National GOKUL MISSION IN BIHAR TO START SPERM CENTER

 1. ​​​​केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री राधा मोहन सिंग यांच्या हस्ते बिहारमधील पूर्णिया जिल्ह्याच्या मरंगा गावात ‘गोठीत वीर्य केंद्र’ (Frozen Semen Station) उभारण्यासाठी कोनशीला ठेवण्यात आली आहे.
 2. केंद्र शासनाच्या 100% अनुदानाने राष्ट्रीय गोकुळ मोहिमेंतर्गत 64 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात आहे.
 3. या मोहिमेंतर्गत कृषी मंत्रालय पशुपालन, दुग्ध व मत्स्य विभागासोबत कार्य करीत आहे.
 4. वर्तमानात कृत्रिम रेतनाचे कार्य बिहारमध्ये CMOFED (सुधा) द्वारे केले जात आहे. कृत्रिम रेतनासाठी उच्च अनुवांशिक दर्जेदार बैलांची गरज असते.
 5. राष्ट्रीय गोकुळ मोहीम हा पुढाकार डिसेंबर 2014 मध्ये गुरा-ढोरांचे देशी वाण जतन करणे आणि विकसित करण्यासाठी घेतला गेला आहे.


bloombarg will coperate with state road safety

 1. राज्यातील रस्ते सुरक्षिततेसाठी ब्लूमबर्ग समूहातर्फे देण्यात येत असलेले सहकार्य अधिक व्यापक करण्याचा निर्णय घेण्यात आला.
 2. न्यूयॉर्क येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘ब्लूमबर्ग‘ चे मुख्य कार्यकारी अधिकारी माईक ब्लूमबर्ग यांच्याशी यासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाली.
 3. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील राज्याच्या शिष्टमंडळाचे कॅनडाच्या दौऱ्यावरून अमेरिकेतील न्यू जर्सी येथे आगमन झाले.
 4. भारताचे न्यूयॉर्कमधील कॉन्सूल जनरल संदीप चक्रवर्ती यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर मुख्यमंत्री न्यूयॉर्ककडे रवाना झाले.
 5. राज्यातील रस्ते सुरक्षिततेबाबतच्या उपक्रमांना ब्लूमबर्गचे मोठे पाठबळ लाभले आहे. त्याबाबत या समूहाशी फेब्रुवारी 2015 मध्ये सामंजस्य करार करण्यात आला होता.
 6. या करारानुसार झालेल्या उपाययोजनांमुळे रस्ते अपघातांच्या प्रमाणात लक्षणीय घट होण्याबरोबरच अशा घटनांमधील जीवितहानीदेखील कमी करण्यात यश आले आहे.
 7. महाराष्ट्रासोबतच्या सहकार्याची व्याप्ती वाढवितानाच राज्याच्या फिनटेक क्षेत्रातील स्टार्टअप कंपन्यांसोबत संयुक्तरीत्या काम करण्याचा मनोदय ब्लूमबर्ग यांनी या वेळी व्यक्त केला.


divya suryadevara appointed as a tata motors CFO

 1. भारतीय वंशाच्या दिव्या सूर्यदेवरा यांची अमेरिकेची प्रसिद्ध कार उत्पादक कंपनी जनरल मोटर्सच्या मुख्य वित्त अधिकारीपदी (सीएफओ) नियुक्ती करण्यात आली आहे.
 2. 39 वर्षीय सूर्यदेवरा सध्या जनरल मोटर्समध्ये कॉर्पोरेट फायनान्स उपाध्यक्षपदी कार्यरत आहेत. त्या एक सप्टेंबरपासून सीएफओ पदाचा कार्यभार स्वीकारतील.
 3. मुळच्या चेन्नई येथील असणाऱ्या सूर्यदेवरा या जनरल मोटर्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मेरी बारा यांना रिर्पोट करतील.
 4. मेरी बारा यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिव्या यांना वेगवेगळ्या पदावर काम करण्याचा अनुभव असून त्यांनी आपले नेतृत्वगुण सिद्ध केलेले आहे. त्यांच्या अनुभवाचा कंपनीला मोठा फायदा मिळाला आहे.
 5. मेरी बारा या 2014 पासून कंपनीच्या सीईओ असून ऑटोमोबाइल क्षेत्रातील कंपनीचे नेतृत्व करणाऱ्या त्या एकमेव महिला आहेत.
 6. दोन प्रमुख पदांवर महिला कार्यरत असलेली जनरल मोटर्स ही पहिली कंपनी बनली आहे.


indian women participated in israel mayor election

 1. इस्त्रायलमधील अशकेलॉन शहाराच्या महापौरपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात भारतीय वंशाची महिलाही उतरली आहे. डॉ. रिंकी सहाय असे या उमेदवाराचे नाव असून त्या मुळच्या महाराष्ट्रातील आहेत.
 2. बडोदा आणि अशकेलॉन शहरात झालेल्या करारामुळे निवडणूक लढण्यास आपण प्रेरित झाल्याचे रिंकी यांनी म्हटले आहे.
 3. तसेच त्या म्हणाल्या, काही वर्षांपूर्वी बडोदा आणि अशकेलॉन या शहरांमध्ये एक करार झाला होता. दोन्ही शहरांना जवळ आणण्यासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्या कार्यक्रमात मी सहभागी होत असते. या करारापूर्वी अशकेलॉन शहराचे भारताबरोबर कमी संबंध होते, असे त्यांनी सांगितले.
 4. दरम्यान, त्या बडोद्याला आल्या आणि इथे अनेक लोकांची भेट घेतली. जेव्हा मी भारतीय संस्कृतीशी जोडले गेले. तेव्हा मला इतर समाजाचे धैर्य आणि सहिष्णुतेच्या मूल्यांबाबत समजले. आता मी महापौरपदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे असे त्यांनी सांगितले.


H R KHAN APPOINTED AS BANDHAN BANK HEAD

 1. बंधन बँकेने हरुन रसिद खान यांची गैर-कार्यकारी, अंशकालिक अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.
 2. एच. आर. खान हे माजी RBI डेप्युटी गव्हर्नर आहेत.
 3. ही नवी नियुक्ती 5 जून 2018 पासून तीन वर्षांपर्यंत किंवा स्वतंत्र संचालक पदाचा कार्यकाळ संपेपर्यंत असेल.
 4. बंधन बँक लिमिटेड-मुख्यालय -कोलकाता, पश्चिम बंगाल
 5. एक भारतीय बँकिंग आणि वित्तीय सेवा कंपनी आहे.
 6. 2001 मध्ये मायक्रो फायनान्स कंपनी म्हणून सुरुवात करणारे बंधन बॅंकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया द्वारे 2014 मध्ये बँकिंग परवाना प्राप्त झाला.
 7. बंधन बँक भारतातील मार्केट कॅपिटल (₹ 56 9 20 कोटी) द्वारे 8 व्या क्रमांकाचे सर्वात मोठे बँक (27 मार्च 2018) झाली आहे .


Top

Whoops, looks like something went wrong.