The Importance of Today's Day in History 23 march

 1. विशेष :
  1. जागतिक हवामान दिन
 2. महत्वाच्या घटना:-
  1. १९३१: भारतीय क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली.
  2. १९४०: संपूर्ण स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीचा ठराव लाहोर येथील मुस्लीम लीगच्या अधिवेशनात संमत.
  3. १९५६: पाकिस्तान हे जगातील पहिले इस्लामी प्रजासत्ताक बनले.
  4. १९८०: ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा प्रकाश पदुकोन यांनी पहिले भारतीय म्हणून जिंकली.
  5. १९९८: अभिनेते दिलीपकुमार यांना निशान-ए-इम्तियाज हा पाकिस्तानचा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर.
  6. १९९९: पं. भीमसेन जोशी व लता मंगेशकर यांना पद्मविभूषण सन्मानाने गौरविेण्यात आले.
 3. जन्म:-
जन्म
 1. १९१०: समाजवादी नेते आणि विख्यात संसदपटू डॉ. राममनोहर लोहिया यांचा जन्म. (मृत्यू: १२ ऑक्टोबर १९६७)
 2. १९१६: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते व पॉलिट ब्यूरोचे सदस्य हरकिशन सिंग सुरजित यांचा जन्म. (मृत्यू: १ ऑगस्ट २००८)
 3. १९७६: भारतीय अभिनेत्री, निर्माती आणि राजकारणी स्मृती इराणी यांचा जन्म.

मृत्यू:-

मृत्यू
 1. १९३१: क्रांतिकारक भगत सिंग यांना फाशी. (जन्म: २८ सप्टेंबर १९०७)
 2. १९३१: क्रांतिकारक सुखदेव थापर यांना फाशी. (जन्म: १५ मे १९०७)
 3. १९३१: क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू यांना फाशी. (जन्म: २४ ऑगस्ट १९०८)
 4. २००७: मराठी साहित्यिक श्रीपाद नारायण पेंडसे यांचे निधन.
 5. २००८: मराठी चित्रपट अभिनेते गणपत पाटील यांचे निधन.


The Importance of Today's Day in History 23 march

 1. महत्वाच्या घटना:-
  1. १३०७: देवगिरीचा वैभवशाली सम्राट रामदेवराव यादव यास मलिक काफूरने कैद करुन दिल्लीला नेले.
  2. १६७७: दक्षिण दिग्विजयप्रसंगी शिवाजी महाराजांनी श्री शैल्य मल्लिकार्जुन येथे मुक्काम केला.
  3. १८९६: अ.एस. पोपोव यांनी इतिहासात पहिल्यांदाच रेडिओ सिग्नल चे प्रसारण केले.
  4. १९७७: स्वातंत्र्यानंतर पहिलेच बिगर काँग्रेसचे सरकार येऊन मोरारजी देसाई पंतप्रधान झाले.
  5. १९९८: टायटॅनिक चित्रपटाला विक्रमी ११ ऑस्कर पुरस्कार मिळाले.
 2. जन्म:-
जन्म
 1. १९०१: अमेरिकन अॅनिमेटर मिकी माऊस चे सह निर्माते अनब्लॉक आय्व्रेक्स यांचा जन्म. (मृत्यू: ७ जुलै१९७१)
 2. १९३०: हॉलिवूड अभिनेता स्टीव्ह मॅकक्‍वीन यांचा जन्म. (मृत्यू: ७ नोव्हेंबर १९८०)
 3. १९५१: अमेरिकन फॅशन डिझायनर टॉमी हिल्फिगर यांचा जन्म.
 4. १९८४: भारतीय हॉकी खेळाडू एड्रियन डिसूझा यांचा जन्म.

मृत्यू:-

मृत्यू
 1. १८४९: जर्मन रसायनशास्त्रज्ञ योहान वुल्फगँग डोबेरायनर यांचे निधन. (जन्म: १३ डिसेंबर १७८०)
 2. १८८२: अमेरिकन नाटककार व कवी एच. डब्ल्यू. लाँगफेलो यांचे निधन. (जन्म: २७ फेब्रुवारी १८०७)
 3. १९०५: फ्रेन्च लेखक ज्यूल्स व्हर्न यांचे निधन. (जन्म: ८ फेब्रुवारी १८२८)
 4. २००७: मराठी कथालेखक व कादंबरीकार श्रीपाद नारायण पेंडसे यांचे निधन. (जन्म: ५ जानेवारी१९१३)


