The names of the first ten police stations of the best performances were announced

 1. देशभरातील पहिल्या दहा पोलीस स्थानकांची नावे जाहीर करण्यात आली आहे.
 2. आश्चर्य म्हणजे यामध्ये महाराष्ट्रातील एकाही पोलिस स्थानकाला अव्वल दहामध्ये स्थान मिळवता आलेले नाही.
 3. 2018 या वर्षभरात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पोलीस स्थानकांमध्ये राजस्थानमधील कालू बिकानेर पोलिस स्टेशनने अव्वल स्थान पटकावले आहे.
 4. गृह मंत्रालयाकडून ही यादी जाहीर करण्यात आली आहे.
 5. चांगली कामगिरी करणाऱ्या या देशभरातील दहा पोलीस स्थानकांचा गौरव करण्यात आला.
 6. स्थानिक पोलिस ठाण्याला इमारतीचे सौंदर्य पाहून नव्हे, तर प्रशासकीय सुसज्ज यंत्रणा, सोयी, सुविधा, नागरीकांना मिळणारी पोलिसी वागणुकीची दखल घेत ही मानंकने निवडण्यात आली आहे.
 7. पोलीस स्टेशनची यादी पुढीलप्रमाणे :
1. कालू (बिकानेर, राजस्थान) 2. कॅम्पबेल बे (अंदमान-निकोबार)
3. फरक्का (मुर्शिदाबाद, पश्चिम बंगाल) 4. नेत्तापक्कम (पुदुच्चेरी)
5. गुदेरी (कर्नाटक) 6. चोपाल (हिमाचल प्रदेश)
7. लाखेरी (राजस्थान) 8. पेरियाकुलम (तामिळनाडू)
9. मुन्स्यारी (उत्तराखंड) 10. कुडचरे (गोवा)

 

 


The 31st meeting of the GST Council has recommended changes in taxes

 1. नवी दिल्लीत २२ डिसेंबर २०१८ रोजी झालेल्या जीएसटीपरिषदेच्या ३१ व्या  बैठकीत वस्तू आणि सेवा कर बदलासंदर्भातपुढील निर्णय घेण्यात आले. सहज आकलन व्हावे यासाठी हेनिर्णय या स्वरूपात सादर करण्यात आले आहेत. अधिसूचना/पत्रकाद्वारे नंतर ते जारी केले जातील.
 2. ज्या वस्तू २८ % कराच्या कक्षेत आहेत त्यावरील करात  कपात
 3. अ ) २८ % वरून  १८ %
  1. एचएस कोड 8483 अंतर्गत पुलीज, ट्रान्समिशन शाफ्ट्स आणिक्रॅन्क्स, गिअर बॉक्सेस वगैरे
  2. मॉनिटर्स आणि ३२ इंच स्क्रीन आकार असलेले टीव्ही
  3. पुनर्वापर केलेले रबरी न्यूमॅटिक टायर्स
  4. लिथियम इऑन बॅटरीच्या पॉवर बँक : लिथियम इऑन बॅटरीवर १८% कर आहेच. यामुळे पॉवर बँक आणि लिथियम इऑन बॅटरीवरीलजीएसटी दरात समानता येईल
  5. डिजिटल कॅमेरे आणि व्हिडिओ कॅमेरा रेकॉर्डर्स
  6. व्हिडिओ गेम कन्सोल्स आणि एचएस कोड  9504 अंतर्गत येणारेअन्य खेळ,
 4. ब) 28% वरून  5%
  1. दिव्यांग व्यक्तींच्या गाड्यांसाठी सुटे भाग आणि अन्य सामान
 5. अन्य वस्तूंवरील जीएसटी दरात कपात
 6. अ)18% वरून 12%
  1.  जुने कॉर्क
  2. नैसर्गिक कॉर्कच्या वस्तू
  3. अग्लोमरेटेड कॉर्क
 7. ब) 18% to 5%
  1. मार्बल विटा दगड
 8. क )12% to 5%
  1. नैसर्गिक कॉर्क
  2. चालताना वापरायची काठी
  3. फ्लाय अश बॉक्स
 9. ड )  12% वरून ० %:
  1. संगीत पुस्तके
 10. इ )5% वरून ० %
  1. भाज्या ( न शिजवलेल्या/ उकडून किंवा पाण्यात वाफवूनशिजवलेल्या ), फ्रोजन , ब्रँडेड, आणि एका विशिष्ट डब्यातल्या
  2. प्रेजर्वेटिव्ह वापरून सुरक्षित ठेवलेल्या भाज्या (उदा. सल्फरडायॉक्साईड गॅस, ब्रायन , सल्फरयुक्त पाणी किंवा अन्य प्रिजर्वेटिव्हमधील) मात्र लगेच वापरण्यासाठी अयोग्य
  3. ३. सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प आणि अन्य नवीकरणीय ऊर्जाप्रकल्प
  4. नवीकरणीय ऊर्जा उपकरणे आणि सुटे भागांसाठी ५ % जीएसटीदराचा प्रस्ताव, (बायोगॅस प्रकल्प, सौर ऊर्जा आधारित उपकरणे, सौर ऊर्जा निर्मिती प्रणाली वगैरे , या प्रकल्पातील अन्य वस्तू आणिसेवांसाठी यापूर्वीचा जीएसटी दर कायम 
  5. सौर  ऊर्जा  प्रकल्पासाठी   ५ % जीएसटी दर असलेल्या विशिष्टवस्तू बांधकाम सेवांसह पुरवण्यात आल्यामुळे वाद निर्माण झाले.
  6. हा वाद सोडवण्यासाठी परिषदेने ५ % जीएसटी आकारण्यातयेणाऱ्या वस्तूंच्या पुरवठ्यावर एकूण किमतीच्या ७०% मूल्य धरलेजाईल आणि उर्वरित ३० % मूल्य प्रमाणित जीएसटी दरानुसार  आकारले जाईल. अशी शिफारस केली
 11. जीएसटी दरात कपात / सेवांवर सवलत-
  1. १०० रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या सिनेमा तिकिटांवरील जीएसटीदर २८ % वरून १८ ५ पर्यंत कमी करण्यात येईल आणि १००रुपयांपर्यंतच्या किमतीच्या तिकीटावरील जीएसटी दर १८ ५ वरून१२ ५ पर्यंत कमी केला जाईल.
  2. मालवाहू वाहनाच्या थर्ड पार्टी विमा हप्त्यावरील जीएसटी दर १८ % वरून १२ % पर्यंत कमी.
  3. प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत मूलभूत बचत ठेव खातेदारांनाबँकांकडून दिल्या जाणाऱ्या सेवावर कर नाही
  4. धार्मिक तीर्थयात्रेसाठी विनाअधिसुचीत /चार्टर विमानानेप्रवाससावर इकॉनॉमी श्रेणीनुसार म्हणजे ५ % जीएसटी (इनपुटसेवेच्या आयटीसीसह)आकारला जाईल.


