RBI has imposed a fine of Rs. 3 crores on Axis Bank and Rs. 2 crores to IOB

 1. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने अॅक्‍सिस बँक आणि इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) यांना एकूण 5 कोटी रूपयांचा दंड ठोठावला आहे.
 2. त्यात अॅक्सिस बँकेला 3 कोटी (30 दशलक्ष) रुपयांचा तर IOB ला 2 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
 3. RBI च्या उत्पन्न ओळख व मालमत्ता वर्गीकरण (IRAC) नियमांचे पालन न करण्याच्या कारणावरून हा दंड ठोठावला गेला आहे.
 4. अॅक्सिस बँकेने अकार्यक्षम मालमत्ता (NPA) वर्गीकरण संबंधी नियमांचे तर IOB ने KYC (नो युवर कस्टमर) संबंधी दिशानिर्देशकांचे उल्लंघन केलेले आहे.
 5. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI):-
 6. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ही भारतातील केंद्रीय बँकिंग संस्था आहे, जी भारतीय रुपया चलनाचे आर्थिक धोरण नियंत्रित करते.
 7. भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम, 1934 च्या उपबंधानुसार ब्रिटिश राजवटीत संस्थेचे 1 एप्रिल 1935 पासून कार्य सुरू झाले.
 8. मूळ भागभांडवलाची प्रत्येकी 100 समभागामध्ये विभागणी झालेली आहे, जे की सुरुवातीला खाजगी भागधारकांच्या पूर्णपणे मालकीचे होते.
 9. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताच्या स्वातंत्र्यानंतर, RBI चे 1 जानेवारी 1949 रोजी राष्ट्रीयीकरण करण्यात आले.


Indian researchers developed the combustible electromagnet 'AgCuTe' compounds

 1. भारतीय संशोधकांनी 25-425 डिग्री सेल्सियस या तपमान वर्गात कमकुवत उष्मावाहकतेचे प्रदर्शन करणारा, परंतु चांगली विद्युत वाहकता दर्शविणारे एक नवे संयुग विकसित केले आहे.
 2. बेंगळुरूच्या जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर अॅडव्हान्स सायंटिफिक रिसर्च (JNCASR) येथील डॉ. कनिष्का बिस्वास यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधकांच्या एका चमूने 'सिल्वर कॉपर टेल्युराइड (AgCuTe)' नामक उष्मारोधी विद्युतवाहक संयुग विकसित केले आहे.
 3. AgCuTe वाया जाणार्‍या उष्णतेला वीजेत रूपांतरित करण्यासाठी सक्षम ठरू शकते, असा दावा संशोधकांनी केला आहे. अश्या पदार्थाला ‘थर्मोइलेक्ट्रिक’ पदार्थ म्हणून शास्त्रीय भाषेत संबोधले जाते.
 4. हा पदार्थ कमकुवत उष्मावाहकता मात्र चांगली विद्युत वाहकता गुणधर्म दर्शवते.

AgCuTe बाबत

 1. सिल्वर कॉपर टेल्युराइड (AgCuTe) मधील चांदीचे (silver) अणू कमकुवत उष्णता वाहकता दर्शवते. उच्च तपमानात, तांब्याची (copper) उष्णता वाहकता आणखी कमकुवत होते.
 2. यामुळे या संयुगाला काचेचे (जवळपास) गुणधर्म प्राप्त होते. टेल्युरियम पदार्थ हा उत्तम विद्युत वाहक पदार्थ आहे, जो की धातूचे गुणधर्म प्रदान करतो.
 3. उष्माचे वीजेमध्ये रूपांतरित करण्याची या नव्या संयुगाची कार्यक्षमता 14% एवढी गणली गेली आहे.
 4. शोधाचे महत्त्व:-
  1. जवळजवळ 65% वापरात येणारी ऊर्जा उष्णतेच्या स्वरुपात वाया जाते म्हणून, काच आणि धातू यांच्यासारखी गुणधर्मे असलेल्या पदार्थाच्या विकासावर जगभरातील संशोधक प्रयत्नशील आहेत.
  2. थर्मोइलेक्ट्रिक तंत्रज्ञानाची ऑटोमोबाइल उद्योगांमध्ये सर्वाधिक उपयोगिता दिसून आलेली आहे. शिवाय रसायन, औष्णिक आणि पोलाद, वीजनिर्मिती केंद्रे या ठिकाणी मोठ्या प्रमाणातील उष्णता वाया घालवतात, तेथेही याचा वीजनिर्मितीसाठी उपयोग केला जाऊ शकतो.


