स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या प्रयत्नांमुळे, 15 ऑगस्ट 1969 रोजी स्थापित ISRO ने 1962 साली स्थापन झालेल्या इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रीसर्च (INCOSPAR) ला बदलले. ही संस्था विज्ञान विभागाकडून व्यवस्थापित केली जाते. 
  3. ISRO ने 1999 सालापासून व्यावसायिक शाखेच्या मदतीने विदेशी उपग्रह अवकाशात सोडण्याचा कार्यक्रम सुरू केला.
 2. ISRO च्या प्रक्षेपकांचा इतिहास:-
  1. ISRO ने भारतीय उपग्रह प्रक्षेपण यानाचे काम 1970 साली सुरू केले. ह्या कामाचे नेतृत्व डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्याकडे दिले गेले होते. अग्निबाणात सॉलिड प्रोपेलंट मोटारी वापरल्या जातात. प्रथम प्रक्षेपण सन 1979 मध्ये झाले.
  2. भारताचा अतिप्रगत असा पहिला संवर्धित उपग्रह प्रक्षेपण यान (ऑगमेंटेड SLV) हा 5 टप्प्यांत काम करणारा सॉलिड प्रॉपेलंट अग्निबाण होता. त्याची क्षमता 150 किलो वजनी उपग्रह अवकाशात नेण्याची होती.
 3. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यान (PSLV):- 
  1. ISRO चा शाश्वत प्रक्षेपक म्हणून ओळखल्या जाणार्‍या ‘धृवीय उपग्रह प्रक्षेपण यान (PSLV)’ याचा जागतिक अवकाश स्पर्धेत भारताला आघाडी मिळवून देण्यास मोलाचा वाटा आहे. PSLV हे ISRO चे अष्टपैलू प्रक्षेपण वाहक रॉकेट आहे.
  2. PSLV कडून केल्या गेलेल्या प्रथम यशस्वी 36 प्रक्षेपणांनंतर, PSLV हे ISRO चे वर्कहोर्स लाँच व्हेईकल म्हणून उदयास आले आणि आंतरराष्ट्रीय ग्राहकांसाठी उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी खुले करण्यात आले.
  3. PSLV हे जगातील सर्वात विश्वसनीय प्रक्षेपण वाहनांपैकी एक आहे. 
  4. PSLV ची वैशिष्ठ्ये:-
   1. PSLV-C37 ही PSLV-XL ची एक सुधारित संरचना आहे.  
   2. उंची- 44 मीटर
   3. व्यास - 2.8 मीटर
   4. स्टेज ची संख्या- 4
   5. वाहून नेण्याची क्षमता- 320 टन (XL)
   6. प्रकार- 3 (PSLV-G, PSLV - CA, PSLV - XL)
   7. प्रथम उड्डाण- 20 सप्टेंबर 1993
 4. भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान (GSLV):-
  1. GSLV हे प्रामुख्याने पृथ्वीच्या भूस्थिर कक्षेत उपग्रहाच्या INSAT वर्गातील उपग्रहांचे प्रक्षेपण करण्याकरिता विकसित केले गेले. 
  2. GSLV हे उपग्रहाच्या GSAT मालिकेच्या प्रक्षेपणासाठी वापरले जात आहे. 
  3. GSLV मध्ये तीन टप्पे:-
   1. घन इंधन वापरणारे रॉकेट मोटर स्टेज, अर्थ स्टोअरेबल लिकुइड स्टेज आणि क्रायोजेणीक स्टेज.
   2. या वाहनाची 49.13 मीटर उंची आहे. GSLV चे प्रथम उड्डाण 18 एप्रिल 2001 रोजी केले गेले होते.
   3. 2017 साली तयार करण्यात आलेला ‘जियोसिंक्रोनस सॅटलाइट लॉंच व्हेइकल मार्क-III’ (GSLV Mk-III) हा भारताने आतापर्यंत बनविलेले सर्वात भारी अग्निबाण आहे आणि हे सर्वाधिक वजनी उपग्रह प्रक्षेपित करण्यास सक्षम आहे.
   4. याला ‘फॅट बॉय’ असे टोपणनाव दिले आहे. भारताने आतापर्यंत बनविलेले हे जवळपास 640 टन वजनी सर्वात भारी अग्निबाण आहे आणि हे सर्वाधिक वजनी उपग्रह प्रक्षेपित करण्यास सक्षम आहे. हा अग्निबाण पृथ्वीच्या वातावरणाच्या खालच्या परिभ्रमन कक्षेत 8 टन वजनापर्यंतचे अंतराळ केंद्र पोहोचवण्यास सक्षम आहे.


Instructions on how to set up a committee to handle the insufficient incident of Mullaperiyar dam in the Supreme Court