Subhasini Mistry won the Padma Shri award

 1. परिस्थिती अतिशय हलाखीची होती म्हणून नवऱ्याला योग्य वेळी हॉस्पिटलमध्ये नेता आलं नाही. पैशाच्या अभावी शेवटी नवरा मृत्युमुखी पडला. वयाच्या २३व्या वर्षी आलेलं वैधव्य आणि पदरात लहान ४ मुलं.
 2. मात्र नियतीने दिलेल्या ह्या व्रणाला कुरवाळत न बसता त्यांनी नियतीला सुंदर प्रत्युत्तर दिलं.
 3. २० वर्ष घरकाम आणि भाजी विकून जमवलेल्या पैशातून आज त्यांनी जिल्ह्यातलं पहिल इस्पितळ बांधलं ... होय ..मानवता_हॉस्पिटल ..!
 4. जिथे गोरगरिबांना मोफत उपचार मिळतात.
 5. पायात साधी स्लीपर घालून पद्मश्री स्वीकारणारी ही बाई म्हणजे .. सुभासिनी_मिस्त्री.
 6.  ह्या वर्षीचा पद्मश्री पुरस्कार वयाच्या ७०व्या वर्षी त्यांनी स्वीकारला..!


India's Sustainable Development Index is well-known by the Niti Commission

 1. भारताच्या शाश्वत विकास उदिृष्टांचा मूलभूत निर्देशांक आज निती आयोगाने प्रसिद्ध केला.
 2. 2030 पर्यंत शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल करताना ठरवलेली उद्दिष्टे साध्य झाल्याविषयी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या कामांचा आढावा या निर्देशांकात घेतला जाईल.
 3. केंद्रीय सांख्यिकी विभागाने काही संस्थांच्या मदतीने हा निर्देशांक तयार केला आहे.
 4. शाश्वत विकासाचे उद्दिष्ट गाठवण्यासाठी लोक, पृथ्वी, समृद्धी, भागीदारी आणि शांतता या पाच घटकांना अनुसरुन ‘सबका साथ, सबका विकास’ करण्याची गरज आहे.
 5. शाश्वत विकास आराखड्यानुसार तीन वर्षापूर्वी भारतात विविध कार्यक्रम सुरु करण्यात आले होते.
 6. यात विविध सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक क्षेत्रात विकास करुन हे उदिृष्ट गाठले जाणार आहे. भारताचा राष्ट्रीय विकास अजेंडाही या आराखड्याशी सुसंगत आहे.
 7. या निर्देशांकानुसार 17 विविध क्षेत्रातल्या शाश्वत विकास उदिृष्टांनुसार यादी बनवण्यात आली आहे.
 8. या यादीनुसार महाराष्ट्र शाश्वत विकासाच्या दिशेने काम करतो आहे तर हिमाचल प्रदेश, केरळ, तामिळनाडू, चंडीगढ आणि पुद्दुचेरी ही राज्ये या क्षेत्रात आघाडीवर आहेत.


Top

Whoops, looks like something went wrong.