RBI has tightened the priority sector loans (PSL) rules for foreign banks

 1. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने परकीय बँकांसाठी प्राधान्य क्षेत्रातील कर्जे (PSL) या संदर्भात नियमांना आणखी कडक केले आहेत.
 2. देशभरातली परकीय बँकांच्या 20 आणि त्याहून अधिक शाखांना याबाबत सूचित करण्यात आले आहे.
 3. नव्या नियमांनुसार:-
  1. परकीय बँकांना उप-लक्ष्य तयार करणे बंधनकारक आहे, जेणेकरून ते एप्रिल 2020 पासून त्यांच्या एकूण कर्जपुरावठ्याचा 40% भाग कृषी, ग्रामीण पायाभूत सुविधा आणि MSMEs यांसारख्या प्राधान्यकृत क्षेत्रात कर्जरूपाने पुरवतील.
  2. परदेशी बॅंकांसाठी बॅंकेच्या निव्वळ कर्जमर्यादेच्या 8% चे उप-लक्ष्य किंवा जमा-खर्च आढावा पत्रकाबाहेर दर्शवलेल्या रकमेच्या समतुल्य कर्जमर्यादा (credit), यांपैकी जे जास्त असेल ते, लागू होईल.
  3. सूक्ष्म उद्योगांना कर्ज देण्याकरता समान निकष वापरून 7.5% चे आणखी एक उप-लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.
  4. MSME ला दिले जाणारे सर्व बँक कर्ज आता PSL च्या अंतर्गत कोणत्याही पतमर्यादेसंबंधी क्षमतेशिवाय पात्र ठरतील.
तुम्हाला हे माहित आहे का?
 1. पार्श्वभूमी:-
 2. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ही भारतातील केंद्रीय बँकिंग संस्था आहे, जी भारतीय रुपया चलनाचे आर्थिक धोरण नियंत्रित करते.
 3. भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम, 1934 च्या उपबंधानुसार ब्रिटिश राजवटीत संस्थेचे 1 एप्रिल 1935 पासून कार्य सुरू झाले. मूळ भागभांडवलाची प्रत्येकी 100 समभागामध्ये विभागणी झालेली आहे, जे की सुरुवातीला खाजगी भागधारकांच्या पूर्णपणे मालकीचे होते. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताच्या स्वातंत्र्यानंतर, RBI चे 1 जानेवारी 1949 रोजी राष्ट्रीयीकरण करण्यात आले.


Krishna Kumari Kohli - The first Dalit woman Senator in Pakistan

 1. कृष्णा कुमारी कोहली या पाकिस्तानच्या सिंध प्रांतातून सिनेटर पदावर निवडून आलेल्या प्रथम दलित महिला सिनेटर ठरल्या आहेत.
 2. शिवाय कृष्णा कोहली पाकिस्तानच्या सर्वोच्च कायदेमंडळात निवडून आलेल्या पहिल्या हिंदू महिला ठरल्या आहेत.
 3. 39 वर्षीय कोलही बिलावल भुट्टो जरदारी यांच्या नेतृत्वात असलेल्या पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) च्या बाजूने निवडून आल्या. ही जागा सिंध प्रांतात महिलांसाठी आरक्षित होती.
 4. पाकिस्तान हा दक्षिण आशियामध्ये स्थित एक देश आहे आणि मध्य पूर्व आणि मध्य आशियासाठी प्रवेशद्वार आहे.
 5. इस्लामाबाद हे देशाचे राजधानी शहर आहे आणि पाकिस्तानी रुपया हे चलन आहे.
 6. लोकसंख्येत हा पाचव्या क्रमांकाचा देश आहे.
 7. देशात वर्तमान पंतप्रधान शाहिद खैकान अब्बासी आणि वर्तमान राष्ट्रपती ममून हुसैन हे आहेत.


