The first 'International Solar Union (ISA) Forum' concluded at the World Energy Conference

 1. आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) ने ‘जागतिक ऊर्जा भविष्य शिखर परिषद-2018 (World Future Energy Summit -WFES)’ मध्ये 17-18 जानेवारी 2018 दरम्यान प्रथम ‘आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) मंच’ आयोजित केली.
 2. WFES हा वैश्विक स्तरावरचा विशेष कार्यक्रम आहे.
 3. जो अबूधाबी (UAE) मध्ये 18 जानेवारी 2018 रोजी अबूधाबी शाश्वत क्षमता सप्ताह दरम्यान मसदरकडून आयोजित केला गेला.
 4. ISA कार्यक्रमादरम्यान ISA च्या बाबतीत महितीचा प्रसार आणि यासंबंधी क्रियाकलाप आणि कार्यक्रमांच्या बाबतीत महितीसाठी ISA मंडप स्थापित केले गेले.
 5. कार्यक्रमाचे यश:-
  1. येस बँकेने $5 अब्जाहून अधिकचा निधी सौर प्रकल्पांना वित्तीय मदतीच्या रूपात देण्याची घोषणा केली.
  2. मॅसर्स CLP आणि मॅसर्स NTPC लिमिटेड यांनी ISA सोबत भागीदारी स्थापन करण्याची घोषणा केली आणि ISA निधीसाठी प्रत्येकी $ एक दशलक्षचे योगदान देण्याची घोषणा केली.
  3. IA आणि GCF यांनीही ISA सोबत भागीदारीत प्रवेश करण्याची घोषणा केली.
  4. ISA अंतर्गत सौर प्रकल्पांसाठी 10 कंपन्यांनी आवडपत्र (LoIs) आणि सामंजस्य करार (MoUs) केलेत.
आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA)
 1. पॅरिस हवामान कराराच्या पार्श्वभूमीवर चालवला जाणारा आंतरराष्ट्रीय सौर युती (International Solar Alliance -ISA) हा सर्वसामन्यांना स्वच्छ आणि स्वस्त ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी भारत आणि फ्रान्स यांच्याकडून सुरू करण्यात आलेला एक जागतिक पुढाकार आहे.
 2. गुडगावमधील राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्थान (NISE, गवलपहारी) येथे ISA चे मुख्यालय आणि अंतरिम सचिवालय आहे. ही भारतातली पहिली आंतरराष्ट्रीय व आंतर-शासकीय संस्था आहे.
 3. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्स राष्ट्राध्यक्ष फ्रँकोईस हॉलंड यांनी आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) ची स्थापना 30 नोव्हेंबर 2015 रोजी केली.
 4. भारताने यामध्ये 5 वर्षाच्या कालावधीत पायाभूत सुविधा आणि आवर्ती खर्च उभारण्यामध्ये योगदान देण्यासाठी US$ 27 दशलक्षचे योगदान दिले आहे.
 5. ISA 121 सदस्य देशांमधील सौर ऊर्जा प्रकल्पांना उभारण्यासाठी समन्वय साधणारा उपक्रम आहे. एक अंतरिम प्रशासकीय विभाग (Interim Administrative Cell -IAC) अस्तित्वात आल्यापासून ते अधिकृतरित्या ISA ची पूर्तता करण्यासाठी कार्यान्वयित करण्यात आले आहे. 
 6. भारतीय अपारंपरिक ऊर्जा विकास यंत्रणा (Indian Renewable Energy Development Agency) आणि भारतीय सौर ऊर्जा महामंडळ (Solar Energy Corporation of India) ने ISA कॉर्पस फंडमध्ये प्रत्येकी USD 1 दशलक्षचे योगदान दिलेले आहे. 
 7. 15 देशांकडून मंजूर केल्यानंतर, 6 डिसेंबर 2017 रोजी ‘आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA)’ कार्यचौकट कराराला लागू करण्यात आले. या कराराने ISA ला एक विधी संमत संधी आधारित आंतरराष्ट्रीय आंतर-शासकीय संघटना बनविले.
 8. आतापर्यंत 19 देशांनी याला स्वीकृती दिली आहे आणि 48 देशांनी ISA कार्यचौकट करारावर स्वाक्षर्‍या केल्या आहेत. एप्रिल 2018 पर्यंत ISA अंतर्गत 100 हून अधिक प्रकल्पांवर स्वाक्षर्‍या केल्या जाणार असल्याची घोषणा केली गेली आहे.
 9. भारताने वर्ष 2020 पर्यंत 175 GWU क्षमतेचे अक्षय ऊर्जा लक्ष्य ठेवलेले आहे. सौर प्रकल्पांसाठी भारत सरकारने $350 दशलक्षचा सौर विकास निधी स्थापित केला आहे.


