
2337 05-Mar-2018, Mon
- महत्वाच्या घटना:-
- १५५८: फ्रान्सिस्को फर्नांडिस यांनी धुम्रपान बनवण्यात पहिल्यांदा तंबाखूचा वापर केला.
- १६६६: छत्रपती शिवाजी महाराज यांनी रायगडावरून आग्र्याला प्रयाण केले.
- १८५१: जिओलॉजीकल सर्व्हे ऑफ इंडिया ची स्थापना झाली.
- १९३१: दुसर्या गोलमेज परिषदेपुर्वी गांधी-आयर्विन करार झाला.
- १९३३: भयानक मंदीमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट यांनी सर्व बँका काही दिवसांसाठी बंद केल्या व आर्थिक व्यवहारांवर बंदी घातली.
- १९६६: म्हैसूरचे राजे वाडियार यांचा बंगळुरूमध्ये असेलेला राजवाडा सरकारच्या ताब्यात घेण्याचा विधेयक मंजूर झाला.
- १९९७: संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेले टपाल तिकीट प्रकाशीत झाले.
- १९९७: धार्मिक जनजागृतीबद्दल दिला जाणारा जॉन एम. टेम्पलटन पुरस्कार पांडुरंगशास्त्री आठवले यांना जाहीर करण्यार आला.
- १९९८: रशियाकडून घेतलेल्या सिंधुरक्षक पाणबुडीचे मुंबईत आगमन झाले.
- २०००: कर्नाटकातील कैगा अणू वीजप्रकल्प पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते देशाला समर्पित केला.
- जन्म:-
- १५१२: नकाशाकार आणि गणितज्ञ गेर्हाट मार्केटर यांचा जन्म. (मृत्यू: २ डिसेंबर १५९४)
- १८९८: चीनचे राष्ट्राध्यक्ष चाऊ एन लाय यांचा जन्म. (मृत्यू: ८ जानेवारी १९७६)
- १९०८: ब्रिटिश आणी अमेरिकन रंगभूमीवरील आणि हॉलिवूड चित्रपटांतील अभिनेते सर रेक्स हॅरिसन यांचा जन्म. (मृत्यू: २ जून १९९०)
- १९१०: संपादक श्रीपाद वामन काळे यांचा जन्म.
- १९१३: किरण घराण्याच्या शास्त्रीय गायिका गंगुबाई हनगळ यांचा जन्म. (मृत्यू: २१ जुलै २००९)
- १९१६: ओरिसाचे मुखमंत्री आणि स्वातंत्र्य सेनानी बिजू पटनायक यांचा जन्म. (मृत्यू: १७ एप्रिल१९९७)
- १९७४: अभिनेता हितेन तेजवानी यांचा जन्म.