Mehmood Abu Zaid gets '2018 UNESCO / Guillermo Kano Press Freedom' award

 1. तुरुंगवास भोगत असलेल्या महमूद अबू झैद यांना यंदाचा 2018 UNESCO/गुईलर्मो कानो प्रेस फ्रीडम पारितोषिक जाहीर झाला आहे.
 2. महमूद अबू झैद इजिप्तमधील एक छायाचित्र पत्रकार आहेत, जे सध्या पाच वर्षांपासून तुरुंगवास भोगत आहेत.
 3. 2013 साली काहिरामध्ये सुरक्षा दल आणि माजी राष्ट्रपती मुहम्मद मुर्सी यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीला कॅमेरात कैद करतांना त्यांना अटक करण्यात आली होती.
 4. चकमकीत तीन पत्रकारांसहित शेकडो लोक मारले गेले होते.
 5. संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) तर्फे ‘गुईलर्मो कानो प्रेस फ्रीडम’ पारितोषिक दिला जातो.
 6. $25,000 चे रोख बक्षीस असलेला हा पुरस्कार अश्या व्यक्तीला, संघटनेला किंवा संस्थेला दिला जातो.
 7. ज्यांनी विशेषतः धोक्याच्या परिस्थितीत वृत्त स्वातंत्र्य जपण्यास किंवा त्याला प्रोत्साहन देण्यासाठी आपले उत्कृष्ट योगदान दिले आहे.
 8. पुरस्कारासाठी कानो फाऊंडेशन (कोलंबिया) आणि हेलसिंगन सॅनोमत फाऊंडेशन (फिनलँड) यांच्याकडून निधी मिळतो.
 9. हा पुरस्कार कोलंबियाच्या गुईलर्मो कानो इसाझा या पत्रकाराच्या सन्मानार्थ दिला जातो, ज्याची 1986 साली त्याच्याच कार्यालयासमोर हत्या करण्यात आली.


"Earth Biogeon Project (EBP)": An overall digital library of life

 1. अलीकडेच “अर्थ बायोजिनोम प्रोजेक्ट (EBP)” याबाबत चर्चा चालू आहे.
 2. हा प्रकल्प संपूर्ण जगात राबविण्यात येणार असून यामधून आतापर्यंत पृथ्वीवर जीवांची उत्क्रांती कश्यापद्धतीने झाली याबाबतचा प्रश्न सोडवला जाऊ शकणार आहे.
 3. या प्रकल्पाच्या माध्यमातून जणूकांच्या क्रमाच्या माध्यमातून एक योजना आखण्यात येणार आहे.
 4. ज्याचा वापर अभ्यासाकरिता केला जाऊ शकणार आहे. सो बतच आजारासंबंधी माहिती अद्ययावत केली जाणार आहे.
अर्थ बायोजिनोम प्रोजेक्ट (EBP)
 1. प्रकल्पाबाबत:-
  1. अर्थ बायोजिनोम प्रोजेक्ट (EBP) प्रकल्पात पेशी असलेल्या जीवांच्या (पशू आणि वनस्पती) प्रत्येक प्रजातींचा एक विस्तृत जिनोमच्या अनुक्रमासंबंधी आराखडा प्रस्तावित आहे.
  2. हा उपक्रम चालविण्याकरिता 10 वर्ष लागण्याचा अंदाज आहे, ज्याला $4.7 अब्जचा खर्च अपेक्षित आहे. ती माहिती डिजिटल स्वरुपात साठवून ठेवण्याकरिता 200 पेटाबाइट्सपेक्षा अधिक स्टोरेज क्षमता आवश्यक आहे.
  3. जीवाणू वर्ग वगळता पेशीयुक्त जीवांची संख्या पृथ्वीवर अंदाजे 10 ते 15 दशलक्षपर्यंत आहे. आतापर्यंत केवळ 0.2% पेक्षा कमी (15,000 पेक्षा कमी) प्रजातींच्या जिनोमला अनुक्रमित केले गेले आहे.
 2. प्रकल्पाचे महत्त्व:-
  1. यामुळे शास्त्रज्ञांना आजार आणि आरोग्य यांसोबत जणूकांच्या जाळ्याचा संबंध शोधण्यास मदत मिळणार तसेच अनपेक्षित दुवे देखील शोधण्यास एक मार्ग मिळणार आहे.
  2. मानवी जिनोमचे वर्गीकरण करणे हा शैक्षणिक, औद्योगिक आणि वैद्यकीय नवकल्पना यांसारख्या विविध दृष्टीने आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि अतिमहत्त्वाचा क्रियाकलाप ठरू शकतो.
  3. 2013 सालच्या अभ्यासानुसार, अमेरिकेत केवळ एक प्रजातीबद्दल झालेल्या अश्याच प्रकारच्या एका शोधअभ्यासातून तब्बल $1 लक्ष कोटींचा व्यापार करण्यात आला.
  4. असे पाहता जर पृथ्वीवरील प्रत्येक प्रजातींसंबंधी असा अभ्यास चालवल्यास त्याचा सर्व घटकांना लाभ मिळू शकणार आहे.


