Recognition for the implementation of the 'Prime Minister Research Scholar (PMRF)' scheme

 1. केंद्रीय मंत्रिमंडळाने ’प्रधानमंत्री संशोधन शास्त्री (Prime Minister Research Fellows -PMRF)’ योजना देशात राबविण्यास मान्यता दिली आहे.
 2. योजनेच्या अंमलबजावणीसाठी वर्ष 2018-19 पासून 7 वर्षांच्या कालावधीसाठी 1650 कोटी रूपयांच्या एकूण खर्चाची तरतूद करण्यास देखील मान्यता दिली.
 3. वर्ष 2018-19 पासून तीन वर्षांमध्ये कमाल 3000 शास्त्रींची निवड केली जाणार आहे. 
 4. संशोधकांना फेलोशिप (संशोधन शिष्यवृत्ती) प्रदान करून देशात अभिनवतेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रधानमंत्री संशोधन शास्त्री (PMRF) योजनेंतर्गत IISc/IIT/NIT/IISER/ IIIT मधून विज्ञान व तंत्रज्ञान विषयांमध्ये बी.टेक. अथवा एकीकृत एम.टेक. अथवा MSc पदवी प्राप्त करणार्‍याला अथवा अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात असलेल्या सर्वोत्‍तम विद्यार्थ्यांना IIT/IISc मध्ये PhD कार्यक्रमामध्ये थेट प्रवेश दिले जाणार आहे.
 5. त्यांना प्रथम 2 वर्षांसाठी मासिक 70,000 रूपये, तिसर्‍या वर्षी मासिक 75,000 रूपये तर चौथ्या व पाचव्या वर्षी मासिक 80,000 रूपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.


Planning to increase crude oil refining capacity by 77% by 2030: India

 1. मागणीची पूर्तता आणि आर्थिक वृद्धीकरणाच्या दृष्टीने, भारत सरकारने 2030 सालापर्यंत कच्चे तेल शुद्धीकरण क्षमता 77% नी वाढवून 438.65 मेट्रिक टन (MT) पर्यंत वाढवण्याची योजना आखलेली आहे.
 2. याबाबतीत रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रोसनेफ्टच्या एस्सार ऑईल कंपनीचा यामध्ये मोठा वाटा असणार आहे. 
 3. एकूणच सध्याची परिस्थिती:-
  1. भारत हा जगातला तिसर्‍या क्रमांकाचा सर्वात मोठा तेल ग्राहक असून, आपल्या एकूण ऊर्जा गरजांपैकी 80% तेल आयात करतो आणि मागणीत वाढ करण्याच्या दिशेने पुढे वाटचाल करत आहे. 
  2. देशाची कच्चे तेल इंधनामध्ये बदलण्याची क्षमता वार्षिक 247.6 MT इतकी आहे. या प्रमाणात वाढ झाल्यास ही क्षमता 2025 सालापर्यंत 414.35 MT आणि 2030 सालापर्यंत 438.65 MT पर्यंत वाढेल. 
  3. वर्तमान तेलशुद्धीकरण क्षमता वर्ष 2016-17 मध्ये 193.74 MT सह मागणीपेक्षा अधिक आहे, परंतु आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या (IEA) अंदाजानुसार ही मागणी 2040 सालापर्यंत 458MT होईल.
कच्चे तेल शुद्धीकरण भविष्यातील योजना
 1. निर्यातच्या दृष्टीने, रिलायन्स इंडस्ट्रीजची सध्याची 33 MT क्षमता 63 MT पर्यंत वाढविण्याची योजना आहे. 
 2. शिवाय एस्सार ऑईलची गुजरातमधील वाडीनार रिफायनरीची क्षमता 20 MT वरून 45 MT करण्याची योजना आहे. 
 3. IOC गुजरात, पानीपत, पारादीप आणि चेन्नई येथील प्रकल्पाचे विस्तारीकरण करून 80.7 MT वरून 116.55 MT क्षमता वाढविण्याची योजना आखत आहे. 
 4. महाराष्ट्रात पश्चिमी किनारपट्टीवर 60 MT क्षमतेचा तेलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याची, HPCL-ONGC समूहाची वर्तमान 20 MT वरून 42.2 MT क्षमता आणि BPCL ची वर्तमान 36.5 MT वरून 56 MT क्षमता करण्याची योजना आहे.


