The Importance of Today's Day in History 9 march

 1. महत्वाच्या घटना:-
  1. १९९१: युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष स्लोबोदान मिलोसोव्हिच यांच्याविरुद्ध राजधानी बेलग्रेड मधे प्रचंड निदर्शने.
  2. १९९२: कवी आणि लेखक डॉ. हरिवंशराय बच्‍चन यांना नवी दिल्ली येथे के. के. बिर्ला प्रतिष्ठानद्वारा आयोजित समारंभात पहिला सरस्वती पुरस्कार उपराष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात आला.
 2. जन्म:-
जन्म
 1. १८६३: गायक आणि नट भाऊराव बापूजी कोल्हटकर यांचा जन्म. (मृत्यू: १३ फेब्रुवारी १९०१)
 2. १८९९: महाराष्ट्र कवी यशवंत दिनकर पेंढारकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ नोव्हेंबर १९८५)
 3. १९५१: प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म.
 4. १९५२: पहिल्या वैमानिक कप्तान सौदामिनी देशमुख यांचा जन्म.

मृत्यू:-

मृत्यू
 1. १६५०: संत तुकाराम यांचा वैकुंठवास.
 2. १९५७: मुंबई राज्याचे माजी मुख्यमंत्री बाल गंगाधर खेर यांचे निधन.
 3. १९९४: पद्मश्री, दादासाहेब फाळके व सोविएत लँड नेहरू पुरस्कार विजेत्या अभिनेत्री देविका राणी यांचे निधन. (जन्म: ३० मार्च १९०८)
 4. २०००: अभिनेत्री उषा मराठे – खेर ऊर्फ उषा किरण यांचे निधन. (जन्म: २२ एप्रिल १९२९)

 


Launch of 'National e-Mobility Program' in India

 1. केंद्रीय नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्री (स्वतंत्र प्रभार) आर. के. सिंह यांच्या हस्ते 7 मार्च 2018 रोजी नवी दिल्लीत ‘राष्ट्रीय ई-गमनशीलता कार्यक्रम (National E-Mobility Program)’ सुरू करण्यात आला आहे.
 2. या कार्यक्रमाचा उद्देश्य म्हणजे वाहन उत्पादक, चार्जिंग पायाभूत कंपन्या, चलन कार्यरत संस्था, सेवा प्रदाता आदींसह संपूर्ण ई-गमनशीलता पर्यावरणाला प्रोत्साहन देणे हा आहे.
 3. EESL ने गेल्या वर्षी 10,000 ई-वाहनांची खरेदी केली आणि वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आणखी 10,000 नवीन ई-वाहनांसाठी लवकरच एक नवीन निविदा जाहीर करणार आहे.
 4. या 20,000 ई-वाहनांमुळे, भारत दरवर्षी 5 कोटी लिटर इंधनाची बचत करेल अशी आशा आहे आणि त्यामुळे 5.6 लक्ष टन वार्षिक CO2 उत्सर्जन कमी होऊ शकणार आहे.
 5. ई-कारसाठी प्रति किलोमीटर खर्च फक्त 85 पैसे आहे, जेव्हा की सामान्य कारसाठी 6.5 रुपये मोजावे लागतात आणि त्यामुळे तेलाच्या आयतीला कमी करण्यास मदत होईल.
 6. तसेच IIT संस्था वीजेवर चालणारी स्वयंपाक प्रणाली विकसित करीत आहे, ज्यामुळे स्वयंपाकाच्या गॅसमधून निर्माण होणार्‍या प्रदूषणास आळा घालण्यास मदत होईल.
‘राष्ट्रीय ई-गमनशीलता कार्यक्रम (National E-Mobility Program)’
 1. कार्यक्रमामधील ठळक बाबी:-
 2. कार्यक्रम ऊर्जा कार्यक्षमता सेवा मर्यादित (Energy Efficiency Services Limited -EESL) कडून राबविला जाईल, जे मोठ्या प्रमाणात वीजेवर चालणारी वाहने खरेदी करून देशात मागणी वाढविणार आहे. या वाहनांना सध्या पेट्रोल व डिझेल वाहनांच्या वाहनांनी बदली करण्यात येईल.
 3. सरकार कार्यक्रमामधून चार्जिंग पायाभूत सुविधा आणि धोरणे, कार्यचौकट तयार करण्यावर लक्ष केंद्रीत करत आहे, जेणेकरुन 2030 सालापर्यंत 30% ई-वाहनांचा वापर होऊ शकणार आहे.
 4. देशात चार्जिंगसाठी पायाभूत सुविधा स्थापन करण्यासाठी परवाना घेण्याची आवश्यकता नसणार आणि यासाठी दर 6 रुपयांपेक्षा कमी असेल.