ICC World Cricketer of the Year 2017 - Virat Kohli

 1. भारतीय कर्णधार विराट कोहलीसाठी वर्ष 2017 हे सर्वाधिक यशाचे ठरले आहे.
 2. ICC ने जाहीर केलेल्या पुरस्कारांमध्ये विराट कोहलीला सर्वाधिक सन्मान मिळाले आहेत.
 3. भारतीय कर्णधार विराट कोहलीने वर्ष 2017 साठी प्राप्त केलेले सन्मान:-  
  1. जागतिक क्रिकेटर ऑफ द इयर (सर गारफिल्ड सोबर्स करंडक)
  2. ICC एकदिवसीय (ODI) क्रिकेटर ऑफ द इयर
  3. वर्ष 2017 सालच्या ICC पुरुष कसोटी संघाचा कर्णधार
  4. वर्ष 2017 सालच्या ICC पुरुष एकदिवसीय संघाचा कर्णधार
  5. कोहली क्रिकेटर ऑफ द इयर (सर गारफिल्ड सोबर्स करंडक) जिंकणारा सलग दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. मागच्या वर्षी रविचंद्रन अश्विनने हा सन्मान मिळवला होता.
 4. कोहलीचे वर्ष 2017:-
  1. वर्ष 2017 मध्ये एकूण 26 सामन्यांमध्ये 76.84 च्या सरासरीने कोहलीने 1460 धावा केल्या. त्यात सहा शतकं आणि 7 अर्धशतकांचा समावेश आहे.
  2. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इंग्लंड, वेस्टइंडिज, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड संघाच्या विरोधात एकदिवसीय मालिका जिंकल्या गेल्या.
  3. कसोटीमध्ये बांग्लादेश, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांना पराभूत केले.
  4. कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात जागा मिळवली होती.
  5. ICC च्या फलंदाजीच्या क्रमवारीत 889 गुणांसह विराट कोहली पहिल्या स्थानावर आहे. 
 5. सर गारफील्ड सोबर्स करंडक:-
  1. सर गारफील्ड सोबर्स करंडक हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (ICC) दरवर्षी देण्यात येणारा क्रिकेट करंडक आहे.
  2. सर्वप्रथम हा पुरस्कार 2004 साली राहुल द्रविडला प्रदान करण्यात आला.

ICC पुरस्कार

 1. ICC कसोटी क्रिकेटर ऑफ द इयर - स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलियाचा कर्णधार)
 2. ICC उदयोन्मुख क्रिकेटर ऑफ द इयर - हसन अली (पाकिस्तान)
 3. ICC सहकारी क्रिकेटर ऑफ द इयर - रशीद खान (अफगाणिस्तान)
 4. ICC टी-20 आंतरराष्ट्रीय परफॉर्मंस ऑफ द इयर - युजवेंद्र चहल
 5. ICC अंपायर ऑफ द इयर (डेव्हिड शेफर्ड ट्रॉफी) - मरीस इरासमुस
 6. ICC स्पिरीट ऑफ क्रिकेट - अॅन्या शृबसोल (इंग्लंड)
 7. ICC फॅन्स मोमेंट ऑफ द इयर – पाकिस्तानने भारताचा पराभव करून ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 जिंकली


Former Gujarat Chief Minister Anandiben Patel Appointed as Madhya Pradesh Governor

 1. गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांची मध्यप्रदेशच्या राज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
 2. पटेल यांची ही नियुक्ती गुजरातचे राज्यपाल ओम प्रकाश कोहली यांच्याजागी करण्यात येत आहे.
 3. कोहली यांच्याकडे मध्यप्रदेशच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त भार होता.
 4. 76 वर्षीय आनंदीबेन पटेल 1987 साली भारतीय जनता पक्षात (भाजप) समावेश केला आणि 1994 साली त्यांची राज्यसभेत निवड झाली.
 5. त्या 1991 साली मंडल (बेचराजी जिल्हा) मतदारसंघातून पहिल्यांदा राज्य विधानसभेवर निवडून आल्या.
 6. त्यानंतर 2007 साली उत्तर गुजरातच्या पाटण आणि 2012 साली अहमदाबाद शहरातील घाटलोडिया मतदारसंघातून जिंकून आल्या.
 7. त्या गुजरातच्या प्रथम महिला मुख्यमंत्री ठरल्या आहेत.


Nirmala Sitharaman is the first woman Defense Minister to travel to Sukhoi

 1. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी एक विक्रम आपल्या नावे केला आहे.
 2. जोधपूर येथील विमानतळावरून सुखोई-३० या लढाऊ विमानातून प्रवास करणाऱ्या त्या देशातील पहिल्या संरक्षणमंत्री ठरल्या आहेत.
 3. यापूर्वी २५ नोव्हेंबर २००९ मध्ये तिन्ही दलांच्या प्रमुख या नात्याने तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी पुण्यातून सुखाईतून प्रवास केला होता.
 4. सुखोई हे वायू दलातील सर्वोत्कृष्ट लढाऊ विमान मानले जाते.
 5. काही दिवसांपूर्वीच सीतारामन यांनी गोवा येथे नौदलातील सर्वांत मोठी युद्धनौका आयएनएस विक्रमादित्यची पाहणी केली होती.
 6. संरक्षण मंत्री झाल्यापासून सीतारामन यांचा सैन्यदलातील विविध कार्यप्रणाली आणि तयारीबाबत जाणून घेण्याकडे कल असल्याचे दिसून येते.
 7. सुखोईतून उड्डाण करण्यापूर्वी त्यांनी वायू दलाच्या जवानांबरोबर चर्चाही केली.
 8. यापूर्वी त्यांनी याच महिन्यात गोव्यातील भारतीय नौदलाच्या कॅम्पवर एक दिवस व्यतीत केला होता.


