
2091 23-Feb-2018, Fri
- इस्रायलच्या सहकार्याने उभारलेल्या भारताच्या ईशान्य क्षेत्रात पहिल्या ‘क्षेत्रीय कृषी केंद्रा’चे उद्घाटन मिजोरममध्ये 7 मार्चला केले जाणार आहे.
- 8 ते 10 कोटी रुपये खर्चाचे हे केंद्र विशेष रूपाने आंबट फळांच्या औद्योगिक प्रक्रियेसाठी असणार आहे.
- हा प्रकल्प कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, मिजोरम राज्य शासन आणि इस्रायली सरकार यांच्या सहकार्याने चालवले जाणार आहे.
- इस्रायल विशेषज्ञता आणि व्यावसायिक पाठबळ प्रदान करणार आहे.
- भारतात सध्या 22 क्षेत्रीय कृषी केंद्र कार्यरत आहेत, ज्यामध्ये हरियाणा, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान आणि पंजाब यांचा समावेश आहे.
- पहिले केंद्र 2008 साली हरियाणामध्ये स्थापित केले गेले.