
1960 18-Jan-2018, Thu
- इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या भारत दौर्यादरम्यान नवी दिल्लीत तिसर्या 'रायसीना संवाद’ या भू-राजनैतिक परिषदेला सुरुवात करण्यात आली आहे.
- ‘मॅनेजींग डिसरप्टीव्ह ट्रांझिशन्स: आयडियाज, इंस्टिट्यूशन अँड इडियम’ या संकल्पनेखाली ही परिषद भरविण्यात आली आहे.
- तीन दिवस चालणारी ही परिषद परराष्ट्र मंत्रालय आणि ऑब्जर्वर रिसर्च फाउंडेशन यांच्याद्वारा संयुक्त रूपात आयोजित केली गेली आहे.
- परिषदेत 90 देशांमधून आलेल्या 150 हून अधिक वक्ता आणि 550 प्रतिनिधींनी भाग घेतला आहे.
- 'रायसीना संवाद’ ही नवी दिल्लीत दरवर्षी आयोजित होणारी बहुपक्षीय परिषद आहे.
- 2016 सालापासून परिषदेचे आयोजन ऑब्जर्वर रिसर्च फाउंडेशन (स्वायत्त वैचारिक संस्था) करते.
- "रायसीना" हे नाव नवी दिल्लीमधील ‘रायसीना हिल’ ठिकाणावरून ठेवले गेले आहे.
- जे भारत सरकार तसेच राष्ट्रपती भवन, राष्ट्रपती भवन यांच्यासाठीचे घर आहे.