Nadaf Ejazal of Nanded National Child Shure Award

 1. नांदेड जिल्हय़ाच्या अर्धापूर तालुक्यातील पार्डी (मक्ता) येथील नदाफ एजाझ अब्दुल रौफ याला यंदाचा राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार  जाहीर झाला.
 2. यंदा देशातील १८ बालकांना राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
 3. यामध्ये महाराष्ट्रातील नदाफ एजाझ अब्दुल रौफचा समावेश आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २४ जानेवारी २०१८ रोजी या शूरवीर बालकांना गौरविले जाईल.
 4. नांदेड जिल्हय़ातील पार्डी (मक्ता) येथील एजाझने धाडस दाखवून दोन मुलींना तलावात बुडण्यापासून वाचविले होते. त्याने दाखविलेल्या साहसाची नोंद घेत त्याला हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
 5. प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी ला राजपथावर होणाऱ्या पथसंचलनातही तो सहभागी होणार आहे.
 6. घडलेला प्रसंग:-
  1. ३० एप्रिल २०१७ रोजी पार्डी गावातील काही महिला व मुली येथील बंधाऱ्यावर कपडे धुन्यासाठी गेल्या असता त्यातील एका मुलीचा पाय घसरून ती तलावात पडली.
  2. तिला वाचविण्यासाठी तिच्या मैत्रिणीने पाण्यात उडी घेतली. मात्र, बंधाऱ्यात त्या दोघी बुडायला लागल्या. हे चित्र पाहून दोन अन्य मुलींनी बुडणाऱ्या मुलींना वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. पण त्यांनाही पोहता येत नव्हते.
  3. बुडणाऱ्या मुलींचा आवाज ऐकून लोक तलावावर मदतीसाठी गेले.
  4. या वेळी शेताकडे निघालेल्या इजाजने बंधाऱ्याजवळील लोकांचा जमाव बघत तिकडे धाव घेतली.
  5. त्याने प्रसंगवधान व धाडस दाखवून पाण्यात उडी घेतली. २० फूट खोल पाण्यात तो मुलींचा सतत शोध घेत राहिला व त्याने यातील तब्बसुम आणि आफरीन या दोन मुलींचे प्राण वाचवले.
  6. दुर्दैवाने यातील दोन मुलींचा मृत्यू झाला.
  7. इजाज हा पार्डी येथील राजाबाई हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यलय येथे दहावीत शिकत असून लष्करात रुजू होऊन देशाची सेवा कराण्याची त्याची इच्छा आहे.
राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार
 1. ७ मुली आणि ११ मुले अशा एकूण १८ बालकांना वर्ष २०१७च्या राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
 2. यामध्ये ३ बालकांना मरणोत्तर हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
 3. चार श्रेणींमध्ये देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे स्वरूप पदक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे आहे.
 4. पुरस्कारप्राप्त बालकांना भारतीय बालकल्याण परिषदेच्या वतीने शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत करण्यात येते.
 5. तसेच, वैद्यकशास्त्र आणि अभियांत्रिकीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना इंदिरा गांधी शिष्यवृत्तीअंतर्गत पदवी पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत दिली जाते.


Bollywood's 'Detective Nanny' is behind the scenes of the era

 1. शाहरुख खान, ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षित यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘देवदास’ या चित्रपटात शाहरुखच्या आजीची भूमिका साकारणाऱ्या अवा मुखर्जी यांचे निधन झाले.
 2. वयाच्या ८८व्या वर्षी मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
 3. चित्रपटसृष्टीत मोलाचे योगदान दिलेल्या अवा मुखर्जी यांच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूडमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
 4. चित्रपटांसोबतच त्यांनी जाहिराती आणि छोट्या पडद्यावरही मोलाचे योगदान दिले.
 5. अवा मुखर्जी यांनी १९६३ मध्ये एका बंगाली चित्रपटातून अभिनयातील कारकिर्दीला सुरुवात केली.
 6. तारु मुखर्जी दिग्दर्शित ‘राम ढाका’ या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
 7. त्यानंतर २००० मध्ये ‘स्निप’ या चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली होती. पुढे २००२ मध्ये अवा यांनी संजय लीला भन्साळी यांच्या ‘देवदास’ या चित्रपटात शाहरुखच्या आजीची महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.
 8. राम गोपाल वर्मा यांच्या ‘डरना जरुरी है’ या चित्रपटातही त्या झळकल्या होत्या.
 9. २००९ मध्ये अवा यांची मुलगी रोमिला मुखर्जी दिग्दर्शित ‘डिटेक्टिव नानी’ या चित्रपटात त्या मुख्य भूमिकेत पाहायला मिळाल्या.
 10. अवा मुखर्जी यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये हळहळ व्यक्त केली जात असून सोशल मीडियावरही त्यांना अनेक कलाकारांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.


Top

Whoops, looks like something went wrong.