
1138 23-Nov-2018, Fri
- ब्रिटन आणि युरोपीय संघाने ब्रिटन संघामधून बाहेर पडल्यानंतर दोघांमधील व्यापार आणि आर्थिक संबंध कश्याप्रकारे असणार यांची स्पष्टता देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या घोषणापत्राचा मसुदा मान्य केला आहे.
- ‘ब्रेक्जिट’ प्रक्रियेमधून ग्रेटब्रिटन (UK) यूरोपीय संघातून (EU) बाहेर पडणार आहे.
- युरोपिय संघ हा 28 सदस्य राज्यांचा राजकीय आणि आर्थिक संघ आहे, जे प्रामुख्याने युरोप खंडात आहेत.
- युरोपिय संघाची स्थापना 1 नोव्हेंबर 1993 रोजी झाली आणि याचे मुख्यालय बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स येथे आहे.
- लिस्बन करारामधील कलम 50 लागू करीत ब्रिटन 29 मार्च2019 पर्यंत EU च्या आर्थिक विभागातून बाहेर पडणार आहे.
- ब्रिटन (ग्रेट ब्रिटन/यूनाइटेड किंगडम/यूके/बर्तानिया) हा युरोप खंडाच्या वायव्येकडे असलेला एक संयुक्त बेटराष्ट्र आहे.
- ज्यामध्ये स्कॉटलँड, वेल्स आणि इंग्लंड तसेच उत्तर आयरलँड या प्रदेशांचा समावेश आहे.
- लंडन हे राजधानी शहर आहे आणि पाउण्ड स्टर्लिंग (GBP) हे अधिकृत चलन आहे.