National Time Release study

 1. जागतिक व्यापारात देशाचा वाटा वृद्धींगत व्हावा यासाठीच्या धोरणात्मक कटिबद्धतेचा भाग म्हणून महसूल आणि वित्त मंत्रालयाने 1 आणि 7 ऑगस्ट दरम्यान भारताचा पहिला टीआरएस म्हणजे राष्ट्रीय टाईम रिलीज अभ्यास हाती घेतला आहे.
 2. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या ओघाचा प्रभाव आणि क्षमता मापनासाठी टीआरएस हे आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता असलेले एक साधन आहे.
 3. माल आल्यापासून ते बंदरातून जहाज जाईपर्यंत मालासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या आणि मंजुऱ्या मिळवण्यातल्या प्रक्रियात्मक त्रुटींचा अभ्यास यामध्ये करण्यात येणार आहे.
 4. यामुळे व्यापार नियंत्रणाशी तडजोड न करता क्षमता सुधारण्यासाठी आवश्यक त्या कार्यात्मक उपाययोजना हाती घेता येतील. निर्यात उद्योग आणि सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगक्षेत्राला याचा मोठा लाभ होणार आहे.
 5. या अभ्यासातून सीमापार व्यापार करणाऱ्या सरकारी एजन्सीना सध्याच्या त्रुटी लक्षात येतील तसेच व्यापाराचा सुरळीत ओघ राखण्यातले अडथळे लक्षात येऊन ते टाळण्यासाठी उपाययोजना हाती घेता येणार आहेत.


India is the largest sulfur dioxide emitter

 1. कोळसा जाळून सल्फर डायऑक्साइडचे (SO2) उत्सर्जन करणारा भारत हा जगातील सर्वांत मोठा देश असल्याचा दावा 'ग्रीनपीस' या स्वयंसेवी संस्थेने 'नासा'च्या पाहणीचा हवाला देऊन केला आहे.
 2. 'नासा'ने ही पाहणी केली असून, त्यासाठी ओझोन मॉनिटरिंग इन्स्ट्रुमेंट (ओएमआय)चा वापर करण्यात आला.
 3. त्यात 'SO2'चे सर्वाधिक उत्सर्जन करणारी जगातील प्रमुख ठिकाणांची पाहणी करण्यात आली. त्यापैकी भारत हा सर्वाधिक 15 टक्के 'SO2'चे उत्सर्जन करत असल्याचे म्हटले असल्याचे 'ग्रीनपीस'ने म्हटले आहे.
 4. अहवालाची ठळक वैशिष्ट्ये:-
  1. भारताच्या संदर्भातः भारत जगातील सल्फर डाय ऑक्साईडचा सर्वात मोठा उत्सर्जक आहे.
  2. नासाच्या ओएमआय उपग्रहाच्या आकडेवारीनुसार, भारतामध्ये मोठ्या प्रमाणात सल्फर डायऑक्साइड हॉटस्पॉट आहेत, ज्याचे मुख्य कारण कोळसा वापर आहे.
  3. भारतात मध्य प्रदेशातील सिंगरौली, तमिळनाडूतील नेवेली आणि चेन्नई, ओडिशातील तल्चेर आणि झारसुगुडा, छत्तीसगडमधील कोरबा, गुजरातेतील कच्छ, तेलंगणातील रामागुंडम आणि महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि कोराडी येथे सर्वाधिक उत्सर्जन होत असल्याचे या पाहणीत आढळले.
  4. हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी भारतातील बहुतेक प्रकल्पांमध्ये तंत्रज्ञानाचा अभाव असल्याचेही या पाहणीच्या विश्लेषणात आढळले.
  5. जगातील सर्वाधिक 'SO2'चे उत्सर्जन रशियातील नोरिल्सक स्मेल्टर कॉम्प्लेक्स येथे होते. त्या पाठोपाठ दक्षिण आफ्रिकेतील क्रील आणि इराणमधील झाग्रोझ या ठिकाणांचा समावेश आहे. मात्र 'एसओ२'चे उत्सर्जन करणारी अधिक ठिकाणे भारतात असल्याने भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे.
  6. भारतातील बहुतेक कोळशावर चालणार्यात उर्जा प्रकल्पांमध्ये वायू प्रदूषण कमी करण्यासाठी डीसल्फराईजेशन तंत्रज्ञानाचा वापर केला जात नाही.
  7. शासनाने उचललेली पावले: केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने डिसेंबर 2015 मध्ये कोळशाच्या उर्जा प्रकल्पांमधून सल्फर डायऑक्साइड उत्सर्जन कमी करण्यासाठी मर्यादा निश्चित केली. परंतु डेसल्फ्युरायझेशन तंत्राची अंतिम मुदत 2017 ते 2022 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
  8. रशिया, दक्षिण आफ्रिका, इराण, सौदी अरेबिया, भारत, मेक्सिको, संयुक्त अरब अमिराती, तुर्की आणि सर्बिया या जगात सल्फर डायऑक्साइड उत्सर्जनाचे प्रमुख आकर्षण केंद्र सापडले आहेत.
  9. चीन आणि अमेरिकेने स्वच्छ उर्जा स्त्रोतांचा वापर करून सल्फर डायऑक्साइड उत्सर्जन कमी करण्यात यश मिळविले आहे.
  10. विश्लेषणानुसार, वायू प्रदूषण ही सार्वजनिक आरोग्यासाठी मोठी चिंता आहे, जगातील 91 टक्के लोकसंख्या जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) बाह्य प्रदूषणाच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या मर्यादा ओलांडणार्याए भागात राहते आणि परिणामी,प्रत्येक वर्षी 4.2 दशलक्ष लोक अकाली मृत्यूमुखी पडतात..


