mary kom has won gold medal at poland

 1. भारताची आघाडीची महिला बॉक्सर मेरी कोमने, पोलंड येथील ग्लिविसेत सुरु असलेल्या सिलेसियान बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
 2. ४८ किलो वजनी गटात मेरी कोमने कझाकिस्तानच्या प्रतिस्पर्धी खेळाडूचा ५-० ने पराभव करत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं.
 3. राष्ट्रकुल स्पर्धेनंतर झालेल्या दुखापतीमुळे मेरी कोमने आशियाई स्पर्धांमधून माघार घेतली होती. मात्र यानंतर पोलंडमधील स्पर्धेमधून पुनरागमन करत मेरी कोमने सर्वांना आपली दखल घेण्यास भाग पाडलं आहे.
 4. भारताच्या मनिषानेही ५४ किलो वजनी गटात रौप्य पदकाची कमाई केली आहे.
 5. संपूर्ण सामन्यात मेरी कोमच्या खेळापुढे तिच्या प्रतिस्पर्धी खेळाडूचा निभावच लागू शकला नाही.
 6. मेरीने उजव्या हाताने केलेले प्रहार तिच्या प्रतिस्पर्धी खेळाडूच्या चांगलेच वर्मावर बसले. याचसोबत ज्यावेळी कझाकिस्तानच्या खेळाडूने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी मेरीने तिचे प्रयत्न हाणून पाडले. मात्र दुसऱ्या सामन्यात युक्रेनच्या इव्हाना क्रुपेनियाने भारताच्या मनिषावर ३-२ ने मात केली.
 7. अटीतटीच्या झालेल्या सामन्या इव्हानाच्या आक्रमक खेळापुढे मनिषाचा निभाव लागू शकला नाही. यामुळे भारताला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं.


swachatta hi seva in all over india

 1. ‘स्वच्छता ही सेवा’ हे अभियान १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत राबवले जाणार आहे. या अभियानाचा नरेंद्र मोदी यांनी शनिवारी शुभारंभ केला. 
 2.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहाडगंज येथील शाळेत हातात झाडू घेऊन साफसफाई केली.
 3. देशभरात ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
 4. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह व अन्य केंद्रीय मंत्री हातात झाडू घेऊन रस्त्यावर उतरले. अभियानापूर्वी नरेंद्र मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विद्यार्थी व देशातील मान्यवर व्यक्तींशी संवाद साधला.
 5. मोदी म्हणाले, देशातील सर्वच स्तरातील लोकांनी व स्वच्छता प्रेमींनी सक्रिय सहभाग नोंदविल्यामुळे ‘स्वच्छ भारत मिशन’ यशस्वी होऊ शकले. या अभियानात ज्या स्वच्छाग्रहींनी सहभाग नोंदविला, त्यांचे योगदान सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल.
 6. मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा आणि प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन हे देखील यात सहभागी झाले. चार वर्षांपासून सुरु असलेल्या स्वच्छता अभियानाला देशातील सर्वच स्तरातील लोकांनी पाठिंबा दिला आहे. टाटा ट्रस्टने स्वच्छता अभियानामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला असून राष्ट्रनिर्माणाच्या कार्यातही टाटा परिवाराचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे.
 7. अमिताभ बच्चन यांनी स्वच्छतेसाठी जनजागृती केली असून स्वच्छतेसोबतच सामाजिक अभियानामध्ये देखील अमिताभ बच्चन यांचे मोठे योगदान आहे.
 8. स्वच्छता अभियानात केलेल्या सहकार्याबद्दल मोदींनी बच्चन आणि टाटा यांचे आभार मानले.
 9. अभियानाला सुरुवात होताच देशाच्या विविध भागांमध्ये भाजपाचे नेते व सरकारी अधिकारी हातात झाडू घेऊन साफसफाईसाठी रस्त्यावर उतरले.
 10. पश्चिम रेल्वेवर वांद्रे टर्मिनस आणि महालक्ष्मी येथे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्वच्छता मोहीम राबवली. (एक्स्प्रेस फोटो: दिलीप कागडा)
 11. या प्रसंगी रतन टाटा म्हणाले, कोणतीही वास्तू उभारण्यासाठी पाया मजबूत असणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे स्वच्छता हाच आपल्या देशाचा पाया आहे.
 12. पंतप्रधानांनी स्वच्छतेसाठी जे कार्य केले, ते महत्त्वपूर्ण आणि धाडसी असल्याचे त्यांनी नमूद केले.


