pencil webportal

राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्पाच्या (National Child Labour Project) प्रभावी अंमलबाजवणीकरिता केंद्र सरकारने हे पोर्टल सुरू केले आहे.
 PENCIL चे पूर्ण रूप :- Platform for Effective Enforcement for No Child Labour.
 कामगार मंत्रालयाने हे पोर्टल विकसित केले.
 घटक :-
1) Child Tracking System
2) Complaint Corner
3) State Government
4) National Child Labour Project
5) Convergence.


vidyadhar surajprasad naypaul

 1. भारतीय वंशाचे व लंडनमध्ये स्थायीक झालेले नोबेल पुरस्कार विजेते लेखक व्ही. एस. नायपॉल यांचे ८५ वर्षी निधन झाले.
 2.  १९७१ मध्ये बुकर पुरस्कार तर २००१ मध्ये साहित्याच्या नोबेल पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते.
 3.  नायपॉल यांचा जन्म १९३२ त्रिनिदादमध्ये झाला होता. "ए बेंड इन द रिवर" आणि "ए हाऊस फॉर मिस्टर बिस्वास" ही त्यांची पुस्तके मोठ्या प्रमाणात चर्चेत आली.
 4.  १९५१ मध्ये नायपॉल यांचे "द मिस्टिक ऑफ मैसर" हे त्यांचे पहिले पुस्तक प्रकाशित झाले होते. 
 5.  १९९० मध्ये इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ यांनी त्यांना सर ही पदवी बहाल केली होती.
 6.  जागतिक पातळीवरील ज्या ५० लेखकांची यादी बनवण्यात आली होती त्यामध्ये व्ही. एस. नायपॉल हे सातव्या क्रमाकांचे लेखक होते.
 7.  इतर गाजलेली पुस्तके... इन ए फ्री स्टेट (१९७१), ए वे इन द वर्ल्ड (१९९४), हाफ ए लाईफ (२००१) आणि मॅजिक सीड्स (२००४) ई.


seva bhoj yojana

 1. 1 ऑगस्ट 2018 पासून भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने 'सेवा भोज योजना' ही नवीन योजना सुरू केली आहे.
 2. योजनेसाठी वित्त वर्ष 2018-19 आणि 2019-20 साठी एकूण 325 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
 3. धर्मदाय आस्थापनांमध्ये दिल्या जाणार्या अन्न/प्रसाद/लंगर यासाठी लागणार्या वस्तूंवर CGST आणि IGST लादला जाणार नाही आणि त्याला परत केले जाईल.
 4. हे अनुदान प्राप्त करण्यासाठी आस्थापने कमीतकमी पाच वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेली असावीत आणि महिन्याला कमीत कमी 5000 लोकांना मोफत अन्न पुरवित असावी.


pani foundation award to takewadi village

 1. पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत 2018 या वर्षी सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील टाकेवाडी (आंधळी) या गावानं प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळवला आहे.
 2. पाणी फाऊंडेशनच्या वतीनं 75 लाख रूपये व ट्रॉफी, तर राज्य सरकारच्या वतीनं 25 लाख रूपयांचा पुरस्कार या गावानं पटकावला आहे.
 3. बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील सिंदखेड आणि सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील भांडवली या गावांना द्वितीय पुरस्कार विभागून देण्यात आला आहे.
 4. प्रत्येकी 25 लाख रुपयांचा पुरस्कार या गावानं पटकावला आहे.
 5. नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील उमठा आणि बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील आनंदवाडी ही गावं तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे.प्रत्येकी 10 लाख रुपयांचा पुरस्कार या गावानं पटकावला आहे.
 6. •पुण्यातील बालेवाडी स्टेडियममध्ये पार पडलेल्या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पाणी फाऊंडेशनचे प्रमुख, सिने अभिनेते आमीर खान यांच्या हस्ते विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.
 7.  •राज्यातील 75 तालुक्यातील 4025 गावांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली होती.


Khangchendzonga Biosphere Reserve

 1.  या क्षेत्राचा यूनेस्कोने 'जिवावरण राखीवचे जागतिक नेटवर्क'मध्ये (WHBR- World Network of Biosphere Reserve) समावेश केला आहे.
 2.  या नेटवर्कमध्ये समाविष्ट होणारे हे भारतातील 11 वे जिवावरण राखीव क्षेत्र ठरले.
 3.  कांचनजुंगा हे देशातील सर्वांत उंचीवरील जिवावरण राखीव क्षेत्र आहे.
 4.  कांचनजुंगा हे जगातील तिसरे सर्वांत उंच पर्वत शिखर आहे. (ऊंची - 8,586 मीटर)
 5.  स्थान :- सिक्किम
 6.  यापूर्वी 2016 मध्ये अगस्थिमलाई (केरळ) जिवावरण राखीव क्षेत्राचा यामध्ये समावेश करण्यात आला होता.
 7.  या नेटवर्क मध्ये स्थान प्राप्त करणारे पहिले भारतीय जिवावरण राखीव - निलगिरी
 8.  देशात एकूण 18 जिवावरण राखीव क्षेत्र असून त्यापैकि 11 क्षेत्रांचा यामध्ये समावेश आहे.


indian womens are very unsafe

थॉमस रॉयटर्स फाऊंडेशन"चे सर्वेक्षण

 1. महिलांच्या अधिकारावर काम करणाऱ्या ५५० तज्ज्ञांनी हा सर्व्हे केला आहे.
 2. यामध्ये १९३ देशांमधून महिलांसाठी १० असुरक्षित आणि धोकादायक देशांची यादी तयार करण्यात आली.
 3. महिलांच्या लैंगिक शोषणाचे धोके टाळण्यासाठी लक्ष देणारा एकमेव देश अमेरिका असल्याचे या सर्व्हेत म्हटले आहे.
 4. यापूर्वी २०११ मध्ये करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये अफगाणिस्तान, कॉन्गो, पाकिस्तान, भारत आणि सोमालीया हे देश धोकादायक असल्याचे म्हटले होते.
 5. मात्र यावर्षी महिलांवरील अन्याय, अत्याचारांच्या घटनेत झालेल्या वाढीमुळे भारताने या देशांना मागे टाकले आहे.
 6. इतकेच नाही तर ६ वर्षापूर्वी झालेल्या निर्भया प्रकरणानंतर देखील महिलांच्या सुरक्षेसाठी कोणतेच ठोस पाऊल भारतात उचलले नसल्याचे म्हटले आहे.


भारत पहिल्या स्थानावर...

 • सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार २००७ ते २०१६ दरम्यान महिलांच्या बाबतीत घडणाऱ्या गुन्ह्यांत ८३ टक्के वाढ झाली आहे.
 • दर तासाला ४ महिला अन्याय, अत्याचाराला बळी पडत असल्याची तक्रार नोंद होते.


Top

Whoops, looks like something went wrong.