Rahul Amarkha of Maharashtra selected for World Wrestling Championship

 1. कझाकस्तान येथे जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा कुस्तीपटू राहुल आवारेची भारतीय संघात निवड झाली आहे.
 2. त्याने निवड चाचणी स्पर्धेत ६१ किलो वजनी गटात बाजी मारून जागतिक स्पर्धेची पात्रताही निश्चित केली.
 3. राहुलने २०१८ मध्ये युवा राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेले आहे. तसेच कनिष्ठ स्पर्धेतही तो रौप्यपदक विजेता आहे. राहुलसह सुशील कुमारनेही जागतिक स्पर्धेची पात्रता निश्चित केली आहे.
 4. मंगळवारी जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी पार पडलेल्या निवड चाचणी स्पर्धेत राहुलने ६१ किलो वजनी गटात रवींदरचा ६-२ असा पराभव केला.
 5. ही स्पर्धा २०२० च्या टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रता मिळवण्याची पायरी आहे.
 6. कुस्ती संघटनेतील राजकारणाचा बळी पडल्यानं राहुलला २०१६च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेला मुकावे लागले होते.
 7. २०१८ मध्ये गोल्ड कोस्ट येथे राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक मिळवले आणि विरोधकांना आपली दखल घेण्यास भाग पाडले.
 8. राष्ट्रकुल स्पर्धेत ५७ किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवले होते.


famous musician khayyam passed away

 1. ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांचे 19 ऑगस्ट 2019 रोजी मुंबईत निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. मोहम्मद जहूर 'खय्याम' हाशमी हे खय्याम ह्यांचे पूर्ण नाव होते.
 2. बालपणापासूनच संगीत साधना करणाऱ्या खय्याम यांनी वयाच्या सतराव्या वर्षी पंजाबमध्ये लुधियाना शहरातून संगीत क्षेत्रातल्या कारकीर्दीला सुरुवात केली. कभी-कभी, उमराव जान, नूरी, रझिया सुलतान, बाजार यांसारख्या चित्रपटांसाठी त्यांनी अविस्मरणीय संगीत दिले.
 3. सन 1953 ते सन 1990 या कालावधीत त्यांनी अनेक चित्रपटांना संगीत दिले. 1953 साली त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
 4. 1961 साली 'शोला और शबनम' या सिनेमाला दिलेल्या संगीतामुळे खय्याम यांना संगीतकार म्हणून एक नवी ओळख मिळाली.
 5. आपल्या उत्कृष्ट कामासाठी त्यांना अनेक पुरस्कारही देण्यात आले आहेत. पद्मभूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले.
 6. 2010 साली खय्याम यांना संगीतक्षेत्रातल्या अतुलनीय योगदानासाठी 'फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार' देण्यात आला.


Top