The Muslims of the Philippines voted on the demand of the autonomous region

 1. फिलिपीन्स देशाच्या दक्षिणेकडील भागातील मुस्लिमांनी नवा स्वायत्त प्रदेश मिळविण्याच्या मागणीवरून जनमत मिळविण्यासाठी मतदान केले आहे.
 2. जवळजवळ अर्ध्या शतकापासून त्या भागात असणार्‍या अशांततेच्या परिस्थितीला संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने, इस्लामिक स्टेट या दहशतवादी गटाच्या नेतृत्वात चालविलेल्या चळवळीला सर्वोत्तम पर्याय म्हणून देशाच्या नेत्यांनी हा निर्णय घेतला.
 3. फिलिपीन्स देशाचे सरकार आणि मोरो इस्लामिक लिबरेशन फ्रंट यांच्यादरम्यान 2014 साली झालेल्या करारावर शिक्कामोर्तब करण्यासाठी हा शांततेचा प्रयत्न केला गेला आहे.
 4. फिलिपीन्स हा पश्चिमी प्रशांत महासागर प्रदेशातला आग्नेय (दक्षिण-पूर्व) आशियाई देश आहे, या देशात 7000 हून अधिक बेटे आहेत.
 5. देशाची राजधानी मनिला असून चलन फिलिपीनी पेसो हे आहे.


In the field of artificial intelligence, India ranked third

 1. भारताच्या ‘इतिहास’ या संशोधक संस्थेनी केलेल्या एका अभ्यासानुसार, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या क्षेत्रात प्रकाशित होणार्‍या उच्च दर्जाच्या संशोधनात्मक प्रकाशनांच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे.
 2. सन 2013 ते सन 2017 या काळात AI संबंधित संशोधनात्मक प्रकाशनांच्या संख्येच्या बाबतीत चीन (37,918) हा देश प्रथम स्थानी आहे.
 3. यानंतर द्वितीय स्थानी अमेरिका (32,421) आणि त्यानंतर भारत (12,135) आहे.
 4. मान्यताप्राप्त संशोधन पत्रिकांमध्ये प्रकाशित झालेल्या लेखाचा संदर्भ घेतला गेला अश्या बाबतीत भारत पाचव्या क्रमांकावर आहे.
 5. याबाबतीत अग्रस्थानी असलेले देश म्हणजे अनुक्रमे ब्रिटन, कॅनडा, अमेरिका आणि चीन हे आहेत. 
 6. AIच्या क्षेत्रात कार्य करणारे केवळ 50 ते 75 प्रमुख संशोधक भारतात आहेत, जे मुख्यताः IIT, IIIT अश्या संस्थांमध्ये आहेत.


Inaugurating the L & T production center in Gujarat for the production of Howitzer toffe

 1. हजिरा (गुजरात) येथे उभारण्यात आलेल्या लार्सन अॅण्ड टुब्रो या बहुराष्ट्रीय कंपनीच्या आर्मर्ड सिस्टीम्स कॉम्प्लेक्स या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.
 2. हा देशातला प्रथम खासगी प्रकल्प आहे, जेथे के-9 वज्र सेल्फ-प्रोपेल्ड होवित्झर तोफेचे निर्मिती केली जाईल. भारतीय लष्कराला ‘के-9 वज्र-टी 155 मि.मी./52 कॅलिबर ट्रॅक्ड सेल्फ-प्रोपेल्ड गन सिस्टम’ याच्या 100 एककांचा पुरवठा करण्यासाठी कंपनीशी करार झाला आहे. हा 4,500 कोटी रूपयांचा करार भारत सरकारच्या "मेक इन इंडिया" या उपक्रमाच्या अंतर्गत करण्यात आला आहे.
 3. शिवाय तोफेच्या निर्मितीसाठी लार्सन अँड टुब्रो कंपनीने दक्षिण कोरियाच्या हानव्हा कॉर्पोरेशन या कंपनीसोबत तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणाविषयीचा करार केला.


In India, the wealth of 1% of the rich population increased by 39% in 2018: Oxfam

 1. ऑक्सफॅम इंडिया (मूळ ब्रिटनची संस्था) या संस्थेकडून केल्या गेलेल्या एका अभ्यासानुसार, 2018 साली संपत्तीच्या बाबतीत भारताच्या यादीमधील शीर्ष 1% अतिश्रीमंतांची संपत्ती 39 टक्क्यांनी वाढलेली आहे, तर लोकसंख्येच्या खालच्या निम्म्या लोकांची संपत्ती केवळ 3 टक्क्यांनी वाढली.
 2. अहवालानुसार,
 3. गेल्या वर्षी 18 नवीन नावांसह भारतामधील अब्जाधीशांची संख्या 119 वर पोहचलेली आहे आणि त्यांच्याकडील एकूण संपत्तीने पहिल्यांदाच USD 400 अब्ज (28 लक्ष कोटी रुपये) हा आकडा पार केला आहे.
 4. जगभरात अब्जाधीशांची संपत्ती 2018 साली 12 टक्क्यांनी (किंवा प्रतिदिनी USD 2.5 अब्जने) वाढली, तर वैश्विक लोकसंख्येच्या खालच्या निम्म्या लोकांच्या संपत्तीमध्ये 11 टक्क्यांनी घट झाली आहे.
 5. 13.6 कोटी (भारतामधील 10% अतिदरिद्री) लोक 2004 सालापासून कर्जबाजारी आहेत.
 6. भारतात एकूण लोकसंख्येच्या शीर्ष अतिश्रीमंत लोकांकडे एकूण राष्ट्रीय संपत्तीच्या 77.4% संपत्ती आहे. मुख्य म्हणजे या यादीतील शीर्ष 1% लोकांकडे राष्ट्रीय संपत्तीचा 51.53% वाटा आहे.
 7. भारतात संपत्तीच्या बाबतीत खालील एकूण लोकसंख्येच्या 60% लोकसंख्येकडे केवळ 4.8% राष्ट्रीय संपत्ती आहे. शीर्ष 9 अब्जांधीशांची एकूण संपत्ती ही भारताच्या लोकसंख्येच्या 50% लोकांकडील संपत्तीच्या समतुल्य आहे.
 8. सन 2018 ते सन 2022 या काळात भारतात एकंदर दररोज 70 नवीन अब्जाधीश तयार होण्याचा अंदाज बांधण्यात आला आहे.
 9. सोबतच वाढती असमानता ही दारिद्र्यविरोधी लढा देण्यास, अर्थव्यवस्थेस हानीकारक ठरत आहे आणि जगभरातील लोकांमध्ये रोष उत्पन्न करीत आहे.


Top

Whoops, looks like something went wrong.