munciple workers will get prize for family planning

 1. एका अपत्यानंतर कुटुंब नियोजन करणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना आता पन्नास हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना दोन जादा वेतनवाढ मिळणार नाही.
 2. राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांना डिसेंबर 1998 नंतर एका अपत्यावर कुटुंब नियोजन केल्यास त्यांना दोन जादा वेतनवाढ देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. याबाबतच्या प्रस्तावाला 2011 साली सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली होती.
 3. तसेच या वेतनवाढीबाबत राज्य सरकारने कोणतेही आदेश दिले नसल्याचे स्पष्ट झाले होते.
 4. त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार करण्यात आला. दोन जादा वेतनवाढ देण्याऐवजी एकदाच संबंधित कर्मचाऱ्याला 50 हजार रुपयांचे बक्षीस देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला होता. त्यास स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी दिली गेली.
 5. महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत ‘लेक दत्तक योजना’ राबविली जाते.
 6. एका मुलीवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास पन्नास हजार रुपयांपर्यंतची रक्कम राष्ट्रीयीकृत बॅंकेत मुलीच्या नावाने ठेवली जाते.


womens will get paid leave for children development

 1. मुलांच्या पालनपोषणासाठी सरकारी सेवेतील महिला कर्मचाऱयांना सहा महिन्यांची विशेष रजा देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. मुले अठरा वर्षांची होईपर्यंत ही रजा टप्प्याटप्प्याने घेता येईल. या बाबतचा शासकीय आदेश येत्या दहा दिवसांत निघणार आहे.
 2. राज्याचे विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन यंदा प्रथमच नागपूरला 4 जुलैपासून सुरू होणार आहे. अधिवेशनाच्या आदल्या दिवशी होणाऱया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला.
 3. त्यानंतर सत्तारूढ पक्षाची बैठक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी रामगिरी बंगल्यावर झाली. या बैठकीनंतर मंत्रिमंडळाची बैठक तेथेच झाली. या बैठकीत विशेष रजा देण्याबाबतचा निर्णय झाला.
 4. तसेच, पुढे होणार्‍या अधिवेशनातील विरोधी पक्षाच्या संभाव्य हल्ल्याला तोंड देण्याची रणनितीही भाजपच्या प्रमुख मंत्र्यांच्या बैठकीत ठरविण्यात आली.
 5.  या बैठकीला मुख्यमंत्री फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, संसदीय कार्य मंत्री गिरीश बापट, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे उपस्थित होते.


in scholership maharashtra at topin scholership maharashtra at top

 1. केंद्र सरकारतर्फे दलित विद्यार्थ्यांना परदेशी विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. ही शिष्यवृत्ती मिळवणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील दलित विद्यार्थी आघाडीवर आहेत.
 2. केंद्र सरकारतर्फे दलित विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या या शिष्यवृत्तीवर महाराष्ट्राचेच वर्चस्व आहे. अलीकडच्य
 • केंद्र सरकारतर्फे दलित विद्यार्थ्यांना परदेशी विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. ही शिष्यवृत्ती मिळवणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील दलित विद्यार्थी आघाडीवर आहेत.
 • केंद्र सरकारतर्फे दलित विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या या शिष्यवृत्तीवर महाराष्ट्राचेच वर्चस्व आहे. अलीकडच्या काहीवर्षातील आकडेवारीवरुन ही बाब समोर आली आहे.
   
 • फेब्रुवारी 2018 पर्यंत अनुसूचित जातीसाठीच्या राष्ट्रीय परदेश शिष्यवृत्ती योजनेतंर्गत एकूण 72 शिष्यवृत्ती जाहीर झाल्या आहेत. त्यातील 40 शिष्यवृत्ती या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मिळाल्या.
 • या यादीत कर्नाटक आणि उत्तर प्रदेश दुसऱ्या स्थानावर असून दोन्ही राज्यातील विद्यार्थ्यांना प्रत्येकी सहा शिष्यवृत्त्या मिळाल्या.
 • 2016-17 मध्ये एकूण 108 शिष्यवृत्ती जाहीर झाल्या. त्यातील 53 शिष्यवृत्ती महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मिळाल्या. उत्तर प्रदेशात आठ तर मध्य प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी पाच जणांना शिष्यवृत्ती मिळाली. अन्य राज्यांमधील विद्यार्थ्यांना एक ते चार या प्रमाणात शिष्यवृत्ती मिळाली. त्याआधीची तीन वर्ष सुद्धा महाराष्ट्र ही शिष्यवृत्ती मिळवण्यामध्ये आघाडीवर होता.

