
1682 14-Jan-2018, Sun
- ‘ओल्ड माँक’ या रमला प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवणारे पद्मश्री ब्रिगेडिअर (निवृत्त) कपिल मोहन यांचे ६ जानेवारी रोजी गाझियाबाद येथे वयाच्या ८८व्या वर्षी निधन झाले.
- कपिल मोहन हे १९६५च्या आधीपासून ट्रेड लिंक्स प्रा. लि.चे प्रमुख होते. त्यांनी डायर मीकिन ब्रेव्हरेजची धुरा सांभाळल्यानंतर कंपनीचा विविध क्षेत्रात विस्तार केला होता.
- एडवर्ड डायरने वर्ष १८५५मध्ये कसौली येथे डायर मीकिन ब्रेव्हरेजची स्थापना केली होती. १९६६मध्ये या कंपनीचे मोहन मीकिन ब्रेव्हरीज लि. असे नामांतर करण्यात आले होते.
- कपिल मोहन यांनी या कंपनीची धुरा सांभाळल्यानंतर ‘ओल्ड माँक’ रम भारतातच नव्हे तर जगात लोकप्रिय झाली झाली होती.
- १९५४मध्ये ‘ओल्ड माँक’चे उत्पादन सुरू झाले होते. जगात सर्वाधिक विकली जाणारी रम म्हणून ‘ओल्ड माँक’ची ख्याती होती.
- त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने तीन नवे डिस्टिलरी आणि दोन ब्रेव्हरेज सुरू करण्याशिवाय देशातील विविध भागात फ्रँचायजींचा विस्तारही केला होता.
- मोहन यांनी नंतर ग्लास, ब्रेकफास्ट फुड, ज्यूस आणि अभियांत्रिकी उद्योगातही पाऊल ठेवले होते.
- विविध क्षेत्रात सक्रिय असलेल्या मोहन यांच्यामुळे मीकिन लि.ची सध्याची उलाढाल ही ४०० कोटी रूपयांहून अधिक आहे.
- लष्करातून निवृत्त झाल्यानंतर, उद्योग व्यवसायात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना २०१०मध्ये पद्मश्री किताबाने सन्मानित करण्यात आले.