Beti Bachao, Beti Padhao: Success and Progress

 1. भारत सरकारने वर्ष 2015 मध्ये 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' अभियानाची सुरुवात केली. जेव्हा ही मोहीम सुरू केली गेली, तेव्हा हरियाणा राज्याच्या 20 मधील 12 जिल्ह्यांमध्ये स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तर अत्याधिक कमी होते.
 2. भारत सरकारने स्त्रियांच्या शिक्षणावर भर देत, मागील साडे तीन वर्षांपासून अधिकच्या कार्यकाळात प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत मुलींना प्रोत्साहित करण्याच्या दिशेने अनेक योजना तसेच शिष्यवृत्ती सुरू केल्या.
 3. सरकारच्या या अभियानामुळे समाजात मुलींच्या जन्माविषयी आणि त्यांच्या शिक्षणाविषयी लोकांच्या विचारसरणीत फार मोठा बदल दिसून आला आहे.
 4. बेटी बचाओ, बेटी पढाओ यशप्राप्ती:-
  1. 2011 साली झालेल्या जनगणनेमध्ये बालकांमधील स्त्री-पुरुष प्रमाणात (CSR) लक्षणीय घट दिसून आली होती, म्हणजे 0-6 वर्षे वयोगटातील दर हजार मुलांमागे फक्त 918 मुली होत्या जेव्हा की 1961 साली हे प्रमाण 976 एवढे होते.
  2. 640 जिल्ह्यांपैकी 429 जिल्ह्यांमध्ये घट दिसून आली होती. 244 जिल्ह्यांमधील हा दर राष्ट्रीय सरासरी 918 पेक्षा खाली होता.
  3. या पार्श्वभूमीवर, भारत सरकारतर्फे 22 जानेवारी 2015 रोजी पानिपत (हरियाणा) येथे 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' अभियानाला सुरु करण्यात आले.
  4. महिला व बाल विकास मंत्रालय, आरोग्य व कुटुंब कल्याण आणि मनुष्यबळ विकास मंत्रालय यांचा त्रिपक्षीय संयुक्त उपक्रम आहे. यामध्ये मुलींच्या जन्माविषयी लोकांची विचारसरणी सुधारण्यासाठी जागरूकता निर्माण करण्यावर लक्ष केंद्रीत केले जात आहे.
  5. कमी CSR असलेल्या निवडक 161 जिल्ह्यांमध्ये विविधांगी उपक्रम, मुलींचे शिक्षण आणि ‘पूर्वकल्पना व गर्भाची पूर्व-चाचणी तंत्र’ कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाते.
  6. पहिल्या टप्प्यात (सन 2014-15, जानेवारी 2015), ही योजना 100 जिल्ह्यांसह सुरू करण्यात आली आणि दुसर्‍या टप्प्यात (सन 2015-16, फेब्रुवारी 2016) 61 अतिरिक्त जिल्ह्यांना यात समाविष्ट करण्यात आले.
  7. या योजनेचे फलित म्हणून या जिल्ह्यांमध्ये स्त्री-पुरुष जन्मदर सुधारण्यात यश आले.
  8. योजनेच्या अंमलबजावणीसाठी महिला व बाल विकास मंत्रालयाला केंद्रीय मंत्रालय बनविण्यात आले आणि इतर पातळीवर आरोग्य व शिक्षण विभागाच्या सहकार्याने राज्य सामाजिक कल्याण / महिला व बाल विकास विभागांद्वारे मदत दिली जात आहे.
  9. खालच्या पातळीवर ही योजना निवडलेल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी / उप-दंडाधिकारी यांच्या नेतृत्वात चालते.
 5. योजनेसाठी निवडक 161 जिल्ह्यांतली प्रगती:-
  1. स्त्री-पुरुष जन्मदर (Sex Ratio at Birth -SRB) बाबतीत, 161 जिल्ह्यांपैकी 104 जिल्ह्यांमध्ये SRB मध्ये वाढ दिसून येत आहे, मात्र एका जिल्ह्यात स्थिर पातळी दिसून आलेली आहे.
  2. 119 जिल्ह्यांमध्ये नोंदवलेल्या ANC नोंदणीविरोधात पहिल्या त्रिमितीय नोंदणीमध्ये प्रगतीची नोंद झाली आहे. मात्र 13 जिल्हे यात स्थिरता दर्शवितात.
  3. संस्थात्मक प्रसूतीच्या बाबतीत मागील वर्षाच्या तुलनेत 146 जिल्ह्यांमध्ये वाढ झाल्याची नोंद आहे. मात्र 60 जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण स्थिर आहे.

