M KARUNANIDHI PASSED AWAY

 1. द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांचे 7 ऑगस्ट रोजी चेन्नईच्या कावेरी रुग्णालयात निधन झाले. गेल्या दहा दिवसांपासून प्रकृती अस्वास्थामुळे ते कावेरी रुग्णालयात उपचार घेत होते.
 2. चेन्नईच्या कावेरी रुग्णालयात गेल्या दहा दिवसांपासून 94 वर्षीय करुणानिधी यांच्यावर उपचार सुरु होते.
 3. रक्तदाब जाणवू लागल्याने त्यांना 28 जुलैला कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती आणखीनच खालावली होती. 
 4. करुणानिधी यांच्या निधनाने राष्ट्रीय राजकारणात पोकळी निर्माण झाली आहे.
 5. तसेच तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करूणानिधी यांच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवट्याची घोषणा करण्यात आली आहे. करूणानिधी यांच्यावर चेन्नईत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
 6. पंतप्रधान नरेंद्र मोदींसमवेत अनेक राजकीय नेते अंत्यसंस्कारात सहभागी होणार आहेत.
 7. केंद्र सरकारकडून राष्ट्रीय दुखवट्याची घोषणा करण्यात आली आहे.
 8. केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, दिल्ली आणि देशातील सर्व राज्यातील राजधानीतील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला जाणार आहे.
 9. चेन्नईमध्ये राजकीय सन्मानासह करूणानिधींवर 8 ऑगस्ट रोजी अंत्यसंस्कार होणार आहेत. 
 10. तामिळनाडूसह संपूर्ण देशभरात राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.


microsoft surface book 2 launched in india

 1. मायक्रोसॉफ्टने आपले सरफेस बुक 2 हे उच्च श्रेणीतील लॅपटॉपचे मॉडेल भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून यात अनेक उत्तम फिचर्स आहेत.
 2. मायक्रोसॉफ्टने गत वर्षी सरफेस बुक 2 हे मॉडेल जागतिक बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली होती. आता याला भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्यात आले आहे.
 3. हे टु-इन-वन या प्रकारातील मॉडेल असल्यामुळे याला लॅपटॉप आणि टॅबलेट या दोन्ही प्रकारांमध्ये वापरता येणार आहे. या मॉडेल सोबत सरफेस पेनही वापरता येणार आहे.
 4. मायक्रोसॉफ्ट सरफेस बुक 2 हा लॅपटॉप 13.5 आणि 15 इंच आकारमानाच्या डिस्प्लेमध्ये सादर करण्यात आला आहे. यातील 13.5 इंची मॉडेलमध्ये 3000 बाय 2000 पिक्सल्स क्षमतेचा तसेच पिक्सलसेन्स या प्रकारचा डिस्प्ले असेल.
 5. तर 15 इंची मॉडेलमध्ये 3400 बाय 2000 पिक्सल्स क्षमतेचा पिक्सलसेन्स या प्रकारातील डिस्प्ले देण्यात आला आहे.
 6. तसेच याच्या विविध व्हेरियंटमध्ये सातव्या पिढीतील कोअर आय-5 आणि आठव्या पिढीतील कोअर आय-7 हे अत्यंत गतीमान प्रोसेसर देण्यात आले आहेत. याशिवाय यात एनव्हिडीया जीफोर्स जीटीएक्स 1050 आणि जीटीएक्स 1060 हे ग्राफीक्स प्रोसेसर असतील.
 7. यातील विविध व्हेरियंटच्या रॅम 6 आणि 16 जीबी असतील. तर स्टोअरेजसाठी 256 जीबी, 512 जीबी आणि 1 टिबी असे पर्याय देण्यात आले आहेत.


Top