"#startuplink": India and the Netherlands startup initiative

 1. स्टार्टअप क्षेत्रात अभिनवता व उद्योजकता यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने इन्‍वेस्‍ट इंडिया (वाणिज्‍य व उद्योग मंत्रालयांतर्गत स्‍टार्टअप इंडियाचे यजमान) आणि नेदरलँड्स सरकार 25 मे 2018 रोजी बेंगळूरूमध्ये “#स्टार्टअपलिंक” (#StartUpLink) या नव्या स्टार्टअप पुढाकाराचा शुभारंभ करणार आहेत.
 2. त्यापूर्वी, या पुढाकाराच्या ‘क्‍लीन एयर’ इंडिया रिंग या महत्त्वाच्या घटकाचा शुभारंभ 24 मे 2018 रोजी नवी दिल्लीत करण्यात आला आहे.
 3. नेदरलँड्सचे (डच) पंतप्रधान मार्क रूट यांच्या आगामी भारत दौर्‍यादरम्यान या पुढाकाराचे उद्घाटन केले जात आहे.
 4. दोन्ही देशांमध्ये सर्व क्षेत्रात संबंधांना वाढविण्याच्या उद्देशाने पंतप्रधान मार्क रूट यांच्या नेतृत्वात 220 जणांचे एक व्‍यापार प्रतिनिधी मंडळ देखील येणार आहे, जे की भारतात आतापर्यंतची सर्वात मोठा व्‍यापार मोहीम ठरणार आहे.
 5. नेदरलँड्स हा पश्चिम युरोप खंडातला एक देश आहे. ‎
 6. अ‍ॅमस्टरडॅम हे राजधानी शहर आहे.
 7. डच ही देशाची अधिकृत भाषा ‎आहे.
 8. युरो हे राष्ट्रीय चलन आहे.


Nipah virus: its origin, symptoms and outbreaks

 1. केरळमधील कोझिकोड शहरात 'निपाह' या भयानक विषाणूची लागण झाल्याने अलीकडेच तिघा जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, आणखी 25 जणांच्या रक्ताच्या तपासणीमध्ये हा विषाणू असल्याचे निष्पन्न झाले आहे.
 2. केरळमध्ये प्रथमच निपाह विषाणू पसरल्याची माहिती समोर आली आहे. केरळच्या कोझीकोड आणि मालापूरमध्ये या आजाराचा सर्वाधिक प्रार्दुभाव दिसतोय. अत्यंत दुर्मिळ अशा निपाहच्या विषाणूंच्या संसर्गामुळे हा आजार भारतात आपले पाय पसरत आहे.
 3. निपाहच्या विषाणूचा संसर्ग झाल्याचे पुण्यातील राष्ट्रीय संशोधन संस्थेने रक्ताच्या तपासणीनंतर पुष्टी केली आहे. दरम्यान, केरळमध्ये आरोग्य विभागाने हाय अलर्ट जाहीर केला आहे.
 4. केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी डॉक्टरांची एक उच्चस्तरीय समिती नेमली असून तात्काळ हे पथक केरळला रवाना करण्यात आले आहे.
 5. आजाराची लक्षणे:-
  1. निपाह विषाणूचा संसर्ग झाल्याने त्या व्यक्तीच्या मेंदूला सूज येते. ताप येणे, डोकेदुखी, उलट्या होणे आणि चक्कर येणे ही या आजाराची लक्षणे आहेत.
  2. योग्य वेळेत उपचार न झाल्यास रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो.
  3. हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनाही होऊ शकतो.
  4. या विषाणूपासून बचाव करण्यासाठी ‘रिबावायरिन’ नावाच्या औषधाचा वापर करण्यात येत आहे.
  5. निपाह विषाणुवर अद्यापपर्यंत प्राणी किंवा मानवांसाठी प्रभावी लस उपलब्ध नाही.
 6. निपाह विषाणू:-
  1. जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO) निपाह विषाणू हा वटवाघुळामुळे फळाफुलांच्या माध्यमातून मनुष्य आणि जनावरांमध्ये पसरतो.
  2. 1998 साली मलेशियातील कांपुंग सुंगई निपाह परिसरातून या विषाणुबाबतची प्रकरणे समोर आली होती.
  3. यामुळे या विषाणूला 'निपाह' असे नाव देण्यात आले.
  4. सर्वात आधी डुकरांमध्ये याचा परिणाम पाहायला मिळाला होता.
  5. 2004 साली बांग्लादेशात हा विषाणू मोठ्या प्रमाणात पसरला होता. त्यानंतर तो माणसांपर्यंत पोहोचला.
  6. 2004 साली देखील बांग्लादेशमध्ये या विषाणूच्या संसर्गाचा उद्रेक झाला होता.


