ROBOCOP IN KERALA

 1. देशातील पहिला रोबोट पोलीस अर्थात रोबो-कॉप ‘केपी-बॉट’ केरळ पोलिसांच्या सेवेत दाखल झाला आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी त्रिवेंद्रम पोलीस मुख्यालयात देशातील पहिला मानवी रोबो पोलिस ‘केपी-बॉट’चे उद्घाटन केले

 2. केपी-बॉटला पोलीस उपनिरीक्षकाचा दर्जा देण्यात आला असून तो पोलीस मुख्यालयाच्या मुख्य कार्यालयासमोर उभा राहून ड्युटी करणार आहे.

 3. पोलीस कर्मचाऱ्याचे मानवी रुप असलेला हा रोबो एका पोलीस कर्मचाऱ्याच्या जागी काम करणार आहे. तो पोलीस मुख्यालयात आलेल्या लोकांचे स्वागत करेन आणि त्यांच्या गरजेनुसार त्यांना निश्चित कार्यालयात जाण्याचे मार्गही सांगेल.

 4. पोलिसांच्या कामकाजामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करण्यात भारतीय राज्यांचे नेतृत्त्व करणारे केरळ पोलीस मानवी रोबोच्या वापराने ऐतिहासिक कामगिरी करत आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री विजयन उद्घाटनानंतर म्हणाले.

 5. केपी-बॉट हा भारतातील पहिला ह्यूमनॉइड, तर जगातील चौथा रोबो आहे. डेटा गोळा करणे, तसेच पोलिसांच्या कामगिरीत सुधारणा घडवून आणणे ही कामे केपी-बॉट करणार आहे.


ICC BAN ON ANSARI

 1. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसीसंयुक्त अरब अमिरातीमधील प्रशिक्षक इरफान अन्सारी यांच्यावर 10 वर्षांची बंदी घातली आहे. 2017मध्ये पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदशी ‘भ्रष्ट इराद्यानेच’ संपर्क साधल्यामुळे ते दोषी सापडले आहेत.

 2. आयसीसी’च्या लाचलुचपत प्रतिबंधक लवादासमोर झालेल्या सुनावणीत अन्सारी दोषी आढळले आहेत. संयुक्त अरब अमिरातीमधील स्थानिक क्रिकेटमध्ये सहभागी झालेल्या दोन संघांचे ते प्रशिक्षक असतानाही त्यांनी अशा प्रकारचे कृत्य दोनदा केले आहे. त्यामुळे एकंदर तीनदा त्यांनी नियमांचा भंग केला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 3. ‘सर्फराज अहमदने आपली नेतृत्वक्षमता आणि व्यावसायिकता दाखवताना त्वरित ‘आयसीसी’ला या घटनेची माहिती दिली. त्याने त्यांचा प्रस्ताव नाकारला आणि त्याची तक्रारसुद्धा दिली,’अशी माहिती ‘आयसीसी’ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महाव्यवस्थापक अ‍ॅलेक्स मार्शल यांनी दिली. सर्फराजने ‘आयसीसी’ची चौकशी आणि लवादाला साहाय्य केले.


MUMBAI AIRPORT

 1. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला उत्कृष्ट पायाभूत सुविधांसाठी पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. दिल्लीत नुकत्याच झालेल्या जागतिक पुरस्कार सोहळ्यात या पुरस्काराने विमानतळाला गौरवण्यात आले.

 2. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल 2 च्या इमारतीच्या निर्मितीबाबत हा पुरस्कार देण्यात आला आहे. नवी दिल्लीत झालेल्या ‘ईपीएस वर्ल्ड’ परिषदेत मुंबई विमानतळाला हा पुरस्कार मिळाला.

 3. 2014 मध्ये विमानतळावर नवीन टर्मिनल 2 इमारत बांधण्यात आली असून त्यासाठी 98 अब्ज रुपये खर्च करण्यात आले आहेत. 12 हजार कर्मचारी येथे कार्यरत आहेत. वर्षभरात 4 कोटी प्रवासी वापर करू शकतील अशा प्रकारे या टर्मिनलची रचना करण्यात आली आहे.

 4. टर्मिनलमध्ये प्रवेश केल्यानंतर एकाच छताखाली आंतरराष्ट्रीय व बहुसंख्य देशांतर्गत उड्डाणांच्या प्रवाशांसाठी येथे सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे प्रवाशांना पायपीट करण्याची गरज भासत नाही.

 5. हवाई प्रवाशांसाठी लागणाऱ्या विविध सेवांचे एकत्रीकरण करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय टाळणे शक्य झाले आहे. त्यामुळेच टर्मिनल 2च्या इमारतीचे बांधकाम हे देशातील विविध सार्वजनिक उपयोगांच्या प्रकल्पांमधील सर्वोत्तम बांधकाम ठरले आहे.


DR KALSHETTY

 1. महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांची सांगलीच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली. त्यांच्या जागी कोल्हापूर महापालिका आयुक्तपदी नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची नियुक्ती झाली. नूतन आयुक्त डॉ. कलशेट्टी 25 फेब्रुवारी रोजी पदभार स्वीकारणार आहेत.

 2. पालिकेची सभा सुरू असतानाच दुपारी आयुक्त डॉ. चौधरी यांना सांगली जिल्हाधिकारीपदी बदली झाल्याचा नगरविकास विभागाकडून ई-मेलवरून आदेश आला. आयुक्तांच्या बदलीची बातमी महापालिका वर्तुळात पसरली. याचा महासभेवरही परिणाम झाला.

 3. थेट पाईपलाईवरून तापलेले वातावरण काहीसे निवळले. सभा संपल्यानंतर महापौर सरिता मारे यांच्यासह पदाधिकारी व नगरसेवकांनी पुष्पगुच्छ देऊन डॉ. चौधरी यांना शुभेच्छा दिल्या.

 4. आयुक्त चौधरी यांनी सावित्रीबाई फुले रुग्णालयाचे रुपडे पालटले. शासनाकडून या रुग्णालयात महात्मा फुले आरोग्य योजना लागू करून घेतली. चौधरी यांच्या कारकीर्दीतले हे सर्वांत महत्त्वाचे काम होय.

 5. झीरो पेंडन्सी उपक्रम राबवून प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्याचा यशस्वी प्रयोग केला. कडक शिस्तीसाठी डॉ. चौधरी परिचित होते.

 6. नूतन आयुक्त डॉ. कलशेट्टी शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत. त्यांनी यापूर्वी खेड व सातारा येथे गटविकास अधिकारी, सांगली जिल्हा परिषदेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मंत्रालयात उपसचिव, यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशा विविध पदांवर काम केले आहे.


DIN VISHESH

 1. 21 फेब्रुवारी हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन‘ म्हणून पाळला जातो.

 2. वैज्ञानिक डॉ. शांतिस्वरुप भटनागर यांचा जन्म 21 फेब्रुवारी 1894 मध्ये झाला.


Top

Whoops, looks like something went wrong.