केंद्र व राज्य सरकारांचे काही ठळक प्रयत्न

 1. ‘गुड्डी-गुड्डा बोर्ड’च्या माध्यमाने सार्वजनिकरीत्या स्त्री-पुरुष जन्मदर प्रदर्शित केली.
 2. ठिकठिकाणी योजनेचे बोधचिन्ह ब्रॅंड म्हणून वापरण्यात आले. सर्व सरकार इमारती, सार्वजनिक कार्यालये, अधिकृत / सार्वजनिक वाहने, सार्वजनिक वाहतूक, शाळा बस येथे हे बोधचिन्ह वापरले जात आहे.
 3. मुलींच्या जन्माचा उत्सव साजरा करणे, मुलींसाठी विशेष दिवस समर्पित करणे, मुलींच्या जन्मासह सुकन्या समृद्धी खात्याशी जोडणे आणि पालकांचा सन्मान करणे, मुलींचे पालनपोषण करणे, मुलींचे पालनपोषणाला दर्शविण्यासाठी रोपलागवड उपक्रम राबवणे, बालविवाह रोखण्यास प्रतिबंध करणे. ‘सेल्फी वीथ डॉटर’ यासारख्या राज्यस्तरावर योजना राबवल्या गेल्या.
 4. क्रीडा, शैक्षणिक, लेखक, वकील, विद्यार्थी अश्या विविध क्षेत्रात जिल्हा प्रशासनातर्फे क्षेत्रांतील उत्कृष्ट कामगिरीसाठी स्थानिक चॅम्पियन यांची निवड करणे. स्थानिक चॅम्पियन युवांना ग्रामपंचायती व गावांना योजनेंतर्गत समुदाय स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी एकत्र आणत आहेत.
 5. सर्वोत्तम पंचायतींचा सत्कार करणे, पालकांनी त्यांच्या मुलींचे कौतुक करणे, समुदाय सदस्य, स्थानिक चँपियन त्यांच्या उत्कृष्ट कामासाठी, गुणवंत मुलींचा सन्मान करणे.
 6. मुलींना शिक्षण प्रदान करून सक्षम करणे. मुलींच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करणारे शाळेमध्ये नोंदणी उपक्रम राबवणे.
 7. राज्ये व जिल्हा पातळीवर बालविवाह रोखण्यासाठी मोहीम राबविली जात आहे.
 8. स्त्री-पुरुष बाल गुणोत्तर घटविण्याच्या मुद्द्यावरून विशेष ग्रामसभा / महिला सभा आयोजित करणे.
 9. नागरी संस्था संघटनांच्या समर्थनाने विषय आधारित मोहीमा राबवणे.
 10. "बेटी बचाओ बेटी पथासो आठवडा- द न्यू फॉर डॉट्स": मुली व स्त्रियांच्या बाजूने राष्ट्रीय आणि मुख्य प्रवाहात प्रवृत्त करण्याच्या प्रयत्नातून आणि बेटी बचाओ बेटी पढाओला दृश्यमानता आणण्यासाठी सुरुवात केली.
 11. आंतरराष्ट्रीय मुलगी दिन (11 ऑक्टोबर) च्या पार्श्वभूमीवर, मुलींचा सन्मान करण्यासाठी महिला व बाल विकास मंत्रालयाने "बेटी बचाओ बेटी पढाओ सप्ताह – नव्या भारताच्या मुली" हा कार्यक्रम आयोजित केला.


MoU on various topics in India and Vietnam

 1. व्हीएतनामचे राष्ट्राध्यक्ष त्रान दाय क्वांग तीन दिवासंच्या भारत दौऱ्यादरम्यान भारत आणि व्हीएतनाम या दोन्ही देशांमध्ये विविध विषयांवर सामंजस्य करार करण्यात आले.
 2. क्वांग यांच्या १८ जणांच्या शिष्टमंडळामध्ये उद्योजक आणि कलाकारांचा समावेश आहे. तसेच त्यांच्या पक्षाचे काही नेते व मंत्रीही आहेत.
 3. पंतप्रधान मोदी व व्हिएतनामचे अध्यक्षांनी अणुसहकार्य, इंम्डो-पॅसिफिक खुली व्यवस्था, संरक्षण, तेल व वायू तसेच कृषी अशा अनेक क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य करण्याचे ठरवले आहे.
 4. दोन्ही देश द्विपक्षीय सागरी सहकार्यावर भर देणार असून खुली, त्यासाठी कार्यक्षम व नियमाधिष्ठित प्रादेशिक व्यवस्था आवश्यक आहे.
 5. भारत व व्हिएतनाम यांनी व्यापार व गुंतवणूक संबंध हे तेल व वायू शोधन, शाश्वत ऊर्जा, कृषी व कापड उद्योगात वाढवण्याचे ठरवले आहे.
 6. अणुऊर्जा, व्यापार व कृषी या तीन क्षेत्रात यावेळी सहकार्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
 7. आशिया-पॅसिफिक प्रदेशात चीनचा वाढता प्रभाव आणि दबावाचे राजकारण लक्षात घेता व्हिएतनाम अध्यक्षांच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे.
 8. नरेंद्र मोदी यांनी व्हीएतनामला २०१६साली भेट दिली होती. या भेटीच्यावेळेस दोन्ही देशांमध्ये माहिती-तंत्रज्ञान, अवकाशविज्ञान, दुहेरी करआकारणी अशा विविध विषयांवर १२ करार करण्यात आले होते.
 9. २०१७साली या दोन्ही देशांच्या राजनैतिक संबंधांना २५ वर्षे पूर्ण झाली आहेत.