Vodafone's plan to start the first four-phase network on the moon

 1. २०१९मध्ये चंद्रावर पहिले फोर जी नेटवर्क सुरू करण्याची योजना व्होडाफोन या ब्रिटिश टेलिकॉम कंपनीने जाहीर केली आहे.
 2. पीटी सायंटिस्टच्या खासगी चांद्रमोहीमेत ही सुविधा दिली जाणार आहे. या मोहिमेत नोकिया कंपनीला तंत्रज्ञान भागीदार करण्यात आले आहे.
 3. पीटी सायंटिस्ट ही जर्मनीची कंपनी असून व्होडाफोन जर्मनी व ऑडी कंपनीबरोबर त्यांचे सहकार्य आहे.
 4. पीटी सायंटिस्टचे संस्थापक रॉबर्ट बोहमी यांच्या मते पुढील वर्षी केप कॅनव्हरॉल येथून स्पेस एक्सच्या फाल्कन ९ अग्निबाणाच्या मदतीने अवकाशयान सोडले जाईल.
 5. चंद्रावर फोर जी सेवा १८०० मेगाहर्टझ्ला सुरू होणार असून, त्याच्या मदतीने चंद्राच्या पृष्ठभागाची एचडी चित्रे पृथ्वीवर पाठवली जातील.
 6. हा प्रकल्प ११ दिवसांचा असून चंद्रावर तापमान बदल होत असल्याने फोर जी सेवा ऊर्जा सक्षम राहील. नोकिया बेल लॅब्स या फोर जी सेवेसाठी लागणारे उपकरण तयार करणार आहे.
 7. बेस स्टेशन व ऑडी ल्युनर क्वाट्रो रोव्हर्स यांच्यात त्यामुळे फोरजी सेवेतून संपर्क असणार आहे. त्यातून एचडी म्हणजे हाय डेफिनेशन चित्रेही पाठवली जाणार आहेत.
 8. अपोलो सतरा मोहिमेच्या वेळी वापरण्यात आलेल्या रोव्हिंग वाहनाचे निरीक्षणही या मोहिमेत केले जाणार आहे.


 MIT Best University in the World

 1. ‘क्वॅकक्वॅरेली सायमंड (क्यूएस)’ या संस्थेने २०१८मधील जागतिक पातळीवरील उत्कृष्ट विद्यापीठांची क्रमवारी नुकतीच जाहीर केली आहे.
 2. अमेरिकेतील मॅसॅच्युसेक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने (एमआयटी) या यादीत सलग सहाव्या वर्षी प्रथम स्थान मिळविले आहे.
 3. जगातील ९५० उत्कृष्ट विद्यापीठांमध्ये एमआयटी यंदाही प्रथम क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे या यादीतील पहिली चारही विद्यापीठे अमेरिकेतील आहेत.
 4. दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या जागेवर अनुक्रमे स्टॅनफर्ड विद्यापीठ, हावर्ड विद्यापीठ व कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या शैक्षणिक संस्था आहेत.
 5. ब्रिटनमधील विद्यापीठांची घसरण सुरूच असल्याचे यावर्षीही दिसून येते. यात ब्रिटनमधील केवळ कॅब्रिज विद्यापीठाचा समावेश पहिल्या पाचामध्ये असून, त्याचा क्रमांक पाच आहे.
 6. भारतातील नऊ विद्यापीठांना या यादीत स्थान मिळाले आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्थांपैकी (आयआयटी) दिल्लीतील तंत्रशिक्षण संस्थेला १७२वे स्थान मिळाले आहे.
 7. आयआयटी मुंबई १७९, आयआयएस्सी बंगळूर १९०, तर आयआयटी मद्रासचा २६४वा क्रमांक आहे. दिल्ली विद्यापीठ ४८१-४९० या स्थानावर आहे.


