The 22nd Asian Harmonization Working Party (AHWP) Conference in Delhi starts

 1. आरोग्य व कुटुंब कल्‍याण राज्‍यमंत्री अनुप्रिया पटेल यांच्या हस्ते 5 डिसेंबर 2017 रोजी नवी दिल्‍लीत 22 व्या ‘एशियन हर्मोनायझेशन वर्किंग पार्टी (AHWP)’ परिषदेला सुरुवात करण्यात आली आहे.
 2. 5 दिवस चालणार्‍या या परिषदेचे आयोजन मंत्रालयाच्या सहकार्याने केंद्रीय औषधी मानक नियंत्रण संघटना (CDSCO) आणि राष्‍ट्रीय औषधी नियामक प्राधिकरण (NDRA) द्वारा केले गेले आहे.
 3. या कार्यक्रमाचा मुख्‍य उद्देश्‍य आशिया आणि त्याबाहेरील क्षेत्रात वैद्यकीय उपकरणांच्या नियमनाच्या एककेंद्राभिमुखता आणि एकरूपता यासाठी दृष्टीकोन विकसित करण्याहेतू शिफारसी देणे आणि नियामक व या उद्योगांमध्ये ज्ञान व तज्ञांचे आदान-प्रदान करण्यामध्ये सुविधा प्रदान करणे हा आहे.
 4. 30 सदस्‍य देश आणि औद्योगिक सदस्यांच्या राष्‍ट्रीय नियामकांच्या ‘एशियन हार्मोनायजेशन वर्किंग पार्टी (AHWP)’ ची स्थापना सन 1999 मध्ये ना-नफा संस्थेच्या रूपात केली गेली होती.
 5. याचा उद्देश्‍य आंतरराष्‍ट्रीय वैद्यकीय उपकरण नियामकांचा मंच (IMDRF) द्वारा तयार कलेल्या दिशानिर्देशाखाली आशिया आणि अन्‍य क्षेत्रामध्ये उपकरणांच्या नियमनावर नियामक एकरूपतेला प्रोत्साहन देणे हा आहे.


Start the process of river linking project

छत्तीसगड शासनाने नदी जोडणी प्रकल्पाच्या प्रक्रियेला सुरुवात केली

छत्तीसगड शासनाच्या जलस्त्रोत विभागाने सिंचन सुविधेचा विस्तार करण्यासाठी राज्यातील नदी जोडणी प्रकल्पाच्या प्रक्रियेस सुरुवात केली आहे.

प्राथमिक टप्प्यात त्यासंबंधी आंतर-जोडणी प्रकल्प बनविण्यात आला आहे आणि सर्वेक्षणाचे कार्य केले जात आहे.

 1. महानदी-तांदुला,
 2. पैरी-महानदी,
 3. रेहर-अटेम,
 4. अहिरन-खारंग आणि
 5. हसदेव-केवई नदी जोडणी प्रकल्पांचा समावेश आहे.

जलसंपदा मंत्रालयाकडून तयार केलेल्या राष्ट्रीय दृष्टीकोन योजना (National Perspective Plan -NPP) अंतर्गत, NWDA कडून हिमालयीन नद्यांचे घटक अंतर्गत 14 आणि द्वीपकल्पाच्या नद्यांचे घटक अंतर्गत 16 आंतर-जोडणी प्रकल्पांना ओळखले गेले आहे.

याच पार्श्वभूमीवर राज्य प्रकल्प राबविण्यात येत आहे.


RBI keeps key interest rates at 6%

 1. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या नव्या अहवालानुसार, त्यांचे मुख्य व्याजदर 6% वर कायम राखले जाणार आहे.
 2. RBI गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या नेतृत्वाखालील सहा सदस्यीय मौद्रिक धोरण समितीने चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या आणि चौथ्या तिमाहीत महागाई अंदाज 4.3-4.7% पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
 3. विक्रीकेंद्र यंत्रणेच्या वापराने व्यापार्‍यांचे जाळे वाढविण्याच्या उद्देशाने व्यापारी सवलती दर देखील तर्कसंगत करण्याचा निर्णय घेतला गेला.
 4. भारतीय रिझर्व बँक (RBI) ही भारतातील केंद्रीय बँकिंग संस्था आहे, जी भारतीय रुपया चलनाचे आर्थिक धोरण नियंत्रित करते.
 5. भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934 च्या उपबंधानुसार ब्रिटिश राजवटीत संस्थेचे 1 एप्रिल 1935 पासून कार्य सुरू झाले.
 6. मूळ भागभांडवलाची प्रत्येकी 100 समभागामध्ये विभागणी झालेली आहे, जे की सुरुवातीला खाजगी भागधारकांच्या पूर्णपणे मालकीचे होते.
 7. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताच्या स्वातंत्र्यानंतर, RBI चे 1 जानेवारी 1949 रोजी राष्ट्रीयीकरण करण्यात आले.


India won the South Asian Badminton Championship for the first time

गुवाहाटी (आसाम) मध्ये खेळल्या गेलेल्या ‘दक्षिण आशियाई बॅडमिंटन स्पर्धा 2017’ च्या भारतीय संघाने सांघिक विजेतेपद मिळविले आहे.

यासोबतच भारताने नेपाळचा पराभव करत आपले पहिले दक्षिण आशियाई क्षेत्रीय बॅडमिंटन अजिंक्यपद जिंकले आहे.

त्यात

 1. आर्यमान टंडन (मुलांचा एकल गट),
 2. अश्मिता चालीहा (मुलींचा एकल गट),
 3. अर्निताप दासगुप्ता
 4. कृष्ण प्रसाद जी. (मुलांचा दुहेरी गट)

यांनी स्पर्धेच्या तीनही गटात विजेतेपद जिंकले.


Top

Whoops, looks like something went wrong.