World Weather Day: March 23

 1. “वेदर-रेडी, क्लायमेट-स्मार्ट” या विषयाखाली जगभरात ‘जागतिक हवामान दिन 2018’ पाळला जात आहे.
 2. 1950 साली 23 मार्चला जागतिक हवामानशास्त्र संघटना (World Meteorological Organisation -WMO) स्थापन करण्यात आले.
 3. हवामान खात्याशी संबंधित WMO ही एक वैश्विक संघटना आहे आणि 191 देश व प्रदेश याचे सभासद आहेत.
 4. हा दिवस सर्व सदस्य देशांमध्ये पाळला जातो.
 5. ही संस्था स्थापन होण्यासाठी पुढाकार घेण्यार्‍या 31 देशांमध्ये भारत देखील होता.
 6. WMO पृथ्वीची वातावरणीय परिस्थिती आणि व्यवहार, महासागरांसोबतचे संबंध, हवामान आणि परिणामस्वरूप जलस्त्रोतांच्या वितरणासंबंधी माहिती याबाबतीत संयुक्त राष्ट्रसंघाची अधिकृत संस्था आहे.
 7. जगभरात हवामानावर लक्ष ठेवणारी ‘वर्ल्ड वेदर वॉच’ ही प्रणाली सुरु असून ती आंतरराष्ट्रीय सहकार्याचे प्रतीक मानली जाते.
जागतिक हवामानशास्त्र संघटना (WMO)
 1. पार्श्वभूमी:-
 2. जागतिक हवामानशास्त्र संघटना (WMO) ही संयुक्त राष्ट्रसंघाची एक आंतर-शासकीय संघटना आहे.
 3.  ज्याचे जगभरात 191 सदस्य देश आहेत.
 4. 1873 साली ‘आंतरराष्ट्रीय हवामान संघटना’ या नावाने संस्था कार्यरत झाली.
 5. पुढे तिला 1950 साली WMO ने पुनर्स्थित करण्यात आले.
 6. WMO चे जिनेव्हा (स्वित्झर्लंड) येथे मुख्यालय आहे.


The Karnataka government will give Lingayat community the status of independent religion

 1. कर्नाटकातील सिद्धरामय्या सरकारने लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे.
 2. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जातीय समीकरण लक्षात घेऊन कर्नाटकातील काँग्रेस सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.
 3. लिंगायत समाजाला धार्मिक अल्पसंख्यांकाचा दर्जा देण्याची केंद्र सरकारकडे लिखित मागणी करण्यात येईल असा निर्णय मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
 4. कर्नाटक राज्याच्या अल्पसंख्य आयोगाने या दर्जा देण्याच्या विषयाबाबत सात सदस्यांची समिती स्थापन केली होती. त्या समितीचे अध्यक्ष उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एच एन नागमोहन दास हे होते.
 5. कर्नाटक अल्पसंख्याक कायद्याच्या कलम २ (डी) अंतर्गत लिंगायत समाजाला धार्मिक अल्पसंख्याक म्हणून मान्यता देण्याचा विचार व्हावा असे नागामोहन दास समितीने म्हटले होते.
 6. नागामोहन दास समितीने दिलेल्या या अहवालाच्या आधारावर हा निर्णय घेण्यात आला.
 7. कर्नाटकच्या एकूण लोकसंख्येच्या १७ टक्के लोकसंख्या लिंगायत असून भाजपाकडून मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असणारे माजी मुख्यमंत्री असणारे बी एस येडीयुरप्पा देखिल लिंगायत आहेत. 
 8. हा समाज १२व्या शतकातील समाज सुधारक बसवेश्वरांचा पाईक आहे. गेल्या काही वर्षांपासून लिंगायतांनी वेगळ्या धर्माचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले.
 9. लिंगायतांना अल्पसंख्याक धर्माचा दर्जा मिळाला तर कलम २५, २८, २९ आणि ३० अंतर्गत फायदे मिळतील.


Developed new algorithms to prevent cyber attacks on GPS devices

 1. शास्त्रज्ञांनी एक काल्पनिक अल्गोरिदम विकसित केले आहे, जे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम (GPS)-सक्षम उपकरणांवर वास्तविक वेळेत सायबर हल्ले शोधण्यास आणि ते टाळण्यास मदत करू शकणार आहे.
 2. अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी विकसित केलेले अल्गोरिदम इलेक्ट्रिकल ग्रिड आणि अन्य GPS वर निर्भर असलेल्या तंत्रज्ञानावरील फसव्या GPS हल्ल्यांचा प्रभाव कमी करते.
 3. व्यापक स्वरूपात, दुर्भावनायुक्त सायबर-आक्रमणकर्ते GPS संकेताचे प्रतिबिंब तयार करतात आणि ते काही काळासाठी प्रदर्शित करतात, जे चुकीची वेळ किंवा चुकीचे स्थान दर्शवतात. यामुळे लोक चुकीच्या ठिकाणी किंवा बेकायदेशीर माहितीचा त्रास सहन करू शकतात.
 4. नवा अल्गोरिदम सेलफोन किंवा संगणकावर एका अॅपद्वारे सहजपणे लागू होऊ शकतो.
 5. हा अल्गोरिदम खोटे GPS संकेत ओळखण्यास आणि हल्ला रोखण्यास सक्षम आहे.
 6. संशोधनाचे महत्त्व:-
  1. अमेरिकेसारख्या देशात इलेक्ट्रिकल पॉवर ग्रिड GPS समर्थित प्रणालीवर आधारित आहे.
  2. त्यावर हल्ले रोखण्यासाठी हे अल्गोरिदम तयार करण्यात आले आहे.
  3. शिवाय विचारार्थ असलेल्या वाहनचालकाविना GSP आधारित वाहनचालनाच्या संकल्पनेकडे वाटचाल करीत असताना, GPS अश्या हल्ल्यांपासून सुरक्षित करणे ही एक गरज ठरत आहे.         