tata motors will start india mleade defence vehicle

 1. हे भारतातील पहिले पायदळातील लढाऊ वाहन आहे
 2. टाटा मोटर्स ही भारताच्या खासगी क्षेत्रातील सुरक्षा भागामधील सर्वात मोठी लँड मोबिलिटी प्लेअर आहे. या कंपनीतर्फे पुण्यात झालेल्या बिम्सटेक नेशन्स समिट २०१८मध्ये, भरपूर प्रमाणात निर्यातीची क्षमता असलेली दोन प्रमुख वाहने सादर करण्यात येतील.
 3.  ४x४ माइन प्रोटेक्टेड व्हेइकल (एमपीव्ही) आणि द डब्ल्यूएचएपी८x८ आयसीव्ही (ड्रोडोसह संलग्नितपणे विकसित करण्यात आलेली) ही वाहने लष्कर प्रमुख आणि बिम्सटेक नेशन्समधील ४०० पेक्षा जास्त लष्करी अधिकारी यांच्यासमोर सादर करण्यात येतील.
 4. या वाहनांमुळे लष्करी श्रेणीतील टाटा मोटर्सची तज्ज्ञता आणि `मेक इन इंडिया फॉर डिफेन्स’ या भारत सरकारच्या पॉलिसीसंबंधातील वचनबद्धता अधोरेखित होणार आहे.
 5. टाटा मोटर्सने अलिकडेच बिम्सटेक नेशन्सबरोबर महत्त्वाच्या लष्करी वाहनांच्या पुरवठ्याचा करार केला, यात टाटा एक्सेनन जीएस ८०० ते म्यानमार, टाटा माइन प्रोटेक्टेड व्हेइकल्स फॉर युनिफिल, मोनुस्को अँड माली मिशन्स, टाटा २.५टी एलपीटीए ७१५ ४x४ ते मॅनमार आणि थायलंड, टाटा ५टी जीएस एलपीटीए १६२८ ४x४ ते नेपाळ आणि मिशन स्पेसिफिक लॉजिस्टिक वाहने यूएनच्या शांतता राखण्याच्या मिशनसाठी पाठवण्यात आली आहेत.
 6. या निमित्ताने, टाटा मोटर्स लिमिटेडचे सुरक्षा आणि प्रशासन व्यवसायाचे उपाध्यक्ष श्री. वेर्नन नोरोन्हा म्हणाले की, ‘आमची सुरक्षा वाहतुकीची श्रेणी अधिकाधिक सबळ होत आहे. आम्ही लढाऊ श्रेणीत, सशस्त्र, लढाऊ पाठिंबा देणारी आणि लॉजिस्टिक वाहून नेणारी वाहने पुरवत आहोत, आमची ही श्रेणी लष्कर, सहलष्कर आणि पोलीस दल यांच्या विविध प्रक्रियांच्या वापरासाठी लोकप्रिय ठरली आहेत.
 7. आमचे आंतरराष्ट्रीय ग्राहक भारतीय लष्कर दल टाटा लष्कर वाहने वापरते हे जाणून आहेत, खूप कठोर अशा खरेदीपूर्व तपासण्यांनंतर (विविध भूभाग आणि हवामानाची परिस्थती यात अनेक वर्षांपासून घेण्यात येणा-या) या वाहनांना लष्करी दर्जा प्राप्त होतो. यामुळे टाटा मोटर्सने आत्मविश्वासाने परदेशी लष्करांसाठी यांची टिकाऊ आणि सुयोग्य घटकांच्या साहाय्याने उभारणी केली आहे.’
 8. ‘टाटा ४x४ माइन प्रोटेक्टेड’ व्हाने (एमपीव्ही) आणि ‘डब्ल्यूएचएपी ८x८ इन्फ्रंट्री कॉम्बॅट व्हेइकल’ पूर्णपणे देशी तज्ज्ञतेअंतर्गत तयार करण्यात आलेले आहे, याद्वारे भारत आणि परदेशातील सुरक्षेसाठी निषेधार्थ आणि लढाऊ प्रक्रियांमध्ये याचा वापर केला जाऊ शकतो,’’ असेही ते पुढे म्हणाले.
