NASA's 'Insight' spacecraft came down on the red planet

 1. अमेरिकेच्या नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) या अंतराळ संस्थेचे ‘इनसाइट (इंटेरियर एक्सप्लोरेशन युजींग सिस्मिक इंव्हेस्टिगेशंस)’ हे अंतराळयान दि. 26 नोव्हेंबर 2018 रोजी लाल ग्रह म्हणजेच मंगळ ग्रहावर यशस्वीपणे उतरले.
 2. ‘इनसाइट’ 300 दशलक्ष मैल (482 दशलक्ष किलोमीटर) अंतर कापत सहा महिन्यांचा प्रवास करीत अखेरीस मंगळावर पोहचले.
 3. 1976 सालच्या ‘वायकींग’ मोहिमेपासून आतापर्यंतची नासाची ही आठवी यशस्वी मंगळ मोहीम आहे.
 4. 2012 साली नासाने पाठविलेले ‘क्यूरिओसिटी रोव्हर’ अजूनही मंगळावर कार्यरत आहे.
 5. जर्मनीच्या नेतृत्वाखाली $1 अब्जच्या या आंतरराष्ट्रीय मोहीमेमध्ये ग्रहाच्या पृष्ठभागाखालील उष्णतेचे मोजमाप करण्यासाठी पहिल्यांदाच 16 फूट (5 मीटर) इतक्या खोलीपर्यंत खोदकाम केले जाणार आहे.
 6. शिवाय यात भूकंपाची मोजणी करण्यासाठी फ्रान्सने तयार केलेले सिस्मोमीटर देखील बसविण्यात आले आहे.


$ 200 million loan agreement with ADB for the development of highways in Bihar

 1. बिहारमधील राज्य महामार्गांमध्ये सुधारणा करण्यासाठी भारत सरकारने आशियाई विकास बँक (ADB) सोबत $200 दशलक्षचा करार केला आहे. 
 2. हा निधी सुमारे 230 किलोमीटरचा रस्ता विस्तारण्यास आणि सर्वकाळ हवामानासंबंधी मानकांवर आधारित सुधारणा करण्यासाठी वापरला जाणार आहे.
 3. 2008 सालापासून आतापर्यंत ADB ने 1,453 किलोमीटरच्या राज्य महामार्गांना सुधारण्यासाठी आणि पटनाजवळ गंगा नदीवर नवीन पूल उभारण्यासाठी बिहारला $1.43 अब्जचे कर्जे दिले आहे.
 4. आशियाई विकास बँक (ADB) ही एक क्षेत्रीय विकास बँक आहे, ज्याची स्थापना दि. 19 डिसेंबर 1966 रोजी आशियाई देशांमधील आर्थिक विकास प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्यासाठी केली गेली.
 5. मंडालुयोंग (फिलीपिन्स) येथे याचे मुख्यालय आहे.
 6. “फाइटींग पॉव्हर्टी इन एशिया अँड द पॅसिफिक” हे ADBचे घोषवाक्य आहे.
 7. याचे 67 देश सदस्य आहेत.


India and China have repaired the DTAA

 1. भारत आणि चीन या देशांनी उत्पन्नावरील कर आणि महसूल चुकवेगिरीला प्रतिबंध करण्यासंदर्भात त्यांच्यामधील दुहेरी कर टाळण्यासंबंधी करारामध्ये (DTAA) दुरूस्ती केली आहे.
 2. कर संबंधित माहितीचे देवाणघेवाण करण्यास दुहेरी कर टाळण्यासंबंधी करार (DTAA) केला जातो.
 3. भारताचा 88 देशांसोबत DTAA झालेला आहे, त्यापैकी 85 कार्यान्वित आहेत.
 4. या करारामधून कराचे दर आणि कायदे ठरवले गेले आहेत, जे दुसर्‍या देशात उत्पन्न घेणार्‍या नागरिकाला दुहेरी कर देण्यापासून वाचवते.
 5. त्यासाठी ‘भारतीय आयकर अधिनियम-1961’ अंतर्गत कलम 90 व कलम 91 अश्या दोन तरतुदी आहेत.
 6. चीन हा जगाच्या मध्यभागी वसलेला एक आशियाई देश आहे.
 7. हा जगातला सर्वांत जास्त लोकसंख्या असलेला देश आहे.
 8. भूप्रदेशाच्या आकारानुसार, चीन (क्षेत्रफळ सुमारे 96 लक्ष चौरस किलोमीटर) जगातला दुसरा सर्वात मोठा देश आहे.
 9. बिजींग ही देशाची राजधानी असून रेन्मिन्बी (CNY) हे राष्ट्रीय चलन आहे.


"PAiSA": Centralized electronic platform for the process of granting interest subsidy to a bank loan

 1. दिनदयाल अंत्योदय योजना - राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान (DAY - NULM) अंतर्गत लाभार्थ्यांना मिळणार्‍या बँक कर्जावरील व्याज अनुदानाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी एक केंद्रीकृत इलेक्ट्रॉनिक व्यासपीठ तयार करण्यात आले आहे.
 2. "पोर्टल फॉर अफोर्डेबल क्रेडिट अँड इंट्रेस्ट सबव्हेंशन अॅक्सेस (PAiSA / पैसा)” नावाचे हे संकेतस्थळ आधारित व्यासपीठ अलाहाबाद बँकेनी तयार केले आहे.
 3. या व्यासपीठाचा लाभ लहान उद्योजकांना मिळणार आहे. सर्व 35 राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि सर्व अनुसूचित व्यवसायिक बँका, क्षेत्रीय ग्रामीण बँका आणि सहकारी बँका या व्यासपीठाशी जुळण्याची अपेक्षा आहे.
 4. शहरी दारिद्र्य निर्मूलनाकरिता आणि कामाच्या संधी प्रदान करण्यासाठी स्वयंरोजगार व कौशल्य प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने, 23 सप्टेंबर 2013 रोजी भारत सरकारच्या गृह व शहरी दारिद्र्य निर्मूलन मंत्रालयाकडून राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान (NULM) सुरू करण्यात आले.
 5.   ही योजना ‘स्वर्ण जयंती शहरी रोजगार’ योजनेच्या जागी आणली गेली.
 6. या साली याचे नाव बदलून ‘दिनदयाल अंत्योदय योजना- राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान (DAY-NULM)’ असे ठेवण्यात आले.
 7. वर्तमानात ही योजना सर्व वैधानिक 4,041 शहरे आणि गावांमध्ये लागू आहे.


Top

Whoops, looks like something went wrong.