senior Literary Vasant Narhar Phene passed away

 1. ज्येष्ठ साहित्यिक वसंत नरहर फेणे यांचे मुंबईतील खार या ठिकाणी त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्या जाण्याने साहित्यविश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
 2. साहित्य विश्वात मोलाचे योगदान देणारे वसंत नरहर फेणे आता काळाच्या पडद्याआड गेले आहेत.
 3. ‘काना आणि मात्रा’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह १९७२ मध्ये प्रसिद्ध झाला. त्यानंतर वयाच्या ९०-९१ व्या वर्षापर्यंत ते लेखन करतच होते.
 4. ‘हे झाड जगावेगळे’, ‘ज्याचा त्याचा क्रूस’, ‘मावळतीचे मृदगंध’ ‘ध्वजा’, ‘निर्वासित नाती’, ‘पहिला अध्याय’, ‘विश्वंभरे बोलविले’ ही आणि अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली.
 5. याच्या ३५ व्या वर्षी त्यांनी लेखन करण्यास सुरुवात केली.
 6. त्यांच्या वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांची ‘कारवारी माती’ ही कादंबरी प्रसिद्ध झाली. या कादंबरीत त्यांनी लहानपणीची माणसे, प्रसंग, बालपण असे सारे काही रेखाटले आहे.
वसंत नरहर फेणे
 1. मुंबईतील जोगेश्वरी या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता. मुंबई, कारवार आणि सातारा असा प्रवास करत वसंत फेणे यांनी अनेक अडथळ्यांवर मात केली आणि साहित्य विश्वास स्वतःचे स्थान निर्माण केले.
 2. वसंत नरहर फेणे हा चार वर्षांचे होते त्याचवेळी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्यांची आई त्यांना आणि त्यांच्या भावंडांना घेऊन कारवार या ठिकाणी गेली.
 3. तिथल्या मराठी प्राथमिक शाळेत चौथीपर्यंतचे शिक्षण घेतल्यावर वसंत फेणे कारवारला आले पण वर्षभरात पुन्हा कारवार येथे गेले.
 4. काही वर्षांनी मुंबईत येऊन त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले. संवेदनशील लेखक अशी ओळख असलेल्या वसंत नरहर फेणे यांनी काही काळ राष्ट्र सेवादलातही काम केले.
 5. नोकरीच्या निमित्ताने कोल्हापूर, विजापूर, पुणे, नाशिक या ठिकाणी त्यांना फिरावे लागले. भटकंतीच्या काळातील अनुभवांमधूनच त्यांच्यातला लेखक आकार घेत गेला.
 6. कथा, नाटक, विनोदी लेखन, अनुवाद, कादंबरी अशा अनेक साहित्य प्रकारात त्यांनी विपुल लेखन केले. सामान्य माणसाचे आयुष्य आपल्या कथांमधून कादंबऱ्यांतून उलगडले.
 7. त्यांच्या जाण्याने साहित्यविश्वात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.
 8. वयाच्या ९१ व्या वर्षापर्यंत लिहिता असणारा लेखक साहित्यविश्वाने गमावला आहे.


The Importance of Today's Day in History 7 march

 1. महत्वाच्या घटना:-
  1. १८७६: अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांना टेलिफोनचे पेटंट मिळाले.
  2. १९३६: दुसरे महायुद्ध – व्हर्सायचा तह धुडकावून जर्मनीने र्‍हाईनलँडमधे सैन्य घुसवले.
  3. २००६: लष्कर-ए-तैय्यबा या आतंकवादी संघटनेने वाराणसी येथे बॉम्बस्फोट घडवून आणले.
  4. २००९: केपलर स्पेस ऑब्झर्व्हेटरी या संशोधन संस्थेची स्थापना.
 2. जन्म:-
  • जन्म
   1. १५०८: दुसरा मुघल सम्राट हुमायून यांचा जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी १५५६)
   2. १९११: ज्ञानपीठ पुरस्कार विजिते आधुनिक हिंदी साहित्यिक आणि वृत्तपत्रकार सच्चिदानंद हिराचंद वात्सायन यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १९८७ – नवी दिल्ली)
   3. १९१८: मराठी साहित्यिक स्नेहलता दत्तात्रय दसनूरकर यांचा जन्म.
   4. १९३४: भारताचा यष्टिरक्षक नरी कॉन्ट्रॅक्टर यांचा जन्म.
   5. १९५५: चित्रपट अभिनेता अनुपम खेर यांचा जन्म.
 3. मृत्यू:-

मृत्यू

 1. १६४७: छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू दादोजी कोंडदेव यांचे निधन.
 2. १९२२: रंगभूमी नट गणपतराव जोशी यांचे निधन. (जन्म: १५ ऑगस्ट १८६७)
 3. १९५२: तत्वज्ञ परमहंस योगानंद यांचे निधन.
 4. १९६१: भारतरत्न पंडित गोविंदवल्लभ पंत यांचे निधन. (जन्म: १० सप्टेंबर १८८७)
 5. २०१५: भारतीय वकील आणि राजकारणी जी. कार्तिकेयन यांचे निधन. (जन्म: २० जानेवारी १९४९)


Top