 Six countries in UNASUR have canceled their membership

 1. सहा सदस्य देशांनी ‘दक्षिण अमेरिका राष्ट्र संघ (Union of South American Nations -UNASUR)’ या प्रादेशिक गटामधील आपले सभासदत्व रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
 2. अर्जेंटिना, ब्राझील, चिली, कोलंबिया, पराग्वे आणि पेरू यांनी तात्पुरत्या स्वरूपात आपले सभासदत्व मागे घेतले आहे.
 3. त्यांच्यात UNASURचे नेतृत्व कोणत्या देशाकडे असावे याबाबत मतभेद निर्माण झाले आहेत.
 4. ‘दक्षिण अमेरिका राष्ट्र संघ (Union of South American Nations -UNASUR)’ हा दक्षिण अमेरिका उप-खंडातल्या देशांचा एक गट आहे.
 5. यामध्ये बोलिव्हिया, इक्वेडोर, गयाना, सुरिनाम, उरुग्वे, व्हेनेझुएला, अर्जेंटिना, ब्राझील, चिली, कोलंबिया, पराग्वे आणि पेरू या देशांचा समावेश होतो.
 6. व्हेनेझुएलाचे दिवंगत राष्ट्रपती हुगो चावेझ यांच्या नेतृत्वात 23 मे 2008 रोजी UNASURच्या संहितेवर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या आणि या गटाची स्थापना झाली.


In the Western Ghats of India found the world's smallest land fern

 1. भारतीय संशोधकांना गुजरातच्या डांग जिल्ह्यात पश्चिम घाटाच्या अहवा जंगलात जमिनीवर वाढणारे जगातले सर्वात लहान नेचाचे रोप (land fern) आढळून आले आहे.
 2. नखाच्या आकाराएवढी वाढणारी ही वनस्पती अॅडर्स टंग फर्न या गटामधली आहे.
 3. ‘ओफिओग्लोसम मालवीए’ नाव देण्यात आलेले हे नेचाचे रोप केवळ एक सेंटिमीटरपर्यंत वाढणारी वनस्पती आहे.
 4. सूरतच्या वीर नर्मद दक्षिण गुजरात विद्यापीठातील जैवशास्त्र विभागाचे संशोधक मितेश पटेल यांच्या नेतृत्वात 2016 साली चालविलेल्या एका वनस्पतिशास्त्रीय मोहिमेदरम्यान ही वनस्पती आढळून आली होती.


Senior Journalist S. Nihal Singh passed away

 1. प्रसिध्द जेष्ठ पत्रकार एस. निहाल सिंग यांचे वयाच्या ८९व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
 2. १९२९मध्ये रावळपिंडीत जन्मलेल्या निहाल सिंग यांची लोकशाही विचारांचे उदारमतवादी संपादक अशी ख्याती होती.
 3. निहाल सिंह इंडियन एक्स्प्रेसचे संपादक होते. याशिवाय, द स्टॅट्समॅनचे मुख्य संपादकआणि खलील टाइम्स व इंडियन पोस्टचे संपादक म्हणूनही त्यांनी काम केले होते.
 4. आणीबाणीविरोधात ताठ मानेने उभे राहिलेल्या थोडय़ा पत्रकारांमध्ये त्यांचे नाव अग्रस्थानी घेतले जाते.
 5. आणीबाणीत त्यांनी ‘स्टेट्मन’च्या पहिल्या पानावर ‘आजचा अंक सेन्सॉरशिपखाली छापला गेला आहे’ असे वाक्य ठळकपणे छापून इंदिरा गांधी सरकारच्या आणीबाणीचा निषेध केला होता.
 6. न्यूयॉर्कमधील ‘इंटरनॅशनल एडिटर ऑफ द इयर’ (१९७७) या मानाच्या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते.
 7. गेली २० वर्षे ते स्तंभलेखन करत होते. ओघवत्या शैलीत ते सरकारी धोरणांतील चुकांवर बोट ठेवत त्यामुळे त्याचे लेखन लोकप्रिय होते.
 8. संपादक होण्याआधी निहाल सिंग यांनी पाकिस्तान, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, सिंगापूर, अमेरिका, इंडोनेशिया या देशांत प्रतिनिधी म्हणून काम केले. यामुळे निहाल सिंग यांच्याकडे विदेशनीतीतज्ज्ञ म्हणूनही पाहिले जाई.
 9. त्यांचे वडील गुरमुख सिंग दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष व दिल्लीचे मुख्यमंत्री होते, नंतर राजस्थानचे राज्यपालही होते.


Top