manjit singh has won gold medal in 800 meter

 1. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या दहाव्या दिवशी पुन्हा एकदा अॅथलेटिक्सने भारताला सुवर्णपदकाची कमाई करुन दिली आहे.
 2. मनजीत सिंह आणि जिनसन जॉन्सन यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदकाची कमाई केली. मनजीतने 1:46:15 तर जिनसनने 1:46:35 अशी वेळ नोंदवली.
 3. सुरुवातीला अतिशय सावधपणे सुरुवात केलेल्या दोन्ही भारतीयांनी मोक्याच्या क्षणी वेग घेत आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले.
 4. त्याआधी सकाळच्या सत्रात भारताच्या पुरुष तिरंदाजी संघाने रौप्यपदकाची कमाई केली आहे.
 5. अटीतटीच्या लढतीत शूटऑफमध्ये कोरियाच्या संघाने भारतीय संघावर मात करत विजेतेपद पटकावले.
 6. भारतीय संघाचे हे तिरंदाजीमधले दुसरे रौप्यपदक ठरले आहे.
 7. शूटऑफमध्ये दोन्ही संघाचे गुण हे समसमान झाले होते. मात्र कोरियाच्या खेळाडूंनी लक्ष्याच्या जवळ अधिक मारा केल्यामुळे त्यांना या स्पर्धेचे विजेतेपद देण्यात आले.
 8. यासोबत कुराश प्रकारात भारताच्या भारताच्या मालप्रभा जाधवला कांस्य तर पिनाकी बलहाराला रौप्यपदक मिळाले.


o smart

 1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली अर्थविषयक केंद्रीय समितीने “ओशन सर्व्हिसेस, टेकनॉलॉजी, ऑबजर्वेशन्स , रिसोर्सेस मॉडेलिंग आणि सायन्स (O-SMART)” या एकछत्री योजनेला मंजुरी दिली आहे.
 2.  ही योजना  2017-18 ते  2019-20 या कालावधीत राबवण्यात येणार असून तंत्रज्ञान, संसाधने, निरीक्षण आणि विज्ञान यासारख्या सागरी विकास उपक्रमांच्या १६ उप-प्रकल्पांचा या योजनेत समावेश आहे.
 3.  देशहित आणि आंतरराष्ट्रीय कटिबद्धता लक्षात घेऊन सागरी क्षेत्रातील योजनांच्या अंमलबजावणीचे महत्व ओळखून  ओ -स्मार्ट योजनेचा भाग म्हणून सध्याच्या योजना सुरु ठेवण्याचा मंत्रालयाचा प्रस्ताव आहे.
 4. भविष्यातील मागण्या पूर्ण करण्यासाठी जमिनीवरील संसाधने पुरेशी नसल्याने भारत महासागरातील संसाधनांचा प्रभावी आणि परिणामकारक वापर करण्यासाठी नील अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रित करत आहे. यासाठी सागरी विज्ञान, तंत्रज्ञान विकास आणि सेवा पुरवण्याबाबत माहितीची आवश्यकता आहे.
 5.  तसेच शाश्वत विकासासाठी महासागर, समुद्र आणि सागरी संसाधनांचा काळजीपूर्वक वापर करून संयुक्त राष्ट्राचें शाश्वत विकास उद्दिष्ट-१४ साध्य करण्यासंदर्भात तटीय संशोधन आणि सागरी जैव  विविधता कार्यक्रम सुरु ठेवणे महत्वाचे आहे.
 6. ओ-स्मार्ट योजनेत याचा समावेश आहे. या योजनेत विकसित केले जाणारे महासागर सूचना सेवा आणि तंत्रज्ञान सागरी पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांसाठी महत्वाचे आहे.


O-SMART :

 1. O-SMART अंतर्गत दिल्या जाणाऱ्या सेवांमुळे मत्स्योद्योग, किनाऱ्यावरील उद्योग, किनारी राज्ये, संरक्षण, नौवहन, बंदरे यासारख्या किनारी आणि महासागर क्षेत्रातील अनेक समुदायांना लाभ होईल.
 2.  सध्या पाच लाख मच्छीमार समुदायांना मोबाईलद्वारे ही माहिती मिळते ज्यात मत्स्योद्योग व्यवसायातील संधी आणि किनारपट्टी भागातील स्थानिक हवामान यांचा समावेश असतो. यामुळे मच्छीमारांचा मासे शोधण्याचा वेळ वाचेल आणि इंधनाच्या खर्चातही बचत होईल.
 3. O-SMARTच्या अंमलबजावणीमुळे शाश्वत विकास उद्दिष्ट-१४ संबंधित समस्या सोडवण्यात मदत मिळेल, ज्याचा उद्देश महासागर, सागरी संपत्ती यांचा वापर काळजीपूर्वक करणे हा आहे. नील अर्थव्यवस्थेच्या विविध बाबींच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान विषयक पार्श्वभूमी या योजनेमुळे मिळेल.
 4.  O-SMART योजनेअंतर्गत स्थापन करण्यात येणाऱ्या अत्याधुनिक पूर्वसूचना प्रणालीमुळे त्सुनामी, वादळ यांसारख्या सागरी आपत्तींचा सामना प्रभावीपणे करायला मदत होईल.
 5.  या योजनेअंतर्गत विकसित करण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानामुळे भारतातील सागरी क्षेत्रातून सजीव आणि निर्जीव अशा दोन्ही संसाधनांचा उचित वापर करण्यात मदत मिळेल.