India won two bronze medals in Asian Wrestling championship

 1. भारताचा कुस्तीपटू आणि माजी विजेता बजरंग पुनियाने यंदाच्या कझाकिस्तान येथे सुरू असलेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत ६५ किलो फ्रिस्टाईल वजनी गटात कांस्यपदक जिंकले.
 2. २०१७साली नवी दिल्लीत झालेल्या आशियाई स्पर्धेत बजरंग पुनियाने सुवर्णपदकाची कमाई केली होती.
 3. विनोद कुमार ओमप्रकाशने ७० किलो फ्रिस्टाईल वजनी गटात भारतासाठी कांस्यपदकाची कमाई केली आहे.
 4. या दोन पदकासह भारताने आतापर्यंत या स्पर्धेत ८ पदक कमावली आहेत, ज्यात १ सुवर्ण, १ रौप्य आणि ६ कांस्य पदकांचा समावेश आहे.
 5. याच स्पर्धेत भारताच्या नवज्योत कौरने ६५ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावून इतिहासाची नोंद केली होती.
 6. आशियाई स्तरावर सुवर्णपदक पटकावणारी नवज्योत पहिली भारतीय महिला ठरली होती.
 7. तर रिओ ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती साक्षी मलिकने ६२ किलो फ्रिस्टाईल वजनीगटात कांस्यपदक मिळवले आहे.


The youngest billionaire in the list of Forbes founder of Paytm

 1. फोर्ब्जने ग्लोबल बिलियनेअर्स म्हणजेच जागतिक अब्जाधीशांची यादी नुकतीच प्रसिद्ध केली आहे. या यादीत यंदा 119 भारतीयांचा समावेश झाला आहे.
 2. विशेष म्हणजे, या यादीत पेटीएमचे संस्थापक विजय शर्मा सर्वात तरुण अब्जाधीश ठरले आहेत. तर सर्वात ज्येष्ठ व्यक्ती म्हणून एल्केम लॅबोरेटरीजचे निवृत्त संचालक संप्रदा सिंह यांचा समावेश झाला आहे.
 3. फोर्ब्सच्या या यादीत 119 भारतीयांपैकी रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी 19 व्या स्थानी मिळाले आहे. गेल्या वर्षी ते 33 व्या स्थानावर होते.
 4. पण यंदा त्यांच्या संपत्तीत 16.9 अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास 1.1 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
 5. सध्या त्यांच्याकडे 40.1 अब्ज डॉलर ( जवळपास 2.61 लाख कोटी रुपये) संपत्ती असल्याचे फोर्ब्सने जाहीर केलेल्या यादीत सांगितले आहे.
 6. विशेष म्हणजे, या यादीत सर्वात कमी तरुण व्यक्ती म्हणून पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा (39) यांचा समावेश झाला आहे.
 7. विजय शर्मा यांना 1394 वे स्थान मिळाले आहे. त्यांच्याकडे 1.7 अब्ज डॉलर संपत्ती आहे.
 8. तर एल्केम लॅबोरेटरीजचे निवृत्त संचालक संप्रदा सिंह (92) हे सर्वात ज्येष्ठ भारतीय ठरले आहेत. त्यांना 1867 वे स्थान मिळाले आहे.
 9. त्यांनी आपल्या एल्केम लॅबोरेटरीजची स्थापना 45 वर्षांपूर्वी केली होती. स्वत: चा व्यावसाय सुरु करण्यापूर्वी ते एका मेडिकलमध्ये काम करत होते.
 10. दरम्यान, या यादीत काही महिलांनाही स्थान मिळाले आहे.यात सावित्री जिंदल, किरण मजुमदार-शॉ, स्मिता कृष्णा गोदरेज, लीना तिवारी, अनु आगा, शीला गौतम आणि मधु कपूर आदींचा समावेश आहे.


Top