Play India Sports Games Haryana with 38 gold medals

 1. प्रथम ‘खेलो इंडिया शालेय’ खेळांमध्ये हरियाणा राज्यातील खेळाडूंनी 38 सुवर्णपदकांसह एकूण 102 पदके जिंकून पदकतालिकेत प्रथम स्थान पटकावले आहे.
 2. हरियाणाने 38 सुवर्ण, 26 रौप्य आणि 38 कांस्य पदकांची कमाई केलेली आहे.
 3. त्यानंतर पदकतालिकेत महाराष्ट्राने 111 पदकांसह दुसर्‍या स्थानी तर दिल्लीने 94 पदकांसह तिसरे स्थान पटकावले.
 4. महाराष्ट्राने 36 सुवर्ण, 32 रौप्य आणि 42 कांस्य पदके जिंकलीत.
 5. हरियाणाच्या मुलींच्या हॉकी संघाने झारखंडचा पराभव करून सुवर्णपदकांची कमाई केली. 
खेलो इंडिया
 1. एप्रिल 2016 मध्ये भारत सरकारने देशात क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी ‘खेलो इंडिया’ ही नवीन योजना सुरू केली होती.
 2. समाजाच्या अगदी तळ पातळीवर बदल करून राष्ट्रव्यापी क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जानेवारी-फेब्रुवारी 2018 मध्ये ‘खेलो इंडिया शालेय खेळ’ याच्या प्रथम संस्करणाचे आयोजन करण्यात आले.
 3. स्पर्धांमधून निवडण्यात येणार्‍या सर्वश्रेष्ठ प्रतिभावंत खेळाडूंना आठ वर्षापर्यंत दरवर्षी प्रत्येकी पाच लक्ष रुपये शिष्यवृत्ती प्रदान केली जाणार, जी 1000 उदयोन्मुख खेळाडूंसाठी निश्चित करण्यात आलेली आहे.
 4. वर्षागणीक खेळाडूंना ‘खेलो इंडिया’ अंतर्गत जोडण्यात येणार आहे.


The RBI will be introducing the base rate with MCLR from 1st April

 1. भारतीय रिजर्व्ह बँकेने बेस रेट (आधारभूत दर) ला वर्तमान ‘मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट (MCLR)’ सोबत संलग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.
 2. हा निर्णय 1 एप्रिल 2018 पासून लागू असणार आहे.
 3. या निर्णयामुळे पुढे ग्राहकांसाठी बँकांकडून स्वनिर्देशित व्याज दर लागू केल्या जाऊ शकणार नाहीत. या निर्णयामुळे चलनविषयक धोरणांच्या संकेतांचा लाभ अधिकाधीक लोकांना मिळणार आहे.
 4. मात्र, बेस रेटशी जुळलेल्या ग्राहकांना अधिक व्याज देय करावे लागणार आणि त्यांना मागील वर्षातील कमी दरांचा लाभ देखील मिळणार नाही. अजूनही अनेक ग्राहकांचे कर्ज बेस रेटशी संलग्न आहेत.
 5. वर्ष 2010 नंतर बँक बेस रेटच्या आधारावर कर्ज देत होती. वर्ष 2015 मध्ये RBI ने MCLR सिस्टम लागू केली.
 6. यामध्ये बँकांच्या कर्जाच्या संपूर्ण कालावधी दरम्यान वेगवेगळ्या व्याज दरावर कर्ज देण्याचा पर्याय दिला गेला.
 7. MCLR रेटमध्ये निश्चित कालावधीमध्ये बदल करता येऊ शकत नाही.
 8. मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट (कोषच्या सीमान्त खर्चावर व्याजदर -MCLR) म्हणजे बँकेचा सर्वात किमान  व्याजदर, ज्याखाली ते कर्ज देऊ शकत नाही, फक्त RBI ने परवानगी दिलेल्या काही प्रकरणांतच हे शक्य आहे.  


Top

Whoops, looks like something went wrong.