 

 

 

 

 

 

 

 1. 2016-17 मध्ये एकूण 108 शिष्यवृत्ती जाहीर झाल्या. त्यातील 53 शिष्यवृत्ती महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मिळाल्या. उत्तर प्रदेशात आठ तर मध्य प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी पाच जणांना शिष्यवृत्ती मिळाली.
 2. अन्य राज्यांमधील विद्यार्थ्यांना एक ते चार या प्रमाणात शिष्यवृत्ती मिळाली. त्याआधीची तीन वर्ष सुद्धा महाराष्ट्र ही शिष्यवृत्ती मिळवण्यामध्ये आघाडीवर होता.


mumbai costlier city in the india

 1. न्यूयॉर्कच्या इंटरनॅशनल कन्सल्टिंग फर्म मर्सरच्या अहवालानुसार देशाच्या आर्थिक राजधानीने मुंबई शहर हे देशातील सर्वात महागडे शहर ठरले आहे.
 2. मर्सरच्या कॉस्ट ऑफ लिव्हिंगने २०१८मध्ये या संदर्भात केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.
 3. जगातील एकूण २०९ प्रमुख शहरांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला आहे. प्रत्येक शहरातील २०० वस्तूंच्या दरांची तुलना करून त्याआधारावरच या शहरांची महागडे शहर म्हणून क्रमवारी निश्चित करण्यात आली आहे.
 4. २०० वस्तूंमध्ये प्रामुख्याने शेती उत्पादने, दूध उत्पादने, अवजड उत्पादने या उत्पादनांचे त्या त्या शहरातील असणारे दर तपासून पाहण्यात आले.
 5. जागतिक पातळीवर करण्यात आलेल्या या सर्वेक्षणामध्ये मुंबईसोबतच दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, कोलकाता या भारतातील अन्य चार शहरांचाही समावेश आहे.
 6. जगाच्या पातळीवर राहण्यासाठी महागड्या असणाऱ्या शहरांमध्ये संपूर्ण जगात हाँगकाँग हे शहर सर्वात महागडे शहर ठरले आहे.
 7. देशात पहिल्या क्रमांकावर असलेल्या मुंबईचा जगातील यादीत मात्र ५५वा क्रमांक आहे. दिल्ली १०३, चेन्नई १४४, बंगळुरू १७० तर कोलकाता १८२व्या स्थानावर आहे.
 8. या सर्वेक्षणामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या भारतीय शहरांमध्ये महागाईचा दर ५.५७ टक्के नोंदवण्यात आला आहे.


india and seychelles 6 agreement

 1. सेशल्सचे राष्ट्रपती डॅनी फॉर यांच्या भारत दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फॉर यांची द्विपक्षीय बैठक २५ जून रोजी पार पडली. त्यानंतर ६ विविध करारांवर दोघांकडून स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
 2. यावेळी सेशल्सच्या सागरी सुरक्षेची क्षमता वाढवण्यासाठी भारताकडून १० कोटी डॉलरचे कर्ज देण्याची घोषणा करण्यात आली.
 3. याशिवाय भारताने हिंदी महासागरामध्ये अत्यंत महत्त्वाच्या जागी असणाऱ्या सेशेल्सला दुसरे डॉर्नियर विमान भेट म्हणून दिले आहे.
 4. सागरी संकटांपासून वाचण्यासाठी या विमानाचा आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी सेशेल्सला या विमानाची मदत होणार आहे.
 5. सेशल्सच्या समुद्रात होत असलेल्या चिनी कारवायांच्या पार्श्वभूमीवर, सेशल्समध्ये नाविक तळ उभारण्यासाठी भारत आणि सेशल्समध्ये महत्त्वपूर्ण करार झाला आहे.
 6. सेशल्सच्या अधिकार क्षेत्रात भारताकडून उभारण्यात येणाऱ्या या नाविक तळामुळे हिंदी महासागरात भारताचे बळ वाढणार आहे.
 7. काही दिवसांपूर्वी सेशल्सने आपल्या असम्शन बेटांवर भारताच्या मदतीने उभारण्यात येणाऱ्या नाविक तळाबाबतचा करार रद्द करण्याची घोषणा केली होती.
 8. मात्र या कराराबाबतच्या सेशल्सच्या शंका दूर झाल्यानंतर भारताचा येथे नाविक तळ उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


Top

Whoops, looks like something went wrong.