3, person, chosen ,human, space ,mission ,

 1. भारताच्या मानवी अवकाश मोहिमेसाठी तिघांची निवड करण्यात येईल व त्यांना 16 मिनिटात पृथ्वीच्या कक्षेबाहेर पाठवणे शक्य होईल, असे भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे प्रमुख के. सिवन यांनी सांगितले.
 2. पृथ्वी निकटच्या कक्षेत हे भारतीय अवकाशवीर पाच ते सात दिवस राहू शकतील. नंतर त्यांना घेऊन येणारी कुपी गुजरातच्या किनाऱ्यावर अरबी समुद्रात विशिष्ट ठिकाणी पडेल असे सांगून ते म्हणाले की, इस्रोने 2022 पर्यंत गगनयान मोहीम पार पाडण्याचे निश्चित केले आहे. 
 3. पंतप्रधानांनी स्वातंत्र्यदिनी या योजनेची घोषणा केली आहे.
 4. भारताच्या मानवी अवकाश मोहिमेचे सादरीकरण इस्रोचे अध्यक्ष सिवन यांनी केले त्यावेळी अणुऊर्जा व अवकाश खात्याचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह उपस्थित होते.
 5. सिवन यांनी सांगितले की, एका वेळी तीन भारतीय अवकाशात जाऊ शकतील.
 6. यात अवकाशवीरांना नेणारे व इतर महत्त्वाची कामे पार पाडणारे असे दोन प्रकारचे मोडय़ूल असतील ते जीएसएलव्ही मार्क तीन अग्निबाणाने सोडण्यात येतील.
 7. श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपक झेपावल्यानंतर पृथ्वी जवळची 300-400 किलोमीटरची कक्षा अवघ्या 16 मिनिटात प्राप्त करता येईल.


chandrayan 2 will launched on januaray

 1. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) येत्या जानेवारी महिन्यात चांद्रयान-2 या अंतराळ यानाचे प्रक्षेपण करणार आहे.
 2. चांद्रयान-2 या अंतराळ यानाचे जीएसएलव्ही-एमके-3-एम 1 या प्रक्षेपकाद्वारे प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
 3. चांद्रयान-2च्या वजनामध्ये वाढ झाली असून आता ते 3.8 टन इतके झाले आहे. त्यामुळेच चांद्रयान-2चे जीएसएलव्हीद्वारे प्रक्षेपण करता येणार नाही, असेही सिवन यांनी सांगितले.
 4. तसेच गरजेनुसार प्रक्षेपण यान अद्ययावत करून त्याला जीएसएलव्ही-एमके-३ असे स्वरूप देण्यात आले आहे.
 5. तर सदर यानाचे प्रक्षेपण 3 जानेवारी ते 16 फेब्रुवारी दरम्यान करण्याचे ठरविण्यात आले आहे.
 6. दक्षिण ध्रुवाच्या जवळ जाणारे हे जगातील पहिलेच अभियान आहे, असेही सिवन यांनी सांगितले.


in haptathlon india won first gold medal of aisan games

 1. आशियाई क्रीडा स्पर्धेत हेप्टॉथ्लॉनमध्ये भारताला पहिलेच सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या स्वप्ना बर्मनने अत्यंत प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन हे यश मिळवले आहे.
 2. स्वप्नाच्या सुवर्णपदक विजेत्या कामगिरीमुळे आज हेप्टॉथ्लॉन या खेळाचे नाव अनेकांना समजले असेल.
 3. हेप्टॉथ्लॉनमध्ये एकूण सात खेळांचा समावेश होतो. तर तिने दोन दिवसात 6026 गुणांची कमाई करुन सुवर्णपदकाला गवसणी घातली.
 4. पात्रता फेरीमधील पहिल्या दोन (भालाफेक आणि उडी) निकषांमध्ये मोठी आघाडी घेत पहिले स्थान कायम राखल्यानंतर स्वप्नाने 800 मीटरची शर्यत पूर्ण करून सुवर्णपदकावर नाव कोरले.
 5. हेप्टॉथ्लॉन या खेळात अॅथलेटीक्सच्या सात प्रकारांचा समावेश असतो. यामध्ये 200 मी. आणि 800 मी. धावण्याची शर्यत होते.
 6. त्याचबरोबर 100 मी. अडथळ्याची शर्यत खेळवली जाते. त्यानंतर उंच उडी. लांब उडी, गोळाफेक आणि भालाफेक या प्रकारांचा समावेश असतो.


rajasthan gov launched nutrition of month in september

 1. राजस्थान सरकारने ‘सप्टेंबर 2018’ महिना "पोषणाचा महिना" (Month of Nutrition) म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला आहे.
 2. या महिन्यात राज्यात जनजागृती निर्माण करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
 3. शिवाय सप्टेंबर-18 या महिन्यापासून शासकीय शाळांमध्ये इयत्ता 1 ते 8 च्या विद्यार्थ्यांना दररोज दूध दिले जाणार आहे.
 4. 3 ते 6 वर्षे वयोगटातल्या विद्यार्थ्यांसोबतच आंगणवाडी केंद्रात नोंदणीकृत किशोरवयीन मुली आणि गर्भवती स्त्रियांना आठवड्यातून तीनदा दुधाचे वाटप केले जाईल.


Top