 Citizenship (Amendment) Bill, 2013: Prohibition from three North Eastern states

 1. भारत सरकारच्या ‘नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक-2016’ याचा ईशान्येकडील अरुणाचल प्रदेश, मिझोराम आणि नागालँड या तीन राज्यांकडून निषेध केला गेला आहे.
 2. या राज्यांमधील विद्यार्थी संघांच्या सर्वोच्च संघटनांकडून आपापल्या राज्यात या प्रस्तावित विधेयकाला तात्काळ मागे घेण्याची मागणी केली जात आहे.
 3. मुद्दा काय आहे?
  1. 1955 सालच्या कायद्यानुसार, कोणत्याही ‘अवैध स्थलांतरित’ व्यक्तीला भारतीय नागरिकत्व दिली जाऊ शकत नाही. या कायद्यांतर्गत ‘अवैध स्थलांतरित’ याच्या व्याख्येत दोन प्रकारचे लोक येतात. पहिले म्हणजे ते परदेशी जे विना वैध पारपत्र (पासपोर्ट) किंवा अन्य आवश्यक दस्तऐवजांशिवाय भारतात दाखल झाले आहेत आणि दुसरे ते परदेशी जे व्हिसाची मुदत संपल्यानंतर देखील भारतात आहेत.
  2. नागरिकत्व अधिनियम-1955 मध्ये दुरुस्तीसाठी लोकसभेत ‘नागरिकत्व (दुरूस्ती) विधेयक-2016’ मांडले गेले.
  3. या विधेयकाचा उद्देश म्हणजे भारतात 6 वर्ष वास्तव्य केल्यानंतर अफगाणिस्तान, बांग्लादेश आणि पाकिस्तान या देशांमधून अवैध स्थलांतरित हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन समुदायांच्या लोकांना भारताच्या नागरिकत्वासाठी पात्र ठरवणे, हा आहे.
 4. विधेयकाची वैशिष्ट्ये:-
  1. जुलैमध्ये मांडल्या गेलेल्या दुरूस्ती विधेयकात ‘अवैध स्थलांतरित’ याच्या व्याख्येत बदल करत असे म्हटले गेले आहे की अफगाणिस्तान, बांग्लादेश आणि पाकिस्तान या देशांमधून अवैध स्थलांतरित हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन समुदायांच्या लोकांना ‘अवैध स्थलांतरित’ मानले जाणार नाही.
  2. ज्या लोकांचा नवा विधेयक ‘अवैध स्थलांतरित’च्या व्याख्येत समावेश होत नाही, अश्या लोकांना देशीकरणाच्या (naturalisation) माध्यमातून भारतीय नागरिकत्व प्राप्त करण्यामध्ये सूट दिली जाते.
  3. जुन्या कायद्यान्वये या प्रक्रियेमधून नागरिकत्वासाठी अर्ज तेव्हाच केला जाऊ शकतो जेव्हा एखादी परदेशी व्यक्ती 12 वर्षांपासून भारतात वास्तव्य करीत असेल, मात्र नव्या विधेयकात ही काळमर्यादा तीन देशांच्या निश्चित सहा धर्माशी संबंधीत लोकांसाठी कमी केली गेली असून ती केवळ सहा वर्षे इतकी केली आहे.
  4. विधेयकानुसार समुद्रापलीकडील भारतीय नागरीक (OCI) कार्डधारकांची नोंदणी कोणत्याही कायद्याचे उल्लंघन झाल्यास रद्द केली जाऊ शकते.
  5. उदा. पार्किंग क्षेत्र नसलेल्या ठिकाणी पार्किंग करणे अश्या क्षुल्लक करणांसारख्या कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल OCI नोंदणी रद्द करण्यास परवानगी देते.


 Complaint to the WTO of India against steel and aluminum prices against the US

 1. अमेरिकाने देशातील पोलाद व अॅल्युमिनियम उत्पादनांच्या आयातीवर लादलेल्या अतिरिक्त शुल्काच्या प्रकरणाबाबत भारताने जागतिक व्यापार संघटना (WTO) याच्या तंटा निवारण समितीकडे अमेरिकेच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
 2. अमेरिकाकडून शुल्क आकारणे जागतिक व्यापार नियमांच्या अनुकूल नाहीत. त्यामुळे हा वाद सोडविण्यासाठी WTO ची मध्यस्थी होणे भाग आहे. 
 3. अमेरिकाने मार्च-18 मध्ये पोलाद व अॅल्युमिनियम उत्पादनांच्या आयातीवर लादलेल्या अनुक्रमे 25% आणि 10% शुल्कामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून भारत, चीन, रशिया, जपान, टर्की आणि युरोपीय संघ वार्षिक USD 3.5 दशलक्षचा एकत्र दावा केला आहे.
 4. जागतिक व्यापार संघटना (WTO) ही आंतरशासकीय संघटना आहे, जी आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियमन करते. 
 5. याचे मुख्यालय जिनेव्हा (स्वित्झर्लंड) येथे आहे आणि याचे 164 देश सभासद आहेत.
 6. 1948 साली लागू झालेल्या दर व व्यापार संदर्भात सर्वसाधारण करार (General Agreement on Tariffs and Trade -GATT) याला बदली करून 15 एप्रिल 1994 रोजी 123 राष्ट्रांनी स्वीकारलेल्या मार्राकेश करारांतर्गत WTO अधिकृतपणे 1 जानेवारी 1995 रोजी कार्यरत झाले.


Top

Whoops, looks like something went wrong.