 1. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र, तामिळनाडू आणि केरळ राज्य शासनांना 180 वर्ष जुन्या ऐतिहासिक मुल्लापेरियार धरणाच्या ठिकाणी कोणत्याही अप्रत्यक्षित आपत्ती परिस्थितीशी सामना करण्यासाठी तीन अलग-अलग समित्या गठित करण्याचे निर्देश दिलेत.
 2. भारतीय सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. ए. एम. खानविलकर आणि न्या. धनंजय वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार, या समित्या धरणासंबंधित आपत्ती परिस्थितीच्या पैलूंवर भर देणार आहे.
तुम्हाला हे माहीत आहे का?
 1. पार्श्वभूमी:-
 2. मुल्लापेरियार धरण केरळ राज्यात वाहणारी प्रमुख नदी पेरियार नदीवर बांधण्यात आलेले एक ‘दगडी बांधकामाचे गुरुत्व धरण’ (Masonry Gravity Dam) आहे.
 3. हे धरण थेक्काडी (इदुक्की जिल्हा) मध्ये पश्चिम घाटात कार्डामम हिल्सवर समुद्रसपाटीपासून 881 मीटर उंचीवर बांधलेले आहे.
 4. याचे बांधकाम सन 1887-1895 या काळात करण्यात आले होते आणि याला ब्रिटिश भारतामधील जॉन पेन्नीक्विक यांनी बनविले होते.
 5. या धरणामधून पश्चिमेकडे वाहणार्‍या पेरियार नदीला पूर्वेकडे मोडून एका बोगद्यामधून तामिळनाडूच्या कोरड्या भागात पाणी उपलब्ध करून दिले गेले.
 6. याचे नियंत्रण, व्यवस्थापन, संचालन आणि याच्या पाण्याचा वापर तामिळनाडू राज्याद्वारा केला जातो.
 7. धरण जीर्ण झाल्यामुळे त्याच्या आसपास राहणार्‍या लोकांच्या जीवनास धोका आहे.
 8. वर्ष 1961 मध्ये या क्षेत्रात आलेल्या पुरानंतर या धरणातील जलपातळी 155 फूटने घटविण्यात आली आणि 1980 साली ही पातळी 136 फूटवर करण्यात आली.
 9. पुढे 7 मे 2014 रोजी सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडू राज्य शासनाला हा जलस्तर 142 फूट राखण्याची परवानगी दिली गेली आणि धरणाच्या सुरक्षिततेसंदर्भात लक्ष ठेवण्यासाठी आणि प्रतिबंधक उपाय सुचविण्यासाठी एक समिती नेमण्यात आली.


Old Manak Kapoor Mohan dies

 1. ‘ओल्ड माँक’ या रमला प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवणारे पद्मश्री ब्रिगेडिअर (निवृत्त) कपिल मोहन यांचे ६ जानेवारी रोजी गाझियाबाद येथे वयाच्या ८८व्या वर्षी निधन झाले.
 2. कपिल मोहन हे १९६५च्या आधीपासून ट्रेड लिंक्स प्रा. लि.चे प्रमुख होते. त्यांनी डायर मीकिन ब्रेव्हरेजची धुरा सांभाळल्यानंतर कंपनीचा विविध क्षेत्रात विस्तार केला होता.
 3. एडवर्ड डायरने वर्ष १८५५मध्ये कसौली येथे डायर मीकिन ब्रेव्हरेजची स्थापना केली होती. १९६६मध्ये या कंपनीचे मोहन मीकिन ब्रेव्हरीज लि. असे नामांतर करण्यात आले होते.
 4. कपिल मोहन यांनी या कंपनीची धुरा सांभाळल्यानंतर ‘ओल्ड माँक’ रम भारतातच नव्हे तर जगात लोकप्रिय झाली झाली होती.
 5. १९५४मध्ये ‘ओल्ड माँक’चे उत्पादन सुरू झाले होते. जगात सर्वाधिक विकली जाणारी रम म्हणून ‘ओल्ड माँक’ची ख्याती होती.
 6. त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने तीन नवे डिस्टिलरी आणि दोन ब्रेव्हरेज सुरू करण्याशिवाय देशातील विविध भागात फ्रँचायजींचा विस्तारही केला होता.
 7. मोहन यांनी नंतर ग्लास, ब्रेकफास्ट फुड, ज्यूस आणि अभियांत्रिकी उद्योगातही पाऊल ठेवले होते.
 8. विविध क्षेत्रात सक्रिय असलेल्या मोहन यांच्यामुळे मीकिन लि.ची सध्याची उलाढाल ही ४०० कोटी रूपयांहून अधिक आहे.
 9. लष्करातून निवृत्त झाल्यानंतर, उद्योग व्यवसायात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना २०१०मध्ये पद्मश्री किताबाने सन्मानित करण्यात आले.


Indu Malhotra - First woman judge to be directly appointed by the Supreme Court

 1. जेष्ठ वकील इंदू मल्होत्रा या वकिलांच्या मंडळाकडून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदी थेट नियुक्त करण्यास शिफारस करण्यात आलेल्या प्रथम महिला न्यायाधीश ठरल्या आहेत.
 2. सोबतच उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश के. एम. जोसफ यांची देखील शिफारस करण्यात आली.
 3. इंदू मल्होत्रा स्वातंत्र्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनणारी सातवी महिला आहे.
 4. यापूर्वी आर. भानुमती (सध्या एकमात्र कार्यरत महिला न्यायाधीश), एम. फातिमा बीवी (1989 साली सर्वोच्च न्यायालयाच्या प्रथम महिला न्यायाधीश), सुजाता व्ही. मनोहर, रुमा पाल, ज्ञान सुधा मिश्रा आणि रंजना प्रकाश देसाई या महिलांची नियुक्ती झालेली होती.
 5. भारतीय घटनेच्या परिच्छेद 124 मध्ये सर्वोच्च न्यायालयांच्या स्थापनेसंबंधी तरतूद आहे.
 6. वर्तमानात न्यायालयात एक भारतीय सरन्यायाधीश (CJI) आणि कमाल 30 अन्य न्यायाधीश पदांची तरतूद आहे.
 7. याचे मुख्यपीठ नवी दिल्लीत आहे.
 8. भारतीय सरन्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपतींकडून (परीच्छेद 124) केली जाते.


Top

Whoops, looks like something went wrong.