 9. टाटा मोटर्सचे प्रमुख उत्पादन डब्ल्यूएचएपी८X८ (चाकांवर चिलखत घातलेले सशस्त्र वाहन) हे भारतातील पहिले पायदळातील लढाऊ वाहन आहे, सकारात्मकतेने टिकून राहणे, सर्व भूभागांमधील कामगिरी आणि वाढता बेबनाव आदी मुद्दे लक्षात घेऊन, भारतीय सुरक्षा संशोधन आणि विकास संस्था (ड्रोडो)बरोबर संलग्नितपणे ही निर्मिती करण्यात आली आहे.
 10. टाटा मोटर्स हे डब्ल्यूएचएपीची १८ महिन्यांत निर्मिती करणारे भारताच्या खासगी क्षेत्रातील पहिले ओईएम ठरले आहे. हे पूर्णपणे लोडेड वाहन असून यात स्फोटापासून संरक्षण, क्षेपणसामर्थ्यविषयक संरक्षण आणि एनबीसी संरक्षण अशी सुरक्षात्मक वैशिष्ट्ये आहेत. आधुनिकता आणि प्रमाणबद्धता वैशिष्ट्यांमुळे वाहन विविध भूभागांवर कोणत्याही परिस्थितीसाठी आणि कोणत्याही मिशनसाठी सहजपणे बदलता येते, वाहनात १०+२ लोकांची क्षमता आहे,डब्ल्यूएचएपी ८X८ विविध प्रकारांमध्ये उपलब्ध आहे, यात सशस्त्र लढाऊ वाहने, इंजिनिअर स्क्वाड वाहने, मोर्टर कॅरियर, कमांडर वाहने आणि अँटी-टँक मार्गदर्शन मिसाइल वाहने यांचा समावेश आहे.
 11. ४X४ काँन्फिगरेशनसह येणारे माइन प्रोटेक्टेड वाहन (एमपीव्ही) माइन प्रूफ ट्रूपच्या वाहतुकीसाठी खास तयार करण्यात आले आहे, हे कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी खास प्रतिसाद देणारे वाहन असून ते हल्ल्याच्या निषेधार्थ वापरले जाईल, किंवा एस्कॉर्ट प्रोटेक्शन वाहन म्हणून वापरले जाईल. हे वाहन विस्तारीत देशभरातील वाहतुकीसाठी सर्वोत्तम अशा ग्राउंड क्लिअरन्स सह येते. याच्या वजनासाठीच्या उच्चतम क्षमतेच्या प्रमाणामुळे आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये विस्तारीत चालना देणे आणि जास्तीत-जास्त गतीने अधिक जलद प्रतिसाद देणे शक्य होते.
 12. टाटा मोटर्सची भारतीय लष्कर दलाबरोबर १९५८ सालापासून भागीदारी आहे, आणि ती निश्चितच अभिमानास्पद आहे. आतापर्यंत भारतीय लष्कर, सह-लष्कर आणि पोलीस दलाला दीड लाख वाहने पुरवण्यात आली आहेत. टाटा मोटर्स ही सार्क, एएसईएएन आणि आफ्रिकेच्या प्रदेशातील सुरक्षा उपाययोजना देणारी अग्रणीची पुरवठादार कंपनी आहे. याबरोबरच कंपनीने यूएनच्या शांतता राखण्याच्या मिशन्समधील विशेष पुरवठादार म्हणूनही नाव कमावले आहे.


Top

Whoops, looks like something went wrong.