For the first time with the indigenous Sadhakas, 'BrahMos' missile test

 1. राजस्थानच्या पोखरण चाचणी क्षेत्रात भारतीय लष्कराने प्रथमच स्वदेशी साधक (indigenous seeker) याने सज्ज असलेले भारताचे सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्र ‘ब्रह्मोस’ याची यशस्वी चाचणी घेतली आहे.
 2. ब्रह्मोस कॉरपोरेशनचे 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्र भारत आणि रशिया संबंधातून विकसित करण्यात आले आहे.
 3. ‘ब्रह्मोस कॉरपोरेशन’ भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि रशियाची NPO मशीनोस्त्रोयेनिशिया यांचा एक संयुक्त उपक्रम (JV) आहे.
 4. ब्रह्मोस (BrahMos) हे नाव भारताची ब्रह्मपुत्र आणि रशियाची मस्कवा नदीवरून ठेवण्यात आले आहे.
 5. ब्रह्मोस जवळपास 300 किलोचे विस्फोटक वाहून नेण्यास सक्षम आहे.
 6. ब्रह्मोसच्या नावावर सर्वाधिक गतिमान सुपरसोनिक क्षेपणास्त्राचा जागतिक विक्रम आहे. याची गती ताशी सुमारे 3400 किलोमीटरपेक्षा अधिक आहे.
 7. भारतीय सेवेत ब्रह्मोस 2006 सालापासून आहे. हे एयर लॉंच्ड क्रुज क्षेपणास्त्र (ALCM) जल-थल-वायू अश्या तीनही परिस्थितीत भारतीय सेवेत आहे. 


'51 Squadron 'receives presidential color and President's color for 230 signals

 1. भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी 22 मार्च 2018 रोजी पंजाबच्या हलवारामध्ये भारतीय वायुदलाच्या 51 स्क्वाड्रनला ‘राष्ट्रपती मानक’ तर ‘230 सिग्नल तुकडी’ला ‘राष्ट्रपती रंग’ सन्मान प्रदान केले आहे.
 2. या तुकड्यांचा व्यावसायिक उत्कृष्टतेबाबत एक समृद्ध इतिहास आहे आणि या तुकड्यांनी शांती व युद्धादरम्यान सन्मान आणि विशिष्‍टता राखत भारताची सेवा केली आहे.
 3. राष्ट्रपती मानक/रंग (presidential standard/President’s Colour) किंवा राष्ट्रपती ध्वज हा एक सन्मान आहे, जो राज्यप्रमुख किंवा राष्ट्राध्यक्ष यांचे प्रतीक किंवा राजेशाही मानक म्हणून अनेक देशांमध्ये वापरला जातो.
 4. संरक्षण दलाला मिळणारा हा सर्वोच्च सन्मान आहे.
 5. भारतात 26 जानेवारी 1950 पासून हा सन्मान भारताचे राष्ट्रपती यांच्याकडून प्रदान केला जात आहे.
 6. या मानकावर चार (2 निळे व 2 लाल) भागामध्ये सोनेरी बाह्यरेखांनी काढलेली राष्ट्रीय प्रतीके कोरलेली आहेत – सिंह, हत्ती (5 व्या शतकाच्या अजिंठा लेणीमधील आदिमानवांची चित्रकला), तराजू (17 व्या शतकातील लाल किल्लामधील), कमळ पुष्पाची फुलदाणी.


 Malayalam writer M. Sukumaran passed away

 1. सुप्रसिद्ध मल्याळम लेखक एम सुकुमारन यांचे १६ मार्च २०१८ रोजी निधन झाले आहे.
 2. ते ७६ वर्षांचे होते.
 3. कट्टर कम्युनिस्ट असूनही त्यांना माकपमधील उणिवा दिसल्या व त्या उणिवा दाखवण्यासाठी त्यांनी १९७९ मध्ये ‘शेषक्रिया’ ही कादंबरी लिहिली होती.
 4. त्यांना ‘मरिचितिल्लावरुदे समराकांगल’ या पुस्तकासाठी १९७६मध्ये व ‘जनीथाकम’ पुस्तकासाठी १९९४ मध्ये असा दोनदा केरळ साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.
 5. त्यांना ‘चुवना चिहनांगल’ या लघुकथा संग्रहासाठी २००६मध्ये राष्ट्रीय साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता.
 6. त्यांच्या ‘संगागनाम’ आणि ‘उनर्थपट्टू’ या लघुकथांवर चित्रपट निर्मिती करण्यात आलेली आहे.


Top